टिव्ही स्कॅम

लोकांना टीव्ही वर चेहेरा दाखवायचा इतका सोस असतो की मग त्या साठी ते काहिही करायला तयार असतात. टीव्ही वरच्या बातम्या पहातांना त्या रिपोर्टरच्या मागे तोंडं खुपसणारे लोकं पाहिले की कसं वाटतं?? खरं तर त्यांचा त्या बातमी शी अगदी अर्थाअर्थी संबंध नसतो.पण त्या व्हिडीओ मधे आपला चेहेरा दिसावा म्हणुन त्या ऍंकरच्या मागे अगदी जवळ उभे रहाण्यासाठी किती मर मर करतात नां लोकं? त्यातल्या त्यात अगदी खालच्या वर्गातले लोकं तर मुद्दाम थांबतात अशा ठिकाणी.
इथे थांबुन आणि व्हिडीओ मधे दिसुन सुध्दा काहिच फायदा नसतो, कारण हे फेसलेस माणसं जेंव्हा तुम्ही आम्ही टीव्ही वर पहातो तेंव्हा त्यांचं अस्तित्व नाकारुन मगच आपण टिव्ही पहातो.मला वाट्तं ते लोकं बहुतेक आपल्या घरच्या लोकांना सांगत असतिल की मी आज टिव्ही वर येणार.. आणि मग त्या दोन मिनिटांच्या क्लिप बघुन समाधान मानणार.
रिऍलिटी शोज मधे कित्येक लोकं येतात .परवा ( शब्दशः नाही) एका ईंडीया गॉट टॅलंट शो मधे एक म्हातारे आजोबा आले होते. तब्येतिने एकदम ठणठणित होते . त्यांनी एक गाणं म्हणत सायकल चालवली, चाकानां आग लाउन. अगदी तद्दन फालतु गाणं होतं. आता ७२ वर्षाच्या वयातही अशा शो वर यायची  इच्छा व्हावी.. कां? लोकांनी पण १० -१५ सेकंदामधे व्होट आउट केलं.या वयात आपल्या नातवंडांना खेळवायचं सोडुन अशा टीव्ही शो वर येउन स्वतःचा अपमान का करुन घेतला तेच समजत नाही.
रिऍलिटी शो प्रोग्राम मधे काही स्मॉल टाइम सिलेब्रिटीज चा एक बिग बॉस म्हणुन शो झाला होता त्या मधे जे लोकं आले होते त्यांच्या बद्दल न बोललेलेच बरे. आजकाल सुरु असलेल्या रिऍलिटी शोज बद्दल आधी पण बरंच लिहिलंय म्हणुन आता लिहिणं टाळतो.बरं.. आता अगदी अनोळखी लोकंच अशा टिव्ही शो मधे भाग घेतात असं नाही. तर अगदी प्रतिथयश नावं,जसे मंदिरा बेदी वगैरेच्या लेव्हलचे लोकं पण अशा रिऍलिटी शो मधे भाग घेतात.
टर्की मधे अशाच एका रिऍलिटी शो चं अमिष दाखवुन तब्बल दोन महिने कांही  मुलिंना एका व्हिला मधे डांबुन ठेवलं होतं.त्यांन हे सांगण्यात आलं होतं की तुम्ही सगळे एका टिव्ही शो चा हिस्सा आहात, बिग ब्रदर सारख्या या शो मधे काम करायला मिळालं म्हणुन  या मुली खुप खुश झाल्या होत्या. पण नंतर दोन महिने पुर्ण झाल्यानंतर सुध्दा जेंव्हा घरच्या लोकांना पण त्या मुलिंना भेटु दिलं नाही तेंव्हा त्यांनी पोलिसांच्याकडे कम्प्लेंट केली.या दोन महिन्यांच्या काळात या मुलिंचे  नग्न फोटो काढुन इंटरनेटवर विकण्यात आले.

