वाय एस आर मृत्यु

वाय एस आर मृत्यु
रेड्डी यांचा मृत्यु झाला, याचं सगळ्यांनाच वाईट वाटलं.  रेड्डी म्हणजे  एक हरहुन्नरी लोकप्रिय व्यक्तीमत्व. आंध्रा मधे व्यक्ती पुजा काही नविन नाही. पण आजची बातमी वाचली आणि अंतर्मुख झालो.त्यांच्या मृत्यु मुळे इतकं जास्त दुःख झालं की  आंध्रात ६० पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केली.
आंध्रा मधे एन टी आर ने कित्येक वर्ष लोकांच्या मनावर आणि राज्यावर अधिकार गाजवला. इथे रामाची मंदिरं आहेत, पण त्या रामाचा चेहेरा एन टी आर चा असतो. कृष्ण पण एनटीआर सारखाच दिसतो. अशा प्रकारची व्यक्ती पुजा फक्त साउथ मधेच पहायला मिळू शकते. एक तद्दन फालतु अभिनेत्री होती हिंदी मधे खुश्बु म्हणुन. अगदी पुर्ण पणे फ्लॉप गेली होती हिंदी सिनेमात. पण तामिळ सिनेमात एक सुपर स्टार बनलेली आहे. तिची पण बरिच मंदिरं आहेत तामिळनाडुत!एखाद्या सिनेमा मधे रामाचं काम केलं म्हणुन काय तो अभिनेता राम होतो?
मला असं वाटतं की साउथ मधे केरळ सोडता शिक्षणाचे प्रमाण फारच कमी आहे. लोकांची आर्थिक परिस्थिती पण एक तर खुपच गरिब किंवा खुप श्रीमंत अशी आहे. याच कारणामुळे लोकं बहुतेक स्वप्नांची आणि सत्याची सरमिसळ करुन या सिनेमा नट नट्यांना देवाच्या स्वरुपात पुजतात.
कांही वर्षांपुर्वी कर्नाटकात जेंव्हा राजकुमार यांना विरप्पन ने पळवुन नेले होते तेंव्हा पण लोकं असेच चवताळले होते. आणि सरकारच्या विरुध्द निदर्शनं करणे सुरु केले होते.आणि तो राजकुमार जेंव्हा सुटून आला होता, तेंव्हा त्या विरप्पनची तारिफ करित होता. तंबी विरप्पन म्हणे!!!!आणि लोकांना त्यामधे काहिच विशेष वाटलं नाही. देशापेक्षा, मोस्ट वॉंटेड गुन्हेगाराच्या तारिफ पेक्षा त्यांना राजकुमार महत्वाचा वाटत होता. नंतर हा म्हातारा नट जेंव्हा अगदी नॅचरल मरण मेला तरी पण लोकांनी खुप जाळपोळ, तोडफोड केली होती. नशिब, कोणि आत्महत्या केली नव्हती तेंव्हा.
इथली जनता ही राजकिय नेते आणि सिनेमा हिरो च्या बाबतित फारच सेंटिमेंटल आहे. अगदी ५५ वर्षाचा म्हातारा हिरो , फुला फुलांचा शर्ट -सुटलेलं पोट झाकायला इन  न करता घातलेला, विचित्र टाइट पॅंट घालुन,  २२ वर्षाच्या हिरोइनच्या मागे गाणं  म्हणत फिरतांना पहायला या लोकांना काहिच विअर्ड वाटत नाही.कधी तरी चॅनल सर्फिंग करतांना एखादं मद्रासी ( म्हणजे साउथ इंडीयन ) चॅनल दिसलं की असा एखादा नाच हमखास सुरु असतो, आणि तो पाहिला की मग कशी किळस येते, आपल्या नातीच्या वयाच्या मुली सोबत अशा प्रकारे नाच करतांना पाहुन! असो.. एकेकाचा चॉइस असतो.
इथे आज जी बातमी वाचली, त्यात म्हंटलंय की वायएस़आर रेड्डी इतके पॉप्युलर होते, की त्यांच्या मृत्युच्या शॉक मुळे किंवा आत्महत्या केल्यामुळे ६० लोकं मरण पावले आहेत. मला खरंच कळत नाही, की लोकांना एक नेता गेला तर इतकं वाईट वाटायचं कारण काय? अगदी आत्महत्या करुन आपला जीव देण्याची गरज काय?
याच बाबतित नॉर्थ इंडीयन्स पक्के आहेत. ते असं काही झालं तर मग स्वतः आत्महत्या न करता, इतरांना मारतात. आठवा, इंदिरा गांधींचा खुन, राजीव गांधिंचा खुन.. वगैरे.. आत्महत्या कोणिच केल्या नाहित.
मला अजुन एक संशय येतोय, की दिवंगत नेत्याची पॉप्युलरीटी दाखवायला त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त तर केलं नसेल कोणी????  की हे सगळे खुन आहेत, आणि त्यांना आत्महत्या म्हणुन पोर्ट्रेट केलं जातंय????

