चोरलेला लेख…

आज एका     मित्राने योगेशने कॉमेंट टाकली, की माझ्या ब्लॉगवरचा पानवाला हा लेख त्यांना ईमेल फॉर्वर्ड मधे मिळाला. अर्थात तो ई मेल पाठवणाऱ्या प्रशांत पवार ह्यांनी, हा लेख  “काय वाटेल ते ” ब्लॉग वरुन घेतलाय असा उल्लेख किंवा हा लेख” महेंद्र कुलकर्णींचा” आहे असा उल्लेख करायला   विसरले असावेत.
.
य़ा पुर्वी पण एकदा मला माझ्याच ब्लॉगवरचा “मराठीचे शत्रु” हा लेख पण इ मेल ने फॉर्वर्ड मधे आला होता… त्या लेखाखाली पण माझा किंवा माझ्या ब्लॉगचा नामोल्लेख नव्हता.अशा तर्हेने एखद्याच्या ब्लॉगवरचे लिखाण हे फॉर्वर्ड करायचे आणि त्याखाली ऋणनिर्देश करायचा नाही.. ही एक पद्धत हल्ली कॉमन होऊ लागली आहे. फक्त एकाच गोष्टी मुळे बरं वाटलं.. त्या लेखाचा सबजेक्ट मधे एक चांगला लेख असं लिहिलेलं होतं… आणि तेवढं वाचुन मला बरं वाटलं..दुःखात सुख शोधायची सवयच आहे मला… 🙂
.
कॉपी स्केप च्या अंतर्गत माझ्या ब्लॉगवरचे सगळे लेख कॉपी राईट प्रोटेक्ट केलेले आहेत. वेळ पडल्यास हे सिध्द करणं की हा लेख माझाच आहे हे सहज शक्य आहे. पण असंही वाटतं की आपण काही प्रथितयश लेखक नाही, त्यामुळे जर कोणी एखादा लेख फॉर्वर्ड केला तर कशाला उगाच बोंबाबोंब करायची? म्हणून सोडून दिलं .
कांही दिवसांपुर्वी गुरु व्हिजन वर पण असाच एक लाकोडतोड्याच्या लेखा संदर्भात कॉमेंट आलेली होती,आणि यावरचं शिरिषचं उत्तर पण खूपच मार्मिक होतं. मला खूप आवडलं… ते असं होतं.. “हा पाणवठा आहे… पाणी प्यायला प्राणी नेहमीच रात्री येतात..इतर पांडवांचा तळ्याचे पाणी पिऊन मृत्यू आणि धर्मराजाला विचारलेले यक्षप्रश्न याची कथा आपणाला माहित असतीलच…त्या सर्वांचे हेच धर्म रक्षण कठरोहीच खरी धर्मजागृती!”
.
हा विषय खूपच सेन्सिटीव्ह आहे. त्यामुळे या विषयावर लिहायचं टाळत  होतो. लोकांना असे इतरांनी लिहिलेले लेख स्वतःच्या नावे पाठवावेसे कां वाटतात? आता एखादा लेख लिहिणं म्हणजे काही खूप’ ग्रेट ’ गोष्ट नाही. अगदी कोणीही अशा विषयावर लेक लिहु शकतो , मग असं असतांना का म्हणून लोकं असे दुसऱ्याचे लिखाण स्वतःच्या नावे प्रसिद्ध करतात?
.
एक गंमत म्हणून सांगतो, एकदा काय झालं की मी सिगारेटच्या जाहिराती ( जुन्या काळच्या) यावर एक लेख लिहिला होता. कर्म धर्म संयोगाने त्याच विषयावर आणि अगदी त्याच जाहिराती वापरुन एक लेख टाइम मॅगझिन मधे पण आला. त्यावर माझ्या एका मित्राने लगेच कॉमेंट टाकली की मी लेख कॉपी केलाय टाइम मॅगझिन वरुन . पण सुदैवाने  टाइमचा लेख माझ्या लेखाच्या नंतर तब्बल ५ दिवसांनी प्रसिद्ध झाला होता. मग मी पण त्या मित्राला ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. हा प्रसंग लिहिण्याचे कारण म्हणजे योगायोगाची पण शक्यता असते…
.
अर्थात जर असा योगायोग असला तर कमीत कमी जरी चित्र एकच असले तरी लिखित मॅटर पुर्ण वेगळे असते.पण इथे नेट फॉर्वर्ड मधे शब्द अन शब्द सारखा असतो.. अगदी चुका पण रिपिट केलेल्या असतात. इथे जेंव्हा मी एखादा लेख टाइप करुन पोस्ट करतो, तेंव्हा कमीत कमी तास दिड तासाची मेहेनत असते त्याच्या मागे..या मेहेनती साठी जर कोणी इतरांनी लिहिलेले लेख फॉर्वर्ड करित असेल तर कमीतकमी मुळ लेखकाचा किंवा ब्लॉगचा नामोल्लेख केल्यास ती त्या लेखकाच्या श्रमाला दिलेली पावती असेल..
.
