बाप्पा मोरया.. पुढल्या वर्षी लवकर या..

आज गणपती विसर्जन.लहानपणी आम्ही गणपती बसवायचो. आज एकटाच घरी बसलोय त्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. बऱ्याचशा गोष्टी ज्या विस्मृतित गेलेल्या होत्या , त्या पुन्हा आठवताहेत. आमचं एक लहान मुलांचं गणपती मंडळ असायचं. त्याचं नांव आनंद गणेश मंडळ. या मधे सगळ्यात मोठा मुलगा १३ वर्षाचा.. आमच्या वाड्यात हे मंडळ २० वर्षापुर्वी आमच्या सिनिअर्सनी सुरु केलं होतं. ते मोठे झाले की दुसरी फ्रंट टेक ओव्हर करायची हा उत्सव.  गणपती बसवायचा म्हणजे  एक  टेन्शन, एक जबाबदारीची जाणिव! मजा असायची! कोणाला तरी घरी कळायचं की आता गणपती आहे,  की एखाद्या दिवशी क्रिकेट खेळतांना  तो सगळ्यांना सांगायचा…. अरे…. गणपती आहे ना आता पंधरा दिवसांनी.. !!!आणि हे एक वाक्य ऐकलं की सगळ्यांमधे एक उत्साह संचारायचा.वातावरण चार्ज व्हायचं. ह्या सगळ्याचा खर्च व्हायचा २० रुपयांपर्यंत.
पहिली स्टेज.. वर्गणी गोळा करणे.. आधी एक पावती पुस्तक हवं ना.. मग सगळे मिळुन ५० पैसे जमा करायचे. आणि रेडिमेड पावती पुस्तक आणलं जायचं. खरं तर आणलं नाही तरीही चाललं असतं.. पण कोणी वर्गणी दिली की पावती लिहायची आणि त्यावर झोकात सही करुन फाडुन द्यायची.. त्यातली मजा .. एकदा अनुभवल्या शिवाय कळणार नाही. एकदा तु पावती दिलिस नां.. आता मी देणार.. असं चालायचं. प्रत्येक पावतीवर वेगवेगळ्या मुलाची सही असायची.. जवळपास प्रत्येकच वाड्यात गणपती बसायचा. म्हणुन वर्गणी गोळा करायला ज्या घरांमधे जायचं.. ते सगळे अगदी जवळचेच असायचे. बरं.. अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे मी जेंव्हा फार तर दहा वर्षाचा असेल, तेंव्हा कमित कमी ५० पैसे आणि जास्तित जास्त १ रुपया वर्गणी मिळायची. पंधरा दिवसांमधे फार तर ३० एक रुपये जमायचे. आणि तेवढ्यामधे आम्ही अगदी थाटात गणपती उत्सव साजरा करायचो.
दुसरी स्टेज म्हणजे प्लॅनिंग करणं.. आता कुठे मांडायचा गणपती?? एखाद्याच्या घरासमोरच्या एक्स्ट्रॉ खोलित ! जी खोली आम्हाला मिळायची ती बहुतेक खुप दिवसांपासुन बंद असलेली खोली असायची. मग सगळे मिळुन खोली स्वच्छ करणे आणि पाण्याने धुवुन काढणे.. हे झालं की .. डेकोरेशन कसं करायचं?? यावर डिस्कशन सुरु व्हायचं. आमच्यातला आर्टीस्टीक डॊकं असलेला एकच होता.. तो म्हणजे शाम जोशी.. कोणाकडुन तरी टेबल, निरांजन, ताट, ताम्हण, पेला, आणायचा.. मग कोणाच्या तरी आईची साडी, किंवा काश्मिरहुन आणलेली शाल मिळायची गणपती मांडायला.. आणि.. हो.. अरे फाडू किंवा जाळू नका रे.. असं पुन्हा पुन्हा बजाउन सांगायच्या त्या काकु..
आम्हाला नेहेमिच काळजी वाटायची की आपल्याला वेळेवर मुर्ती मिळणार नाही म्हणुन. मग आमची सगळी गॅंग गणपतीची मुर्ती पहायला जायची. एखादी मुर्ती निश्चित केली की त्या मुर्तीला तो मुर्तीवाला आमच्या नावाचं लेबल गळ्यात अडकवायचा. साधारणपणे ५ ते १० रुपयात चांगला १८ इंची गणपती यायचा. प्रसाद म्हणजे खोबरा किस +साखर यांचं मिश्रण. हे ठेवायला डबा लागायचाच. नाहितर मुंग्या लागुन  सगळा प्रसाद खराब व्हायचा. डबा अर्थातच कोणाच्या तरी घरुनच यायचा. पुजेकरता लागणारे उदबत्ती, कापुर इत्यादी सामान आणले जायचे.प्रत्येकच मुलगा.. अरे कशाला उगिच खर्च करायचा.. मी आणतो ना घरुन म्हणुन प्रत्येक गोष्ट घरुन आणायला तयार असायचा. आणि त्याची आई पण कशाला उगिच आपल्या घरुन नेतोस असं म्हणण्याऐवजी आनंदाने वस्तु द्यायची.
