मेड इन ईंडीया??

मेड इन ईंडीया??
कालच्या पेपरला एक बातमी वाचली.टी ९० टॅंक्स  ज्याचं नांव भिष्म ठेवण्यात आलं आहे ते अवधी च्या हेवी व्हेइकल फॅक्टरी मधे निर्माण करण्यात आले आहेत. पहिल्यांदा जेंव्हा बातमीची हेडलाइन वाचली तेंव्हा खरंच खुप बरं वाटलं, की भारत आता मिलिट्रीच्या सामग्री च्या बाबतित स्वयंपुर्ण होतोय म्हणुन.
अवधी हे गांव चेन्नाई पासुन जवळपास २० किमी अंतरावर आहे. या तयार करण्यात आलेल्या टँक्स ला इंडिजिनियस म्हंटलं जातंय. टी ९० टॅंक्सची क्षमता पुर्णपणे टेस्ट केलेली आहेच रशियन लोकांनी. अफगाण युध्दात या टॅंक्सनी मोठी कामगिरी बजावली… अर्थात रशियाला अफगाण योध्यांच्या पुढे ( अमेरिका- पाकिस्तान पुरस्कृत) सपशेल माघार घ्यावी लागली ही गोष्ट अलहिदा.
अमेरिकेने पण अफगाणी योध्यांना ऍंटी टॅंक मिसाइल्स, ऍंटी एअरक्राफ्ट गन्स दिले होते, ज्या मूळे या अफगाण लोकांना रशियाच्या टॅंक्स आणी विमानांच्या विरुध्द लढता आले. अमेरिकेने उभा केलेला हा अफगाणिस्थानचा भस्मासुर कधी अमेरिकेच्याच डोक्यावर हात ठेवायला धावु लागला, ते त्यांनाच कळलं नाही. मग जेंव्हा या भस्मासुराने ९/११ ला डब्लुटीसी वर हात ठेवले, तेंव्हा अमेरिकेला वाचवायला कोणि मोहिनी नव्हती. जर अमेरिकेने अफगाणिस्थानला  मदत केली नसती तर मात्र रशियाचा विजय निश्चितच होता.
अफगाण योध्यांना तिकडल्या डोंगरामधे पोखरुन तयार केलेल्या गुहांच्या मुळे पण खुपच संरक्षण मिळालं. असो.. तर टी ९० टॅंक्स.. या टँक्सच्या बाबतित पुढे वाचल्यावर असं कळलं की हे टॅंक्स इथे सिकेडी ( कम्लिटली नॉक्ड डाउन ) परिस्थितित आयात करण्यात आले होते. म्हणजे जरी यावर मेड इन ईंडियाचं लेबल असलं, तरिही हे टॅंक्स फक्त भारतामधे असेम्ब्ली केलेले आहेत.
भारतामधे इतके टेक्निकली क्वालिफाइड लोकं असतांना मला हे लक्षात येत नाही, की एक साधा टॅंक का डिझाइन करता येउ नये आपल्याला? टेक्नॉलॉजिकली बॅकवर्ड पाकिस्तान जर सिकेडी आय्टम विकत घेत असेल तर ते समजु शकते, पण भारतासारख्या टेक्निकल वर्कफोर्सने स्वयंपुर्ण देशाला पण इतर देशांच्या पुढे टेक्नॉलॉजी साठी हात का पसरावे लागतात? भारतिय लोकं टॅंक्स वगैरे बनवण्यासाठी कॅपेबल नाही असंही मला वाटत नाही.
टॅंक म्हणजे असतं तरी काय? एक डीझल इंजिन, एक ऍटॊमॅटिक ट्रान्समिशन, मोबिलिटी साठी आणि एक गन… जी टेक्निकली ऍड्व्हान्स्ड , इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल, गायडेड मिसाल लॉंच करण्याची कॅपेब्लिटी.. वगैरे वगैरे… हे सगळं वाचायला जरी अवघड वाटत असलं तरिही भारतियांची टेक्निकल कॅपेब्लिटीज पहाता काही फारसं कठिण नाही.
गोरी कातडी म्हणजे हुशार.आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी स्वतःबद्दल आत्म विश्वासाची कमतरता… ही मानसिकता बदलायलाच हवी.कालची बातमी वाचुन मला तरी काही फारसा आनंद झालेला नाही. कारण आज तुम्ही सगळं इम्पोर्ट करुन टॅंक असेम्ब्ली करताय,  पण मग नंतर काही वर्षांनी स्पेअर पार्टस मधे बचत करण्याच्या नादात या टॅंक्सची पण अवस्था मिराज २००० प्रमाणे होऊ नये हिच इच्छा…
एखाद्या रशियन टॅंकला भारतिय नांव भिष्म दिल्याने तो टॅंक भारतिय, आणि मेड इन इंडिया होत नाही. उगिच देशात असा बातम्या प्रसिध्द करुन काय साधतं कोणास ठाउक..
आपल्या भारतामधे पण डीफेन्स रिसर्च ऍंड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आहे, की जी याच प्रकारच्या डेव्हलपमेंटसचे कामं करते. माझे काही मित्र या डिआरडीओ मधे कामं करतात. आणि  एक सांगतो.. दे आर कॅपेबल टु डेव्हलप एनी थिंग.. मग हे टॅंक्स वगैरे किरकोळ आहे…
लवकरच भारतिय बनावटीच्या मिल्ट्री इक्विपमेंट्स बद्दल मिळालं तर मला खुप आनंद होईल. तो पर्यंत रशियन टॅंक्सच्या असेम्ब्लिलाच मेड इन इंडिया टॅंक समजुन आनंद मानायचा झालं!