इंजिनिअरिंगला असतांना सिव्हिल वाले मुलं, किंवा इव्हन मेक वाले मुलं पण जीटी मारायचे. आता जीटी ( ग्लास टॊपो) म्हणजे दोन साईडला पुस्तकांची चळत ठेवायची आणि त्यावर एक कांच ठेवायची. काचेच्या खाली रिकाम्या जागेत एक  बल्ब लावायचा. नंतर तुम्हाला जी ड्रॉइंग शिट कॉपी करायची आहे तिच्यावर एक नविन शिट लावायची आणि ती त्या काचेवर ठेवायची. खाली लावलेल्या बल्ब मुळे खालच्या शिटवर काढलेले ड्रॉइंग हे वर दिसते आणि पेन्सिलने कॉपी करता येते. सिव्हिल वाली मंडळी पर्स्पेक्टीव्ह काढायला आणि मेक वाले मशिन ड्रॉइंग साठी ही पद्धत वापरायचे.
.
या मधे पण नंतर सरांच्या लक्षात यायचंच की टॊपॊ मारलाय म्हणून.. ते ओळखायची पण एक पद्धत होती, जी शिट कॉपी केली आहे तिच्या खालच्या बाजुला पण पेन्सिल चे पिवळे  डाग उमटायचे.आमचे सर नेहेमी म्हणायचे आता टोपो मारुन तुम्ही टर्म वर्क पुर्ण करताय, पण पुढे आयुष्यात कोणाची कॉपी कराल? ड्रॉइंग मधे मी तर खुपच कच्चा होतो , त्यामुळे ज्युनिअर्स कडून शिट्स काढून घ्यायचो,ज्युनिअर्स पण स्वतः ड्रॉ न करता जी टी करुन कॉपी करायचे…. 🙂
जो मुलगा स्वतः मेहेनत करुन शिट काढायचा तो ती शिट जीटी मारण्यासाठी देण्यास खूप कां-कुं करायचा. त्याला खूप जिवावर यायचं शिट कॉपी करायला द्यायचं.. तॊ असं कां करायचा .. किंवा ड्रॉइंग शिट कॉपी करायला देणं कां टाळायचा.. ते आत्ता आपल्या लेखाची कॉपी झाल्यावर समजले….   🙂 !
पण एखादी लहानशी गोष्ट लक्षात यायला आयुष्यातली २०-२५ वर्ष जावी लागतात??????…….. खरंच.. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायचा तर मार्कंडेयऋषीचं आयुष्य पण पुरणार नाही.त्या प्रशांत पवार  यांचे माझ्या ब्लॉग वरचे लिखाण माझे नांव न लिहिता स्वतःच्या नावानेच फॉर्वर्ड केल्यामुळेच  ही अनुभूती झाली, म्हणूनच मला प्रशांत पवार यांचे मनापासून आभार मानावेसे वाटतात… धन्यवाद..
.
पण त्याच बरोबर, या पुढे या ब्लॉगवरचे लेख पोस्ट करतांना जर माझ्या ब्लॉगची लिंक दिली  तर जास्त बरं होईल.पानवाला लेख तर फॉर्वर्ड केला पण त्यातले फोटो ग्राफ्स मात्र दिलेले नाहीत.लेखाचा इम्पॅक्ट जो आहे तो त्या फोटॊ मुळेच आहे, त्यामुळे जर ब्लॉगची लिंक दिली असती तर जास्त संयुक्तिक ठरले असते.
आजही औरंगाबादलाच आहे. कालचा पुर्ण दिवस कामातंच गेला. खरं तर प्रत्येक कॉमेंटला रिप्लाय करण्याची माझी पध्दत आहे , पण जेंव्हा टुरवर असतो तेंव्हा मात्र केवळ सेल फोन वरुन कॉमेंट्स ऍप्रुव्ह करणं एवढंच करतो मी.
आज एका जागरुक वाचक मित्राने योगेशने कॉमेंट टाकली, की माझ्या ब्लॉगवरचा पानवाला हा लेख त्यांना ईमेल फॉर्वर्ड मधे मिळाला. अर्थात तो ई मेल पाठवणाऱ्या प्रशांत पाटील हे , हा लेख  काय वाटेल ते ब्लॉग वरुन घेतलाय असा उल्लेख किंवा हा लेख महेंद्र कुलकर्णींचा आहे असा उल्लेख करायला सोयिस्कर रित्या विसरले असावेत.
मला माझ्याच ब्लॉगवरचा मराठीचे शत्रु हा लेख पण इ मेल ने फॉर्वर्ड मधे आला होता… त्या लेखाखाली पण माझा किंवा माझ्या ब्लॉगचा नामोल्लेख नव्हता.अशा तर्हेने एखद्याच्या ब्लॉगवरचे लिखाण हे फॉर्वर्ड करायचे आणि त्याखाली ऋणनिर्देश करायचा नाही.. ही एक पध्दत हल्ली कॉमन होऊ लागली आहे. फक्त एकाच गोष्टी मुळे बरं वाटलं.. त्या लेखाचा सबजेक्ट मधे एक चांगला लेख असं लिहिलेलं होतं… आणि तेवढं वाचुन मला बरं वाटलं..
