किंगफिशर रुल्स!!

हल्ली जेट एअरवेजने प्रवास करणं टाळतोय. खरं तर गेली जवळपास सहा वर्ष जास्तित जास्त प्रवास हा जेट नेच केला. त्या पुर्वी फक्त ईंडीयन एअरलाइन्संच होतं. आणि इंडीयन ची महती काय वर्णावी? टीपिकल नोकर शाही.. हिरव्या रंगाचं नेलपेंट, आणि जांभळी लिपस्टीक लावलेली एज बार झालेली एअर होस्टेस, तिचा तुमच्यावर उपकार केल्या प्रमाणे दिली जाणारी सर्व्हिस .. जितकं लिहावं तितकं थोडंच आहे. कांही दिवसांनी एखादी म्हातारी कंबरेत वाकलेली आणि हातात काठी घेउन वाकत चालणारी  एअर होस्टेस दिसली तर हमखास समजा.. ती नक्कीच इंडियन एअरलाइन्सची आहे म्हणुन 🙂
अहो, इतक्यातलीच गोष्ट आहे.. मला वाटतं की मागच्याच आठवड्यात मी सकाळी औरंगाबादला गेलो होतो. जातांना सकाळच्या जेटने गेलो, पण परतिचं तिकिट मात्र संध्याकाळची ५ -१५ च्या इंडीयन एअर लाइन्सचं होतं. एअरपोर्टला गेलो, आणि गेटवर फोटॊ आयडी दाखवुन आत शिअरलो.. चेक इन काउंटरवर तिकिटाचा प्रिंट आउट आणि ऑफिसचं आय कार्ड दिलं.. तर तो काउंटरवरचा माकड मला म्हणाला की हे ऑफिसचं आय कार्ड चालत नाही.(???) पॅन कार्ड दाखवा..माझं टाळकंच सरकलं.. म्हंटलं नाही आहे.. तु नकॊ देउस बोर्डींग पास.. !!
मी त्याला म्हंटलं, प्रिंट आउट परत दे, आणि त्यावर लिही की पॅन कार्ड नसल्यामुळे बोर्डींग पास देता येत नाही म्हणुन.. मग मी पहातो काय करायचं ते….  यावर त्याने काही न बोलता बोर्डींग पास हाता ठेवला.. म्हणजेच काय.. तर त्याची इच्छा मला त्रास द्यायची होती… अशा सिनिक मेंटॅलिटीचे बरेच लोकं इंडीयन एअरलाइन्स मधे आहेत.मला वाटतं की त्याची इच्छा अशी असावी मी त्याची मनधरणी करुन , कसंही करुन मला अलाउ करा हो.. वगैरे म्हणेन .. आणि मग माझ्यावर उपकार केल्याच्या आविर्भावात तो माकड मला बोर्डींग पास इशु करेल. पण त्याच्या प्लॅनवर मी बोळा फिरवला.
अर्थात.. हे सगळं मला त्रास देण्यासाठिच तो बोलत असावा.  त्याचा   उद्देश सरकारी बाबुगिरी प्रमाणे स्वतःचे नसलेले इम्पॉर्टन्स दाखवणे.. असाच काही तरी असावा..
इंडीयन एअर लाइन्स केवळ फुल सर्व्हिस एअर लाइन आहे , म्हणुन जेट लाइट पेक्षा जास्त प्रिफर करतो आजकाल, नाहितर ही एअरलाइन्स अगदी थकलेली आहे.. अगदीच नाइलाज असेल तर प्रवास करतो मी ईंडियन ने..
अशा प्रकारचे विचित्र अनुभव तुम्हाला पण आले असतिलच.. जेंव्हा इंडियन एअर लाइन्सला पुर्णपणे कंटाळलॊ होतो.. आणि कांहीतरी बदल व्हावा या एअरलाइन्स मधे,  असं वाटत असतांनाच  जेट  एअर सुरु झाली. सुरुवातीला फारच कमी फ्लाइट्स होत्या. पण लवकरच.