रेड्डी यांचा चॉपरच्या ऍक्सिडेंट मधे मृत्यु झाला, याचं सगळ्यांनाच वाईट वाटलं.  रेड्डी म्हणजे  एक हरहुन्नरी लोकप्रिय व्यक्तीमत्व.गरीब जनतेसाठी करत यांनी तहहयात खूप कामं केलीत.आजपर्यंत जितक्या निवडणुका लढवल्या त्या सगळ्या जिंकल्या होत्या रेड्डींनी.

आंध्रा मधे व्यक्ती पुजा काही नवीन नाही. पण आजची बातमी वाचली आणि अंतर्मुख झालो.त्यांच्या मृत्यु मुळे इतकं जास्त दुःख झालं की  आंध्रात ६० पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केली.  महाराष्ट्र टाइम्सची बातमी इथे आहे.

आंध्रा मधे एन टी आर ने कित्येक वर्ष लोकांच्या मनावर आणि राज्यावर अधिकार गाजवला. इथे रामाची मंदिरं आहेत, पण त्या रामाचा चेहेरा एन टी आर चा असतो. कृष्ण पण एनटीआर सारखाच दिसतो. अशा प्रकारची व्यक्ती पुजा फक्त साउथ मधेच पहायला मिळू शकते. एक तद्दन फालतू अभिनेत्री होती हिंदी मधे खुश्बु म्हणून. अगदी पुर्ण पणे फ्लॉप गेली होती हिंदी सिनेमात. पण तामिळ सिनेमात एक सुपर स्टार बनलेली आहे. तिची पण बरीच मंदिरं आहेत तामिळनाडूत!

एखाद्या सिनेमा मधे रामाचं काम केलं म्हणून काय तो अभिनेता राम होतो? पण इथल्या लोकांना तसंच वाटतं. आंध्रात एनटीआर च्या विरुद्ध काही बोलून दाखवा बरं?? किंवा कर्नाटकात राजकुमार च्या विरुद्ध? तामिळनाडूत रजनिकांतच्या विरुद्ध?? अहो खरंच सांगतो… खून पडतील तिथे …!

मला असं वाटतं की साउथ मधे केरळ सोडता शिक्षणाचे प्रमाण फारच कमी आहे. लोकांची आर्थिक परिस्थिती पण एक तर खूपच गरिब किंवा खुप श्रीमंत अशी आहे. याच कारणामुळे लोकं बहुतेक स्वप्नांची आणि सत्याची सरमिसळ करुन या सिनेमा नट नट्यांना देवाच्या स्वरुपात पूजतात. सिनेमा पहाणं हा यांचा राष्ट्रीय पास टाइम असतो. एखादा सिनेमा रिलीझ होतांना कटाउट्स ची उंची त्या नटाच्या पॉप्युलरीटी सोबत वाढत असते. नट नट्यांचे फॅन क्लब्स पण इथे साउथलाच पहायला मिळतात.

