चविनं खाणार..इंदौरला

इंदौर म्हंट्लं की पहिले आठवते ते आहिल्या बाई होळकरांची छत्री  – जी सध्या संपुर्णपणे दुर्लक्षित आहे, अगदी राजवाड्याच्याच वाटेवर डाव्या हाताला असलेली ही छ्त्री दिसली की माझे टेस्ट बड्स जागृत होतात. कारण  सराफा बाजारला जातांना ह्या छत्री समोरुनच वळावं लागतं.इंदौरला राजवाड्या जवळच आहे सराफा बाजार. दिवसभर इथे सोने,चांदी इत्यादिंचा व्यवहार होतो. पण संध्याकाळ झाली की मग मात्र रस्त्यावर किंवा सराफा दुकानांच्या पायऱ्यावर लोकं आपले स्टॉल्स लावतात. तसे काही परमनंट स्टॉल्स पण आहेत इथे.  इंदौरचे लोकं खाण्यापिण्याच्या बाबतित खुप चोखंदळ आहेत. इथले आमचे मित्र म्हणतात, इंदौर के लोग चटोरे है..  चटोरे म्हणजे  काय असेल बरं?
चांगल्या मोठ्या हॉटेल्स मधे खाण्याचा  फार लवकर कंटाळा येतो आणि मग सांधं काही तरी हवं हवंसं वाटायला लागतं. मग अर्थातच पाय वळतात गाडीकडे. गाडिवरच्या पदार्थांची एक निराळिच लज्जत असते.चवदार साबुदाण्याची खिचडी गाडिवर मिळते ती फक्त इंदौरलाच.. आणि टेस्ट पण अगदी अप्रतिम..या खिचडी सारखी खिचडी कधिच खा्लेली नाही. माझा एक नेहेमीचा गाडिवाला आहे . एका स्टीलच्या भांड्य़ात साबुदाणा खिचडी बनवलेली, + बटाटा कीस तळलेला + कुठलासा मसाला + लिंबु घालुन चमच्याने मिक्स करु , एका पेपरच्या द्रोणात घालुन तुम्हच्या हातात देतो तो.. सभोवताली बरेच लोकं उभे असतात साबुदाणा खिचडी हा इथला स्पेशल पदार्थ ! एखाद्या गाडिवाल्याकडे एक  दिवस तरी संध्याकाळी चक्कर असतेच प्रत्येक व्हिजीटला.
सध्या इंदौरला आलेलो आहे. म्हणजे दोन दिवस  नुसती चंगळ.. दिवसभर भरपुर कामं करायची आणि रात्री खाद्य यात्रा सुरु करायची .मनसोक्त खायचं.. ठरवुन टाकलंय की मुंबईला गेलो की नंतर मग डायटिंग सुरु करु. इथे असे पर्यंत नाहि. 🙂
आज सकाळी लवकरच उठलो. सकाळी दहावाजता काम सुरु करायचं.. म्हणुन, अंघोळ वगैरे आटोपुन बसलो होतो. हॉटेलमधे तोच तो टिपिकल ब्रेकफास्ट बफे स्प्रेड असतो. आणि इंदौरला आल्यावर, आलु पराठा, पुरीभाजी, इडली-दोसा , किंवा कॉर्नफ्लेक्स खाण्यात कसली मजा??
इथे आल्यावर सकाळचा नाश्ता हवा.. पोहा आणि जिलबी. आता दहावाजेपर्यंत तर सगळीकडला नाश्ता संपुन कचोरी सुउरु झालेली असते. पोहे हे फक्त सकाळी६ते ८ -९ पर्यंतच चांगले मिळतात. नंतर मग काही ठराविक दुकानातंच जावं लागतं.खरं तर हा शब्द जिलबी की जिलेबी हा मला नेहेमिच पडणारा प्रशन.. 🙂 पण कुठलाही असला तरी त्या पदार्थाची चव बदलत नाही.
सकाळी साधारण दहाच्या सुमारास शर्माजी आले. म्हंटलं..शर्माजी नास्ता कहां कराओगे?? हमे तो स्पेशल इंदौरी नाश्ता करना है.. शर्माजींनी अपेक्षेप्रमाणे उत्तर दिलं.. ५६दुकान.. कारण आता दहा वाजता इंदौरी नाश्ता मिळण्याचं तेच ठिकाण आहे. युजवल मी मुंबईला परत जातांना ५६ दुकानातुन आकाशचे नमकिन आणि मधुरमची मिठाई घेतल्या शिवाय  इंदौर सोडत नाही.
कार पार्क केली ५६दुकानाच्या शेजारी . समोरच बसण्याची व्यवस्था केलेली होती, भर रस्त्यावर प्लॅस्टीकच्या खुर्च्या मांडून ठेवलेल्या होत्या. एक दुकानदार गरमागरम जिलबी तळत होता.. शर्माजी म्हणे, सर , वहां चलिये, वो अच्छा बनाता है. आम्ही जिलबी +पोहा ची ऑर्डर दिली. कागदावर पोहे त्यावर आकाशचं किंवा प्रकाशचं थोडंस नमकिन..जिराळू ( हे काय असतं ते माहिती नाही पण एक टेस्टी पावडर मसाला आहे) घालुन त्याने हातात आणुन दिलं.
