असं महाराष्ट्रात का नाही?

असं महाराष्ट्रात का नाही?
दिवसभर काम झालं होतं. आता रुमवर बसुन करायचं तरी काय? संध्याकाळचे ४ वाजले होते. टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला, की साब ग्वालियर फोर्ट देखा है क्या?? माझ्या प्रश्नार्थक मुद्रे कडे बघुन तो पुढे म्हणाला, एकदा जरुर पहा फोर्ट..माझी मुक सम्मती गहित धरुन त्याने कार डोंगरावर चढवली.होता होता बऱ्याच वळणा वळणाच्या रस्त्याने आम्ही वर पोहोचलो तर उजव्या हाताला सांस बहु मंदिर दिसतं. याचं नांव हे कां पडलं ते कोणालाच माहित नाही. पण एक मोठं मंदिर आणि दुसऱं लहान मंदिर म्हणुन कदाचित असेल. दोन्ही मंदिरात एकही मुर्ती नाही. समोर पाहिलं तर ग्वालियर शहराचं सुंदर दृष्य़ दिसतं. मस्त हवा सुटलेली होती. मोकळं आकाश.. आणि गर्दी पण अजिबात नव्हती. 🙂 त्या मोकळ्या हवेत डोक्यावर नसलेले केस आता उगिच स्वतःच्या अस्तित्वाची जाणिव करुन देत होते.गाडितुन उतरुन तिथे त्या मंदिरात उगिच टाइमपास
या मंदिरासमोरुन पुढे गेल्यावर मानसिंह महाल आहे. पुरातन हिंदु  वास्तु शास्त्राचे  उत्कृष्ट नमुने  भारता मधे आजही अस्तित्वात आहेत.  इ.स. १४८६ मधे याचं बांधकाम सुरु झालं ते १५०८ मधे पुर्ण झालं.  ग्वालियर किल्ल्यामधला (मनमंदिर पॅलेस हे ह्याचं खरं नांव पण पॉप्युलरली मानसिंह महाल म्हंटलं जातं.. ! अप्रतिम कारागिरीचा एक सुंदर नमुना आहे हा.या किल्ल्याचे काही फोटॊ इथे पोस्ट करतोय.  दोन मजले जमिनिखाली आणि दोन मजले जमिनिवर.. असं ह्या महालाचं स्वरुप आहे.
जमिनिखाली दोन मजले असले तरिही कुठेही प्रकाशाची कमतरता जाणवु नये म्हणुन आरसे वापरुन प्रकाश परिवर्तनाचा फायदा उचललेला आहे.व्हेंट होल्स मधे अशा तऱ्हेने आरसे बसवले आहेत की प्रकाशाचे परिवर्तन दुसऱ्या आरशावरुन तिसऱ्या आरशावर.. अशा तर्हेने प्रकाश अगदी खालच्या मजल्यावर पोहोचवला आहे.
हा महाल बनवला होता तो राजा मानसिंगच्या राण्यांना ठेवण्या साठी. या महालात एकदा कोणी शिरलं की मग परवानगी शिवाय जिवंत बाहेर पडण कठिण होतं.या महालात राण्या, आणि इतर दासी यांच्या सोबतंच राजाने युध्दामधे जिंकलेल्या सुंदर तरुणी ठेवल्या जात असंत.
खास राणि वास म्हणुन हा महाल उपयोगात येत होता. या महालात सगळ्या सोई आहेत. कंटाळा आला की पाळण्यावर बसा, गाणि ऐका!! एका मजल्यावर चक्क पाण्याचा हौद.. स्विमिंग पुल म्हणा हवं तर.. आहे ज्या मधे राण्या अगदी मोकळेपणाने स्विमिंग करायच्या -कारण कोणी पाहिल याची भिती नसायची.
प्रत्येक खोली मधे भिंती मधे दोन पोकळ पाइप्स घातलेले आहेत. एका कोनाड्यात असे दोन तोंडं मोकळे असलेले पाइप्स दिसतात.. आमचा गाईड असं म्हणाला की या पाइप्सचा उपयोग पुर्वी टेलिफोन प्रमाणे केला जायचा.एका पाईप मधुन बोलायचं आणि दुसऱ्या पाइपमधुन ऐकायचं..
एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे राणी वासामधे एक फाशीची खोली पण आहे. ज्या खोली मधे दोषी व्यक्तींना , फाशी देण्यात येत असे.
जमिनिखाली दोन मजले आहेत पण नंतर वरचे मजले मात्र दगळी  पिलर्स वर सपोर्टेड आहेत. मधे राजा ची बैठक घेण्याची खोली, आणि त्याच्या शेजारिच राण्यांना बसण्याची सोय दगडी जाळ्यांच्या आड केलेली आहे. अजुनही १४ व्या शतकात केलेलं मिना काम अजुनही चांगल्या स्थितित आहे. सहाशे वर्ष रंगावरची चमक अजुनही कमी झालेली नाही.
राजाची बेडरुम मस्त आहे. याच्या चारही बाजुने मोकळा व्हरांडा ठेवलेला आहे. रोज सकाळी या व्हरांड्य़ामधे नर्तिका पायात घुंगरू बांधुन  नृत्य करायच्या. घुंगराच्या आवाजाच्या अलार्म ची  आय़डिया भन्नाट आहे नां?
ह्या महालाचे निर्माण किल्ल्याच्या उंच भिंतिंना धरुन केले आहे . जवळपास ३०० फुट उंचिचा हा किल्ला आहे. आजही ह्या म्हालावर कोरलेली नक्षी, किंवा बदक, मोर , माणुस इत्यादी आकृत्या चांगल्या स्थितित आहेत. मुसलमानांच्या कब्जात असुनही या महालाचं नुकसान झालेलं नाही हे महत्वाचं..मुसलामानांच्या ताब्यात हा किल्ला १६ व्या शतकात गेला, तेंव्हा याचा उपयोग जेल म्हणुन केला जायचा.
या महालाच्या शेजारिच एक जुनाट बिल्डींग आहे .त्या बिल्डींगवरचे घुमट अजुनही लक्ष वेधुन घेतात. लोकं म्हणतात की हा पुर्वी बारुद खाना होता. इथे बारुद गोळा ठेवला जायचा.
मी जेंव्हा  हा ग्वालियर फोर्ट वरचा महाल पहायला गेलो तेंव्हा सगळ्यात पहिले मनात आलं की शिवाजी चा एकही किल्ला इतक्या चांगल्या अवस्थेत कां नाही? सगळे किल्ले म्हणजे माळरानं कां झाली आहेत? असे बरेच विचार मनात येत होते.
sas bahu mandir

