शिक्षक दिन

काल संध्याकाळी ऑफिस मधुन घरी परत आलो, आणि पहातो तर काय सौ. आणि धाकटी सुकन्या ( यंदा दहावित आहे ) मिळुन साड्यांचं ( अरे बापरे कित्ती असतात ना या साड्या) )अवलोकन करणे सुरु होत.मला लक्षातच आलं नाही, की हे काय सुरु आहे ते.. अगं.. ती काळी नेस ना, मोठ्या बॉर्डरची, नाहितर..  ती जांभळी… बघ आवडते कां…? असं गहन डीस्कशन ऐकु येत होतं.पण निर्णय काही होत नव्हता.. शेवटी.. जाउ दे एक नविन साडी घेउन येउ आपण   म्हणुन मांडवली झाली, पण मला अजुनही कळंत नव्हतं की हे कशाबद्दल सुरु आहे ते..!

सावकाश पण  लॅपटॉपची बॅग कोपऱ्यात फेकली आणि नंतर ऐकतांना लक्षात आलं, की आमच्या सुकन्येला टीचर्स डे मधे टिचर व्हायचंय.. म्हणुन सगळा खटाटॊप सुरु होता. ५ सप्टेंबर… शिक्षक दिन..!!

माझा जन्मंच टिचर्सच्या कुटुंबात झालाय. वडिल करियरच्या सुरुवातीला शिक्षक होते, पण नंतर एम पी एस सी पास झाल्यावर कॉलेज मधे प्रो. म्हणुन काम करायला लागले.त्यामूळे शिक्षकां बद्दल थोडा जास्त आदर आणि सॉफ्ट कॉर्नर असायचा.

मी शाळेत असतांना माझे ९० टक्के शिक्षक म्हणजे माझ्या वडिलांचे विद्यार्थी. हेड मास्तर म्हणजे माझ्या आईचा सख्खा मावस भाउ. त्यामुळे शाळेत फायद्या पेक्षा तोटाच जास्त व्हायचा.आणि मार पण थोडा जास्तंच मिळायचा-भाचा म्हणुन.. थोड्या उचापत्या केल्या की लगेच घरी निरोप जायचा.बरं आमच्या शाळेच्या अगदी समोरंच वडिलांचं कॉलेज. तो पण एक मोठा प्रॉब्लेम होता.  टीचर्स डे साजरा करणं म्हणजे दहामिनिटांच्या सुटी नंतर क्लासमधे समोर उभे राहुन भाषण देणे. बहुतेक सगळ्या मुलांची भाषणं सारखीच असायची. काही सिनिअर वर्गातली मुलं टिचर बनुन यायचे आणि काही तरी शिकवायचा प्रयत्न करायचे. नुसती धमाल असायची. एक प्रकारचा सुटीचा दिवसंच असायचा हा. तेंव्हा शिकवायला येणारा विद्यार्थी पण हाफ पॅंट आणी शर्ट घालुनच शिकवायला यायचा.त्या मुलाने शिकवायला सुरुवात केली की वर्गातली सगळी मुलं नुसता गोंधळ  करायची. शेवटी तो बिचारा वर्ग सोडुन चालला जायचा.  नंतर मग टिचर्सचा टेबल हा तबला म्हणुन त्यावर ताल धरुन गाणि म्हंटली जायची..

राधाक्रिष्ण   जेंव्हा   राष्ट्रपती झाले तेंव्हा त्यांचे विद्यार्थी    त्यांचा वाढदिवस स्स्जरा करण्यासाठी म्हणुन मागे लागले, तेंव्हा त्यांनी म्हंटलं की माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा या दिवशी शिक्षक दिन साजरा करा. मी एकटाच तुमचा शिक्षक नव्हतो  , इतर ही होते..तेंव्हापासुन हा दिवस शिक्षक दिन म्हणुन साजरा केला जातो.