जगातले सर्वोत्कृष्ट पोहे हे फक्त इंदौरलाच मिळतात. असे पोहे आजपर्यंत कुठेच खाण्यात आले नाहीत. आणि जिलबी पण अगदी मस्त होती शुध्द तुपात तळलेली , खातांना त्या जिलबीचा क्रिस्पीनेस आणि चांगल्या तुपाची चव प्रत्येक घासागणिक जाणवत होती.. शर्माजी आधी नाही – नको करित होते, पण जिलबी संपवली त्यांनी!
दुसरा क्या लोगम्हंट्ल्यावर म्हंटलं भुट्टॆका किस और कचोरी.. म्हणे भुट्टेका किस शामको मिलेगा..इंदौरची आणि सिहोरची कचोरी तसेच भोपाळची पण कचोरी आणि समोसा अगदी मस्त असतात. अशी कचोरी मुंबईला मीळत नाही. उडिद डाळ घालुन, मुग डाळ घालुन, कांद्याची कचोरी, बटाटा कचोरी, हिरव्या मटरची कचोरी असे अनेक प्रकार इथे मिळतात. कचोरी अर्थात जास्त खा्ली जात नाही. पण दोन चार तर नक्किच संपवु शकता. इथे कचोरी खातांना त्यावर चटणी वगैरे टाकायची अजिबात गरज नाही. जर तुम्ही मुंबई प्रमाणे चटणी वगैरे घालुन खा, तर ओरिजिनल टेस्ट निघुन जाइल , आणि ती इंदौरची कचोरी गुज्जु कचोरी होऊन जाईल. म्हणुन तशिच खा…. सोबत फार तर तळलेली हिरवी मिरची घ्या.सिहोच्या कचोरीत थोडं मिरं जास्त असतं आणि मिऱ्याचा पंजंट पणा आणि तो फ्लेवर मला खुप आवडतो.इंदौरची सपना संगिताच्या समोरची आलु कचोरी पण अप्रतिम असते.
पिथमपुरला पुर्वी एम आय डी सी मधे जाणं व्हायचं. तेंव्हा त्या रस्त्यावर एक समोसा वाल्याचं दुकान होतं . इंदौर पासुन थोड्या अंतरावर असेल . तिथला समोसा म्हणजे माझा जिव की प्राण! त्या समोशाची भाजी एकदम वेगळी असायची. टिपिकल पंजाबी समोशाची टेस्ट नाही.. तर किंचित आंबट गोड चव असलेली ती भाजी, आणि त्यात अधुन मधुन दाताखाी येणारे शोपेचे दाणे.यांच्यामुळे अप्रतिम फ्लेवर येतो.पण या वेळेस पिथमपुरला गेलो नाही, त्यामुळे राहुन गेलं! एनी वे , देअर इज ऑलवेज नेक्स्ट टाइम…
दुपारचं लंच अगदी लाईट हवं होतं. टुरला असलो की सारखं पंजाबी खाउन कंटाळा येतो. मग वाटतं की साधी तवा रोटी ( म्हणजे पोळी) असलेली थाळी मिळाली तर??? इंदौरला गेल्या कित्येक वर्षापासुन माझं एक आवडिचं ठिकाण आहे ते म्हणजे निळकंठ भोजनालय. अगदी बेसिक भोजनालय असतं तसं आहे हे.केवळ ४० रुपयात चांगली थाळी मिळते या हॉटेलमधे. इथे अगदी घरच्या प्रमाणे साधं जेवण मिळतं. मराठी थाळी  म्हंटलं तरिही हरकत नाही. उसळ, बटाटा  भाजी, एक दुसरी भाजी, फुलका आणि साधं वरण भात. तुम्ही जेवायला बसलात, की गरम गरम फुगलेले फुलके आणुन वाढतो तो वेटर… !! मस्त आहे ही जागा. मला तर आवडते बॉ!इथल्या थाळिला बघुन सारखी गुज्जू थाळीखाणारे कदाचित नाकं मुरडतिल पण टेस्ट एकदम अप्रतिम…ना फरसाण..ना स्विट … साधं घरगुती  जेवण. अशा घरगुती जेवणाची किंमत कांही दिवस दररोज पंजाबी खा्ल्याशिवाय  कळत नाही..इंदौरला आलो की एकदा इथे व्हिजिट जरुर असते.फक्त लंच टाइममधे थांबावं लागतं, कारण  नेहेमिच वेटींग असते.
रात्री अहिल्याबाइंच्या छत्री वर फिरायला गेलो. तो घाट मला खुप आवडतो. पण ही जागा हल्ली पुर्णपणे दुर्लक्षित झालेली आहे. पुरातन विभागाने वेळीच काळजी घेतली नाही तर मात्र ही जागा नशेडी लोकांचा अड्डा होइल. रात्री जेवायचं नाही हे ठरवलंच होतं, म्हणुन सरळ सराफा च्या दिशेने चालायला लागलो.
सराफा म्हणजे इंदौर चा सराफा बाजार. दिवस भर इथे सोने -चांदी दागिन्यांचा व्यापार होतो, आणि रात्री इथे मस्त पैकी खाण्या पिण्याचे स्टॉल्स लागतात. मी आणि माझा मित्र संदिप सोबत होता. आम्ही आधी संपुर्ण बाजार फिरुन आलो.कुठे काय काय मिळतं ते बघितलं आणि नंतर जोशीच्या दुकानासमोर थांबलॊ . प्रसन्न चेहेऱ्याने त्या जोशीबुवाने स्वागत केलं.
