वास

वांस
नविन कोऱ्या पुस्तकाचा वास, छापलेल्या शाईचा वास, पाउस पडुन गेल्यावर येणारा जमिनिचा वास.. अरे हो… हा जमिनिचा वास प्रत्येक ठिकाणचा वेगळा असतो. मुंबईला पाउस पडल्यानंतर येणारा वास एका वेगळ्याच प्रकारचा असतो.घराजवळचं सगळं अंगण ( मुंबैला अंगण?? हसु येतंय नां? पण हो, मला तोच शब्द सुचतोय लिहायला) आणि त्यावरच्या पावसाचा वास, आणि लोकलच्या स्टेशनवरचा , रेल्वे ट्रॅकचा वास, किंवा मार्केटमधला भाजिपाला सडल्यानंतरचा येणारा वास.. सगळे वास स्वतःची एक कहाणी सांगत येतात. तुम्हाला ती कहाणी ऐकु आली तर ठिक, नाहितर च्यायला,कसला घाण वास आहे म्हणुन नाकाला रुमाल लाउन पुढे जाल तुम्ही.
लहानपण अगदी लहान गावात गेलं त्यामुळे लहानपणचे वास अगदी नाकात पक्के बसलेले आहेत.लहानपणी पिंपळाच्या /वडाच्या झाडाखालुन पाउस पडल्यानंतर जातांना येणारा वास खुप आवडायचा. त्या पानांचिई सळसळ, आणि चुकार पणे अंगावर पडणारे थेंब…. तो वास आणि अनुभव पण खुप वेगळा असतो.
पाउस पडला की आमच्या घरासमोरचया शामबाबुच्या गॅरेजचा पण वास बदलायचा. वर्षभर जमिनिवर फेकलेले युझ्ड लुब ऑईल आणि ग्रिस, कॉटन वेस्ट, थिनर, पेंट यांचा सम्मिश्र वास पण एक वेगळंच निमंत्रण द्यायचा, या आणी बघा.. या पावसाने काय केलंय मला.
वडाच्या किंवा पिंपळाच्या वर बऱ्याच पक्षांची घरटी असायची. त्यामुळे पक्षांचा मुक्काम नेहेमिच असायचा या झाडांवर. पक्षांच्या विष्ठेत बऱ्याच झाडांच्या बिया पण न पचलेल्या अवस्थेत असतात. पक्षांच्या  बिटच्या मुळे खालची जमिन खुप सुपिक ( बरोबर नां?) व्हायची आणी वेगवेगळ्या रोपांना जन्म द्यायची.
प्रत्येक रोपाला पण एक वेगळाच वास असायचा. आमच्या इथे काही घरांशेजारी बारिक फुलांचं झाड असायचं , एकाच फुलामधे ५०-६० वेग्वेगळ्या रंगाची बारिक फुलं असायची. त्या गुच्छाला थोडा जरी स्पर्श झाला तरी त्याचा एक रानटी दर्प हाताला लागायचा.इतरांना जरी तो वास नकोसा होत असला तरी मला तो रानटी वास खुप आवडतो.
समोरच्या महादेव मंदिराच्या कुंडातल्या साचलेल्या शेवाळ्याचा पाउस पडल्यावर असा विचित्र वास का येतो ते मात्र कधिच कळलं नाही.
लहान म्हणजे अगदी १०-१५ दिवसांच्या बाळाला जवळ घेतल्या नंतर स्वतःमधे प्रोटेक्शनिस्टची भावना निर्माण करणारा वास पण मनात घट्ट बसलाय.
नविन कारचा वास.. आतल्या सगळ्या पॉलिमर्सचा तिव्र सुगंध आणि सिटकव्हरचा वास..पायाखालच्या रबर मॅट्सचा वास, सिटकव्हर लावणं बाकी असल्यामुळे प्लॅस्टीक कव्हर न काढल्याने त्याचा पण येणारा वास..पेट्रोल चा एक सुगंध आणि कारचे दारं बंदकेल्यानंतर सगळ्यांच्या निरनिराळ्या पर्फ्युम्सचा/ डिओ’ज चा एक सम्मिश्र सुगंध जेंव्हा काल अनुभवला , तेंव्हाच क्षणभरात वर लिहिलेले सगळे वास आठवले.
समोरच्या बगिच्यातली काळी माती अगदी नरम झालेली आणी त्यात पाय पडल्यावर पायाबरोबर बाहेर आलेला गांडूळ आणी त्या मातिचा वास एकदम नकोसा वाटायला लागतो.
आईच्या हातचा सत्तुच्या पीठाचा वास, चकली ची वेगळी चव आणी वास, आईच्य़ा हातच्या पुरणपोळीचा वास, लहानपणी श्रावणिच्या वेळेस घेतलेल्या पंचगव्याचा वास, कित्ती कित्ती वास असतात नां…
मला वाटतं या वासावर कितिही लिहिलं जाउ शकतं..

