तिचा ब्लॉग..

मुलांना सुंदर आणि बिनडोक मुली जास्त आवडतात !! आता हे कसलं स्टेटमेंट ?? माझं नाही हे स्टेटमेंट! असंच वाचलंय कुठेतरी… समस्त स्त्री वर्गाची  माझ्यावर वैतागण्यापुर्वीच मी तुमची माफी मागतोय- जरी हे स्टेटमेंट माझ नसलं तरिही….
ह्याचा अर्थ हा नाही की जर तुम्ही सुंदर असाल आणि मुलांच्या मधे पण लोकप्रिय असाल तर बिनडोक आहात.. किंवा  असाही नाही की  तुम्ही मुलांच्या मधे पॉप्युलर नाही म्हणजे दिसायला सो सो आणि फार हुशार आहात…….
सुन्दर आणि  हुशार पण असाल तर मुली  मुलांना आवडणार नाही,असही नाही… !कुठेतरी वाचल्याचं आठवतं… नक्कीच मिल्स ऍंड बुन्स मधे असावं.. नक्की आठवत नाही, तुम्ही म्हणाल, काय माणुस आहे , अगदी एम ऍंड बी वाचतो आणि ते पण ओपनली कबुल पण करतो.. पण मी खरंच एंजॉय करायचॊ एम ऍंड बी.. अगदी लपुन छपुन पुस्तकं वाचायचो.. लग्नाच्या पुर्वी… म्हणजेच .. कोणे एके काळी…….  🙂
द ओनली वे टु विन हिम  इज ऍक्ट डंब- असा सल्ला एका पुस्तकात त्या पुस्तकाच्या नायिकेला त्या टीडीएच मुलाची आई देते…   तर ब्लॉंड्स ऍंड ब्युटीफुल हे कॉम्बो फार लोकप्रिय आहे.असाही समज/गैरसमज आहे की ब्लॉंड्स या बिनडोक असतात… ( बिनडॊक हा खास नागपुरी शब्द आहे.. याचा समानार्थी शब्द आहे निर्बुध्द!! अर्थात हा सगळा जोक्सचा भाग आहे .
आपल्या कडे जसे सरदारजीचे जोक्स असतात, ( जरी आपले पंतप्रधान हार्वर्ड चे ग्रॅजुएट असले तरिही) तसेच माझे अमेरिकेतिल मित्र ब्लॉंड्स चे जोक्स इमेल ने पाठवतात. ..असो…हे जे काही इथे लिहिलंय ते पुरुषी दृष्टीकोनातुन.. नथिंग पर्सनल अबाउट इट..
मी  रहातो एका हारम मधे, घरात माझ्या व्यतिरिक्त सगळ्या स्त्रियाच आहेत,( बायको+मुली) त्यामुळे जर कोणी हे वाचले तर मात्र नुसती बोंब आहे, अर्थात घरी मी जे काही लिहितो ते कधिच वाचत नाहित म्हणुन तर इतक्या बिनधास्त पणे लिहितोय नां. अहो नाही तर  .. घरी जेवायला पण मिळणार नाही, हे असं काही लिहिलं म्हणुन..
आज मला काय झालंय असं वाटतं कां? हे काय लिहितोय मी.. खरंच सांगतो मलाही कळत नाही की मी काय लिहितोय ते.. कारण हा लेख सुरु केला तेंव्हा बॅक ऑफ द माइंड एक सौंदर्यवती होती. तिच्या बद्दल बातमी वाचली की तिला एक रेअर बोन मॅरो शी रिलेटेड कॅन्सर झालाय म्हणुन… तेंव्हाच ठरवलं की तिच्या बद्दल लिहायचं..
तुम्ही आजचा पेपर वाचला असेलच.. लिसा रे या सौंदर्यवती ला झालेल्या कॅन्सर बद्दल पण सगळं वाचलं असेलंच . .मी इथे तिला झालेल्या कॅन्सरची माहिती देणार नाही- आजचा कुठलाही पेपर उघडा .. दिसेल तिसऱ्या पानावर!!
एके ठिकाणी वाचलं की लिसा रे ला न दुरुस्त होणारा कॅन्सर झालाय आणि तिने तिच्या ब्लॉग वर या बद्दल  लिहिलंय !  सर्च केला आणि तिची साईट आणि ब्लॉग शोधुन काढला. ती अतिशय ब्रेव्ह ,सुंदर आणि बुद्धिमान आहे हे तिचा ब्लॉग वाचल्यावर लक्षात आलं.
लिसाचे स्वतःवरचे  कॅन्सर झाल्या बद्दलचे पोस्ट वाचले . इतक्या तटस्थ पणे कोणी स्वतःबद्दल लिहुच कसं शकतं??  तिच्या धैर्याची कमाल वाटते. सौंदर्य आणि बुध्दिमत्ता दोन्ही असलेली एक तरुणी म्हणजे लिसा रे, हे तिचा ब्लॉग वाचल्यावर जाणवते. इतका मोठा जीवघेणा रोग झाला तरी पण तिचा ब्लॉग म्हणजे एक बॅलन्स्ड पोस्ट असलेला आहे.कुठेही तिने स्वतःबद्दल कणव यावी असे लिहिलेले नाही. जे कांही आहे ते.. प्राक्तनात आहे .. असा सुर वाटला त्या पोस्टचा.
तिला झालेल्या रोगाबद्दल इतक्या साधी सर्दी ताप आणि फ्लु झाल्याप्रमाणे सरळ आणि सहजपणे लिहिलंय . तिचे पोस्ट वाचतांना तिच्या धैर्याबद्दल खरंच आदर वाटला.. सुर्य प्रकाशाइतकं  स्पष्ट   असतांना, की हा रोग बरा होऊ शकत नाही, लिसाचा मानसिक तोल कुठेही ढासळलेला दिसत नाही. तिने लिइलय, तिच्च्या  मधे पुर्ण आत्मविश्वास आहे की ती बरी होणार म्हणुन!
एकच प्रार्थना कराविशी वाटते.. गेट वेल सुन..