आजकाल टिचर्स डे च्या दिवशी टिचर्सला” गिफ्ट ” देण्याची पध्दत आहे. टीचर्स पण अशी गिफ्ट्स अगदी सहजतेने स्विकारतात.अशी गिफ्ट्स देण्याच्या मागचा उद्देश म्हणजे आपल्या पाल्याला त्रास होऊ नये हा असतो.विशेषतः थोडे अभ्यासात कमी असलेली मुलं  अशी गिफ्ट्स वगैरे देतात.टिचर्स डे ला टिचरसच्या योगदानाला ऍप्रिशिएट करणं हा उद्देश कधिचा संपलेला आहे.लहान असतांना माझी मुलगी पण एकदा मागे लागली होती की टिचरला गिफ्ट द्यायचंय म्हणुन , पण नंतर समजाउन सांगितल्यावर तिने मान्य केलं नुसतं गुलाबाचं फुल आणि ग्रिटींग द्यायचं.

डॉ. राधाक्रिष्णांच्या कार्या बद्दल काय माहिती आहे म्हणुन मुलिला विचारले असता, तिने फक्त रे भारताचे राष्ट्रपती होते एवढीच माहिती सांगितली.

बनारस हिंदु विद्यापिठाचे पहिले भारतिय व्हिसी. उनेस्को चे भारतिय डेलिगेट्सचे नेते १९४६ ते १९५०,  उनेस्कोच्या एक्झिक्युटीव्ह बोर्डाचे चेअरमन- १९५२ साली ,युनेस्कोचे प्रेसिडॆंट १९५२ साली, ऍम्बेसेडर एक्स्ट्रॉऑर्डिनरी  अफेअर्स , रशियाचे.
१९४९ ते १९५२ भारताचे पहिले व्हाइस प्रेसिडेंट, आणि नंतर १९५२ ते १९५६ राष्ट्रपती!
यांच्या ऑनररी डिग्रिज बद्दल लिहायचं तर एक मोठठं पान भर लिहावं लागेल.  कित्येक विद्यापिठांनी दिलेल्या पिएचडी च्या डिग्रीज.. आहेत त्यांच्या नांवे…

बनारस हिंदु विद्यापिठाचे पहिले भारतिय व्हिसी. उनेस्को चे भारतिय डेलिगेट्सचे नेते १९४६ ते १९५०,  उनेस्कोच्या एक्झिक्युटीव्ह बोर्डाचे चेअरमन- १९५२ साली ,युनेस्कोचे प्रेसिडॆंट १९५२ साली, ऍम्बेसेडर एक्स्ट्रॉऑर्डिनरी  अफेअर्स , रशियाचे.१९४९ ते १९५२ भारताचे पहिले व्हाइस प्रेसिडेंट, आणि नंतर १९५२ ते १९५६ राष्ट्रपती!

त्यांनी पुढिल कॉलेजेस मधे शिकवले होते… मॅंचेस्टर कॉलेज, ऑक्सफोर्ड, युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगो ,युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, आणि …इतर बरेच विद्यापिठं.

या शिवाय भारतामधे, म्हैसुर विद्यापीठात प्रोफेसर  म्हणुन, कलकत्ता विद्यापिठात , काम केले. आंध्रा युनिव्हर्सिटी मधे व्हाइस चान्सलर, अशा अनेक ठिकाणी त्यांनी शिकवले. म्हणुनच त्यांच्या जन्मदिवशी शिक्षक दिन सिलेब्रेट केली जाते..

यांच्या ऑनररी डिग्रिज बद्दल लिहायचं तर एक मोठठं पान भर लिहावं लागेल.  कित्येक विद्यापिठांनी दिलेल्या पिएचडी च्या डिग्रीज.. आहेत त्यांच्या नांवे..त्यांनी मिळवलेल्या डीग्रीज च्या बद्दल थोडक्यात… तेहरान विद्यापीठाची मान्द पीएचडी, नाइटहुड ची डी लिट, त्रिभुवन विद्यापीठ नेपाळची पीएचडी, मॉस्कॊ युनिव्हर्सिटीची पीएचडी, डॉक्टर ऑफ लॉ,या शिवाय  ऑक्सफोर्ड , केंब्रिज, लंडन, विद्यापीठाच्या डॉक्टरेट्स त्यांना मिळाल्या. या शिवाय जवळपास जगातिल असंख्य विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट दिली.