विसर्जनाच्या एक दिवस आधी सगळीकडुन शिधा गोळा करुन वांगी बटाट्याची भाजी, पुरी असा स्वयंपाक केला जायचा. पुऱ्या वगैरे लाटायला मात्र सगळ्या मुली तयार असायच्या.. रात्री आपापल्या घरुन ताटवाटी आणुन जेवणं व्हायची सगळ्यांची. एखादी काकु चांगला किलोभराचा शिरा वगैरे करुन आणायची घरुन.
आमची वर्गणी फारच कमी जमत असल्यामुळे आमच्या इथे फक्त आमचेच कार्यक्रम असायचे. एकदा रात्रीची आरती झाली की आम्ही सगळे बाहेर इतर गणपतीचे कार्यक्रम पहायला निघायचो.त्यातल्या त्यात जादुचे प्रयोग पहायला खुप आवडायचं..गणपतीचे दहा दिवस इतक्या फास्ट निघुन जायचे की समजायचंच नाही. गणपती विसर्जन हे जोशीवाड्यातल्या विहिरीवर केलं जायचं . विहिरीवर आरती वगैरे केल्यावर गणपतीला वरुन विहिरीत न टाकता, कोणितरी ( बहुतेक शाम्याच) विहिरीत उडी मारायचा.विसर्जन झाल्या नंतर पुन्हा ज्या खोलित गणपती असायचा त्याच खोलित जाउन आम्ही सगळे बसायचो. बराच वेळ….. परवाच दिलप्या ला फोन केला होता, तर म्हणे अजुनही आनंद गणेश मंडळ सुरु आहेच.. आणि अगदी अशाच प्रकारे उत्सव साजरा केला जातो. आणि सध्या वर्षं आहे.. ५७ वे…!!
नौकरी निमित्य पुण्याला होतो. एक बाकी आहे. काहिही असो.. जसे आयुर्विम्याला पर्याय नाही- तसेच पुण्याच्या गणपतीला पर्याय नाही. पुण्यातले गणपती पहाण्याची मजा इतर ठिकाणी नसते. वातावरणातला लाइव्हलीनेस जो पुण्यात असतो, तो इतर कुठेच पहायला मिळत नाही. संध्याकाळच्या वेळेस तर आमची तयारी सुरु व्हायची  गणपती विसर्जनाचा सोहळा पहण्यासाठी. चांगले इस्त्री केलेले कपडे ( कारण फॅक्टरितुन आल्यावर कपड्यांना एक विचित्र असा मशिन शॉपचा वास यायचा , त्यामुळे आधी आंघोळ आणि कपडे बदलणे हे पहिले काम. एकदाचं आवरुन झालं की मग स्विठ होम मधे जाउन साबुदाणा खिचडी -आणि चटणी आणि चहा मारला   की आमचा  जणांचा ग्रूप फिरायला निघायचा.चहा मारणं हा खास हा वाक्प्रचार फक्त अमृततुल्य मधेच वापरला जावा असं माझं मत आहे. पण पुण्याला चहा आणि बिडी मारणे हा एक रुढ वाक्प्रचार आहे.
आमच्या गृप मधे सगळे निरनिराळ्या प्रांतातले होते. मराठी फक्त मी एकटा आणि उदय .
मिरवणुक पहायला म्हणुन लक्ष्मी रोडला जाउन उभं रहायचं. एका जागी उभं रहायचा कंटाळा आला की मग अलंकार ते लक्ष्मी रोडचं दुसरं टोक.. आणि कधी तरी टीळक रस्त्यावर पण चक्कर मारायचो. अधुन मधुन एखादा चहा मारला की झालं .
आता रात्रीचे २-३ पर्यंत पुर्णपणे थकुन जायचो. पण परत घरी जाण्याची इच्छा होत नसायची. मानाचे पहिले पांच गणपती झालेले असायचे. मला स्वतःला कस्ब्याचा गणपती खुप आवडतो. अजुनही पुण्याला गेलो की या गणपतीला जाउन येतोच एकदा तरी. अर्थात या आवडीमागे कारण काहिच नाही.. बस्स!! ऐसेही….!
आमच्यातल्याच एकाची एक ग.फ्रे. होती. त्यामुळे त्याला तर हे गणपतीचे दहा दिवस म्हणजे पर्वणीच वाटायचे. रोज गणपती पहायला जायचा तो.. 🙂 आम्हाला आधी विचारायचा, की आम्ही आज कुठल्या भागात जाणार आहे ते.. (??)गणपती पहाता पहाता रात्रीचे दोन तिन वाजायचे. मग लक्ष्मी रोडवऱच्या एखाद्या दुकानाच्या पायरिवर जाउन बसलो की एखादा भैय्या यायचा.. साब पैर दबाके दु क्या?? आणि खरं सांगतो… हे भैय्ये लोकं असे मालिश, पाय दाबणे यात मात्र एकदम एक्सपर्ट असतात बरं कां.. एकदा चांगले पाय दाबुन घेतले की सरळ घरी जाउन झोपणे.. हा आवडिचा कार्यक्रम.. असो.. खुप मोठा झालाय लेख.

