मराठीचे शत्रु

मराठीचे शत्रु
मराठी भाषा सगळ्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या टोन्स मधे बोलली जाते. त्यातल्या त्यात कोंकण भागात बोलली जाणारी भाषा ही शुध्द मानली जाते. मराठी भाषेचा माझा अभ्यास नाही. पण केवळ बोली भाषेच्या जोरावरंच मी इथे लिहितो. इथे तुम्ही भारतामधे कुठलिही भाषा घेतलीत तरिही ती संस्कृत बेस्ड आहे. बरेचसे शब्द हे संस्कृत मधुन प्राकृतात घेतलेले आहेत. केवळ मराठी सोडुन प्रत्येक भाषेने संस्कृत शब्द जरी घेतला तरिही व्याक्रण मात्र बोली भाषेचंच ठेवलेलं दिसतं.जे शब्द संस्कृत मधुन प्राकृतात घेतलेले आहेत, त्या शब्दांना व्याक्रणाचे नियम पण मराठीचे न लावता संस्कृतचेच लागलेले आहेत.    त्यामुळे लिहितांना सगळा गोंधळ होतो. ( सौ. ने कधी तरी बोलतांना सांगितलं होतं ते लक्षात आहे)
पुस्तकी भाषा आणि बोली भाषेत फरक हा असतोच. पुस्तकी भाषा बोलायची तर तोंडात छापखान्यातले खिळे बसवुन सखाराम गटणे प्रमाणे बोलणे प्रत्येकालाच जमेल असे नाही.
जेंव्हा व्याक्रणाचे नियम लिपीबध्द केले गेले तेंव्हा इंग्रजांनी एका कोंकणातल्या ब्राह्मणास हे काम दिले होते. त्यामुळे कोंकणी बेस असलेली मराठी ही शुध्द म्हणुन मान्यता प्राप्त झाली.महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात जवळच्या दुसऱ्या प्रदेशाच्या भाषेचा इम्पॅक्ट हा त्या भागातिल बोली भाषेवर दिसतो. जसे मुंबईच्या मराठी वर गुजराथीचा खुपच जास्त प्रभाव आहे. इव्हन एका गाण्यात नदिला पुर आलेला…. वगैरे शब्द वापरलेले आहेत. मुंबईला बोली भाषेत बोलतांना, मी आलेलो, मी गेलेलो, शब्द बऱ्याच प्रमाणात वापरल्या जातात. हे शब्द म्हणजे हूं आयेलो , हूं गयेलो.. वगैरेचे भ्रष्ट भाषांतर आहे. मुंबईची मराठी ही  अशी..
तेच तुम्ही विदर्भात जाल, तर जवळच्या मध्य प्रदेशाचा खुपच परिणाम इथल्या मराठी वर आढळतो. मै वहा जा रहा हुं चं शब्दशः भाषांतर मी तिकडे जाउन राहिलो असं केलं जातं.म्हणुन जाउन राहिलो, येउन राहिलो वगैरे शब्द हमखास वापरात दिसतात. बोली भाषा ही ज्या भागातल्या सामाजिक कल्चर वर अवलंबुन असते. त्यामुळे तिला अशुध्द म्हणता येत नाही. बोली भाषा ही बोली भाषाच असते..
मराठवाड्यात मराठी भाषा पुन्हा एक वेगळाच बाज घेउन जास्तंच भारदस्त होते. मला एक्झॅक्टली कारण माहिती नाही, पण करायली, यायली, जायली हे शब्द वापरले जातात. ( जर कोणाला माहिती असेल तर जरुर कारण लिहा कॉमेंट्स मधे- यावर जरुर लिहा) आता ही जी भाषा बोलली जाते ती अशुध्द म्हणायची कां? अर्थात नाही. प्रत्येकाच्या दृष्टीने आपली मात्रूभाषा ही सगळ्याच शुध्द आणि गोड असते. सगळं लहानपण आपलं गेलं असतं अशिच भाषा ऐकण्यात .. अजुनही एखादा जुना विदर्भातला मित्र भेटला की, काउन बे? चालते का सिनेमाले? असं विचारावंसं वाटतं …… 🙂 विदर्भात बऱ्याच ठिकाणी अशी भाषा बोलली जाते. विदर्भातसुध्दा दोन प्रकारची मराठी आहे, वऱ्हाडात पुन्हा एक वेगळाच बाज असतो या भाषेला.
मला हेच सांगायचंय , की प्रत्येक भागातल्या बोली भाषेला एक गोडी आहे. अहिराणी भाषा ऐकली आहे कां? खुप गोड वाटते ऐकायला..मला ही भाषा समजत नाही पण जळगांवकडची मंडळी मान्य करतिल या भाषेचा गोडवा. बहिणाबाईंची मराठी पण अद्वितिय आहे. भाषेतलं सौंदर्य पहायचंय?? मग वाचा कविता  बहिणाबाईंच्या!
मराठीचे शत्रु हे या लेखाचे शिर्षक कां? असा प्रश्न पडला असेल . विदर्भात/ मराठवाड्यात  काही ब्राह्मण फॅमिलिज सोडल्या तर लोकल ऍसेंट असलेली मराठी बोलली जाते. हाच प्रकार कोल्हापुरला पण आहे. कोल्हापुरी मराठी एक रांगडेपणा घेउन येते.शुध्द पुस्तकी भाषेची तुलना जर बोलीभाषेबरोबर करायची तर साजुक तुपात तळलेल्या जिलबी ची तुलना तांबड्या रश्श्यातल्या मिसळीबरोबर करावी लागेल.
कोल्हापुरचा/मराठवाडा/नागपुरकडचा एखादा माणुस पुण्याला किंवा मुंबईला आला तर त्याच्या कडे हा कुठला एलियन आलाय? अशा नजरेने पाहिले जाते. त्याच्या बोलण्याच्या स्टाइलची नेहेमी हेटाळणी केली जाते.
दुर कशाला कोल्हापुरच्या भागातल्या लोकांना   घाटी म्हणुन हिणवलेजाते. मी म्हणतो असं कां?? एका मराठी माणसाचा दुसरा मराठी माणुस केवळ एवढ्यासाठी अपमान करतो कारण त्याची बोलण्याची स्टाइल वेगळी आहे म्हणुन? याचाच फायदा इतर भाषा वाले घेतात. महाराष्ट्रात मराठी लोकांच्या मधे पण एकी होऊ शकत नाही… आणि याला कारणीभुत पण मराठि माणुसच..!!!डीव्हाइड ऍंड रुल.. याच तत्वावर ब्रिटीश लोकांनी राज्य केलं .. आणि आता इथले मराठी पण ब्रिटिशांचंच काम करताहेत. याचा परिणाम??ही सगळी मंडळी मग पब्लिक प्लेस मधे मराठी बोलणे टाळतात. सगळीकडे हिंदीच बोलणं पसंत करतात. मी स्वतः बऱ्याच मराठी लोकांना इथे हिंदी बोलतांना पहातो, नागपुरकडच्या. जेंव्हा त्यांना कळतं की मी पण विदर्भातला, तेंव्हा ते जरा मोकळेपणाने बोलीभाषेत बोलतात .
आज तुम्ही बघाल, तर मराठी लोकांमधे पण एकता नाही. केवळ विविधतेत एकता. विविधतेत अखंडता , असं नुसतं म्हणुन चालणार नाही. तसं वागणंही आवश्यक आहे. प्रत्येक बोली भाषेला मान हा मिळालाच पाहिजे. आणि कुठल्याही ऍसेंटची हेटाळणी टाळली तर मराठी लोकांच्यामधे एकता निर्माण होईल.

मराठी भाषा सगळ्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या टोन मधे बोलली जाते. त्यातल्या त्यात कोकण भागात बोलली जाणारी भाषा ही शुद्ध मानली जाते. मराठी भाषेचा माझा अभ्यास नाही. पण केवळ मराठी ही मातृभाषा आहे म्हणून मी इथे मराठीत लिहितो..

तुम्ही भारतामधे कुठलीही भाषा घेतलीत तरीही ती संस्कृत बेस्ड आहे. बरेचसे शब्द हे संस्कृत मधुन प्राकृतात घेतलेले आहेत. केवळ मराठी सोडून प्रत्येक भाषेने संस्कृत शब्द जरी घेतला तरीही व्याकरण मात्र बोली भाषेचंच वापरले आहे..मराठी भाषेत मात्र संस्कृत शब्दांना व्याकरण पण संस्कृतचं लावल्यामुळे लिहितांना ह्र्स्व दिर्घ चा गोंधळ होतो. .      ( सौ. ने कधी तरी बोलतांना सांगितलं होतं ते लक्षात आहे)पुस्तकी भाषा आणि बोली भाषेत फरक हा असतोच. पुस्तकी भाषा बोलायची तर तोंडात छापखान्यातले खिळे बसवून सखाराम गटणे प्रमाणे बोलणे प्रत्येकालाच जमेल असे नाही.

