रिऍलिटी शो

रिऍलिटी शो
रिऍलिटी शोज चं हल्ली खुपंच पीक आलंय. प्रत्येक चॅनल आपला एक नविन शो आणतोय. या मधे पण दोन प्रकारचे शोज आहेत. जे म्हणजे एखाद्या कले ला प्रमोट करण्यासाठी असतात किंवा दुसरा प्रकार म्हणजे मानवी स्वभावाचे पैलु – जे साधारण परिस्थितित सुप्तावस्थेत असतात त्यांना जागृत करुन तुमच्या पुढे दाखवायचे.
कलेला प्रमोट करण्यासाठी बरेचरसे त्या त्या कलेला डिव्होटेड लोकं किंवा सिलेब्रिटीज आहेत. सारेगमप हा गाण्यांचा शो तर गेली १० -१२ वर्षांपासुन सुरु आहे. आधी हा शो हिंदी भाषेत होता, पण नंतर मग जेंव्हा मराठीत आला तेंव्हा पासुन तर याची महाराष्ट्रातली पॉप्युलरॅटी खुपच वाढली. लिल चॅम्प्स ने या शोला तर अगदी यशाच्या अत्युच्य शिखरावर नेउन पोहोचवलं.तसेच बुगी बुगी हा डान्स रिऍलिटी शो गेली १५ वर्षांपासुन ( चुक भुल द्यावी घ्यावी) सुरु आहे.
दुसऱ्या प्रकारच्या शो मधे बिग बॉस चं नांव घेता येइल.काही अगदी निरुपद्रवी शोज,बिग बॉस सारखे, ज्या मधे एका घरामधे दहा लोकांना एकत्र ठेवायचं आणि त्यांच्यातली  आणि त्यांच्यातले हेवे दावे, इत्यादी सगळे बाहेर काढुन लोकांना दाखवायचे. तो शो पण पहायला लोकांना आवडायचा. तसेच रोडिज हा पण एक चांगला शो होता पण एम टीव्ही वर असल्यामुळे त्याचा प्रेक्षक वर्ग अगदी लिमिटेड होता.
पण जेंव्हा , खतरोंके खिलाडी हा एक शो आला  कलर टिव्ही वर,त्याच्या पॉप्युलरॅटी ने सगळी समिकरणंच बदलुन टाकली. लोकांना हा शो आवडला. दुसऱ्या देशातल्या बिभत्स शोज वर बेतलेला हा एक रिऍलिटी शो होता. भारतिय टिव्ही वर असे सापाच्या काचेच्या पेटीत रहाणे, किंवा झुरळांच्या डब्यात हात घालणे वगैरे गोष्टी नविन होत्या. ज्या गोष्टींची सर्वसामान्य माणसांना किळस वाटेल, त्या गोष्टीच इथे “डेअर” मधे करायला लावायचे शो वर. कॉंटेस्टंट्स पण ह्या गोष्टी करण्यासाठी तयार असायचे, लोकांना पण हा प्रकार तसा नविनच होता , त्यामुळे खुपच पॉप्युलर झाला हा शो. आता काय नेहेमिचे सास बहु चे सिरियल्स पाहुन प्रेक्षक वर्ग कंटाळला होता , त्यांना काही तरी चेंज हवा होता तो त्यांना   या  शो मधे मिळाला, आणि हा शो पण खुप पॉप्युलर झाला.
सध्या सुरु असलेल्या एका रिऍलिटी शो चा ” ईस जंगलसे मुझे बचाओ” चा एक एपिसोड चुकुन पाहिला. त्या मधे इतक्या किळसवाण्या टास्क्स दाखवल्या होत्या.. जसे किडे खाणं. वगैरे.. की पहातांना पण अनईझी वाटंत होतं. किडे , मुंग्या खाणं , कींवा सांप असलेल्या काचेच्या पेटीत तोंड घालुन त्यातले स्टार्स काढणे असा खेळ होता तो.. एकदा तर डांसांनी भरलेल्या एका काचेच्या पेटितुन स्टार काढणे हा खेळ पण पाहिला. दुसऱ्या दिवशी जेंव्हा ऑफिसमधे मित्राशी बोलतांना त्याला सहज म्हंटलं तेंव्हा, तो म्हणाला, की हे तर काहिच नाही, पुर्वी एकदा तर अळ्यांचं शेक करुन प्यायला लावलं होतं. हे असे खेळ (??? ) पहायला आवडणारे महाभाग पण आहेत.