कांही वर्षांपूर्वी कर्नाटकात जेंव्हा राजकुमार यांना विरप्पन ने पळवून नेले होते तेंव्हा पण लोकं असेच चवताळले होते. आणि सरकारच्या विरुद्ध निदर्शनं करणे सुरु केले होते.आणि तो राजकुमार जेंव्हा सुटून आला होता, तेंव्हा त्या विरप्पनची तारीफ करित होता. तंबी विरप्पन म्हणे!!!!आणि लोकांना त्यामधे काहीच विशेष वाटलं नाही. देशापेक्षा, मोस्ट वॉंटेड गुन्हेगाराच्या तारीफ करणारा राजकुमार महत्वाचा वाटत होता. नंतर हा म्हातारा नट जेंव्हा अगदी नॅचरल मरण मेला तरी पण लोकांनी खूप जाळपोळ, तोडफोड केली होती. नशिब, कोणी आत्महत्या केली नव्हती तेंव्हा.

इथली जनता ही राजकीय नेते आणि सिनेमा हिरो च्या बाबतीत फारच सेंटिमेंटल आहे. अगदी ५५ वर्षाचा म्हातारा हिरो , फुला फुलांचा शर्ट -सुटलेलं पोट झाकायला इन  न करता घातलेला, विचित्र टाइट पॅंट घालुन,  २२ वर्षाच्या हिरोइनच्या मागे गाणं  म्हणत फिरतांना पहायला या लोकांना काहीच विअर्ड वाटत नाही.कधी तरी चॅनल सर्फिंग करतांना एखादं मद्रासी ( म्हणजे साउथ इंडीयन ) चॅनल दिसलं की असा एखादा नाच हमखास सुरु असतो, आणि तो पाहिला की मग कशी किळस येते, आपल्या नातीच्या वयाच्या मुली सोबत अशा प्रकारे नाच करतांना पाहून! असो.. एकेकाचा चॉइस असतो.

इथे आज जी बातमी वाचली, त्यात म्हटलंय की वायएस़आर रेड्डी इतके पॉप्युलर होते, की त्यांच्या मृत्युच्या शॉक मुळे किंवा आत्महत्या केल्यामुळे ६० लोकं मरण पावले आहेत. मला खरंच कळत नाही, की लोकांना एक नेता गेला तर इतकं वाईट वाटायचं कारण काय? अगदी आत्महत्या करुन आपला जीव देण्याची गरज काय?

याच बाबतीत नॉर्थ इंडीयन्स पक्के आहेत.  त्यांना नेता मेल्याचं दुःख झालं की ते इतर लोकांना मारतात, स्वतः आत्महत्या करित नाहीत , इतरांना मारतात. आठवा, इंदिरा गांधींचा खून, राजीव गांधींचा खून.. वगैरे.. आत्महत्या कोणीच केल्या नाहीत.

मला अजुन एक संशय येतोय, की दिवंगत नेत्याची पॉप्युलरीटी दाखवायला त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त तर केलं नसेल कोणी????  की हे सगळे खून आहेत, आणि त्यांना आत्महत्या म्हणून पोर्ट्रेट केलं जातंय???असे हजारोंनी प्रश्न मनात उभे रहात आहेत.

जे काही असेल ते असो.. पण लोकांचा जीव जातोय.. हे मात्र खरं. मध्यंतरी च्या काळात एक सर्व्हे वाचला होता, त्यात म्हंटलं होतं की आंध्रा मधे महाराष्ट्रा पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कदाचित मुख्यमंत्र्यांच्या मृत्युचा असाही फायदा करुन घेतला जात असावा. एकदा पॉपुलरिटी एस्टॅब्लिश झाली की मग वाय एस आर च्या मुलाचा मार्ग – मुख्यमंत्री पदाचा , वेगळा!. मला असं वाटतं की  आंध्रा मधल्या शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे केलेल्या आत्महत्यांना रेड्डीच्या मृत्यु मुळे झालेल्या दुःखा मुळे झालेल्या आहेत असंही दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो. किंबहुना, असावा!! अशी माझी खात्री आहे..एखाद्याच्या मृत्युचा राजकीय सहानुभूतीच्या वापर करुन घेण्याची पद्धत भारतात फार पूर्वापार चालत आलेली आहे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , . Bookmark the permalink.

23 Responses to वाय एस आर मृत्यु

 1. सचिन says:

  असही असु शकत की,त्या काळी TV चे जास्त प्रस्थ नसल्यामुळे त्यांनी नट-नट्याना डोक्यावर घेतले.