जेंव्हा व्याक्रणाचे नियम लिपीबद्ध केले गेले तेंव्हा इंग्रजांनी एका कोंकणातल्या ब्राह्मणास हे काम दिले होते. त्यामुळे कोंकणी बेस असलेली मराठी ही शुद्ध म्हणून मान्यता प्राप्त झाली.महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात जवळच्या दुसऱ्या प्रदेशाच्या भाषेचा इम्पॅक्ट हा त्या भागातील बोली भाषेवर दिसतो. जसे मुंबईच्या मराठी वर गुजराथीचा खूपच जास्त प्रभाव आहे. वगैरे शब्द वापरलेले आहेत. मुंबईला बोली भाषेत बोलतांना, मी आलेलो, मी गेलेलो, शब्द बऱ्याच प्रमाणात वापरल्या जातात. हे शब्द म्हणजे हूं आयेलो , हूं गयेलो.. वगैरेचे भ्रष्ट भाषांतर आहे. मुंबईची मराठी ही  अशी..

तेच तुम्ही विदर्भात जाल, तर जवळच्या मध्य प्रदेशाचा खूपच परिणाम इथल्या मराठी वर आढळतो. मै वहा जा रहा हुं चं शब्दशः भाषांतर मी तिकडे जाउन राहिलो असं केलं जातं.म्हणून जाउन राहिलो, येउन राहिलो वगैरे शब्द हमखास वापरात दिसतात. बोली भाषा ही ज्या भागातल्या सामाजिक जीवनावर ,कल्चर वर अवलंबून असते- त्यामुळे तिला अशुद्ध म्हणता येत नाही. बोली भाषा ही बोली भाषाच असते..

मराठवाड्यात मराठी भाषा पुन्हा एक वेगळाच बाज घेउन जास्तच भारदस्त होते. मला एक्झॅक्टली कारण माहिती नाही, पण करायली, यायली, जायली हे शब्द वापरले जातात. ( जर कोणाला माहिती असेल तर  कॉमेंट्स मधे- यावर जरुर लिहा) आता ही जी भाषा बोलली जाते ती अशुद्ध म्हणायची का? अर्थात नाही. प्रत्येकाच्या दृष्टीने आपली मातृभाषा ही सगळ्याच शुद्ध आणि गोड असते. सगळं लहानपण आपलं गेलं असतं अशीच भाषा ऐकण्यात .. अजुन ही एखादा जुना विदर्भातला मित्र भेटला की, काउन बे? चालते का च्या प्यायले?? असं विचारावंसं वाटतं ……  🙂  विदर्भात बऱ्याच ठिकाणी अशी भाषा बोलली जाते. विदर्भात सुध्दा दोन प्रकारची मराठी आहे, वऱ्हाडात पुन्हा एक वेगळाच बाज असतो या भाषेला.

मला हेच सांगायचंय , की प्रत्येक भागातल्या बोली भाषेला एक गोडी आहे. अहिराणी भाषा ऐकली आहे कां? मला ही भाषा समजत नाही पण खूप गोड वाटते ऐकायला.. जळगांवकडची मंडळी मान्य करतील या भाषेचा गोडवा. बहिणाबाईंचे मराठी पण अद्वितीय आहे. भाषेतलं सौंदर्य पहायचंय?? मग वाचा कविता  बहिणाबाईंच्या!

मानूस मानूस

मतलबी रे मानसा,
तुले फार हाव
तुझी हाकाकेल आशा
मानसा मानसा,
तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर
भरला डाडोर
भूलीसनी जातो सूद
खाईसनी चारा

गायम्हैस देते दूध
मतलबासाठीं
मान मानूस डोलये
इमानाच्यासाठीं
कुत्रा शेंपूट हालये
मानसा मानसा,
कधीं व्हशीन मानूस
लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस !

बोला.. वरच्या कवितेतला गोडवा ती जर पुस्तकी भाषेत असती तर जाणवला असता कां?

मराठीचे शत्रु हे या लेखाचे शीर्षक का? असा प्रश्न पडला असेल . विदर्भात/ मराठवाड्यात  काही उच्चवर्णीय कुटूंब सोडल्या तर लोकल ऍसेंट असलेली मराठी बोलली जाते. हाच प्रकार कोल्हा्पूरला पण आहे. कोल्हापुरी मराठी एक रांगडेपणा घेउन येते. शुध्द पुस्तकी भाषेची तुलना जर बोली भाषेबरोबर करायची तर साजुक तुपात तळलेल्या जिलबी ची तुलना तांबड्या रश्श्यातल्या मिसळीबरोबर करावी लागेल.

कोल्हापुरचा/मराठवाडा/नागपुरातला एखादा माणुस पुण्याला किंवा मुंबईला आला तर त्याच्या कडे हा कुठला एलियन आलाय? अशा नजरेने पाहिले जाते. त्याच्या बोलण्याच्या स्टाइलची नेहेमी हेटाळणी केली जाते.एखाद्या गृपमधे एकटा पडला की मग तो सरळ मराठी बोलणं बंद करतो आणि सरळ हिंदी बोलणं सुरु करतो.

दुर कशाला कोल्हापुरच्या भागातल्या लोकांना   घाटी म्हणून हिणवले जाते. मी म्हणतो असं का??का बरं त्या दुसऱ्या माणसाच्या मातृ भाषेला पुरेसा मान दिला जात नाही? का म्हणून त्याची हेटाळणी केली जाते?एक मराठी माणुस दुसऱ्याला घाटी म्हणून शिवी का देतो?? घाटावर रहाणं म्हणजे कमी दर्जाचं आहे का? किंवा जर कोणी जळगाव, विदर्भात रहात असेल तर तो कमी दर्जाचा होतो का? असं का???? एका मराठी माणसाचा दुसरा मराठी माणुस केवळ एवढ्यासाठी अपमान करतो कारण त्याची बोलण्याची स्टाइल वेगळी आहे म्हणून?

याचाच फायदा इतर भाषा वाले घेतात. महाराष्ट्रात मराठी लोकांच्या मधे पण एकी होऊ शकत नाही… आणि याला कारणीभूत पण मराठी माणूसच..!! डीव्हाइड ऍंड रुल.. याच तत्वावर ब्रिटीश लोकांनी राज्य केलं .. आणि आता इथले मराठी पण ब्रिटिशांचे काम करताहेत. याचा परिणाम??ही सगळी मंडळी मग पब्लिक प्लेस मधे मराठी बोलणे टाळतात. सगळीकडे हिंदीच बोलणं पसंत करतात. मी स्वतः बऱ्याच नागपूरकडच्या मराठी लोकांना इथे हिंदी बोलतांना पहातो, . जेंव्हा त्यांना कळतं की मी पण विदर्भात ला, तेंव्हा ते जरा मोकळेपणाने बोलीभाषेत बोलतात .

इथे आपण सगळे, विदर्भातले, मराठवाड्यातले, कोंकणातले, मुंबईचे, पुण्याचे आहोत, महाराष्ट्रातला कोणीच नाही… !!!

आज तुम्ही बघाल, तर मराठी लोकांमध्ये पण एकता नाही. केवळ विविधतेत एकता. विविधतेत अखंडता , असं नुसतं  म्हणून चालणार नाही. तसं वागणही आवश्यक आहे. प्रत्येक बोली भाषेला मान हा मिळालाच पाहिजे. आणि कुठल्याही ऍसेंटची हेटाळणी टाळली तर मराठी लोकांच्या मधे एकता निर्माण होईल.एका मराठी माणसाने, दुसऱ्या मराठी माणसाच्य़ा मराठीचा/त्याच्या मातृभाषेचा आदर केला तरच मराठी टीकेल .. ……………………. नाहीतर…..  !!!!!!!!!  बोंबला, इथे भैय्या येतोय म्हणून………………..आणि हिंदी बोलणारे नवीन  मराठी  भैय्ये तयार करा!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

58 Responses to मराठीचे शत्रु

 1. Catch says:

  महेंद्र अगदी बरोबर बोललात. १००% खरं एक मराठी दुस-याला आदर देत नाही. स्वत:चा अनुभव आहे. माझी गर्लफेन्ड मुंबईची आणि मी मराठवाड्याचा. नेहमी नेहमीच्या हेटाळणी मुळे मी ते नातं टिकवू शकलो नाही.

  • dhirajkumar patil says:

   jo jilha,,jo vibhag maharashtatil itar marathmoli bolincha apman karat aasin to jilha aani to vibhag maharashtra baher kadhun takava.mug maharashtrat fakt aaplech lok rahtin.aaplya shivaji maharajanche marathi aani aaplya sarva bolibhashanna aaplese mhannare marathi…………..!
   mi jalgaon jilhyacha. aahirani (khandeshi) majhi boli.mag majhi aahirani ashuddha aahe ka ? mi suddha svabhimani aahe. majhyasathi majhi boli shuddha aahe . koni majhya bolila ashuddha mhanin tar mi tyacha paay modun tyachya galyat baandhin..
   !!! jay maharashtra !!!
   (ek jalgaon cha maratha)

   • धिरज
    फार जूना लेख आहे हा. दोन हजार नऊ मधे लिहिलेला. तेंव्हा तसंच काहीतरी कारण झालं होतं बहूतेक.
    भाषानिहाय प्रांत रचना , हा निर्णय घेतला गेला होता तेंव्हाच ह्या भाषांना वेगळी म्हणून मान्यता दिल्या गेली असती तर??