पण शिक्षकांनी मुलांना त्यांच्या बद्दल थोडीतरी माहिती सांगावी अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे काही खुप नाही..पण दुर्दैवाने… तसं होतं नाही.. हे खरं! असो.. काही का असेना कमित कमी शिक्षक दिनानिमित्य तरी त्यांची आठवण काढली जाते हेच महत्वाचे..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , . Bookmark the permalink.

20 Responses to शिक्षक दिन

 1. sahajach says:

  आज आपली सेम सेम पोस्ट…म्हणजे नाव सेम आणि शिक्षकांच घर हे पण सेम….
  वर्गात आलेल्या मुलांना त्रास देणे वगैरे आम्ही पण करायचो पण हे काही ईशानला सांगितले नाही….बाकी आज आमच्या पण घरी आईची सकाळी अशीच तयारी असते….गिफ्ट बद्दलचे मत पटले….

 2. डॉ. राधाक्रिष्णन: बनारस हिंदु विद्यापिठाचे पहिले भारतिय व्हिसी. उनेस्को चे भारतिय डेलिगेट्सचे नेते १९४६ ते १९५०, उनेस्कोच्या एक्झिक्युटीव्ह बोर्डाचे चेअरमन- १९५२ साली ,युनेस्कोचे प्रेसिडॆंट १९५२ साली, ऍम्बेसेडर एक्स्ट्रॉऑर्डिनरी अफेअर्स , रशियाचे.१९४९ ते १९५२ भारताचे पहिले व्हाइस प्रेसिडेंट, आणि नंतर १९५२ ते १९५६ राष्ट्रपती!

  वा! खरं तर मलाही ही हे आजच माहित झालं. आभार!

 3. Madhuri says:

  Very good infomation. Suggest please write a seperate article on Dr Radhakrishanan.. He Deserves more than celebrating his birthday as Teachers Day.

 4. तन्वी
  अहो आमच्या घरी पण एकदा हा एपिसोड झालाय. टिचरला खरोखरचं गिफ्ट द्या म्हणुन. पण आम्ही केवळ एक गुलाबाचं फुल आणि एक ग्रिटींग बनवुन दिलं , धाकटी मुलगी ६वित असतांना. गिफ्ट मधे अगदी चिकनकरीचा ड्बा ते चॉकलेट सगळं काही दिलं जायचं टीचरला.
  दिपक
  हा माणुस खुपच ग्रेट होता. माझ्या माहिती प्रमाणे सगळ्यात स्कॉलर ! आज जशी कलामांची इमेज आहे तशीच इमेज यांची पण होती. तुमची पोस्ट वाचल्यावर थोडी माहिती अजुन ऍड केली आहे.
  माधुरी
  प्रतिक्रिये करता आभार.

 5. देवेंद्र चुरी says:

  बरीच नविन माहिती मिळाली डॉ.राधाकृष्णन यांच्याबद्दल .

  • देवेंद्र
   खुप मोठे होते ते. त्यांच्या मोठेपणाला आपण विसरलोय.. फक्त शिक्षक दिन म्हणुन त्यांची आठवण करणं एवढंच करतो आपण.

