ऍलन रॉबर्ट्स.. वय वर्षं १२.. घरी पोहोचला, आणि पहातो तर काय घरी कोणीच नाही. आठव्या मजल्यावरचं घर. आई , वडील दोघंही बाहेर गेलेले.घराला कुलूप.. आणि चावी पण नाही. या मुलाने काय केलं असेल?? बाहेर बसून राहिला पायरीवर? की रडत बसला? की खाली खेळायला गेला?? नाही.. या पैकी काहीच नाही.सरळ ग्राउंड फ्लोअरला उतरला आणि सरळ आपल्या आठव्या मजल्यावरच्या घरात बाहेरून चढुन प्रवेश केला. बाहेरुन म्हणजे पाइप, खिडक्या इत्यादींना धरुन.. आणि ही होती ह्युमन स्पायडरमॅनची पहिली चढाई.खरं तर घराजवळच्या लहान लहान टेकड्यांवर चढण्याचे तर याने बरेच आधी म्हणजे अगदी लहानपणापासून सुरु केले होते. पण बिल्डींग वर चढायची ही वयाच्या १२ वर्षीच्या वयात पहिलीच वेळ.
इतक्या लहान वयात असं चढण्याची कल्पना पण करवत नाही… पण ह्याने मात्र पहिली चढाइ सर केली.. नंतर घरी आई बाबानी चोप दिला असेलच .. पण त्यावर काही नेटवर माहिती नाही 🙂
असं कुठल्याही बिल्डींगवर अजिबात सेफ्टी बेल्ट वगैरेचा वापर न करता चढायचं म्हणजे काही सोपं काम नाही.असे बिल्डींग वर चढतांना त्याचे दोन ऍक्सिडॆंट्स पण झाले होते वयाच्या १९ आणि २० व्या वर्षी.इतके मल्टीपल फ्रॅक्चर्स होते की डॉक्टरांनी सांगितलं की ह्याच्या मधे ६० टक्के डिसऍबिलिटी आलेली आहे, आणि हा पुन्हा कधीच असा बिल्डींगवर चढू शकणार नाही. पण ह्याच्या इच्छाशक्ती ला मात्र दाद द्यावीच लागेल. पठ्ठा पुन्हा सहा महिन्यातच बिल्डींग वर चढू लागला.नंतर रॉक क्लाइंबिंग मधे याने मास्टरी मिळवली.या नंतर पण जवळपास त्याचे ५ ऍक्सिडेंट्स झालेत पण त्यातूनही तो बचावला आणि नंतर पुन्हा त्याने हेच काम सुरू ठेवले.
फ्रांस आणि इतर देशांमधे कुठल्याही बिल्डींगवर चढणं हा कायद्याने गुन्हा आहे. तरी पण या माणसाने ८५ बिल्डिंग सर केल्या आहेत्त . याची स्ट्रॅटेजी खूपच साधी आहे. अगदी भल्या पहाटे ज्या बिल्डींगवर चढायचं आहे त्या बिल्डिंग जवळ जायचं आणि चढणं सुरु करायचं.आता एखादा माणुस अशा तऱ्हेने जर कुठल्याही बिल्डींगवर चढायला लागला की मग येणारे -जाणारे लोकं थांबून पहाणारच.्खूप गर्दी जमा व्हायची. हा माणूस थोडी खडुची पावडर घेउन सरळ वर चढणं सुरु करायचा. एकदा एका ठरावीक लेव्हलला पोहोचला की मग ह्याला उतरवणे अशक्यच कारण एका ठरावीक उंची नंतर याला उतरवायला, पोलिसांना चढणं आवश्यक असायचं , आणि ते काही सोपं नसायचं, म्ह्णूनच सगळे पोलीस त्या बिल्डींगच्या टॉपवर याची वाट पहात उभे रहायचे. हा माणुस वर पोहोचला की मग त्याला अटक केली जायची आणि केस पण केली जायची. अर्थात ही सगळी एक फॉर्मॅलिटीच असायची आणि त्याला सोडून दिलं जायचं. वर चढण्यासाठी त्याला अगदी लहान लहान बिल्डींगच्या खिडकीच्या बिजागऱ्या आणि काच लावण्याकरता वापरलेल्या अल्युमिनियमच्या फ्रेम्स पण पुरतात.
