शाहरुख खानचा अपमान??

शाहरुख खानचा अपमान
विनाकारण एखाद्या फालतु आउट ऑफ प्रपोर्शन ब्लो करुन तेच ते दळण, पुन्हा पुन्हा दळत रहाणं हे एक आवडिचं काम आहे मिडीयाचं. अगदी टीव्ही पासुन तर मटा पर्यंत या फालतु न्युजला अगदी  फर्स्ट पेज वर स्थान दिलं. मग या न्युजच्या पुढे कालच्या स्वातंत्र्य दिनाच्या बातम्या पण मागे पडल्या. शोभा डे च्या ब्लॉगवर काल वाचलं होतं.. ति म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे डिलेड मेनोपॉज.. खरंच कां असं आहे?
भारतामधे व्हिआयपी ट्रिटमेंट्स ची इतकी सवय झालेली असते लोकांना, की त्या मधे मग सेफ्टी कडे संपुर्ण दुर्लक्ष केलं जातं. अशिच ट्रिटमेंट आपल्याला इतर ठिकाणीही मिळावी अशी अपेक्षा असणं अगदी चुकिचं आहे असं मला तरी वाटतं.
अमेरिकेत ९/११ नंतर एकही टेररिस्ट हल्ला झालेला नाही..कारण अमेरिका सेफ्टी इशुज ला सगळ्यात जास्त महत्व देते. आता प्रियंका चोपडा म्हणजे ब्रॅड पिट ला पण जर भारतामधे असंच चेक केलं तर चालेल कां?? मी म्हणतो, कां चालु नये? ब्रॅड पिट हा फक्त एक अभिनेता म्हणुन जरी चांगला असला तरिही त्याचे पर्सनल लाइफ आणि पोलिटीकल व्ह्युज बद्दल काहिच खात्री देता येत नाही. अगदी मायकेल जॅक्सन आणि कॅशियस क्ले पण मुस्लिम झाले होते. जर एखादा माणुस थोड्याशा स्वार्थासाठी जर आपला धर्म बदलु शकतो, तर तो लॉयल्टी पण बदलु शकणार नाही के कशावरुन??
आपल्या कडले सगळे सो कॉल्ड हिरोज ( मला खरं तर ऍक्टर्स लिहायचं होतं) इन्क्लुडींग गोविंदा ( एक्स मेंबर ऑफ पार्लमेंट) कधी ना कधी तरी डॉन च्या इशाऱयावर नाचलेले आहेतच दुबईला जाउन.. जर ते काही पैशासाठी नाचु शकतात  एका देशद्रोह्यापुढे, तर ते कशावरुन……………….जाउ द्या…
मला बरेचदा भारतियांच्या मानसिकतेची खरंच किव येते. अमेरिकेत जाण्यापुर्वी तुम्हाआम्हाला मिळालेली व्हिसाच्या वेळेसची ट्रिटमेंट आणि तुमच्याकडे संशयाने पहाणारा तो अधिकारी.. या सगळ्यांना आपण सहन करतोच नां?मग एकदा व्हिसा मिळाल्यावर तिथे गेल्यावर पण अशा गोष्टी सहन करायची तयारी ठेवलिच पाहिजे. आणि शाहरुख खानला चौकशिसाठी अडवुन ठेवण्यात मला तरी काही एक वावगं वाट्त नाही.
भारतामधली सवय, की आम्ही अल्पसंख्यांक आहोत म्हणुनच आम्हाला वेगळी वागणुक आहे हेच तुणतुणं तिथे पण वाजवतोय शहारुख..
या बाबतित सलमानची कॉमेंट रास्त आहे, तो म्हणतो, मला पण बरेचदा तसं चेक करण्यात आलंय, त्यात काही विशेष नाही. पण आपल्याकडे उठसुठ कोणालाही व्हिआयपी ट्रिटमेंटची इतकी सवय झालेली असते की थोडंही कायद्यानुसार केलेलं काम त्यांना आपला अपमान वाटू लागतो.
इनफर्मेशन ऍंड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर ( ???? हा हा हा???) अंबिका सोनी म्हणते की भारताने पण आता टीट फॉर टॅट वागायला पाहिजे.. अरे काय हे.. देवाने जीभ दिलि आहे म्हणुन काय उचलायची अन लावायची टाळ्याला?? काही तरी सेन्सेटिव्ह स्टेटमेंटच्या ऐवजी हे काय स्टेटमेंट आहे एका मंत्र्याचं??