नवीन कोऱ्या पुस्तकाचा वास, छापलेल्या शाईचा वास, पाउस पडून गेल्यावर येणारा जमिनीचा वास.. अरे हो… हा जमिनीचा वास प्रत्येक ठिकाणचा वेगळा असतो. मुंबईला पाउस पडल्यानंतर येणारा वास एका वेगळ्याच प्रकारचा असतो.घराजवळंच सगळं अंगण ( मुंबईला अंगण?? हसू येतंय ना? पण हो, मला तोच शब्द सुचतोय लिहायला) आणि त्यावरच्या पावसाचा वास, आणि लोकलच्या स्टेशनवरचा , रेल्वे ट्रॅकचा वास, किंवा मार्केट मधला भाजी पाला सडल्या नंतरचा येणारा वास.. सगळे वास स्वतःची एक कहाणी सांगत येतात. तुम्हाला ती कहाणी ऐकु आली तर ठीक, नाहितर च्यायला,कसला घाण वास आहे म्हणून नाकाला रुमाल लाऊन पुढे जाल तुम्ही.

लहानपणी शाळा सुरू झाली की नवीन पुस्तकं आणल्यावर त्यांचा वास, बुटांना पॉलिश केल्यावर येणारा वास, आईने डब्यामधे   तेल लोणचं आणि बारीक चिरलेला कांदा ,काळा मसाला , आणि तेल कालवीन दिलेल्या वरणाचा सुगंध, सोबत दिलेल्या तूपसाखर पोळीच्या गूंडाळी चा सुगंध. किती म्हणून सांगु??

peepal

लहानपण अगदी लहान गावात गेलं त्यामुळे लहानपणचे वास अगदी नाकात पक्के बसलेले आहेत.लहानपणी पिंपळाच्या /वडाच्या झाडाखालून पाउस पडल्यानंतर जातांना येणारा वास खूप आवडायचा. त्या पानाची  सळसळ, आणि चुकार पणे अंगावर पडणारे थेंब…. तो वास आणि अनुभव पण खूप वेगळा असायचा.

वडाच्या किंवा पिंपळाच्या वर बऱ्याच पक्षांची घरटी असायची. त्यामुळे पक्षांचा मुक्काम नेहेमीच असायचा या झाडांवर. पक्षांच्या विष्ठेत बऱ्याच झाडांच्या बिया पण न पचलेल्या अवस्थेत असतात. पक्षांच्या  बिटच्या मुळे खालची जमीन खूप सुपीक ( बरोबर नां?) व्हायची आणि वेगवेगळ्या रोपांना जन्म द्यायची.

IMG_0907प्रत्येक रोपाला पण एक वेगळाच वास असायचा. आमच्या इथे काही घरांशेजारी  फुलांचं झाड असायचं , एकाच फुलामधे ५०-६० वेग्वेगळ्या रंगाची बारिक फुलं असायची. त्या गुच्छाला थोडा जरी स्पर्श झाला तरी त्याचा एक रानटी दर्प हाताला लागायचा.इतरांना जरी तो वास नकोसा होत असला तरी मला तो रानटी वास खूप आवडतो.

समोरच्या महादेव मंदिराच्या कुंडातल्या साचलेल्या शेवाळ्याचा पाउस पडल्यावर असा विचित्र वास का येतो ते मात्र कधीच समजलं नाही.

अगदी १०-१५ दिवसांच्या बाळाला जवळ घेतल्या नंतर स्वतः मधे प्रोटेक्शनिस्टची भावना निर्माण करणारा वास पण मनात घट्ट बसलाय.समोरच्या  बागेतली काळी माती अगदी नरम झालेली आणि त्यात पाय पडल्यावर पायाबरोबर बाहेर आलेला गांडूळ आणि त्या मातीचा वास एकदम नकोसा वाटायला लागतो.

आईच्या हातचा सत्तुच्या पीठाचा वास,काळा (गोडा) मसाला ,   चकली ची वेगळी चव आणि वास, आईच्य़ा हातच्या पुरणपोळीचा वास, लहानपणी श्रावणीच्या वेळेस घेतलेल्या पंचगव्याचा वास, कित्ती कित्ती वास असतात नां…बायकोने कितीही जीव तोडून केलं तरीही आईच्या हातची चव नाही जमली. किंवा ’तसं’ नाही जमलं .. असं वाटतं नां? कोणी मोठ्याने बोलत नसेल पण मनात येतं ना — एकदा तरी… बरंं चुकिने तरी? काही लोकं मान्य करतील , तर काही अगदी मान्य करणार नाहीत.

पाउस पडला की  लहानपणी आमच्या घरासमोरच्या शामबाबुच्या गॅरेजचा पण वास बदलायचा. वर्षभर जमिनीवर फेकलेले वापरलेले लुब ऑईल आणि ग्रिस, कॉटन वेस्ट, थिनर, पेंट यांचा सम्मिश्र वास पण एक वेगळंच निमंत्रण द्यायचा, या आणि बघा.. या पावसाने काय केलंय मला.