    • dhirajkumar patil says:

     tar kharokharach mitra, aamha samdhya maharahtra baher raahnarya marathmoli lokaanni maharashtra baaher aapli svataahchi kadhi marathi mhanun olakh karun dili nasti.mi uttar maharashtra madhalaa jalgaon jilhyatil ek sahityik aahe.pan mi sadhya surat madhe rahto.aamuchya khandeshatil barechse lok suratla,ahmadabadla,barodyala,vapila raahtaat.tyamule aamuchya khandeshi lokaant ‘jay maharashtra’ bolnyache thode jaastach ved laglele aste.kaaran amhi maharastrachya matipasun laam rahto mhanun. hech aamch marathmolipun aaj disle naste. aani aamhi marathmoli aahot hi ekta suddha amchya khandeshi lokaant aani itar marathmoli boli bolnarya lokaant rahili nasti.
     (ek jalgaon cha maratha)

     • धिरजकुमार,
      तुमचे म्हणणे खरच पटण्यासारखे आहे. अहो कुठेही असलात तरी तुम्ही मराठीच रहाल हेच खरे..

 2. bhujang says:

  कुलकर्णी साहेब,

  मी आतापर्यंत कधीही वैदर्भियाने कोल्हापुरी माणसाला, अथवा मराठवाड्यातील माणसाने खानदेशी लोकांना नावे ठेवल्याचे पाहिलेले नाहीये.

  But guess which types of %@#$*! I have seen so many times looking down upon rest of the Maharashtrians. 🙂

 3. काका, मस्त झालाय लेख !!!

  माझी काही मतं:

  १. मराठी भाषा सगळ्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या टोन्स मधे बोलली जाते. त्यातल्या त्यात कोंकण भागात बोलली जाणारी भाषा ही शुध्द मानली जाते.
  -> तुमच्या जालनिशीच्या वाचकांमध्ये कुणी पुणेकर निघाला तर कदाचित हे वाक्य खोडून काढलं जाईल 🙂

  २. तुम्ही भारतामधे कुठलिही भाषा घेतलीत तरिही ती संस्कृत बेस्ड आहे.
  -> अगदी खरं. पण तमिळ याला अपवाद आहे. तमिळ भाषेचं मुळ संस्कृतमध्ये नाही, इतकंच नव्हे तर तमिळ संस्कृतपेक्षाही जुनी भाषा आहे असे तमिळ लोक म्हणतात.

  ३. बोली भाषा ही ज्या भागातल्या सामाजिक जीवनावर ,कल्चर वर अवलंबुन असते- त्यामुळे तिला अशुध्द म्हणता येत नाही. बोली भाषा ही बोली भाषाच असते..
  -> १०१ टक्के सहमत. याच नियमाने आपण खेडयातल्या लोकांना “किती अशुदध बोलतात हे लोक” असं म्हणू शकत नाही. ते जी भाषा बोलतात ती त्यांची बोली भाषा असते.
  या विधानाला पुष्टी देणारी जालावर एक व्याख्या मिळाली.
  Dialect: A regional or social variety of a language distinguished by pronunciation, grammar, or vocabulary, especially a variety of speech differing from the standard literary language or speech pattern of the culture in which it exists

  ४. बोला.. वरच्या कवितेतला गोडवा ती जर पुस्तकी भाषेत असती तर जाणवला असता कां?
  -> नाही. नाही. नाही.

  शेवटच्या उतार्‍यातलं अगदी अक्षर नं अक्षर खरं आहे…

  जाता जाता, हल्ली पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये एक भलतीच मराठी भाषा बोलली जाते. उदा, शाळेत जाणार्‍या मुलाला म्हटलं जातं “तू जर त्या नोटबुकमध्ये टीचरनी दिलेला होमवर्क कंप्लीट केला नाहीस तर मी तुला पनिश करेन”. ही मराठीची कुठली बोली भाषा म्हणायची 🙂

 4. मनाली says:

  बरोबर आहे…
  या मुळे समोरच्या माणसाचा आत्मविश्वास कमी होतो..अगदी असाच अनुभव मराठी माध्यमात शिकलेल्यांना येतो आणि ते कायम मागे पडतात….

 5. महेंद्रजी,
  नेहमीप्रमाणेच सविस्तर लेख आहे.
  हां, कोल्हापुरच्या मराठीचा एक खास टोन आहे.. अगदी तीन – चार महिन्यांच्या माझ्या वास्तव्यात मी तो टोन बराच काळ पकडुन ठेवला होता… “का करालय, ***?”…. किंवा सोलापुरकडची कडक अन् राकट “का बे?” … पण त्यातही एक गोडवा आहे हे खरं! सुरवातीला बरेच मित्र, सहकारी हिंदीतुनच बोलायचे… पण आता – किमान मीच मराठीत लिहण्यास सुरुवात केल्यापासुन म्हणा – त्यातलेच काही – चक्क मराठीत बोलतात. बरं वाटतं!

  मी तर एवढंच म्हणेनः

  लाभले भाग्य अम्हांस बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
  धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
  – सुरेश भट

  • दिपक
   हा लेख लिहिण्यास कारणिभुत झालेल्या त्या शिव्या घालणाऱ्या महाभागाचे आभार मानावे लागतिल. त्याने माझ्या मराठीवर टिका केली म्हणुनच हा लेख झालाय.. 🙂
   आणि हो…. सुरेश भट माझ्या वडिलांचे शाळासोबती (न्यु इंग्लिश स्कुल अमरावतीला) बरं का.. अगदी व्हिएमव्ही मधे ग्रॅजुएशन पर्यंत एकत्र होते ते. आणि भटांचं घरं पण आमच्या घरा शेजारीच ( कॉमन वॉल ) असलेलं होतं अमरावतीला.. 🙂

 6. हा विषय माझ्या मनात बरेच दिवसांपासुन घॊळत होता. म्हंटलं एकदा लिहुन टाकावं काय वाटेल ते… प्रतिक्रियेकरता सगळ्यांचेच ( कॅच , सतिश, पाटीअसाहेब, आणि मनाली) आभार.
  सतिश, जे काही लिहिलंय मराठी कोंकणी वर बेस्ड आहे ते सौ. ने सांगितलेलं आहे.. म्हणजे नक्की बरोबरच असणार.. 🙂 तिचा अभ्यासाचा विषय होता/ आहे तो.
  मनाली छान विषय आहे. मराठी माध्यमातल्या शिक्षणाचे फायदे तोटे.. धन्यवाद..

 7. Ashish says:

  त्यातल्या त्यात कोंकण भागात बोलली जाणारी भाषा ही शुध्द मानली जाते.
  >> दुरुस्ती
  पुण्याची मराठी हि सर्वात शुद्ध मराठी आहे.

  बाकी लेख फार छान झाला आहे.

  • पुण्याला स्थाइक झालेले सगळे लोकं कोंकणातुनच स्थलांतरीत झालेले लोकं आहेत.. त्यामुळे पुणेरी भाषा ही कोंकणातल्या मराठीशी जवळिक साधणारी आहे. म्हणुनच कदाचित पुणेरी भाषा ही प्रमाण भाषेच्या जवळ पोहोचते.
   जस्ट माहिती साठी म्हणुन सांगतो.. मराठीला लिखित स्वरुपातलं व्याक्रण नव्हतं . इंग्रजांच्या काळात, एका इंग्रज अधिकाऱ्याने एका कोंकणातल्या ब्राह्मणाला व्याक्रण लिहिण्याचं काम दिलं. म्हणुनच कोंकणातली/ पुण्याची भाषा प्रमाण भाषेशी जवळीक साधणारी आहे.. आणि याच कारणासाठी शुध्द समजली जाते.
   करेक्शन करा.. चुकिचे वाटत असेल तर..

 8. Sevakram says:

  लेख खुपच छान झालाय.लेखावरुन एक गोश्ट आठ्वली, या शुद्द मराठीवरून, पहिलि किवा दुसरीत असेल मी, गुरुजिनि निबंध लिहयला सांगितला होता मी पंतप्रधान झालोतर… आनी मी एकाच ओळीत संपविला होता कि मी पंतप्रधान झालो तर माझ्या गावाला राजधानी करेल. पुढे आमची काय गत झाली असेल तुम्हि कल्पना करू शकता.पण माझा हेतु त्यामागे असा होता कि माझे गाव राजधानि तर भाशा शुद्द भाशा. असो असे आम्हि पहिल्या पासुनचे ……,त्यामुळे शहरात येउन पन खेड्यातले येडे झालो.आज कामानिम्मीत्ताने शहरात पंधरा वर्शे झाली पण जखमा खोल आहेत.अजुनहि कुठेतरि विचारणारा भेटतोच,खान्देश कडचे का तुम्हि. का काय झाल भाउ? म्हनुन विचारल कि आपल्याकडे हा पामर इथे कसा? अस्सा बघून छ्दमी पणे हसणार. आणि यात दुसरेकड्चे लोक नाहित तर शहरात दोन-तिन पिढ्या झालेले खान्देशिहि आहेतच. शेवटी तुम्हि म्हट्ल्याप्रमाणे महाराश्ट्राचे असे कोणी नाही.[ आहेत पन खुपच कमी आहेत.]

