एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी इंडीयन

एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी इंडीयन.
मेडिकल कॉलेज मधुन एम बी बी एस ची परिक्षा पास केल्यावर अगदी मनापासुन आदिवासी लोकांची सेवा करण्याची इच्छा असलेले प्रकाश आमटे सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत. नुकत्याच दिल्यागेलेल्या मेगॅसेस पुरस्कारामुळे त्यांचे नांव सर्वतोमुखी झालेले आहे. आज एका अशाच एका दुसऱ्या ध्येयवेड्याची  माहिती वाचनात आली.
मेळघाट!! म्हंटलं की काय आठवतं?? उपासमारिने खंगलेले मुलं. पिठाचं दुध करुन -म्हणजे पाण्यात पिठ कालवुन मुलांना दुधाच्या ऐवजी पाजणाऱ्या त्या माता.कुपोषणाचे मृत्यु.. आणि मुख्य म्हणजे मुर्दाड मनोवृत्तीची प्रशासकिय यंत्रणा..
अशा परिस्थितित डॉ कोल्हे यांनी एमबिबिएस नंतर या कोर्कू जमातिच्या सेवेसाठी इथे येउन प्रॅक्टिस करण्याचे ठरवले. डॉ. रविंद्र कोल्हे. एम डी. हल्ली मुक्काम मेळघाट.. आदिवासींच्या मधे . यांची फी असते पहिल्या कन्सल्टेशनला २ रुपये, आणि नंतर फॉलो अप साठी १ रुपया. डॉक्टरांच्यावर रस्किन बॉंडच्या या स्टेटमेंटचा खुपच असर झालेला होता.. जर तुम्हाला मानवजातिची सेवा करायची असेल तर गरिब आणि निग्लेक्टेड लोकांची सेवा करा.
एमबीबीएस नंतर दिड वर्ष मेळघाटात काम केल्यावर त्यांना असं वाटलं की आपलं इथलं काम झालेलं नाही.. म्हणुन त्यांनी तिथेच राहुन गरिबांची सेवा करण्याचे ठरवले. गेली २४ वर्ष ते तिथेच रहातात.
माझ्या भाषेबद्दल बरेच आक्षेप घेतले जातात. पण मी अगदी मनापासुन जे काही मनात येइल ते लिहित असतो. अगदी मला जे वाटेल ते. अर्थात, हा माझा ब्लॉग माझे विचार मांडण्यासाठिच आहे नां??
महाराष्ट्राच्या आणि मध्यप्रदेशाच्या बॉर्डर वर असलेला एक आदिवासी विभाग..इथे नेमेची येतो पावसाळा प्रमाणे कुपोषण, बाल मृत्यु यांचं प्रमाणही खुप जास्त आहे. इतर भारतात १००० मुलांमधिल जर ८ किंवा ९ मुलं दगावत असतिल तर तेच प्रमाण या भागात २०० होते. पण एका ध्येयवेड्या डॉक्टरमुळे मात्र आता हे प्रमाण ६० वर आलेलं आहे. अर्थात, ही पण काही आनंदाची बाब नाही, पण दगडापेक्षा विट मऊ.. म्हणुन २०० पेक्षा ६० बरे असं म्हणायची वेळ स्वातंत्र्यानंतर ६२ वर्षांनी आलेली आहे.
डॉ,. कोल्हे यांनी याच गोष्टी साठी पब्लिक लिटीगेशन केस दाखल केलेली आहे मुंबई हाय कोर्टात. यांनी ऍफेडेव्हिट फाइल केलंय आणी आता गव्हर्नमेंटच्या रिप्लायची वाट पहाताहेत. आता मी वर म्हंटल्या प्रमाणे मुर्दाड मनोवृत्तीची नोकर शाही या नोटिशिला उत्तर पण अजुन देत नाही. डॉ. कोल्हे म्हणतात.. आम्ही काहिच करु शकत नाही आता…फक्त वाट पहाणं आमच्या हातात आहे.