lalabagcharajaआज गणपती विसर्जन.लहानपणी आम्ही गणपती बसवायचो. आज एकटाच घरी बसलोय त्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. बऱ्याचशा गोष्टी ज्या विस्मृतीत गेलेल्या होत्या , त्या पुन्हा आठवताहेत. आमचं एक लहान मुलांचं गणपती मंडळ असायचं. त्याचं नांव आनंद गणेश मंडळ.

या मधे सगळ्यात मोठा मुलगा १३ वर्षाचा.. आमच्या वाड्यात हे मंडळ २० वर्षापूर्वी आमच्या सिनिअर्सनी सुरु केलं होतं. ते मोठे झाले की दुसरी फ्रंट टेक ओव्हर करायची हा उत्सव.  गणपती बसवायचा म्हणजे  एक  टेन्शन, एक जबाबदारीची जाणिव! मजा असायची! कोणाला तरी घरी कळायचं की आता गणपती आहे,  की एखाद्या दिवशी क्रिकेट खेळतांना  तो सगळ्यांना सांगायचा…. अरे…. गणपती आहे ना आता पंधरा दिवसांनी.. !!!आणि हे एक वाक्य ऐकलं की सगळ्यामधे एक उत्साह संचारायचा.वातावरण चार्ज व्हायचं.  आणि गणपती कसा बसवायचा याचं डीस्कशन सुरु व्हायचं..

पहिली स्टेज.. वर्गणी गोळा करणे.. आधी एक पावती पुस्तक हवं ना.. मग सगळे मिळून ५० पैसे जमा करायचे. आणि रेडिमेड पावती पुस्तक आणलं जायचं. खरं तर आणलं नाही तरीही चाललं असतं.. पण कोणी वर्गणी दिली की पावती लिहायची आणि त्यावर झोकात सही करुन फाडून द्यायची.. त्यातली मजा .. एकदा अनुभवल्या शिवाय कळणार नाही. एकदा तु पावती दिलंस ना.. आता मी देणार.. असं चालायचं. प्रत्येक पावतीवर वेगवेगळ्या मुलाची सही असायची..

