एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी इंडीयन-२

मागच्याच आठवड्यात १२ सप्टेंबरला आणी १३ सप्टेंबरला मी नाशिकला गेलो होतो. माझी धाकटी बहिण असते नाशिकला, तिने सगळी तयारी करुन ठेवली होति.. कालसर्प योगाच्या पुजेची. माझा जन्म रोहिणी नक्षत्रावरचा , ज्याची सर्प योनी असते. म्हणुन माझे वडिल कधिचं सांगताहेत की एकदा ही पुजा करुन घे. म्हणुन ही पुजा.माझ्या वडिलांना आधी पासुन पत्रिका वगैरे पहाण्याची खुप आवड.गेली ५० वर्ष तरी पत्रिका वगैरे पहात असतिल, पण पैसे वगैरे काहिच घेत नाहित. वारसा हक्काने मला पण पत्रिका वगैरे समजते,थोडं फार शिकलोय वडिलांच्या कडुन ,  पण नंतर मी अभ्यास सुरु ठेवला नाही.
माझ्या बरोवरच माझ्या दोन्ही भाच्यांच्या पण ह्या पुजा करायच्या होत्या .त्यामुळे आम्ही जवळपास १४ लोकं गेलो तिथे. त्यामुळे  ही तर एक पिकनिकच वाटत होती. अमृता (माझी भाची) ने नुकतंच सीए पास केलंय पहिल्याच अटेम्प्ट मधे. २२ व्या वर्षी सी ए म्हणजे एक मोठी उपलब्धी, आणि दुसरी गौतमी होतकरू सी ए… 🙂 आम्ही तिघंही एकदमच पुजेला बसलो होतो. इथे पुजेबद्दल माहिती सांगायला हे पोस्ट नाही. 🙂
अर्थातच, सगळी पुजेची तयारी माझ्या लहान बहिणीने ( नाशिकलाच असते ती) करुन ठेवली होती. त्र्यंबकेश्वर ला श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान आहे. या संस्थाना मधे कांही स्वामीजी लोकसेवेचे कार्य करतात. माझ्या  बहिणिची एकदा नागपुरहुन नाशिकला परत येतांना या स्वामिजीशी ओळख झाली.  या रामकृषण आरोग्य संस्थानाचे कार्य इथल्या वनवासी भागात चालते. जव्हार ते डहाणूच्या मधे आणि अगदी सिल्व्हासाच्या मधे खुप वनवासी लोकं रहातात . या लोकांना अगदी बेसिक आरोग्य सेवा पण उपलब्ध नाहित.कित्येक लोकांचा औषधा अभावी मृत्यु होतो.
इथल्या या दुर्गम भागात हे स्वामिजी जाउन विनामुल्य आरोग्य सेवा देण्यासाठि कॅम्प्स करतात.  स्वामिजींना नांव किंवा पुर्वायुष्याबद्दल विचारलं तर ते अजिबात काही सांगत नाही. म्हणतात साधुच कुळ विचारु नये. त्यांना इथे मोठे स्वामिजी आणी छोटे स्वामिजी म्हणतात. एका स्वामिजिंचे नांव  श्रीकंठानंद आहे,दुसरे आहेत ते विश्वरुपानंद स्वामी. अर्थात ही दोन्ही नावं सन्यास घेतल्यावर घेतलेली आहेत.
जवळपासचे म्हणजे, मुंबई, पुणे, नाशिक, जळगांवचे डॉक्टर लोकं इथे वेळ काढुन येऊन  कॅम्प सक्सेसफुल करण्यासाठी मदत करतात.डॉक्टर लोकां इथे येउन कामं करण्यासोबतंच त्यांना मिळणाऱ्या सॅंपल औषधी इथे डोनेट करतात. नुकताच जवळच्याच एका दुर्गम आदिवासी भागात नेत्र शिबिर, म्हणजे मोती बिंदु काढण्याचे शिबिर ऑर्गनाइझ करण्यात आले होते. कित्येक लोकांनी ह्या शिबिराचा फायदा घेतला. ज्या लोकांना जागेवर उपचार करणं शक्य  नसतं , त्यांना शहरात नेउन उपचार करण्यासाठी नेलं जातं.