SRKविनाकारण एखाद्या फालतू बातमीला प्रमाणाबाहेर  फुगवून   तेच ते दळण, पुन्हा पुन्हा दळत रहाणं हे एक आवडीचं काम आहे मिडीयाचं. अगदी टीव्ही पासून तर मटा पर्यंत या फालतू बातमीला अगदी  पहिल्या पानावर वर स्थान दिलं. मग या बातमीच्या पुढे कालच्या स्वातंत्र्य दिनाच्या बातम्या पण मागे पडल्या. शोभा डे च्या ब्लॉगवर काल वाचलं होतं..ती म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे डिलेड मेनोपॉज.. खरंच का असं आहे?

अमेरिकेत ९/११ नंतर एकही टेररिस्ट हल्ला झालेला नाही..कारण अमेरिका सेफ्टी इशूज ला सगळ्यात जास्त महत्व देते. आता प्रियंका चोपडा म्हणजे ब्रॅड पिट ला पण जर भारतामधे असंच चेक केलं तर चालेल का?? मी म्हणतो, का चालू नये? ब्रॅड पिट हा फक्त एक अभिनेता म्हणून जरी चांगला असला तरीही त्याचे पर्सनल लाईफ आणि पोलिटीकल व्ह्युज बद्दल काहीच खात्री देता येत नाही.आणि प्रियंका बाई , जर भारतामधे ब्रॅड पिट ला तशी वागणूक न देता व्हिआयपी वागणूक मिळत असेल तर तो भारतीय सुरक्षा व्यवस्थेचा एक कमकुवत दुवा आहे  असं मला तरी वाटतं…असं होत असेल (त्याची सुरक्षा तपासणी न करता त्याला आत येउ देणं) तर ते पुर्णपणे चुकीचे आहे. असं व्हायला नको.. त्याचं पण व्यवस्थित चेकिंग व्हायलाच पाहिजे तो भारतात आल्यावर.सिक्युरीटी पहिले आणि स्टार स्टेटस वगैरे सगळं नंतर..

अगदी मायकेल जॅक्सन आणि कॅशियस क्ले पण मुस्लिम झाले होते. जर एखादा माणुस थोड्याशा स्वार्थासाठी जर आपला धर्म बदलू शकतो, तर तो लॉयल्टी पण बदलू शकणार नाही के कशावरून??ती मंदाकीनी म्हणे दाऊदच्या भावाची बायको (?) झाली आहे.

आपल्या कडले सगळे सो कॉल्ड हिरोज ( मला खरं तर ऍक्टर्स लिहायचं होतं) इन्क्लुडींग गोविंदा ( एक्स मेंबर ऑफ पार्लमेंट) कधी ना कधी तरी डॉन च्या इशाऱयावर नाचलेले आहेतच दुबईला जाउन.. जर ते काही पैशासाठी नाचु शकतात  एका देशद्रोह्यापुढे, तर ते कशावरून……………….जाउ द्या…सलमान खान म्हणणं बरोबर आहे तो  म्हणतो, की असे कडक उपाय अमेरिकेत आहेत म्हणूनच ९/११ नंतर तिथे दुसरा अटॅक झालेला नाही. अशा प्रकारच्या तपासण्या ह्या  नेहेमीच होतात अमेरिकेत, त्यात काहीच विशेष नाही.चला एक तरी सेन्सेटीव्ह हिरो निघाला म्हणायचा..

एका सामान्य नागरीकाप्रमाणे दिल्या गेलेली वागणूक त्याला अपमान वाटली.. त्यालाच कशाला आपल्या मिडियाला पण तो अपमान वाटला. दिवसभर ब्रेकिंग न्युज होती त्या भिकारचोट चॅनल्सवर “शाहरुख खान का अमेरीकामे अपमान”!! सेन्सलेस कॅरेक्टर्स!!मी म्हणतो, असा मोठा काय फरक पडला शाहरुखखानला अडकवुन ठेवल्याने? काय त्याच्या अंगाला भोकं पडलीत का सिक्युरिटी चेक मुळे? नाही नां?? मग कशाला उगाच इतका बाउ केला जातोय या गोष्टीचा??

मला बरेचदा भारतीयांच्या मानसिकतेची खरंच कीव येते. अमेरिकेत जाण्यापूर्वी तुम्हाआम्हाला मिळालेली व्हिसाच्या वेळेसची ट्रिटमेंट आणि तुमच्याकडे संशयाने पहाणारा तो अधिकारी.. या सगळ्यांना तुम्ही सहन करताच ना??मग एकदा व्हिसा मिळाल्यावर तिथे गेल्यावर पण अशा गोष्टी सहन करायची तयारी ठेवलीच पाहिजे. आणि शाहरुख खानला चौकशीसाठी अडवून ठेवण्यात मला तरी काही एक वावगं वाटत नाही.