नवीन कारची डीलीव्हरी घेतली काल.नवीन कारचा वास.. आतल्या सगळ्या पॉलिमर्सचा तीव्र सुगंध आणि सिटकव्हरचा वास..पायाखालच्या रबर मॅट्सचा वास, सिटकव्हर लावणं बाकी असल्यामुळे प्लॅस्टीक कव्हर न काढल्याने त्याचा पण येणारा वास..पेट्रोल चा एक सुगंध आणि कारच दारं बंद केल्यानंतर सगळ्यांच्या निरनिराळ्या पर्फ्युम्सचा/ डिओ’ज चा एक संमिश्र सुगंध जेंव्हा काल अनुभवला , तेंव्हाच क्षणभरात वर लिहिलेले सगळे वास आठवले.

मित्रांनो.. वर बऱ्याच ठिकाणी वास हा शब्द सुगंध या अर्थाने वापरलेला आहे.मला वाटतं या वासावर कितीही लिहिलं जाऊ शकतं..

अरे वा… हे काय , मी चक्क ललित लिहिलं की.. चला इम्प्रुव्हमेंट आहे तर !! 🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

14 Responses to वास

 1. mugdhamani says:

  Congratulations navin kar baddal…
  pratyek goshtit asach gaav, lahanpan, tithle sugandha aathvat gela na ki vyatit jhalela aayushya punha jagata yeta…hich tar khari gammat aste..sagalyannach jamat nahi he..
  tumhala jamla mhanunahi punha ekda congratulations..

  • मुग्धा
   तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. कितीही वय वाढलं तरिही लहानपण कधिच विसरु शकत नाही आपण. हातातुन गळुन गेलेल्या वाळुसारखं आयुष्य.. पण शेवटचे चिकटलेले कण का होईना पण एंजॉय केलं पाहिजे..

 2. ….. महेंद्रजी,
  मस्त – सुगंधित लेख लिहिलाय!

  बरेच वास-गंध मनात अगदी खोलवर रुजलेले असतात.. जसं, आमच्या लहाणपणी – त्या काळ्या पाटीला – आणि शाडु [ मातीचा एक प्रकार – खासकरुन खडु / पेन्सिल साठी वापरतात] च्या पेन्सिलिंचा येणारा वास… माझ्या सासरवाडीच्या देवघरातला “धुपाचा” वास…वाफाळणार्‍या चहाचा – अमॄततुल्य चा वास.. किंवा गवती चहाचा वास…!!

  आणि खास लक्षात राहिलेला – पुण्याच्या “कयानी बेकरी” मध्ये येणारा – केक – तुप – बिस्कीटांचा वास…!..

  ….असे आणखी बरेच…. जास्त नाही लिहित.. नाहीतर “कमेंटची पोस्ट” व्हायची 😉

 3. आल्हाद alias Alhad says:

  अभिनंदन!
  ललित लेखनापर्यंत ’प्रगती’ केल्याबद्दल!!

 4. bhaanasa says:

  निरनिराळे गंध अन तितक्याच खोल रूतलेल्या अनुषंगीक अनेक आठवणी, तोडीस तोड समीकरण आहे. आली का गाडी?:). फिरून एक कोरा वास. बाकी तुझ्या ललिताचा गंध मला जास्तच भावला.:)

  • भाग्यश्री
   गाडी आली, पण अजुन रजिस्ट्रेशन नंबर यायचाय, तो आज येइल . उद्या जायचंय पुण्याला, तेंव्हा रविवारीच ( मुलिंच्या वेळा बघुन ) बाहेर जाता येइल. ललित वगैरे माझा प्रांत नाही, तरी पण एखाद्या वेळेस ” जसं अंधेके हाथ मे बटेर” तसं जमुन जातं लिखाण.

 5. Aparna says:

  चला म्हणजे आता बाकी सर्वांनी आपापले ब्लॉग्ज बंद करायला लागा….इथे सुंदर ललितही वाचायला मिळणारसं दिसतयं…:)
  छान विषय आहे मी नंतर कधीतरी चोरणार आहे. अर्थात सध्या आमची डायपर बदलायची स्टेज आहे ना त्यामुळे वास म्हटलं की…………..आपलं सुगंधच बरं…..
  आणि हो सुपीक आणि खूप असं असतं का???

  • अपर्णा
   प्रतिक्रियेकरता आभार.. ललीत वगैरे माझं क्षेत्र नाही. पण काल उगिच लिहिलं आणी लिहिल्यावर जाणवलं .. अरे हे तर ललीत लेखनाच्या स्टाइलचं झालंय.. असाच एकदा पुर्वी विनोदी लिखाणाचा पण प्रयत्न केला होता, तो एकदाच !! 🙂

 6. sahajach says:

  मस्त जमलाय लेख……थोडक्यात आता तुमच्या लेखणीत (किंवा किबोर्डमधे) वरदहस्त लेखनाचा ’वास’ व्हायला लागलाय तर…..

  • तन्वी
   अहो, एखाद्या वेळेस जमुन जातं.. नेहेमीच नाही काही..
   आणि मी प्रयत्नही करणार नाही. कारण बरेच लेखक आहेत ललित वगैरे लिहिणारे.
   आणि पुन्हा ललित लिहुन स्वतःच्या बायकोशी कॉंपिटीशन??..छे!! नक्को रे बाबा… 🙂 घरात रहायचंय ना मला..

 7. laxmi says:

  nice article.
  congrats for u r new car…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s