सिव्हिक सेन्स

आपल्या प्रत्येकाच्याच घरात वडिलधारी माणसं असतात. मग ते वडिल असो, आई असो, की आजी आजोबा असोत. आपल्या काही वाईट सवयींच्या मुळे त्यांना किती त्रास होतो ?? वय झालं की गुडघ्याचा त्रास हा बऱ्याच लोकांना सुरु होतो. गुडघ्याचा त्रास सुरु झाला की  मग मात्र जिने चढणं आणी उतरणं  ही एक शिक्षा होते.आधार घेतल्या शिवाय पाय टेकवला तर अगदी जीवघेण्या कळा येतात.
अरे बेटा  राजा, जरा मला घेउन चलतो का रे मंदिरात , असं आजी म्हणाली की मी लहान पणी पळ काढायचो. आज त्या गोष्टीचा खुप पश्चाताप होतो. वाटतं, थोडा वेळ दिला असता आजी ला तर काय झालं असतं?? अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या होऊन गेल्यावर आपल्याला खुप पश्चाताप होतो, आणि वाटतं.. अरे.. मी जर असं नसतं केलं.. किंवा असा नसतो वागलो तर किती बरं झालं असतं? पण आता वेळ निघुन गेलेली असते आणि आपल्या हातात फक्त रहात ते पश्चाताप करणं!!!
समाजाचा सिव्हिक सेन्स जरा कमिच झाल्या सारखा वाटतो मला आजकाल..दुर कशाला, एक साधी गोष्ट घ्या.. पान खाउन थुंकणे…   बरेच लोकं प्रवास करतांना कारची  खिडकी खाली करुन थुंकतात, मग ते मागच्या दुचाकी स्वाराच्या अंगावर उडलं तरिही त्याची यांना काळजी नसते. दुचाकी स्वार पण काही कमी नाहित, हेल्मेट तर मागे कॅरियरला लाउन ठेवलेलं असतं, त्यामुळे डाविकडे तोंड करुन पचकन पिचकारी मारतात, तेंव्हा पायी चालणाऱ्यांच्या अंगावर वगैरे उडेल याची अजिबात त्यांना पर्वा नसते.आपली पिचकारी मारायची आणि भर्ऱकन निघुन जायचं. जर एखादा माणुस मागुन ओरडलाच तर इंग्रजांनी दिलेला एक शब्द आहेच ना साथीला. “सॉरी”!!
म्हाताऱ्या लोकांना जीने चढतांना किंवा उतरतांना जिन्याच्या भिंतीचा आधार लागतो. माझे आई वडिल जेंव्हा मुंबईला आले होते- मागच्या आठवड्यात तेंव्हा एके ठिकाणी आम्ही गेलो असतांना आईला भिंतीचा आधार घेउन उतरावा लागला होता जीना.
भिंतिवर बऱ्याच ठिकाणी कोणी तरी *******ने (जितक्या  शिव्या असतित तितक्या )भिंतिवर तंबाखु, पान, आणी बहुतेक गोवा खाउन थुंकुन ठेवलं होतं.खुप राग आला, आणि वाईट पण वाटलं, की आपल्या देशात इतका पण सिव्हिक सेन्स असु नये?? आईला त्या घाणीने भरलेल्या भिंतीचा आधार घ्यावा लागला. वडिलांचे वय ८१ च्या वर आणी आईचे ७६ तरी असेल.
आई जिना उतरत असतांना हे पाहिलं आणि हा प्रसंग कायम लक्षात रहावा म्हणुन मागुन फोटॊ काढला. तेंव्हाच ठरवलं होतं की यावर कधी तरी लिहायचं. पण राहुन गेलं. आज जेंव्हा जुने फोटो पहातोय तेंव्हा दिसला हा फोटो म्हणुन आठवण झाली.
माझी एक कळकळीची विनंती आहे..  जर तुम्ही कोणी तंबाखु किंवा पान वगैरे खात असाल, तर या पुढे कृपया जिन्याच्या भिंतिंवर थुंकू नका. कदाचित उद्या तुमच्याच आई वडिलांना त्या भिंतीचा आधार लागेल… !!