ह्या माणसाला मी एक जिमनॅस्ट मानण्या पेक्षा मी एक कलाकार मानतो !बिल्डींग वर चढण्याची याची कला अगदी अ्तूलनिय आहे. दुसरा कोणी स्पायडरमॅन अजुन तयार व्हायचाय. सध्या तरी हाच एक आहे बोटांना पट्ट्या बांधून बिल्डींग्ज सर करणारा…आणि आजचं पोस्ट हे ह्याचे कालची मलेशियातिल सगळ्यात उंच बिल्डींग सर केल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी केलेलं पोस्ट आहे. कालच त्याने मलेशियातिल पीटरसन ट्विन टॉवर्स वर अगदी अत्युच्च टोकावर चढून गेला.तेव्हाचे हे छाया चित्रं वर पोस्ट केलेलं आहे..
ही डॉक्युमेंट्री आहे हा पाच फुट पाच इंच उंचीचा मध्यम शरीरयष्टीचा माणुस कसा काय स्पायडरमॅन बनला ते.त्याची.. जवळपास ९ मिनिटांची डॉक्युमेंट्री आहे.. वर्थ वॉचिंग!
कमिटेड लोकांच्या बद्दल मला नेहेमीच आदर आणि कौतुक वाटत आलंय.मग ते कुठल्याही कामात असलेलं कमिटमेंट असो. यु ट्य़ुबवर याचे जवळपास ८० व्हिडीओज आहेत .. शोधा आणि पहा.. मस्त आहेत सगळे.. हा कालचा व्हिडीओ.. याच चढाईचा.
आतापर्यंत सिनेमातच स्पायडरमॅन पाहिला होता.. हा तर खरोखरचा निघाला! केवळ हातांच्या [नाही – बोटांच्या] आधारावर असं वर चढणं साहजिकच वाटतं तेवढं सोपं नाही. ईच्छाशक्तिच्या बरोबरच त्याने घेतलेले अथक परिश्रम आणि प्रॅक्टीसही वाखानण्यासारखं आहे! खरं आहे – प्रयत्ने वाळुचे कण रगडता – तेलही गळे!
दिपक
काल बातमी वाचली आणि याचे व्हिडीओज शोधले . पुर्वी एकदा टिव्ही वर पण दाखवला होता एक व्हिडीओ.काल जवळपास १५ व्हिडिओज पाहिलेत. सगळेच खुप छान आहेत. त्यातलेच दोन वर पोस्ट केले आहेत,
मस्त आहेत व्हिडिओज. मधे एकदा कुठेतरी वाचले होते की दोन चित्रकार भावांना पैसे नसल्यामुळे आपल्या चित्रांचं प्रदर्शन भरवता आले नाही. त्यासाठी पैसे जमवायला त्यांनी आपल्या फ्लॅट च्या बाहेर त्यांच्या घराचं प्रदर्शन लावलं होतं. लिंक मिळाल्यास पाठवते.
अवश्य!! वाट पहातो.. इ मेल ची..
तो जरी कातिंग मानवाप्रमाणे चढला असला, तरी त्याला कातिंग मानवासारखे जाळे सोडता येत नसल्यामुळे तो काही कातिंग मानव (तुमचा स्पायडर मॅन) म्हणवता येणार नाही, हं महेंद्र काका….!!!!!
विशाल
ते बाकी खरं आहे..
तरी पण जगात सगळीकडे हा फ्रेंच स्पायडरमॅन नावानेच प्रसिध्द आहे.
ठिक आहे, नविनच कळाले बरं काका, माझ्या माहितीत भर पडली !
जय महाराष्ट्र
check “Man on Wire” on Wikipedia.
It is Petronas Towers and not Peterson.
Thanks for the correction..