पहिली ऑर्डर अर्थातच भुट्टेका कीस.. पहिला घास तोंडात घातला, आणि वाह!! क्या बात है.. म्हणून ऍप्रिशिएट केलं.. जोशी बुवा एकदम खुष झाले, त्यांना कळलं की मी बाहेरचा असावा म्हणुन. इथल्या या किसाची चव इतकी छान कां होते ?? मराठितच पुटपुटलो स्वतःशीच.. तर जोशी बुवा म्हणाले, की आम्ही हा किस शिजवतांना त्यात पाणिघालतां खुप सारं दुध घालुन खुप वेशिजवतो मंद आचेवर.. म्हणुन इतका टेस्टी असतो हा.एखादा लिटर दुध तरी लागतं अर्धा किलो  किस शिजवायला. .  घरी बायकोला सांगायला हवं हे या लोकांचं ट्रेड सिक्रेट.. 🙂
मोठा द्रोण भरुन तो किस रिचवला. तसा भुट्टा हा पचायला जड असतो, इतका किस खाउन पाणी प्यायलं की पोट भरणार. पण तरिही त्या जोशी बुवांची कलाकारी पहात तिथे उभा राहिलो. जोशी बुवा दही वडे बनवत होते.. कसे त्यावर कांही लिहित नाही, तुम्हीच पहा इथे व्हिडीओ पोस्ट करतोय……………… चव मात्र एकदम उत्कृष्ट होती. लक्षात राहिली ती एकाचिमटित धरुन मिठ, जिरं, आणी ओव्याची पावडर त्या दहिवड्यावर घालण्याची हातोटी.एकाच वेळी चिमटीमधे मिठ मिरं आणी ओवा पावडर धरुन क्रमा क्रमाने सोडायची दहिवड्यावर…. सुपर्ब!! व्हिडीओ मधे आहे ती… खाणं झाल्यावर शेवटी सुहास्य मुद्रेने जोशी बुवांनी निरोप घेतला आमचा हात जोडून.. पुन्हा या म्हणाले.
म्हंट्लं जोशी बुवा, तुम्हाला टाकतो आता नेटवर.. तर म्हणे मी आधीपासुनच आहे नां.. !!
थोडी पेटपुजा झाली होती, पोट पण भरलं होतं.आम्ही रमत गमत सराफ्याला फिरत होतो. समोर कढयांमधे रबडी बनवणे चालु होते.खाी कोळशाची मोठी शेगडी आणि त्यावर एक कढई. समोरच एक माणुस बसलेला , अधुन मधुन कडेला लागणारी साय मोठ्या उलथण्याने खरडुन पुन्हा त्या दुधात टाकत होता. तिथे ही गम्मत पहात पाचेक मिनिटं उभं राहिलो आणी नंतर पुढे चालायला लागलो.
एका ठिकाणी एक आजोबा समोर तयार झालेली रबडी, काला जामुन, गुलाब जामुन, आणि माझा फेवरेट मुगाचाहलवा घेउन बसले होते. मुगाचा हलवा पुर्णपणे साजुक तुपात एका परातित बुडलेला.. इथे कॉलेस्ट्रॉल चा विचार करायचा नाही. 🙂 कागदी द्रोणात एक  मुगाचा हलवा, आणि नंतर एक काला जामुन +रबडी घेतली . हे इंदौरचं स्पेशल कॉम्बो.. सगळं झालं आणि पैसे द्यायला लागलो तर त्या आजोबांनी समोर एका द्रोणामधे दोन लहानसे गुलाबजाम सदृष्य पदार्थ टाकले आणि द्रोण समोर केला. म्हणे साब ट्राय करो.. एक एक पिस आम्ही उचलला आणि तोंडात घातला.. आणि त्या पिस बरोबर आम्ही पण विरघळलोच…. म्हंटला, ये क्या है? तर म्हणाला की मुगाच्या डाळिचे गुलाबजाम. अप्रतिम पदार्थ आहे हा. इतका सुंदर पदार्थ मुगाच्या डाळिचा असु शकतो ??? मुगाची भजी सदृष्य पिसेस, साजुक तुपात तळुन पाकामधे भिजलेली..  अप्रतिम.. जर कधी इंदौरला याल ना, तर इथे नक्कीच भेट द्या.
इथे पार्किंगची प्रॉब्लेम आहे , त्यामुळे रिक्षानेच आलात तर बरं.. सगळं झालं आणि आकंठ तृप्त होऊन आम्ही बाहेर निघालो. तर समोरच मटका कुल्फी वाला दिसला. समोर पाटी होती.. १९५० से प्रसिध्द.. याच्याकडली मटका कुल्फी घेतली ड्रायफ्रूट वाली. पण अजिबात चांगली नव्हती. हे अग्रवालचं दुकान टाळा. पहिली गोष्ट म्हणजे जरी जाहिरात केली होती मटका कुल्फी ची तरी पण इथे विकली जाणारी कुल्फी मटका कुल्फी नव्हती. आतल्या फ्रिझर मधुन काढुन दिली त्यानी कुल्फी. द्सरं म्हणजे चविच्या नावानी अगदी चांग भलं…. असो..कुल्फी अक्षरशः फेकुन दिली.  😦
इंदौरच्या अजुन बऱ्याच चांगल्या जागा आहेत खाण्यासाठी.. ऍज युजवल चोखी ढाणी पण बरी आहे … आणि अजुन बरंच काही असेल. पण मी इंदौरचा नसल्यामूळे मला जास्त माहिती नाही. जर तुम्हाला इंदौरच्या काही जागा माहिती असतिल , तर या लेखावर कॉमेंट्स देउन माहिती द्याल कां म्हणजे पुढच्या वेळेस भेट देता येइल?