मुलांना सुंदर आणि बिनडोक मुली जास्त आवडतात !! आता हे कसलं स्टेटमेंट ?? माझं नाही हे स्टेटमेंट! असंच वाचलंय कुठेतरी… समस्त स्त्री वर्गाची  माझ्यावर वैतागण्यापुर्वीच   माफी मागतोय- जरी हे स्टेटमेंट माझ नसलं तरिही.इथे कोणाचाही अपमान करण्याचा हेतु नाही. कृपया विनोदाच्या अंगाने घ्या या पोस्टची सुरुवात.

ह्याचा अर्थ हा नाही की जर तुम्ही सुंदर असाल आणि मुलांच्या मधे पण लोकप्रिय असाल तर बिनडोक आहात.. किंवा  असाही नाही की  तुम्ही मुलांच्या मधे पॉप्युलर नाही म्हणजे दिसायला सो सो आणि फार हुशार आहात!

सुन्दर आणि  हुशार पण असाल तर मुली  मुलांना आवडणार नाही,असही नाही!!  छे!!  छे!! किती कन्फ्युज करतोय ना मी?  मी स्वतः पण कन्फ्युज झालोय माझ्या स्वतःच्या या लिखाणाबद्दल.

!कुठेतरी वाचल्याचं आठवतं… नक्कीच मिल्स ऍंड बुन्स मधे असावं.. नक्की आठवत नाही- तुम्ही म्हणाल, काय माणुस आहे , अगदी एम ऍंड बी पण वाचतो आणि ते पण ओपनली कबुल पण करतो.. पण मी खरंच एंजॉय करायचॊ एम ऍंड बी.. अगदी लपुन छपुन पुस्तकं वाचायचो.. लग्नाच्या पुर्वी… म्हणजेच .. कोणे एके काळी…….  🙂

“द ओनली वे टु विन हिम  इज ऍक्ट डंब”- असा सल्ला एका पुस्तकात त्या पुस्तकाच्या नायिकेला त्या टीडीएच मुलाची आई देते…   तर ब्लॉंड्स ऍंड ब्युटीफुल हे कॉम्बो फार लोकप्रिय आहे.असाही समज/गैरसमज आहे की ब्लॉंड्स या बिनडोक असतात… बिनडॊक हा खास नागपुरी शब्द आहे, याचा समानार्थी शब्द आहे निर्बुध्द!! अर्थात हा सगळा विनोदाचा एक  भाग आहे .