शाहरुख खान स्वतःला इंटरनॅशनल स्टार समजतो. भारत , पाकिस्तान बाहेर त्याला अमेरिकेत प्रत्येक माणसाने ओळखावे असे प्रियंका चोपडा आणि इतर कलाकारांना का वाटते? त्याचं इंटर्नॅशनल फिल्म्स मधे कॉंट्रिब्युशन कितीसं आहे असं? शून्य!!!भारतामधील सवय, की आम्ही अल्पसंख्यांक आहोत म्हणूनच आम्हाला वेगळी वागणूक आहे हेच तुणतुणं तिथे पण वाजवतोय शहारुख.इथली सवय तिथे चालवून घेतली जाणार नाही. त्याला अडकवून ठेवण्याचं कारण होतं की त्याचं सामान आलेलं नव्हतं इंग्लंडहून, ते का आलं नाही याची चौकशी करण्यात येत होती. .या बाबतीत सलमानची कॉमेंट रास्त आहे, तो म्हणतो, मला पण बरेचदा तसं चेक करण्यात आलंय, त्यात काही विशेष नाही. पण आपल्याकडे उठसुठ कोणालाही व्हिआयपी ट्रिटमेंटची इतकी सवय झालेली असते की थोडही कायद्यानुसार केलेलं काम त्यांना आपला अपमान वाटू लागतो.

इनफर्मेशन ऍंड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर (  हा हा हा ) अंबिका सोनी म्हणते की भारताने पण आता टीट फॉर टॅट वागायला पाहिजे.. अरे काय हे.. देवाने जीभ दिली   आहे म्हणून काय उचलायची अन लावायची टाळ्याला?? काही तरी सेन्सेटिव्ह स्टेटमेंटच्या ऐवजी हे काय स्टेटमेंट आहे एका मंत्र्याचं??म्हणजे काय हो मॅडम?? अमेरिकेतुन कोणीही आला तरी त्याची स्ट्रिक्ट तपासणी करायची म्हणता होय?? ( मग सध्या काय तपासणी न करताच त्यांना भारतात येऊ देता काय?)तसं असेल तर, तुमचं स्टेटमेंट रास्त आहे,  बरं झालं,  वेळीच जाग आली. देशाची सुरक्षा थोडी तरी मजबुत होईल तसं केलं तर..

शाहरुख खान आणि तमाम इतर सिनेमातल्या सो कॉल्ड व्हिआयपी लोकांना एक सजेशन आहे, जर तुम्हाला अमेरिकेत आपला अपमान होतोय असं वाटत असेल तर अजिबात तिथे जायची गरज नाही. त्यांनी काही तुम्हाला अक्षता देऊन बोलावलेले नाही की तुम्ही आमच्या अमेरिकेत या म्हणून.. नका जाऊ ना भारता बाहेर .. !!! म्हणजे तुम्हाला तुमचे व्हिआयपी स्टेटस इथे भारतामधे गोंजारत बसून कौतुक करवून घेता येइल. इथे भारतात आहेत ना करोडॊ लोकं तुमचे लाड करायला.यावर आता अजुन काही जास्त लिहायची इच्छा नाही माझी.. बंद करतो आता.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , . Bookmark the permalink.

33 Responses to शाहरुख खानचा अपमान??

 1. andy says:

  Kupach marmik lihile aahe tumhi….
  Shaharukh should consider him fortunate that USA officers did not perform ” CAVITY SEARCH ” on him.

 2. Pravin says:

  मी पण अगदी हेच विचार मांडणार होतो. बरं झालं तुम्ही लिहिलत ते 🙂 त्यांचा देश आहे, ते हवे तशी सिक्युरिटी ठेवू शकतात. तुमच्या XXX दम असेल तर तुम्हिही तसली किंवा त्यापेक्षा कडक सिक्युरिटी ठेवा ना.

 3. sahajach says:

  मनापासून पटले…..आपल्या लोकांना स्ट्रीक्ट चेकिंग चा अर्थ समजला असता तर स्वाईन फ़्लूचे असे स्वागत केलेच नसते भारताने….हेच जर एखाद्या समाजसेवेसाठी झटणाऱ्या व्यक्तीचे झाले असते तर निम्म्या जनतेला काहीही फरक पडला नसता…पण शाहरुख होता ना!!! मग पेटून उठायलाच हवय!!!!