  कारण आजकाल ते जास्त नाहिये. आणी आजकाल जे काहि व्यक्ती पुजे बाबत होत आहे , ते आता स्वतः नट- नट्या घडवून आणतायेत. त्या साठी media ची मदद घेतली जातीये आणि पैसा आहेच. आणी या साठी रीकाम टेकड्यां ची मदद घेतली जातीये.

 2. काका मला देखील हे आत्महत्या प्रकरण कळलं नाही. वाय एस आर काही एन टी रामाराव किंवा राजकुमार इतका प्रसिद्ध नेता नव्हता. राजकुमार गेला तेंव्हा मी देखील बंगलोरला होतो आणि मी स्वत: माझ्या डोळ्यासमोर जाळपोळ पहिली आहे. त्या दिवशी मी कसाबसा रूम वर पोहोचलो होतो. आम्ही त्यावेळी हॉस्टेलला राहायचो आणि दोन दिवस सगळी हॉटेल्स बंद होती. आम्ही दीड दिवस उपाशी होतो. शेवटी दुसर्‍या दिवशी रात्री एका मित्राने कशीबशी मॅगी मिळवली. हे South Indian लोकं डोक्याने फार कमी विचार करतात. हीरो लोकंबद्दल कमालीचे पझेसिव असतात.

 3. सचिन, सिध्दार्थ
  मला अगदी शंभर टक्के खात्री वाटते की शेतकऱ्यांच्या आत्महत्या रेड्डींच्या नावे खपवण्याचा प्रकार आहे हा. जर लोकांना वाईट वाटलं तर जाळपोळ करणे, बसेस लुटणे, ट्रेन्स बंद पाडणे असं काहितरी करतिल लोकं.. पण आत्महत्या… छे…. अशक्य!!सगळा राजकिय स्टंट आहे हा, रेड्डींच्या मुलाला गादिवर बसवायचा.

 4. सचिन says:

  YSR चा मृत्यू झाला म्हणून आंध्रा च्या कोणी नेत्याने का नाही आत्महत्या केली ?

  आता सगळे पदा साठी भांडायला तयार झालेत .

  • म्हणुनच मला हे सगळं खोटं वाटतंय..
   नेते काय, साधे कार्यकर्ते पण आत्महत्या करित नाहित. ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या असाव्यात याची मला तरी खात्री आहे. पण अशा सवंग लोकप्रियतेच्या बातम्या देउन ही लोकं स्वतःच्या पोळिवर तुप ओढुन घ्यायचा प्रयत्न करताहेत.

 5. देवेंद्र चुरी says:

  मला ही ती बातमी वाचून खुप वाईट वाटल ..कारण काहीही असो लोक मरत आहेत.
  एका तरुणाने तर म्हणे सुसाईड नोट लिहली होती की …
  “YSR dedicated his life to people, I am dedicating my life to him,”
  आता काय म्हणा याच ह्याला …असो खुप सेंटी असतात ही लोक .

 6. “शेतकऱ्यांच्या आत्महत्या रेड्डींच्या नावे खपवण्याचा प्रकार आहे” – मी साशंक आहे… म्हणजे १००% सहमत आहे असं मी म्हणत नाही.. हां मात्र अधिकांशी मी सहमत आहे. शिवाय, नट नट्यांची मंदिरे बांधणारे – त्यांच्या नावाने उदो – उदो करणारे साऊथ इंडियन लोकांकडुन असा प्रकार नविन नसावा. [ मी त्यांचा अवमान करत नाही – लोकाच्या लेकराला मी कधीच नावं ठेवत नाही!] मात्र वाय एस आर’ च्या मृत्यला दिलेला हा एखादा सा.इ. इस्टाइल स्टंट वाटतो, हेही तितकच खरं!

 7. देवेंद्र
  काय असेल खरंच सांगता येत नाही. आता तो माणुस गेला आहे , चिठ्ठी त्यानेच लिहिली की प्लांट केली — काय सांगणार?
  वाय एस आर च्या बाबतित काहिच प्रश्न नाही. पण मला अजुनही असं वाटतं की त्यासाठी कोणी आत्महत्या करणार नाही.हा सगळा पोलीटीकल स्टंट असावा.