 6. anuja says:

  नमस्कार,
  शिक्षक दिनाचा लेख वाचून पुन्हा मी शिक्षक झाले.शाळा हेच ध्येय मानून शिक्षिका होणे,व व्यवसाय म्हणून नोकरी करणे हाच फरक जाणवतो.अपवाद उद्हारणे आहेतच.पण सद्य परिस्थिती नाकारता येत नाही.आपणच पालक,शिक्षक व्हावे
  हाच मध्यम मार्ग होऊ शकतो.आपण सर्व ब्लोग लेखक पण,जाणीवा,अनुभव लिहून प्रबोधनाचे कार्य करता,अभिवादन
  आपणा सर्वाना.
  anuja

  • अनुजा
   शाळा हे ध्येय म्हणुन शिक्षक होणं व व्यवसाय म्हणुन नौकरी करणं यातला फरक जाणवतो. ही गोष्ट अगदी १०० टक्के खरी आहे.
   आई ही पहिली शिक्षक असते मुलाची . यात तर अजिबात शंका नाही.
   पण शालेय शिक्षणात मन ओतुन शिकवणारे शिक्षक हल्ली दिसत नाही. मी शाळेत असतांना एक्स्ट्रा पिरियड घेउन शिकवणारे शिक्षक, एखाद्या गरिब मुलाला फुकट शिकवणारे शिक्षक , आजकाल इतिहास जमा झाले आहेत,त्यांची कमतरता प्रकर्षाने जाणवते .

 7. bhaanasa says:

  महेंद्र, तुमच्या लेकीच्या साड्यांचे सिलेक्शन, उत्साहाने मायलेकीची गडबड पाहून मला माझी आठवण आली. चौथीत असताना गोव्याला होतो ना तेव्हा मुख्याध्यापिका झाले होते मी. फार मजा आली होती. आख्खी शाळा आपल्या हातात असल्याचा एक वेगळाच फील होता तो.:)
  बाकी आजकाल हे गिफ्ट प्रकरण जरा अतिच झालेय. मुलांना पटवून दिल्यावर पटते पण शाळेत इतर सगळी मुले जेव्हा टिचरना गिफ्ट देतात तेव्हा पुन्हा त्यांना अस्वस्थपणा येतोच. उगाचच आपण काहीतरी चूक केली आहे असे वाटत राहते. आपल्याला या सगळ्या मोठ्या माणसांची महती सांगणारे धडे होते ना पाठ्यपुस्तकात, आजकाल नसतात का?
  ध्येय मानून शिक्षक होणे हा प्रकार खरोखरच इतिहासजमा झालाय. पण त्यामागची कारणेही शोधायला हवीत.
  मात्र अजूनही लहान मुलांसाठी टिचर म्हणेल तीच पूर्वदिशा असते हे पाहून मला आनंद होतो. निदान अजून हा इम्पॆक्ट तरी टिकून आहे हे ही नसे थोडके. लेख मस्त-आता खरे तर हे वेगळे सांगायला नकोच.:)

  • हो , ते बाकी खरंय, कमित कमी शाळेत असे पर्यंत तरी टिचर म्हणेल तेच खरं.. असं असतं.
   शिक्षकांना नावं ठेवणं सुरु होतं , कॉलेजमधे गेल्या नंतर.. तो पर्यंत तरी शिक्षक म्हणेल तेच खरं वाटतं..
   …………………आणि म्हणुनच शिक्षकांची जबाबदारी जास्त वाढते.

 8. Pravin says:

  हो मी पण एकदा शिक्षक दिनी गणित विषय शिकवला होता. दुसर्या दिवशी सर्व मुलांसमोर शिकवायच म्हणून सराव करत होतो. कुठल्या तरी समीकरणातून आई, वडील आणि मुलाच वय काढायच होत. माझ्या समीकरणातून मुलाच वय 25, आईच वय 14 आणि वडीलांच वय 7-8 वर्षे अस काहे तरी आल होत 🙂 नंतर वर्गात बरोबर शिकवल होत मात्र 🙂

 9. छान पोस्ट काका. (हे आपलं उगाचच. तुमच्या पोस्ट वाचणे हा आता नेहमीच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहे. नुसत्या पोस्टच नव्हे तर त्या पोस्टना जाणकार वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रिया, त्या प्रत्येक प्रतिक्रियेला तुम्ही दिलेलं उत्तर अगदी सारं काही अधाशासारखं वाचून काढतो हल्ली. मागची काही वर्षे काही विशिष्ठ व्यासपिठांवरून दिलेल्या “मराठी भाषा वाचवा” या शिमग्याच्या बोंबेला आजचं मराठीतून होणारं सकस ब्लॉगिंग हे सर्वसामान्यांनी दिलेलं सणसणीत उत्तर आहे. थोडं विषयांतर झालं. असो.)