 4. प्रविण
  खरंतर आजचं पोस्ट लिहुन झालेलं होतं. पण आजचा मटा उघडला, ती फ्रंट पेज न्युज पाहिली आणि माझं डोकंच खराब झालं , आणि हे पोस्ट लिहिलं.आमच्या सिक्युरिटी म्हणजे सामान्य माणसाला त्रास देणे.. बस्स!! आणि नेते /सिनेमा नट/क्रिकेट खेळाडूंच्या पुढे लोटांगण घालणारे..
  तन्वी..
  अगदी खरं. कायदे धाब्यावर बसवुन जगायची सवय लागलेली आहे या मंडळींना.. त्याचाच परिणाम आहे हा!!

 5. देवेंद्र चुरी says:

  आपल्या देशात खुप लाड करून ठेवले आहेत ह्या स्टार्सचे.. बहुतेक ठिकाणी बायपास मिळतो असतो यांना म्हणून शेफारले आहेत हे .मलाही काही गैर वाटल नाही या प्रकरणात याउलट मागे शाहरुखने गावस्कर यांना उद्देशून जे विधान केले होते तो सुनील गावसकार यांचा अपमान होता.

 6. अगदी मुद्द्याचंआणि मनातलं बोललात!
  मिडियाला अणि ह्या सिनेनट – नट्यांना आता प्रसिद्धिचीच भुख आहे हेच या सगळ्यांवरुन दिसुन येतं.. याच मिडियाने आ. डॉ. अब्दुल कलाम यांच्या अपमानाबद्दल का मौन पाळले होते? आणि अल्पसंख्यांक आहोत हे रडगाणं किती दिवस गाणार आहेत ?

 7. दिपक
  प्रतिक्रियेकरता आभार..

 8. मी आजच कुठेतरी लिहिले की या शाहरूखचा एक सिनेमा येतोय ’माय नेम इज खान’ नावाचा. यात हाच विषय आहे ९/११ नंतर अमेरिकेत होणारी सर्वसामान्य मुस्लिमांची गळचेपी. मला तर वाटतेय की या नाटकी शाहरुखचा व त्या बावळट करण जोहरचा काहीतरी पब्लिसीटी स्टंट आहे हा !!!!!!!!!!!!

 9. Amol says:

  Maazya manaatahee agadee hech aale hote.
  I am glad that he was treated like this. In fact all ‘so called’ Indian celebrities need to be treated like this every now and then, so that they will get to know what their level is.

  -Amol
  http://www.anaamik.blogspot.com

 10. Aparna says:

  काल मी ही बातमी ऑनलाइन पाहिली आणि मला वाटलंच होतं की आज “काय वाट्टेल ते” मध्ये हाच विषय येणार म्हणून आणि विचारही हे असेच. अगदी बरोबर आहे महेन्र्दकाका, तुमचं अगदी पटतयं. आपण इतक्या गोष्टी वेस्टर्न कंट्रीज मधुन घेतो ना? मग ही घ्या की…टीट फ़ॉर टॅट म्हणून नाही तर योग्य़ कारणासाठी अशी तपासणी झालीच पाहिजे. खरं तर भारतात अशा तपासण्या होणं जास्त जरुरीचं आहे. आणि विसा इ. गोष्टी सुद्धा आपणही जरा कडक तपासण्या करुनच मग दिल्या पाहिजेत कारण उठसुठ अतिरेकी कारवाया आपल्या इथे होत असतात. ९/११ नंतर अमेरिकेने जशी काळजी घेतली आहे तशी इतके हल्ले होऊन आपण घेतली नाही. आपल्याला या सो कॉल्ड सेलेब्रेटिजची पडलीय. तिथे त्याने सरकारला नीट कर तरी भरलाय का देव जाणे आणि आता म्हणे भारत सरकार हे प्रकरण पुढेही नेणार आहे. आधी त्या कसाबची गठडी वळा. शाहरुख तिथे डॉलर्स मध्ये कमवील. त्याला कुणाची पडलीय???

  • अपर्णा ,
   प्रतिक्रियेकरता आभार. अगदी मनातलं लिहिलंत, इथे जर प्रॉपर काळजी घेतली तर सहज शक्य आहे टेररिझम वर नियंत्रण ठेवणं. पण आपण या फालतु गोष्टींनाच जास्त महत्व देत असतो, आणि मुख्य गोष्टींकडे सरळ दुर्लक्ष करित असतो.

   अमोल,
   प्रतिक्रियेकरता आभार.

