आयुष्य एवढं का स्वस्त झालंय?

आयुष्य एवढं का स्वस्त झालंय? आज सकाळची ८-३३ मिनिटांची वेळ . माझं ऑफिस आहे चेंबुरला म्हणजे मला रोज कुर्ला स्टेशनला उतरावं लागतं. आज सकाळी ८-३५ च्या सुमारास ठाणे साईडच्या ब्रिजवरुन निघालो होतो तर काय.. एक ट्रेन प्लॅटफॉर्म वर येत होती ( हार्बर प्लॅटफॉर्म वर)  आणि तेवढ्यात एका मध्यमवयिन माणसाने ट्रेन समोर उडी मारली. क्षणभर काय झालं ते कळलंच नाही. ट्रेन धडाडत प्लॅट्फॉर्म वर पोहोचली आणि तिन शिट्या वाजवु लागली..
ट्रेनच्या शेवटच्या डब्याच्या मागे तो माणुस शिरच्छेद झालेल्या अवस्थेत पडलेला होता. धड एकिकडे आणि शिर दुसरीकडे. सगळं इतक्या लवकर झालं की रक्ताचा एकही थेंब दिसत नव्हता कुठे..
माझ्या सोबतंच शेजारी एक रेल्वे पोलिस निर्विकार पणे उभा होता. म्हणाला, आजका दिन तो शुरु हो गया… बस्स!! इतकीच प्रतिक्रिया. बहुतेक रोज ऍक्सिडॆंट बघुन बहुतेक त्याची नजर मेली असावी. पण मला मात्र अगदी ’सिक’ फिलिंग येत होतं. बरेच लोकं ती डेड्बॉडी ( क्षणभरापुर्वी जिवंत असालेला माणुस) पहायला तिथे निघाले. पण मी दुरुनच बघुन मला कसं तरी होत होतं. म्हणुन दोन स्नॅप्स ब्रिजवरुनच क्लिक केले आणि ऑफिसला पोहोचलो.
म्हणतात मानवी जिवन एकदाच मिळतं. पण ते इतक्या इझिली थ्रो अवे करणं कितपत योग्य? जास्त काही लिहायची इच्छा नाही. ते फोटॊ इथे पोस्ट करतोय.. जर तुम्ही ते सेव्ह करुन झुम करुन बघाल तर ती बॉडी दिसेल..

आज सकाळची ८-३३ मिनिटांची वेळ . माझं ऑफिस आहे चेंबुरला म्हणजे मला रोज कुर्ला स्टेशनला उतरावं लागतं. आज सकाळी ८-३५ च्या सुमारास ठाण्याच्या बाजूच्या  ब्रिजवरून निघालो होतो . एक ट्रेन प्लॅटफॉर्म वर येत होती ( हार्बर प्लॅटफॉर्म वर)  आणि तेवढ्यात एका मध्यमवयीन माणसाने ट्रेन समोर उडी मारली. क्षणभर काय झालं ते कळलंच नाही. ट्रेन धडाडत प्लॅट्फॉर्म वर पोहोचली आणि ३ शिट्या वाजवू लागली..

. ट्रेनच्या शेवटच्या डब्याच्या मागे तो माणुस शिरच्छेद झालेल्या अवस्थेत पडलेला होता. धड एकिकडे आणि शीर दुसरीकडे. सगळं इतक्या लवकर झालं की रक्ताचा एकही थेंब दिसत नव्हता कुठे..हे सगळं अगदी नकळंत पाहिलं गेलं. अगदी अनपेक्षितरीत्या अशा तर्हेने कोणी तुमच्या डॊळ्यादेखत आत्महत्या केली तर ?? माझं डोकं सुन्नं झालं. त्या ब्रिजच्या कठड्यावरून मी पण डोकाउ लागलो.

माझ्या सोबतच शेजारी एक रेल्वे पोलीस निर्विकार पणे उभा होता. म्हणाला, आजका दिन तो शुरु हो गया… बस्स!! इतकीच प्रतिक्रिया. बहुतेक रोज ऍक्सिडॆंट बघुन बहुतेक त्याची नजर मेली असावी. पण मला मात्र अगदी ’सिक’ फिलिंग येत होतं. बरेच लोकं ती डेड्बॉडी ( क्षणभरापुर्वी जिवंत असालेला माणुस) पहायला तिथे निघाले. पण मी दुरुनच बघुन मला कसं तरी होत होतं. म्हणुन दोन स्नॅप्स ब्रिजवरुनच क्लिक केले आणि ऑफिसला पोहोचलो.