civic senseआपल्या प्रत्येकाच्याच घरात वडिलधारे माणसं असतात. मग ते वडील  असो, आई असो, की आजी आजोबा असोत. आपल्या काही वाईट सवयीच्या मुळे त्यांना किती त्रास होतो ?? वय झालं की गुडघ्याचा त्रास हा बऱ्याच लोकांना सुरु होतो. गुडघ्याचा त्रास सुरु झाला की  मग मात्र जिने चढणं आणि उतरणं  ही एक शिक्षा होते.आधार घेतल्या शिवाय पाय टेकवला तर अगदी जीवघेण्या कळा येतात.

अरे बेटा  राजा, जरा मला घेउन चलतो का रे मंदिरात , असं आजी म्हणाली की मी लहान पणी पळ काढायचो. आज त्या गोष्टीचा खूप पश्चात्ताप होतो. वाटतं, थोडा वेळ दिला असता आजी ला तर काय झालं असतं?? अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या होऊन गेल्यावर आपल्याला खूप पश्चात्ताप होतो, आणि वाटतं.. अरे.. मी जर असं नसतं केलं.. किंवा असा नसतो वागलो तर किती बरं झालं असतं? पण आता वेळ निघून गेलेली असते आणि आपल्या हातात फक्त रहात ते पश्चात्ताप करणं!!!

समाजाचा सिव्हिक सेन्स जरा कमीच झाल्या सारखा वाटतो मला आजकाल..दुर कशाला, एक साधी गोष्ट घ्या.. पान खाऊन थुंकणे…   बरेच लोकं प्रवास करतांना कारची  खिडकी खाली करुन थुंकतात, मग ते मागच्या दुचाकी स्वाराच्या अंगावर उडल तरीही त्याची यांना काळजी नसते. दुचाकी स्वार पण काही कमी नाहीत, हेल्मेट तर मागे कॅरीयरला लावून ठेवलेलं असतं, त्यामुळे डावी कडे तोंड करुन पचकन पिचकारी मारतात, तेंव्हा पायी चालणाऱ्या लोकांच्या अंगावर वगैरे उडेल याची अजिबात त्यांना पर्वा नसते.आपली पिचकारी मारायची आणि भर्ऱकन निघून जायचं. जर एखादा माणुस मागून ओरडलाच तर इंग्रजांनी दिलेला एक शब्द आहेच ना साथीला. “सॉरी”!!

म्हाताऱ्या लोकांना जीने चढतांना किंवा उतरताना जिन्याच्या भिंतीचा आधार लागतो. माझे आई वडील जेंव्हा मुंबईला आले होते- मागच्या आठवड्यात तेंव्हा एके ठिकाणी आम्ही गेलो असतांना आईला भिंतीचा आधार घेउन उतरावा लागला होता जीना.जिथे गेलो होतो, ती एक दादरमधली खुप जुनी बिल्डींग होती. आणि त्या बिल्डिंगमधे रहाणारे पण अगदी १०० टक्के मराठी लोकंच होते. तरी पण इतका गलिच्छ पणा ?? काय फायदा आहे उगाच इतरांच्या नावे बोटं मोडण्यात?

