पानवाला..

सिगरेट+तंबाखु
मला रोज दुपारी लंच नंतर एक चक्कर टाकायची सवय आहे. मी आणि माझे दोन मित्र, आम्ही समोरच्या पानवाल्या भैय्या कडे पान खायला जातो. आम्हाला पाहिलं की तो ठरल्या प्रमाणे तीन कलकत्ता साधा पान, सल्ली , सौंफ , हरिपत्ती , ठंडक तेज.. बनवुन तयार करतो, आणि मोठ्या अदबिने आमच्या हातात देतो. या बाबतित भैय्या लोकांची आठवण मात्र एकदम पक्की असते. प्रत्येकाच्या पानात काय हवं काय नको हे त्यांच्या अगदी बरोब्बर लक्षात रहातं.इतकी मेमरी असलेला भैय्या पान का विकतॊ हा एक मोठा प्रश्न आहे.   हा लेख त्या भैय्या, किंवा पानवाल्यावर नाही. त्या साठी पुलंचा पानवाला वाचा!
परवा, एका मित्राने पुलंचा पानवाला इ मेल ने पाठवला. तो लेख वाचला, आणि  म्हणुन दुपारी लंच टाइम मधे जेंव्हा पान खायला गेलो, तेंव्हा लक्षात आलं.. अरे बराच बदललाय की हा पान वाला.. 🙂
समोरचा आरसा, जरी असला, तरिही गांधी, नेहेरु, रंभा इत्यादींचे फोटॊ गेलेले होते. त्यांची जागा आता डीजिटल घड्याळाने घेतलेली होती.रेडिओ च्या ऐवजी आता एक सिडी प्लेअर आणि दोन स्पिकर्स कोपऱ्यात.शेजारीच एक लहानशी स्टीलची बादली, ज्यामधे पाणि भरलेलं , आणी त्यात पानं तरंगत, तर काही बुडलेली.
तुम्ही ऑर्डर दिली, की ताबडतोब, तुम्हाला हवं असलेलं पान काढणार, समोरच्या सुरिने त्याचे देठ कापुन जवळच्या एकेकाळी दुसऱ्या कुठल्या तरी रंगाचा असलेल्या , पण आता लाल झालेल्या टॉवेलला पुसुन त्याला समोर ठेउन , मोठ्या नजाकतिने कात चुना लावणार.आणि पटा पट डबे उघडुन गिऱ्हाइकाच्या आवडीनुसार त्यात जे कांही हवं ते, म्हणजे किवाम -मसाला.. किंवा १२० जर्दा वगैरे घालणार..
सनमायका चं कपाट , त्याला दर्शनी भागावर काचेची दारं, त्यातुन डोकावणारे सिगारेटसचे , तंबाखु ची पाकिटं..आणि मधेच एक खण कंडोम्स च्या पाकिटांचा पण ! तो खण खास सजवुन ठेवलेला- ती पाकिटं अशी रचुन ठेवलेली असतात की त्यावरची चित्रं गिऱ्हाइकाला दिसायला हवित ! असं बरंच काही दिसत होत.जर कोणी नविन माणसानी कपाट उघडलं तर सगळी पाकिटं खाली पडतिल असं वाट्त होतं. माणिकचंद, शिमला, गोवा च्या पुड्यांच्या माळा समोर लटकत होत्या. भांगे मधे तुळशीचं रोप असल्या प्रमाणे मधेच धना डाळ आणि शोपेची पाकिटं लटकत होती. स्वतःचं अस्तित्व जपण्याची एक केविलवाणी धडपड   करित!
समोरच्याच बाजुला बरण्य़ांमधे चिक्की, गोळ्या, बबलगम, च्विंगम आणि चकली… हो .. चकली ची बरणी. थोडी शेजारी एक मोठी बरणी, ज्यामधे म्हैसुर पाक दिसत होता. बहुतेक, मेड इन धारावी असावा. जर्द पिवळा रंग पाहिल्यानंतर तो खाण्याची इच्छाच मरुन जाईल असा !
पेन्सिल सेल ची माळ पण शेजारिच लटकत होती, एका जाळिच्या पिशवित लेज, ची आणि कुरकुरेची पाकिटं होती. बिस्किट्स ची पाकिटं पण त्या सनमायकाच्या कपाटात दिसत होती.  इतक्या लहानशा कपाटात सगळा संसार साठवलेला असावा.. यु आस्क इट, वुई हॅव ईट.. !! 🙂
आज पानवाला का आठवला? उद्या सकाळी मी जाणार आहे औरंगाबादला.. तिथे तारा पान सेंटर आहे नां.. त्याची आठवण झाली म्हणुन हा लेख.
तो पानवाला भैय्या आज दुसराच दिसला, म्हंट्लं कहां गया  भैय्या.. ?? तर म्हणाला, वो तो गांव गया है.. दो हफ्ता बाद आयेंगा…  लाल कपड्याच्या खाली पानं ठेवलेली होती, शेजारीच एक हॅक सॉ  ब्लेड चा बनवलेला चाकु, ज्याची मुठ ही  पिव्हिसी टेप गुंडाळुन केलेली…!शोप, सुपारी, सल्ली, हरी पत्ती सगळं काही स्टीलच्या डब्यात ठेवलेलं.. आजकाल पितळी डबे मेंटेन करणं जमत नाहीं वाटतं… म्हंट्लं खरंच .. पुलं.. अहो तुमचा पानवाला बदलाय बरं कां….
कोणे एके काळी मी  स्वतः पण सिगारेट ओढत होतो, आणि सोबतच १२० चं पान पण खायचो.त्यामुळे विल्स नेव्ही कटच्या पाकिटावर एक चित्र दिसलं, एका विंचु चं चित्र होत, आणि खाली एक सुचना !!तंबाखु मुळे कॅन्सर होतो. पण इतक्या रंगिबिरंगी पाकिटावर ही लहानशी वॉर्निंग लक्षात तर येत होती. मी पाहिलं की एक स्मोकर आला, त्याने पाकिट घेतलं सिगारेटचं, त्याने निर्विकारपणे उघडलं  पाकिट, ते चित्र जाणिवपुर्वक खाली धरुन , आणि एक सिगारेट पेटवली. त्याला काही फरक पडलेला दिसला नाही.
मला असं वाटतं की जर हा अवेअर नेस वाढवायचा असेल तर मात्र ही चित्रं जरा कलरफुल आणि बिभत्स करावी.. म्हणजे स्मोकर्स आणि तंबाखु खाणारे थोडे तरी कॉशस होतिल..
बाखु