स्वामिजिंच्याच ओळखीने तिथे पुजा अरेंज करण्यात आली होती. आम्ही सगळे तिथे सकाळी पोहोचलो, आणि मग पुजा अटोपल्यावर सरळ मठात गेलो. ह्या मठाला मठ कां म्हणायचं?? इथे चार पाच खोल्या आहेत एका रांगेत. एका खोलित फक्त औषधं वगैरे ठेवलेली आहेत, दुसऱ्या खोलित स्वामिजी झोपतात. एका खोलीत रामकषण परमहंस आणि माताजिंचा फोटॊ लाउन ठेवलाय. समोर एक साधी सतरंजी.. बस्स!!    एक खोली म्हणजे स्वयंपाक घर. स्वयंपाक घरात अगदी बेसिक सुविधा आहेत.
स्वामिजींनी पुजा झाल्यानंतर जेवायला या म्हणून आम्हला बोलावलं होतं. तिथे पोहोचलो तर स्वामिजींचा सगळा स्वयंपाक तयार होता. भाजी, कढी, उसळ, आणी नारळाची चटणी.. असा साधासा बेत होता. पोळ्या करायला भाग्यश्री आलेली होती. भाग्यश्री ही इंजिनिअरिंग करते आहे पुण्याला डि वाय पाटिल मधे. सुटीचं म्हणुन  ती इथे आली होती. सगळ्यांची जेवणं झाली. आणि दोन चार्टर्ड अकाउंटंट ( एक पुर्ण , दुसरी होतकरु) भांडी घासायला बसल्या.
रामकृषण परमहंसांच्या बद्दल मला फारच आदर आहे. जेंव्हा त्यांचं गॉस्पेल ऑफ राम्कृषण परमहंस वाचलं तेंव्हा पासुन नजरेसमोरचा पडदा बाजुला होऊन सगळं काही स्वच्छ दिसावं तसं झालं. वाचलेलं नसेल तर जरुर वाचा हे पुस्तक. रामकृष्ण मिशनच्या कुठल्याही मठात विकत मिळते. कर्मकांडाला किती महत्व द्यायचं आणि किती भक्तीला ते लक्षात आलं..असो..
या वर उल्लेखित आदिवासी  भागा मधे मिशनरी कार्य खुपच जोरात सुरु आहे. बऱ्याच आदिवासी पाड्यांमधे मंदिर जरी नसलं तरी चर्च मात्र आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात धर्म परिवर्तन सुरु असतं इकडे की सांगायची सोय नाही. अर्थात, त्या ख्रिश्चन धर्मगुरुंनी इथे येउन बरंच काम केलंय. या आदिवासी लोकांना आपण तर पुर्ण पणे विसरुनच गेलो होतो. तेंव्हा हे ख्रिश्चन धर्मगुरु तिकडे गेले आणि त्यांनी धर्म प्रसाराचं कार्य केलं.
स्वामिजी आदिवासी भागात एक जुनाट मोटरसायकल वर फिरतात. पैशांचा अजिबात मोह नाही. म्हणाले, की इथे सेवा देणारे डॉक्टर्स तर विनामुल्य येतात, पण त्यांची रहाणे, खाणेपिणे इत्यादी सोय करण्यासाठी थोडा फार खर्च होतो. पैशाची गरज पडते ती मुख्यत्वे करुन औषधी आणण्यासाठी. कॅम्प मधे फ्री सॅंपलची औषधं पुरत नाहित, त्यामुळे बेसिक औषधं विकतंच आणावी लागतात..  या पोस्ट मधे स्वामिजींचा पत्ता, फोन नंबर इत्त्यादी देतोय . जर तुमच्या पैकी कुणाला इंटरेस्ट असेल तर किंवा जर वाढदिवस, किंवा एखाद्या शुभ प्रसंगा प्रित्यर्थ , किंवा कोणाच्या स्मती प्रित्यर्थ जर एखादा आरोग्य कॅम्प स्पॉन्सर करायचा असेल तर जरुर संपर्क साधा. तुमचे पैसे सत्कारणी खर्च होतिल याची खात्री मी   देतो.. जर तुम्हाला स्वतःला कॅम्प मधे सहभागी व्हायचं असेल तर ते ही शक्य आहे. फक्त स्वामिजींशी संपर्क साधा.. बस्स!!

