टाइपरायटर

टाइपरायटर मेकॅनिक
आजकालच्या मुलांना टाइपरायटर म्हणजे काय हे कदाचित कळणार पण नाही. कदाचित मेकॅनिकल प्रिंटर असं काही तरी सांगावं लागेल. टायपिंग शिकणं हा सर्वसाधारण मुलांचा पास टाइम होता. कारण इंजिनिअरिंग कॉलेजेस होती केवळ७, त्यामुळे इंजिनिअरिंग करणं आजच्या इतकं सोपं नव्हतं.
टाइपरायरटर वर टायपिंग शिकायला टायपिंग इन्स्टिट्युट्स असायच्या. मग एक कुठलीतरी संस्था टायपिंगच्या परिक्षा पण घ्यायची. त्यामधे वर्ड्स पर मिनिट्स.. म्हणजे एका मिनिटात तुम्ही किती वर्ड्स टाइप करु शकता ते चेक केलं जायचं. काही लोकं तर मिनिटाला साठच्या पेक्षा जास्त शब्द टाइप करु शकायचे.  टायपींगची पण एक आर्ट आहे . प्रत्येक अक्षर टाइप करायला एक ठराविक बोट असतं तेच बोट तुम्ही वापरलं तर टायपींग अगदी सोपं होतं. मग सुरुवातिला ए एस डी एफ जी सेमिकॉलम एल के जे एच ही ओळ पहिले दहा विस दिवस बडवत रहायची.. मग तुमची बोटं पक्की झाली, म्हणजे की बोर्ड कडे न पहाता टायपता आलं, की पुढची ओळ.. असा काहिसा प्रकार होता. वाचायला जरी सोपं वाटत असलं तरी खुप कठिण प्रकार होता हा.
आता मी स्वतःपण १५ दिवस गेलो होतो शिकायला पण नंतर सोडून दिलं. टायपिंग ही आर्ट पोहोणं किंवा सायकल शिकण्यासारखी आहे. एकदा तुम्हाला प्रसन्न झाली, की आयुष्यभर साथ देत रहाते.एकदा शिकलं की मग कधिच विसरु शकत नाही.
टायपिंग शिकतांना बहुतेक रेमिंग्टन चा एखादा जुनाट टाइप रायटर असायचा. नंतर गोदरेज ने पण टाइपरायटरमधे शिरकाव करुन मार्केटींग करणं सुरु केलं.
पुर्वीच्या काळी आजकालच्या प्रमाणे फॊटॊकॉपी किंवा झेरॉक्स हा प्रकार नव्हता. त्यामुळे कुठल्याही डॉक्युमेंटची प्रत ही टाइप करुनच काढली जायची. त्यावर एखाद्या गॅझेटेड ऑफिसर ची सही घेतली की मग झालं. आमच्या घरी वडिलांच्या सह्या घेण्यासाठी बरेच लोकं यायचे.. छे.. भलतिच कडे चाललाय लेख..
आमच्या ऑफिस मधे पण कित्येक वर्ष टाइप रायटर्संच होते. माझा एक आधिचा लेख आहे… वर्ड स्टार ते सॅप म्हणुन,,, त्यामधे हे सगळं ट्रान्झिशन लिहिलंय. टाइप रायटर मधे काय नसायचं?? एक परिपुर्ण मशिन म्हणुन आणि एक मेकॅनिक इंजिनिअर म्हणुन मला खरंच खुप आदर आहे ही मशिन डेव्हलप करणाऱ्या बद्दल…टाइपरायटर रिपेअर करता एक वेगळीच टाइपरायटर मेकॅनिक्स ही जमात होती. ते लोकं आपल्या टुल बॅग्ज मधे वेग वेगळे खिळॆ ( म्हणजे टाइप सेट ) , प्लायर्स असायचे. दर सोमवारी येउन प्रत्येक टाइपरायटरचं सर्व्हिसिंग करुन जायचा. या टाइपरायटर मेकॅनिकच्या बॅगेत सगळं काही असायचं..अगदी प्रत्येक मेकच्या( रेमिंग्टन, गोदरेज वगैरे) खिळ्यांपासुन सगळं काही. प्रत्येक टाइपरायटरचा टाइप सेट वेगळा असायचा. त्यामुळे खिळे पण वेगळेच असायचे.निर निराळे ब्रश, थिनर किंवा स्पिरिट .. स्वच्छ करण्यासाठी.. आणि बरंच काही.रेगुलर युझ मधे ह्या खिळ्यांचं सेटींग बिघडलं की मग काही अक्षरं अर्धवट उमटणे , किंवा अजिबातंच न उमटणे असा प्रकार चालायचा. म्हणुन ह्या सर्व्हिस मेकॅनिकची खुपच किंमत होती.. मोस्ट वॉंटेड असायचा हा मेकॅनिक..
काल काही फोटो पहाण्यात आले टाइपरायटर रिपेअर मेकॅनिकच्या बॅगचे .. आणि जुने दिवस आठवले, म्हणुन तुमच्यासोबत शेअर करतोय इथे.. त्या किट मधे खाली पातळसे डबे दिसताहेत, त्यामधेच ते खिळे (टाइपसेट) असायचे.
पण नंतर जेंव्हा कॉम्प्युटर्स आले , तेंव्हा मात्र हा टाइपरायटर कधी स्क्रॅप मधे फेकला गेला तेच कळलं नाही.

