बिन चेहेऱ्याची माणसं.

बिन चेहेऱ्याची माणसं
मी तसा नविनच आहे ह्या ब्लॉगिंगच्या क्षेत्रात. जेंव्हा ब्लॉग सुरु केला तेंव्हा तर निटसं माहिती पण नव्हतं हा काय प्रकार आहे ते. पण इथे आल्यावर मात्र  सगळं कसं सुरळित झालं. लिहिणं पण जमायला लागलं.. अर्थात  असं माझं मलाच वाटतंय बरं कां.कारण सगळं आयुष्य गेलं इंग्रजीचा वापर करण्यात. अगदी खरं सांगतो, इथे ब्लॉगिंग सुरु करे पर्यंत मी गेल्या २५ वर्षात कधिच मराठीचं एकही वाक्य लिहिलेलं नव्हतं , त्यामुळे मराठी लिहितांना इंग्रजी शब्द येणं किंवा ह्र्स्व दिर्घाच्या चुका होणं सहाजिक आहे, तरी पण नेटाने लिखाण सुरु ठेवलंय आजपर्यंत तरी..
इथे येण्यापुर्वी मी ऑर्कुटवर बऱ्यापैकी ऍक्टीव्ह होतो. तिथे बरिच बिन चेहेऱ्याची माणसं होती. नांव खोटं, वय खोटं. सगळं खोटं असायचं काही लोकांचं . कारण मला कधिच कळलं नाही. तशाच काही लोकांनी आता ब्लॉग वर पण कॉमेंट टाकणं सुरु केलंय.. स्वतःचं आणि आपल्या बापाचं/ बापाने दिलेले आडनांव ( अशी अपेक्षा करतो की त्यांना माहिती असावं ते) लपवुन 🙂
माझं रेगुलरली पोस्ट टाकणे सुरु असायचं कांही कम्युनिटी मधे. पण नंतर ऑर्कुट अकाउंट डिलिट केल्यानंतर निर्माण झालेली पोकळी मात्र या ब्लॉगिंगने भरुन काढली. मी इंटरनेटवर कुठेही असलो तरिही नेहेमीच आपल्या खऱ्या नावाने वावरलो. माझ्या नावाची किंवा माझ्या वडिलांनी दिलेल्या आडनावाची मला लाज वाटत नाही.
पण आजकाल एक नविन ट्रेंड आलेला दिसतोय. बऱ्याच लोकांना आपण कोण म्हणजे स्वतःचे नांव लिहिण्याची किंवा आपल्या बापाने दिलेले आडनांव लिहायची लाज वाटते. ( मला तर बरेचदा असा पण संशय येतो की या लोकांना आडनांव असते कां?? की नसते??  🙂 कारण जी गोष्ट अभिमानाने सांगायची तिच हे लपवुन ठेवतात म्हणुन वाटलं. ) . बरेचदा अमेरिकेत कुमारी माता होतात, त्यांची ऑफ स्प्रिंग्ज असतिल कां हे कॉमेंट्स टाकणारे? की ज्यामुळे यांना आपलं आडनांव पण माहिती नाही?
नंतर मग बिना नावाने ऍनोनिमस कॉमेंट्स टाकतात लोकांच्या ब्लॉग्ज वर.स्वतः मधे अगदी शुन्य टक्के कॉन्फिडन्स असला की लोकं असे कुठल्या तरी पडद्या आड उभे राहुन इतरांवर कॉमेंट्स करणं, किंवा शिविगाळ करणं पसंत करतात. या लोकांचा आत्मविश्वास कमी असल्यामुळे त्यांची जगाच्या समोर येउन आपली ठाम मते सांगण्याची तयारी नसते. स्वतः तर काहिच करायचं नाही , पण दुसरा जर काही करित असेल तर मात्र त्याच्या चुका काढण्यातच ही अशा लोकांची जमात विकृत आनंद घेते.
माझ्या ब्लॉग वर मी माझी मतं मांडतो. आज पर्यंत बरेचदा लोकांच्या कॉमेंट्स आल्या होत्या की माझी मतं त्यांना पटलेली नाहित म्हणुन, आणि ती मतं पण मी ब्लॉग वर प्रसिध्द केली . पण शिवराळ भाषा वापरुन लिहिलेल्या कॉमेंट्स मुळे मात्र डोकं पार खराब होतं. ज्याने असं केलंय त्याला सरळ भोसडुन काढायची इच्छा होते. पण हे वैचारिक दृष्ट्या नपुंसक असलेले लोकं पडद्या आड लपुन स्वतःला सेव्ह करतात . कॉमेंट्स पोस्ट करतांना हे षंढ लोकं  अगदी खोटे इमेल आयडी देउन कॉमेंट टाकतात. इमेल आयडी नसल्याने, ज्याला यांनी शिव्या घातल्या आहेत त्याला यांना काहिच रिप्लाय देता येत नाही आणि तो माणुस मात्र मग हात चोळत चिडचिडकरित बसतो. खरंच सांगतो, कालच्या त्या कॉमेंटने माझा एक दिवस पुर्ण खराब झाला. दिवस भर चिडचिड होत होती. म्हणुन कालच ठरवलंय , की त्याला सोडायचं नाही.. !!!!
हाच अनुभव माझ्या मित्र, मैत्रिणिंना पण आलाय. अशा लोकांच्या कडे दुर्लक्ष करावं असं वाटतं.. पण त्या मुळे काय होणार? हे लोकं तर पुन्हा पुन्हा कॉमेंट्स टाकत रहाणार. तेंव्हा हर्षद ने यावर एक चांगला उपाय सांगितलाय. सरळ कॉमेटला अप्रुव्ह न करता स्पॅम म्हणुन मार्क करा. पुन्हा त्या आयपी वरुन कॉमेंट्स येणार नाहित.
माझं एकच म्हणणं आहे, जर टीका करायची ईतकी खाज आहे तर आपला इ मेल आयडी सहित कॉमेंट द्या.. म्हणजे तुम्ही ज्याच्यावर कॉमेंट करता तो पण तुम्हाला रिप्लाय देउ शकेल. एखाद्याच्या आयुष्यातला एक दिवस खराब करण्याचा तुम्हाला काहिही अधिकार नाहि!
हे तर झालं ब्लॉगिंग बद्दल. ऑर्कुटवर असतांना पण बरिच मंडळी खोट्यानावाने आपलं वय, लपवुन वावरायची. म्हणजे काय तर सगळेच हवेतले इमले.. नांव खोटं, वय खोटं, ….! अशी खॊटी नावं घेउन मग मित्र जमवायचे , ही संकल्पना खुप हिट झाली… मी जेंव्हा ऑर्कुटवर होतो तेंव्हा अशा बिनचेहेऱ्याच्या लोकांना कधिच आपल्या लिस्ट मधे स्थान दिले नव्हते.
मी अगदी खरोखरंच हर्ट झालोय कालच्या कॉमेंट मुळे, म्हणुन वरची भाषा जरा बिघडलेली आहे त्याबद्दल क्षमस्व!!