कालच्या पेपरला एक बातमी वाचली.टी ९० टॅंक्स  ज्याचं नांव भीष्म ठेवण्यात आलं आहे ते अवधी च्या हेवी व्हेइकल फॅक्टरी मधे निर्माण करण्यात आले आहेत. पहिल्यांदा जेंव्हा बातमीची हेडलाइन वाचली तेंव्हा खरंच खूप बरं वाटलं, की भारत आता मिलिट्रीच्या सामग्री च्या बाबतीत स्वयंपूर्ण होतोय म्हणून.पण नंतर जेंव्हा डिटेल वाचले तेंव्हा माझा पुर्ण भ्रमनिरास झाला,का ते पुढे लिहितोय…

अवधी हे गांव चेन्नाई पासून जवळपास २० किमी अंतरावर आहे. या तयार करण्यात आलेल्या टँक्स ला ’भारतीय’ म्हंटलं जातंय. टी ९० टॅंक्सची क्षमता पुर्णपणे टेस्ट केलेली आहेच रशियन लोकांनी. अफगाण युध्दात या टॅंक्सनी मोठी कामगिरी बजावली… अर्थात रशियाला अफगाण योद्ध्याच्या पुढे ( अमेरिका- पाकिस्तान पुरस्कृत) सपशेल माघार घ्यावी लागली ही गोष्ट अलाहिदा.

अमेरिकेने पण अफगाणी योध्याना ऍंटी टॅंक मिसाइल्स, ऍंटी एअरक्राफ्ट गन्स दिले होते, केवळ ती शस्त्रं वापरूनच  अफगाण लोकांना रशियाच्या टॅंक्स आणि विमानांच्या विरुद्ध लढता आले. अमेरिकेने उभा केलेला हा अफगाणिस्थान चा भस्मासुर कधी अमेरिकेच्याच डोक्यावर हात ठेवायला धावू लागला, ते त्यांनाच कळलं नाही. मग जेंव्हा या भस्मासुराने ९/११ ला डब्लुटीसी वर हात ठेवले, तेंव्हा अमेरिकेला वाचवायला कोणी मोहिनी नव्हती. जर अमेरिकेने अफगाणिस्थान ला  मदत केली नसती तर मात्र रशियाचा विजय निश्चितच होता.म्हणूनच टी ९० टॅंक्सच्या कॅपॅब्लिटीज बद्दल अजिबात शंका घेतली जाऊ शकत नाही.

२००१ साली रशियाबरोबरच्या कॉंट्रॅक्ट प्रमाणे ३१० टॅंक्स रशियाकडून इम्पोर्ट करण्यासाठी ऍग्रिमेंट करण्यात आले. या पैकी १२४ टॅंक कम्प्लिटली असेम्बल्ड कंडीशन मधे असतील असंही ठरलं होतं.उरलेले १८६ हे सिकेडी आणण्यात येणार आहेत.रशियन लोकांनी फेजेस मधे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करु असंही मान्य केलं होतं. आता ती फेज कधी सुरू होणार हे कोणास ठाऊक!

