कालभैरवाय नमः

6 monkeyएके दिवशी संध्याकाळी सगळीकडे गॉसिपिंग सुरु झालं की गणपती दूध पितो.. आणि मग काय सगळे लोकं निघाले हातातली कामं सोडून गणपतीला दुध पाजायला. टिव्ही चॅनल्स ला तर एक नवीन ब्रेकिंग न्यूज मिळाली होती. आपले मुख्य मंत्री पण टिव्ही वर दाखवले आणि त्यांनी पण सांगितलं की त्यांच्या पण गणपतीने दुध प्यायलं !!!हा चमत्कार पहायला मी पण गेलो होतो दुधाची वाटी घेउन. पण गणपती काही दुध प्यायला नाही माझ्या हातून. पण काल दारु मात्र प्यायला कालभैरव माझ्या हातून,

उज्जैन ला पण कांही कामासाठी जाणं झालं. काम झाल्यावर परतीच्या वाटेवर महांकाल  मंदिर आहे  . महाकाल म्हणजे  महादेवाचं.. इथे या महादेवाला रोज सकाळी ४ वाजता भस्मारती होते. दररोज नवीन चिता भस्म लागतं महादेवाला. आमचा मित्र शर्मा म्हणाला, उज्जैनला हा एक वरदान आहे की रोज एक तरी माणुस मरेल आणि त्याचं चिता भस्म महांकाल देवाला मिळेल असा आशीर्वाद आहे उज्जैनला. म्हंटलं शर्मा जी हे वरदान आहे की शाप?

ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात अजिबात गर्दी नव्हती अगदी दहा मिनिटात आम्ही दर्शन घेउन परत बाहेर आलो. बाहेर आल्यावर म्हंटलं शर्माजी  चला आपण कालभैरवाला पण जाउन येऊ.प्रत्येक वेळेस उज्जैनला आलं की फक्त महाकालाचं दर्शन घेतलं जातं आणि काल भैरवाचं दर्शन घ्यायचं राहुन जातं. तसं काही फार दुर नाही ते कालभैरवाचं मंदिर. जास्तीत जास्त ३ किमी असेल..इथे जाण्याचं मुख्य कारण म्हणजे इथला काल भैरवाची मुर्ती दारु पिते …. खरंच!॒

स्कंध पुराणातील गोष्टी नुसार हे काल भैरवाचं मंदिर अर्वाचीन काळा पासून आहे. वेळोवेळी केलेल्या जीर्णोध्दारामुळे याची स्थिती फारच चांगली आहे.

पूर्वीच्या काळी उज्जैन हे अवंतिका नगरी म्हणुन ओळखलं जायचं. ब्रह्म देवाने चार वेद निर्माण केले, सृष्टी निर्माण केली आणि नंतर त्याला काहीच काम नव्हतं, म्हणून त्याने पाचव्या वेदाचं  लिखाण सुरु केलं. सगळ्या देवांनी त्याला सांगून पाहिलं की अरे ब्रह्मा, पाचव्या वेदाची काहीच गरज नाही , तेंव्हा तु हे काम थांबव.. पण ब्रह्म देव काही ऐकायला तयार नव्हते.

शेवटी सगळे देव भगवान महादेवाकडे गेले. महादेवाला त्यांनी सगळी गोष्ट सांगितली , आणि विनंती केली की ब्रह्माला थांबवा म्हणून. महादेवाने पण सांगितल्यावर ब्रह्मदेवाने पाचवा वेद लिहिणं थांबवलं नाही.

महादेवाला राग आला..आणि त्याने तिसरा नेत्र उघडला.. त्यातुन निर्माण झाला हा कालभैरव. कालभैरवाने ब्रह्माचे पाचवे मस्तक कापून काढले आणि ब्रह्माला थांबवले पाचवा वेद लिहिण्या पासुन.

