9/11

काल ११ सप्टे -कांही फोटो पोस्ट केले होते.. पण नंतर ते डिलीट केलेत. लक्षात आलं की ते वायफळ ब्लॉगिंग होतं म्हणुन. “त्या”दिवशी मी जरा लवकरंच घरी आलो होतो. टीव्ही सुरु होता.. आणि तेवढ्यात ’ती’ ब्रेकिंग न्युज सुरु झाली सगळीकडे. कुठल्याही चॅनलवर तेच सुरु होतं.. अमरिका पे उग्रवादी हमला.. आणि सारखं ते प्लेन त्या टॉवर वर   आदळतांना दाखवत होते. मला खुप बरं वाटलं.. पहिल्यांदा तो हल्ला पाहिल्यावर!! अंकल सॅम च्या देशात जाउन अंकलला वेसण घालणारा कोणितरी भेटला म्हणुन.
माझी मानसिकता पण टेररिस्ट लोकांसारखी झाली कां?? पण त्या दिवसांत अमेरिका आणि पाकिस्तानचा हनिमुन पिरियड सुरु होता. अमेरिके कडुन पाकिस्तानला आर्थीक आणि लष्करी मदत पुरवली जात होती. टॅंक्स , लॉंग रेंज मिसाइल्स, एफ १६, आणि कित्येक युध्दाच्या उपयोगी वस्तु आणि सोबत करोडॊ डॉलर्सचा मलिदा पाकिस्तानला दिला जात होता. पाकिस्तान तेच पैसे टेररिझम ट्रेनिंग, आणि बंदुका, रॉकेट लॉंचर्स इत्यादी अफगाण तालिबानला देत होते, रशियाशी लढण्याकरता .. कदाचित त्यामुळेच असेल, की  अमेरिकेबद्द्ल मनात खुप राग होता. अगदी फुसका पाकिस्तानी मंत्री जरी अमेरिकेत गेला तर त्याला खुप आदराने ट्रिट केलं जात होतं, आणि भारतिय पंतप्रधानांना इग्नोअर केलं जात होतं.
काश्मिरच्या प्रश्नावर अमेरिकेचं बोटचेपं धोरण.. भारतात टेररिझम फैलवणाऱ्या  पाकिस्तानी भागातिल दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांच्या बद्दलची अनास्था, या अशा अनेक गोष्टींच्या मुळे अमेरिके बद्दल मनात खुप चीड होती.. आणि कदाचित हेच कारण असेल की अमेरिकेवर हल्ला झाला तेंव्हा बरं वाटलं.. असं वाटलं.. चला आता स्वतःवर वेळ आल्यावर टेररिझम म्हणजे किती वाईट याची प्रचिती येइल.!
तेवढ्यात दुसरा हल्ला पण झाला, ट्विन टॉवर मधलं दुसरं टॉवर पण कोसळलं.. आणि दुसऱ्याच क्षणी.. माझ्या मनातला सैतान मरण पाउन, ’माणुस’ जागा झाला. क्षणात सगळं चित्रं क्लिअर झालं डॊळ्यापुढचं.. लक्षात आलं, की कित्येक निरपराध लोकं मारल्या गेले असतिल… दुसऱ्याच क्षणी, लिटील बॉय ची आठवण झाली. त्या काळी जेंव्हा लिटील बॉय हिरोशिमावर टाकला गेला तेंव्हा इतकं मिडिया कव्हरेज नव्हतं. म्हणुन कदाचित त्याचा सिव्हिअरनेस आपल्या लक्षात येत नाही. पण इथे सगळं डॊळ्यादेखत घडल्यावर मात्र सिव्हिअरनेस कळला..
“यु आर आयदर विथ देम ऑर विथ अस” हा मेसेज आजही आठवतोय. जे कांही असेल ते असो..पण आजचं बरंचसं राजकिय आणि सामाजिक चित्र जे पहातोय ते आपण त्या घटनेचा आफ्टरमॅथ आहे..

काल ११ सप्टे -कांही फोटो पोस्ट केले होते.. पण नंतर ते डिलीट केलेत. लक्षात आलं की ते वायफळ ब्लॉगिंग होतं म्हणुन. “त्या”दिवशी मी जरा लवकरच घरी आलो होतो. टीव्ही सुरु होता.. आणि तेवढ्यात ’ती’ ब्रेकिंग न्यूज सुरु झाली सगळीकडे. कुठल्याही चॅनलवर तेच सुरु होतं.. अमरिका पे उग्रवादी हमला.. आणि सारखं ते प्लेन त्या टॉवर वर   आदळताना दाखवत होते. मला खूप बरं वाटलं.. पहिल्यांदा तो हल्ला पाहिल्यावर!! अंकल सॅमच्या एका कानाखाली जोरदार आवाज काढला, आणि तो गाल चोळत उभा आहे, आणि समजून घ्यायचा प्रयत्न करतोय की काय झालं? तेवढ्यात दुसऱ्या गालावर पण नक्शी काढली.अंकल सॅम च्या देशात जाउन अंकलला वेसण घालणारा कोणीतरी भेटला म्हणून.