upset…… तुमच्या ब्लॉग वर ऍनोनिमस कॉमेंट्स, शिवराळ भाषेत  टाकुन तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जातो का?? निश्चितच होत असेल तसं. .. मग हा लेख नक्कीच वाचा..

मी तसा नवीनच आहे ह्या ब्लॉगिंगच्या क्षेत्रात. आता सात महिने झालेत इथे पोस्टिंग सुरू करुन.जेंव्हा ब्लॉग सुरू केला तेंव्हा तर नीटसं माहिती पण नव्हतं हा काय प्रकार आहे ते. पण इथे आल्यावर मात्र  सगळं कसं सुरळीत झालं. लिहिणं पण जमायला लागलं.. अर्थात  असं माझं मलाच वाटतंय बरं का.

सगळं आयुष्य  इंग्रजीचा वापर करण्यात गेलं. अगदी खरं सांगतो, इथे ब्लॉगिंग सुरू करे पर्यंत मी गेल्या २५ वर्षात कधीच मराठीचं एकही वाक्य लिहिलेलं नव्हतं , त्यामुळे मराठी लिहितांना इंग्रजी शब्द येणं किंवा ह्र्स्व दीर्घाच्या चुका होणं साहजिक आहे, तरी पण नेटाने लिखाण सुरु ठेवलंय आजपर्यंत तरी..