  • या लेखाचा हेतु फक्त आपण सगळ्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे, हे ओळखणं गरजेचं आहे. हे सांगण्यासाठी आहे… नाहितर .. इतर लोकं आहेतच आपला फायदा घेणारे..

   सतिश

   🙂

   • काका, मी तुमच्याशी पुर्णपणे सहमत आहे.

    “तुमच्या जालनिशीच्या वाचकांमध्ये कुणी पुणेकर निघाला तर कदाचित हे वाक्य खोडून काढलं जाईल” हे वाक्य मी केवळ गमतीने आणि तेही केवळ त्यामध्ये तथ्य असल्यामुळे लिहिलंय 🙂

  • सेवकरामजी
   आपल्याकडे एक पध्दत आहे. मी नेहेमी म्हणतो, की मराठी माणुस मोठ्या गावात रहायला गेला की स्वतःला मोठा समजायला लागतो,आणि आपल्या गावाकडल्या लोकांना लहान समजायला लागतो. केवळ मोठ्या शहरात रहातो म्हणुन सगळं काही ज्ञान आहे असं दाखवतो. ही तर खरी शोकांतिका आहे. काय करणार?

 9. archana says:

  छान जमलाय लेख. मी पुण्यात लहानाची मोठी झाले. त्यामुळे माझे मराठी, पुणेरी.तरीही तुमचे आरोप अगदी मान्य.पण इथे माझी माझ्या भाषेमुळे मोठी गोची झालेली आहे. कोल्हापुरात १२ वी पर्यन्त शिकलेल्या आणि engg. पुण्यात केलेल्या office मधल्या मुलाच्या प्रेमात पडले.proposeपण केले.तर हा मी पुणेरी म्हणुन नाही म्हणाला. 😦
  बाकी एक मुद्दा मात्र राहुन गेला तुमचा.जातीनुसार बदलनारी भाषा.पुण्यात काही घरान्मधे कुनी चुकुन पोळीला चपाती म्ह्नटले की अत्यन्त तुच्छतेने पाहेले जाते त्या व्यक्तीकडे.एव्हडेच काय ण आणि न चे उच्चार चुकले तरी हेटाळणी करणारे पुण्यात खुप भेटतील.दुसर्‍याना demorlalise करणे अशा लोकाकडुन शिकावे.

  • अर्चना,
   केवळ पुण्यालाच नाही तर मुंबईला पण असंच आहे. मुंबई मधे शुध्द मराठी बोलली जाते ती केवळ वसईच्या ख्रिश्चन घरातुन.. खोटं वाटतंय़? पण आज ही वस्तुस्थिती आहे..
   माझ्या मुलिंना पण मुंबईच्या बाहेर जायला नको असतं . सुटी असली तरिही मुंबईलाच राहु म्हणतात.

 10. रवि करंदीकर says:

  महेद्रजी

  तुमचा लेख वचला. मुद्दा पटला.

  पुण्यातील मराठीला शुद्ध म्हणुन जरा दोष दिल्या सारखे (उगाचच) वाटले.

  तसा हेतू तुमचा नाही – हे मी तुमच्या ह्या आधिच्या लेखांवरून सांगु शकतो – पण हा लेख प्रथम वाचणार्‍याचा असा गैरसमज होण्याची शक्यता आहे.

  हे मत नोंदवावे वाटते.

  रवि करंदीकर

  • रवीजी
   तसा उद्देश नव्हता. फक्त एकच मेसेज द्यायचा होता तो म्हणजे सगळ्यांनी मतभेद विसरुन एकत्र आलं पाहिजे . पुण्याच्या मराठीला शुध्द म्हणुन दोष द्यायचा उद्देश नव्हता. ती शुध्दतेच्या ( प्रमाण भाषेच्या ) जवळ आहे ही वस्तुस्थिती आहे आजची.
   माझं म्हणणं केवळ एवढंच होतं की प्रत्येक बोली भाषेला सारखाच मान दिला तरंच चांदा ते बांदा महाराष्ट्र एक होइल. आता तुम्ही हेच बघा ना मुंबईची गुजराथी प्रचुर मराठी भाषा असुनही मुंबईचे लोकं उगिच कोल्हापुरी लोकांना घाटी म्हणुन चिडवतात .. हेच थांबलं की झालं .. आपण जिंकलो..!

 11. prashant says:

  मराठी प्रमाणभाषेसंदर्भात पुलंचं ‘ती फुलराणी’ हे नाटक सर्वांनी पहायलाच हवं! त्यात एक संवाद मला आठवतोय नायिका म्हणते,”जर ‘नव्हता’ हे बरोबर असेल तर ‘व्हता’ असं म्हणने चुकीचं कसं काय?

 12. Vikrant says:

  महेंद्रजी,
  आपण वर्णिलेले मला तर कुठेही पहायला मिळाले नाही. भाषेवरून असा भेदभाव केला जात असावा असे मला वाटत नाही. माझ्या कधी दृष्टीपथास आले नाही.
  पुण्याची मराठी शुद्ध आहेच त्याबद्दल दुमत असायचे काहीच कारण नाही. पण मला सतिशचेही म्हणणे पटते. रत्नागिरी, अलिबाग वगैरे ठिकाणी काही काही घरात मी कमालीची शुद्ध आणी गोड मराठी ऐकली आहे. तुम्ही तर इतिहासाचा दाखला दिलेलाच आहे. त्यामुळे कोकणी माणसामुळे पुण्याची मराठी अप्रतिम झाली हे मानायला जागा आहे. मुंबईच्या मराठीबद्दल मी काय लिहू? ’तो मला बोलला’ वगैरे पुणेरी कानांना अजिबात सुमधूर वाटत नाही. पण मुंबईची दुःखं निराळीच.असो.
  भाषेचा लिहाज वेगवेगळा असतो. आपण आपले स्वत्व फारसे न सोडता इतर वळणांमधंलं चांगलं घ्यायला काय हरकत आहे?
  जाता जाता – संभाषणातला समोरचा श्रोताही महत्वाचा आहे ना ’कुठे जाऊन राहिलास?’ हा प्रश्न वैदर्भीय माणसाने इकडच्या कोणास विचारला तर हा बिचारा त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा 😛

  • विक्रांत
   असं होतंय.. अजुनही. मुंबईला आत्ताच आमच्या कडे एक इंजिनिअर जॉइन झाला, तो अजुनही मराठीत बोलत नाही, अकोल्याचा आहे तो.. ! लोकं हसतात नां.. म्हणुन..
   आणि दुसरं ,मुंबईला लोकं गाणं पण बोलतात.. म्हणत नाहित!! 🙂
   आणि हो.. तेवढं विदर्भातलं मराठी किंवा खान्देशातलं कळतं हो पुण्याच्या लोकांना पण. फक्त समोरच्या माणसाची चेष्टा करु नये एवढंच म्हणणं आहे. म्हणजे तो हिंदी वर घसरणार नाही.

 13. आल्हाद alias Alhad says:

  “बोंबला, इथे भैय्या येतोय म्हणुन………………..आणि हिंदी बोलणारे नविन मराठी भैय्ये तयार करा!”
  हे पटलं.
  पण “मात्रू भाषा” असं वाचताना मात्र अडखळायला होतं.
  बरहात मातृभाषा, mAtRubhASA असं लिहीता येईल.

  धन्यवाद.

 14. Salil says:

  MK

  लेख छान झाला आहे. तुमची लेखणी (कीबोर्ड 🙂 जादु करते यात शंका नाही.

  मराठीच्या विषयाबद्दल मात्र थोडासा वेगळा विचार मांडतो (अर्थात आपल्या परवानगीने). माझ्या मते भाषा शुद्ध किंवा अशुद्ध हा वादच मुळात चुकीचा आहे. इंग्रजी किंवा हिंदी शब्द मिसळुन मराठी बोललो तर मराठी अशुद्ध होते हे मला पटत नाही.

  भाषा ही नदीसारखी असते. आपला आकार आपणच ठरवणार्‍या नदीसारखी. नविन शब्द, नविन उच्चार आत्मसात करत प्रत्येक भाषा विकसीत होत जाते. आज इंग्रजी सर्वमान्य भाषा मानली जाते कारण ती भाषा सर्वात प्रगल्भ झाली आहे. इंग्रजीने संस्कृत, लॅटीन, ग्रीक, रोमन अशा अनेक भाषांमधुन शब्द स्वीकारले आहेत. हे शब्द जेव्हा स्वीकारले गेले तेव्हा इंग्रजी अशुद्ध होतेय असं कुणी म्हंटले का?