कॉपी स्केप च्या अंतर्गत माझ्या ब्लॉगवरचे सगळे लेख कॉपी राईट प्रोटेक्ट केलेले आहेत. वेळ पडल्यास हे सिध्द करणं की हा लेख माझाच आहे हे सहज शक्य आहे. पण असंही वाटतं की आपण काही प्रतिथयश लेखक नाही, त्यामुळे जर कोणी एखादा लेख फॉर्वर्ड केला तर कशाला उगिच बोंबाबोंब करायची? म्हणुन सोडून दिलं जातं.
हा विषय खुपच सेन्सिटीव्ह आहे. त्यामुळे या विषयावर लिहायचं टाळतंच होतो. लोकांना असे इतरांनी लिहिलेले लेख स्वतःच्या नावे पाठवावेसे कां वाटतात? आता एखादा लेख लिहिणं म्हणजे काही खुप’ ग्रेट ’ गोष्ट नाही. अगदी कोणीही अशा विषयावर लेक लिहु शकतो , मग असं असतांना कां म्हणुन लोकं असे दुसऱ्यांचे लिखाण स्वतःच्या नावे प्रसिध्द करतात?
एक गंमत म्हणुन सांगतो, एकदा काय झालं की मी सिगारेटच्या जाहिराती ( जुन्या काळच्या) यावर एक लेख लिहिला होता. कर्म धर्म संयोगाने त्याच विषयावर आणि अगदी त्याच जाहिराती वापरुन एक लेख टाइम मॅगझिन मधे पण आला. त्यावर माझ्या एका मित्राने लगेच कॉमेंट टाकली की मी लेख कॉपी केलाय टाइम मॅगझिन वरुन . पण लकिली टाइमचा लेख माझ्या लेखाच्या नंतर तब्बल ५ दिवसांनी प्रसिध्द झाला होता. मग मी पण त्या मित्राला ही गोष्ट निदर्शनास आणुन दिली. हा प्रसंग लिहिण्याचे कारण म्हणजे योगायोगाची पण शक्यता असते…
अर्थात जर असा योगायोग असला तर कमित कमी जरी चित्र एकच असले तरी लिखित मॅटर पुर्ण वेगळे असते.पण इथे नेट फॉर्वर्ड मधे शब्द अन शब्द सारखा असतो.. अगदी चुका पण रिपिट केलेल्या असतात. इथे जेंव्हा मी एखादा लेख टाइप करुन पोस्ट करतो, तेंव्हा कमित कमी तास दिडतासाची मेहेनत असते त्याच्या मागे..या मेहेनतीसाठी जर कोणी इतरांनी लिहिलेले लेख फॉर्वर्ड करित असेल तर कमित कमी मुळ लेखकाचा किंवा ब्लॉगचा नामोल्लेख केल्यास ती त्या लेखकाच्या श्रमाला दिलेली पावती असेल..
इंजिनिअरिंगला असतांना सिव्हिल वाले मुलं, किंवा इव्हन मेक वाले मुलं पण जीटी मारायचे. आता जीटी ( ग्लास टॊपो) म्हणजे दोन साईडला पुस्तकांची चळत ठेवायची आणि त्यावर एक कांच ठेवायची. काचेच्या खाली रिकाम्या जागेत एक  बल्ब लावायचा. नंतर तुम्हाला जी ड्रॉइंग शिट कॉपी करायची आहे तिच्यावर एक नविन शिट लावायची आणि ती त्या काचेवर ठेवायची. खाली लावलेल्या बल्ब मुळे खालच्या शिटवर काढलेले ड्रॉइंग हे वर दिसते आणि पेन्सिलने कॉपी करता येते. सिव्हिल वाली मंडळी पर्स्पेक्टीव्ह काढायला आणि मेक वाले मशिन ड्रॉइंग साठी ही पध्दत वापरायचे. या मधे पण नंतर सरांच्या लक्षात यायचंच की टॊपॊ मारलाय म्हणुन.. ते ओळखायची पण एक पध्द्त होती, जी शिट कॉपी केली आहे तिच्या खालच्या बाजुला पण पेन्सिलचे डाग उमटयचे.आमचे सर नेहेमी म्हणायचे आता टोपो मारुन तुम्ही टर्म वर्क पुर्ण करताय, पण पुढे आयुष्यात कोणाची कॉपी कराल? ड्रॉइंग मधे मी तर खुपच कच्चा होतो , त्यामुळे जुनिअर्स कडुन शिट्स काढुन घ्यायचो… 🙂
जो मुलगा स्वतः मेहेनत करुन शिट काढायचा तो ती शिट जीटी मारण्यासाठी देण्यास खुप कां-कुं करायचा. त्याला खुप जिवावर यायचं शिट कॉपी करायला द्यायचं.. तॊ असं कां करायचा .. किंवा ड्रॉइंग शिट कॉपी करायला देणं कां टाळायचा.. ते आत्ता आपल्या लेखाची कॉपी झाल्यावर समजले….   :)नशिबाने पुढे आयुष्यभर ड्रॉइंग्ज वाचायचंच काम पडलं , काढायचं नाही….. !!