  हा लेख वाचून ईंजिनीयरींग संपल्यानंतर माझ्याच कॉलेजमध्ये एका सेमिस्टरसाठी केलेल्या लेक्चररशिपच्या दिवसांची आठवण झाली… आपण वयाच्या बाविसाव्या वर्षी गव्हर्नमेंट ईंजिनीयरींग कॉलेजमध्ये लेक्चरर आहोत या जाणिवेनं अगदी हवेत तरंगत असायचो मी तेव्हा 🙂

  बाकी आजच्या तरुण पिढीलाही “राधाकृष्ण हे एकेकाळी भारताचे राष्ट्रपती होते” एव्हढंच माहिती आहे. तुम्ही राधाकृष्णांची “जागतिक” शिक्षक म्हणून दिलेली माहिती वाचून ज्ञानात भर पडली. नव्हे अभिमान वाटला…

  >>आजकाल टिचर्स डे च्या दिवशी टिचर्सला” गिफ्ट ” देण्याची पध्दत आहे. टीचर्स पण अशी गिफ्ट्स अगदी सहजतेने स्विकारतात.अशी गिफ्ट्स देण्याच्या मागचा उद्देश म्हणजे आपल्या पाल्याला त्रास होऊ नये हा असतो.विशेषतः थोडे अभ्यासात कमी असलेली मुलं अशी गिफ्ट्स वगैरे देतात.

  हा प्रकार मात्र खरंच चिंताजनक आहे. टीचर्स डे ला दिलेली गिफ्ट ही एक प्रकारची लाचच आहे असं मला वाटतं. पूर्वी आश्रम पदधती होती तेव्हा शिष्य आपलं अध्ययन पुर्ण झाल्यावर गुरुला गुरुदक्षिणा द्यायचा. पण त्यामागे गुरुने जे आपल्यासाठी केलं त्याची जाणीव ठेऊन थोडंफार उतराई होणं एव्हढीच भावना असायची.
  या गिफ़्ट प्रकाराला केवळ शिक्षकच आळा घालू शकतील. जर कुणा मुलाने किंवा मुलीने गिफ्ट आणलं तर त्या मुलाला किंवा मुलीला मला गिफ्टची गरज नाही, त्याने किंवा तिने व्यवस्थित केलेला अभ्यास हेच माझ्यासाठी गिफ्ट असेल हे समजावून सांगितलं पाहिजे…

 10. ओम ॐ शिक्षक दिन च्या शुभेच्छा नमस्कार

 11. ओम ॐ माहिती पूर्वक लेख आहे शुभेच्छा नमस्कार

   • ओम ॐ मी शिक्षिका नाही पण ब्लॉग लिखाण इतकं केले आहे सर्व गाव किल्ले पदार्थ सन वार सर्व माहिती माझ्या वसुधालय मध्ये वाचायला मिळते एवढा अभ्यास व लिखाण मी केलेल्र नाही पण
    ब्लॉग साठी माहिती देते अमेरिका इतर देश यांची माहिती मी लोहिली आहे
    थोडस करून पुस्तक तयार करावे वाटते पणपुस्तक कोणी घेतले नाहीतर त्या पेक्षा नुसतेच ब्लॉग वाचन करू मराठी संगणक मध्ये भरपूर माहिती मी लिहिली आहे ते वाचतात छान वाटते मला

 12. प्रशांत says:

  Very nice

 13. बाळासाहेब बोराडे राजूर जालना says:

  शिक्षकदिना विषयीची खुप छान माहिती आहे तरुण पिढीला याचा फायदा होईल खुप छान उपक्रम .पुढील कार्यसाठी सुभेछ्या .

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s