नेहेमी प्रवास करावा लागायचा त्यामुळे इंडीयन एअरलाइन्सचं फिक्वेंट फ्लायर कार्ड पण विकत घेतलं होतं.. असं आश्चर्यानं काय वाचताय?? अहो खरंच तेंव्हा इंडीयन एअरलाइन्स फ्रिक्वेंट फ्लायर कार्डच्या रजिस्ट्रेशन साठी पण १००० की १५०० रुपये घ्यायची. किती ते नक्की आठवत नाही, आणि केवळ पॉइंट्स जमा व्हावेत म्हणुन इंडीयनने प्रवास करायचो.
पण एकदा इंडियनच चे तिकिट न मिळाल्यामुळे जेंव्हा गोव्याला जेटने जावे लागले( ही गोष्ट आहे सात आठ वर्षांपुर्वीची, जेंहा जेट ही फुल सर्व्हिस एअरलाइन होती तेंव्हाची), तेंव्हा जेट च्या सर्व्हिसने खुप इम्प्रेस झालॊ आणि तिध इमिडिएट इफेक्ट जेट ने प्रवास करणे सुरु केले, आणि इंडियन एअरलान्स ला राम राम ठोकला.. 🙂 पुढची ५-६ वर्षं बरी सर्व्हिस होती जेट ची. पण हे सहारा, आणि जेट लो कॉस्ट सुरु झालं आणि एखाद्या राजवाड्याचं झोपडीत रुपांतर व्हावं तसं झालंय जेट एअर लाइन्सचं.
जेट एअर जेंव्हा सुरु झाली तेंव्हा अगदी खुपच लो प्रोफाइल वर सुरु झाली होति, थोड्या फार फ्लाइट्स होत्या….अगदी सुरुवातीच्या काळात जेट च्या फिक्वेंट फ्लायर प्रोग्राम मधे जर तुम्ही वर्ष भरात सोळा वेळेस प्रवास केला तर सिल्व्हर कार्ड दिलं जायचं. माझ्या सोळा फ्लाइटस तर अगदी दोन तिन महिन्यातंच झाल्या . आणि जेट प्रिव्हिलेजेस मिळणं सुरु झालं.. जसे… टेलि चेकिन आणि लाउंज मधे एंट्री. लाउंजमधे बरा स्प्रेड असायचा स्नॅक्स आणि कॉफी वगैरे चा. जर इच्छा असेल तर एक बिअर पण मिळते .. अजुनही ही बिअरची फॅसिलिटी मुंबई, दिल्ली एअरपोर्टवर आहे. आता एक पिल्लु बिअर घेतल्याने काही होत नाही, म्हणुन मग मास्टरकार्डवर पण एक बिअर फुकट मिळते.. 🙂 जरी तुमच्या कडे कुठल्याही एअरलाइन्सचं फ्रिक्वेंट फ्लायर कार्ड नसेल तरिही मास्टरकार्ड दाखवुन तुम्ही लाउंज मधे प्रवेश मिळवु शकता.. मुंबई एअरपोर्टचा लाउंज ओबेरॉय मॅनेज करतं त्यामुळे क्वॉलिटी चांगली असते स्नॅक्सची. लंच टाइम मधे तर मुंबई, दिल्ली इत्यादी एअरपोर्टला सरळ लंच स्प्रेड लावुन ठेवलेला असतो लाउंज मधे! या लाउंजला आम्ही जेट एअरवेज चा लंगर म्हणतो.  एक दिवस तर बोर्डींग पास घेतांना तिने लाउंज कार्ड दिलं नाही तेंव्हा अगदी न कळत त्या मुलिला म्हंटलं, जरा लंगर कार्ड देना.. तिने माझ्या कडे पाहिलं आणि जोर जोरात हसायला लागली.. !!! म्हणाली सर .. यु हॅव युज्ड ऍन अप्रोप्रिएट वर्ड फॉर लाउंज!! असो.. असं होतं कधी तरी…!