इंदौर म्हंटलं की पहिले आठवते ते आहिल्या बाई होळकरांची छत्री  – जी सध्या संपुर्ण पणे दुर्लक्षित आहे, अगदी राजवाड्याच्या वाटेवर डाव्या हाताला असलेली ही छ्त्री दिसली की माझे टेस्ट बड्स जागृत होतात. कारण  सराफा बाजारला जातांना ह्या छत्री समोरून वळावं लागतं.इंदौरला राजवाड्या जवळच आहे सराफा बाजार. दिवसभर इथे सोने,चांदी इत्यादींचा व्यवहार होतो. पण संध्याकाळ झाली की मग मात्र रस्त्यावर किंवा सराफा दुकानांच्या पायऱ्यावर लोकं आपले स्टॉल्स लावतात. तसे काही परमनंट स्टॉल्स पण आहेत इथे.  इंदौरचे लोकं खाण्यापिण्याच्या बाबतीत खूपच चोखंदळ आहेत. इथले आमचे मित्र म्हणतात, इंदौर के लोग चटोरे है..  चटोरे म्हणजे  काय असेल बरं?

56 dukanचांगल्या मोठ्या हॉटेल्स मधे खाण्याचा  फार लवकर कंटाळा येतो आणि मग काही तरी हवं हवंसं वाटायला लागतं. मग अर्थातच पाय वळतात गाडीकडे. गाडीवरच्या पदार्थांची एक निराळीच लज्जत असते.चवदार साबुदाण्याची खिचडी गाडीवर मिळते ती फक्त इंदौरलाच.. आणि टेस्ट पण अगदी अप्रतिम..या खिचडी सारखी खिचडी कधीच खा्लेली नाही. माझा एक नेहेमीचा गाडीवाला आहे . एका स्टीलच्या भांड्यात साबुदाणा खिचडी बनवलेली, + बटाटा कीस तळलेला + कुठलासा मसाला + लिंबु घालुन चमच्याने मिक्स करु , एका पेपरच्या द्रोणात घालुन तु्मच्या हातात देतो तो.. सभोवताली बरेच लोकं उभे असतात साबुदाणा खिचडी हा इथला स्पेशल पदार्थ ! एखाद्या गाडी वाल्याकडे एक  दिवस तरी संध्याकाळी चक्कर असतेच प्रत्येक व्हिजीटला.

सध्या इंदौरला आलेलो आहे. म्हणजे दोन दिवस  नुसती चंगळ.. दिवसभर भरपूर कामं करायची आणि रात्री खाद्य यात्रा सुरु करायची .मनसोक्त खायचं.. ठरवून टाकलंय की मुंबईला गेलो की नंतर मग डायटींग सुरु करु. इथे असे पर्यंत नाही. 🙂

आज सकाळी लवकरच उठलो. सकाळी दहा वाजता काम सुरु करायचं.. म्हणून, अंघोळ वगैरे आटोपून बसलो होतो. हॉटेलमधे तोच तो टिपिकल ब्रेकफास्ट बफे स्प्रेड असतो. आणि इंदौरला आल्यावर, आलु पराठा, पुरी भाजी, इडली-दोसा , किंवा कॉर्नफ्लेक्स खाण्यात कसली मजा??

इथे आल्यावर सकाळचा नाश्ता हवा.. पोहा आणि जिलबी. आता दहा वाजेपर्यंत तर सगळी कडला नाश्ता संपुन कचोरी सुरु झालेली असते. पोहे हे फक्त सकाळी ६ते ८ -९ पर्यंतच चांगले मिळतात. नंतर मग काही ठरावीक दुकानातच जावं लागतं.खरं तर हा शब्द जिलबी की जिलेबी हा मला नेहेमीच पडणारा प्रशन.. 🙂 पण कुठलाही असला तरी त्या पदार्थाची चव बदलत नाही.

सकाळी साधारण दहाच्या सुमारास शर्माजी आले. म्हंटलं..शर्माजी नास्ता कहां कराओगे?? हमे तो स्पेशल इंदौरी नाश्ता करना है.. शर्माजींनी अपेक्षेप्रमाणे उत्तर दिलं.. ५६ दुकान.. कारण आता दहा वाजता इंदौरी नाश्ता मिळण्याचं तेच ठिकाण आहे. युजवल मी मुंबईला परत जातांना ५६ दुकानातून आकाशचे नमकिन आणि मधुरमची मिठाई घेतल्या शिवाय  इंदौर सोडत नाही.

कार पार्क केली ५६दुकानाच्या शेजारी . समोरच बसण्याची व्यवस्था केलेली होती, भर रस्त्यावर प्लॅस्टीकच्या खुर्च्या मांडून ठेवलेल्या होत्या. एक दुकानदार गरमागरम जिलबी तळत होता.. शर्माजी म्हणे, सर , वहां चलिये, वो अच्छा बनाता है. आम्ही जिलबी +पोहा ची ऑर्डर दिली. कागदावर पोहे त्यावर आकाशचं किंवा प्रकाशचं थोडंस नमकिन..जिराळू ( हे काय असतं ते माहिती नाही पण एक टेस्टी पावडर मसाला आहे) घालुन त्याने हातात

1poha jalebi

आणुन दिलं.