लोकांना टीव्ही वर चेहेरा दाखवायचा इतकी हौस  असते  की मग त्या साठी ते काहीही करायला तयार असतात. टीव्ही वरच्या बातम्या पहातांना त्या रीपोर्टरच्या मागे तोंडं खुपसणारे लोकं पाहिले की ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कसं वाटतं – त्यांचा त्या बातमी शी अगदी अर्थाअर्थी संबंध नसतो.पण त्या व्हिडीओ मधे आपला चेहेरा दिसावा म्हणून त्या ऍंकरच्या मागे अगदी जवळ उभे रहाण्यासाठी किती मर मर करतात ना लोकं? त्यातल्या त्यात अगदी खालच्या वर्गातले लोकं तर मुद्दाम थांबतात अशा ठिकाणी.

इथे थांबून आणि व्हिडीओ मधे दिसून सुध्दा काहीच फायदा नसतो, कारण हे फेसलेस माणसं जेंव्हा तुम्ही आम्ही टीव्ही वर पहातो तेंव्हा त्यांचं अस्तित्व नाकारून मगच आपण टिव्ही पहातो.मला वाट्त ते लोकं बहुतेक आपल्या घरच्या लोकांना सांगत असतील की मी आज टिव्ही वर येणार.. आणि मग त्या दोन मिनिटांच्या क्लिप बघुन समाधान मानणार.शेजार पाजारच्या लोकांना सांगून झालं की आज एखाद्या टिव्ही शो वर येणार म्हणून , पण जेंव्हा एक्झॅक्टली तो सीन येतो, तेंव्हा नेमका शेजाऱ्याने कंटाळून चॅनल बदललेला असतो.

रिऍलिटी शोज मधे कित्येक लोकं येतात .परवा ( शब्दशः नाही) एका ईंडीया गॉट टॅलंट शो मधे एक म्हातारे आजोबा आले होते. तब्येतीने एकदम ठणठणीत होते . त्यांनी एक गाणं म्हणत सायकल चालवली,  चाकाला आग लावून. अगदी तद्दन फालतू गाणं होतं. आता ७२ वर्षाच्या वयातही अशा शो वर यायची  इच्छा व्हावी.. का? लोकांनी पण १० -१५ सेकंदामधे व्होट आउट केलं.या वयात आपल्या नातवंडांना खेळवायचे सोडून अशा टीव्ही शो वर येउन स्वतःचा अपमान का करुन घेतला तेच समजत नाही.

रिऍलिटी शो प्रोग्राम मधे काही स्मॉल टाइम सिलेब्रिटीज चा एक बिग बॉस म्हणुन शो झाला होता त्या मधे जे लोकं आले होते त्यांच्या बद्दल न बोललेलेच बरे. आजकाल सुरु असलेल्या रिऍलिटी शोज बद्दल आधी पण बरंच लिहिलंय म्हणुन आता लिहिणं टाळतो.बरं.. आता अगदी अनोळखी लोकंच अशा टिव्ही शो मधे भाग घेतात असं नाही. तर अगदी प्रतिथयश नावं,जसे मंदिरा बेदी वगैरेच्या लेव्हलचे लोकं पण अशा रिऍलिटी शो मधे भाग घेतात.

टर्की मधे अशाच एका रिऍलिटी शो चं आमिष दाखवून तब्बल दोन महिने कांही  मुलींना (१६ ते २४ वयोगटातील )आणि मुलांना  एका बंगल्या मधे डांबून ठेवलं होतं.त्याना हे सांगण्यात आलं होतं की तुम्ही सगळे एका टिव्ही शो चा हिस्सा आहात, बिग ब्रदर सारख्या या शो मधे काम करायला मिळालं म्हणून  या मुली खूप खूश झाल्या होत्या.

जवळ पास दोन महिने या मुलींच्या कडून निरनिराळे  टास्क्स करुन घेण्यात आले. या मधे फाईटिंग, बिकिनी घालुन पोहोण, आणि इतर पण बऱ्याच प्रकारचे ( म्हणजे नेमकं काय ते बीबीसी वर सांगितलं नाही) टास्क होते. जेंव्हा  दोन महिने पुर्ण झाल्यानंतर सुध्दा या मु्लींना सोडण्यात आलं नाही, तसेच त्यांच्या  घरच्या लोकांना पण त्या मुलींना भेटू दिल्या गेलं  नाही तेंव्हा त्यांनी पोलिसांच्या कडे कम्प्लेंट केली.