मला रोज दुपारी लंच नंतर एक चक्कर टाकायची सवय आहे. मी आणि माझे दोन मित्र, आम्ही समोरच्या पानवाल्या भैय्या कडे पान खायला जातो. आम्हाला पाहिलं की तो ठरल्या प्रमाणे तीन कलकत्ता साधा पान, सल्ली , सौंफ , हरिपत्ती , ठंडक तेज.. बनवुन तयार करतो, आणि मोठ्या अदबिने आमच्या हातात देतो. या बाबतित भैय्या लोकांची आठवण मात्र एकदम पक्की असते. प्रत्येकाच्या पानात काय हवं काय नको हे त्यांच्या अगदी बरोब्बर लक्षात रहातं.इतकी मेमरी असलेला भैय्या पान का विकतॊ हा एक मोठा प्रश्न आहे.   हा लेख त्या भैय्या, किंवा पानवाल्यावर नाही. त्या साठी पुलंचा पानवाला वाचा!

परवा, एका मित्राने पुलंचा पानवाला इ मेल ने पाठवला. तो लेख वाचला, आणि  म्हणुन दुपारी लंच टाइम मधे जेंव्हा पान खायला गेलो, तेंव्हा लक्षात आलं.. अरे बराच बदललाय की हा पान वाला.. 🙂

समोरचा आरसा, जरी असला, तरिही गांधी, नेहेरु, रंभा इत्यादींचे फोटॊ गेलेले होते. त्यांची जागा आता डीजिटल घड्याळाने घेतलेली होती.रेडिओ च्या ऐवजी आता एक सिडी प्लेअर आणि दोन स्पिकर्स कोपऱ्यात.शेजारीच एक लहानशी स्टीलची बादली, ज्यामधे पाणि भरलेलं , आणी त्यात पानं तरंगत, तर काही बुडलेली.

तुम्ही ऑर्डर दिली, की ताबडतोब, तुम्हाला हवं असलेलं पान काढणार, समोरच्या सुरिने त्याचे देठ कापुन जवळच्या एकेकाळी दुसऱ्या कुठल्या तरी रंगाचा असलेल्या , पण आता लाल झालेल्या टॉवेलला पुसुन त्याला समोर ठेउन , मोठ्या नजाकतिने कात चुना लावणार.आणि पटा पट डबे उघडुन गिऱ्हाइकाच्या आवडीनुसार त्यात जे कांही हवं ते, म्हणजे किवाम -मसाला.. किंवा १२० जर्दा वगैरे घालणार.. आणि मोजुन तिस सेकंदात ते पान तुमच्या हातात !!