नंतर मग ब्रह्म हत्येचं पातक  जावं म्हणून इथे क्षीप्रा नदीच्या किनारी येउन त्याने शिवाची आराधना केली , आणि मुक्ती मिळवली..पुरातन काळापासुन कालभैरवाची पुजा ही “पंच मकार” म्हणजे मद्य , मांस, मैथुन (आणि इतर दोन मला माहीत नाहीत )ने केली जाते. पण आजकाल फक्त मद्यच चढवलं जाते कालभैरवाला.

कालभैरवाच्या मंदिराच्या जवळ आम्ही पोहोचलो.सगळे फुलवाले मागे लागले, चप्पल काढुन ठेवा, कार इथेच पार्क करा म्हणुन. एका ठिकाणी कार पार्क करुन फुलं घ्यायला गेलो.फुलवाला अगदी फुल टू टुन्नं दिसत होता.म्हणाला, २० रुपयात फुलं घ्या.. आणि दारुचे .. ४० रुपये.   कालभैरवाची ्पूजाकरतांना त्यासाठी दारु लागते.

दारुचे दुकान ,अगदी आपलं फुलांचं असतं नां तस्संच आहे इथे.. सगळ्या बाटल्या रांगेने मांडून ठेवल्या होत्या.इथे सगळे ब्रॅंड्स अव्हेलेबल होते. आम्ही एक माहित नसलेला कुठला तरी एक ब्रॅंड घेतला. आणि मंदिरत शिरलो.तिथे सेल फोन आणि कॅमेरा अलाउड नाही म्हणून पाटी दिसली. मुकाटयाने आपला सेल फोन बंद केला.

मंदिर नेहेमीच्याच मंदिरा प्रमाणे आहे. मंदिराबाहेर, जसा महादेवा समोर नंदी असतो तसाच इथे एक कोल्हा, की लांडगा असतो. त्या लांडग्याला पण झुल चढवलेली होती.मंदिराच्या गर्भागरात गेलो. दोन माणसं .. ती दोघंही  बेवडेच दिसत होते.. त्यांना पुजारी म्हणणं म्हणजे पुजारी शब्दाचा अपमान म्हणावा लागेल. आम्ही ती फुलांची परडी आणि दारुची बाटली त्या पुजाऱ्याच्या हातात दिली. पुजाऱ्याने तिथलीच एक थाळी ( ६ इंच व्यासाची) घेतली आणि त्यामधे आम्ही दिलेली दारु ओतली. आणि बशीत ओतून ज्या प्रमाणे चहा पितात तशा प्रकारे त्या मुर्तीच्या तोंडाला लावली. सगळी दारु त्या मुर्तिच्या तोंडात गेली, आणि ती प्लेट रिकामी झाली. चमत्कार झाल्याप्रमाणे मी पहात होतो. व्हिडीओ घ्यायची खुप इच्छा होती पण परमिशन नाही.. म्हणून राहुन गेलं..

समोरच एक तिर्थाचा तांब्या होता. त्या तांब्यात पण त्याने थोडीशी दारु ओतुन घेतली आणि उरलेली दारुची बाटली आमच्या हातात दिली..

समोर जे कांही सुरु होतं ते एक अतर्क्य आणि अगम्य होतं. गुढ कथेप्रमाणे तिथलं कुंद वातावरण होतं आम्ही बाहेर आलो.. आणि दिपमाळेशेजारी बसलॊ. हातामधे  ती प्रसादाची देशी  दारुची अर्धी बाटली आमच्या हातात होती. समोरचं देवाला वाहिलेली फुलं पडलेली होती. त्यावर एक खारुताई मजेत बागडत होती. एक माकडीण आपल्या पिल्लाला घेउन बसलेली होती.तिच्या समोर एका भक्ताने टाकलेले प्रसादाचे दाणे खाण्यात मग्न होती.