पण एखादी लहानशी गोष्ट लक्षात यायला आयुष्यातली २०-२५ वर्ष जावी लागतात…….. खरंच.. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायचा तर मार्कंडेय ऋषीचं आयुष्य पण पुरणार नाही.त्या प्रशांत पाटिल यांचे माझ्या ब्लॉग वरचे लिखाण

माझे नांव न लिहिता स्वतःच्या नावानेच फॉर्वर्ड केल्यामुळेच  ही अनुभुती झाली, म्हणुनच मला प्रशांत पाटील यांचे मनापासुन आभार मानावेसे वाटतात..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , . Bookmark the permalink.

30 Responses to चोरलेला लेख…

 1. Anand says:

  विचार करून (मराठीत??) (सगळ्यात जास्त ह्याला वेळ लागतो ), मग कंप्यूटर वर टाइप करून (मराठी मध्ये), लेख पब्लिश करने सोपे आहे का ? कॉपी/पेस्ट खुपच सोप्पे असते.
  रिकॉर्ड बुक कॉपी देताना मला देखिल जिवावर येत असे. असो, तुमच्या लेखांची महती अशी पटते. सोप्पी भाषा पण कागदावर(?) मनातले उतरवने वाटते तितके सोपे नाही….

  • आनंद
   धन्यवाद.. पण आता मात्र खरंच जाणिव होते, की एखाद्याची ड्रॉइंग कॉपी केल्यावर त्याला कसं वाटत असेल ते.. असो… असाही अनुभव आवश्यक आहेच..आपली चुक समजायला. मला हा अनुभव घ्यायला २५ च्या वर वर्षं लागलित.. 😦 ती कॉमेंट वाचली, आणि मला जुने दिवस आठवलेत..

 2. महेंद्रजी,
  आज दुपारी योगेशने ट्विटरवर हे अपडेट टाकलं होतं.. त्याला मी रीप्लाय दिला अगदी टोमणा मारुन! … हां, आता असे मेल मलाही काही वेळा आले होते.. मी त्यांना त्या पोस्टची लिंक पाठवली [रिप्लाय ऑल!] आणि हे ही सांगितलं की तो ब्लॉग माझाच आहे, आपल्या आदर सत्काराबद्दल शतशः आभार!