सनमायका चं कपाट , त्याला दर्शनी भागावर काचेची दारं, त्यातुन डोकावणारे सिगारेटसचे , तंबाखु ची पाकिटं..आणि मधेच एक खण कंडोम्स च्या पाकिटांचा पण ! तो खण “खास” सजवुन ठेवलेला- ती पाकिटं अशी रचुन ठेवलेली असतात की त्यावरची चित्रं गिऱ्हाइकाला दिसायला हवित ! जर कोणी नविन माणसानी कपाट उघडलं तर सगळी पाकिटं खाली पडतिल असं वाट्त होतं.

माणिकचंद, शिमला, गोवा च्या पुड्यांच्या माळा समोर लटकत होत्या. भांगे मधे तुळशीचं रोप असल्या प्रमाणे मधेच धना डाळ आणि शोपेची पाकिटं लटकत होती. स्वतःचं अस्तित्व जपण्याची एक केविलवाणी धडपड   करित!

समोरच्याच बाजुला बरण्य़ांमधे चिक्की, गोळ्या, बबलगम, च्विंगम आणि चकली… हो .. चकली ची बरणी. थोडी शेजारी एक मोठी बरणी, ज्यामधे म्हैसुर पाक दिसत होता. बहुतेक, मेड इन धारावी असावा. जर्द पिवळा रंग पाहिल्यानंतर तो खाण्याची इच्छाच मरुन जाईल असा ! मला असं वाटलंच होतं की हे कोण खात असेल.. तेवढ्यात एक कळकट मुलगा धावत आला, आणि एक रुपया समोर करुन एक म्हैसुर पाक घेउन गेला. म्हंट्लं प्रत्येक गोष्टी करता एकेक कस्टमर आहेच, आणि म्हणुनच तर त्या भैय्याने विकायला ठेवलंय.

पेन्सिल सेल ची माळ पण शेजारिच लटकत होती, एका जाळिच्या पिशवित लेज, ची आणि कुरकुरेची पाकिटं होती. बिस्किट्स ची पाकिटं पण त्या सनमायकाच्या कपाटात दिसत होती.  इतक्या लहानशा कपाटात सगळा संसार साठवलेला असावा.. यु आस्क इट, वुई हॅव ईट.. !! 🙂

समोरच्या टेबलवर लाल कपड्याच्या खाली पानं ठेवलेली होती, शेजारीच एक हॅक सॉ  ब्लेड चा बनवलेला चाकु, ज्याची मुठ ही  पिव्हिसी टेप गुंडाळुन केलेली…!शोप, सुपारी, सल्ली, हरी पत्ती सगळं काही स्टीलच्या डब्यात ठेवलेलं.. आजकाल पितळी डबे मेंटेन करणं जमत नाहीं वाटतं… म्हंट्लं खरंच .. पुलं.. अहो तुमचा पानवाला बदलाय बरं कां….

तो पानवाला भैय्या आज दुसराच दिसला, म्हंट्लं कहां गया  भैय्या.. ?? तर म्हणाला, वो तो देस   गया है.. दो हफ्ता बाद आयेंगा… म्हंटलं देस गया? त्याच्या लक्षात आलं की आणि त्याने मला समजेल अशा हिंदित सांगितलं की वो मुलुक गया है.. ! माझ्या चेहेऱ्यावरचं समजल्याचं स्मित बघुन त्याचा चेहेऱा पण उजळला.

gutka warning
cigaret warningकोणे एके काळी मी  स्वतः पण सिगारेट ओढत होतो, आणि सोबतच १२० चं पान पण खायचो.त्यामुळे विल्स नेव्ही कटच्या पाकिटावर एक चित्र दिसलं, एका विंचवाचा चित्र होत, आणि खाली एक सुचना !!तंबाखु मुळे कॅन्सर होतो. पण इतक्या रंगिबिरंगी पाकिटावर ही लहानशी वॉर्निंग निटशी लक्षात पण येत नव्हती.. मी पाहिलं की एक स्मोकर आला, त्याने पाकिट घेतलं सिगारेटचं, त्याने निर्विकारपणे उघडलं  पाकिट, ते चित्र जाणिवपुर्वक खाली धरुन , आणि एक सिगारेट पेटवली. त्याला काही फरक पडलेला दिसला नाही.