या नंतर बरिच वर्ष जेट ला पॅट्रोनेज करित होतो. पण हल्ली जेट ने आपलं स्टॅंडर्ड खुपच खाली आणुन ठेवलंय. पहिलं म्हणजे कधी तरी मेसेज येतो.. की जेट लाइट ( जुनी सहारा) ने प्रवास करतांना तुम्हाला लाउंजमधे प्रवेश मिळणार नाही.. नंतर काही दिवसांनी पुन्हा एक मेसेज आला, की जेट ने नविन लो कॉस्ट एअरलाइन सुरु केलेली आहे, आणि त्या एअरलाइनने प्रवास करतांना पण लाउंज फॅसिलिटी वापरत येणार नाही. असे रेगुलरली ह्युमिलिएट करणारे मेसेजेस आले की मग मी इरिटेट होतो. माझ मत पक्कं आहे.. कर्ट्सी इज एक्स्टॆंडेड..व्हॉलेंटिएअरिली.. इफ कर्टसी इज डीमांडेड  इट बिकम्स चॅरिटी!!या सगळ्या मेसेजेस, आणी इतर फॅसिलिटीज विथ्ड्रॉ केल्या पासुन मी जेट चा प्रवास पुर्ण पणे बंद केलेला आहे.
नंतर एकदा जेट लाइटने अहमदाबाद ते मुंबई प्रवास केला तेंव्हा लक्षात आलं , की एक लहानशी दोनशे एम एल ची बाटली ( अहो पाण्याची) फ्री दिली जाते, आणि जर एक्स्टॉ पाणि हवं असेल तर मात्र त्याचे पैसे द्यावे लागतिल. स्नॅक्स वगैरे पण सगळं काही चार्जेबल. फक्त फ्रिक्वेंट फ्लायर प्रोग्राम च्या अंतर्गत काही पॉइंट्स मिळतिल.
या प्रवासात ते सी सी डी चे प्रॉडक्ट्स विकतात. कॉफी मागवली तर तिने कप समोर ठेउन पाणी ओतलं . त्या कपात कॉफी प्रि मिक्स होतं टाकलेलं . मी जेंव्हा तिला म्हंट्लं की कॉफी टेस्टलेस आहे आणि मला नकोय.. तर तिने सॉरी म्हणुन परत घेतली. आणि पैसे परत द्यायला लागली. मी तिला म्हणालो, की पुर्वी तुम्ही ज्या पाउच द्यायच्या त्या नाहित कां? मला एक पुर्ण पाउच आणुन दे. पुर्वी कप+प्रिमिक्स्चा पाउच द्यायची.  आणि तिने ती आणून दिली. म्हणाली, सर आम्हाला इन्स्ट्रक्शन्स आहेत की एक पाउचमधे दोन कप बनवा कॉफी म्हणुन.आता एका पाउचचे दोन कप करतात हे भिकारडे जेट वाले… ( ती मराठीच होती!) .. अशा तर्हेने बेस्ट एअरलाइन्सचे अवॉर्ड सातत्याने चार पाच वर्ष जिंकणारी एअरलान कचरा एअर लाइन मधे परिवर्तित झालेली आहे.
एकदा पुर्वी एक पोस्ट टाकलं  होतं, तेंव्हा गिरिश म्हणाला होता कॉमेंट मधे के एफ ( किंग फिशर ) ट्राय कर म्हणुन! किंग फिशर ने म्हणुन प्रवास करुन पाहिला, आणि मी चक्क प्रेमातच पडलो. बेस्ट सर्व्हिस एअरलाइन्स म्हंट्लं तरिही हरकत नाही. कॅप्टन गोपिनाथचं एअर डेक्कन पण किंगफिशर रेड झालंय. पुर्वीची लो कॉस्ट एअरलाइन्स पण आता अजुनही लो कॉस्ट एअरलाइन असुनही  फुल सर्व्हिस देते. माझ्या तर्फे किंग फिशरला शंभर टक्के मार्क.. हल्ली माझा सिक्वेन्स बदललाय तिकिट बुक करतांनाचा. पहिला किंग फिशर, दुसरा इंडियन एअर , तिसरा जेट लाइट!!
थांबवतो आता इथेच.. बराच मोठा झालाय लेख..