way toमागच्याच आठवड्यात १२ सप्टेंबरला आणि १३ सप्टेंबरला मी नाशिकला गेलो होतो. माझी धाकटी बहीण असते नाशिकला, तिने सगळी तयारी करुन ठेवली होती.. कालसर्प योगाच्या पूजेची. माझा जन्म रोहिणी नक्षत्रावरचा , ज्याची सर्प योनी असते. माझ्या वडिलांना आधी पासून विनामुल्य पत्रिका वगैरे पहाण्याची खूप आवड.गेली ५० वर्ष तरी पत्रिका वगैरे पहात असतात ..म्हणून माझे वडील कधीचं सांगताहेत की एकदा ही पुजा करुन घे. म्हणून ही पुजा…ते सारखं म्हणतात की पुजा करुन टाक -म्हणून ह्या पुजेचे प्रयोजन!

माझ्या बरोवरच माझ्या दोन्ही भाच्यांच्या पण ह्या पुजा करायच्या होत्या .त्यामुळे आम्ही जवळपास १२लोकं गेलो तिथे. त्यामुळे  ही तर एक पिकनिकच वाटत होती. अमृता (माझी भाची) ने नुकतंच सीए पास केलंय पहिल्याच अटेम्प्ट मधे. २२ व्या वर्षी सी ए म्हणजे एक मोठी उपलब्धी, आणि दुसरी गौतमी होतकरू सी ए… 🙂 आम्ही तिघंही एकदमच पूजेला बसलो होतो.  पूजेबद्दल पोस्ट नाही   हे . 🙂

ramkrishna mathअर्थातच, सगळी पूजेची तयारी माझ्या लहान बहिणीने ( नाशिकलाच असते ती) करुन ठेवली होती. त्र्यंबकेश्वर ला श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान आहे. या संस्थाना मधे कांही स्वामीजी लोकसेवेचे कार्य करतात. माझ्या  बहीणीची एकदा नागपूरहुन नाशिकला परत येतांना या स्वामीजीशी ओळख झाली.

या रामकृषण आरोग्य संस्थानाचे कार्य इथल्या वनवासी भागात चालते. जव्हार ते डहाणूच्या मधे आणि अगदी सिल्व्हासाच्या मधे खुप वनवासी लोकं रहातात . या लोकांना अगदी बेसिक आरोग्य सेवा पण उपलब्ध नाहीत.कित्येक लोकांचा औषधा अभावी मृत्यु होतो.

इथल्या या दुर्गम भागात हे स्वामीजी जाउन विनामुल्य आरोग्य सेवा देण्यासाठी कॅंम्प्स करतात.  स्वामीजींना नांव किंवा पूर्वायुष्याबद्दल विचारलं तर ते अजिबात काही सांगत नाही. म्हणतात साधूचे  कुळ विचारु नये. त्यांना इथे मोठे स्वामिजी आणी छोटे स्वामिजी म्हणतात. एका स्वामिजिंचे नांव  श्रीकंठानंद आहे,दुसरे आहेत ते विश्वरुपानंद स्वामी. अर्थात ही दोन्ही नावं सन्यास घेतल्यावर घेतलेली आहेत.

eye campजवळपासचे म्हणजे, मुंबई, पुणे, नाशिक, जळगांवचे डॉक्टर लोकं इथे वेळ काढुन येऊन  कॅम्प सक्सेसफुल करण्यासाठी मदत करतात.डॉक्टर लोकं  इथे येउन कामं करतातच आणि  सोबतच त्यांना मिळणाऱ्या सॅंपल औषधी इथे डोनेट करतात. नुकताच जवळच्याच एका दुर्गम वनवासी भागात नेत्र शिबिर, म्हणजे मोती बिंदु काढण्याचे शिबिर  करण्यात आले होते. कित्येक लोकांनी ह्या शिबिराचा फायदा घेतला. ज्या लोकांना जागेवर उपचार करणं शक्य  नसतं , त्यांना शहरात नेऊन उपचार करण्यासाठी नेलं जातं.या सगळ्या कामासाठी मिळणारा पैसा हा फक्त देणग्या मधुन  उभा केला जातो. साधारणपणे पाच एक हजार रुपये उभे झाले, की एक कॅम्प ऑर्गनाइझ केला जातो.