मला असं वाटतं की जर हा अवेअर नेस वाढवायचा असेल तर मात्र ही चित्रं जरा कलरफुल आणि बिभत्स करावी.. म्हणजे स्मोकर्स आणि तंबाखु खाणारे थोडे तरी कॉशस होतिल..इथे भारतातिल सिगारेटची वॉर्निंग आणि इतर देशातिल वॉर्निंग चे फोटो पोस्ट करतोय..जर परदेशामधे अवेअरनेस साठी इतका व्यवस्थित प्रचार केला जातो तर मग भारतामधे कां केला जाउ नये?

.

कांही देशात तर याही पेक्षा भयानक चित्र आहेत सिगारेट पॅक्स वर.. पण मला असं वाटतं की भारतामधे आता हा कायदा थोडा कडक  करण्याची वेळ आलेली आहे.या कायद्यान्वये, ही चित्रं जी हल्ली ब्लॅक ऍंड व्हाईट दाखवली जातात, ती फक्त रंगित करण्यात यावित.. बस्स!एवढं जरी केलं तरिही बरेच लोकं या व्यसनापासुन दुर होतिल.त्या लहानशा चित्रामुळे या व्यसनामुळे होणारे शरिराचे नुकसात लक्षात येत नाही.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , . Bookmark the permalink.

13 Responses to पानवाला..

 1. महेंद्रजी,
  वाचुन वाटलं की मी पानवाल्याच्या टपरी [?, नाही, आता दुकान म्हणायला पाहिजे!] समोर उभा आहे.. सारं वर्णन – तंतोतंत!

  पुण्यातही एक दोन दुकानं – पानांसाठी बरीच फेमस आहेत जसं – बिबवेवाडीमधला – पप्पु पानवाला.. यांचं पानाचं ए.सी. दुकान आहे! काही दिवसांपुर्वी एका पानवाल्याची न्युज एका चॅनलवर बघितल्याचेही आठवतं. हे पानवाले – भैय्या लोक या धंद्यात फारच तरबेज असतात.. पान – सिगारेट ब्रॅड आणि गिर्‍हाईक लक्षात ठेवण्यांत यांचा चांगलाच हातकंडा असतो! शिवाय ते मधाळ बोलणं… 😉

  आता सिगारेटच्या अवेरनेससाठी नक्कीच काहीतरी करायला हवं.. जरी आजकाल १८ वर्षाच्या वरती असलेल्यांना तंबाखुचे प्रॉडक्टस विकले जातील असे बोर्ड काही ठिकाणी दिसतात, मात्र १८ वर्षाखालील कोणताही ग्राहक त्या टपरींवरुन किंवा दुकानातुन रिकामा गेल्याचे माझ्या पाहण्यात नाही!

  आपण चित्रात दाखवल्याप्रमाणे गोल्ड फ्लॅकच्या पॅकवर [माझा एक्स ब्रॅड – आता नो – स्मोकिंग!!] जे चित्र दाखवलंय ते पुरेसं नाही. कारण एक तर ते फर्स्ट लुक मध्ये कुणी सुटमध्ये – खिशात हात घालुन उभा आहे असं दिसतं… ते लंग्ज आहेत हे प्रॉमिनंटली दिसायला हवं! तंबाखु किंगा इतर काही पॅकवर काळा रंगात विंचवाचे चित्र आहे. ते कॅसरची खुण कमी, ब्रॅड/ लोगो वाटतो!

  याविरुद्ध, परदेशातल्या ब्रॅडवरती मात्र हेच चित्र फार वेगळं आहे. एकतर मायनर [वया बद्दल बोलतोय!] लोकांना असे प्रॉडक्टस विकतच नाहीत… वयाचा डाऊट आला तर आय-कार्ड विचारतात! शिवाय पॅकवरती स्मोकिंगच्या परिणामाचे चित्र इतकं बोलकं – अपिलिंग – छापलेलं असतं की बघितलं तरी किळसवाणं होतं! [आपल्या फोटोंमध्ये – डनहिल् चे चित्र!]

  थांबतो… कमेंटस् चा लेख होतोय! … बाकी, स्मोकिंग – परिणाम – ……. यांवर बोलावं तेवढं कमीच!