बाजुला बरेच भिकारी बसले होते, साधूच्या वेशात. मला नेमकी ह्याच गोष्टीची चीड आहे. भिक मागायची तर भिकाऱ्याच्या वेशात मागा नां.. पण हे लोकं साधू प्रमाणे रहातात आणि भिक मागतात. एक गोरी मड्डम पण तिथे होती. तिला आणि तिच्या साथिदाराला सगळ्या भिकाऱ्यांनी घेउन ठेवलं होतं.. तीचे कपडे दोन बोटात पकडून ओढून तिचं लक्षं आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करित होती. हे सगळ पाहिलं आणि खुप संताप आला . शर्माजी अरे साहब.. क्या कर रहे हो… म्हणे पर्यंत मी रागाने समोर पोहोचलो, आणि त्या भिकाऱ्यांवर जोरात ओरडलॊ , म्हंटलं ये लोक मेरा गेस्ट है.बदतमिजी करोगे तो पुलिस बुलाउंगा…. आणि त्या दोघांना पण बाहेर घेउन गेलॊ, अगदी कृतज्ञतेने पहात आणि थॅंक्स म्हणुन ते निघुन गेले. आमची गाडी पण त्यांच्या पाठोपाठ काढली आणि आम्ही पण इंदौरला निघालो..

त्या दारुड्या फुलवाल्याचा व्हिडीओ पण काढलाय.. पण तो इथे नंतर म्हणजे शनिवारी पोस्ट करीन.

Video Uploaded

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात.... Bookmark the permalink.

18 Responses to कालभैरवाय नमः

 1. pravin says:

  सॉलिड एकदम. माहीतच नव्हत असले काही असेल म्हणून. दूध मी पण द्यायचा प्रयत्न केला होता, माझ्यापण हातून नाही प्यायले गणराय. माझे मित्र म्हणाले की भरपूर मुलींना टापतोस म्हणून नाही प्यायले तुझ्या हातून:)

  • प्रविण,
   पुढच्या वेळी दारु पाजुन पहा कालभैरवाला. 🙂
   त्याला कांहीच ऑब्जेक्शन नाही. अगदी पंचमकार चालतात या देवाला. 🙂

 2. मी says:

  भन्नाट ! भारतात गेल्यावर कधीतरी या देवाला भेटायला हरकत नाही.शेवटचा पॅरामधे मला नेहमी पडाणारा प्रश्नावर लिहिलय, तुमची प्रतिक्षिप्त क्रीया आवडली .. मला गॅरन्टी आहे अशावेळी एखाद्याच्या कानाखाली .. मला गुरूव्हिजनवर लिहिलेला लेख आठवला : प्रतिबिंब मिसिसीपीच्या पाण्यातलं 🙂 http://blog.guruvision.in/?p=219

  • नक्कीच भेट द्या.. नॉर्मली आपण उज्जैन ला गेल्यावर महांकालाला (जोतिर्लिंग) भेट देउन निघुन जातो. पण हे मंदिर पण पहायलाच हवं . गेली कित्येक वर्षं इथे येतोय, पण काल योग आला जायचा.मला वाटतं की गावाबाहेर, स्मशानाजवळ आहे म्हणुन लोकं कमी जात असावेत.
   मिसिसिपीच्या पाण्यातलं प्रतिबिंब वाचलं. माझ्या एका मित्राला तुमच्या कडे हत्तीवर बसुन लोकं फिरतात कां? असांही प्रश्न विचारला होता. असे प्रश्न… काय उत्तर देणार??
   आपल्या कडे गोरी कातडी बद्दल अजुनही अप्रुप आहे. लोकांना असं वाटतं की पाश्चात्य देशात अगदी १३-१४ वर्षापासुनच डेटिंग सुरु होतं म्हणजे इथे येणाऱ्या सगळ्या मुली तशाच असतात, आणि त्यांना कांहीही धरबंद नसतो.. सारखे हॉलिवुडचे सिनेमे पाहुन, लोकांचा इथला समज आहे तो.म्हणजे तिकडे तसा गैरसमज, आणि इकडे असा..शेवटी या सगळ्यांसाठी मिडीया मस्ट बी ब्लेम्ड !!