पुर्वी फक्त इंडीयन एअरलाइन्सच होतं.सगळा एकाधिकार होता.  आणि इंडीयन ची महती काय वर्णावी? टिपीकल नोकर शाही.. हिरव्या रंगाचं नेलपेंट, आणि जांभळी लिपस्टिक लावलेली एज बार झालेली एअर होस्टेस, तिचा तुमच्यावर उपकार केल्या प्रमाणे दिली जाणारी सर्व्हिस .. जितकं लिहावं तितकं थोडंच आहे. कांही दिवसांनी एखादी म्हातारी कंबरेत वाकलेली आणि हातात काठी घेउन वाकत चालणारी  एअर होस्टेस दिसली तर हमखास समजा.. ती नक्कीच इंडियन एअरलाइन्सची आहे म्हणून  🙂

अहो, इतक्यातलीच गोष्ट आहे.. मला वाटतं की मागच्याच आठवड्यात मी सकाळी औरंगाबादला गेलो होतो. जातांना सकाळच्या जेटने गेलो, पण परतिचं तिकिट मात्र संध्याकाळची ५ -१५ च्या इंडीयन एअर लाइन्सचं होतं. एअरपोर्टला गेलो, आणि गेटवर फोटॊ आयडी दाखवुन आत शिअरलो.. चेक इन काउंटरवर तिकिटाचा प्रिंट आउट आणि ऑफिसचं आय कार्ड दिलं.. तर तो काउंटरवरचा माकड मला म्हणाला की हे ऑफिसचं आय कार्ड चालत नाही.(???) पॅन कार्ड दाखवा..माझं टाळकं सरकलं.. म्हंटलं नाही आहे.. तू नकॊ देउस बोर्डींग पास.. !!  प्रिंट आऊट परत दे, आणि त्यावर लिही की पॅन कार्ड नसल्यामुळे बोर्डींग पास देता येत नाही म्हणुन.. मग मी पहातो काय करायचं ते….  यावर त्याने काही न बोलता बोर्डींग पास हातात ठेवला..

म्हणजेच काय.. तर त्याची इच्छा मला त्रास द्यायची होती… अशा त्रासदायक मनोवृत्तीचे  बरेच लोकं इंडीयन एअरलाइन्स मधे आहेत.मला वाटतं की त्याची इच्छा अशी असावी मी त्याची मनधरणी करुन , कसंही करुन मला  प्रवास करू द्या हो,  .. वगैरे म्हणेन .. आणि मग माझ्यावर उपकार केल्याच्या आविर्भावात तो माकड मला बोर्डींग पास इशु करेल. पण त्याच्या प्लॅनवर मी बोळा फिरवला.अर्थात.. हे सगळं मला त्रास देण्यासाठीच तो बोलत असावा.  त्याचा   उद्देश सरकारी बाबुगिरी प्रमाणे स्वतःचे नसलेले इम्पॉर्टन्स दाखवणे.. असाच काही तरी असावा..

इंडीयन एअर लाइन्स केवळ फुल सर्व्हिस एअर लाइन आहे , म्हणून जेट लाइट पेक्षा जास्त प्रिफर करतो आजकाल, नाहितर ही एअरलाइन्स अगदी थकलेली आहे.. अगदीच नाइलाज असेल तर प्रवास करतो मी ईंडियन ने..अशा प्रकारचे विचित्र अनुभव तुम्हाला पण आले असतीलच.. जेंव्हा इंडियन एअर लाइन्सला पुर्णपणे कंटाळलॊ होतो.. आणि कांहीतरी बदल व्हावा या एअरलाइन्स मधे,  असं वाटत असतांनाच  जेट  एअर सुरु झाली. सुरुवातीला फारच कमी फ्लाइट्स होत्या. पण लवकरच सगळा भारत कव्हर केला जेट ने..

नेहेमी प्रवास करावा लागायचा त्यामुळे इंडीयन एअरलाइन्सचं फिक्वेंट फ्लायर कार्ड पण विकत घेतलं होतं.. असं आश्चर्यानं काय वाचताय?? अहो खरंच तेंव्हा इंडीयन एअरलाइन्स फ्रिक्वेंट फ्लायर कार्डच्या रजिस्ट्रेशन साठी पण १००० की १५०० रुपये घ्यायची. किती ते नक्की आठवत नाही!आजकाल तर कुठलिही एअरलाइन्स फ्रिक्वेंट फ्लायर कार्ड साठी चार्ज करित नाही.