त्यापैकी ही पहिली दहाची सो कॉल्ड ’मेड इन ईंडिया” बॅच!( असंही वाचण्यात आलंय की या पैकी काही सेमी नॉक्ड डाउन कंडीशन मधे पण इम्पोर्ट करण्यात आले आहेत) नुकतीच रोल आऊट झाली…२००१ सालच्या ऍग्रिमेंटचे टॅंक्स भारतात पोहोचायला ८ वर्षं का लागावे??असो.. जे काही असेल ते असो..

अफगाण योध्यांना तिकडल्या डोंगरामधे पोखरून तयार केलेल्या गुहांच्या मुळे पण खूपच संरक्षण मिळालं. असो.. तर टी ९० टॅंक्स.. या टँक्सच्या बाबतीत पुढे वाचल्यावर असं कळलं की हे टॅंक्स इथे सिकेडी ( कम्लिटली नॉक्ड डाउन ) परिस्थितीत आयात करण्यात आले होते. म्हणजे जरी यावर मेड इन ईंडियाचं लेबल असलं, तरीही हे टॅंक्स फक्त भारतामधे असेम्ब्ली केलेले आहेत.याचा प्रत्येक पार्ट हा रशियामधे मॅन्युफॅक्चर करण्यात आलेला आहे. अर्थात बाहेरचे कमी महत्वाचे पार्ट्स  कदाचित इथे बनवले असतीलही, पण मुख्य पार्ट्स जसे इंजिन, ट्रान्समिशन इम्पोर्टेड आहे.

मेड इन इंडीया?? कट द क्रॅप  .. इट्स नॉट लाइक द वे इट लुक्स..भारतामधे इतके टेक्निकली क्वालिफाइड लोकं असतांना मला हे लक्षात येत नाही, की एक साधा टॅंक का डिझाइन करता येऊ नये आपल्याला? टेक्नॉलॉजिकली बॅकवर्ड पाकिस्तान जर सिकेडी आय्टम विकत घेत असेल तर ते समजू शकते, पण भारतासारख्या टेक्निकल वर्क फोर्सने स्वयंपूर्ण देशाला पण इतर देशांच्या पुढे टेक्नॉलॉजी साठी हात का पसरावे लागतात? भारतीय लोकं टॅंक्स वगैरे बनवण्यासाठी सक्षम नाही असंही मला वाटत नाही.

टॅंक म्हणजे असतं तरी काय? एक डीझल इंजिन, एक ऍटॊमॅटिक ट्रान्समिशन, मोबिलिटी साठी आणि एक गन… जी टेक्निकली ऍड्व्हान्स्ड , इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल, गायडेड मिसाल लॉंच करण्याची कॅपेब्लिटी.. वगैरे वगैरे… हे सगळं वाचायला जरी अवघड वाटत असलं तरीही भारतीयांची टेक्निकल  सक्षमता पहाता काही फारसं कठिण नाही.

गोरी कातडी म्हणजे हुशार.आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी स्वतःबद्दल आत्म विश्वासाची कमतरता… ही मानसिकता बदलायलाच हवी.कालची बातमी वाचून मला तरी काही फारसा आनंद झालेला नाही. कारण आज तुम्ही सगळं इम्पोर्ट करुन टॅंक असेम्ब्ली करताय,  पण मग नंतर काही वर्षांनी स्पेअर पार्टस मधे बचत करण्याच्या नादात या टॅंक्सची पण अवस्था मिराज २००० प्रमाणे होऊ नये हीच इच्छा…

एखाद्या रशियन टॅंकला भारतीय नांव भीष्म दिल्याने तो टॅंक भारतीय, आणि मेड इन इंडिया होत नाही. उगाच देशात असा बातम्या प्रसिद्ध करुन काय साधतं कोणास ठाऊक..आपल्या भारतामधे पण डीफेन्स रिसर्च ऍंड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आहे, की जी याच प्रकारच्या डेव्हलपमेंटसचे कामं करते. माझे काही मित्र या डिआरडीओ मधे कामं करतात. आणि  एक सांगतो.. दे आर कॅपेबल टु डेव्हलप एनी थिंग.. मग हे टॅंक्स वगैरे किरकोळ आहे…

आपण भारतामधे जर उपग्रह लॉंचिंग फॅसिलिटीज तयार करु शकतो, स्वतःच्या जोरावर चंद्रावर यान पाठवण्याचे स्वप्न पाहु शकतो, हजारो किमी रेंज ची बॅलेस्टीक मिसाइल्स बनवू शकतो.. तर हे असले टॅंक्स वगैरे काय अवघड आहेत का बनवणे?.लवकरच भारतीय बनावटीच्या मिल्ट्री इक्विपमेंट्स बद्दल मिळालं तर मला खुप आनंद होईल. तो पर्यंत रशियन टॅंक्सच्या असेम्ब्लिलाच मेड इन इंडिया टॅंक समजुन आनंद मानायचा झालं!