 8. Anand says:

  आश्चर्य असे आहे की फक्त गरीब किंवा कमी-शिकलेले लोकचं व्यक्ति पूजक नाहीत तर आईटी इंडस्ट्री मध्ये काम करणारे देखिल, जे की उच्च शिक्षित आहेत. (अंध) व्यक्ति पूजक. दिवसाचे ४-५ तास फक्त चित्रपट आनी रिलेटेड गॉसिप ची चर्चा करतात! ( मी हैदराबाद ला असल्यामुळे ओब्सेर्वेशन केले आहे.)

 9. Pravin says:

  अगदी बरोबर. मंत्री कितीही चांगला असला तरी 60 लोक या धक्क्याने आत्महत्या करतील ही गोष्टच मुळी न पटणारी आहे. आणि तो राजकुमार किडनॅप झाला तेव्हा मी बॅंगलुर ला होतो. ऑफीस मधून घरी येताना आमच्या बस वर दगड फेक होऊ नये म्हणून त्या राजकुमारचे फोटो चिकटावले होते, तरी आमच्या बस च्या काचा फोडल्या होत्या. खिडकी जवळ असणार्‍या एकाचा डोळा थोडक्यात वाचला होता. डॉक्टर नसल्याने उपचारही झाले नव्हते त्याच्यावर. सेफ्टी साठी आम्ही 15-16 लोक एकाच घरात राहत होतो. दोन दिवस फक्त बिस्किट आणि मॅगी खाऊन काढले होते. तो जेव्हा सुटून आला तेव्हा वीरप्पन त्याचे जंगलात शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करतानाचे फोटो आले होते मेल मध्ये. कधी कधी असले फ्रस्ट्रेशन येत ना या सगळ्या गोष्टींच……

  • प्रविण
   ब्लॉगिंग सुरु केल्यापासुन कमित कमी मनातली सगळी गरळ तरी ओकुन टाकता येते. नाहितर खुप त्रास व्हायचा अशा बातम्या वाचल्या की!अनभिषिक्त राजा होता तो.

 10. bhujang patil says:

  साहेब, विश्वास बसणार नाही, पण ममता कुळकर्णी चे सुद्धा मंदीर आहे दक्षीणेत.

 11. “रेडडींच्या ६७ चाहत्यांचा मृत्यू”… काहीही… कुणा नेत्याच्या मृत्यूनंतर, मग तो कितीही जनहितदक्ष किंवा प्रसिदध असेना सामान्य नागरीक जीव देतील का? अकलेचे तारे किती तोडावेत याला काही मर्यादा…

  बाकी,

  “अगदी ५५ वर्षाचा म्हातारा हिरो , फुला फुलांचा शर्ट -सुटलेलं पोट झाकायला इन न करता घातलेला, विचित्र टाइट पॅंट घालुन, २२ वर्षाच्या हिरोइनच्या मागे गाणं म्हणत फिरतांना पहायला या लोकांना काहिच विअर्ड वाटत नाही.”

  हे चित्र बर्‍यापैकी बदलतंय बरं का काका. कन्नड आणि मल्यालम चित्रपटांचं काही माहिती नाही परंतू तमिळ आणि तेलुगू चित्रपट सृष्टी मात्र नक्कीच बदलतेय… तरुणाईने उचलून धरलेला रहना हैं तेरे दिलमें किंवा अगदी आता आता आलेला गजनी हे तमिळ चित्रपटांचे रीमेक आहेत. बोमरीलू या तेलुगू चित्रपटाचे तमिळ, बंगाली आणि ओरीया या भाषांमध्ये रीमेक झाले आहेत. हा चित्रपट हिंदीतही बनतोय. त्यांच्याकडचे चित्रपट चांगले व्हायला लागलेत म्हणूनच त्यांचे हिंदी रीमेक बनत आहेत…

  तुम्ही पाहिलेले म्हातारा हीरोवाले चित्रपट जुने तरी असतील किंवा मोहनलाल या नटाचे मल्यालम चित्रपट तरी असतील. त्यांना बिचार्‍यांना मोहनलाल हा त्यांचा सुपरस्टार ५० वर्षांचा झाला तरी नविन सुपरस्टार सापडत नाहीये 🙂