इथे येण्यापूर्वी मी ऑर्कुटवर बऱ्यापैकी ऍक्टीव्ह होतो. तिथे बरीच बिन चेहऱ्याची माणसं होती. नांव खोटं, वय खोटं. सगळं खोटं असायचं काही लोकांचं . कारण मला कधीच कळलं नाही. तशाच काही लोकांनी आता ब्लॉग वर पण कॉमेंट टाकणं सुरु केलंय.. स्वतःचं आणि आपल्या बापाचं/ बापाने दिलेले आडनांव ( अशी अपेक्षा करतो की त्यांना माहिती असावं ते) लपवून  🙂

नंतर ऑर्कुट अकाउंट डिलिट केल्यानंतर निर्माण झालेली पोकळी मात्र या ब्लॉगिंगने भरुन काढली. मी इंटरनेटवर कुठेही असलो तरीही नेहेमीच आपल्या खऱ्या नावाने वावरलो. माझ्या नावाची किंवा माझ्या वडिलांनी दिलेल्या आडनावाची मला लाज वाटत नाही.

पण आजकाल एक नवीन ट्रेंड आलेला दिसतोय. बऱ्याच लोकांना आपण कोण म्हणजे स्वतःचे नांव लिहिण्याची किंवा आपल्या बापाने दिलेले आडनांव लिहायची लाज वाटते.  मला तर बरेचदा असा पण संशय येतो की या लोकांना आडनांव असते का?? की नसते??  🙂 कारण जी गोष्ट अभिमानाने सांगायची ्तीच हे लपवून ठेवतात म्हणून वाटलं.  🙂  इंग्रजी मधे एक छान शब्द आहे अशा लोकांसाठी बास्टर्ड्स.. मरा्ठीत काय म्हणतात हो त्याला?

मग बिना नावाने ऍनोनिमस कॉमेंट्स टाकतात लोकांच्या ब्लॉग्ज वर.स्वतः मधे अगदी ्शून्य टक्के कॉन्फिडन्स असला की लोकं असे कुठल्या तरी पडद्याआड उभे राहुन इतरांवर कॉमेंट्स करणं, किंवा शिवीगाळ करणं पसंत करतात. या लोकांचा आत्मविश्वास कमी असल्यामुळे त्यांची जगाच्या समोर येउन आपली ठाम मते सांगण्याची तयारी नसते. स्वतः तर काहीच करायचं नाही , पण दुसरा जर काही करित असेल तर मात्र त्याच्या चुका काढण्यातच ही अशा लोकांची जमात विकृत आनंद घेते.

माझ्या ब्लॉग वर मी माझी मतं मांडतो. आज पर्यंत बरेचदा लोकांच्या कॉमेंट्स आल्या होत्या की माझी मतं त्यांना पटलेली नाहीत म्हणून, आणि ती मतं पण मी ब्लॉग वर प्रसिद्ध केली . अर्थात मत- मतांतरे सहाजिकच आहे. पण दुसऱ्या माणसाला खोट्या इमेल आयडी वरुन शिव्या घालण्यात कसला पुरुषार्थ आलाय?हिम्मत असेल तर स्वतःच्या खऱ्या नावाने कॉमेंट टाका, आणि ती पण पर्सनल   नको.. लेखाच्या अनुषंगाने ..मी ती प्रसिद्ध करिन आणि तिला  उत्तर पण देईन.

शिवराळ भाषा वापरुन लिहिलेल्या कॉमेंट्स मुळे मात्र डोकं पार खराब होतं. ज्याने असं केलंय त्याला सरळ भोसडुन काढायची इच्छा होते. पण हे वैचारिक दृष्ट्या नपुंसक असलेले लोकं पडद्या आड लपून स्वतःला सेव्ह करतात . कॉमेंट्स पोस्ट करतांना हे षंढ लोकं  अगदी खोटे इमेल आयडी देऊन कॉमेंट टाकतात. इमेल आयडी नसल्याने, ज्याला यांनी शिव्या घातल्या आहेत त्याला यांना काहीच उत्तर देता येत नाही आणि तो माणुस मात्र मग हात चोळत चिडचिडकरित बसतो. खरंच सांगतो, कालच्या त्या कॉमेंटने माझा एक दिवस पुर्ण खराब झाला. दिवस भर चिडचिड होत होती. म्हणून कालच ठरवलंय , की त्याला सोडायचं नाही.. !!!!