  • दिपक
   उद्या जातोय मी औरंगाबादला. आणि औरंगाबाद म्हंटलं की तारा पानवाला आलाच ओघाने. तिथे गेलं की त्या पानवाल्याला नक्कीच भेट देतो, त्याची आठवण झाली म्हणुन हा लेख लिहिला..पण सिगरेटचे परिणाम जरा इफेक्टिव्हली दाखवायला हवेत. पॅसिव्ह स्मोकिंग हा पण एक मह्त्वाचा विषय आहे. भारतामधे रस्त्यावर किंवा पब्लिक प्लेस मधे स्मोकिंग करणं कायद्याने गुन्हा आहे , तरी अजुनही बरेच लोकं रस्त्यावर स्मोकिंग करतांना दिसतात. कधी तरी एका तान्ह्या मुलाला कडेवर घेउन स्मोकिंग करतांना एका माणसाला पानाच्या टपरिवर पाहिलं होतं. तिथे शेवटी त्याला मी ऑफर केली की तु सिगरेट ओढ तोपर्यंत मी तुझा मुलगा कडेवर घेतो..तेंव्हा त्याने सिगरेट फेकली , आणि थॅंक्स म्हणुन निघुन गेला.
   सौ. नेहेमी म्हणते की मला उगिच लोकांच्या कामात नांक खुपसायची सवय आहे म्हणुन.. पण काय करणार?? सवयीचे गुलाम!

 2. vishal says:

  तुमचा ब्लॉग अतिशय सुंदर आहे. रोज इतके लिहिणे म्हणजे खरेच खूप stamina लागत असेल. मी २-४ पोस्ट टाकल्या असतील फक्त माझ्या ब्लॉगवर (http://life-is-beautyfool.blogspot.com). आणि “ळ”, “ण” टाईप करताना होणारी मारामार.. बाप रे. तसे आता जमायला लागले आहे मराठी मध्ये टाईप करायला. सध्या तरी दुसऱ्यांचे ब्लॉग वाचून enjoy करतोय…

 3. bhaanasa says:

  कितीही ठळकपणे दुष्परीणाम छापले तरीही पिणारे पाहून न पाहिल्यासारखेच करतात ना, :(. तो सैफ अली व बोमन इराणीचा एक प्रसंग दाखवला होता ना-नो स्मोकींग तसे करायला हवे.:D. लेख मस्त.

 4. sahajach says:

  तुमचा लेख वाचतांनाच ’तारा पान सेंटर’चे नाव मनात आले होते आणि कमेंट्स मधे तुम्ही त्याचा उल्लेख केलेला आहेच….अमितनी औरंगाबादमधल्या आवर्जून दाखवलेल्या जागांपैकी ते एक ठिकाण आहे……
  बाकी नासिकला पान सेंटरवर जायची वेळ माझ्यावर येत नाही, मला स्वत:ला पान फारसे आवडत नाही…आणि आवडत ते घरी आजीने बनवून दिलेले…पण तुमचे वर्णन तंतोतंत.
  बाकी स्मोकिंगचे म्हणाल तर बऱ्याच जित्यांची खोड मेल्याशिवाय जात नाही……..रमत गमत आत्महत्या आवडते काही लोकांना….

 5. देवेंद्र चुरी says:

  आपल्या इथेही असेच फोटो दयायला हवेत हया प्रोडक्ट्स वर …..
  आणी हो भानस तुम्ही सांगितलेला उपाय मला एकदम बेस्ट वाटतो.(लगेच ते सैफ आणी बोमनच शेवटी एकत्र बसून टॉम एंड जेरी पाहत असल्याच दृश्य समोर आल.. :D)

 6. आल्हाद alias Alhad says:

  “औरंगाबाद म्हंटलं की तारा पानवाला आलाच ओघाने.”
  मी पान खायला तिथेच शिकलो.
  तिथलं मघई म्हणजे स्वर्ग!
  मुंबईत काहीच मजा नाही. 😦