  ज्या मराठी भाषेच्या शुद्धीबद्दल आपण बोलतोय तीसुद्धा संस्कृत आणि हिंदी (पाली) भाषेपासुनच बनलेली आहे. तेव्हा सुद्धा कोणीतरी संस्कृत किंवा हिंदी अशुद्ध होते आहे असा विचार केला असेल का?

  भाषेचा उपयोग प्रभावीपणे संवाद साधता यावा यासाठी केला जातो. आणि म्हणुनच वेगवेगळे शब्द स्वीकारले जातात. टेबल, ट्रेन, रीक्शा, बस, स्कुटर, सायकल हे इंग्रजी शब्द जसे आपण स्वीकारले तसेच इंग्रजीनेही आपले मातृ , पितृ, त्रीकोणमीती हे शब्द स्वीकरले आहेतच ना. मग या भाषा विकासाला आपण अशुद्धी कसे म्हणु शकतो? कोणी एक माणुस, जमात किंवा प्रदेश भाषेची शुद्धी कसा काय ठरवु शकतो?

  आपली भाषा बदलतेय आणि तीचे हे बदलणे कोणीच थांबवु शकत नाही.

  हल्ली मुले जास्तीत जास्त हिंदी/इंग्लीश सिनेमे/कार्टुन्स पाहतात. त्यांच्याकडुन शुद्ध मराठीची अपेक्षा कशी करावी?

  लहान मुलांचे कार्यक्रम टीव्हीवर दाखवणारी एकही मराठी वाहीनी नाही. लहान मुलांसाठी किती पुस्तके/कवीता प्रकाशीत होतात?

  शुद्ध बोलणे गरजेचे नाही आहे आज गरज आहे ती जास्तीत जास्त मराठीत बोलण्याची. मराठीतील ज्ञानसंपदा वाढवण्याची.

  सलिल चौधरी
  http://www.netbhet.com

 15. Amol says:

  awesome, U mention kolhapuri, But lot of people think that kolhapuri mhanje Shivral bhasha, Ase nahi aahe, Me aaj paryant kadhich shivya dilya nahit pan maza tone aaj hi kolhapuri aahe. Kadhi pan me maazya mitra shi bolto tar KAY KARALAYS re! asach bolto. Toch maza vidarbha kadacha mitra kay karulalayas ase mhanto. but it feels good.!

 16. Anand says:

  अगदी सहमत! एक प्रश्न – इतर भाषेतून जर शब्द घेतले तर ठीक, पण अपभ्रंशिक शब्द वापरणे कितपत योग्य वाटेल ?

 17. bhaanasa says:

  महेंद्र, लेखातील विचारांशी सहमत. मराठी माणूस एकमेकांची उणीदुणी काढत बसेल अन त्याचा फायदा इतर उठवत राहतील हे रडगाणे कधी संपणार कोण जाणे. आता सांगलीची माझी बहिण नेहमी म्हणत असे, मी उभारली. आता मुंबईत जन्म गेलेले आम्ही प्रथम कळतच नसे. पण काही दिवस तिथे राहणे झाले अन मग कळू लागले. तसेच गोव्याचे. भाषा कोकणी उलयता, वसता.. दोन वर्षे राहिलो ना.पण मराठीच्या जवळचीच. दर पावलागणीक मराठी भाषा बदलतेच, शिवाय तिचा स्वत:चा गोडवाही टिकून राहतो. असो. सलील यांच्या मतांशी सहमत आहे.
  मराठी लोकांना अनेकदा मराठीत बोलायची लाज वाटते का आणिक काय कारण असते कोण जाणे. परंतु दोन मराठी बाहेर कुठेही भेटले तरी इंग्रजीतच वाचाळत राहतात. आणि वर म्हणणार मराठी भाषा लयाला जातेय. काय बोलायचे ह्यावर.

 18. आनंद
  सहमत आहे विचारांशी
  भाग्यश्री
  प्रतिक्रियेकरता आभार.. कोंकणी भाषा कव्हर करायची राहुन गेली लेखात.. 🙂

 19. Rohini says:

  मी स्वत: नागपुरहुन पुण्याला आल्यावर कॉलेजमधे ह्या गोष्टिचा मला बराच त्रास झाला. पुढे सगळ्यांत सामावुन जायला मलाच माझी भाषा बदलायला लागली. तेव्हा खुप राग यायचा त्या सर्वांचा. निव्वळ मी मराठी थोडी वेगळी बोलायचे त्यामुळे माझ्याशी मैत्री करायला ही कोणि आलं नाही. तुमच्या लेखाने ते दिवस परत आठवले…

 20. रोहिणी
  सहमत आहे.. राग हा येतोच.

 21. Shubhanan Gangal says:

  प्रत्येक भाषेत ‘गद्य, पद्य, संगीत’ असते. त्यांचे आकलन व्हायला नीसर्गाने मानवाला तीन भीन्न कान दीले नाहीत. एकाच कानाने तीघांची ओळख पटते. म्हणजेच कानांना ध्वनीच्या गुणधर्मांचे वीघटन करता येते. ध्वनी गुणधर्मांचे चार वीभाग आहेत. १) फ्रीक्वेन्सी, २) लाउडनेस, ३) उच्चारातील वेळ, ४) जातीगुणवैशीष्टय. मराठीतील व्यंजन-स्वर ‘जातीगुणवैशीष्टय’ यावर आधारीत आहेत. संस्कृतचे नाहीत. आपण मराठी बोलतो त्यातच व्याकरण असते. मराठीत अनेक बोली आहेत. संस्कृत मध्ये बोली नाहीत. मराठी ही भाषा आहे. ‘मराठी’ नावाची बोली नसते. ‘अहीराणी, कोकणी, कोल्हापुरी, खानदेशी, पुणेरी, . . . अशा बोली मराठीत आहेत. या भीन्न बोलीत जे सामान्य असते त्याला ‘मराठी’ म्हणतात. बोलीतील सामान्यपणा जाणणे म्हणजेच ‘मराठी’ ओळखणे होय. असा प्रयत्न न करता, एका बोलीला ‘प्रमाणीत’ मानुन, मराठीचे व्याकरण, संस्कुतच्या व्याकरणाच्या आधारे लीहीले गेले. त्यामुळे ‘पुस्तकी व्याकरण’ आणी ‘खरे मराठी’ यात फरक पडला. त्यातुन बरेच प्रश्न नीर्माण झाले. ‘शोध मराठीचा’ हे संशोधन मी पुर्ण केले आहे. त्याबाबत चर्चा करायला संपर्क साधा. शुभानन गांगल. फोन : ९१-२२-२६२०१४७३ मोबाईल : ९१-९८३३१०२७२७ ईमेल : gangalg@ymail.com

 22. महेंद्रजी, तुमच्या मताशी १००% सहमत! मराठी माणसाचं वागणं शेखचिल्लीसारखं झालं आहे. परवा एम. टी. एन. एल. मधे गेले होते, औषधालासुद्धा मराठी माणूस सापडला नाही. फलक सुद्धा इंग्रजी आणि हिंदीमधे होते. हे आपणच केलं आहे या जाणीवेने फार विषण्ण वाटलं.

  • कांचन
   मन व्यतिथ होतं. तुम्ही शुभानन ची कॉमेंट वाचलीत कां? त्यांचा खुप अभ्यास आहे या विषयावर आणि खुपच तळमळीने काम करतात ते..

  • सलील कुळकर्णी says:

   हा विषय फारच गंभीर आहे. संपूर्ण देशात विविध राज्यांना भेट दिल्यावर असं लक्षात येतं की महाराष्ट्रात जशी स्थानिक भाषेची हेळसांड आणि उपेक्षा केली जाते तशी ती इतर कुठल्याही राज्यात होत नाही. आणि कांचन यांनी सुचवल्याप्रमाणे अशा सर्व बाबींना केवळ आपण स्वतःच जबाबदार आहोत. त्यासाठी इतरांना, अगदी राजकारण्यांनासुद्धा दोष देण्यात अर्थ नाही.