आपल्या कडे जसे सरदारजीचे जोक्स असतात, ( जरी आपले पंतप्रधान हार्वर्ड चे ग्रॅजुएट असले तरिही) तसेच माझे अमेरिकेतिल मित्र ब्लॉंड्स चे जोक्स इमेल ने पाठवतात. ..असो. .

मी  रहातो एका हारम मधे, घरात माझ्या व्यतिरिक्त सगळ्या स्त्रियाच आहेत,( बायको+मुली) त्यामुळे घरी जर कोणी हे वाचले तर मात्र नुसती बोंब आहे, अर्थात घरी मी जे काही लिहितो ते कधिच वाचत नाहित म्हणुन तर इतक्या बिनधास्त पणे लिहितोय नां. अहो नाही तर  .. घरी जेवायला पण मिळणार नाही, हे असं काही लिहिलं म्हणुन..

आज मला काय झालंय असं वाटतं कां? हे काय लिहितोय मी.. ? हा लेख सुरु केला तेंव्हा बॅक ऑफ द माइंड एक सौंदर्यवती होती. तिच्या बद्दल बातमी वाचली की तिला एक रेअर बोन मॅरो शी रिलेटेड कॅन्सर झालाय म्हणुन… तेंव्हाच ठरवलं की तिच्या बद्दल लिहायच,पण लेखाची सुरुवात ही अशी झाली. 🙂

तुम्ही आजचा पेपर वाचला असेलच.. लिसा रे या  मॉडेल, अभिनेत्रीला झालेल्या कॅन्सर बद्दल पण सगळं वाचलं असेलंच . .मी इथे तिला झालेल्या कॅन्सरची माहिती देणार नाही- आजचा कुठलाही पेपर उघडा .. दिसेल तिसऱ्या पानावर!!भारतामधे जरी ती एक अभिनेत्री म्हणुन फारसी प्रसिध्द झाली नसली तरिही तिचा वॉटर मधला अभिनय वाखाणण्यासारखा आहे. अवश्य पहा .. टाइम्स ऑफ इंडीयाच्या “टॉप  टेन ब्युटीफुल इंडीयन वुमन” मधे तिचं नावं आहे.

एके ठिकाणी वाचलं की लिसा रे ला न बरा होऊ शकणारा कॅन्सर झालाय आणि तिने तिच्या ब्लॉग वर या बद्दल  लिहिलंय !  सर्च केला आणि तिची साईट आणि ब्लॉग शोधुन काढला. लिसाचे स्वतःवरचे  कॅन्सर झाल्या बद्दलचे पोस्ट वाचले . इतक्या तटस्थ पणे कोणी स्वतःबद्दल लिहुच कसं शकतं??  तिच्या धैर्याची कमाल वाटते. सौंदर्य आणि बुध्दिमत्ता दोन्ही असलेली एक तरुणी म्हणजे लिसा रे, हे तिचा ब्लॉग वाचल्यावर जाणवते.

इतका मोठा जीवघेणा रोग झाला तरी पण तिचा ब्लॉग म्हणजे एक बॅलन्स्ड पोस्ट   आहे.कुठेही तिने स्वतःबद्दल कणव यावी असे लिहिलेले नाही. जे कांही आहे ते.. प्राक्तनात आहे .. असा सुर वाटला त्या पोस्टचा. तिला झालेल्या रोगाबद्दल इतक्या साधी सर्दी ताप आणि फ्लु झाल्याप्रमाणे सरळ आणि सहजपणे लिहिलंय . तिचे पोस्ट वाचतांना तिच्या धैर्याबद्दल खरंच आदर वाटला.

सुर्य प्रकाशाइतकं  स्पष्ट   असतांना, की हा रोग बरा होऊ शकत नाही, लिसाचा मानसिक तोल कुठेही ढासळलेला दिसत नाही. तिने लिहिलंय,  पुर्ण आत्मविश्वास आहे की ती बरी होणार म्हणुन!तिच्या पोस्टवरच्या इतरांच्या कॉमेंट्स पण वाचण्यासारख्या आहेत. लोकं तिला रेकी पासुन तर ऍक्युप्रेशर ते योगा प्रॅक्टिस चा सल्ला देताहेत.