जगातले सर्वोत्कृष्ट पोहे हे फक्त इंदौरलाच मिळतात. असे पोहे आजपर्यंत कुठेच खाण्यात आले नाहीत. आणि जिलबी पण अगदी मस्त होती शुध्द तुपात

तळलेली , खातांना त्या जिलबीचा क्रिस्पीनेस आणि चांगल्या तुपाची चव प्रत्येक घासागणिक जाणवत होती.. शर्माजी आधी नाही – नको करित होते, पण जिलबी संपवली त्यांनी!

2 dalkachori and jilebi

दुसरा क्या लोगम्हंट्ल्यावर म्हंटलं भुट्टॆका किस और कचोरी.. म्हणे भुट्टेका किस शामको मिलेगा..इंदौरची आणि सिहोरची कचोरी तसेच भोपाळची पण कचोरी आणि समोसा अगदी मस्त असतात. अशी कचोरी मुंबईला मीळत नाही. उडिद डाळ घालुन, मुग डाळ घालुन, कांद्याची कचोरी, बटाटा कचोरी, हिरव्या मटरची कचोरी असे अनेक प्रकार इथे मिळतात. कचोरी अर्थात जास्त खा्ली जात नाही. पण दोन चार तर नक्किच संपवु शकता. इथे कचोरी खातांना त्यावर चटणी वगैरे टाकायची अजिबात गरज नाही. जर तुम्ही मुंबई प्रमाणे चटणी वगैरे घालुन खा, तर ओरिजिनल टेस्ट निघुन जाइल , आणि ती इंदौरची कचोरी गुज्जु कचोरी होऊन जाईल. म्हणून तशीच खा…. सोबत फार तर तळलेली हिरवी मिरची घ्या.सिहोच्या कचोरीत थोडं मिरं जास्त असतं आणि मिऱ्याचा पंजंट पणा आणि तो फ्लेवर मला खुप आवडतो.इंदौरची सपना संगिताच्या समोरची आलु कचोरी पण अप्रतिम असते.

पिथमपुरला पुर्वी एम आय डी सी मधे जाणं व्हायचं. तेंव्हा त्या रस्त्यावर एक समोसा वाल्याच दुकान होतं . इंदौर पासुन थोड्या अंतरावर असेल . तिथला समोसा म्हणजे माझा जिव की प्राण! त्या समोशाची भाजी एकदम वेगळी असायची. टिपिकल पंजाबी समोशाची टेस्ट नाही.. तर किंचित आंबट गोड चव असलेली ती भाजी, आणि त्यात अधुनमधुन दाताखाी येणारे शोपेचे दाणे.यांच्यामुळे अप्रतिम फ्लेवर येतो.पण या वेळेस पिथमपुरला गेलो नाही, त्यामुळे राहुन गेलं! एनी वे , देअर इज ऑलवेज नेक्स्ट टाइम…

5 nilkant thaliदुपारचं लंच अगदी लाईट हवं होतं. टुरला असलो की सारखं पंजाबी खाउन कंटाळा येतो. मग वाटतं की साधी तवा रोटी ( म्हणजे पोळी) असलेली थाळी मिळाली तर??? इंदौरला गेल्या कित्येक वर्षापासून माझं एक आवडीचं ठिकाण आहे ते म्हणजे निळकंठ भोजनालय. अगदी बेसिक भोजनालय असतं तसं आहे हे.केवळ ४० रुपयात चांगली थाळी मिळते या हॉटेलमधे. इथे अगदी घरच्या प्रमाणे साधं जेवण मिळतं. मराठी थाळी  म्हंटलं तरीही हरकत नाही. उसळ, बटाटा  भाजी, एक दुसरी भाजी, फुलका आणि साधं वरण भात. तुम्ही जेवायला बसलात, की गरम गरम फुगलेले फुलके आणून वाढतो तो वेटर… !! मस्त आहे ही जागा. 4 nilkanthमला तर आवडते बॉ!इथल्या थाळीला बघुन सारखी गुज्जू थाळीखाणारे कदाचित नाकं मुरडतिल पण टेस्ट एकदम अप्रतिम…ना फरसाण..ना स्विट … साधं घरगुती  जेवण. अशा घरगुती जेवणाची किंमत कांही दिवस दररोज पंजाबी खा्ल्याशिवाय  कळत नाही..इंदौरला आलो की एकदा इथे व्हिजिट जरुर असते.फक्त लंच टाइममधे थांबावं लागतं, कारण  नेहेमीच वेटींग असते.

रात्री अहिल्याबाइंच्या छत्री वर फिरायला गेलो. तो घाट मला खुप आवडतो. पण ही जागा हल्ली पुर्णपणे दुर्लक्षित झालेली आहे. पुरातन विभागाने वेळीच काळजी घेतली नाही तर मात्र ही जागा नशेडी लोकांचा अड्डा होइल. रात्री जेवायचं नाही हे ठरवलंच होतं, म्हणून सरळ सराफा च्या दिशेने चालायला लागलो.