   मराठी माणसाला स्वतःच्या भाषेबद्दल प्रचंड न्यूनगंड आहे. तशी परिस्थिती भारतातील इतर कुठल्याही राज्यात आढळत नाही. मुंबईत मराठी माणसांचे स्पष्ट बहुमत नसले तरी ती ३०-३५% आहेत. म्हणजे इतर कुठल्याही भाषिक गटापेक्षा अधिक आहेत. (महाराष्ट्रातील इतर शहरात तर मराठी माणसांची संख्या कितीतरी अधिक आहे.) पण तरीही मुंबई ही बहुभाषिक या नावाखाली मराठीची कुचंबणा केली जाते. रेलवे, टपाल खाते, बॅंका, व जवळजवळ सर्व कडे स्थानिक भाषेला खड्यासारखे उचलून बाजूला केले जाते. त्या उलट बंगळूरू शहरामध्ये कानडी माणसांपेक्षा तमिळांची लोकसंख्या गेली अनेक दशके अधिक आहे. म्हणजे कानडी भाषा ही संख्येच्या दृष्टीने दुसर्‍या क्रमांकावर आहे. पण त्याचा परिणाम कुठेही दिसत नाही. सर्वत्र कानडीचे महत्त्व अबाधितच असते. सर्व पात्यांवर आणि अधिकृत संपर्क भाषा म्हणून कानडीलाच सर्वाधिक प्राधान्य असते, तमिळ नाही किंवा हिंदीही नाही. कारण कानडी माणूस स्वतःच्या अधिकारांबद्दल, स्वाभिमानाबद्दल जागृत आहे. मराठी माणसाला स्वतःच्या भाषेबद्दल औदासिन्यच नव्हे तर न्यूनगंड आहे. ज्याला स्वतःबद्दल अभिमान नाही त्याला इतर लोक कसे मान देतील? इतर राज्यात सर्वत्र स्थानिक भाषा वापरली जात असल्यामुळे साहजिकच स्थानिक भाषा अवगत असणार्‍या माणसाला अनेक प्रकारच्या नोकरी-व्यवसाय-उद्योगांमध्ये प्राधान्य मिळते. त्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर परप्रांतीयांना मारण्याची आवश्यकता नसते. न्यायालयात मराठी सक्तीची करण्याचा निर्णय घेऊन अनेक वर्षे झाली पण शासन स्वतःच्या निर्णयाची अंमलबजावणीच करीत नाही. खरं म्हणजे त्या एका बाबीमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या काही लाख मराठी कुटुंबांची पोटे भरतील. पण शासनावर तेवढे दडपण आणण्याची कुवतच आपल्यात नाही. त्याच प्रमाणे मराठी विषय ५वी ते १०वी च्या वर्गांना अनिवार्य करण्याच्या युती शासनाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने केवळ अनुमतीच दिली असे नव्हे तर त्याबद्दल पूर्णपणे पाठिंबा दिला. पण तो शासकीय निर्णय अंमलात आणण्याच्या बाबतीत मात्र शासन चालढकल करतयं. (इतर बहुतेक सर्व राज्यांनी असे विविध निर्णय १०-२०-२५ वर्षांपूर्वीच अंमलात आणले आहेत.)

   अर्थात अशा सर्व बाबतीत राजकारण्यांची इच्छाशक्ती नव्हे तर मराठी सामान्यजनांच्या इच्छाशक्तीचा अभाव आहे. अराजकीय, निस्वार्थी मराठी नागरिकांनी इतर भाषकांप्रमाणेच आपल्या भाषेबद्दल प्रेम व अभिमान बाळगायला पाहिजे; एवढेच नव्हे तर तो उघडपणे, कुठल्याही प्रकारचा गंड न बाळगता समाजात सर्व ठिकाणी दाखवून द्यायला पाहिजे. अशा विचारांचा वणवा सर्वत्र पसरला पाहिजे आणि मग आपण मराठीबद्दलच्या भावनांचा जोर सर्वत्र दाखवून देऊन राजकारण्यांवर दबाव आणायला पाहिजे.

   आपल्याला हिंदीचा अनाठायी दबाव वाटतो कारण महाराष्ट्रात “हिंदी ही राष्ट्रभाषा आहे” असा खोटारडा प्रचार केला जातो व तो खरा मानून मराठी माणूस आपल्या भाषेत हिंदीपुढे दुय्यम मानतो व मराठीला वगळून हिंदी पाट्या लावल्या तरी त्याला त्यात काहीही गैर वाटत नाही. याबाबतीतही आपण मराठी माणसांची लोकजागृती करायला हवी.

   • मराठी माणसाची कुचंबणा होते आहे हे तर त्रिकालबाधित सत्य आहे. मराठी मधे दुकानांचे बोर्ड्स लावण्यासाठी पण स्वातंत्र्या नंतर सहाच्या वर दशकं जावी लागतात.
    श्रीलंकेमधे पण सिंहली सरकारने घेतलेल्या भाषीक बदलामुळेच, तिथल्या लोकल सिंहली लोकांना रोजगार मिळाला आणि तामिळ लोकं सिंहली न आल्यामुळे विस्थापित झाले. अगदी पध्दतशिर पणे सरकारी नौकरी मधल्या तामिळ लोकांना या मुव्ह मुळे काढुन टाकले गेले. </strong>आधीचा एक लेख इथे आहे..

    आपल्याइथे आजही मराठी ही न्यायदानाची भाषा झालेली नाही. आपल्यावरची इंग्रजांनी घातलेली मानेवरची जोखडं अजुनही आम्ही अभिमानाने वागवतो. मुंबई सारख्या शहरात भारतिय पोशाखामधे कोर्टात वकिलाने जाणं कायद्याने मान्य नाही. कोट आणि टाय हा लावावाच लागतो. निव्वळ मुर्खपणा आहे हा.

    माझे बाबा नेहेमी म्हणायचे, इथले इंग्रज ( इंग्लंडला जाउन आलेले भारतिय), इंग्लंडला थंडी पडली की ईकडे कोट घालायचे.अंधानुकरण किती असावं??. आता यातला विनोदाचा भाग जरी सोडला तरिही असे कायदे अजुनही आहेत. टीटी कोट घातलेला कशाला हवा?? असो. विषयांतर होतंय..

    तुमचा मुद्दा न्यायालयात आणि इतर ठिकाणी मराठी भाषा सक्तीची केली तर बराच फायदा होईल, पुर्णपणे योग्य वाटतो. ही गोष्ट चार पाच दशकं आधीच व्हायला हवी होती. पण राजकिय इच्छाशक्ती कमी पडते. आता साधी गोष्ट आहे, मराठी मधे पिएचडी करुनही नौकरी मिळणं कठिण आहे. पण तेच जर एखाद्या आंग्ल भाषेत पिएचडी केलं तर नौकरीची खात्री असते.सध्या जे लोकं मराठी मधे शिकतात ते केवळ भाषेवरच्या प्रेमापोटी. जर भाषेमधलं शिक्षण नौकरी साठी पण उपयोगी पडलं तर नक्कीच भाषेचं महत्व वाढेल.

    आपल्याकडे लग्नाचं सर्टीफिकेट, बर्थ सर्टीफिकेट इंग्लिश मधेच असतं. तेच माझा एक तामिळ मित्र आहे, त्याचं लग्नाचं सर्टिफिकेट तामिळ भाषेत आहे. आपणच इथे मराठीचा आग्रह धरणं आवश्यक आहे.

    हा ब्लॉग सुरु करुन आता ८-९ महिने झाले आहेत. सुरुवातिला मराठी लिहिण्याची सवय नसल्यामुळे बरेच इंग्रजी शब्द यायचे लिखाणात, पण नंतर हळु हळू सवयीने बरंच लिहिणं जमायला लागलं. पण अजुनही चुका होतातच!!

    स्वतःच्या भाषे बद्दल अभिमान हा असायलाच हवा. इथे पुर्ण जन्म गेलेला असतो. पण वर्षं- सहा महिने अमेरिकेत ऑन साईट राहुन आलेले लोकं मराठी बोलतांना त्रास होतो असं जेंव्हा म्हणतात तेंव्हा हसु येतं.

    कधी तरी असंही वाटतं की श्रीलंका सरकार प्रमाणे आपल्याही महाराष्ट्र सरकारने राज्य भाषेला जरा मानाचा दर्जा द्यावा.. शक्य तितक्या राज्य शासनाच्या अखत्यारितल्या सगळ्या विभागांमधे मराठी कम्पलसरी करावी तरंच काही तरी होऊ शकेल.

    इथे मुंबईला जन्म झालेले तामिळ /कन्नड लोकं , किंवा अमेरिकेत असलेले ताच वंशाचे लोकं आपली मातृभाषा चांगली बोलतात… पण तेच मराठी????

 23. सलील कुळकर्णी says:

  प्रिय श्री० महेंद्र,

  सप्रेम नमस्कार. लेख आवडला. आपण एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातलाय. यावर विचारमंथन व्हायला हवे. आपल्या लेखातील खालील विधानाबद्दल मला काय वाटते ते सांगतो.

  <>

  सर्व भाषांना बोली भाषा आहेत. भारतात अनुसूची-८ प्रमाणे २२ भाषा असल्या तरी शेकडो बोली भाषा आहेत. (दुर्दैव असे की त्यातील अनेक मरणपंथाला लागल्या आहेत.) हिंदी भाषेच्याही भोजपूरी, मैथिली, व इतर अनेक (बहुधा मराठीहूनही अधिक) बोलीभाषा आहेत. त्यांच्या राज्यांतही भाषांवरून वाद चालू असतात. कर्नाटक, तमिळनाडू, गुजराथ… सर्वच राज्यांत विविध बोली भाषा आहेत आणि त्यांच्यात कुरबुरी चालू असतात.

  मराठी बोलीभाषांवरून ती बोलणार्‍यात आजतरी फार भेदभाव असतील असं मला वाटत नाही. निदान मला नीट कल्पना नाही. पण असलेच तर ते पूर्णतः अयोग्य आहे.