ती अतिशय ब्रेव्ह ,सुंदर आणि बुद्धिमान आहे हे तिचा ब्लॉग वाचल्यावर लक्षात आलं.इतक्या सगळ्या क्वॉलिटीज एकाच स्त्री मधे?? मी हे पोस्ट केवळ ती खुप सुंदर आहे किंवा ती एक अभिनेत्री आहे म्हणुन लिहायला घेतलं नाही, तर तीचा ब्लॉग वाचल्यावर इम्प्रेस झाल्यामुळे हे पोस्ट लिहिलंय.या लेखाच्या सुरुवातिला लिहिलेलं पहिलं स्टेटमेंट हे अगदी खोटं ठरवलेलं दिसलं या अभिनेत्रीने.

एकच प्रार्थना कराविशी वाटते.. गेट वेल सुन..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन, मेडिकल सायंस and tagged , . Bookmark the permalink.

25 Responses to तिचा ब्लॉग..

 1. अनिकेत says:

  मध्ये मी एक ब्लॉग फॉलो करत होतो.. ब्लॉग होता अमेरीकेतील एका प्रॉस्टेट्युटचा. तिने तिच्या प्रत्येक ‘ग्राहकाबरोबरचे’ ‘अनुभव’ एकाही शब्दाची लाज न बाळगता सगळेच्या सगळे लिहीले होते. इतके विचीत्र अनुभव होते..

  उदा. एक गिऱहाईकाने तिला रात्रभर विवस्त्र बसवुन ‘इकॉनॉमिक्स शिकवले!. काही गिऱ्हाईकांच्या ‘ती’ प्रेमात पडली. कित्तेक वेळा इच्छा नसुनही पैश्यासाठी तिने रात्र घालवली. भयानक ब्लॉग होता तो. लिंक सापडली तर कमेंट मध्ये टाकतो. तेंव्हाही मला अस्संच वाटलं. स्वतःबद्दलचे असले अनुभव उघडपणे कसं कोण लिहु शकतं!

  • अनिकेत
   हिचा ब्लॉग मी वाचला आणि क्षणभर स्तब्ध झालो. समजेनासं झालं की आपण काय वाचलं ते.. इतक्या तटस्थ पणे लिहिलंय तिने .. तिचा हा ब्लॉग पण एवढ्यातच सुरु केलाय तिने, बहुतेक तिला कॅन्सर डीटेक्ट झाल्यानंतर…
   मला तर आता वाटतंय की आजची पोस्ट डिलिट करुन टाकावी , थोडी ऑफेन्सिव्ह वाटते विनाकारण.. इव्हन दो आय इट्स नॉट द इंटेन्शन..!!

 2. Girish says:

  MBK kahi loke swataha vishayi pan ek neutral astat, far rare astat ashi loke. May be Lisa Ray is one of them, pan am sure this atitude will help her recover fast..amen!!

 3. मी “तीला” अंदाजे १०२-१२ [?] वर्षांपुर्वी “आफरीन… आफरीन” या नु.फ.अली खान यांच्या गाण्यात पाहिले.. “ती” सुंदर आहे, यात वादच नाही.. मात्र ती बुद्धिमान आणि ब्रेव आहे, हे तिनं ब्लॉगवर दाखवून दिलयं. तिच्या “गेट वेल सुन” साठी माझीही प्रार्थना आणि शुभेच्छा!

  • कांही लोकांचं एखाद्या प्रसंगाला टॅकल करण्याची पध्दत किंवा एखाद्या प्रॉब्लेमला फेस करण्याची पध्दत पाहुन उगिच मन हळवं होतं. लिसा रे च्या बाबतित पण असंच झालंय..तिचा ब्लॉग वाचला आणि ताबडतोब हे पोस्ट लिहिलंय.

 4. mugdha says:

  I guessed rightly that your next post would be on lisa ray.. 🙂

 5. bhaanasa says:

  लिसा रे सुंदर आहेच. बुध्दिमान व खंबीरही आहे. स्वत:च्या दुर्दम्य इच्छाशक्तीने अशी माणसे इतक्या टोकाच्या परिस्थितीतही आनंदून, ओढीने जीवन जगत असतात व दुसयांनाही प्रवृत्त करतात. देव करो आणि ती लवकर बरी होवो. अनंत शुभेच्छा!

 6. अभि says:

  महेंद्र
  आपल्या प्रतिसादाबद्द्ल खुप खुप आभार!!!