माझा जेट चा प्रवास कसा सुरु झाला ? तर एकदा इंडियनच चे तिकिट न मिळाल्यामुळे जेंव्हा गोव्याला जेटने जावे लागले( ही गोष्ट आहे सात आठ वर्षांपूर्वीची, जेंव्हा जेट ही फुल सर्व्हिस एअरलाइन होती तेव्हाची), तेंव्हा जेट च्या सर्व्हिसने खूप इम्प्रेस झालॊ आणि   ताबडतोब  इफेक्ट  म्हणजे जेट ने प्रवास करणे सुरु केले, आणि इंडियन एअरलान्स ला राम राम ठोकला.. 🙂 पुढची ५-६ वर्षं बरी सर्व्हिस होती जेट ची. पण हे सहारा, आणि जेट लो कॉस्ट सुरु झालं आणि एखाद्या राजवाड्याचं झोपडीत रुपांतर व्हावं तसं झालंय जेट एअर लाइन्सचं.

जेट एअर जेंव्हा सुरु झाली तेंव्हा अगदी खूपच लो प्रोफाइल वर सुरु झाली होति, थोड्या फार फ्लाइट्स होत्या….

अगदी सुरुवातीच्या काळात जेट च्या फिक्वेंट फ्लायर प्रोग्राम मधे जर तुम्ही वर्ष भरात सोळा वेळेस प्रवास केला तर सिल्व्हर कार्ड दिलं जायचं. माझ्या सोळा फ्लाइटस तर अगदी दोन तिन महीन्यातंच झाल्या . आणि जेट प्रिव्हिलेजेस मिळणं सुरु झालं.. जसे… टेली चेकिन आणि लाउंज मधे एंट्री. लाउंजमधे बरा स्प्रेड असायचा स्नॅक्स आणि कॉफी वगैरे चा. जर इच्छा असेल तर एक बिअर पण मिळते .. अजूनही ही बिअरची फॅसिलिटी मुंबई, दिल्ली एअरपोर्टवर आहे. आता एक पिल्लु बिअर घेतल्याने काही होत नाही, म्हणून मग मास्टरकार्डवर पण एक बिअर फुकट मिळते.. 🙂 जरी तुमच्या कडे कुठल्याही एअरलाइन्सचं फ्रिक्वेंट फ्लायर कार्ड नसेल तरीही मास्टरकार्ड दाखवून तुम्ही लाउंज मधे प्रवेश मिळवू शकता..

मुंबई एअरपोर्टचा लाउंज ओबेरॉय मॅनेज करतं त्यामुळे क्वॉलिटी चांगली असते स्नॅक्सची. लंच टाइम मधे तर मुंबई, दिल्ली इत्यादी एअरपोर्टला सरळ लंच स्प्रेड लावुन ठेवलेला असतो लाउंज मधे! या लाउंजला आम्ही जेट एअरवेज चा लंगर म्हणतो.  एक दिवस तर बोर्डींग पास घेतांना तिने लाऊंजचे कार्ड दिलं नाही तेंव्हा अगदी न कळत त्या मुलीला म्हंटलं, जरा लंगर कार्ड देना.. तिने माझ्या कडे पाहिलं आणि जोर जोरात हसायला लागली.. !!! म्हणाली सर .. यु हॅव युज्ड ऍन अप्रोप्रिएट वर्ड फॉर लाउंज!! असो.. असं होतं कधी तरी…!