सराफा म्हणजे इंदौर चा सराफा बाजार. दिवस भर इथे सोने -चांदी दागिन्यांचा व्यापार होतो, आणि रात्री इथे मस्त पैकी खाण्या पिण्याचे स्टॉल्स लागतात. मी आणि माझा मित्र संदिप सोबत होता. आम्ही आधी संपुर्ण बाजार फिरुन आलो.कुठे काय काय मिळतं ते बघितलं आणि नंतर जोशीच्या दुकानासमोर थांबलॊ . प्रसन्न चेहेऱ्याने त्या जोशीबुवाने स्वागत केलं.

पहिली ऑर्डर अर्थातच भुट्टेका कीस.. पहिला घास तोंडात घातला, आणि वाह!! क्या बात है.. म्हणून ऍप्रिशिएट केलं.. जोशी बुवा एकदम खुष झाले, त्यांना कळलं की मी बाहेरचा असावा म्हणून. इथल्या या किसाची चव इतकी छान कां होते ?? मराठीतच पुटपुटलो स्वतःशीच.. तर जोशी बुवा म्हणाले, की आम्ही हा किस शिजवतांना त्यात पाणीघालतां खुप सारं दुध घालुन खुप वेशिजवतो मंद आचेवर.. म्हणुन इतका टेस्टी असतो हा.एखादा लिटर दुध तरी लागतं अर्धा किलो  किस शिजवायला. .  घरी बायकोला सांगायला हवं हे या लोकाचं ट्रेड सिक्रेट.. 🙂

मोठा द्रोण भरुन तो किस रीचवला. तसा भुट्टा हा पचायला जड असतो, इतका किस खाउन पाणी प्यायलं की पोट भरणार. पण तरिही त्या जोशी बुवांची कलाकारी पहात तिथे उभा राहिलो. जोशी बुवा दही वडे बनवत होते.. कसे त्यावर कांही लिहित नाही, तुम्हीच पहा इथे व्हिडीओ पोस्ट करतोय……………… चव मात्र एकदम उत्कृष्ट होती. लक्षात राहिली ती एका चिमटित धरुन  मीठ, जिरं, आणी ओव्याची पावडर त्या दहिवड्यावर घालण्याची हातोटी.एकाच वेळी चिमटीमधे मिठ मिरं आणी ओवा पावडर धरुन क्रमा क्रमाने सोडायची दहिवड्यावर…. सुपर्ब!! व्हिडीओ मधे आहे ती… खाणं झाल्यावर शेवटी सुहास्य मुद्रेने जोशी बुवांनी निरोप घेतला आमचा हात जोडून.. पुन्हा या म्हणाले.

म्हंट्लं जोशी बुवा, तुम्हाला टाकतो आता नेटवर.. तर म्हणे मी आधीपासूनच आहे नां.. !!

[youtube=http://www.youtube.com/watch?v=5pMe4sAVviQ]

2 rabadi makingथोडी पेटपुजा झाली होती, पोट पण भरलं होतं.आम्ही रमत गमत सराफ्याला फिरत होतो. समोर कढयांमधे रबडी बनवणे चालू होते.खाी कोळशाची मोठी शेगडी आणि त्यावर एक कढई. समोरच एक माणुस बसलेला , अधून मधून कडेला लागणारी साय मोठ्या उलथण्याने खरडून पुन्हा त्या दुधात टाकत होता. तिथे ही गम्मत पहात पाचेक मिनिटं उभं राहिलो आणि नंतर पुढे चालायला लागलो.

sweet meat shopएका ठिकाणी एक आजोबा समोर तयार झालेली रबडी, काला जामुन, गुलाब जामुन, आणि माझा फेवरेट मुगाचाहलवा घेउन बसले होते. मुगाचा हलवा पुर्णपणे साजुक तुपात एका परातित बुडलेला.. इथे कॉलेस्ट्रॉल चा विचार करायचा नाही. 🙂 कागदी द्रोणात एक  मुगाचा हलवा, आणि नंतर एक काला जामुन +रबडी घेतली . हे इंदौरचं स्पेशल कॉम्बो.. सगळं झालं आणि पैसे द्यायला लागलो तर त्या आजोबांनी समोर एका द्रोणामधे दोन लहानसे गुलाबजाम सदृष्य पदार्थ टाकले आणि द्रोण समोर केला. म्हणे साब ट्राय करो.. एक एक पिस आम्ही उचलला आणि तोंडात घातला.. आणि त्या पिस बरोबर आम्ही पणविरघळलोच…. म्हंटला, ये क्या है? तर म्हणाला की मुगाच्या डाळिचे गुलाबजाम. अप्रतिम पदार्थ आहे हा. इतका सुंदर पदार्थ मुगाच्या डाळिचा असु शकतो ??? मुगाची भजी सदृष्य पिसेस, साजुक तुपात तळुन पाकामधे भिजलेली..  अप्रतिम.. जर कधी इंदौरला याल ना, तर इथे नक्कीच भेट द्या.