 11. आपली माणसं या सिनेमातल्या लोकांचा उदो उदो का करतात हेच कळत नाही. कलाकार म्हणून त्यांचा आदर नक्कीच करायला हवा. पण जेव्हा प्रश्न देशाचा किंवा देशाच्या सुरक्षिततेचा येतो तेव्हा त्यांना इतरांसारखी वागणूक मिळाली तर बिघडलं कुठं…

  अमेरिकेचं काय चुकलं जर त्यांनी त्यांच्या देशात येणा-या एखादयाची सुरक्षा तपासणी केली तर…

  “टीट फॉर टॅट” बददल न बोलणंच चांगलं…

 12. आल्हाद alias Alhad says:

  खरं बोललात विक्रांत, फक्त पब्लिसिटी स्टंट आहे.
  अनुल्लेखानेच मारावं याला हे उत्तम!

 13. bhaanasa says:

  दोन दिवस झाले हे शाहरूख प्रकरण ऐकतेय, वाचतेय….. इतका संताप आला. किती लोकांचा वेळ बरबाद झाला. सुरक्षा या शब्दाचा अर्थच जिथे याला कळत नाही तिथे… शाहरूख प्रसिध्दीच्या झोतात राहण्यासाठी काहीही करू शकतो. तेव्हा हा त्याच्या नविन सिनेमासाठी केलेला स्टंट असेल. म्हणजे तपासणी झाली असेल पण ती इतकी तो उछलतोय… कठीण आहे.

 14. Shantanu says:

  First thing first..it doesnt matter but it seems you dont like SRK and if there was Amithabhje instead of SRK the tone of your post would have been different.

  Salman Khan’s views dont count because everyone knows why he said like that..if there was Aamir khan instead of SRK then Salman khan would have said something different ..anyways we shouldnt get into this.

  If you can digest media’s unwanted and non stop coverage of many other silly issues which happens most of the times in india then I think either you should have digested this coverage or should have said…ok..whatever..I am not interested rather than critisizing the media or the people like Priyanka Chopra who attempted to take the matter to the next level.

  Now like you I am also not a great fan of our media ..Priyanka chopra or the politicians but I kind of appriciate what they have done about this issue.

  Like it or not Shahrukh Khan is something..far ahead than the common muslim and one of the powerful and influential persons in the world chosen by US media ( I dont know what that means) but surely he is a international icon and a global face..he represents the country and the bollywood when he goes abroad.

  Frisking or security check is must and should same for everyone. No exceptions..be it in India or US.

  But the hour long questioning of someone like SRK and not allowing him to use his phone was definitly not required. Indian embassy had to come there and rescue him..so there was something. If this thing is happening with SRK then you can imagine the situation of a common muslim man travelling from India to US.

  Sure they want to be safe and dont want another 9/11 but at what cost..raising eyebrows on every muslim who is entering the country ?

  US ambassadar ,foreign ministry including knwledgable Shashi Tharoor and others have taken the note of this issue..that means there is something apart from the politics .. Media has blowned this issue..certainly. they did it in the past and they will do it in the future..its in their DNA. One can take wise decision to change the channel or the page of newspaper if not interested . And just becasue they are playing the news again n again doesnt mean some news are useless.

  I came on this blog after long time, couple of months back I read some posts and found really nice..it was kind of traditional thoughts n thinking,,,but the content that I found in this post doesnt suit your style..think neutral and you will write more beutifuly..

  There is something called dignity and if SRK wanted take this issue further for whatever reason..I think he is right. In the end everyone including India as country , SRK and common muslim man has a benifit in it. US needs to know what India is and what SRK means..

  Next time please enlighten us by typing your thoughts based on your thinking and experience and dont fall for SRK or media.

  Best Regards

  • Shantanu
   Thanks for your comments. The fact is i am not against SRK. I also like all his movies.. Havent missed any movie in last few years. My post isnt written with personal grudge against him. 16th aug, being an indian, i would have liked to see some thing related with 15th august coverage. But what i saw is this news covering SRK’s detention on air port.
   Even, our Ministers are involved in “Human Trafficking”. I have read somewhere that singer who sung “aise wiase ko diya hai” was also involved in human trafficking. In view of such situation questioning SRK is justified.

   Not each and every muslim is questioned, the way SRK was questioned. I Its only because his bagage was left at UK he was questioned for almost one hour. SRK isnot well known in US -among US Fellas. therefore the question of allowing him to use Cel phone does not arises- They dont allow any thing which is not as per their law..
   would like to recall that not only SRK but many other Indian Hero’s had attended the party and show organised by Dawood . The links of Bollywood with Underworld are well known…

   In my opinion, the media has blown the issue out of proportion.