म्हणतात मानवी जीवन एकदाच मिळतं. पण ते इतक्या सहजपणे संपवणे कितपत योग्य? जास्त काही लिहायची इच्छा नाही. ते फोटॊ इथे पोस्ट करतोय.. जर तुम्ही ते सेव्ह करुन झुम करुन बघाल तर ती बॉडी दिसेल.ट्रेनच्या मागे ती डेड बॉडी पडलेली दिसेल तुम्हाला रुळाच्या मधे शीर आणि शेजारी धड..

फोटोग्राफ्स काढले आहेत या पोस्ट वरुन. जर पहायचे असतील तर पिकासा वर ठेवले आहेत. इथे  पाहु शकता.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , . Bookmark the permalink.

19 Responses to आयुष्य एवढं का स्वस्त झालंय?

 1. sahajach says:

  सुन्न झालय पाहून आणि वाचून…..कसे काय लोक असे वागतात कळत नाही!!! कुठल्याही संकटाची उंची आयुष्यापेक्षा जास्त नसते असे वाटत असतांना हे असे काही समोर आले की वाटते असे काय आहे ज्यापुढे आयुष्याची किंमत वाटू नये!!!

 2. अरे रे…
  खरंच आयुष्य एवढं स्वस्त झालंय ?

 3. भल्या राम प्रहरी असं काही पहायला मिळाल्यामुळे कसंतरिच वाटतंय आज. डोळ्यासमोर कोणितरी आत्महत्या करतांना पहाण्याची ही पहिलिच वेळ आयुष्यातली. अशी वेळ या आयुष्यात पुन्हा न यावी हिच इच्छा..
  अगदी खरं सांगतो, त्या बिहेडेड डेड्बॉडी कडे दुरुनही पहातांना कसंतरीच वाटत होतं.बरेच लोकं तिथे जवळुन बघायला गेले पण मी मात्र सरळ पळ काढणेच योग्य समजलो…

 4. bhaanasa says:

  ही झाली फक्त स्वत:ची सोडवणूक. मागे राहिलेल्यांचे काय? एकदाच मिळणारे आयुष्य इतके सहज भिरकावून द्यायचे….कुठलेही संकट इतके मोठे असते का? ह्म्म्म, फार फार वाईट वाटले, देव त्याच्या घरातल्यांना सामर्थ्य देवो.

 5. Anil says:

  jey jivan jagu shakat nahit tey maran baghu shakat nahi,na talanarya goshti kade path phirwo naye eitkach shiklat tari khoop zale

 6. बधिर झालंय मन हे वाचून… तो फोटो सेव्ह करून मोठा करुन पाहण्याचं धाडसंच होत नाहीये.

 7. bhagyashree says:

  plz to photo kadhun picasa chi vagere link dya… achanak asa kahitari dhaadkan samor yena far vichitra ahe.. jyala pahaychay to click karel… 😦

 8. भाग्यश्री
  फोटोग्राफ्स काढले आहेत पोस्ट वरुन.

 9. somnath says:

  बधिर झालंय मन हे वाचून… तो फोटो सेव्ह करून मोठा करुन पाहण्याचं धाडसंच होत नाहीये.

 10. Lahu Mamale. says:

  ही झाली फक्त स्वत:ची सोडवणूक. मागे राहिलेल्यांचे काय? एकदाच मिळणारे आयुष्य इतके सहज भिरकावून द्यायचे….कुठलेही संकट इतके मोठे असते का? बधिर झालंय मन हे वाचून…

 11. suvarna says:

  kharach manse aashi ka kartat. gharatil problems aasatil tar te sodwnaicha prayant karava. aayushat yenarai pratek sankatana tond det pude jave kadich har manu naye.tarch to pude jawu shakel

  • ही घटना मी स्वतः पाहिली- आयुष्यातली पहिली वेळ कुणाला तरी मरतांना पहायची. नंतरचे बरेच दिवस रात्री झोपायला गेलो की पुन्हा डोळ्यासमोर दिसायचं सगळं.

 12. swapnil kakade says:

  when god pushes u on the edge of difficult,trust him fully bcoz only two things can be happy happend either he will catch u when u fall or he will teach u how to fly.i feel very bad to read this.

 13. akshata khochare says:

  jivan he jagtana kadhi radayche naste ,
  hrudayi vedana sahtana sadha hasyche aste….
  vitbhar pota sathi,dhapad hi chlu rahil pan tyat
  aayushyach mol visru naka…

 14. nilesh says:

  khrach ashi ghatna jar koni share keli tar ayushyache mahatv kalte

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s