सांस बहुका मंदिर. एका मंदिराचा दुसऱ्या मंदिरातुन काढलेला फोटो .

दिवसभर काम झालं होतं. आता रुमवर बसुन करायचं तरी काय? संध्याकाळचे ४ वाजले होते. टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला, की साब ग्वालियर फोर्ट देखा है क्या?? माझ्या   कडे बघुन  .माझी मुक सम्मती गहित धरुन त्याने कार डोंगरावर चढवली.होता होता बऱ्याच वळणा वळणाच्या रस्त्याने आम्ही वर पोहोचलो .

sasbahu mandir

अतिशय सुंदर कलाकारी आहे. अजुन बरेच फोटॊ आहेत पण ते फोटो ब्लॉग वर पोस्ट करणार आहे..

तर उजव्या हाताला सांस बहु मंदिर दिसतं. याचं नांव हे कां पडलं ते कोणालाच माहित नाही. पण एक मोठं मंदिर आणि दुसऱं लहान मंदिर म्हणुन कदाचित असेल. दोन्ही मंदिरात एकही मुर्ती नाही. समोर पाहिलं तर ग्वालियर शहराचं सुंदर दृष्य़ दिसतं. मस्त हवा सुटलेली होती. मोकळं आकाश.. आणि गर्दी पण अजिबात नव्हती. 🙂 त्या मोकळ्या हवेत डोक्यावर नसलेले केस आता उगिच स्वतःच्या अस्तित्वाची जाणिव करुन देत होते.गाडितुन उतरुन तिथे त्या मंदिरात उगिच टाइमपास केला.

14012009927

दुरवरुन दिसणारा महाल.

या मंदिरासमोरुन पुढे गेल्यावर मानसिंह महाल आहे. पुरातन हिंदु  वास्तु शास्त्राचे  उत्कृष्ट नमुने  भारता मधे आजही अस्तित्वात आहेत,पण फारच कमी.बहुतेक सगळ्याच वास्तुंची तोडफोड केली आहे यवनांनी. एखादी वास्तु जिंकली.. (कशिही, लढुन किंवा अंतर्गत फितुरिमुळे) तिचा सत्यानाश करायचा हे यवनांचे मुख्य ध्येय.. म्हणुनच बहुतेक वास्तुंची पार विल्हेवाट लागलेली आहे. जगातिल सगळ्यात मोठी बहामा बुध्दाची मुर्ती- एक जागतिक धरोहर.. फोडतांना पण यांचे हात  कापत नाहित..असो..  .

darabar

राजाचा दरबार.. हा सगळ्यात वरचा मजला.