जवळपास प्रत्येकच वाड्यात गणपती बसायचा. म्हणून वर्गणी गोळा करायला ज्या घरांमधे जायचं.. ते सगळे अगदी जवळचेच असायचे. बरं.. अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे मी जेंव्हा फार तर दहा वर्षाचा असेल, तेंव्हा कमीतकमी ५० पैसे आणि जास्तीत जास्त १ रुपया वर्गणी मिळायची. पंधरा दिवसांमधे फार तर ३० एक रुपये जमायचे. आणि तेवढ्या मधे आम्ही अगदी थाटात गणपती उत्सव साजरा करायचो.

दुसरी स्टेज म्हणजे प्लॅनिंग करणं.. आता कुठे मांडायचा गणपती?? एखाद्याच्या घरासमोरच्या एक्स्ट्रॉ खो्लीत ! जी खोली आम्हाला मिळायची ती बहुतेक खूप दिवसांपासून बंद असलेली खोली असायची. मग सगळे मिळून खोली स्वच्छ करणे आणि पाण्याने धुवून काढणे.. हे झालं की .. डेकोरेशन कसं करायचं?? यावर डिस्कशन सुरु व्हायचं. आमच्यातला आर्टीस्टीक डॊकं असलेला एकच होता…. तो म्हणजे शाम जोशी ,त्यामुळे डेकोरेशन करणं त्याचंच काम असायचं.. कोणाकडून तरी टेबल, निरांजन, ताट, ताम्हण, पेला, आणायचा.. मग कोणाच्या तरी आईची साडी, किंवा काश्मिरहुन आणलेली शाल मिळायची गणपती मांडायला.. आणि.. हो.. अरे फाडू किंवा जाळू नका रे.. असं पुन्हा पुन्हा बजावून सांगायच्या त्या काकु..

आम्हाला नेहेमीच काळजी वाटायची की आपल्याला वेळेवर मुर्ती मिळणार नाही म्हणून. मग आमची सगळी गॅंग गणपतीची मुर्ती पहायला जायची.थोडा ऍडव्हान्स दिला की बुकिंग पुर्ण व्हायचं. एखादी मुर्ती निश्चित केली की त्या मुर्तीला तो मुर्तीवाला आमच्या नावाचं लेबल गळ्यात अडकवायचा. साधारणपणे ५ ते १० रुपयात चांगला १८ इंची गणपती यायचा.

प्रसाद म्हणजे खोबरा किस +साखर यांचं मिश्रण. हे ठेवायला डबा लागायचाच. नाहितर मुंग्या लागून  सगळा प्रसाद खराब व्हायचा. डबा अर्थातच कोणाच्या तरी घरूनच यायचा. पूजेकरता लागणारे उदबत्ती, कापुर इत्यादी सामान आणले जायचे.प्रत्येकच मुलगा.. अरे कशाला उगाच खर्च करायचा.. मी आणतो ना घरुन म्हणून प्रत्येक गोष्ट घरुन आणायला तयार असायचा. आणि त्याची आई पण कशाला उगाच आपल्या घरुन नेतोस असं म्हणण्याऐवजी आनंदाने वस्तु द्यायची.

विसर्जनाच्या एक दिवस आधी सगळीकडून शिधा गोळा करुन वांगी बटाट्याची भाजी, पुरी असा स्वयंपाक केला जायचा. पुऱ्या वगैरे लाटायला मात्र सगळ्या मुली तयार असायच्या.. रात्री आपापल्या घरुन ताटवाटी आणून जेवणं व्हायची सगळ्यांची. एखादी काकु चांगला किलो भराचा शिरा वगैरे करुन आणायची घरुन.असा गणपतीचा महाप्रसाद व्हायचा. मजा यायची. हनुमान जयंती आणि गणपती दोन्ही सणांना खुप मजा यायची.या महाप्रसादा मधे सगळी मोठी मुलं आणि मुली पण सहभागी व्हायचे.