  -अभि

 7. nimisha says:

  महेन्द्र,
  एखाद्या कठीण परीस्थितीचा सामना करण्यासाठी जे धैर्य लागतं, ते अगदी आतुनच यावं लागतं.मग कधी आपली देवावरची श्रध्दा म्हण किंवा नास्तिक असाल तर आपल्या स्वतःतल्या पॉझीटिव विचारांची शक्ती म्हण…पण आयुष्याच्य़ा क्षणभंगुरतेचं नीट आकलन ज्या व्यक्तींना होतं आणि ज्या ते पुर्ण भान ठेवुन स्विकारू शकतात त्याच अशा धीटपणे वागू शकतात!
  आणि कधी कधी तर असंही होतं की स्वतःबद्दल असं धैर्य बाळगणारी व्यक्ति आपल्या जवळच्या,जिव्हाळ्याच्या लोकांवर असं काही संकट आलं की मात्र खुप नर्व्हस होते…मी स्वतः यातून गेले आहे.अर्थात माझा कॅन्सर असाध्य नाहिय…आणि आता ४ वर्षही उलटली आहेत….पण माझा मॅलीग्नसिंचा रीपोर्ट आल्यावर ‘ ठीक आहे माझ्या शरीराला काही तरी गंभीर व्याधी झाली आहे ‘ असा विचार माझ्या मनात आला.म्हणजे जणु काही मी आणि माझं शरीर हे जणु काही २ वेगळ्या एन्टिटिज असल्याप्रमाणे मी समजत होते.
  आणि जगायचं असेल तर शरीर दुरुस्त केलं पाहीजे ह्याच भावनेने मी केमो आणि रेडीएशन सहन केलं…पण तरीही आज माझ्या जवळच्या कुणालाही थोडंही बरं नसलं की मात्र मला खुप काळजी वाटत राहते..मन ही अगदी विचित्र गोष्ट आहे हे मात्र खरं..

  • निमिषा
   तुझी प्रतिक्रिया खुपच बोलकी आणि अनुभवातुन लिहिलेली आहे. कॅन्सर पासुन कुणाचिच सुटका होऊ शकत नाही. वय वाढलं की कॅन्सर हा कुठल्या ना कुठल्या स्वरुपात डोकं वर काढतो असं मेडिकली प्रुव्ह झालंय, तेंव्हा मला नाही .. सो डोन्ट केअर असं म्हणुन चालत नाही.
   रामकृष्ण परमहंसांना पण ९० च्या वर वय झाल्यावर कॅन्सर झाला होता. मॅलिग्नन्सी मधुन मी पण गेलोय.. पण नंतर कधी तरी लिहिन इ मेल वर..
   प्रतिक्रिये करता आभार वगैरे मानत नाही..कारण यु आर अ फ्रेंड…

 8. Aparna says:

  हा व्लॉग शोधुन दिल्याबद्दल धन्यवाद. आजारपण सोसावं ते पाश्चिमात्यांनी असं एकंदरित मला वाटतं. इथे मी खूपदा ऑक्सिजनच्या नळकांड्या घेऊन इ. फ़िरताना लोकांना पाहते आणि जगण्याविषयीचा त्यांचा आशावाद खरच खूप प्रेरित करतो. आपल्याकडे साधे साधे आजारही नीट माहिती न दिल्यामुळे रोगी मानसिकदृष्ट्या खचतो. असो. पोस्ट खूपच छान आहे. बाकी लोकांनी वर सर्व लिहुन ठेवलयच…

 9. ravindra says:

  लिसा रे ने स्वतः च्या जीव घेण्या आजारपणा बद्दल स्वतः च्या ब्लोग वर लिहील आहे हि अतिशय भयानक गोष्ट आहे. न पेलवणारी. पण माझे मत आहे कि आपल्याला आजाराबद्दल समजल्यावर ते दुख दुसऱ्याकडे व्यक्त केल्याने दुख कमी होते. दुखाचा प्रभाव कमी होतो. तसे तिने केले असावे. दुख इतरांसोबत वाटल्याने सहन करण्याची ताकत वाढते, असे मला तरी वाटते. म्हणूनच मी इतरांसोबत नेहमी बोलत असतो. हसत असतो. काळजात लपलेल्या भावना व दुख सहन करण्याची ताकत वाढते हे निश्चित. हा आजार असलेल्या एका मित्राला मी नेहमी धीर देतो. ” डरो नही, हमारी दुवाये आपके साथ ही.” एकदा मी म्हटले ” आप इस बरे में कूच भी मत सोचीये” त्यांनी स्पस्तपणे सांगितले “नही, मै ने यह बिमारी हुई है ये बात हि दिमाग से निकाल दि है” माझ्या मते जर स्वतः धीर गंभीरपणे आजाराला सामोरे गेले तर आयुष्य वाढते. आनंदाची बातमी सांगतो त्यांचा तो आजार बऱ्या पैकी आटोक्यात आलाय. माझ्या एका मित्राचे नातेवाईक जवळ जवळ १५ वर्ष हा विकार सोबत घेऊन फिरत होते असे तो मित्र मला म्हणाला होता.