भिंतिवर बऱ्याच ठिकाणी कोणी तरी *******ने (जितक्या  शिव्या असतीत तितक्या )भिंतीवर तंबाखू, पान, आणि बहुतेक गोवा खाऊन थूंकून   ठेवलं होतं.खुप राग आला, आणि वाईट पण वाटलं, की आपल्या देशात इतका पण सिव्हिक सेन्स असू नये?? आईला त्या घाणीने भरलेल्या भिंतीचा आधार घ्यावा लागला. वडिलांचे वय ८१ च्या वर आणि आईचे ७६ तरी असेल.त्यातल्या त्यात नशिबाची गोष्ट म्हणजे आईला दिसत ही नव्हते व्यवस्थित त्यामुळे तिला मानसिक त्रास तरी झाला नाही त्या  घाणेरड्या भिंतीवर हात टेकवल्याचा, ( बरं हात धरुन आधार दिलेला पण आवडत नाही या मोठ्या लोकांना).

आई जिना उतरत असतांना हे पाहिलं आणि हा प्रसंग कायम लक्षात रहावा म्हणून मागून फोटॊ काढला. तेंव्हाच ठरवलं होतं की यावर कधी तरी लिहायचं. पण राहुन गेलं. आज जेंव्हा जुने फोटो पहातोय तेंव्हा दिसला हा फोटो म्हणून आठवण झाली.

माझी एक कळकळीची विनंती आहे..  जर तुम्ही कोणी तंबाखू किंवा पान वगैरे खात असाल, तर या पुढे कृपया जिन्याच्या भिंतिंवर थुंकू नका. कदाचित उद्या तुमच्याच आई वडिलांना त्या भिंतीचा आधार लागेल… !!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , . Bookmark the permalink.

16 Responses to सिव्हिक सेन्स

 1. rohan says:

  कोणीतरी म्हटले आहे … “Common sense is most uncommon in this world … ” तू बरोबर म्हटले आहेस … “समाजाचा सिव्हिक सेन्स जरा कमीच झाल्यासारखा वाटतो मला आजकाल.”

  असे कोणी दिसले की एक सणसणीत ठेवून द्यावीशी वाटते मला कधीतरी. 😦

  • रोहन
   माझी पण बरेचदा इच्छा होते. मी कधीही कुठेही काहिही करु शकतो. पुर्वी एकदा एका भैय्याला एड्स ची माहिती दिली होती रेल्वे प्लॅटफॉर्म वर. खरंच.. घरी आल्यावर बायको म्हणाली आता जरा आवरतं घ्या. वयाप्रमाणे वागा.. :)पण स्वतःचे रिफ्लेक्स मी बरेचदा कंट्रोल करु शकत नाही.
   तो लेख इथे आहे बघ.. पुर्वी लिहिलेला..

   • rohan says:

    होय … मी वाचले आहे ते. बाकी मला सुद्धा बरेच ठिकाणी काहीतरी असेच वेगळे वागायची सवय आहे. 😀

 2. Mayur berde says:

  apala sandesh uttam aehi me to anusarin me kehi khat nahi pan me dusarina tea karu denar nahi

  • मयुर
   धन्यवाद.. आपण थोडं जरी करु शकलो तरिही खुप झालं.. काही वेळेस अगदी वाईट वाटतं आपलेच लोकं असं वागतांना पाहुन.

 3. Mayur berde says:

  mala hae avadala thank uuuuuuuuuuuuuu!!!!!!!!!!!!!!!!!!!!

 4. mandar joshi says:

  काका आजच आमच्या बिल्डींग मधले सगळे जिने स्वच धुवून साफ केले आणि जिथे शक्य होईल तिथे देवांचे फोटो लावले आहेत…

  • मंदार
   अरे देवाचे फोटो लावले हे ठिक आहे, पण रहाणाऱ्यांनीच पाळली पाहिजे स्वच्छता. नाहितर देवाचे फोटो जिथे नाहित तिथे थुंकतिल हे थुंकणारे महाभाग. सगळ्या जिन्यात तर देवाचे फोटो लावणं शक्य नाही. !! असो.. पण सुरुवात तर झाली.. हे महत्वाचं.