 15. प्रशांत says:

  महेंद्र,
  वाचून छान वाटलं. थोडेफार लिहिण्याच्या स्टाईलमधे कोणाला फरक वाटल्यास काही चूक नाही, पण प्रत्येकाने आपले विचार योग्यप्रकारे मांडणे आवश्यक असल्याने, सगळं मोकळेपणाने लिहिल्याबद्दल अभिनंदन!

  आपला मुख्य विचार पहिल्याच ओळीच व्यवस्थिक कळवला आहे: “विनाकारण एखाद्या फालतु बातमीला आउट ऑफ प्रपोर्शन ब्लो करुन तेच ते दळण, पुन्हा पुन्हा दळत रहाणं हे एक आवडिचं काम आहे मिडीयाचं”. एकदम बरोबर आणि सगळ्यांनी जाणून घेण्याची ही गंभीर बाब आहे. प्रसारमाध्यमं ही आपल्या देशाचा एक महत्वाचा स्तंभ आहे, याची जाण प्रसारमाध्यमांनीच ठेवणं हे गरजेचं आहे.

  हे वाक्य “एका सामान्य नागरिकाप्रमाणे दिल्या गेलेली वागणुक त्याला अपमान वाटली” स्पष्टपणे दाखवतं की शाहरूख एक व्यक्ती म्हणून कसा आहे. कलामांनी कधिही असा कांगावा केला नाही. इथे कलामांच उदाहरण प्रथम मनात आलं, ते त्यांच्या धर्मामुळे नाही. पण एका चांगल्या व्यक्तीचं आणि स्वतःबद्दल गर्व असलेल्या व्यक्तीचं वागण यातला फरक स्पष्ट दिसून येतो म्हणून. स्वाभिमान असावा पण दुराभिमान असू नये. जर खरोखरच नियम डावलून काही वेगळी वागणून केली असेल तर भारताने फक्त त्याबद्दल आपले म्हणणे अमेरिकेला पटवावे. पण याबद्दल प्रसार करणे म्हणजे नेत्यांचा आपली विशिष्ट वर्गासाठी जवळीक साधण्याचा प्रयत्न आहे. तो त्यांचा प्रश्न आहे, बरा की वाईट हा वेगळा मुद्दा.

  Shantanu,
  तुमचा या लेखावरचा विचार कळला. जरा कमी भावनिक होउन विचार केला तर तुम्हाला दिसेलच की तुमचे आणि महेंद्रचे विचार सारखेच आहे. पण शाहरूखचे तुम्ही चाहते असल्यामुळे कदाचित तुम्हाला ही भाषा आवडली नसावी. मला तुमचे मत यावर जाणून घेणं आवडेल की तुम्हाला असं वाटतं का, की प्रसारमाध्यमांत ह्या बातमीला अधिक रंगवून सांगताना थोडाफार विपर्यास केला आहे? (उदा. ‘अपमान’ कुठुन आला यात? ‘धरून ठेवलं’ म्हणजे काय कैदेत टाकलं का बेड्या ठोकल्या?, फक्त नियमाप्रमाणे थांबवण्यात आलं तेही, व्यवस्थित बसवून वगैरे)

  @Shantanu:
  “If you can digest media’s unwanted and non stop coverage of many other silly issues which happens most of the times”
  याचा अर्थ असा नाही की इतर दहा वाइट गोष्टी आहेत म्हणून या वाइट गोष्टीबद्दल बोलण्याचा हक्क कोणालाच नाही. कुठुन तरी सुरवात केलीच पाहिजे. त्यात अशा बातम्यांची वर्णी लागणारच ज्याबद्दल सर्वसामान्य माणसाला रुची आहे, आपुलकी आहे.

  “Shahrukh Khan is something..far ahead than the common muslim and one of the powerful and influential persons in the world”
  मला नाही वाटत, की सर्वसामान्य मुसलमानांपेक्षा वेगळा असा शाहरूख आहे. तुम्ही त्याचे चाहते आहात, तुम्ही कळवा त्याचे विचार. आणि influential persons in the world? माझ्यामते भारतात तो आहेच अधिक influential !, पण अमेरिकेत फक्त मुळ भारतीय वंशाच्या लोकांसाठीच. अमेरिकन सर्वसामान्य माणसाचे जगाबद्दल ज्ञान काय आहे, याबद्दल अनेक विनोद आहेतच. पण मी असंही म्हणेन की विमानतळावरच्या अधिकार्‍यांनी उगाच त्याची माहीती असून नसून काही फरक करू नये. आपले काम करावे. सलमानने म्हटलेलं बरोबरच आहे. आणि कितीही नाही म्हटलं तरी तो अधिकारी त्याच्या बायकापोरांच्या सुरक्षेचा विचार करेलच.