  • रविंद्र
   मला याच गोष्टीचं कौतुक वाटलं, म्हणुनच हा लेख लिहायला घेतला. प्रतिक्रिये करता आभार.यात फरक इतकाच आहे, की हा रोग बरा होणार नाही हे तिला माहिती असतांना पण ती इतक्या नेटाने त्याला सामोरा जाते आहे ते बघुन कौतुक वाटलं..

 10. काय विलक्षण अलिप्तपणा आहे हा! खरंच तिच्या इच्छाशक्तीची कमाल आहे.

  • कंचन,
   सुन्नं झाला होतो मी पहिल्या वेळेस जेंव्हा तिचा ब्लॉग वाचला तेंव्हा. जर ती बरी झाली , किंवा जर तिने मृत्यु दुर ठेवला, तर त्याचं कारण तिची पॉझिटीव्ह अटीट्य़ुड!!

 11. अभिजित says:

  महेंद्र आजचीच बाती मी आहे लिसा रे बरी झाली आहे कॅंसर मधून.

 12. अनघा says:

  खरोखर महेंद्र लिझा रे कडून शिकावं तितकं थोडंच…
  अश्या तितक्याच दोन सुंदर तरुणी माझ्या आयुष्यातील….कॅन्सरशी झगडून अधिकच सुंदर बनलेल्या….एक सख्खी मैत्रीण आणि एक सख्खी धाकटी बहिण. दोन वर्षांपूर्वी त्यातून झगडून बाहेर पडलेल्या बहिणीने, आत्ताच ‘गणित’ ह्या विषयावरील प्रबंध दाखल केलाय. दोन छोट्याश्या मुलांचे संगोपन करीत. 🙂
  माझ्या दोन बहिणी मात्र नाही त्यातून बाहेर पडू शकल्या. एक सख्खी मामेबहिण आणि दुसरी सख्खी मावसबहिण.

  • अनघा
   कॅन्सर हा प्रत्येकच दिर्घायुष्य़ी माणसाला होऊ शकतो असे म्हणतात. स्वामी रामकृष्ण परमहंसांना पण ११०व्या वर्षी कॅन्सर झाला होता. माझी आजी पण ९३ वर्षाची गर्भाशयाच्या कॅन्सरने गेली. लिझा रे मात्र खरंच लढवैय्यी! तिला काल पाहिलं आणि एकदम हा जूना लेख आठवला, म्हणून वर लिंक पोस्ट केली.

 13. Gurunath says:

  लिसा ह्या रोगातुन बरी झाली आहे दादा, तिने एका नव्या उपचार पद्धतीत ह्युमन सब्जेक्ट म्हणुन भाग घेण्याचे कबुल केले होते व त्याच थेरेपी ने ती बरी झाली आहे (स्टेम सेल शी संबंधित आहे ती थेरेपी), एवढेच नाही तर तिने बरे होता होताच ट्रॅव्हल ऍंड लिव्हिंग साठी ” ओ.एम.जी” म्हणजे ” ओ माय गोल्ड” हा कार्यक्रम पण शुट करणे सुरु केले होते तो प्रोग्राम सद्ध्या टी.एल.सी वर दाखवतात, अन खरेच त्यात दाखवलेल्या २-२.५ किलोच्या दागिन्यांपेक्षा लिसा झळाळती वाटते.

  • अरे गिनिपिग म्हणून स्वतःला ऑफर करणं ह्या मधे पण एक मोठेपण आहेच. कधीच बरा न होऊ शकणारा कॅन्सर होता म्हणतात तो.

 14. geetapawar says:

  aase hone ashkya aahe sir.

Leave a Reply to महेंद्र Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s