   • तुमच्याकडे हत्तीवरून शाळेला जाता का? ह्या प्रश्नाला छानच उत्तर दिले होते मी…

    म्हंटले…” हो तर अहो हत्तींसाठी पार्किंग लॉट सुद्धा असतात आमच्याकडे…” आणिक मग प्रश्नकर्ता स्तंभित…

 3. हे मात्र नविनच बघायला [वाचायला] मिळालं..! आपण जर नेहमीच प्रवास करत असाल तर एखाद्या कॅमेरा जवळ ठेवा ना.. तेवढ्याच फोटोच्या आठवणी 🙂

  • दिपक
   कॅमेरा असतोच ना जवळ. मोबाइल मधे एन ९५ मधे चांगला कॅमेरा आहे. पण इथे सेल फोनवरुन पोस्ट करतोय तर फोटो अपलोड होत नाहित. म्हणुन तर म्हंटलं की शनिवारी म्हणजे उद्या घरी गेल्यावर सगळे फोटो आणि व्हिडीओज अपलोड करिन या पोस्टचे.

 4. Girish says:

  jai kal bhairav..me aikle ahay ki kolkatta javal kuthe tari ek devi la pan daru cha prasad dakhavtat..

 5. rohan says:

  मस्त टॉपिक रे .. नेहमीप्रमाणे … बाकी तू त्या आमिरखान सारखे केलस .. “ये हमारे मेहमान है म्हणुन” … 😀

  • अरे रोहन,
   तेंव्हा, तु पहायला हवं होतंस.. ते तु पण नक्की तेच केलं असतंस.. सगळे दाउ पिउन तर्र झालेले ते साधू.. आणि जर मी समोर गेलो नसतो तर नक्कीच कपडे फाडले असते त्यांनी,

 6. sonalw says:

  amazing. aaplyakade dewachya naawakhali kahihi chalat. aani tyachich mala chid yete.
  Mi Orisa madhe eka mahadevachya mandirat gele hote.local lokanni khup kautuk kel hot tya jagech. pan gelyawar hach chid aannaara prakaar hota. dewlachya kadelach laagun eka guhe madhe sagle gardulle aani bewde basle hote. Pujari tar itake bhayanak hote ki sura dakhwun loottil ashi bhiti watat hoti. ardhya mintaat darshan gheun satakalo aksharshah aamhi.

 7. सोनल
  प्रतिक्रियेकरता आभार.
  आता मुंबईलाच असलेल्या एलिफंटा केव्हज मधे विथ फॅमिली जायची लाज वाटते. कारण तो भाग नुसता गर्दुल्ल्यानी व्यापलेला आहे. देवाच्या नावाखाली भांग आणि गांजा पिणारे ते साधु (???) पाहिले की मला खुप संताप येतो. पण आपल्या समाजा मधे एक मान्यता आहे की भिकाऱ्यांना दान दिल्याने पुण्य लाभते. तो कन्सेप्ट आधी बदलला पाहिजे. जाउ दे.. यावर एक वेगळा लेखच लिहितो आज.. :).

 8. bhaanasa says:

  कठीण आहे. पण कालभैरव दारू प्यायला म्हणजे…..???? गेली तरी कुठे ती? ही आजूबाजूची सगळी मंडळी फूल्ल नशेत असणारच अशी फुकटची दारू दिवसभर प्यायला मिळते म्हटल्यावर. खरे आहे देवाच्या नावाखाली कुठल्याही गोष्टींचा अतिरेक आसतो आपल्याकडे. आणी त्यात हे प्रकार म्हणजे…

  • असं म्हणतात, की ती दारु कुठे जाते हे शोधण्याचा खुप प्रयत्न केला गेला पण समजत नाही. बरिच जुनी मुर्ती आहे ही. जशी ज्वालाजी आहे ना हिमाचल मधे तशिच काहिशी केस असेल..

 9. Rajeev says:

  chayla…
  changla dhanda aahe kee !!!! aavdte kaam karayla milale aste !!!
  -rajeev

 10. Pingback: कालभैरवाय नमः-उज्जैन | काय वाटेल ते……..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s