  लेख हा आवडला म्हणुन काय तसाच ढापावा,
  नाव आपुले लाऊनी काय सर्वांना पाठवावा?
  अरे कान्हा.. अरे कॄष्णा…. मनरंजन मोहना!

 3. ravindra says:

  मी सांगतो मला आयुष्यात कौपी कायला आवडलेलं नाही. येत असेल नसेल तरी चालेल पण दुसर्याची कोपी करायची नाही हे मी शाळे पासून गाठ बांधून ठेवलेली होती. आपण जी टी चा उल्लेख केल्यावर इंजीनीयरिंग कालेज चे २५ वर्ष्यापुर्वीचे दिवस आठवले. इंगीनीरिंग ला असतांना हि drawing स्वतः च काढायचो. इतरांनी माझ्या drawing वरून जी टी केली तरी चालेल पण मी करीत नसायचो. माझ्या कन्येला हि मी असीच शिकवण दिली आहे. परीक्षेत कमी गुण मिळाले तरी हरकत नाही पण जे करणार ते स्वतःच्याच मेहनतीने त्यात आनंद औरच असतो. असो.
  आपण कोपी स्केच अंतर्गत ब्लोगवरचे लेख कोपी राईट प्रोटेक्ट केले आहेत असा उल्लेख केला आहे. कृपया मला या बद्दल माहित नसल्याने काही सांगणार का. मी तसा ब्लोग च्या विश्वात नवखाच आहे. दिली तर बरे होईल. मी माझ्या बऱ्याच कविता सुद्धा ब्लोग वर टाकतो. म्हणून मार्गदर्शन कराव अशी विनंती आहे राव.

  my blog address http://mazyamana.wordpress.com/ , http://manachyakavita.wordpress.com/

 4. bhaanasa says:

  माझ्याही काही पाककृतींची अशीच झालेली उचलेगिरी( चक्क स्वत:च्या ब्लॊगवर टाकल्यात की रे, कमीतकमी नाव तरी टाका…पण छे.)अशीच ओळखीच्यांनी निदर्शनास आणून दिली तेव्हापासून ब्लॊगचे नाव टाकण्याची दक्षता घेऊ लागले. लेखावर कुठे कुठे नांव टाकणार? ह्म्म्म, बरे झाले तू या विषयाला तोंड फोडलेस.

  • भाग्यश्री
   रविंदंना दिलेली कॉमेंट वाच. आणि कॉपी स्केप वर रजिस्टर कर.. म्हणजे कमित कमी मालकी हक्क तरी रहातो आपल्या कडे.

 5. ravindra says:

  मी आपला लेख वाचला आणि मला २८-२९ वर्ष्या पूर्वीचे इंजिनियरिंग चे दिवस आठवले. जी टी शब्द आठवला. मी लहन पण पासून गाठ बांधलेली आहे कोपी न करायची. कौलेज ला असतांना सुधा मी स्वतः द्रविंग काढायचो. मी मुलीला लहान पनापासूनच सवय लावली आहे. स्वतः केल्यानेच शिकायला मिळत.
  आपल्या लेखात एक उल्लेख आढळला कोपी स्केच अंतर्गत कोपी राईट प्रोटेक्ट चा. मला या बद्दल काहीच माहित नाही. काही मार्गदर्शन केले तर आभारी राहीन. मी माझ्या ब्लोग वर माझ्या कविता टाकत असतो म्हणून विचारतो.
  http://mazyamana.wordpress.com/
  http://manachyakavita.wordpress.com/

  • तुम्ही या साईटला जाउन कॉपी स्केप साठी रजिस्टर करा. एकदा रजिस्टर केलं की या कॉपी स्केप कडुन आपल्याला प्रत्येक लेखाची/कवितेची डिजिटल सिग्नेचर इमेल द्वारा मिळते. तीआपण सांभाळून ठेवायची.. बस्स! त्या सिग्नेचर वरुन आपणच तो लेख लिहिलाय हे सिध्द होतं.
   कॉपी स्केप चं बॅनर पण आपल्या साईटवर लाउ शकता, म्हणजे इतरांना पण कळेल की तुमचा ब्लॉग राइट प्रोटेक्टेड आहे म्हणुन.
   http://www.copyscape.com/signup.php?pro=0&o=f

 6. Catch says:

  कॉपी पेस्ट प्रोटेक्ट करण्या साठी. राईट क्लिक डिसेबल करण्या साठी. हा कोड वापरा.
  Template मधून Edit HTML मध्ये जा नंतर शोधा व खालील कोड ने रिप्लेस करा.