  • भाग्यश्री, तन्वी, आल्हाद, योगेश

   काल दिवसभर कामात असल्यामुळे लॉग इन केलंच नाही. दिवसभर फक्त कॉमेंट्स सेल फोन वरुन अप्रुव्ह केल्यात.म्हणुन रिप्लाय देउ शकलो नाही.तुम्हा सगळ्यांचे प्रतिक्रियेबद्दल आभार.
   तन्वी.. तारा पानवाल्या दोन्ही भावांची दुकानं आता वेगवेगळी झालेली आहेत. दोघांचही नांव तारा पान सेंटरंच आहे. तिथलं मघई एकदम मस्त असतं.. आल्हाद शी या बाबतित एकदम सहमत!
   योगेश,
   तुम्ही दिलेल्या माहिती करिता धन्यवाद. मला माझेच लेख इ मेल ने मिळता फॉरवर्ड मधे. अर्थात त्यात माझं नांव नसतं.. 😦 . तो मराठीचे शत्रू तर मला तिन मित्रांनी फॉरवर्ड केला, एक चांगला लेख आहे म्हणुन.. मला हे कळत नाही, लोकं ब्लॉग ची लिंक का फॉरवर्ड करित नाहीत??
   हीअशी उचलेगिरी खुप झालेली आहे . माझ्या लेखाला मी स्वतः ऑन लाइन कॉपी राईट करुन ठेवलंय, पण त्याचा उपयोग कसा करायचा हेच माहिती नाही. शेवटी इंटरनेट वर अशा गोष्टी रोखणं शक्य नाही..

 7. Yogesh says:

  तुमच्या लेखांची चोरी होते आहे.मला आताच तुमच्या परवाच्या “पानवाला” या पोस्टची मेल आली आहे. ज्यात तुमच्या नावाचा साधा उल्लेख पण नाही.मी तुम्हाला ती मेल सेंड करू शकतो. प्रशांत पवार नावाच्या सद्व्यक्तीने ही चोरी केली आहे.त्याचा ID : prapawar_4u@yahoo.co.in. It is fwd on marathi aapan,dombivalionline and mrugjal yahoogroups.

 8. ravindra says:

  मी माझ्या बद्दल सांगतो मला इंजिनियरिंग ला असतांना, साधारण २७ -२८ वर्ष्यापुर्वी, एका मित्राने सिगरेट ओढायची जबरदस्ती सवय लावली. एक दोन करीत “अरे लेना कुछ नही होता”, असे करीतच ती “लत” कधी झाली समजलेच नाही. २२-२३ वर्ष्यापुर्वी लग्न झाल्यानंतर बायकोने सिगरेट सोडायचा तगादा लावला. तो अद्याप हि सुरु आहे. पण सिगारेट काही केल्या बंद होत नाही. रोज प्रयत्न व प्रण हि करतो. काही केल्या लत सुटत नाही. एक सांगतो तुम्ही पान खाणे सोडू शकता का? तसच सिगरेट च हि आहे मला मागच्या साधारण १० वर्षा पासून डॉक्टरने सांगितले आहे “सिगरेट बंद करा” म्हणून. पण येरे माझ्या मागल्या. मला काही फरक पडत नाही. काय कराव सुचतच नाही. तुम्ही काही मार्ग सांगितला तर बरे होईल. मी आभारी राहील. माफ कराव लिहिता लिहिता मी आपण वरून तुम्ही मध्ये कधी आलो ते समजलेच नाही.
  एक आवर्जून सांगतो पाकिटावर किती हि खतरनाक चित्र टाकल्याने काही होणार नाही, स्वतः ठरवल्याशिवाय सवय मोडत नसते हे मी आपल्या अनुभवावरून सांगू शकतो.
  कालच माझ्या ब्लोग वर मी धुम्रपान सोडा असा लेख लिहिला आहे. कृपया वाचवा http://mazyamana.wordpress.com/

  • सिगारेट सोडणे म्हणजे खरंच त्रास दायक आहे , आणि त्याची मला खरंच कल्पना आहे. फक्त चार दिवस जर तुम्ही सिगरेट न ओढता काढु शकलात तर सहज शक्य आहे. नंतर मात्र विथड्रॉवल सिम्प्टम्स मुळे पुन्हा सिगारेट ओढण्याची इच्छा होऊ शकते. म्हणुन तेंव्हा थोडा कंट्रोल आवश्यक असतो. शुभेच्छा!!

 9. ravindra says:

  मी बर्याच वेळा प्रयत्न केले पण फेल गेले. आण भाका घेतल्या त्या हि फेल गेल्या. सिगरेट ची टपरी दिसली कि पाय स्वतः हून तिकडे वळतात. मन त्यांना लांब खेचत. पण वाईट मन म्हणा किंवा सिगरेट म्हणा ती तिकडे ओढून नेतेच.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s