आमची वर्गणी फारच कमी जमत असल्यामुळे आमच्या इथे फक्त आमचेच कार्यक्रम असायचे. एकदा रात्रीची आरती झाली की आम्ही सगळे बाहेर इतर गणपतीचे कार्यक्रम पहायला निघायचो.त्यातल्या त्यात जादुचे प्रयोग पहायला खुप आवडायचं..गणपतीचे दहा दिवस इतक्या फास्ट निघून जायचे की समजायचंच नाही. गणपती विसर्जन हे जोशी वाड्यातल्या विहिरीवर केलं जायचं . विहिरीवर आरती वगैरे केल्यावर गणपतीला वरुन विहिरीत न टाकता, कोणीतरी ( बहुतेक शाम्याच) विहिरीत उडी मारायचा.विसर्जन झाल्या नंतर पुन्हा ज्या खोलीत गणपती असायचा त्याच खोलीत जाउन आम्ही सगळे बसायचो. बराच वेळ….. परवाच दिलप्या ला फोन केला होता, तर म्हणे अजुनही आनंद गणेश मंडळ सुरु आहेच.. आणि अगदी अशाच प्रकारे उत्सव साजरा केला जातो. आणि सध्या वर्षं आहे.. ५७ वे…!!

नौकरी निमित्य पुण्याला होतो. एक बाकी आहे. काहीही असो.. जसे आयुर्विम्याला पर्याय नाही- तसेच पुण्याच्या गणपतीला पर्याय नाही. पुण्यातले गणपती पहाण्याची मजा इतर ठिकाणी नसते. वातावरणातला लाइव्हलीनेस जो पुण्यात असतो, तो इतर कुठेच पहायला मिळत नाही. संध्याकाळच्या वेळेस तर आमची तयारी सुरु व्हायची  गणपती विसर्जनाचा सोहळा पाहण्यासाठी. चांगले इस्त्री केलेले कपडे ( कारण फॅक्टरितुन आल्यावर कपड्यांना एक विचित्र असा मशिन शॉपचा वास यायचा , त्यामुळे आधी आंघोळ आणि कपडे बदलणे हे पहिले काम. एकदाचं आवरून झालं की मग स्विट होम मधे जाउन (पुण्याची माझी फेवरेट जागा ) साबुदाणा खिचडी -आणि चटणी आणि चहा मारला   की आमचा  जणांचा ग्रूप फिरायला निघायचा.चहा मारणं हा खास हा वाक्प्रचार फक्त अमृततुल्य मधेच वापरला जावा असं माझं मत आहे. पण पुण्याला चहा आणि बिडी मारणे हा एक रुढ वाक्प्रचार आहे.

पुण्याला स्विट होम शिवाय अजुन एक जागा होती माझी फेवरेट. ती म्हणजे पिसिएच च्या समोर, रस्त्याच्या विरुद्ध बाजुला  एक माणुस संध्याकाळी बसायचा. त्याच्याकडचे कांद्याचं थालिपिठ, त्यावर लोण्याचा गोळा, कांदा … आमच्या सारख्या बाहेर रहाणाऱ्यांसाठी एक पर्वणी होती. हल्ली तो दिसत नाही तिथे.. आमच्या गृप मधे सगळे निरनिराळ्या प्रांतातले होते. मराठी फक्त मी एकटा आणि उदय .

मिरवणुका पहायला म्हणून लक्ष्मी रोडला जाउन उभं रहायचं. एका जागी उभं रहायचा कंटाळा आला की मग अलंकार ते लक्ष्मी रोडचं दुसरं टोक.. आणि कधी तरी टीळक रस्त्यावर पण चक्कर मारायचो. अधून मधून एखादा चहा मारला की झालं .