आता लोकांना हे पण नेहेमी पहायची सवय झाल्यामुळे आता अजुन जास्त रोमांचक काहितरी द्यायचं तर काय करणार? याच शो मधे जीवावर बेतणारे स्टंट्स करायला लावायचे पार्टीसिपंट्सला. आता भारतात जरी अजुन पर्यंत हे लोण आलेलं नसलं तरिही इतर देशात अशा प्रकारचे जीवावर बेतणारे स्टंट्स असलेले शो खुप लोकप्रिय आहेत.
हा लेख टिव्ही च्या शो बद्दल माहिती लिहिण्यासाठी नाही. कालच एक बातमी वाचली की एक पाकिस्तानी पार्टीसिपंट एका रिऍलिटी शो च्या शुटींगच्या वेळेस मारल्या गेला. साद खान नावाचा हा ३२ वर्षाचा माणुस- शुटींवच्या दरम्यान ह्याने हाताला आणि पायाला वजनं बांधुन पोहण्याचं चॅलेंज मान्य केलं होतं आणि ते पुर्ण करतांना तो पाण्यात बुडुन मृत्यु पावला.
रिऍलिटी शोज मधे  अशा प्रकारचे स्टंट्स करतांना सेफ्टी करता काहितरी प्रिकॉशन्स घेणं आवश्यक आहे. पण नेमकं त्याच गोष्टी कडे दुर्लक्ष केलं जातं.जे कोणि पार्टीसिपंट्स आहेत ते थोड्याशा पब्लिसिटी करता असे खेळ खेळ्ण्याचे मान्य करतात. टीव्ही वर दिसणे हाच एक मुख्य उद्देश असतो. केवळ, भारत पाकिस्तानात्च नाही तर संपुर्ण जगातच अशा प्रकारचे अपघात झालेले आहेत. या शो ला डीझाइन करतांना एक्सपर्ट्स कडुन टास्क्स डिझाइन करुन घ्यायला हवेत, ते अगदी अननुभवी माणसांच्याकडुन करुन घेतले जातात. जर पार्टिसिपंट काही कारणाने टास्क पुर्ण करु शकला नाही तर त्याला वाचवण्यासाठी काहिच उपाययोजना केलेली नसते.
रिऍलिटी शो चं फॅड  पाश्चात्य जगात सुरु झालंय साधारण १३ वर्षा पुर्वी. तेंव्हा पासुन आत्ता पर्यंत जवळपास ८ लोकांचा मृत्यु झालेला आहे. या पैकी सगळेच काही ऍक्सिडेंटल डेथ्स नाहित  , तर त्या पैकी बरेचसे तर आत्महत्या आहेत.ऍक्सिडेंटल डेथ ची ही पहिलिच घटना आहे.
अशा गेम्स मधे सायकॉलॉजिकल डीसऑर्डर होणं हे सहज शक्य आहे, आणि नेमकं त्याकडे पण दुर्लक्ष केलं जातं. या आत्महत्यांच्यासाठी कोणाला जबाबदार धरायचं? ’शो’ ला? की त्या पार्टीसिपंटला? . अशा शो मधे मानसिक दष्ट्या कितिही स्टेबल असलेला माणुस आपलं बॅलन्स बिघडवुन घेउ शकतो..!!! या गेम्सच्या डायरेक्टरचा उद्देशच हा असतो की लोकांच्या आतला माणुस बाहेर काढायचा. पण ते करतांना तो ’आतला’ आवाज इतका प्रॉमिनंट होतो की बाह्य जगातल्या अस्तित्वाला पण टेक ओव्हर करतो, ज्या मूळॆ आत्महत्या, खुन या सारख्या घटना घडतात.
हे असे शो जर बंद करणे शक्य होत नसेल, तर कमित कमी सायकॉलॉजिस्ट सोबतच्या सिटींग तरी ऑर्गनाइझ कराव्या. लहान मुलांचे शो जर छॊटे मिया, किंवा सारेगमप वगैरे पण आवडिने पाहिले जातात. अशा शो मधे पण पार्टीसिपंट्स हे दहा वर्षाच्या आतली मुलं कींवा फारतर १५ वर्षापर्यंतची मुलं असतात. ती मुलं इथे स्वप्नांची आणि वास्तवाची सांगड घालण्यासाठी येतात. त्या पैकी आठवड्यातुन एकाला व्होट आउट केलं जाते… त्याच्या मानसिक स्थिती ची जाणिव आपण जे शो पहातो त्यांना येऊ शकत नाही. संपुर्णपणे आतुन तुटुन जातात ही मुलं…, जरी वरुन दाखवत नसले तरिही रिजेक्शन ची भावना घर करुन बसतेच मनामधे!
सायकॉलॉजी हा काही माझा विषय नाही पण मला जे काही या संदर्भात वाटलं ते इथे पोस्ट करतोय..