  बोली भाषा म्हणजे अशुद्ध भाषा असे मुळीच नाही. माझ्या मते भाषालेखनाचे योग्यायोग्य अशा दृष्टीकोनातून आपण दोन प्रकारे वर्गीकरण करू शकतो. एक म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध आणि दुसरे म्हणजे प्रमाणित आणि अप्रमाणित.

  पु०ल० म्हणाले होते (अर्थात माझ्या ऐकीवाप्रमाणे) की ’नव्हता’ हे व्याकरणीय रूप शुद्ध असेल तर ’व्हता’ हे अशुद्ध रूप कसे? आणि ते मला पूर्णपणे पटते.

  मला वाटते की ’व्हता’ हे रूप फार तर अप्रमाणित म्हणता येईल पण अशुद्ध नक्कीच नाही. जे पुण्या-मुंबईच्या (किंवा सरकारी) तथाकथित विद्वानांनी पुस्तकात लिहून ठेवले तेच मराठीच्या शुद्धाशुद्धतेचे निकष असे मी मानत नाही. फारतर ते प्रमाणित मराठीचे नियम म्हणता येतील. कुठलीही भाषा संपन्न झाली, प्रगल्भ झाली, तिचा बर्‍यापैकी प्रसार झाला की तिच्यात बरेच बदल-अपभ्रंश होऊ लागतात. शब्दांचे उच्चारही बदलतात आणि बर्‍याचदा अर्थच्छटाही बदलतात. त्यामुळे या दोन निकषांच्या दृष्टीने भाषा बदलते, किंबहुना निरनिराळ्या समाजांत, भौगोलिक क्षेत्रांत एकाच शब्दाचे एकाच वेळी अनेक भिन्न उच्चार आणि अर्थच्छटा अस्तित्वात असू शकतात. (सुदैवाने इंग्रजीप्रमाणे मराठीत स्पेलिंग हा तिसरा भयानक प्रकार नाही.) त्यामुळे त्या सर्व भेदाभेदांपैकी काही आपण ’प्रमाणित’ म्हणून मान्य करतो आणि मग साहजिकच इतर अप्रमाणित ठरतात. पण म्हणून त्यांना अशुद्ध म्हणणे मला योग्य वाटत नाही.

  बहिणाबाईंनी त्यांच्या साध्या (खेडवळ?) बोलीभाषेत सांगितलेल्या श्रेठ तत्त्वज्ञानाला आपण अशुद्ध म्हणायला धजू तरी का? कुठलाही मराठी समाज मराठी बोलताना नियमितपणे जर मराठी शब्दांचा विशिष्ट प्रकारे उच्चार करत असेल किंवा विशिष्ट अर्थ लावीत असेल तर ते सर्व शुद्धच म्हणायला हवेत. शब्दकोशात नाही का शिष्टसंमत, शहरी शब्द व अर्थांच्या बरोबरच इतर भागातील शब्द, त्यांचे उच्चार व त्यांचे अर्थसुद्धा दिलेले असतात? अगदी शिव्या आणि ’चावट’ समजले जाणारे अश्लील, अशिष्ट शब्दसुद्धा त्यात असतात, असायलाच पाहिजेत.

  खरं म्हणजे आज गावाकडील लोकंच अधिक शुद्ध मराठी बोलतात. “मी फुडल्या मंगलवारी पुन्न्यांदा एकदा त्याच्या घरला जाऊन येईन” अशा प्रकारचे गावाकडे ऐकू येणारे वाक्य कदाचित अप्रमाणित समजले गेले तरी ते अशुद्ध तरी नक्कीच नाही. त्याउलट “नेक्स्ट च्यूसडेला मी वन्स अगेन त्याच्या घराला विजिट करेन” हे वाक्य मात्र जरी शहरातील उच्चभ्रू आणि बुद्धिजीवी (म्हणजे नक्की काय?) वर्गातील स्वतःला सुशिक्षित आणि सुसंस्कृत ’समजणार्‍या’ व्यक्तीने गुर्मीत उच्चारले तरीही ते माझ्या दृष्टीने पूर्णतः अशुद्धच आहे. (खरं म्हणजे अशी वाक्ये कानावर पडल्यावर ते बोलणार्‍याच्याच कानाखाली…… असो.) त्यामुळे माझ्यामते मराठी दूरदर्शन वाहिन्यांवरील मराठी (विशेषतः पल्लवी जोशी सारख्या मराठीवर पोट भरणार्‍या पण आपल्याला ती भाषा नीट येत नाही असे अभिमानाने सांगणार्‍या) मंडळींची मराठीच अधिक अशुद्ध असते.

  इंग्रज माणसे अमेरिकन, ऑस्ट्रेलियन एवढेच काय तर अगदी जवळच्या स्कॉटलंड आणि वेल्समधील माणसांचे इंग्रजीचे उच्चार व व्याकरण हे अशुद्ध मानतात. पण मी वर सांगितलेल्या तत्त्वाप्रमाणे ते इंग्रजांच्या दृष्टीने अप्रमाणित म्हणावे, अशुद्ध नाही.

  • प्रिय श्री सलिल
   ह्या मुद्द्यावर मला बरेच दिवसांपासुन लिहिण्याची इच्छा होती. मी जो मुद्दा मांडलाय तो स्वतः पण अनुभवला आहे. अजुनही बरिचशी जळगांव, विदर्भातली मुलं इंजिनिअरिंग केल्यावर इकडे आल्यावर बरेच दिवस मराठी बोलायचं टाळतात, आणि हे जेंव्हा मी पाहिलं तेंव्हा खरंच वाईट वाटलं.

   जर अप्रमाणित भाषा अशुध्द म्हंटली तर कदाचित “श्री ज्ञानेश्वरी, किंवा गाथा” ही पण शुध्द म्हणता येईल कां?? आर्थात ज्ञानेश्वरी किंवा गाथा ही भाषेच्या शुध्दाशुध्दतेच्या पलिकडची आहे.

   हा लेख लिहिण्याचं मुख्य कारण हेच होतं की मराठी बोलणाऱ्यांनी इतरांच्या बोलिची खिल्ली उडवणे बंद करावे. सगळ्या मराठी भाषिकांनी एकत्र यावं, हिच अगदी मनापासुन इच्छा.. अगदी पहिलं म्हणजे घाटी, म्हणुन हिणवणे, एखाद्याला अलिबागसे आया क्या रे?? असं म्हणुन अपमान करणे.. हे सगळं बंद व्हायलाच हवं.

   मराठी माणसाने अट्टाहासाने मराठी मधे लिहावे,अगदी जशी येइल तशी भाषा लिहित रहाणं आवश्यक आहे. .. म्हणजे भाषेशी नाळ जोडून राहिल.

   “इंग्रज माणसे अमेरिकन, ऑस्ट्रेलियन एवढेच काय तर अगदी जवळच्या स्कॉटलंड आणि वेल्समधील माणसांचे इंग्रजीचे उच्चार व व्याकरण हे अशुद्ध मानतात. पण मी वर सांगितलेल्या तत्त्वाप्रमाणे ते इंग्रजांच्या दृष्टीने अप्रमाणित म्हणावे, अशुद्ध नाही.” हे बाकी एकदम खरं..

 24. महेंद्रजी, शुभानन यांची प्रतिक्रिया वाचली. सलीलजींच्याही प्रतिक्रिया वाचल्या. अंधानुकरणाच्या हव्यासापायी आपण आपली मूळ ओळख विसरत चाललो आहोत. अमेरिकेत प्रत्येक राज्यानुसार भाषेतील उच्चार बदलतात तसंच भारतातील मराठी किंवा हिंदीबाबतही घडतं पण केवळ ऐकायला स्टाईलीश वाटतं म्हणून आपण इंग्रजीचा केवढा बोलबाला करतो आणि आपल्याच आईला कोप-यातील जागा देतो. खूप खूप वाईट, अपमानास्पद आणि चूक आहे हे!