इ.स. १४८६ मधे मानसिंह महालाचं बांधकाम  सुरु झालं- ते १५०८ मधे पुर्ण झालं.  ग्वालियर किल्ल्यामधला (मनमंदिर पॅलेस हे ह्याचं खरं नांव पण पॉप्युलरली मानसिंह महाल म्हंटलं जातं.. ! अप्रतिम कारागिरीचा एक सुंदर नमुना आहे हा.या किल्ल्याचे काही फोटॊ इथे पोस्ट करतोय.  दोन मजले जमिनिखाली आणि दोन मजले जमिनिवर.. असं ह्या महालाचं स्वरुप आहे.मला वाटतं की भारतामधे अशा प्रकारचा हाच एक महाल असावा.

जमिनिखाली दोन मजले असले तरिही कुठेही प्रकाशाची कमतरता जाणवु नये म्हणुन आरसे वापरुन प्रकाश परिवर्तनाचा फायदा उचललेला आहे.व्हेंट होल्स मधे अशा तऱ्हेने आरसे बसवले आहेत की प्रकाशाचे परिवर्तन दुसऱ्या आरशावरुन तिसऱ्या आरशावर.. अशा तर्हेने प्रकाश अगदी खालच्या मजल्यावर पोहोचवला आहे.हा प्रकाशाचा खेळ पाहुन मन अचंभित होतं.

14012009944

१६ व्या शतकातिल मीना काम.. अजुनही तितकंच सुंदर दिसतंय.

हा महाल बनवला होता तो राजा मानसिंगच्या राण्यांना ठेवण्या साठी. या महालात राण्या, आणि इतर दासी यांच्या सोबतंच राजाने युध्दामधे जिंकलेल्या सुंदर तरुणी ठेवल्या जात असंत.या महालात एकदा कोणी शिरलं की मग परवानगी शिवाय जिवंत बाहेर पडण कठिण होतं.  खास राणि वास म्हणुन हा महाल उपयोगात येत होता. या महालात सगळ्या सोई आहेत. कंटाळा आला की पाळण्यावर बसा, गाणि ऐका!! एका मजल्यावर चक्क पाण्याचा हौद.. स्विमिंग पुल म्हणा हवं तर.. आहे ज्या मधे राण्या अगदी मोकळेपणाने स्विमिंग करायच्या -कारण कोणी पाहिल याची भिती नसायची.

हेच ते दोन पाइप्स मला टेलिफोन म्हणुन दाखवले गाईडने.

हेच ते दोन पाइप्स मला टेलिफोन म्हणुन दाखवले गाईडने.

प्रत्येक खोली मधे भिंती मधे दोन पोकळ पाइप्स घातलेले आहेत. एका कोनाड्यात असे दोन तोंडं मोकळे असलेले पाइप्स दिसतात.. आमचा गाईड असं म्हणाला की या पाइप्सचा उपयोग पुर्वी टेलिफोन प्रमाणे केला जायचा.एका पाईप मधुन बोलायचं आणि दुसऱ्या पाइपमधुन ऐकायचं..

एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे राणी वासामधे एक फाशीची खोली पण आहे. ज्या खोली मधे दोषी व्यक्तींना , फाशी देण्यात येत असे.गाईड म्हणाला, की राजाला इतक्या राण्या सांभाळणं जड जात असे, आणि म्हणुन जर एखाद्या राणिने ’तसं’ काही केलं तर तिला फाशी दिली जात असे या ठिकाणी.

प्रकाश परिवर्तनासाठी ठेवलेला हा पॅसेज.. या मधेच आरसे लावलेले असायचे.

प्रकाश परिवर्तनासाठी ठेवलेला हा पॅसेज.. या मधेच आरसे लावलेले असायचे.

जमिनिखाली दोन मजले आहेत पण नंतर वरचे मजले मात्र दगळी  पिलर्स वर सपोर्टेड आहेत. मधे राजा ची बैठक घेण्याची खोली, आणि त्याच्या शेजारिच राण्यांना बसण्याची सोय दगडी जाळ्यांच्या आड केलेली आहे. अजुनही १४ व्या शतकात केलेलं मिना काम अजुनही चांगल्या स्थितित आहे. सहाशे वर्ष झालेत पण रंगावरची चमक अजुनही कमी झालेली नाही.