  • वर्ड प्रेसला टेम्प्लेट मॉडीफाय करण्याची फॅसिलिटी दिलेली नाही. टेम्प्लेट मधल्या बदलासाठी पैसे द्यावे लागतात.माझा ब्लॉग अजुन तरी फ्री होस्टींगवरंच आहे.

  • @Catch
   राइट क्लिक डिसएबल करुन तुम्ही कॉपी – पेस्ट थांबऊ शकत नाही! कारण:
   १. सोअर्स कोड मध्ये तुमचे लिखाण दिसतेच व तिथुन आरामात कॉपी करता येतं
   २. प्रिंटा स्र्कीन बटन मुळे स्क्रीन कॅप्चरकरुन लेखाऐवजी – इमेज म्हणुनही हे लेख पाठऊ शकतात.

   मुळात – लिखाणाबद्दल – लेखकाबदद्दल आदर आणि चोरीबद्दल तीव्र अनादर असणे, हाच यावरती पर्याय होऊ शकतो!

 7. Aparna says:

  याच्या पुढे जाउन आपण ज्या सीडि कॉपी करतो किंवा पुस्तकांच्या pdf वाचतो त्यांच्याबद्दल पण असंच म्हणता येईल का की आपण त्या सर्व विकत घ्यायला हव्या कारण कलाकाराने त्या खरं विकण्यासाठी बनवल्या असतात?? हा खरं तर खूप गहन प्रश्न आहे सध्याच्या मायाजालातल्या युगातल्या आणि आपल्यावर बेतलं की आपल्याला कळतं नाही???

  • खरंय तुमचं म्हणणं.. अगदी कटू असलं तरिही शाश्वत सत्य हे नेहेमीच सत्य रहाणार. म्हणुनच मी अजिबात आक्षेप घेतलेला नाही, फक्त विनंती करणं आपल्या हातात असतं.. 🙂 दुसरं म्हणजे आपण जरी कॉपीस्केप अंतर्गत कॉपी प्रोटेक्ट केले तरिही ,त्यावर आपण काहिच ऍक्शन घेणार नाही….म्हणजे काही विशेष फायदा नाही.. हल्ली महाराष्ट्रात सिडी कॉपी करणं कायद्याने खुप मोठा गुन्हा आहे. सिडी कॉपी केलेलीविकत घेणं हा पण एक मोठा गुन्हा आहे. भारतात सगळिकडेच अक्रोबॅट रायटर हे विकत घेतलेले नसते. फोटॊ शॉप ( माझ्या कडे नाही) पण ज्या कुणाकडे आहे त्यांनीच सांगावं ते कसं आहे ते..
   यावर पुर्वी एक लेख लिहिला होता.. इथे आहे तो..

   • भारतामध्ये छोट्या आय. टी. कंपन्यामध्ये मध्ये वापरले जाणारे जवळ-जवळ सारेच सॉप्टवेअर हे क्रॅक्ड् असतात, म्हणजे ट्रायल डाऊनलोड करायचे आणि मग त्याचा सिरियल नंबर नेट वर शोधुन वा कोणाकडुन तरी हस्तगत करुनते सॉप्टवेसर क्रॅक करायचे.. म्हणजे फुल वर्जन वापरायला तयार! मात्र बाहेर च्या कंपन्या – यु.के., यु.एस. उदा. याबाबतीत फारच कडक नियम करतात. आमच्याकडे तर – सॉप्टवेअरचे ऑडिट होते.. म्हणजे तुमच्या मशिनवर असणारे सारे सॉप्टवेअर्स लिगल आणि तुमच्या नावे रजिस्टर्ड असतात – हे दाखवावे लागते. फोटोशॉप मी ऑफिसमध्ये वापरतो – लिगल वर्जन!