स्वामिजिंच्याच ओळखीने तिथे पुजा अरेंज करण्यात आली होती. आम्ही सगळे तिथे सकाळी पोहोचलो, आणि मग पुजा आटोपल्यावर सरळ मठात गेलो. ह्या मठाला मठ का म्हणायचं?? इथे चार पाच खोल्या आहेत एका रांगेत. एका खोलीत फक्त औषधं वगैरे ठेवलेली आहेत, दुसऱ्या खोलीत स्वामीजी झोपतात. एका खोलीत रामकषण परमहंस आणि माताजींचा फोटॊ लाऊन ठेवलाय. समोर एक साधी सतरंजी.. बस्स!!    एक खोली म्हणजे स्वयंपाक घर. स्वयंपाक घरात एक गॅस , भांडी आणि अगदी गरजेपुरते सामान दिसत होते.स्वयंपाक घरात अगदी बेसिक सुविधा आहेत.

vishwarupanandस्वामीजींनी पुजा झाल्यानंतर जेवायला या म्हणून आम्हाला बोलावलं होतं. तिथे पोहोचलो तर स्वामीजींचा सगळा स्वयंपाक तयार होता. स्वामी श्री विश्वरुपानंदांनी स्वतः सगळा स्वयंपाक तयार करुन ठेवला होता आमच्या साठी.भाजी, कढी, उसळ, आणि नारळाची चटणी.. असा साधासा बेत होता. पोळ्या करायला भाग्यश्री आलेली होती. भाग्यश्री ही इंजिनिअरिंग करते आहे पुण्याला डि वाय पाटिल मधे. सुटीचं ती इथे आली होती. सगळ्यांची जेवणं झाली. आणि जेवणं झाल्यावर (अमृता, आणि गायत्री  )दोन चार्टर्ड अकाउंटंट ( एक पुर्ण , दुसरी होतकरु) भांडी घासायला बसल्या.  🙂

रामकृषण परमहंसांच्या बद्दल मला फारच आदर आहे. जेंव्हा त्यांचं गॉस्पेल ऑफ रामकृष्ण परमहंस वाचलं तेंव्हा पासून नजरे समोरचा पडदा बाजुला होऊन सगळं काही स्वच्छ दिसावं तसं झालं. वाचलेलं नसेल तर जरुर वाचा हे पुस्तक. रामकृष्ण मिशनच्या कुठल्याही मठात विकत मिळते. कर्मकांडाला किती महत्व द्यायचं आणि किती भक्तीला ते लक्षात आलं..असो..

shrikanthanadया वर उल्लेखित वनवासी  भागा मधे मिशनरी कार्य खूपच जोरात सुरु आहे. बऱ्याच वनवासी पाड्यांमधे मंदिर जरी नसलं तरी चर्च मात्र आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात धर्म परिवर्तन सुरु असतं इकडे की सांगायची सोय नाही. अर्थात, त्या ख्रिश्चन धर्मगुरुंनी इथे येउन बरंच काम केलंय. या आदिवासी लोकांना आपण तर पुर्ण पणे विसरुन गेलो होतो. तेंव्हा हे ख्रिश्चन धर्मगुरु तिकडे गेले आणि त्यांनी धर्म प्रसाराचं कार्य केलं.

वनवासी भागामधे दातांच्या आरोग्या बद्दल ( ओरल हायजिन बद्दल) कमालीचा निष्काळजी पणा असतो.त्या मूळे दांतांच्या चिकित्सेचं पण शिबिर घेण्यात येतात वनवासी भागात.