पोलिसांनी या बंगल्यावर छापा मारुन सगळ्या मुलींना सोडवलं. या दोन महिन्यांच्या काळात या मुलींचे  नग्न फोटो काढून इंटरनेटवर विकण्यात आले होते. अर्थात हे काम फक्त त्या शो मधे असणारे प्रोडुसर/डायरेक्टरच करु शकतात. पोलीस तपासात काय निघतं ते बघायचं आता.

या मुलींच्या घरचे लोकं म्हणतात की त्यांना सेक्स्युअली एक्स्प्लॉइट केल्या गेलेलं नाही..   अर्थात हे खरं असण्याचे चान्सेस तसे कमीच वाटतात.

बरं जर त्या मुलींपैकी एखादी ने घर सोडून जायचं म्हंटलं तर त्यांच्या कडून ३३००० डॉलर्स फाईन घेतला जाईल असंही ऍग्रिमेंट करुन घेतलं होतं.त्यामुळे कोणीच घर सोडून गेलं नाही. बीबीसी च्या बातम्यांवरुन असंही कळलं की जेंव्हा या मुलीना सोडवण्यात आलं तेंव्हा या सगळ्या मुली तिथे रडत होत्या..!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन. Bookmark the permalink.

8 Responses to टिव्ही स्कॅम

 1. टर्की स्कॅम बद्दल माहितीच नव्हतं… काय काय चालतं या दुनियेत!…. आजच्या [की कालच्या ?] “पुणे मिरर” ला वाचले की, एकता कपुर एक नविन सिरीयल/ रियालिटी शो आणतेय आणि त्याच्या ऑडिशन ला गेलेल्या मुलींना चक्क स्मुचिंग चा सिन [? का अ‍ॅक्टींग] करायला आणि बिकिनी घालायला सांगितली म्हणे.. आणि या कंटेस्टंटस ना त्याबद्दल असं काहीच सांगण्यात आलं नव्ह्तं. आता ही बाई असला कोणता रियालॅटी शो घेऊन येतेय की तिच्या त्या रटाळ “डेली डोस” मध्ये स्पाइस- तडका कशाला मारते, देव जाणे!

 2. आल्हाद alias Alhad says:

  “टर्की मधे अशाच एका रिऍलिटी…
  …काढुन इंटरनेटवर विकण्यात आले.”

  हे वाचून तर हसावं की रडावं हेच कळत नाहीये या लोकांच्या तद्दन मूर्खपणाला…

  • आल्हाद
   या मधे एक कारण आहे.. स्वतःला टिव्ही वर पहाणं.. जसे आपले लोकं किल्ला वगैरे पहायला गेले की तिथे नांवं लिहुन ठेवतात नां.. तस्संच..

 3. आनंद says:

  बरोबर आहे, पण सगलेच शो काही फसवे नसतात. उदा. ‘एम् टीवी रोडीज’ , त्यात भाग घेणारे काही `भांडखोर` आज एम् टीवी चे VJ आहेत. 🙂 आणि सारेगामापा सारख्या शो मधून काही उत्तम गायक देखिल मिळाले आहेत. पण तरीही बाकी ९५% गड़बड़ घोटालाच आहे …

 4. ravindra says:

  हल्ली रिअलीटी शो चे इतके फेड आले आहे. पहाव त्या चेनल वर रिअलिटी शो असतो. कार्यक्रम काय असतो हे बनविनाराला तरी माहित असते का कोण जाणे? भाग घेणारे हि घेऊन टाकतात. रटाळ कार्यक्रम वाटतात ते. त्या कोणत्यातरी चेनल वर कोणत्यातरी जंगलात काही मुली व मुल म्हणे सेलिब्रिटी राहतात. यांना सेलिब्रिटी कोणत्या एन्गल ने म्हणाव हेच कळत नाही. टी.वी.वर त्यांना कोणती मालिकेत पाहिलं होत होत का नव्हत हेही लक्षात राहत नाही, म्हणे सेलिब्रिटी. ते कायम भांडत असतात व साधे सुधे नाही, चक्क एक दुसऱ्याला घाणेरड्या शिव्या देऊन भांडतात. नीती मात्तच राहिली नाही मुली. ते कार्यक्रम बघून हसव कि रडव हेच कळत नाही.

 5. Dhananjay says:

  mala tumcha pramane blog banvata yet nahi pls help me

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s