रिऍलिटी शोज चं हल्ली खूपच पीक आलंय. प्रत्येक चॅनल आपला एक नवीन शो आणतोय. या मधे पण दोन प्रकारचे शोज आहेत. जे म्हणजे एखाद्या कले ला प्रमोट करण्यासाठी असतात किंवा दुसरा प्रकार म्हणजे मानवी स्वभावाचे पैलु – जे साधारण परिस्थितीत सुप्तावस्थेत असतात त्यांना जागृत करुन तुमच्या पुढे दाखवायचे.

कलेला प्रमोट करण्यासाठी बरेच  एखाद्या कलेमधला दर्दी किंवा एक्स्पर्ट  किंवा त्त्या क्षेत्रातले मान्यवर  आहेत. ते अशा शो मधे आपली हजेरी लावतात.भाग घेणाऱ्याला  ज्या मान्यवर व्यक्तीला कधी पहायला पण मिळालं नसतं , त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळतं हा एक प्लस पॉइंट! सारेगमप हा गाण्यांचा शो तर गेली १० -१२ वर्षांपाशून सुरूआहे. आधी हा शो हिंदी भाषेत होता, पण नंतर मग जेंव्हा मराठीत आला तेंव्हा पासून तर याची महाराष्ट्रातली पॉप्युलरॅटी खुपच वाढली. लिल चॅम्प्स ने या  कार्यक्रमाला तर अगदी यशाच्या अत्युच्च शिखरावर नेऊन पोहोचवलं.तसेच बुगी बुगी हा डान्स रिऍलिटी शो गेली १५ वर्षांपासून ( चुक भुल द्यावी घ्यावी) सुरू आहे.

दुसऱ्या प्रकारच्या शो मधे बिग बॉस चं नांव घेता येइल.काही अगदी निरुपद्रवी शोज,बिग बॉस सारखे, ज्या मधे एका घरामधे दहा लोकांना एकत्र ठेवायचं आणि त्यांच्यातली  आणि त्यांच्यातले हेवे दावे, इत्यादी सगळे बाहेर काढून लोकांना दाखवायचे. तो कार्यक्रम पण पहायला लोकांना आवडायचा. तसेच रो्डीज हा पण एक चांगला शो होता पण एम टीव्ही वर असल्यामुळे त्याचा प्रेक्षक वर्ग अगदी लिमिटेड होता.

पण जेंव्हा , खतरोंके खिलाडी हा एक शो आला  कलर टिव्ही वर,त्याच्या लोकप्रियते्ने  सगळी समीकरणच बदलून टाकली. लोकांना हा शो आवडला. दुसऱ्या देशातल्या बिभत्स शोज वर बेतलेला हा एक रिऍलिटी शो होता. भारतीय टिव्ही वर असे सापाच्या काचेच्या पेटीत रहाणे, किंवा झुरळाच्या डब्यात हात घालणे वगैरे गोष्टी नविन होत्या. ज्या गोष्टींची सर्वसामान्य माणसांना किळस वाटेल, त्या गोष्टीच इथे “डेअर” मधे करायला लावायचे शो वर. कॉंटेस्टंट्स पण ह्या गोष्टी करण्यासाठी तयार असायचे, लोकांना पण हा प्रकार तसा नवीनच होता , त्यामुळे खूपच पॉप्युलर झाला हा शो. आता काय नेहेमीचे सास बहु चे सिरियल्स पाहून प्रेक्षक वर्ग कंटाळला होता , त्यांना काही तरी चेंज हवा होता तो त्यांना   या  शो मधे मिळाला .