(भारतिय) टी ९० आणी अल खलिद ( पाकिस्तानी टॅंक)  ची कम्पॅरिझन वाचण्यात आली एका फोरमवर. इथे पोस्ट केली आहे ती.

T-90

Specifications
Dimensions
Length 9.53 – 6.86 meters
Width 3.78 meters
Height 2.225 meters
clearance 0.47 meters
Weight 46.5 – 50 metric tons
Armored volume 11.04 m3
turretvolume 1.85 m3
Crew 3
Engine 840 hp V-84MS diesel
1,000 hp V-84KD turbo-supercharged diesel
1,000 hp V-85 diesel
1 kW AB-1-P28 auxiliary power unit
Max Road Speed 65 km/h
Max cross-country Speed 45 km/h
Power/Weight 18 – 20.0 hp/tn
Ground Pressure 0.938 kg/sq.cm
Range 550 – 650 km
Obstacle negotiation
Fording depth 1.2 m on the move/5 m with OPVT (snorkel)
Trench width 2.8 m
Vertical obstacle 0.8 m
Maximum gradient 30°
Weapons
Main Weapon 125mm 2A46M-2 smoothbore
Stabilization 2E42-4 Zhasmin
Rate of fire 6-8 rounds/min
Ammunition 43 rounds (22 in carousel)
Ammunition Types APFSDS, HEAT, HEF
ATGM through 125mm 9M119M Refleks-M (AT-11 Sniper-B)
Machine Guns Coaxial PKT 7.62mm (2000 rounds)
Remotely-controlled AAMG mount Utjos NSVT 12.7mm (300 rounds)
Smoke Screens 12 902B 82mm mortars with 3D17 smoke grenades
smoke discharger
Equipment
Night Vision TO1-PO2T Agava-2 TI (target id range 2.5 km)
TPN-4-49-23 Buran-PA (target id range 1.2/1.5 km)
Fire Control 1A45T Irtysh computerized system with 9S515 missile guidance system
Onboard sights
Commander PNK-4S sight includes TKN-4S Agat-S day/night sight (target id range 800 m (day)/700 m (night))
Gunner 1V528-1 ballistic computer
1A43 rangefinder/sight
1G46 laying device
DVE-BS wind gauge
Driver TVN-5 IR night viewer
Radio R-163-50U
R-163-50U + R-163-50K (T-90K)
Navigation TNA-4-3 (T-90K)
Jammers Shtora-1 EOCMDAS
Dazzle painting
Other NBC, 3ETs13 Inej auto-fire-fighting equipment,
self-dig-in blade,
air conditioning,
KMT-6 mine clearing equipment (optional)
Front & side armor laminated front, side and top armor behind Kontakt-5 ERA
Front armor rating, mm RHA vs APFSDS: 550 mm + 250-280mm with Kontakt-5 = 800-830mm
vs HEAT: 650 mm + 500-700mm with Kontakt-5 = 1,150-1,350mm

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक. Bookmark the permalink.

13 Responses to मेड इन ईंडीया??

 1. Rohini says:

  तुमचं अगदी बरोबर आहे की हे टॅंक्स बनवण्याची क्षमता भारतात आहे. पण का बनत नाहीत त्यामागे सुद्धा तशिच काही कारणं आहेत. बाकी लेख एकदम informative झाला आहे.

  • रोहिणी
   गोव्याला कित्तेक जहाजं बनवली जातात पण , जेंव्हा फ्रिजेट वगैरे लागते तेंव्हा आपण रशिया /ब्रिटन कडे धाव घेतो आणि त्यांनी वापरुन जुन्या केलेल्या शिप्स विकत आणतो. दुर्दैव आपलं..
   इथे आपल्याकडे शिप्स बनवण्यासाठी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. गोव्याला तर कित्तेक ड्राय डॉक्स आहेत. पण इच्छाशक्ति ची कमतरता… आणि राजकिय कारणं पण आहेतंच..

 2. archana says:

  भारतात बनविणे अगदिच शक्य आहे पण मग दलालीचे काय? तीच्यासाठी तर हा आयातीचा अट्टाहास!!आपण आहोतच tax भरायला .