या नंतर बरिच वर्ष जेट ला पॅट्रोनेज करित होतो. पण हल्ली जेट ने आपलं स्टॅंडर्ड खुपच खाली आणुन ठेवलंय. पहिलं म्हणजे कधी तरी मेसेज येतो.. की जेट लाइट ( जुनी सहारा) ने प्रवास करतांना तुम्हाला लाउंजमधे प्रवेश मिळणार नाही.. नंतर काही दिवसांनी पुन्हा एक मेसेज आला, की जेट ने नविन लो कॉस्ट एअरलाइन सुरु केलेली आहे, आणि त्या एअरलाइनने प्रवास करतांना पण लाउंज फॅसिलिटी वापरत येणार नाही. असे रेगुलरली ह्युमिलिएट करणारे मेसेजेस आले की मग मी इरिटेट होतो. माझ मत पक्कं आहे.. कर्ट्सी इज एक्स्टॆंडेड..व्हॉलेंटिएअरिली.. इफ कर्टसी इज डीमांडेड  इट बिकम्स चॅरिटी!!या सगळ्या मेसेजेस, आणी इतर फॅसिलिटीज विथ्ड्रॉ केल्या पासुन मी जेट चा प्रवास पुर्ण पणे बंद केलेला आहे.

नंतर एकदा जेट लाइटने अहमदाबाद ते मुंबई प्रवास केला तेंव्हा लक्षात आलं , की एक लहानशी दोनशे एम एल ची बाटली ( अहो पाण्याची) फ्री दिली जाते, आणि जर एक्स्टॉ पाणि हवं असेल तर मात्र त्याचे पैसे द्यावे लागतिल. स्नॅक्स वगैरे पण सगळं काही चार्जेबल.

या प्रवासात ते सी सी डी चे प्रॉडक्ट्स विकतात. कॉफी मागवली तर तिने कप समोर ठेउन पाणी ओतलं . त्या कपात कॉफी प्रि मिक्स होतं टाकलेलं . मी जेंव्हा तिला म्हंट्लं की कॉफी टेस्टलेस आहे आणि मला नकोय.. तर तिने सॉरी म्हणुन परत घेतली. आणि पैसे परत द्यायला लागली. मी तिला म्हणालो, की पुर्वी तुम्ही ज्या पाउच द्यायच्या त्या नाहित कां? मला एक पुर्ण पाउच आणुन दे. पुर्वी कप+प्रिमिक्स्चा पाउच द्यायची.  आणि तिने ती आणून दिली. म्हणाली, सर आम्हाला इन्स्ट्रक्शन्स आहेत की एक पाउचमधे दोन कप बनवा कॉफी म्हणुन.आता एका पाउचचे दोन कप करतात हे भिकारडे जेट वाले… ( ती मराठीच होती!) .. अशा तर्हेने बेस्ट एअरलाइन्सचे अवॉर्ड सातत्याने चार पाच वर्ष जिंकणारी एअरलान कचरा एअर लाइन मधे परिवर्तित झालेली आहे.

एकदा पुर्वी एक पोस्ट टाकलं  होतं, तेंव्हा गिरिश म्हणाला होता कॉमेंट मधे के एफ ( किंग फिशर ) ट्राय कर म्हणुन! किंग फिशर ने म्हणुन प्रवास करुन पाहिला, आणि मी चक्क प्रेमातच पडलो. बेस्ट सर्व्हिस एअरलाइन्स म्हंट्लं तरिही हरकत नाही. कॅप्टन गोपिनाथचं एअर डेक्कन पण किंगफिशर रेड झालंय.

विजय मल्ल्याने टेकओव्हर केल्यापासुन या एअरलाइन्सचं रुपडंच पालटलंय. तो अगदी विचित्र युनिफॉर्म इतिहास जमा होऊन , के एफ चा स्पेशल रेड युनिफॉर्म दिलाय स्टाफला. आणि स्टाफ एफिशिअन्सी पण खुपच चांगली आहे.. सध्याच्या परिस्थितित किंग फिशर इज द बेस्ट!!पुर्वीची लो कॉस्ट एअरलाइन्स पण आता अजुनही लो कॉस्ट एअरलाइन असुनही  फुल सर्व्हिस देते. माझ्या तर्फे किंग फिशरला शंभर टक्के मार्क.. हल्ली माझा सिक्वेन्स बदललाय तिकिट बुक करतांनाचा. पहिला किंग फिशर, दुसरा इंडियन एअर , तिसरा जेट लाइट!!

काल इंदौरला आलो ते किंग फिशर रेड नेच!