हाच अनुभव माझ्या मित्र, मैत्रिणिंना पण आलाय. अशा लोकांच्या कडे दुर्लक्ष करावं असं वाटतं.. पण त्या मुळे काय होणार? हे लोकं तर पुन्हा पुन्हा कॉमेंट्स टाकत रहाणार. तेंव्हा हर्षद ने यावर एक चांगला उपाय सांगितलाय. सरळ कॉमेटला अप्रुव्ह न करता स्पॅम म्हणून मार्क करा. पुन्हा त्या आयपी वरुन कॉमेंट्स येणार नाहीत.

माझं एकच म्हणणं आहे, जर टीका करायची ईतकी खाज आहे तर आपला इ मेल आयडी सहीत कॉमेंट द्या.. म्हणजे तुम्ही ज्याच्यावर कॉमेंट करता तो पण तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर  देऊ शकेल. एखाद्याच्या आयुष्यातला एक दिवस खराब करण्याचा तुम्हाला काहीच  अधिकार नाही!

मी अगदी खरोखरंच हर्ट झालोय कालच्या कॉमेंट मुळे, म्हणून वरची भाषा जरा बिघडलेली आहे त्याबद्दल क्षमस्व!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged . Bookmark the permalink.

21 Responses to बिन चेहेऱ्याची माणसं.

 1. महेंद्रजी,
  कालच आपली ट्विटरवर अपडेट वाचली… रिप्लाय करणार होतो, मात्र वाटलं उद्याची पोस्ट हीच असणार… म्हटलं सविस्तर लिहावं!

  ब्लॉगस्पिअरवर असे प्रकार नविन नाहीत, खास करुन जेंव्हा आपण एखाद्या पर्स्नल विषयावरती किंवा कॉन्ट्रावर्सियल इश्युवरती लिहितो तेंव्हा अशा कमेंटस अनपेक्षितपणे येतात. मलाही हा अनुभव आलाय. अशावेळी डोकंच आउट होतं.. वाटतं साला समोर आसता तर फाडुन टाकला असता… मात्र एक नक्की, अशा लोकांमध्ये हिंमत नसते! माझ्या ब्लॉग वाचणार्‍या बहुंताशी लोकांमध्ये माझे मित्रच असतात… शिवाय बर्‍याच लोकांना मी माहितही आहे. त्यामुळे सध्यातरी अशा कमेंटस् येत नाहीत.

  तसं या लोकांशी निपटायचा उपाय म्हणजे त्या कमेंटस् अनएप्रुव्ह करुन – तशाच टेऊन, ट्रॅक कराव्या. स्पॅम केल्या तर परत येणार नाहीत हे खरं, मात्र त्या लोकांबद्द्ल कळणारही नाही. आय.पी. वरुन अशा लोकांना शोधनं खुप अवघड नाही.खुपच सेन्सिटीव मॅटर असेल तर सायबर सेल ची मदतही घ्यावी, हे बरं!

  • दिपक
   माझं डोकंच आउट झालं होतं दिवसभर. इतकं सिरियस मॅटर नाही, आयपी वरुन सायबर सेल कडे मदत मागण्याइतकं.पण ह्या गृहस्थाला असंच सोडुन देणंही बरोबर नाही.. खरं की नाही?

   • अच्छा.. मात्र त्या कमेंटस् अनएप्रुव करुन तशाच ठेवा, डिलीट नका करु.. कदाचित मॅटर सिरिअस झालाच तर प्रुप असावे! बाकी आपण लिहित रहा – बिंधास्त! आम्ही वाचणारे आहोतच..!

 2. bhujang says:

  कुळकर्णी साहेब,

  असभ्य आणि अर्वाच्य कॊमेंण्ट्स लिहिणार्यांचा मुख्य हेतु लेखकाला frustrate करण्याचा असतो.
  आपण जितका उहापोह कराल तितका त्यांचा हेतु साध्य होतो.
  असल्या महाभागांना अनुल्लेखाने मारलेलेच योग्य.

  • पाटील साहेब
   प्रतिक्रियेकरता आभार. या अशा कॉमेंट्स मुळे नसता मनःस्ताप मात्र होतो.
   दिपक
   प्रुफ्स ठेवलेले आहेत इ मेल मधे पण वर्डप्रेसचा मेल असतोच ..तोच मेल फॉरवर्ड करिन म्हणतो.

 3. Ashish says:

  कुलकर्णी साहेब,

  “Any fool can criticize, condemn, and complain but it takes character and self control to be understanding and forgiving.”

  सोडून द्या ना..