    मात्र घरी बरीच सॉप्टवेअर्स ही ओपन सोअर्स आहेत.. जसं मायक्रोसॉप्ट ऑफिस साठी ओपन ऑफिस [हां, यामध्ये आपण पी.डी.एफ. फाइल ही बनवु शकता!], फोटोशॉप साठी गिंम्प , कोडिंगसाठी नोटपॅड++, गाणी ऐकण्यासाठी वी.एल.सी. मेडिया प्लेअर

    • दिपक
     आमच्या पण ऑफिस मधे सॉफ्ट्वेअरचं ऑडिट असतंच , त्यामुळे सगळे लिगलाइझ्ड सॉफ्ट्वेअर्स आहेत. हा प्रश्न येतो तो केवळ घरच्या पिसीच्या बाबतित. ५० टक्के कॉस्ट सॉफ्टवेअरचीच होते.. 😦
     तुम्ही दिलेले ऑप्शन्स अगदी बरोबर आहेत. पण या ऑफिस साठी पण वर्किंग प्लॅटफॉर्म हा विंडोज आहे. म्हणजे विंडॊज विकत घेणं आलंच. लिनक्स ट्राय करायचंय मला..

     • लिनक्स मध्ये “युबन्टु” ट्राय करा… मस्त जी.यु.आय. आहे! त्यांच्या साइटवरुन डाऊनलोड करा किंवा सी.डी. मागवा

      याची “लाईव्ह सी.डी.” सुद्धा येते.. म्हणजे – फक्त सी.डी. वरुन तुम्ही ती ओ.एस. वापरु शकता.. भन्नाट आहे!

      मी सध्या बॅक-अप घेतोय… दिपवाळीच्या सुट्टीत युबन्टु इन्स्टाल करणार!

      • युबन्टू आधी बुटेबल सिडी वरुन ट्राय करतो . घरचा लॅपटॉप मुली वापरतात, त्यांची कम्फर्ट लेव्हल पण चेक करावी लागेल. एकदा जमलं, की मग सरळ लोड करतो युबंटू!

 8. sahajach says:

  तुम्हाला लिहायला सुरुवात करून ७/८ महीने झालेत…….जवळपास ५५,००० पेक्षा जास्त ब्लॉग हिट्स आहेत…आणि तुम्ही स्वत:च्या मनाला पटणाऱ्या विषयांवर बिंधास्त खरे मत मांडत आहात…..काही अनामिक मत्सराने किंवा ईतर काही कारणाने काही कमेंट्स टाकणे म्हणा वा कोणी हे असे उचलेगिरी करणे म्हणा…घडणारच…हे तुमच्या प्रगतीचे लक्षण आहे.लोक जेव्हा स्वत:चा वेळ स्वत: काही constructive करण्यात घालवण्यापेक्षा आपल्याविषयी विचार करण्यात किंवा आपल्याला कॉपी घालवण्यात करतात तेव्हा त्यांची दया येते.तुम्ही लिहित रहा….आणि नवे मुद्दे मांडत रहा.
  बाकी ग्राफिक्सच्या शीट्स बद्दल…माझे स्वत:चे शीट्स व्यवस्थीत असत पण माझी एक मैत्रीणीला ते जाम जमत नसत…..त्यामुळे बहूतेक सगळे शीट्स मी दोनदा बनवत असे…..ईतर मुली जीटी मारत पण मला ते आवडायचे त्यामुळे मी ते दोनदा काढायचे…..आठवणी ताज्या झाल्या…..

  • तन्वी
   माझा काहिही आक्षेप नाही. जरी कोणी इथुन उचलुन इतर ठिकाणी जरी पोस्ट केलं तरिही काहिही फरक पडत नाही. मी इथे जे लिहितो ते स्वान्त सुखाय!! मला जे वाटेल ते आणि पटेल ते….!!
   अजुन तरी लिहायचा कंटाळा येत नाही, तो पर्यंत लिहिणं सुरु ठेवणार.. नंतर पुढे बघु .. 🙂

 9. archana says:

  एव्हडे काही मनावर घ्यायचे कारण नाही. मुळात कुठलेही लिखाण स्वतःला व्यक्त करण्यासाठी केलेले असते. त्यामुळी श्रेय मिळाले काय आणि नाही मिळाले काय.. काय फरक पडतो. मधे एका प्रसिध्द french लेखकाच किस्सा ऐकला,”ह्या महाशयानी parisचे सुन्दर वर्णन त्यान्च्या पुस्तकात केले होते. तेच वर्णन बर्‍याच tourist guide मधे छापुन यायला लागले.त्यावर त्यान्ची प्रतिक्रिया अशी … सगळीकडे छापुन येतेय म्हणजे बरे लिहिले आहे मी”
  तुमच्या लिखाणातला सच्चेपणा लोकाना भावत असेल म्हणुन पाठवत असतील fwds. त्यामुळे श्रेय मिळाले नाही म्हणुन तक्रार करण्याचे कारण नाही. अर्थात तुमचे मत वेगळे असेल तर त्याचाही आदरच करते मी.