सध्या सुरु असलेल्या एका रिऍलिटी शो चा ” ईस जंगलसे मुझे बचाओ” चा एक एपिसोड चुकून पाहिला. त्या मधे इतक्या किळसवाण्या टास्क्स दाखवल्या होत्या.. जसे किडे खाणं. वगैरे.. की पहातांना पण अनईझी वाटत होतं. किडे , मुंग्या खाणं , किंवा साप असलेल्या काचेच्या पेटीत तोंड घालुन त्यातले स्टार्स काढणे असा खेळ होता तो.. एकदा तर डासांनी भरलेल्या एका काचेच्या पेटीतुन स्टार काढणे हा खेळ पण पाहिला. दुसऱ्या दिवशी जेंव्हा ऑफिसमधे मित्राशी बोलतांना त्याला सहज म्हंटलं तेंव्हा, तो म्हणाला, की हे तर काहीच नाही, पुर्वी एकदा तर अळ्याचं शेक करुन प्यायला लावलं होतं. हे असे खेळ (??? ) पहायला आवडणारे महाभाग पण आहेत.

टीआरपी वाढवायची असेल तर प्रेक्षकांना  काही तरी नवीन दाखवायला हवं.. ते काय असावं? आता लोकांना हे असे अळ्या खाणं , साप वगैरे पहायची सवय झालेली असते. त्यामधे पण तोच तो पणा वाटायला लागतो.टीआरपी  मेंटेन करायला आता अजुन जास्त रोमांचक काहीतरी द्यायचं- तर काय करणार?

डायरेक्टर्सनी आता या पुढची स्टेप म्हणजे जीवावर बेतणारे स्टंट्स करायला लावणे सुरू केले .या शो मधे जीवावर बेतणारे स्टंट्स करायला लावायचे पार्टीसिपंट्सला. आता भारतात जरी अजुन पर्यंत हे लोण आलेलं नसलं तरीही इतर देशात अशा प्रकारचे जीवावर बेतणारे स्टंट्स असलेले शो खूप लोकप्रिय आहेत.

जगातले टॉप १० रिऍलिटी शोज.. इथे आहेत.

हा लेख टिव्ही च्या शो बद्दल माहिती लिहिण्यासाठी नाही. कालच एक बातमी वाचली की एक पाकिस्तानी पार्टीसिपंट एका रिऍलिटी शो च्या शूटिंगच्या वेळेस मारल्या गेला. साद खान नावाचा हा ३२ वर्षाचा माणुस- शुटींगच्या दरम्यान ह्याने हाताला आणि पायाला वजनं बांधून पोहण्याचे चॅलेंज मान्य केलं होतं आणि ते पुर्ण करतांना तो पाण्यात बुडून मृत्यु पावला.

reality showरिऍलिटी शोज मधे  अशा प्रकारचे स्टंट्स करतांना सेफ्टी करता काहीतरी प्रिकॉशन्स घेणं आवश्यक आहे. पण नेमकं त्याच गोष्टी कडे दुर्लक्ष केलं जातं.जे कोणी पार्टीसिपंट्स आहेत ते थोड्याशा पब्लिसिटी करता असे खेळ खेळण्याचे मान्य करतात. टीव्ही वर दिसणे हाच एक मुख्य उद्देश असतो. केवळ, भारत पाकिस्तानात नाही तर संपुर्ण जगातच अशा प्रकारचे अपघात झालेले आहेत.

या शो ला डीझाइन करतांना एक्सपर्ट्स कडून टास्क्स डिझाइन करुन घ्यायला हवेत, ते अगदी अननुभवी माणसाच्या कडून करुन घेतले जातात. जर भाग घेणारा  काही कारणाने टास्क पुर्ण करु शकला नाही तर त्याला वाचवण्यासाठी काहीच उपाययोजना केलेली नसते.साद खान जेंव्हा बुडत होता तेंव्हा त्याला वाचवण्यासाठी काय केलं गेलं?? जर काहीच नाही, तर मात्र सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्या शो च्या डायरेक्टरला शिक्षा व्हायला हवी.

रिऍलिटी शो चं फॅड  पाश्चात्य जगात सुरु झालंय साधारण १३ वर्षा पुर्वी. तेंव्हा पासुन आत्ता पर्यंत जवळपास ८ लोकांचा मृत्यु झालेला आहे. या पैकी सगळेच काही ऍक्सिडेंटल डेथ्स नाहीत  , तर त्या पैकी बरेचसे तर आत्महत्या आहेत.आधिच्या मृत्युंची डीटेल्स इथे आहेत.ऍक्सिडेंटल डेथ ची ही पहिलीच घटना आहे.