  • आशिष
   प्रतिक्रियेकरता आभार. आज कालपेक्षा बरं वाटतंय. कालचा राग आता शांत झालाय हा लेख लिहिल्या नंतर..पण त्या माणसाला धडा शिकवायलाच हवा नां? नाही तर इतरांना पण तो असाच त्रास देईल. सोडुनच दिलय तसं.. कम्प्लेंट तर केलेली नाही अजुन तरी..

 4. रवि करंदीकर says:

  महेंद्रजी

  तुमचे लिखाण खुप दिवसां पासून मी वाचतो आहे. त्यातला ताजेपणा व जिवंत पणा मला खुपच आवडला. कदाचित कुणा अनामिकाला हेच नेमके आवडत नसावे. कारण जगात चांगल्या लोकां इतके वाईट लोकही आहेत. तेव्हा त्याने (त्यांच्या कमेंटस ने) जर तुम्ही नाउमेद झालत तर त्यांचा विकृत हेतु सफल झाल्यासारखे होईल. तसे होउ नये व तुमचा उत्साह कायम रहावा म्हणुन हा लेखन प्रपंच. cheer up and keep it up !!!

  रवि करंदीकर

  • रवीजी
   प्रतिक्रिये करता आभार. मी जातिचा लढवय्या आहे . इतक्या सहजा सहजी हार मानणारा मी नाही. आणि मला इतक्या सहजा सहजी नाउमेद करणं शक्य नाही. मी त्याच्या आयपी वरुन बरिच माहिती शोधुन काढलेली आहे. आता तिचा वापर करायचा की सोडुन द्यायचं हेच ठरवायचंय.

 5. me says:

  आपली परवाची गुरूव्हिजनवरची कमेंट वाचल्यावर मी या ब्लॉगवर आलो. आवडला म्हणून फिडरिडरमधे टाकला.
  लिखाणाबद्दल कुठेही वाद असण्याचा कारण नाहीच, कदाचित वैचारिक मतभिन्नटा असू शकेल व वैचारिक मतभिन्नता brain-storming साठी चांगलीच. परंतु आपण लिहिल्याप्रमाणे लपून वार करणारे खच्चीकरण करतात हे नक्की. http://blog.guruvision.in/?p=283 या पोस्टवर अशीच एकाने a या नावाने कमेंट लिहिली. त्याने नाव द्यायचे धाडस केले नाही परंतु मी मात्र ती प्रकाशित केली व त्याला शिरीषने उत्तरही दिले. मला माहित नाही वादग्रस्त कमेंट काय होती ते, परंतु असल्या फालतू लोकांमुळे तुम्ही त्रस्त होऊ नये ही विनंती !! तुमच्या या पोस्टमुळे मी TheLife वर न दिलेले About पेज टाकतोय. 🙂

  • आता राग निवळलाय. पण जेंव्हा त्याची कॉमेंट वाचली तेंव्हा त्याचा इमेल नसल्यामुळे काहिच रिप्लाय देता येत नव्हता, म्हणुन जास्त चिड्चिड झाली. मला वाटतं सहाजिकच आहे ते.. नाहि कां? पण काल सगळंब्लॉग वर लिहिल्यावर एकदम शांत वाटतंय.तुमची ती पोस्ट मी वाचली होती. पण तेंव्हा ती कॉमेंट नव्हती.. असो..
   प्रतिक्रियेकरता आभार.

 6. देवेंद्र चुरी says:

  agar log aapke khilaaf bolne lage
  toh samjo tarrakii kar rahe ho……………

  tumachya blogchi lokpriyata tya vikrut manushyaalaa baghvali nasel mhnunach tyane ha prakar kelaa asaavaa.
  aso tumhi manstap karun gheu naka…asech chhan chhan post karat raha…

 7. मी कम्पेंट केलेली नाही. तेवढी मॅचुअरिटी आहे मला. जे काही लिहिलं ते फक्त तुम्ही समोर यावं म्हणुन.
  काल पण जे काही लिहिलं ते तुम्ही पडद्याआडुन बाहेर यावं आणि तुम्हाला इन्स्टीगेट करण्यासाठी कालचं पोस्ट होतं. ( पुन्हा इंग्रजी शब्द आलाच.. ) असो.. माझी तुमच्याशी काही वैय्यक्तिक दुष्मनी नाही. तेंव्हा तुम्हाला तुमच्या प्रेझेंट जॉब मधे काही प्रॉब्लेम येइल असं वागणं मला संयुक्तिक वाटलं नाही, माझ्या मधे तेवढी मॅचुअरीटी आहे आणि म्हणुनच कम्प्लेंट दिलेली नाही. निःश्चिंत रहा!
  पण त्या दिवशीच्या कॉमेंट मुळे मात्र माझा एक पुर्ण दिवस खराब झाला, आणि मला खात्री आहे की तुमचे पण गेले दोन दिवस खराब गेले असतिलच. तेंव्हा.. लेट्स फर्गेट.. द इशु.