[youtube=http://www.youtube.com/watch?v=lB5fqly_htg]

icecreamइथे पार्किंगची प्रॉब्लेम आहे , त्यामुळे रिक्षानेच आलात तर बरं.. सगळं झालं आणि आकंठ तृप्त होऊन आम्ही बाहेर निघालो. तर समोरच मटका कुल्फी वाला दिसला. समोर पाटी होती.. १९५० से प्रसिध्द.. याच्याकडली मटका कुल्फी घेतली ड्रायफ्रूट वाली. पण अजिबात चांगली नव्हती. हे अग्रवालचं दुकान टाळा. पहिली गोष्ट म्हणजे जरी जाहिरात केली होती मटका कुल्फी ची तरी पण इथे विकली जाणारी कुल्फी मटका कुल्फी नव्हती. आतल्या फ्रिझर मधुन काढुन दिली त्यानी कुल्फी. द्सरं म्हणजे चवीच्या नावानी अगदी चांग भलं…. असो..कुल्फी अक्षरशः फेकुन दिली.  😦

इंदौरच्या अजुन बऱ्याच चांगल्या जागा आहेत खाण्यासाठी.. ऍज युजवल चोखी ढाणी पण बरी आहे … आणि अजुन बरंच काही असेल. पण मी इंदौरचा नसल्यामूळे मला जास्त माहिती नाही. जर तुम्हाला इंदौरच्या काही जागा माहिती असतील , तर या लेखावर कॉमेंट्स देउन माहिती द्याल कां म्हणजे पुढच्या वेळेस भेट देता येइल?

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा and tagged , , . Bookmark the permalink.

31 Responses to चविनं खाणार..इंदौरला

 1. Nilesh says:

  wah kaka chan!!
  ek ek padharath che varnan vachun tondala paani sutale….

 2. jkbhagwat says:

  Hi Mr Mahendra,
  I am from Indore , presently settled inPune .The masala in Sabudana Khichadi, is avaiable in Matothya Bazar right behind sarafa .In fact you can also buy poha masala from there and use it at home.
  Fond memories of Indore revived by your lovely piece of writhing.
  Regards
  JKBhagwat
  sep19th

  • धन्यवाद. पुढल्या वेळेस इंदौरला गेलो की नक्की आणणार मसाला.. मला आमचे शर्माजी म्हणाले की ते जिरालु असतं.. पण मला काही निटसं कळलं नाही.तुम्ही माहिती दिलित आता, पुढच्या वेळी नक्की भेट मोठ्या बाजाराला.

 3. D D says:

  खूप छान वर्णन केलंय तुम्ही! पण हा “भुट्टे का कीस” कसा तयार केलेला असतो हे जाणून घ्यायला आवडेल.

 4. भुट्टेका कीस.. म्हणजे भुट्टा किसुन त्याचा केलेला उपमा. खुपच टेस्टी असतो. जोशी बुबा म्हणाले की शिजवतांना चांगलं एक लीटरभर दुध घालायचं.. मग छान टेस्ट येते.. आपण घरी करतांना पाणी घालतो ते करु नका असं जोशी म्हणाले. आणि अमेरिकन कॉर्न + देशी कॉर्न चं मिक्स करुन किसायचे.. या पेक्षा जास्त मला तरी माहिती नाही..

 5. sadanand says:

  pudhacha veles bum chi khasata kachori khaun paha.tondat thewalavar virghalate.
  kacnh mandircha pudhe milel.
  Nagar nigam roadvar ravichi aalo kachori eadam tasty.
  Apana swits malgunj, mithai eadam lajawab.
  pruthavilok bojnalya cloth market, thali chawdar.
  baki indorela aalyavar.

  sadaindori, sadanand

 6. rohan says:

  दादा … आता तुझा एक मस्त खातानाचा फोटो पाठव मला … माझ्या फ़ूडब्लॉगवर तुझा फोटो असावा असे मला वाटते आहे … 😀 तू सुद्धा मला प्रेरणा देतो आहेस खाण्यासाठी… 😉

  • रोहन
   डायटिंग करायला सांगितलंय डॉक्टरांनी. ओव्हर वेट झालोय चांगला ९६ किलो झालोय. 🙂 खातांनाचा फोटॊ..अजुन तरी काढलेला नाही. पण पाठविन तुला.

 7. ravindra says:

  आपली आजची पोस्ट आता घरी आल्यावर वाचली आणि मी जुन्या आठवणीत गेलो. १९७७ ते साधारणपणे १९८२-८३ पर्यंत मी इंदौर येथे engineering शिकायला होतो. ते दिवस माझ्या डोळ्यासमोर आले. वर्णन वाचून व् व्हिडियो बघून तर अक्षरशः तोंडाला पानी सुटले. ती जिलेबी व सकाळी सकाळी जिलेबी सोबत दूध, आपल्या महाराष्ट्रात त्याला विचित्र प्रकार म्हणतात, त्याची मजा काही औरच. खाण्याच्या व व्यवहाराच्या बाबतीत इंदौरला तोड़ नहीं हे मात्र नक्की. आपल्या देशातील माझ एकमेव आवडत शहर म्हणजे इंदौरच. आणखी एक नोंद घेतली. आता पर्यंत आपला फक्त फोटो बघितला होता ब्लॉगवर, आज आवाज ही ऐकला.

  • रविंद्र
   माझी पण आवडती जागा इंदौर.मला अगदी मनापासुन आवडते.. सध्या वजन कमी करण्याचा प्रयत्न करतोय, तरी पण इंदौरला गेलो की सगळं डायटिंग वगैरे विसरुन मस्त खाणं सुरु करतो…जिलबी आणि रबडी, किंवा गुलाबजाम आणी रबडी पण मला आवडते. पण इंदौरच्या मुगाच्या हलव्याला तोड नाही. घरी जमत नाही तसा…

 8. bhaanasa says:

  महेंद्र, किती किती जळवायचे माणसाने? एक एक पदार्थ आणि फोटो वर तुझे रसभरीत वर्णन….याला म्हणतात दूष्टपणा, हाहाहा. दहीभल्ला मस्तच. चांगला बनवला तरच अप्रतिम लागतो नाहीतर ते बरेचदा उडप्यांकडे दगडासारखेच मिळतात. इंदौर बद्दल मैत्रिणींकडून( स्थानिक ) खूप ऐकलेय आहेच आता हे वाचून तोंडाला पाणी सुटले. मस्तच.