या भागात कोर्कु जमातिचे लोकं रहातात.  कित्येक किलोमिटर्स मधे अजिबात इलेक्ट्रिक सप्लाय नाही– कारण काय तर म्हणे टायगर रिझर्व फॉरेस्ट असल्यामुळे इथे विद्युत सप्लाय देता येत नाही.
या आदिवासींच्या आयुष्याबद्दल बोलतांना डॉक्टर म्हणाले, की या आदिवासी लोकांची शेती केवळ पावसावरच अवलंबून आहे. सप्लिमेंट फुड म्हणून हे लोकं पुर्वी लहान सहान प्राणी मारुन खायचे जंगलामधे. पण आता सरकारने रिझर्व फॉरेस्ट म्हणुन घोषित केल्यापासुन शिकार करणे इल्लिगल झाले आहे. हे लोकं शिकार करतात, ते पोट भरण्यासाठी , शौक म्हणुन नाही.
मार्च ते ऑक्टोबर या दरम्यान इथे कुठलेही धान्य वगैरे अव्हेलेबल नसते, ज्या मुळे आईला बरोबर अन्न मिळत नाही, आणि तान्ही बाळं मालन्युट्रिशनने दगावतात.
इथला दुधाचा व्यवसाय.. मिल्क को ऑपरेटिव्ह सेक्टर पण फेल झालाय. कारण इथे जर्सी गाईंना पुरेसं खाद्य मिळत नाही, आणि देशी गाईंना पुरेसं दुध येत नाही.. !!!
या भागात व्हेटरनरी सर्विसेस पण नाहीत. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांमधेच बरिचशी कोंबडीची पिल्लं मरतात. कोंबड्यांना पहिल्या ३६ तासामधे व्हॅसिनेशन द्यावं लागतं.. पण ते देणार कोण?? म्हणुन पोल्ट्री पण सुटेबल व्यवसाय होऊ शकत नाही.
सगळ्यात दुःखाची गोष्ट.. आदिवासींसाठी ४०० च्या वर स्किम्स आहेत, पण ज्यांची माहितीच आदिवासिंना नाही. इथे वर्षातले १०० दिवस एम्प्लॉयमेंट देण्यासाटःई म्हणुन नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्किम सुरु करण्यात आलेली होती. पण नंतर लवकरंच बंद करण्यात आली. ज्या लोकांनी कामं केलीत त्यांचे पैसे पण या योजनेअंतर्गत देण्यात आलेले नाहीत असे.. भांडू साने, एका एनजिओ चे फाउंडर (खोज) म्हणतात.
ऍग्रिकल्चर बोर्ड बंद करण्यात आलेलं आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची पण करण्यात आली तर मग आदिवासींचे उन्हाळ्यात होणारे हाल वाचतिल.
शासनाने एकच चांगली गोष्ट केलेलीआहे, ती म्हणजे या भागात ३०० शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. कोर्कू लोकांना प्रायमरी एज्युकेशन त्यांच्याच कोर्कु भाषेत दिलं जातं, ज्यामुळे लिटरसी रेट बराच वाढलाय.
डॉ. कोल्हे यांचा सेल नंबर ९४२३१४६१८१, आणि लॅंडलाइन नंबर ०७२२६-२०२००२
हा लेख रेडिफ मधे वाचलेल्या एका न्युज वर अवलंबुन आहे.मला खुप इन्स्पायरिंग वाटला, म्हणुन इथे मराठित लिहिलाय..