राजाची बेडरुम मस्त आहे. याच्या चारही बाजुने मोकळा व्हरांडा ठेवलेला आहे. रोज सकाळी या व्हरांड्य़ामधे नर्तिका पायात घुंगरू बांधुन  नृत्य करायच्या,आणि मग त्या घुंगराच्या आवाजाने राजा उठायचा.. घुंगराच्या आवाजाच्या अलार्म ची  आय़डिया भन्नाट आहे नां?

या जाळिच्या आडुन राण्या दरबाराचे काम पहायच्या.

या जाळिच्या आडुन राण्या दरबाराचे काम पहायच्या.

ह्या महालाचे निर्माण किल्ल्याच्या उंच भिंतिंना धरुन केले आहे . जवळपास ३०० फुट उंचिचा हा किल्ला आहे. आजही ह्या महालाचे कोरलेली नक्षी, किंवा बदक, मोर , माणुस इत्यादी आकृत्या चांगल्या स्थितित आहेत. मुसलमानांच्या कब्जात असुनही या महालाचं नुकसान झालेलं नाही हे महत्वाचं..मुसलामानांच्या ताब्यात हा किल्ला १६ व्या शतकात गेला, तेंव्हा याचा उपयोग जेल म्हणुन केला जायचा,पण नंतर लवकरच हा किल्ला परत हिंदु राजांच्या ताब्यात आला. .

महालातली कला कुसर.. कोरिव काम खुपच सुंदर आहे.

महालातली कला कुसर.. कोरिव काम खुपच सुंदर आहे.

या महालाच्या शेजारिच एक जुनाट बिल्डींग आहे .त्या बिल्डींगवरचे घुमट अजुनही लक्ष वेधुन घेतात. लोकं म्हणतात की हा पुर्वी बारुद खाना होता. इथे बारुद गोळा ठेवला जायचा.

बारुद खाना

बारुद खाना

मी जेंव्हा  हा ग्वालियर फोर्ट वरचा महाल पहायला गेलो तेंव्हा सगळ्यात पहिले मनात आलं की शिवाजी चा एकही किल्ला इतक्या चांगल्या अवस्थेत कां नाही? सगळे किल्ले म्हणजे माळरानं कां झाली आहेत? आजही पुढच्या पिढीला शिवाजी चा किल्ला वगैरे दाखवु म्हंट्लं तर केवळ माळरानंच दाखवता येतिल. किल्ल्यावरच्या सगळ्या रहाण्याच्या जागांची लाकडी दारं, सागवानी खांब वगैरे चोरिला गेलंय. आणि आता किल्ल्याच्या नावावर फक्त माळरान आहे … तटबंदीनी वेढलेलं.. भुतकाळाच्या खुणा आणि जखमा अंगावर बाळगत..

!शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर आज गेलो तर काय दिसतं?? एक तरी किल्ला असा आहे कां की जिथे महाराजांच्या स्मृती जपल्या आहेत आपल्या लोकांनी??प्रतापगडावर पण महाराजांच्या स्मृती साठी एक पुतळा बसवलाय- आणि तो पण सरकारने.. आम जनतेने नव्हे. म्हणजे आम जनतेचं  कॉंट्रिब्युशन काय? दारुच्या रिकाम्या बाटल्या, गुटख्याची रिकामी पाकिटं, सिगारेट्स ची थोटकं.. हेच देतोय आपण त्या शिवाजी महाराजांच्या स्मृती म्हणुन असलेल्या गडाच्या  तुटक्या फुटक्या बुरुजाला…  ..

आणि खाली आहे एक मजार… अफझल खानाची.अफझलखानाची स्मृतीजपण्यासाठी त्याला लोकांनी देवाचा दर्जा दिलाय, त्या मजार वर जाउन नवस बोलला तर इच्छा पुर्ण होते असाही प्रचार केला जातोय.  काही दिवसांनी या देवतुल्य अफझल खानाला मारणारा दानव म्हणुन शिवाजी महाराजांची प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न झाला तर आश्चर्य वाटुन घेउ नका.