अशा गेम्स मधे सायकॉलॉजिकल डीसऑर्डर होणं हे सहज शक्य आहे, आणि नेमकं त्याकडे पण दुर्लक्ष केलं जातं. या आत्महत्यांच्या साठी कोणाला जबाबदार धरायचं? ’शो’ ला? की त्या पार्टीसिपंटला? . अशा शो मधे मानसिक दष्ट्या कितीही स्टेबल असलेला माणुस आपलं बॅलन्स बिघडवून घेउ शकतो..!!! या गेम्सच्या डायरेक्टरचा उद्देशच हा असतो की लोकांच्या आतला माणुस बाहेर काढायचा. पण ते करतांना तो ’आतला’ आवाज इतका प्रॉमिनंट होतो की बाह्य जगातल्या अस्तित्वाला पण टेक ओव्हर करतो, ज्या मूळॆ आत्महत्या, खून या सारख्या घटना घडतात.

हे असे शो जर बंद करणे शक्य होत नसेल, तर कमीत कमी सायकॉलॉजिस्ट सोबतच्या सिटींग तरी ऑर्गनाइझ कराव्या. लहान मुलांचे शो जर छॊटे मिया, किंवा सारेगमप वगैरे पण आवडिने पाहिले जातात. अशा शो मधे पण भाग घेणारे हे दहा वर्षाच्या आतली मुलं कींवा फारतर १५ वर्षापर्यंत ची मुलं असतात. ती मुलं इथे स्वप्नांची आणि वास्तवाची सांगड घालण्यासाठी येतात. त्या पैकी आठवड्यातून एकाला व्होट आऊट केलं जाते… त्याच्या मानसिक स्थिती ची जाणिव आपण जे शो पहातो त्यांना येऊ शकत नाही. संपूर्णपणे आतून तुटून जातात ही मुलं…, जरी वरुन दाखवत नसले तरीही रिजेक्शन ची भावना घर करुन बसतेच मनामधे!

सायकॉलॉजी हा काही माझा विषय नाही पण मला जे काही या संदर्भात वाटलं ते इथे पोस्ट करतोय..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged . Bookmark the permalink.

14 Responses to रिऍलिटी शो

 1. Manali says:

  नमस्कार…
  खरच reality shows हा एक भयंकर प्रकार आहे…तसे पाहायला गेले तर tv हाच एक भयंकर प्रकार आहे असे मला वाटते…एक पण कार्यक्रम असा नाही जो कुटुंबातील सर्व जण एकत्र बसून पाहू शकतील….

  मनाली..

  • मनाली
   या रिऍलिटी शो मधे भाग घेण्यासाठी कमित कमी १८ वर्षाची तरी लिमिट असावी असं मला वाटतं. किंवा जर तुम्ही लहान मुलांना घेउन शो करित असाल तर मात्र सगळ्यांनाच अगदी शेवटच्या भागापर्यंत ठेवावं, आणि शेवटच्या भागात एक विजेता घोषित करावा. इतर मुलांना पण कन्सोलेशन प्राइझेस द्यावेत म्हणजे त्यांचा पण कॉनफिडन्स टिकुन राहिल. लहान मुलांच्या मनाशी खेळण्याचा अधिकार कुठल्याही चॅनलला नाही… !पालकांनी पण जागरुक राहुन मुलांना अशा कार्यक्रमात भाग घेउ द्यायचा का याचा निर्णय घ्यायला हवा.

 2. सचिन says:

  आता TV साठी सुध्दा censor board करायच म्हणतायेत, पण त्याने सुध्दा जास्त फरक पडेल अस काहि वाटत नाहि.

  • सेन्सॉर बोर्ड काही करु शकेल– कमित कमी बिभत्स पणा जरी कमी केला तरी पुरेसा आहे. अगदी पहावत नाही………

 3. रिऍलिटी शो साठी सेन्सॉर बोर्ड असावं [@सचिन] असं मीही म्हणेन. इस जंगल से मुझे बचाओ, रोडिज, सरकार कि दुनिया आणि हद्द म्हणजे – दादागिरी! या कार्यक्रमांत तर शिवीगाळ [बीप], विभित्सपणा ठासुन भरलेला आहे. ‘दादागिरी’ मधली भाषा तर लिमिच आहे… ! टी.व्ही. वाले टी.आर.पी. आणि पब्लिसिटीसाठी कोणत्या थराला जातील हे सांगता येणं फार कठीण आहे.