मेडिकल कॉलेज मधून एम बी बी एस ची परीक्षा पास केल्यावर अगदी मनापासून आदिवासी लोकांची सेवा करण्याची इच्छा असलेले प्रकाश आमटे सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत. नुकत्याच दिल्या गेलेल्या मेगॅसेस पुरस्कारामुळे त्यांचे नांव सर्वतोमुखी झालेले आहे. आज एका अशाच एका दुसऱ्या ध्येयवेड्याची  माहिती वाचनात आली.

मेळघाट!! म्हंटलं की काय आठवतं?? उपासमारीने खंगलेले मुलं. पिठाचं दूध करुन -म्हणजे पाण्यात पीठ कालवून मुलांना दुधाच्या ऐवजी पाजणाऱ्या त्या माता.कुपोषणाचे मृत्यु.. आणि मुख्य म्हणजे मुर्दाड मनोवृत्तीची प्रशासकीय यंत्रणा..

अशा परिस्थितीत डॉ कोल्हे यांनी एमबिबिएस नंतर या कोर्कू जमातीच्या सेवेसाठी इथे येउन प्रॅक्टिस करण्याचे ठरवले.एमबीबीएस नंतर दीड वर्ष मेळघाटात काम केल्यावर त्यांना असं वाटलं की आपलं इथलं काम झालेलं नाही.. म्हणून त्यांनी तिथेच राहुन गरिबांची सेवा करण्याचे ठरवले. गेली २४ वर्ष ते तिथेच रहातात. डॉ. रविंद्र कोल्हे. एम डी. हल्ली मुक्काम मेळघाट.. आदिवासींच्या मधे . यांची फी असते पहिल्या कन्सल्टेशनला २ रुपये, आणि नंतर फॉलो अप साठी १ रुपया. डॉक्टरांच्यावर रस्किन बॉंडच्या या स्टेटमेंटचा खूपच असर झालेला होता.. जर तुम्हाला मानवजातीची सेवा करायची असेल तर गरीब आणि निग्लेक्टेड लोकांची सेवा करा,आणि हे वचन अगदी अमलात पण आणलंय त्यांनी..

महाराष्ट्राच्या आणि मध्यप्रदेशच्या बॉर्डर वर असलेला एक आदिवासी विभाग..इथे नेमेची येतो पावसाळा प्रमाणे कुपोषण, बाल मृत्यु यांचं प्रमाणही खुप जास्त आहे. इतर भारतात १००० मुलांमधील जर ८ किंवा ९ मुलं दगावत असतील तर तेच प्रमाण या भागात २०० होते. पण एका ध्येय वेड्या डॉक्टर मुळे मात्र आता हे प्रमाण ६० वर आलेलं आहे. अर्थात, ही पण काही आनंदाची बाब नाही, पण दगडापेक्षा वीट मऊ.. म्हणून २०० पेक्षा ६० बरे असं म्हणायची वेळ स्वातंत्र्यानंतर ६२ वर्षांनी आलेली आहे. 😦

डॉ,. कोल्हे यांनी याच गोष्टी साठी पब्लिक लिटीगेशन केस दाखल केलेली आहे मुंबई हाय कोर्टात. यांनी ऍफेडेव्हिट फाइल केलंय आणि आता शासनाच्या उत्तराची वाट पहात आहेत. आता मी वर म्हटल्या प्रमाणे मुर्दाड मनोवृत्तीची प्रशासकीय यंत्रणा या नोटिशीला उत्तर पण अजुन देत नाही. डॉ. कोल्हे म्हणतात.. आम्ही काहीच करु शकत नाही आता…फक्त वाट पहाणं आमच्या हातात आहे.  😦

या भागात कोर्कु जमातीचे लोकं रहातात.  कित्येक किलोमिटर्स मधे अजिबात इलेक्ट्रिक सप्लाय नाही– कारण काय तर म्हणे टायगर रिझर्व फॉरेस्ट असल्यामुळे इथे विद्युत सप्लाय देता येत नाही.विज नाही, पाणी नाही.. खाण्याची व्यवस्था नाही. शासकीय स्वस्त धान्याची दुकानं नाहीत..इथे नुसती बोंबाबोंब आहे.ऍग्रिकल्चर बोर्ड बंद करण्यात आलेलं आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची पण करण्यात आली तर मग आदिवासींचे उन्हाळ्यात होणारे हाल वाचतील.