 25. Sagar says:

  Kaka
  Kai solid post aahe hi…..Mi aadhi vachlich navati….Aata facebook var tumchi profile pahat astna link disali v mag vachli……Post sobatch comments hai changlya aahet.
  Ata post baddal…..Mi marathvadyacha….Majalgaon he maz gav.Yach Gavat Makrand anaspure rahaycha…..Tyachi ji bhasa aahe tich toning mazya gavat vaprli jate…
  ya bhashecha ek kissa sangato …Mazi tai Tasgav la D.ED karat hoto tenva Maz fav Lakshman Deshpandech Vrhad Nighalay Londaonla he tine tichya classmates la ikalav an tumhla sangto tyana tyatla Vinod kalalch nahi….
  Ya Natkacha vinod mala vatat tyachya bhashemule ajun ajun jast enjoy karat yeto.
  Mala swatla ya goshteecha anubhav Mi Kopargavla astana zala.Mala maze roommate satat mazya bhasevarun chidvayche but aala Makarndchi bhasha mahnun chidvan band zal..Karana te Makrand anaspure che Fan aahet…:)

 26. ajay k says:

  Dear mahendra kaka
  mi tumchya blog cha fan aahe
  gelya mahinabhara pasun ek n ek blog wachun kadhla ,
  tumch mhanane khare aahe .
  punyat mala mi vedrbhiyan asalyachya khup kharab anubhav aala
  mag aamhi tyanchi gochi karayachi mhanun hinditun bolyacho ani aaj pan tech karan aahe ki punyatale lok vedrbhiyan marathila hastat mhanun aamchya sarkhya lokana muddam hindit bolwa lagat
  baki your simply great kaka

 27. nilesh says:

  Thanks for remembering सखाराम गटणे(P.L.Deshpande)….
  “पुस्तकी भाषा बोलायची तर तोंडात छापखान्यातले खिळे बसवून सखाराम गटणे प्रमाणे बोलणे प्रत्येकालाच जमेल असे नाही.”
  Like it…

 28. अनिकेत राजे says:

  लेख वाचला.. अभिप्राय पण वाचले. काही गोष्टी सांगाव्या वाटल्या..
  लेखामध्ये कोकणी ब्राह्मणाचा संदर्भ दिला आहे. उद्देश काय असावा? कदाचित लेखकाने फक्त माहिती साठी हा संदर्भ वापरला आहे. पण वाचक काय अर्थ काढतील किवा काढलाय हे सांगता येत नाही.
  फक्त माहिती म्हणून हा संदर्भ लक्षात घेत असाल तर ठीक आहे. पण यात जात-द्वेष घेत असाल तर काही गोष्टी सांगणे गरजेचेच आहे.
  मला नाही वाटत कि तुम्ही विदर्भी-मराठवाडी-कोल्हापुरी मराठी बोलताय म्हणजे तुम्ही गुन्हा करताय. किंवा ती हसण्याची पण गोष्ट नाहीये. ती एक बोली भाषा आहे.
  मी मांडतो आहे ते कोकणी ब्राह्मणाने भाषेचे नियम लिपीबद्ध केले म्हणून कोकणी मराठी हि शुद्ध.. या विचारचे उत्तर.

  जर कोकणात गेलात आणि तिथल्या भाषे कडे लक्ष दिले तर कळेल कि कोकणातली मराठी हि नाकात बोलली जाते. उदा : नाही ला ते – “नांही ” असा उच्चार करतात. त्यामुळे कोकणी मराठी शुद्ध हा विचार बदला.

  खरतर माझ्या मते इग्रजांनी हे काम कोकणी ब्राह्मणाला दिले याचे कारण होते कि कोकणी ब्राह्मण नवीन विचार, नवीन सुधारणा लवकर आत्मसात करू शकतो. (जातीच्या फुशारक्या मारण्यासाठी नाही सांगत आहे तर एक वास्तव म्हणून सांगतो आहे. कि खरच या कोकणी ब्राह्मणांनी खूप सुधारणा घडवल्यात आपल्या समाजामध्ये. केशवपन-विरोध, विधवा विवाह, स्त्री शिक्षण, कुटुंबनियोजन, देशाचे स्वातंत्र अशा अनेक सुधारणांमध्ये या कोकणी ब्राह्मणांनचा खूप मोठा सहभाग आहे. हे मान्य करायलाच हवे. )

  प्राकृत – पाली भाषेतून जेव्हा मराठीचा उगम झाला तेव्हा त्या नवीन भाषेला काहीतरी नियम करणे गरजेचे होते. (प्रत्येक गोष्टीचे काही नियम हे असतातच. ते असावेच लागतात. ते काळाप्रमाणे बदलावे पण लागतातच. नाहीतर ती गोष्ट कालबाह्य समजून बाहेर फेकली जाते. ) याच साठी काही अभ्यास करून हे नियम केले गेले आहेत. उगाचच दुसऱ्याचे बघून त्याचे अनुकरण केलेले नाही. समाजाच्या गरज लक्षात घेऊनच आणि मूळ भाषांचा अभ्यास करूनच हे नियम केले गेले आहेत. पुणेकरांनी हे नियम फार लवकर आत्मसात केले आहेत. कारण नवीन चांगले शिकायची इच्छा आणि सर्वोत्तम असण्याची हौस हे खऱ्या पुणेकरांचे वैशिष्ठय आहे. आणि म्हणूनच पुणेरी मराठी हि शुद्ध मानतात. जे खरे पुणेकर आहेत त्यांना हे चांगलेच माहिती आहे. गेल्या १०-१२ वर्षांपूर्वी जे पुण्यात आले आहेत त्यान बद्दल मी म्हणत नाहीये. (नियम हे महत्वाचे असतातच. – कोल्हापुरी मिसळ हि मिसळ आणि पुणेरी मिसळ हि खरी मिसळ नाही. असे का म्हणतात? “झणझणीत नसेल तर ती कसली मिसळ?” हा या मागचा नियम आहे.)

  मला पण स्वतःला हे मान्य नाही कि तुम्ही मराठी वाक्यात इंग्रजी हिंदी शब्द घुसडवून त्यांना मराठी प्रत्यय जोडावेत. “खिलवायचे” हा काय शब्द आहे? भरवायचे किंवा खाऊ घालणे हा खरा मराठी शब्द आहे. जर आपल्या भाषेत त्याला शब्दच नाहीत तर ते बोलणे हे योग्य आहे. शुद्ध मराठी म्हणजे इतर कुठल्याही भाषेचे शब्द न वापरता (ज्यांना मराठी शब्द नाहीत ते सोडून) बोलणे.- तू जर त्या नोटबुकमध्ये टीचरनी दिलेला होमवर्क कंप्लीट केला नाहीस तर मी तुला पनिश करेन हि खरी अशुद्ध भाषा. सध्या मला एक आढळते आहे कि बायकांना लेडीज असे संबोधले जाते आणि पुरुषांना जेन्ट्स. कोल्हापूर मध्ये सगळ्या माणसांन मध्ये हा वापर मला सर्वात जास्त आढळला. “लेडीज ने वेगळी लाइन करा.” .”माझ्याकडे जी गिऱ्हाईक येतात त्यात जेन्ट्स पेक्षा लेडीज च जास्त असतात.” इ. हि खरी अशुद्ध मराठी.

  इथे अमेरिकेमध्ये इंग्लिश वेगळ्या प्रकारे बोलली जाते. I want to go to school for education. हे भारतीय (ब्रिटीश ) इंग्रजी मध्ये आपण ” आय वॉन्ट टू गो टू स्कूल फॉर एज्युकेशन ” असे म्हणतो. पण इथे “आय वोन्त तू गो तू श्कुल फो एदुकेशन” असे उच्चारतात. ब्रिटीश इंग्लिश ला हे लोक दुय्यम स्थान देतात आणि इंग्लंड मध्ये अमेरिकन इंग्लिशला. ब्रिटिशांना अमेरिकन भाषा अशुद्ध वाटते. मात्र अमेरिकन यावर कधीही घालून पाडून कुणालाही बोलत नाहीत किंवा वागवतपण नाहीत. पण मी इथे आल्यावर अमेरिकन इंग्लिश शिकलोच. कारण मी पुणेकर आहे. 🙂

  त्यामुळे शुद्ध अशुद्ध हा विचार बाजूला ठेवून आपण मराठी बाबत शहरी – व्यवहारी मराठी आणि गावरान मराठी असे दोन भाग होऊ शकतात. आणि दोन्ही पण त्यांच्या त्यांच्या जागी आहेत. कुणीही त्याला हासू नये. हि अपेक्षा. आणि कुणी त्याला हसत असेल तर दुसऱ्या भाषेत बोलण्या पेक्षा शहरी मराठी शिका किंवा समोरच्याला जाणीव करून द्या कि ती तुमची भाषा आहे आणि त्यात हसण्या सारखे काही नाही. जर समोरचा त्याला बधत नसेल तर तो त्याचा दोष असेल. आणि नवीन न शिकणे हा तुमचा दोष असेल.

  • अनिकेत
   ब्लॉग वर स्वागत. २००९ साली एकदा एका गृहस्थाशी माझे भांडण झाले होते ब्लॉग वर. नवीनच लिहीणे सुरु केले होते, मराठी लिहीण्याची सवय पण नव्हती, त्या मूळे बरेच इंग्रजी शब्द वापरले जायचे. तेंव्हाची ही पोस्ट आहे.
   आता चार वर्ष होत आल्याने नीटसं काय झालं होत्ं ते आठवत नाही, पण तेंव्हा ही पोस्ट लिहीली होती.

   तो कोंकणी ब्राह्मणाचा उल्लेख केवळ माहितीसाठी केला गेलाय. सौ. जेंव्हा पिएचडी चा अभ्यास करायची , तेंव्हा तिने सांगितले होते म्हणून लिहीण्याच्या ओघात ती गोष्ट लिहीली गेली असावी. जातीयवादी लिखाण करणारे बरेच लोकं आहेत, त्यात माझी भर कशाला घालायची उगीच ?मी नेहेमीच त्या गोष्टीपासून दूर रहातो.
   प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s