थांबवतो आता इथेच.. बराच मोठा झालाय लेख..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

23 Responses to किंगफिशर रुल्स!!

 1. अनिकेत वैद्य says:

  लंगर

  खूप मस्त शब्द वापरलाय.

 2. आनंद says:

  मी पहिला हवाई प्रवास ‘ऐअर डेक्कन’ नि केला, त्या मध्ये त्या काळी फ्री सिटींग असायची, म्हणजे आपला रुमाल टाकून जागा धरल्या सारखे 😉 , सर्व गोष्टी चार्जेबल होत्या, हो फक्त कॅन्डी फ्री होत्या… लौंज वगैरे सुविधा नव्हत्या. आणि कहर म्हणजे माझी कलकत्ता रिटर्न फ्लाईट त्यांनी एक दिवस आधी कॅन्सल केली, आणि मला माझा स्टे वाढवावा लागला… इंडिअन एअर लाईन्स बद्दल सर्व मतांशी सहमत, हैदराबाद ला land करताना तर भयंकर घाबरवलं होते त्यांनी….वाटले होते हा शेवटचाच प्रवास… किंगफिशर आणि paramount मात्र सही सर्विस द्यायचे ( at least १ वर्षा पूर्वी तरी )… अशात काही अनुभव नाही …

 3. काका, प्रवासात मस्त सुचलायं तुम्हाला हा विषय…!

 4. rajeev says:

  बाबू काळी पीव ळी ने प्रवास करून बघ…
  ईंडीगो ही चांग ली वाटेल.
  वीमानात बसुन लै उड्तो का ???

  rajeev ratnalikar

 5. आरती says:

  त्यांनी फोटो आयडी मागितला तर त्याचे काय एव्हढे? ऑफ़ कोर्स, ऑफ़ीसचे आय कार्ड नाहीच चालणार कुठे…तुम्ही हे कंसिडर का नाही केलेत?

 6. rohan says:

  ‘लंगर’ … N.C.C. च्या कैम्पसची आठवण झाली मला … हटके विषय आणि त्यावरचे सातत्यपूर्ण लिखाण हा तुझा हातखंडा आहे. तुझा ब्लॉगपोस्ट आला नाही तर दिवस सुरू होत नाही इकडे माझा. 😀

 7. Ashish says:

  इंडिअन एअर लाईन्स बद्दल सर्व मतांशी सहमत. पण प्रामाणिकपाने मला हि वाटता कि त्यांनी PAN कार्ड मागितलं
  यात काहीच चूक नाही. कंपनी ID कार्ड VALID असूच शकत नाही. Anybody can make company ID card. Especially in India anything can happen.

  • आशिश
   जर असा नियम असेल की पॅन कार्ड दाखवणं आवश्यक आहे, तर त्याने कार्ड मागणे ठिक आहे. कुठलिच एअरलाइन्स पॅन कार्ड मागत नाही. कंपनीची फोटॊ आयडी चालते, वेळप्रसंगी जर तुमचा फोटॊ असलेले क्रेडिट कार्ड असेल तर ते पण चालतं.. औरंगाबाद एअरपोर्टच्या त्या माणसाची कदाचित इच्छा असावी की मी त्याला रिक्वेस्ट करावी, अजिजी करावी.. म्हणुन .. आणि केवळ त्रास द्यायचा म्हणुन त्याने पॅन कार्ड मागितले. जेंव्हा मी त्याला म्हंटलं की बोर्डींग पास देउ नकोस, आणि तिकिट परत दे कॉमेंट टाकुन , तर त्याने सरळ बोर्डींग पास दिला… कारण त्याला माहिती होतं की तो जे काही बोलतोय ते चुकिचं आहे.
   शुक्रवारी सकाळी जेंव्हा मी दिल्लिला गेलो होतो एअर इंडियाने, तेंव्हा पण मुंबईला किंवा दिल्लिहुन परत येतांना पॅन कार्ड मागितलं नव्हतं. याचा अर्थ काय?? की तो माणुस उगिच त्रास देत होता..
   By the way, its easier to make pan card.. than companies ID card. Pan card can be prepared by paying only 100 Rs

 8. Renuka says:

  No Offence, but please go through following web site.
  http://indian-airlines.nic.in/scripts/CITIZENS_CHARTER.pdf
  It is official web site of indian airlines which mentions acceptable forms of identification. It does not include office ID card.
  I am surprised to hear that airlines do accept office ID card as a valid identification proof. If someone is asking for a valid identification proof, there is nothing wrong in it. Infact if rest of the airlines/people who are not asking for a valid identification proof they may not be actually following the rules.