हे वेळिच थांबलं तर ठिक आहे, नाही तर या पिढीला इतिहासातला एक बदल तर पचवावाच लागतोय, दादोजी कोंडदेवांच्या बद्दल चा.. पुढच्या पिढिला कदाचित दुसरा बदल.. एका समाजाची मनं दुखावतात म्हणुन शिवाजीचा धडाच काढुन टाकतिल , किंवा महात्मा अफझलखानाचा धडा पण शिकवतिल.. या दिशेने ऑलरेडी प्रयत्न सुरु झाले आहेतच .. इथे या ब्लॉग वर वाचा.. अफझल खानचा उदो उदो करणारे काय म्हणतात ते..काय सांगावं??…

त्या **ला आणि खे**** हे दिसत नाही कां? अशा ठिकाणी सरळ शेपुट घालुन कोपऱ्यात पडुन असतात, पण केवळ हिंदुंच्याच मधे भांडणं लावण्याचा डाव आहे अशा विघ्नसंतोषी लोकांचा,आणि हिंदु समाजात फुट पाडायची वेळ आली की मग यांना    कंठ फुटतो आणि मोठ्मोठ्याने बोंबाबोंब करतात… इथे पण नुसते भिकारडे पॉलिटीक्स करताहेत शिवाजी महाराजांच्या नावाने.. शेम !!शेम!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , , . Bookmark the permalink.

26 Responses to असं महाराष्ट्रात का नाही?

 1. आनंद says:

  महाराष्ट्रात केवळ किल्लेच नाहीत तर मंदिरांची देखील वाईट अवस्था आहे, साउथ मधील सगळी मंदिरे स्वच्छ असतात, ते मला महाराष्ट्रात दिसत नाही. परवा ‘श्रीरंगपटणं’ ला गेलो होतो (मैसूरला जाताना), तिथे टिपू सुलतानचा मृतदेह जिथे सापडला होता ते ठिकाण पहिले, आजू बाजूला वस्ती असून देखील आणि कुणी रखवालदर नसताना देखील ते स्मारक चांगल्या अवस्थेत होते, कुठेही एक ओरखडा नाही…. आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही…

  • मंदिरांचा तर एक दुसरा मुद्दा आहेच. ते स्मारक टिपुचं आहे म्हणुन स्वच्छ आहे. पण आपल्या इथे खुपच वाईट अवस्था आहे.
   तुळजा भवानीचं मंदिर किंवा इतर कुठलंही मंदिर घ्या, परिस्थिती सारखीच आहे.. कमित कमी महाराजांच्या गडाची तरी अवस्था अशी होऊ नये .
   मुसलमान लोकं एखाद्याला देवपण देण्यात खुपच हुषार आहेत. टिपुची पण थडगं नाही तर मजार आहे… !!!
   बरं आज पर्यंत जे झालं ते झालं, पण आता तरी आपण जागं व्हायला हवं की नाही??

 2. rohan says:

  महाराष्ट्रातील किल्ले … गतवैभवाचे मानकरी … आजचे भग्नावशेष … !

  दुर्ग – गड़ – किल्ले यांचा उपयोग मुख्यत: लढण्यासाठी असतो हेच विसरुन गेलेल्या सुंदर किल्ल्यांपेक्षा मला माझ्या महाराष्ट्रामधले ढासळलेले उध्वस्त गड्किल्ले भारुन टाकतात. त्यांचाच मला अभिमान वाटतो.
  (संदर्भ ग्रंथ – ‘सह्याद्री’ – स. आ. जोगळेकर.)
  Read full article … http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/02/blog-post_22.html

  • रोहन
   लढतांना भग्न झालेल्या किल्ल्यांच्या बद्दल मला कांहीच म्हणायचं नाही.
   माझ्या म्हणण्याचा अर्थ ,महाराजांच्या नंतर हे किल्ले आपल्याच लोकांनी नेस्तनाबुत केलेत . लाकडी दरवाजे, लाकडी खांब वगैरे चोरुन नेउन त्याची पार विल्बेवाट लावली. आज उरली सुरली कसर आपण पुर्ण करतोय ते त्या पवित्र स्थानावर जाउन दारु पाट्या करुन… याचं वाईट वाटतं.
   तु दिलेलं आर्टीकल मस्त आहे..

   • महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांबद्दल / त्यांचा सद्यस्थितीबद्द्ल आपली मते अगदी समर्पक आहेत. त्यावर मी – तोरणा – राजगड ट्रेक च्या पोस्टवर लिहिलं आहे. आता हे असं का? यासाठी – प्र.के. घाणेकरांच्या पुस्तकातील उतारा:

    इतिहासाची आपल्याला जाणीव हवी. नाहीतर आज तिथं दिसतीलढासळलेले बुरुज, माना टाकलेल्या कमानी, पडलेली तटबंदी अन ओहोरलेली टाकी. पण हीचती ठीकाणे जिथे इये देशीचे पुत्र ताठ मानेने वावरले आहेत. जगण्यातला अर्थत्यांच्या मरणाने आपल्याला मिळाला आहे. उत्तरेकडचे किल्ले धड उभे आहेत. त्यांच्यादगडादगडावर कोरीव काम आहे अन आतल्या भिंती, वाडे, दालने शाबुत आहेत. पण त्याचीकिंमत..? फ़ार भयानक किंमत देऊन हे सारं टिकवलं गेलं आहे! आपल्यामुलीबाळी परधर्मीय जुलमी सत्ताधिशांच्या घरी लोटाव्या लागल्या. नावांत सिंह अनकिताबाने राजे असणारे या किल्ल्याचे माल्क आपली धनदौलत, अब्रु आणि मुख्यम्हणजे स्वातंत्र्य त्या सत्तांध – धर्मांध सुलतानांकडे गहाण टाकुन आले होते. म्हणुन हे असे राहिले! शोकेसमध्ये ठेवलेल्या या नटव्या बाहुल्याच.

    पण महाराष्ट्रातल्या या रांगड्या किल्ल्यांच तसं नाही. इथले भग्नावशेष हीच या किल्ल्यांची महावीर अन परमवीर चक्रंआहेत. ज्याला आपण दुषण देतो तीच त्यांची भुषणं आहेत. आपल्या लढाऊ परंपरेची ही जिवंत स्मारकं आहेत. अगदी १९१८ च्या शेवटच्या इंग्लिश-मराठे युध्दातही सिंहगड, वासोटा, रायगडचे किल्ले भांडवल केले गेले. त्यात त्यांच नुकसानझालं. एकावर एक दगड ठेवुन हे किल्ले बांधले नाही गेले. मानसांची मने त्यांशी जखडली गेली होती. हे सारं दुर होण्यासाठी डिकीन्सन आणि एतरांनी बुध्द्याच हे किल्ले ढासळवुन टाकावेत, किल्ल्यावर जाण्याचे मार्गच तोडावेत व स्वातंत्र्याची कारंजी मुळात नष्ट करावीत असे मनी धरुन मोहिम मांडुन हे उध्वस्तीकरण केले. काही प्रमाणात इंग्लिशांना त्यात यशही आले. पण घामाचा पाऊसपाडुन अन रक्ताचा सडा शिंपुन ही दुर्गपुष्पे इये देशी वाढवली गेली-टिकवली गेली हे विसरुन चालणार नाही !

    • दिपक
     माझा आक्षेप आहे तो आपल्या लोकांनिच राष्ट्रिय धरोहर नष्ट करण्या बद्दल.. जर युध्दामधे किल्ला उध्वस्थ झाला तर गोष्ट निराळी.. त्याला काहिच आक्षेप नाही. आपल्याच लोकांनी अगदी चिरे पण काढुन नेलेत घरं बांधायला.. असो… रोहनने म्हंटल्या प्रमाणे पांच किल्ले जरी जुन्या नकाशाबरहुकुम तयार केलेत सरकारने तरिही जास्त संयुक्तिक होईल, समुद्रामधे शिवाजी चा पुतळा उभा करण्यापेक्षा.. ऑन लाइन पिटीशन ची आय्डीया कशी वाटते?

     • खरंय – समुद्रामधे शिवाजी राजांचा पुतळा उभा करण्यापेक्षा पांच किल्ले जरी जुन्या नकाशाबरहुकुम तयार केलेत सरकारने तरिही जास्त संयुक्तिक होईल! – माझे प्रामाणिक अनुमोदन.

      हो – ऑन लाइन पिटीशन ची आयडिया रास्त वाटते.

      • पण हे ऑन लाइन पिटीशन कसं करायचं?

       • कदाचित ऑनलाईन पोल ही मदत करेल. तुम्ही जर तुमच्या ब्लॉगचा विचार करत असाल तर, वर्डप्रेसमध्ये पोल चे ऑप्शन आहेत. बघा टाकुन!

        • ऑन लाइन पोल चा मसुदा तयार झाला की तुम्हाला मेल करतो. फायनलाइझ करुन ऑन लाइन पोल स्टार्ट करु या..