  “…and dont want another 9/11 but at what cost..raising eyebrows on every muslim who is entering the country ” का नाही? ही तडजोड, प्रत्येक धर्माचा आणि सर्वसामान्य जनतेचा धर्माबद्दलचा विचार हाताळण्याचा दृष्टीकोन काय आहे, यावरही अवलंबून आहे. शाहरूख काही असं बोर्ड घेउन फिरत नाही की तो आतंकवाद्यांच्या विरोधात आहे म्हणून! मुसलमानांत फितना म्हणून काय प्रकार आहे, आणि मुलतत्ववादी आणि आतंकवादी लोकं त्याचा कसा दुरुपयोग करतात, याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. असो, तो विषय वेगळा.

  “There is something called dignity”…. बरोबर आणि देअर इज समथिंग कॉल्ड सिक्योरिटी ऑफ पिपल. ही एक तडजोड आहे, आणि सद्ध्याच्या परिस्थितीत, अमेरिकेला आपल्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा हक्क आहे. त्यादृष्टीने भारतियांनीही अमेरिकेला जाणे टाळावे, हे योग्य आहे, आणि शाहरूखला हे दुर्दैवाने एका वाईट अनुभवावरून शिकावे लागले. (तो त्याच्यासाठी दुर्दैवी कारण त्याला VIP treatment ची सवय झाली होती म्हणून). पण अनुभवातुनच माणूस शिकतो, आणि प्रसारमाध्यमांनी त्या वृत्ताचा अती उदो उदो करणे वाईट आहे, हेच आम्हाला म्हणायचे आहे.

  “Media has blowned this issue..certainly. they did it in the past and they will do it in the future..its in their DNA. One can take wise decision to change the channel or the page of newspaper if not interested” एकदम बरोबर, पण जर प्रत्येक चॅनलवर बहुतेक वेळ हेच चालू असेल तर हा जनतेच्या वेळेचा अपव्यय नाही का? तर याबाबतीत एक सुंदर चॅनल मी सगळ्यांना सुचवू शकतो, पहा तुम्हाला आवडलं तर: Rajyasabha आणि Loksabha आपलं सरकारी चॅनल आहे, पण मी तिथले हाताळलेले विषय पाहून खरच थक्क झालो, बहुतेक वेळा मस्त आणि कामाची माहिती देत असतात तिथे. जोपर्यंत इतर चॅनल सुधरत नाहीत, तोपर्यंत तरी या चॅनलकडे लक्ष द्या.

 16. Shantanu says:

  Well..Prashant you are right and I am wrong becasue you guessed ( me being a SRk fan forever) about me correctly and I was wrong when I said Mahendra dont like SRK..so you win and I need more practice..

  Actually now I am confused and failing to understand what exactly the problem that we are talking about..is it about the media ? or Is US right or wrong by questioning india or this blog post?

  As far as the media is concerned and as I said earlier there shouldnt be a second thought about them overexposing issues or out of the limit coverages. Everyone knows about this including the media itself. IT WILL NEVER CHANGE.
  so I am with you when you say that media has blown the issue.

  I watch ndtv24x7 and etv marathi news and never felt that their coverage was out of the limit. it is really a channel to channel specific and personally I hate all hindi news channels..they are just stupid but i understand they have the largest viewership.. so the time is wasted more here by watching such news.

  For this incident is US right or wrong ?
  IMHO, they are wrong. and i am not saying this becasue I am SRK fan. security check and frisking of SRK is must and fine..but hour long questioning ..not required. sure they dont know who SRK is and they dont need to know but when they are told by someone at the spot who that person is ..they should verify it and be done with it. they shouldnt have asked stupid questions to him and let indian embassy to step in..it is surely a mistake from their end and they should take a note of this..its not about the royal treatment ..its about how you are treating people of other countries.