  • भाग्यश्री
   पुढल्या वेळेस इकडे आली की इंदौरला चक्कर मार. खाण्यासाठी तरी एकदा इकडे आलंच पाहिजे…. जोशी बुवांच्या कडचा दहीभल्ला खुपच सॉफ्ट आणि अप्रतिम असतो..आणि भुट्टयाचा कीस पण. 🙂

 9. ravindra says:

  महेंद्र
  रहायला नासिकला असून ही मागच्या २० वर्ष्यापासून इंदौरला न जाता आल्या बद्दल खंत वाटते. मनातील खंत प्रताम्च आपल्या कड़े व्यक्त करीत आहे. कोणाला सांगू नका बर का?

 10. D D says:

  भुट्टे का कीस ची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! आमच्याकडे आम्ही स्वीट कॉर्नचे दाणे मिक्सरमधून काढून त्याला फ़ोडणी देतो आणि त्याला मक्याचा चिवडा असे म्हणतो. पण स्वीट कॉर्नच्या दाण्यांचाच भरपूर रस निघत असल्याने त्याला पाणी किंवा दूध घालत नाही, पण तो कोरडा व्हावा म्हणून पोहे घालतो. आता तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने दूध घालून एकदा प्रात्यक्षिक करून बघणार आहे.

 11. याच्या टेस्ट चं कारणं म्हणजे भरपुर वेळ शिजवणं.. आणि ते पण दुधामधे. ..मुगाची रसभरी पण मस्त असते बरं कां.. जरुर ट्राय करा. 🙂

 12. amol says:

  आई शपथ भूक चाळ व्ली तुम्ही तर, आता भारतात आल्यावर एथे जावाच लागेल. कंटललो ह्या बेचव अमेरिकन जेवणाला. तुम्ही कोल्हापूर ला कधी तरी. तुम्हाला दाखवें न अशीच काही ठिकाणे

  • अमोल,
   कोल्हापुरचं वुड हाउस एवढं एकच माझं आवडिचं, आणि अंबाबाईच्या मंदिरा जवळचा तो मिसळवाला. नक्की नांव आठवत नाही आता.

   • amol says:

    U been to kop too? next time gelat tar padma guest house aani parag je kavala nakyala aahe te try kara. Tumhi boltay to chorge misal vala, but last time i been there it was not so tasty. pudchya velela udyam nagart fadatare try kara. ekdam zanzanit…………..

 13. urmila wadwekar says:

  re baba indore che pohe ha maza weak point aahe. sabudana khichadi khalli navhati.
  aata nakki khain. thanks to u and j k bhagavat. pohyacha aani sabudana khichadi cha masala lothe milato ti mhiti dilyamule.

 14. sonalw says:

  रात्री जेवायचं नाही हे ठरवलंच होतं… ya wakyane surwaat aani Bhutte ka kis, dahi bhalla, kulfi via mug halwa and mug gulabjam?
  wartun ‘पोट पण भरलं होतं’ hehi surwaatilach saanglitlat…LOL.
  Tondala paani sutal matr. kadhi ekda Indore chi trip maarte as jhalay. Majha aatebhau raahto tithe. lahanpani ek donda gele hote tevdhich. Ha lekh waachun aata parat jawas wattay.

 15. रात्री जेवायचं नाही हे ठरवलंच होतं
  माझा तो खानदानी गुण आहे. माझा काका शिरिश कणेकरचा खास मित्र. शिरिश जेंव्हा लोकसत्ता मधे होता, तेंव्हा माझा काका नंदु कुलकर्णी त्याच्याच बरोबर इंडियन एक्सप्रेसला ला होता. त्याने एक लेख लिहिलाय काकावर , त्याच्या कधिही आणि कितिही खाउ शकण्याच्या कॅपॅसिटीवर कुठल्याशा एका पुस्तकात.
  मला वाटतं हा गुण हेरिडेटरी आहे माझ्यात.. 🙂

 16. महेंद्र,
  पुढच्याच आठवड्यात इंदौरला सहलीला जातोय. चांगला तीन दिवस मुक्काम आहे. आज मुद्दाम तुमचा हा लेख शोधून परत वाचला. आत्तापासून तोंडाला पाणी सुटलंय!

  -निरंजन

 17. Pingback: प्रवासवर्णन – पंचमढी – भेडाघाट – इंदौर : इंदौरची खादाडी (भाग ५ अंतिम) « सुकामेवा

 18. सुनीर says:

  छे छे छे .. मुगाचा हलवा काय , रबडी काय , मुगाचे गुलाबजाम काय … अगदी पाणी आणि डोळ्यात … आपला तोंडात ….

  • सुनीर
   माझा पुन्हा प्लान आहे या महिन्यात इंदौर ला जायचा.. 🙂 ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.

 19. Ganesh Budkhale says:

  Indore chi panipuri pan khup chaan aahe. Tithe 10 different flavours madhe milate..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s