माझी मानसिकता पण टेररिस्ट लोकांसारखी झाली का?? पण त्या दिवसांत अमेरिका आणि पाकिस्तानचा हनिमून पिरियड सुरु होता. अमेरिकेकडून पाकिस्तानला आर्थिक आणि लष्करी मदत पुरवली जात होती. टॅंक्स , लॉंग रेंज मिसाइल्स, एफ १६, आणि कित्येक युद्धाच्या उपयोगी वस्तु आणि सोबत करोडॊ डॉलर्सचा मलिदा पाकिस्तानला दिला जात होता. पाकिस्तान तेच पैसे टेररिझम ट्रेनिंग, आणि बंदुका, रॉकेट लॉंचर्स इत्यादी अफगाण तालिबानला देत होते, रशियाशी लढण्याकरता .. कदाचित त्यामुळेच असेल, की  अमेरिकेबद्दल मनात खूप राग होता. अगदी फुसका पाकिस्तानी मंत्री जरी अमेरिकेत गेला तर त्याला खूप आदराने ट्रिट केलं जात होतं, आणि भारतीय पंतप्रधानांना इग्नोअर केलं जात होतं.

आत्तापर्यंत अमेरिकेला कायम लोकांना काय आणि कसं ते शिकवतानाच पाहिलं होतं,  नेमका त्याच पिरियड मधे क्रायोजेनिक इंजीनच्या तंत्रज्ञानाबद्दल रशियावर ( भारताला तंत्रज्ञान देउ नये म्ह्णून आणलेला दबाव) आणलेला दबाव असेल, पण त्या क्षणी तरी थोडं बरं वाटलं

काश्मीरच्या प्रश्नावर अमेरिकेचं बोटचेप धोरण.. भारतात टेररिझम फैलवणाऱ्या  पाकिस्तानी भागातील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांच्या बद्दलची अनास्था, या अशा अनेक गोष्टींच्या मुळे अमेरिकेच्या बद्दल मनात खूप चीड होती.. आणि कदाचित हेच कारण असेल की अमेरिकेवर हल्ला झाला तेंव्हा बरं वाटलं.. असं वाटलं.. चला आता स्वतःवर वेळ आल्यावर टेररिझम म्हणजे किती वाईट याची प्रचिती येइल.!

ज्या गोष्टींसाठी भारत कायम कम्प्लेंट करित होता, त्याच गोष्टींना आता स्वतःला फेस करावं लागल्यामुळे अमेरिकेची मानसिकता बदलली. काश्मीर मधले फ्रिडम फायटर्स(??) आता टेररिस्ट म्हणून ओळखले जाउ लागले.

तेवढ्यात दुसरा हल्ला पण झाला, ट्विन टॉवर मधलं दुसरं टॉवर पण कोसळलं.. आणि दुसऱ्याच क्षणी.. माझ्या मनातला सैतान मरण पावला आणि, ’माणुस’ जागा झाला. क्षणात सगळं चित्रं क्लिअर झालं डॊळ्यापुढचं.. लक्षात आलं, की कित्येक निरपराध लोकं मारल्या गेले असतील… दुसऱ्याच क्षणी, लिटील बॉय ची आठवण झाली. त्या काळी जेंव्हा लिटील बॉय हिरोशिमावर टाकला गेला तेंव्हा इतकं मिडिया कव्हरेज नव्हतं. म्हणून कदाचित त्याचा सिव्हिअरनेस आपल्या लक्षात येत नाही. पण इथे सगळं डॊळ्या देखत घडल्यावर मात्र सिव्हिअरनेस कळला..

“यु आर आयदर विथ देम ऑर विथ अस” हा मेसेज आजही आठवतोय. जे कांही असेल ते असो..पण आजचं बरंचसं राजकिय आणि सामाजिक चित्र जे पहातोय ते आपण त्या घटनेचा आफ्टरमॅथ आहे..

आज तो दिवस आठवला, आणि त्या दिवशीचे माझे विचार आठवले तर मला स्वतःलाच माझी लाज वाटते. इतका सुसंस्कृत माणुस, पण मनात असे विचार कसे काय येउ शकतात??