स्वामिजी वनवासी भागात एक जुनाट मोटरसायकल वर फिरतात. पैशांचा अजिबात मोह नाही. म्हणाले, की इथे सेवा देणारे डॉक्टर्स तर विनामुल्य येतात, पण त्यांची रहाणे, खाणेपिणे इत्यादी सोय करण्यासाठी थोडा फार खर्च होतो. पैशाची गरज पडते ती मुख्यत्वे करुन औषधी आणण्यासाठी. कॅम्प मधे फ्री सॅंपलची औषधं पुरत नाहीत, त्यामुळे बेसिक औषधं विकतच आणावी लागतात..

prayer roomया पोस्ट मधे स्वामीजींचा पत्ता, फोन नंबर इत्त्यादी देतोय . जर तुमच्या पैकी कुणाला इंटरेस्ट असेल तर किंवा जर वाढदिवस, किंवा एखाद्या शुभ प्रसंगा प्रीत्यर्थ , किंवा कोणाच्या स्मती प्रित्यर्थ जर एखादा आरोग्य कॅम्प स्पॉन्सर करायचा असेल तर जरुर संपर्क साधा. तुमचे पैसे सत्कारणी खर्च होतील याची खात्री मी   देतो..

मोखाडा ह्या नाशिकजवळच्या ( त्र्यंबकेश्वर जवळच्या) गावामधे त्यांना नुकतीच दोन एकर जमीन दान दिलेली आहे, जिथे आता एक दवाखाना सुरु करण्याचे योजिले आहे.

जर तुम्हाला स्वतःला कॅम्प मधे सहभागी व्हायचं असेल तर ते ही शक्य आहे. फक्त स्वामीजींशी संपर्क साधा.. बस्स!!

यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची माहिती हवी असेल तर बरेच फोटोग्राफ्स आहेत त्यांच्या ब्लॉग वर.निरनिराळ्या कॅंप्स चे फोटॊग्राफ्स आहेत, जरुर भेट द्या. एखाद्या कामासाठी स्वतःचे सर्वस्व अर्पण करणाऱ्या अशा लोकांना मी तर एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी इंडीयन्स म्हणतो.. ह्यांच्या सारखे हेच.. जरी आपण काही करु शकत नसलो, तरी यांच्या कार्याला हातभार जरुर लाऊ शकतो.. विचार करा..

Shri Ramakrishna Aarogya Sansthan.
Reg. no: E-1163
Address: Ring Road, Trimbakeshwar, Nashik-422 212, Maharashtra, India.
Cellphone: +919822703688, +919970803660
Email: makali06@gmail.com

(Cheques/draft should be drawn in favor of “Shri Ramakrishna Arogya Sansthan”.All donations to “Shri Ramakrishna Arogya Sansthan” are exempted from Income Tax under section 80G of Indian Income Tax Act of 1961.)

एकदा स्वामी विवेकानंदांना विचारलं होतं की तुम्ही कुठल्या देवाची सेवा करता? यावर स्वामी विवेकानंद म्हणाले होते, ” मी त्या परमात्म्याची सेवा करतो , ज्याला अज्ञानी लोकं मनुष्य म्हणतात”


About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in व्यक्ती आणि वल्ली and tagged . Bookmark the permalink.

2 Responses to एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी इंडीयन-२

  1. bhaanasa says:

    फारच उपयुक्त माहिती दिलीस महेंद्र. असे लोक आहेत म्हणून तर अजुनही चांगुलपणा जगात टिकून आहे. वाढदिवस, लग्नकार्ये, पार्ट्या यावर प्रचंड पैसा खर्च होतो त्यातला काही भाग तरी अशा ठिकाणी दिला गेला पाहिजे. अनेक देवळांमधील दानपेटीत पैसा ओतण्यापेक्षा असा दिला गेला तर सत्कारणी तरी लागेल. किमान देवळांच्या कमिटीने तरी पुढाकार घ्यावा.

    चांगला लेख.

    • स्वतः काय केलं हे सांगु नये, म्हणुन पण काहितरी हातभार लावला वाढदिवसाच्या निमित्याने. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s