type-writer

आत्ताच्या पिढीला कदाचित टाइपरायटर म्हणजे काय ते माहिती असेल, पण कदाचित तुमच्या मुलांना , म्हणजे पुढच्या पिढीच्या दृष्टीने टाइपरायटर ही संकल्पना केवळ पुस्तकातल्या चित्रा पुरतीच मर्यादित राहील.बऱ्याचशा गोष्टी ज्या काळाच्या ओघात नामशेष झालेल्या आहेत, किंवा होतील त्यापैकी एक ही पण..

काल भुंगाच्या ब्लॉगवर पोळ्याच्या बद्दलची पोस्ट वाचली आणि प्रकर्षाने जाणवले की जग खूप बदलतंय. आपल्या लहानपणच्या व्हॅल्युज वगैरे सगळ्या गोष्टी एकदम चेंज होताहेत. आमच्या लहान पणी माझी पणजी ( हो, मी माझ्या पणजीला पण पाहिलंय) नेहेमी म्हणायची- वरिष्ठ शेती, मध्यम धंदा, आणि कनिष्ठ नौकरी.. पण आता हे समिकरण पुर्ण बदललंय.. !! निदान शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघून तरी तसं वाटतंय..

आजकालच्या मुलांना टाइपरायटर म्हणजे काय हे कदाचित कळणार पण नाही. कदाचित मेकॅनिकल प्रिंटर असं काही तरी सांगावं लागेल. आमच्या लहानपणी टायपिंग शिकणं हा सर्वसाधारण मुलांचा पास टाइम होता. कारण इंजिनिअरिंग कॉलेजेस होती केवळ ७, त्यामुळे इंजिनिअरिंग करणं आजच्या इतकं सोपं नव्हतं.टायपिंग येत असलं, की बॅंकेत किंवा इतर ठिकाणी नोकरी मिळण्यासाठी सोपं व्हायचं.

typeKit02

टाइपरायरटर वर टायपिंग शिकायला टायपिंग इन्स्टिट्युट असायच्या. मग एक कुठलीतरी संस्था टायपिंग च्या परीक्षा पण घ्यायची. त्यामधे वर्ड्स पर मिनिट्स.. म्हणजे एका मिनिटात तुम्ही किती वर्ड्स टाइप करु शकता ते चेक केलं जायचं. काही लोकं तर मिनिटाला साठच्या पेक्षा जास्त शब्द टाइप करु शकायचे.  टायपींगची पण एक आर्ट आहे . प्रत्येक अक्षर टाइप करायला एक ठरावीक बोट असतं तेच बोट तुम्ही

वापरलं तर टायपींग अगदी सोपं होतं. मग सुरुवातीला ए एस डी एफ जी सेमिकॉलम एल के जे एच ही ओळ पहिले दहा विस दिवस बडवत रहायची.. मग तुमची बोटं पक्की झाली, म्हणजे की बोर्ड कडे न पहाता टायपता आलं, की पुढची ओळ.. असा काहिसा प्रकार होता. वाचायला जरी सोपं वाटत असलं तरी खूप कठिण प्रकार होता हा..

आता मी स्वतःपण १५ दिवस गेलो होतो शिकायला पण नंतर सोडून दिलं. मी जेंव्हा टायपिंग शिकायला जायचो, तेंव्हा करंगळीने ए किंवा सेमिकॉलम टाइप करणं जमलं नाही कधीच.. आणि मी टायपिंग सोडून दिलं.. टायपिंग ही आर्ट पोहोणं किंवा सायकल शिकण्या सारखी आहे. एकदा तुम्हाला प्रसन्न झाली, की आयुष्यभर साथ देत रहाते.एकदा शिकलं की मग कधीच विसरू शकत नाही.टायपिंग शिकतांना बहुतेक रेमिंग्टन चा एखादा जुनाट टाइप रायटर असायचा. नंतर गोदरेज ने पण टाइपरायटरमधे शिरकाव करुन मार्केटींग करणं सुरू केलं.

typeKit05पूर्वीच्या काळी आजकालच्या प्रमाणे फॊटॊकॉपी किंवा झेरॉक्स हा प्रकार नव्हता. त्यामुळे कुठल्याही डॉक्युमेंटची प्रत ही टाइप करुनच काढली जायची.मार्कलिस्ट टाइप करुन घेण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागायचे कारण त्यामधे टेबल्स वगैरे असायचे.  कांही मुलं तर हातानेच ट्रु कॉपी काढून त्यावरच सर्टीफिकेशन करुन घ्यावे लागायचे.त्यावर एखाद्या गॅझेटेड ऑफिसर ची सही घेतली की मग झालं. आमच्या घरी वडिलांच्या सह्या घेण्यासाठी बरेच

लोकं यायचे.. छे.. भलतीच कडे चाललाय लेख..