  • अर्चना
   मी मनावर घेतलेलं नाही. आणि माझी काही तक्रारही नाही. कारण इंटरनेटवर असं चालणारंच.केवळ या संदर्भात जुन्या गोष्टी आठवल्या आणि म्हणून लेख लिहिला.
   आणि श्रेय वगैरे काय .. तरिही मानवी स्वभाव आहे , थोडा चंचल रहाणारंच.. तुम्ही दिलेलं उदाहरण खुपच सुंदर आहे. छान वाटलं वाचतांना.

 10. ngadre says:

  कॉपी करतात ना? म्हणजे तुम्ही खूप लोकप्रिय आहात..
  तुमचं नाव मात्र लिहायलाच पाहिजे republish करताना..

  आम्हाला कोणाला असा फॉरवर्ड आला तर आम्ही नक्कीच ओळखू की हे तर आपले महेन्द्रजी…लिखाणवरही तुमची अदृश्य सिग्नेचर असते.. ती कोण बदलू शकणार ?

 11. नचिकेत
  धन्यवाद. इनहरंट सिग्नेचर लिखाणावर असतेच.. ते अगदी न सांगता पण समजत.आणि कसली लोकप्रियता.. आपलं अगदी जे मनात येइल ते लिहितो इथे!..नांव लिहिलं तर बरं वाटेल.. नाहि तरिही हरकत नाही.. इतका काही मोठा लेखक नाही मी.. चलता है… !!!

 12. Yogesh says:

  महेंद्र्जी,
  मोठ्या लेखकापेक्षा, मनाला भावणारी साधी सोपी भाषा असेल तरच मजा येते अन् मला वाटत तुमचा लिखाण अगदी असाच आहे. तुमचे लेख हे खूप प्रामाणिक अन् मनापासूनचे वाट्तात. त्यात कुठेही कृत्रिमता वाट्त नाही. विनाकारण मराठीचे जड जड शब्द वापरले म्हणजे मोठा लेखक अस काही नाही.I think so. . .

  त्यात तुम्ही इंजिनीअर म्हणून थोडा जास्त अभिमान. . . आम्ही तर तुमचे पंखे आहोत (fan) . . .त्यामुळे काल जेव्हा ती मेल आली तेव्हा तो माणूस त्यापेक्षा त्याची प्रवृत्ती डोक्यात गेली. अरे ज्याचा लेख चोरलाय त्यांचा
  उल्लेखा तरी करा. . . Jaane do keep writing. . .

  Parat jar koni saapadlaa na chori kartana tyaalaa agdee assal gaavaraan reply karto. . .kay karta ashya Upatsubhana dusaree bhaasha kalat nahi ho!!!

  • योगेश
   प्रतिक्रियेकरता आभार.. आधी थोडा राग आला होता, नंतर त्याचं रुपांतर वैफल्यात होण्याआगोदरच मी हा लेख लिहिला.. म्हंटलं मनातलं खरं काय ते लिहुन टाकलं की हलकं वाटतं. मला तर ब्लॉग चा हा एकच उपयोग लक्षात आलाय.

 13. कोई आपका दिल न चोरी कर सकेगा अगर आप उसका दरवाजा खुलाही रखें… चोरी हमेशा बंद दरवाजे पें (या गलतीसे) होती है…

  इस दर्द की एकही दवा है… खुदके मन को इतना बुलंद (उँचा) कर भाई की कोई उसको छूभी न सके तो ठेस कैसे पहुचेगी आपको?

 14. असाच त्रस्त अनुभव मलाही आला आहे. म्हणून तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घेतलं. आपलं लेखन दुसरीकडे प्रसिद्ध होताना आपल्याला श्रेय दिलं जात नाही, हे मी समजू शकते पण ते लेखन स्वत:च्या नावावर खपवायचं म्हणजे जरा अतिच होतं.

  • पण या गोष्टीला कांहिच उपाय नाही. जरी तुम्ही ऑन लाइन कॉपीराईट्स घेतले तरी पण केस करायला वेळ कुणाकडे आहे?? शेवटी लिखाण हा आपला पास-टाइम असतो. आपली इतर कामं जास्त महत्वाची असतात, आणि हे सगळ्यांना माहिती असल्यामुळे च त्यांचं फावतं.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s