  ता.क: खतरों के खिलाडी बरा वाटला होता…. किमान “धाडस -धोका” यावर तो होता… कुठंतरी वाचलं की त्याचा दुसरा भाग येतोय म्हणे!

  • दिपक,
   हा दादागिरी कुठल्या चॅनलवर असतो? कधी पाहिलेला नाही हा शो.. काही दिवसांपुर्वी एक क्लिप पाहिली होती पाकिस्तानी शो मधे एक माणुस रिऍलिटी शो मधे आपण केलेल्या रेप बद्दल फुशारकी मारत होता. शेवटी त्या शो चा होस्ट आणि त्या पार्टीसिपंट ची मारामारी पण झाली सेटवर. यु ट्य़ुब वर आहे.
   मला खरंच काळजी वाटते ती लहान मुलांची.. त्या मुलांना काढुन टाकल्यावर त्यांच्या चेहेऱ्या कडे पहावत नाही. . काही तरी कंट्रोल हवाच.

 4. आल्हाद alias Alhad says:

  अगदी पहावत नाही………
  म्हणूनच आपल्या हातात रिमोट कंट्रोल असतो नाही का?
  रोडीज्‌ सारख्या तद्दन फाल्तू शो ला तुम्हीसुद्धा चांगलं म्हणावं याचं खरंच आश्चर्य वाटलं…

  • मी स्वतः बाइक प्रेमी होतो ना.येझ्दी आणी नंतर बुलेट वापरायचो मी. ( बुलेट अजुनही आहे .. बंद पडलेल्या अवस्थेत.). कित्तेक वर्ष माझ्या मनात होतं की आपण सगळा भारत पालथा घालावा बाइकवर . पण नंतर लग्न झालं आणि बाइक सुटली ती सुटलीच.. मनातली सुप्त इच्छा होती ती. कोणितरी पुर्ण करतोय म्हणुन पहायला आवडायचा तो शो.. 🙂

   • अरे वा! तुम्ही पण बुलेट वापरायचा! सही….. !.. बंद असेल तर घ्या ना दुरुस्त करुन… असंच कधी कधी राईड मारायला… मीही जातो असाच.. 🙂

    आमच्या सोसायटीच्या पाठीमागे एक घाट आहे, छोटासा… बुलेटवर मस्त त्या टेकडीवर जायचं… सुर्योदय किंवा सुर्यास्त पाहणं हा एक अल्टीमेट अनुभव!

    • आधी येझ्दी क्लासिक होती. लग्नानंतर बायकोने बसणे बंद केले गाडिवर म्हणुन दोन तिन वर्ष इंड सुझुकी घेतली. पण परत नंतर बुलेट वर आलो. बुलेट मस्त आहे गाडी.. अजुनही इच्छा होते चालवायची कधीतरी. आता टायर, बॅटरी , सिट बदलावी लागेल. बाकी गाडी चांगली आहे.

 5. Madhuri says:

  हे लहान मुलांचे शो पहाणं म्हणजे दोन कोंबड्यांना झुंजायला लाउन आपण मजा पहात रहाण्यासारखं आहे.दोन पैकी एक कोंबडा रक्तबंबाळ होऊन पडणार, त्याकडे लक्ष न देता जिंकलेल्या कोंबड्याला डॊक्यावर उंच धरुन नाचायचं… !!! हे थांबायला हवं. लहान मुलांचं लहानपण असं अवेळी त्यांना मोठं करुन संपवु नये असं माझं मत आहे.

 6. sahajach says:

  आम्ही हे असले शो पहाणं बंद केलय कारण बरेचदा विनर्स आधीच ठरलेले असतात….आपण उगाच उत्सूकता ताणायची आणि हे लोक अंत पहातात. हे एक कारण आणि तोच तोच पणा किती सहन करायचा……ते ’ईस जंग”…वगैरे तर कठीण आहे पहाणे..
  त्यात भर म्हणजे लहान मुलांचे शोज…एक मराठी सारेगमप सोडले तर अकाली प्रौढत्व आलेली ती मुलं आणि त्यांचा आगाउपणा असह्य होतो अनेकदा. अन्नु मलिक, फरहा खान मंडळी जिथे जजेस म्हणून बसतात ते तर शहाण्याने पाहू नये…..

  • अन्नु मलिक, फरहा खान मंडळी जिथे जजेस म्हणून बसतात ते तर शहाण्याने पाहू नये…. AGREED!!!!!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s