आता रात्रीचे २-३ पर्यंत पुर्णपणे थकून जायचो. पण परत घरी जाण्याची इच्छा होत नसायची. मानाचे पहिले पांच गणपती झालेले असायचे. मला स्वतःला कस्ब्याचा गणपती खूप आवडतो. अजूनही पुण्याला गेलो की या गणपतीला जाउन येतोच एकदा तरी. अर्थात या आवडी मागे कारण काहीच नाही.. बस्स!! ऐसेही….!

आमच्यातल्याच एकाची एक ग.फ्रे. होती. त्यामुळे त्याला तर हे गणपतीचे दहा दिवस म्हणजे पर्वणीच वाटायचे. रोज गणपती पहायला जायचा तो.. 🙂 आम्हाला आधी विचारायचा, की आम्ही आज कुठल्या भागात जाणार आहे ते.. (??)गणपती पहाता पहाता रात्रीचे दोन तिन वाजायचे. मग लक्ष्मी रोडवऱच्या एखाद्या दुकानाच्या पायरीवर जाउन बसलो की एखादा भैय्या यायचा.. साब पैर दबाके दु क्या?? आणि खरं सांगतो… हे भैय्ये लोकं असे मालीश, पाय दाबणे यात मात्र एकदम एक्सपर्ट असतात बरं कां.. एकदा चांगले पाय दाबुन घेतले की सरळ घरी जाउन झोपणे.. हा आवडीचा कार्यक्रम..  बाप्पा मोरया.. पुढल्या वर्षी लवकर या..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सण and tagged , . Bookmark the permalink.

25 Responses to बाप्पा मोरया.. पुढल्या वर्षी लवकर या..

 1. Ashish says:

  खर आहे, दर वर्षी न चुकता गणपती विसर्जन मिरवणूक बघायला लक्ष्मि रोड वर जायचो. आज मी दूर बहरीन मध्ये बसून इ टीवी मराठी वर थेट प्रक्षेपण पाहूनच समाधान मानतो आहे. असो.
  >>>> हे भैय्ये लोकं असे मालिश, पाय दाबणे यात मात्र एकदम एक्सपर्ट असतात बरं कां..
  मला अशा आहे कि हे article कुणी म न से वाले वाचणार नाहीत [:)]

 2. काका,
  शेवटचा पॅरा भन्नाट लिहिला आहे, बरच काही आठवून गेलं 🙂

 3. आशिष
  मनसे वाले पण भैय्यालोकांना अशा कामाला वापरलं म्हणुन खुष होतिल..
  सोमेश
  एकटं बसलं की असं काहीतरी आठवत रहातं..आणि मग लिहुन काढ्तो.
  प्रतिक्रियेकरता आभार..

 4. Anand says:

  ‘आनंद गणेश मंडळ’, या नावा ऐवजी, रूढ़अर्थाने पॉप्युलर ‘बाल गणेश मंडळ’ नाव कसे काय नव्हते ? 🙂 त्या नावामागे काही हिस्ट्री ?

  • आनंद
   पुर्वी ज्या पहिल्या जरा ऍक्टिव्ह मुलाने सुरु केले त्याचे नांव आनंद होते, आणि त्याने आपल्या नावानेच सुरु केले होते.

 5. Ashish says:

  हा आनंद कोकणस्थ होता का… स्वतःच्याच नावाने मंडळ वगेरे चालू केला म्हणून विचारलं

  • आशिष
   खरंच तुम्हाला मनापासुन दाद देतोय… 🙂 यातच आलं माझं उत्तर.
   आणि तेंव्हा मुलगा असलेल्या त्या मुलाचे आनंदचे वय पण आता कमित कमी७०-७५ असावे.. 🙂

 6. Pravin says:

  Mastah ekdam…. Mee karanta gele 4 varshe ganpati miss kartoy 😦

  • प्रविण
   गणेशोत्सव म्हणजे निव्वळ चैतन्य!! मजा यायची .. अजुनही वाटतं, पुन्हा लहान व्हावं आणि गणपती बसवावा..