  I am into a security profession with direct connection to corporate policies and regional law and I am a frequent traveller to US and UK and well aware of their procedures at the airports. US is a subject of criticism when it comes to the enforcement of the laws and policies..couple of airport related laws and policies are under scrutiny..e,g, a year back they introduced a law saying that if asked by official, you will surrender your laptop with password without asking any question..official will look for the data what they are looking for.
  now it is a one of the measure they wanted to take to control the situation in their country..but its not acceptible by the world and US is a part of the world.
  they must respect other countries. and this kind of small small incidents counts becasue common mans complaints dont count. unfortunatly.

  and there is just no scope to compare Kalam’s incident with srk incident..srk was bound to repond or complain becasue he is just like us with extra layers of ego , dignity, hungery for popularity or self marketting etc etc..

  but Dr Kalam is simple , great..something different..thats why we all respect him
  He did not feel like complaining about that becasue he doesnt give importance to such issues..he dint even entertain media when they asked him and probably thats why media did not blow that issue..there is nothing surprising.

  Security cannot be achieved by exploiting someone else’s security, privacy or dignity. you think US’s strategy including the drone attacks , war in afghan and Iraq is going to help them to achieve what they are after?? I think,never . there will be a pause but no full stop. but ofcoure US dont any other option but to use drones..

  and now for this blog post, there is nothing, his writing style is alreay great and thats why I am here and commenting..but when I like something i raise the bar of my expectations very high without really thinking about the other part.e,g. Mehndra writes what he wants and what he enjoys while writing..but something i may not like while reading which is not his problem..its my problem and i am going to work on it..

  Thanks

 17. mala lekh awadla an patla hee ,pan tychyawar kevadha ha uhapoh ?

 18. Shanatanu, Ashatai,
  pratikriye karata abhar..

 19. Ashish says:

  मूळ लेखापेक्षाही प्रतिक्रिया वाचून अधिक मनोरंजन झालं.

 20. sagar says:

  kharch patal he…….Dr. kalam yana asch tras zala tenva nahi evdhi charcha….pan to sharukh hota na…..mla vatat aapan ithech chukato…..an kharch ya tv meadia valyanch kai karav kalat nahi………

 21. Sameer Khan says:

  I may not have much to say about the incident of SRK and Dr.Kalam to differentiate, however i just want to say one thing is it OK if ur security systems demands such scrutiny it must go on with any hesitation be it is whoever but Mr.Mahendra I would definitely like to have ur say on my one simple question that “as per media ispite of having all relevant documents submitted or shown to concern authorities about SRK’s visit to US and Security personnel asking SRK to prove that what he is whatever he was saying about himself and also by getting verfied by the people who known SRK in there” is it justified apart from SRK our own Dr.Kalam we have far more respect for such a gr8 man known for his straight n simple attitude. Would appreciate if u go thru following link which puts the light on how Dr.Kalam was humiliated by US Air Lines that too In Our Capital So called Bharat Ki Rajdhani Delhi on which some1 from other coutry insults our own former President the president of country who welcomes all US presidents spreading their arms. I will not miss on saying that we even have to take a good care of their Dogs when they Visit India and we r yet to hear that some action been taken against the people who all r responsible in insulting our Pride Dr.Kalam .
  http://ibnlive.in.com/news/kalam-humiliated-how-us-airline-treated-him/97622-3.html

  Please don’t take me in a wrong way as i really wanted to just put my points across on whatever u hv written in here which is very good thing to discuss in this manner so that we have the thoughts from people around us.

  Thanks

 22. Ashish says:

  While reading Sameer Khan’s reply, I checked the IBN Live link and discovered that unfortunately -Throw a tomato – series is still on. We need to do something about this stupid act.

 23. vilas Narayan Shinde says:

  sarvajan ShivajiMaharajyache nav gheun rajya karatat. Pan ekalahi tyanchya nakhachi sar nahi. ekada shivaji maharajyana killyavar yayla ushir zala asata pahrekaryne tyana killyat ghenyas nakar dila hota. tya kartavyanishtha paharekaryache kautuk maharajyani baxis devun kele hota. Ata ase koni kelyas tyala phasavar detil. tyamulech konihi jababadarine vagatana disat nahi.

 24. vilas Narayan Shinde says:

  marathit kase lihave te kalavave. apala abhari ahe.

  • http://baraha.com/download.htm
   वर दिलेल्या साईटवर जाउन सॉफ्ट वेअर डाउनलोड करुन इन्स्टॉल करा. खुप सोपं आहे यावर मराठीत टाइप करणं. मराठी व्यतिरिक्त बऱ्याच भाषात टाइप करता येतं हे सॉफ्ट्वेअर वापरुन.

 25. आशिष says:

  ह्या साईट वर सुधा अत्यंत सोप्या पद्धतीने मराठी मध्ये लिहिता येतं..
  http://www.google.com/transliterate/indic/Marathi

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s