  • आरती says:

   I feel the same. May be they do not ask every time, but if asked , office I card can no0t be the valid proof. Agrred that PAN card can be made in 100 Rs….It is not the question of value but of the verification it asks for before issuing the same. And issung authority is Govt of India…not any private company!

   • http://indian-airlines.nic.in/scripts/CITIZENS_CHARTER.pdf I have gone through all the instructions, and its not required to show the Pan card.
    On friday i went to delhi, but during that time no pan card was even asked for…
    Showing passport is compulsory during intl flts as per their guidelines.

    This is what they exactly say on their web site:-
    Driving License, Photo Identity Card, Passport or Photo Credit Card
    are some of the accepted documents for verification of identity before
    a passenger is issued a boarding card.

    NO WHERE THE PAN CARD IS ASKED FOR AS A PROOF OF IDENTITY> ALSO ITS NOT MENTIONED THAT THE ICARD OF OFFICE WILL NT BE ACCEPTED>

 9. bhaanasa says:

  महेंद्र, लंगर एकदम मस्त.:)
  २००४ मध्ये आमच्या अमेरिकन मित्र-मैत्रिणीचे जेटने दिलेला नाश्ता-गरम गरम इडली सांबार व छोटे छोटे उत्तपा तेही चकटफू पाहून डोळे फिरलेच. अतिशय आवडले त्यांना.अजूनही आठवण काढतात.( इथे चार जुनाट शेंगदाणे किंवा छोट्या प्रेट्झलचे पाकीट मिळण्याची सवय असल्याने ) पण आजकाल आपल्याकडेही सगळेच बदलत चाललेय.
  लेख छान.

  • श्री
   अगदी जसं घडलं तसं लिहिलंय.. तसं जेट चांगली एअर लाइन होती पण हल्ली अजिबात केअर करित नाहित.जेट च्या दोन लोकॉस्ट आणि एक फुल सर्व्हिस काउंटर्स आहेत. त्यातल्या त्यात फुल सर्व्हीस अजुनही चांगली आहे.. पण इतर दोन .. एकदम होपलेस..

 10. मी says:

  अमेरिकन एअर्लाईन, नॉर्थवेस्ट, डेल्टा, ब्रिटिश असो किंवा बडवायजर, सॅम्यूअल आडम्स, हनिकेन …. किंगफिशरला पर्याय नाही ! आणि मल्ल्याने बापूजींच्या लिलावातल्या वस्तू घेतल्यापासून तर मी त्यांचा ‘पंखा’ झालो आहे .. 🙂

 11. Girish says:

  MBK,

  Jet is sick now and undoubtedly KF is leader, but try Indigo..i was quite impressed by them!! Low cost but good service and mostly on time unlike Jet or Goair, Goair is sickest of all!!

 12. किंगफिशर रुल्स! – अगदी खरं. तसा माझा फ्लाईटचा अनुभव थोडाच आहे, मात्र त्यांच्या “मुंबई-लंडन” ट्रीपचा अनुभव एकदम झकास होता… अहो, फ्लाईटमध्ये मी चक्क मराठी गाणी ऐकली!!

  • दिपक
   मल्ल्या रुल्स!!! एअर डेक्कन सारखी मोस्ट अनवॉंटेड एअर लाइन्स पण त्याने एकदम सुधरवुन टाकली आहे.

 13. vishal says:

  sagale saarkhech…private vaale aadhi neet vaagtat nantar rang daakhvataat..mobile service aso ki airlines…sarkari bare ase vaatu laagte..maatr air india ne sudharave he kharech…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s