आमच्या ऑफिस मधे पण कित्येक वर्ष टाइप रायटर्संच होते. माझा एक आधीचा लेख आहे… वर्ड स्टार ते सॅप म्हणून,,, त्यामधे हे सगळं ट्रान्झिशन लिहिलंय. टाइप रायटर मधे काय नसायचं?? एक परीपुर्ण मशिन म्हणून   मला खरंच खूप आदर आहे ही मशिन डेव्हलप करणाऱ्या बद्दल…

.

typeKit01

टाइपरायटर रिपेअर करता एक वेगळीच टाइपरायटर मेकॅनिक्स ही जमात होती. ते लोकं आपल्या टुल बॅग्ज मधे वेग वेगळे खीळॆ ( म्हणजे टाइप सेट ) , प्लायर्स असायचे. दर सोमवारी येउन प्रत्येक टाइपरायटरचं सर्व्हिसिंग करुन जायचा. या टाइपरायटर मेकॅनिकच्या बॅगेत सगळं काही असायचं..अगदी प्रत्येक मेकच्या( रेमिंग्टन, गोदरेज वगैरे) खिळ्यांपासुन सगळं काही. प्रत्येक टाइपरायटरचा टाइप सेट वेगळा असायचा. त्यामुळे खिळे पण वेगळेच असायचे.

निर-निराळे ब्रश, थिनर किंवा स्पिरिट .. स्वच्छ करण्यासाठी.. आणि बरंच काही.रेग्युलर युझ मधे ह्या खिळ्यांचं सेटींग बिघडलं की मग काही अक्षरं अर्धवट उमटणे , किंवा अजिबातच न उमटणे असा प्रकार चालायचा. म्हणून ह्या सर्व्हिस मेकॅनिकची खुपच किंमत होती.. मोस्ट वॉंटेड असायचा हा मेकॅनिक..

काल काही फोटो पहाण्यात आले टाइपरायटर रिपेअर मेकॅनिकच्या बॅगचे .. आणि जुने दिवस आठवले, म्हणुन तुमच्यासोबत शेअर करतोय इथे.. त्या किट मधे खाली पातळसे डबे दिसताहेत, त्यामधेच ते खिळे (टाइपसेट) असायचे.गिअर्स, क्लिप्स, बेल्ट असे अनेक typeKit04स्पेअर पार्ट्स त्या बॅगेत असायचे.आणि बाकीचे टूल्स .. त्यापैकी बरेचसे कॉमन आहेत, अजूनही वापरले जातात बऱ्याच ठिकाणी.

नंतर काही दिवसांनी इलेक्ट्रॉनिक टाइपरायटर पण आला, पण त्याचं आयुष्य फारच कमी होतं. कारण लवकरच कॉम्प्युटर पण आला …पण नंतर जेंव्हा कॉम्प्युटर्स आले , तेंव्हा मात्र हा टाइपरायटर कधी स्क्रॅप मधे फेकला गेला तेच कळलं नाही.

याच विषयावर एक लेख लिहिलाय “वर्ड स्टार ते सॅप” म्हणुन..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged . Bookmark the permalink.

3 Responses to टाइपरायटर

 1. Sagar says:

  hummm……

 2. bhujang says:

  I still remember my father’s mini typewriter. It was Italian “Olivetti” make.

  I used to love the sound of “Ting” when the bar reached the end.

 3. जग बदलतय … बदललंय … जुणी समिकरणे, त्यांच्या व्हॅल्युजही काळाप्रमाणे बदलल्यात!
  माझ्या ग्रॅज्युएशनच्या काळापर्यंत साठ आणि बहुतेक तीसच्या स्पीडच्या टायपिंगच्या परीक्षा व्हायच्या… मीही त्याला बसलो होतो… मात्र १-२ क्लासच्यावर माझी मजल गेलीच नाही. कोरज [कोरे’ज?] च्या शाखा त्यावेळी बहुतेक ठीकाणी असायच्या.

  सध्याच्या युगात मला माहिती असलेलं “टाइपरायटर” चं ठीकाण म्हणजे न्यायालयं… सिनेमात तर अजुनही दाखवतात की एक टाइपरायटर नेहमी चालु असलेले वाद आणि मुद्दे टाइप करत असतो!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s