 3. >> हे वेळिच थांबलं तर ठिक आहे, नाही तर या पिढीला इतिहासातला एक बदल तर पचवावाच लागतोय, दादोजी कोंडदेवांच्या बद्दल चा..

  म्हणजे? शिवचरीत्रातून दादोजी कोंडदेवांचा उल्लेख काढून टाकला की काय? तसं असेल तर ते महाराष्टाचं दुर्दैव. दुसरं काय म्हणणार.

  अठरापगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण करणार्‍या शिवबांनासुद्धा जातीपातीच्या राजकारणाने सोडलं नाही. अर्थात ज्यांच्यात इतिहास घडवण्याची कुवत नसते ते इतिहासाच्या पुस्तकामधील उल्लेख वगळण्यापलिकडे काय करू शकतात…

  • सतिश
   तुम्ही भारतात नाही , त्यामुळे कदाचित तुम्हाला महिती नसेल, शालेय पुस्तकातुन दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु होते हा उल्लेख वगळण्य़ात आलेला आहे. 😦 बाळासाहेबांनी, किंवा राज ने ( जो बाबासाहेब पुरंदरेंचा खरा चाहता आहे ) त्याने पण यावर कांहिच आक्षेप घेतला नाही. तसं , सगळं झाल्यावर एकदा बाळासाहेब बोलले होते, की असं कांही खपवुन घेतलं जाणार नाही. तरी पण…. झालंच ते..

 4. bhaanasa says:

  ओह्ह्ह, :(. पण दादोजी कोंडदेवच शिवरायांचे गुरू होते तर हा उल्लेख वगळण्याचे काय कारण आहे? किती मूर्खपणा करावा. महेंद्र, खरेच आहे आपल्या किल्ल्यांची, मंदिरांची जितकी निगराणी करायला हवी तितकी केलेली नाही. शिवाय जे लोक भेट द्यायला जातात ते पडलेला कचरा गोळा करण्याएवजी अजूनच कचरा करून, नावे लिहून- हा प्रकार तर मला कधी समजलाच नाही-म्हणजे त्यातील मानसिकता काय असावी?– येतात.
  शिवाजीमहाराजांच्या नावाने पॊलिटिक्स करता आहेत……एकदम पटेश. कठिण आहे सगळेच.
  पोस्ट एकदम छान झाली आहे. फोटो आणि शेजारीच वर्णन मस्त. आवडले.

 5. rohan says:

  दादा .. मला मान्य आहे की आपल्याच लोकांनी ह्या किल्ल्यांची वाट लावली नंतर. सरकार आणि सामान्य लोक सुद्धा… पण प्रयन्त सुरू आहेत.

  पुन्हा त्यात मुद्द्यावर येतोय मी … हजारो कोटी खर्चुन पुतळा उभारण्याऐवजी ५ किल्ले रोल मॉडल म्हणुन बनवा की … अगदी जसेच्यातसे १७ व्या शतकात दिसायचे तसे.. आपण हे करू शकतो. सरकारला इच्छा नाही तर जनरेटयाने हे काम होऊ शकते. पण …..

  • रोहन
   कल्पन अतिशय उत्तम आहे. अगदी खरं.. कमीत कमी ५ किल्ले जरी पुन्हा पुर्वस्थितित आणले तर कमित कमी पुढच्या पिढीला काहितरी दाखवता येइल. पण हे राजकारणी प्रत्येक गोष्टीत राजकारण करतात, मग त्या पुतळ्यामुळे होणारा राजकिय फायदा जास्त असेल तर तेच करतिल हे नेते. लोकमानसाची कदर करणं बंद केलंय या नेत्यांनी..
   सध्याच्या स्थिती मधे प्रत्येक किल्ला हा व्हर्च्युअल झालेला आहे. फक्त तटबंदी आणी तुटके फुटके बुरुज.. बस्स.. एवढंच आहे किल्ल्यां मधे. ..
   मी स्वतः पाहिलंय, जेंव्हा ट्रेकर्स जातात, तेंव्हा ते अजिबात कचरा वगैरे करित नाहित. सगळा कचरा आपल्या हॅवर्सॅक मधे भरुन खाली आणतात.

   ऑन लाइन पिटीशन तयार केलं तर?? कसं करायचं माहिती आहे कां??जर माहिती असेल तर तयार कर, आपण सगळी कडे सर्क्युलेट करु या आणि ऑन लाइन सह्या गोळा करु.. आणि सरकारला पाठवु… कदाचित फायदा पण होईल….काय सांगावं?