  आणि तसंही आपल्या मराठीतही का काल परवापर्यंत अशोक सराफ २२ वर्षांच्या हीरोईनसोबत नाचायचेच की 🙂

  • सतिश
   मला परवाच एक कन्नड चित्रपट स्कॅनिंग करतांना सुरु असलेला दिसला. त्यात तो हिरो असाच फिरत होता एका हिरोइनच्या मागे,ते पाहिलं आणि कदाचित सुप्त मनात रजिस्टर झाल्यामुळे लिहिल्या गेलं असावं. त्यामधे चक्क चौकोनी आकाराच हिरो फिरत होता हिरोइनच्या मागे.. त्याचं नांव पण ऐकलंय.. आता आठवत नाही.
   तेलगु सिनेमा मधला शंकराभरणम आठवतो मला मी पाहिलेला. एक चांगला सिनेमा होता.तामिळ, मल्याळमच्या तर मी वाटेलाच जात नाही. 🙂
   आपल्या हिंदी मधे पण संजिव कुमार होताच ना, हातामधे एक वही धरुन कॉलेजात जाणारा… 😀

 12. इथे बेटेनडॉर्फ मधे माझ्या ऑफिसमधे एक हैदराबादी आहे, ज्या दिवशी चॉपर बेपत्ता ची बातमी आली त्यादिवशी तो प्रचंड चिंतातूर होता, त्याला विचारले त्यावर तो म्हणे ‘हमारा सीएम लापता है ..’ आणि एखादा अमेरिकन कलिग कुत्र हरवल्यावर जितका चितातूर दिसतो तितका तो होता …. जाता जाता एक प्रश्न .. व्यक्‍तिपूजा श्रेष्ठ की फालतूगिरी ? बरच लिहिता येईल .. मला वाटतय आदर्शवाद, प्रेरणा या नक्कीच जगायला शिकवणार्‍या गोष्टी आहेत आणि त्या गरजेच्याही आहेत पण ‘व्यक्‍तीपूजा’ आली सगळं संपलच. डॉ. हेडगेवारांनी भगव्या झेंड्यालाच गुरू मानन्याचं कारण हेच होतं की व्यक्‍तीपूजा आणि त्यातून येणारी लाचारी नको. नाहितर घराणेशाहीचं अवडंबर माजायला सुरूवात होते आणि चड्डीत मुतणार्‍या ‘बाळराजेंचे’ पोस्टर चौकात लावले जाते .. जय हो !!

 13. bhaanasa says:

  रेड्डींच्या मृत्यूनंतर झालेल्या आत्महत्या या नक्की कशाचे द्योतक आहेत हेच मला समजेनासे झालेय. व्यक्तीपूजेतून लोकं कधीच बाहेर येणार नाहीत का? त्यांचे कार्य महान असेल व त्यांच्या जाण्याने तुम्हाला अपरिमित दु:ख झाले असेल तर त्यांच्या शिकवणीनुसार चाला पण जीव देऊन काय साधले जातेय? वरील अनेकजणांशी सहमत आहे, शेतकयांच्या व इतर कोणी केलेल्या आत्महत्या इथे खपविणे(दडपणे)हेच खरे असावे.
  आणखी एक गोष्ट इतकी खटकते व परंपरागत चालूच आहे. इतकी वर्षे राजकारणात रेड्डींच्या बरोबर असलेले, जीवन वाहून टाकलेले लोकं त्यांच्या नंतर मुख्यमंत्री होण्यास लायकच नाहीत का? एकदम त्यांची बायको/मुलगा यांचेच नाव कसे येतेय? असे झाले की वाटते की चालू असलेल्या ( पडद्याआड घडत असलेल्या भानगडी/गोलमाल ) गोष्टीत नवीन माणूस आल्यास प्रॊब्लेम होईल त्यापेक्षा हे बकरे बरे.
  ह्या घराणेशाहीतून कधी आपली सुटका होणार?

  • त्या आत्महत्या आहेत कां? हाच मुख्य प्रश्न आहे… शेतकऱ्यांच्या आत्महत्या लपवायचा प्रयत्न आहे हा.. नक्कीच!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s