  • अर्चना
   अगदी मुद्याचं बोललात. कदाचित ते पण कारण असेल. तसं इथे हिंदुस्थान एरोनॉटिक्स मधे विमानाचे भाग बनवले जाउ शकतात/ बनवले जातात. तेंव्हा हा टॅंक बनवणे म्हणजे काही अवघड नाही.

 3. VK says:

  आम्ही भारतीय नव्हे इंडीयन फार बनवाबनवी करण्यात पारंगत आहोत, अर्ध्या ह्ळकूंडाने पीवळे होणे हा आमचा जन्मसिध्द हक्क होऊ लागला आहे. त्यात जातीयवाद, आरक्षण अशा वादांच्या माकड ऊडया चालू ठेवण्यात आमच्या राज्य करत्यांनाच नव्हे तर परकीयांच्या फायद्याच्या आहेत. भारतावर आक्रमण करून आजवर सगळ्यांचे अस्तीतत्व धोक्या आले, म्हणून भारताची प्रगती थांबण्याचा ह एक रामबाण उपाय वापरांत आहे. दूर्भाग्य हेच की हीच चाणाक्य नीती परकीयांनी आत्मसात केली आहे, ऊदाहरणे शोधा भरपूर सापडतील. मी आणि माझी दोन्ही मुले नेहमी सांगतो आम्ही भारतीय होतो ह्याचा अभीमान आहे ( लंकेत सोन्याच्या वीटा ) पण अ‍ॅक्सीडेंट्ली ईंडीयन झालो आहोत.
  कदचित बर्‍याच जणांना मी दुखावले असणार. ३० वर्ष नॉन रीकवायर्ड ईंडीयन होऊन आम्ही मायदेशी परतलो, इथले लाथा मारण्याचे नैपुण्य बघुन आणि खाऊन, आमची मतं ही अशी आहेत. क्षमस्व!

  • तुमच्या म्हणण्याचा मतितार्थ लक्षात आला. पण त्यात तुम्ही काही वावगं लिहिलंय असं मला वाटत नाही. प्रतिक्रिये करता आभार.

 4. rohan says:

  महेंद्र दादा.. १८ दिवस लडाखला जाउन आलो रे. टॅंक्स काय आणि बोफोर्स काय.. पुन्हा एकदा अगदी जवलून पाहून आलो.

  • रोहन
   मी स्वतःपण १९८८ मधे टॊपाझ च्या रिपॉवरिंग मधे इन्व्हॉल्व्ह्ड होतो. मजा यायची फ्रंट वर. चार महिने काढले होते पॉवर पॅक च्या ट्रायल्स साठी. पाकि बॉर्डरवर होतो आम्ही. जाळिच्या पलिकडे नंबर १ करायची आणि मग पाकिस्तान पे *** किया म्हणुन समाधान मानायचं… 🙂

 5. nagarkar says:

  read this article http://www.rediff.com/news/2009/feb/12-defence-rand-what-india-needs-to-do.htm

  as you said we can but till date it dint happen fully because only government orgs like DRDO VRDE were allowed for the defense equipment research n production..now its changing..becasue private companies are being allowed to do the research and production…other countries like US UK ISRAEL RUSSIA CHINA have these kind of partnership since many many years so they are ahead of everyone..after russia and US..it took 50+ years for us to send a machine on the moon but we did it..thats important. simialry..we too will ahve our own 100% tools to fight..for sure..but for that to happen political will and the realization of ones true potential is necessary..now adays even a mechanical engineer with all related knowledge and skills wants to do a crash course in the programing and get into IT beucase he/she has learned that the money is there..which is true.

  I am sure we can do it and we have hell lot of knowledge and reources than others..but need to give some more time ..and until then need buy equipments from other becasue we have our friends pak n china around to take care ..

 6. Karach khoop mahiteepoorn lekh aahe an kar hee aahe tumach mhanan pan nete lokanchee mothee pot kashee bharanar mag.

 7. दिपक says:

  भारतीयात क्षमता आहे हे आपण जाणतो. मग नक्की घोडं कुठे अडते हाच प्रश्न उभा राहतो. महेंद्रा लेख मस्त जमलाय. बरीच माहिती मिळाली. मागे डिस्कव्हरीवर टॅंक कसे तयार करतात हे पाहिले होते. ह्या विषयांवर तुझ्याकडून अजुन वाचायला आवडेल. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s