इश्वर मृतात्म्यास शांती देवो.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स and tagged . Bookmark the permalink.

5 Responses to 9/11

 1. Pravin says:

  There are a few more videos available on youtube in which the conspiracy behind the planning has been shown. The towers were built to withstand such impacts. Even after the impact they shouldnt have fallen. It seems they had planted the explosives to demolish the towers after the airplane attack.

 2. ९-११ बद्दल बर्‍याच स्टोरीज आहेत.. म्हणजे – की हा सगळा अमेरीकेचाच एक प्लान होता.. त्या बिल्डिंगज अशा हल्ल्यासाळी मजबुत होत्य, त्यामुळे त्यांच्या पिलर्सनाच स्फोटके लावण्यात आली होती…. त्या दोन्ही बिल्डींग्ज अगदीच सरळ कशा पडल्या – आसपासच्या बिल्डींग्जवर न पडता… किंवा त्या बिल्डींगमध्ये – त्या दिवशी खास लोक आलेच नव्हते, त्यांना हे करस्थान आधीच माहित होतं – आणि अशा बर्‍याच – अफवा की सत्यता! काल डिस्कवरीवरती त्या बद्दल मस्त कार्यक्रम होता.. अगदी ते अटॅकर्स ना तयार करण्यापासुन हल्ल्यापर्यंतची माहिती दाखवली.

  मला वाटतं – एका क्षणी आपण अगदी आपल्या वैर्‍यासाठीही उदास होतो – कधी – कधी त्याच्यावरही दया [कीव?] येते…. कदाचित आपलीही हीच अवस्था असेल!

 3. रवि करंदीकर says:

  महेन्द्रजी

  तुमच्या मनात प्रथम आलेले विचार अगदी चुकीचे नाहीत – असे मला वाटते.

  अमेरिकेने निर्माण केलेल्या भस्मासुराने जेव्हा त्यांच्याच डोक्यावर हात ठेवला तेव्हा (आणि तेव्हाच) त्यांना त्याची दाहकता कळली!. एरव्ही अमेरिका, अ‍ॅज अ व्होल, त्यांच्याच मस्तीत होती / असते आणि ही मस्ती (गुर्मी) केवळ पैशाची, दादागीरीची आहे ह्यात शंका नसावी.

  आम्ही हिन्दुस्थानात गेली बासष्ट वर्षे ह्या अमेरिका / ब्रिटन प्रेरित दशहत वादाच्या झळा सहन करतो आहोत त्याचे बाहेरील कुणालाच काही ढिम्म वाटले नाही. कधी कधी हे गोर्‍या कातडीचे अमेरिकन / युरोपियन लोक बहुतांशी निर्लज आहेत की काय ? असे वाटयला लागते. (तसे काही चांगल्या स्वभावाचे माझे ब्रिटिश मित्र पण आहेत हे येथे नमूद असावे)

  WTO वर झालेल्या हल्ल्यात असंख्य निरपराध लोक भरडले गेले हे सत्य आहे. अशा जनसामान्यांच्या बद्दल कुणालाही वाईट वाटेल. ( तसेच तुम्हालाही नंतर वाटले) पण सुक्याबरोबर ओलेही जळते हेही एक कटु सत्यच आहे. हे होणे कसे टाळता येईल?

  मानवी स्वभावातला एक गंमतशीर विरोधाभासाचा भाग म्हणजे : जेव्हा हे सगळे दुसर्‍या देशात घडते तेव्हा आपण अगदी अलिप्तपणे बोलतो. आणि जेव्हा आपल्या जवळ हा व्हयोलन्स चा उद्रेक, अगदी जसाच्या तसा होत असतो तेव्हा भिती, चीड, राग व काही प्रमाणात सुडाची भावना ह्यांनीच आपले मन व्यापलेले असते. अलिप्तपणा तर सोडाच सारासार विचार पण आपल्यासारखा अ‍ॅव्हरेज आदमी करू शकत नाही.

  असो, तुमच्या संवेदनाशील मनाचे थोडे दर्शन घडले.

  रवि करंदीकर.

 4. निरपराध माणसं मेली हे वाईटच, पण अमेरिकेचा माज कसा उतरणार ?

 5. प्रविण, नरेंद्र, दिपक, आणि रवी
  मी गेले दोन दिवस ऑन लाइन नसल्याने कॉमेंट्सला उत्तर देणे झाले नाही . क्षमस्व..पुढचा आठवडा पण ऑन लाइन रहाणार नाही.. तरी कृपया गैरसमज करुन घेउनये.
  प्रतिक्रियेकरता मनापासुन आभार..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s