या आदिवासींच्या आयुष्याबद्दल बोलतांना डॉक्टर म्हणाले, की या आदिवासी लोकांची शेती केवळ पावसावरच अवलंबून आहे. सप्लिमेंट फुड म्हणून हे लोकं पुर्वी लहान सहान प्राणी मारुन खायचे जंगलामधे. पण आता सरकारने रिझर्व फॉरेस्ट म्हणुन घोषित केल्यापासुन शिकार करणे इल्लिगल झाले आहे. हे लोकं शिकार करतात, ते पोट भरण्यासाठी , शौक म्हणुन नाही.

इथला दुधाचा व्यवसाय.. मिल्क को ऑपरेटिव्ह सेक्टर पण फेल झालाय. कारण इथे जर्सी गाईंना पुरेसं खाद्य मिळत नाही, आणि देशी गाईंना पुरेसं दुध येत नाही.. !!!

बरं पोल्ट्री सुरु करावी म्हंटलं तर,या भागात पशूवैद्यक सुवीधा पण नाहीत. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांतच  बरीचशी कोंबडीची पिल्लं मरतात. कोंबड्यांना पहिल्या ३६ तासामधे व्हॅसिनेशन द्यावं लागतं.. पण ते देणार कोण?? म्हणून पोल्ट्री पण योग्य व्यवसाय होऊ शकत नाही.

सगळ्यात दुःखाची गोष्ट.. आदिवासींसाठी ४०० च्या वर स्किम्स आहेत, पण ज्यांची माहितीच आदीवासींना नाही. इथे वर्षातले १०० दिवस एम्प्लॉयमेंट देण्यासाठी  म्हणून नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम सुरू करण्यात आलेली होती. पण नंतर लवकरच बंद करण्यात आली. ज्या लोकांनी कामं केलीत त्यांचे पैसे पण या योजनेअंतर्गत देण्यात आलेले नाहीत असे भांडू साने, एका एनजिओ चे फाउंडर (खोज) म्हणतात.

या आदिवासींच्या कडून  कामं करुन घेउन त्यांचे पैसे बुडवणाऱ्या अधिकाऱ्यास चाबकाने फोडून काढले पाहिजे आणि सरळ जेलमधे टाकले पाहिजे, म्हणजे पुन्हा दुसरा कोणी अशी हिम्मत करणार नाही.

शासनाने एकच चांगली गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे या भागात ३०० शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. कोर्कू लोकांना प्रायमरी एज्युकेशन त्यांच्याच कोर्कु भाषेत दिलं जातं, ज्यामुळे शिक्षणाचा ओढा बराच वाढलाय.

नॅशनल अवॉर्ड हे अशा ध्येयवेड्या व्यक्तिंना द्यायला पाहिजे.. धोनी , हरभजन ,हेलन ला किंवा ऐश्वर्याला सारख्या लोकांना नाही.. असं वाटणारे माझ्यासारखे बरेच लोकं असतील असे मला वाटते.

डॉ. कोल्हे यांचा सेल नंबर ९४२३१४६१८१, आणि लॅंडलाइन नंबर ०७२२६-२०२००२

असेच एक डॉक्टर सावजी म्हणून आहेत चांदुरबाजारचे. ते पण व्यसनमुक्ती केंद्र आणि हार्ट ट्रबल अवेअरनेस प्रोग्राम चालवतात. प्रयास नावाची एनजीओ आहे त्यांची. असे लोकं नेहेमी मागेच पडतात जेंव्हा  बक्षीसं वगैरे देण्याची वेळ येते तेंव्हा..

हा लेख रेडिफ मधे वाचलेल्या एका न्यूज वर अवलंबून आहे.मला खुप इन्स्पायरिंग वाटला, म्हणून इथे मराठीत लिहीलंय..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in व्यक्ती आणि वल्ली and tagged . Bookmark the permalink.

14 Responses to एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी इंडीयन

 1. तुम्ही बिंधास – मनापासून लिहिता तेच वाचण्यायोग्य! मारून – मटकुन लिखाण होतं … भावना – संदेश पोहचत नाही.