 5. Pravin says:

  Really, never thought from this angle. I too used to use a lot of #$#$#$ words for people who spit like this, but it was of no use 😦

 6. खरंय काका तुमचं… सामान्य नागरीकांनी अशा साध्या साध्या गोष्टींची काळजी घेतली तर कितीतरी चांगल्या गोष्टी घडतील. फक्त ईच्छाशक्ती हवी !!!

  मध्यंतरी डॉ. अब्दुल कलाम यांचं “देशासाठी दहा मिनिटे” या नावाने एक फॉरवर्ड ईंटरनेटवर फीरत होतं त्याचाही आशय हाच होता.

  छोटेखानी लेखात खुप मोठा आशय व्यक्त केला आहे तुम्ही… आणि तोही एका मनाला स्पर्श करणार्‍या उदाहरणासह!!!

  • सतिश
   मला एक वाटतं की जरी आपण पान , तंबाखु खात नसलो, तरीही जर एखादा माणुस खाउन थुंकणार असं वाटलं तर त्याला थांबवायला हवं.

 7. Aparna says:

  मी एकदोनदा रिक्षावाल्यांना सांगितलं होतं तर त्यांनी इतक्या चमत्कारिकपणे पाहिलं की मी कुठल्या परग्रहावरुन आले आहे. जर पर्याय असेल तर मी शक्यतो पान/पानमसालावालं तोंड दिसलं तर ती रिक्षा सरळ सोडुन द्यायचे…या बाबतीत स्वछ्छ लोकांनी जरा आग्रह धरला पाहिजे. निषेधाची तीव्रता वाढवली तर अशी घाण कमी होईल.

 8. amol says:

  kharach kadhi kadhi prashana padato. ka bar he lok asa karatat? really is common sense and morality is soless in our country? ya sathi kadhi kadhi vattat ki ekdam kadak kayde karun ya lokana thmbvava. pan chyala lok kaydach kadhi kadhi dhyabayavar basavat…………. ase dokyat jate na…

  • कायदे कडक करणे हाच उपाय मला तरी योग्य वाटतो.आजकाल मुंबईला दारु पिउन कार चालवल्यास लायसन्स नेहेमी करता कॅन्सल केलं जातं आजकाल. पहिल्या वेळेस वॉर्निंग , दुसऱ्या वेळेस लायसन्स कॅन्सल. आजच वाचलं , सगळ्यात जास्त करप्ट डिपार्टमेंट म्हणजे पोलिस.. तेंव्हा कायद्या ची अम्मलबजावणी कशी केली जाते .. हे पण पहावे लागेल.
   नाहितर, त्यांना पैसे खायला अजुन एक नविन चान्स..

 9. Kanchan says:

  खूप वाईट वाटतंय, हा फोटो पाहून. कधी कधी, चालताना आपणही आपल्या नकळत काय ब्रह्मांड ओलांडत असतो हे जर वळून पाहिलं तर शिसारी येते. कळस म्हणजे काही लोक ’सॉरी’ म्हणण्याइतकेही सौजन्य दाखवत नाहीत. “कुठे उडालंय, दाखवा,” असा निर्लज्ज प्रश्‍न विचारतात. आजूबाजूला त्यांच्याच विचारांची लोकं असली तर ती आपल्यालाच उपहासाने हसतात. अशा वेळी आत्मविश्‍वास थोडा डळमळीत होतो. वाटतं, “काय करायचंय आपल्याला हा सिव्हिक सेन्स जागृत ठेऊन? आपलंच हसं होतं.” पण असं म्हणून आपण गप्प बसलो तर सगळीकडेच ही रांगोळी दिसेल. म्हणून आजही कोणी थुंकणारा दिसला, तर त्याला तिथेच चार शब्द सुनावते.

 10. कांचन
  बऱ्याच गोष्टी या अशाच असतात. अशाही परिस्थितित मी तर अगदी शक्य होईल तितक्या लोकांना सांगत असतो. तशीही मला ती सवय आहेच. आपणच सुरुवात केल्याशिवाय अशा गोष्टी होत नाहित.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s