   • rohan says:

    ऑनलाइन पेटिशनचा कितपत फायदा होतो ह्या बाबत मी शाशंक आहे. पण हे बांधकाम थांबवण्यासाठी आपण जनहित याचिका नक्की करू शकतो. प्रॉब्लम असा आहे की त्या मागे शेवटपर्यंत पाठपुरावा करणे हे आपल्याला कामामुळे शक्य नाही आहे 😦

    ट्रेकर्स स्वतःच्या ताकदीने काम करत असतातच. पण ह्यावर आता विचार करण्याची वेळ येउन ठेपली आहे. नाहीतर खरच उशीर होइल.

 6. Ashok says:

  हजारो कोटी खर्चुन पुतळा उभारण्याऐवजी ५ किल्ले रोल मॉडल म्हणुन बनवा की … अगदी जसेच्यातसे १७ व्या शतकात दिसायचे तसे.. आपण हे करू शकतो. सरकारला इच्छा नाही तर जनरेटयाने हे काम होऊ शकते.रोहन यांचे विचार बरोबर आहेत. नाहीतर अजु न काही वर्षांनी हे किल्ले जमीनदोस्त होऊन जातील

 7. महेन्द्रजी खुपच छान लेख आहे.
  खरच आपल्याकडे खुप दुर्लक्ष केल गेल बरयाच ऐतिहासिक ठेविंकडे.
  मी रोहनच्या विचारांशी सहमत आहे …

 8. Kanchan says:

  गड, किल्ले पाहण्याची खूप इच्छा होती. भाऊ एक-दोनदा जाऊन आला आणि त्याने असंच सांगितलं, तेव्हापासून जाण्याची इच्छाच झाली नाही. नकोच ते!

  ऑनलाईन पिटीशनची मला माहिती नाही पण कुणाला माहित असेल तर नक्की कळवते. मला पण यात सहभागी करा. स्वत: काही केल्याशिवाय होणार नाही. निदान आता तरी मराठी माणसाने आपली शेखचिल्ली वृत्ती बदलावी असं वाटतं. दुसरा जे करेल त्याचा उदो उदो करायचा पण तेच आपल्या दाराशी आलं की कडी कुलुपं लावून भुर्र व्हायचं, ही वृत्ती सोडायला हवी आता.

 9. kanchan says:

  ह्या लिंकचा काही उपयोग होईल का?
  http://www.petitiononline.com/create_petition.html

 10. कौटिल्य says:

  नमस्कार!
  हल्लीच मला आपल्या blog चा शोध लागला. आपली लेखन शैली फारच छान! ग्वालियर किल्ल्याचे वर्णन छान. मी जेव्हा राजस्थान मध्ये गेलो होतो तेव्हा मलाही हाच प्रश्न पडला की आपले किल्ले असे का नाहीत? माझा तर्क असा की मराठयानी इतर संस्थानिकांच्या मानने बरीच झुंजदिली. तेव्हा आकसाने, इन्ग्रजानी आपले किल्ले उद्ध्वस्थ केले. पण बाकीचे संस्थानिक लवकर शरण गेले आणि pension घेउन बसले. म्हणून त्यांचे किल्ले राहिले.

  • कौटिल्य
   मनःपुर्वक आभार.. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. पण हा किल्ला सुध्दा बरेचदा हस्तांतरीत झालेला आहे. हिंदु ते मुस्लिम ते पुन्हा हिंदु.. म्हणुन हा प्रश्न पडला होता. कौटिल्य
   आपले किल्ले आपल्याच लोकांनी नंतर उध्वस्त केले . सागवानी दारं, खिडक्या वगैरे सगळं काही चोरिला गेलं असंही ऐकलं आहे. खरं खोटं देव जाणे..

 11. Nimish says:

  Maharashtra Madhe Puratatva Khatyala kille zapnyacha Interest Nahi fakt Paisa Kai Karnar. Aani rahila Prashna Afzal Khan yachya Samadhi cha. TI samadhi bandhnyasathi Maharajani svata dili hoti aani tyache vaunshaz te kaam karat aahet.Maharajanche Sataryat rahnare Vaunshaz kahi Kartana Disat nahit. Satarkarana rag yene shakya aahe pan satya paristhiti kai aahe te sarva zan zanta.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s