 7. हो ना काका, दरवर्षी गणपती दुर्मिळ आठवणींची छाप सोडुन जातो, आय शाल एवर नॉट वॉण्ट मिस दि बाप्पा फेस्टिवल इन माय लाइफ, देन वॉटेव्हर विल हॅपेन, आय डोण्ट केअर अबाउट दॅट !

  • माझं इंग्रजी जरा कच्चं आहे, पण नुसतं मनात आलं म्हणून लिहीलयं, पण मराठीबद्दल (नो प्रॉब्लेम!)

 8. लहानपणींच्या जुन्या आठवणींना ताजी झळाळी मिळाली..! गणपती बाप्पा मोरया … पुढच्या वर्षी लवकर या!

 9. sahajach says:

  खरच लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या…..आज दिवसभर ईशानला गणपती विसर्जन म्हणजे काय हे समजावले….आणि ’गणपती गेले गावाला..चैन पडेना आम्हाला’ वगैरे म्हणून दाखवले….
  विहीरीजवळचा नारळ, खिरापत, मोदक आणि वाटल्या डाळीच्या प्रसादाची तर फारच आठवण येते. रोह्याला असताना सुदर्शन केमिकलचा जवळपास सगळा स्टाफ असायचा विसर्जनाला आणि प्रत्येकाचा वेगळा प्रसाद….अक्षरश: डबा न्यावा लागायचा बरोबर. वाजत गाजत ती मिरवणूक कुंडलिका नदीकडे जायची…वरून धुवाधार पाऊस….सगळं आठवलं बघा पोस्ट वाचताना…..

  • तन्वी
   सोशलायझेशन म्हणजे काय ? याचं एक प्रकारचं ट्रेनिंगच होतं हे. लहानपणापासुनच सोशलायझेशन शिकता यायचं.

 10. Aparna says:

  महेन्द्र काका मस्तच लिहिलंय. मला ज्या लोकांना असं बालपण घालवायला मिळालं त्यांचा हेवा वाटतो. तुम्ही एकदम तुमचा तो काळ डोळ्यापुढे उभाच केलात….

  • सगळे मध्यमवर्गीय लोकं होते. ते दिवस अजुनही आठवतात.गणपती समोर बसुन म्हंटलेली गाणी, भेंड्य़ा, खेळ खुप मजा यायची.

 11. सही… अजून एक सुंदर “नॉस्टाल्जिया” लेख !!!

  >>पंधरा दिवसांमधे फार तर ३० एक रुपये जमायचे. आणि तेवढ्यामधे आम्ही अगदी थाटात गणपती उत्सव साजरा करायचो.
  विश्वास नाही बसत हो काका. हल्लीच्या दिवसात ३० रुपयांमध्ये बाप्पाचा एक दिवसाचा चणे खडीसाखरेचा प्रसादही विकत घेता येणार नाही 🙂

  GF चं ग.फ्रे. हे मराठीकरण लय भारी 😛

  • सतिश
   अगदी ५० पैसे किंवा फारच घासाघिस केल्यावर एक रुपया मिळायचा.आणि त्या एक रुपयासाठी पण दोन चार चकरा व्हायच्याच! माझ्या लहान पणी पेट्रोल १ रुपया २० पैसे लिटर भरल्याचे आठवते :)तशी स्वस्ताई होती.आणि त्याच प्रमाणात पगार पण कमिच असायचे.

 12. Nachiket says:

  नारळ पंचवीस पैशांना घेतल्याचं आठवतं..
  तुमचा ब्लॉग आता रोजच्या वाचनाचा भाग होऊन गेलाय..

  साध्या सरळ लिखाणात किती आनंद असतो..

  • नचिकेत
   धन्यवाद.. मुलिंना सांगितलं तर खोटं वाटतं.
   ४० रुपयात ऍम्बी चा टॅंक फुल व्हायचा.
   गेले ते दिवस..!!

 13. swapna says:

  साब पैर दबाके दु क्या?????? kya bat hai… bharich..
  by the way kaka.. kam zalay. problem aapoaap sutla. kasa te nivant mail ne kalvin. atta office madhye aahe.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s