  नॅशनल अवॉर्ड हे अशा ध्येयवेड्या व्यक्तिंना द्यायला पाहिजे.. धोनी , हरभजन ,हेलन ला किंवा ऐश्वर्याला सारख्या लोकांना नाही.. असं वाटणारे माझ्यासारखे बरेच लोकं असतिल असे मला वाटते.

  बरेच आहेत.. मी ही त्यातलाच एक!

 2. medhasakpal says:

  खुप मोलाची माहिती दिलीत.. ह्या अशा व्यक्ती नेहमीच पडद्यामागे राहतात.. अशा व्यक्तींचे काम पाहिले की एक नवी प्रेरणा, एक वेगळा उत्साह मिळत राहतो…

 3. bhaanasa says:

  जगात असे लोक आहेत म्हणून कलियुगातही सदभाव-आपलेपण टिकून आहे. डॊ.कोल्हें व त्यांच्या कार्याला सलाम. बाकी नॆशनल अवॊर्ड अशा व्यक्तींना द्यायला हवे याच्याशी सहमत. अर्थात त्यांना याची गरज नाही हा भाग वेगळा.

 4. Pravin says:

  I had read about him earlier in Maharashtra times. Salute to this person. BTW dont really worry about the language. It is to communicate your feeling and certain types of feeling can only be communicated using certain type of language 🙂 I have read almost all post of yours and never found your language offensive 🙂

 5. नॅशनल अवॉर्ड हे “अशा” ध्येयवेड्या व्यक्तिंना द्यायला पाहिजे.. धोनी , हरभजन ,हेलन ला किंवा ऐश्वर्याला सारख्या लोकांना नाही… खरेच अगदी भारतरत्न सुद्धा द्यायला काहीच हरकत नाही… आपले जीवन वाहतात हे ध्येयवेडे…

 6. दिपक
  आजच्या पेपरला राजिव गांधी अवॉर्ड मिळालेल्यांची नावं आली आहेत.. जरा नजरेखालुन घाला..

  मेधा,
  अशी माणसं आज जगात आहेत म्हणुन भारत टीकुन आहे असं वाटतं मला.मी त्यांना फोन पण केला होता. त्यांना फार बरं वाटलं.
  भाग्यश्री,
  तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे.खरं तर हे असे लोकं अवॉर्ड्स साठी कामं करित नाहित. ते कामं करतात ते स्वान्त सुखाय!! त्यांना अवॉर्डस देउन आपण अवॉर्डस चं मोठेपण वाढवतो.

  प्रविण,
  मटा मधला लेख तर मला वाचता आलेला नाही.पण चिखलदरा म्हणजे अमरावती पासुन फक्त ९० किमी अंतरावर..आणि इतक्या जवळ असुन सुध्दा तिथे अशी परिस्थिती असावी याचं वाईट वाटतं.

  शिरिश
  अगदी मनातलं बोललात. जर शक्य झाल्यास त्यांना फोन करु शकता. नंबर दिलाय वर..

  तुम्हा सगळ्यांचे प्रतिक्रिये बद्दल आभार.

 7. apashchim says:

  mi dr. kolhe ravi yachya kade 2 divas rahun aaloy te tar great aahetach tya sah tyanchi patni , sobat 2 mule {doghe jan sarpmitra aahet , tyani sapanvar ek pustak pan lihale aahe . mi tithe 3 varsh purvi gelo hoto tya veli pustakachi 3 ri aavrutti prakashit zali hoti } great na !

 8. archana says:

  one of the most beautiful post written by you. really inspiring!!!!
  ashaa lokaanchyaa punyaaiwarch jag chaalale aahe!!

 9. आल्हाद alias Alhad says:

  बरं झालं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलात…
  आता पुढची देणगी आनंदवनाऐवजी त्यांनाच…

 10. laxmi says:

  Thanks for giving information about such wonderful human beings.
  what u said is absolutally true. National award should b given to these persons(also to farmers,teachers,samajsevak) not to actors,cricketars or politic people.

 11. Heramb says:

  atishay apratim lekh.. sagalech.. aapan far ch chhan lihita aani mukhya mhanaje mana pasun lihita.. keep writting.. !!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s