  “१९६१-१९८० काळात विदर्भातल्या इंग्रजीचा स्पर्श नसलेल्या वातावरणात वाढलेल्या व्यक्तीला अशी भाषा शोभत नाही हे मत नोंदवायचा विचार होता.”
  तुमच्या माहिती साठी सांगतो, माझं शिक्षण इंग्रजितुनच झालेलं आहे. तेंव्हा वरचं वाक्य बरोबर नाही. कायम विदर्भातला म्हणजे मागासलेला ही कल्पना काढुन टाका डोक्यातुन. माझी मराठी आहे ही अशी आहे. यात इंग्रजी शब्द येतातच. कारण गेली कित्येक वर्ष इंग्रजिचाच वापर असतो सगळिकडे. आणि ब्लॉगिंग हे काही साहित्यिक लिखाण नसतं. जे काही माझे व्हुज आहेत ते इथे लिहिलेले असतात- माझ्या भाषेत.. म्हणजे ज्या भाषेत मी कम्फर्टेबल आहे त्या भाषेत.असो..

 8. Aparna says:

  महेन्द्र काका मी माझ्या एका पोस्टवर अशा काही नकारात्मक प्रतिक्रिया ठेवल्या आहेत अर्थात त्या शिवराळ इ. नाहीत पण फ़क्त मी माझ्या उत्तरात त्यांना नामानिराळे म्हणते. कारण हे सर्व लिहितात पण नाव लिहित नाहीत म्हणजे नामानिराळेच नाही का?? मलातर अशा लोकांना उत्तर देण्यात पण रस वाटत नाही कारण आपण कुणाशी बोलतो हेच कळत नाही….
  काही काही गोष्टी आपण का करतो हे फ़क्त आपल्यालाच माहित असतं. मराठी शुद्ध करण्याचा आपण प्रयत्न करत असू तर ते आपलं आपल्याला माहित असतं. कदाचित आपला ब्लॉग बर्याच जणांना आवडतो म्हणून असं होत असेल. आपण निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणून हे सोडून द्यावं हे उत्तम…

  • अपर्णा
   संपला आता तो विषय माझ्या दृष्टीने. मला संताप केवळ या साठी आला होता कारण, प्रतिक्रिया दिल्यावर उत्तर लिहिण्यासाठी इमेल दिलेला नव्हता. त्यामुळे असं वाटायला लागलं, की कोणी तरी आपल्याला जोरात फटका मारला आणि पळून गेला..आणि आपल्याला काहिही करता येत नाही.. ही वैफल्याची भावना निर्माण झाली. नंतर मग कसंही करुन त्या गृहस्थाला समोर आणायचंच म्हणुन पुढचे हे दोन पोस्ट्स लिहिलेत..
   निगेटिव्ह प्रतिक्रियेचा राग नव्हता…मला काहिच करता येत नाही.. याचं वैफल्य होतं..

 9. mahesh chakote says:

  I do not know how to write comments in Marathi.I would rather have preferred it.This is the first time ever I am participating in such blog or so.I know it is very difficult to digest such nonsense language or comments.But do not worry.”jaya angi mothepan taya yatana kathin”. and “suryakade pahoon kuni neechane tyachyawar thunknyacha prayatna kela tar tyache kaay hote aaplyala maheetach aahe”.So do not stop.DO write & be brave.

 10. vijay ramchandra birmal says:

  मी एक जेष्ठ नागरिक आहे.मला आजच आपला ” काय वाटेल ते ” हा ब्लॉग वाचायला मिळाला.त्यातील काही लेख आज वाचले.ते आवडले म्हणून प्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन.इतर लेख सुद्धा तेवढेच चांगले असतील,यात शंकानाही. यापुढेही आपल्याला असाच “त्रास” देत राहीन.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s