
शशी थरुर
शशी थरुरच्या नावाने सारखा काहितरी इशु करायची सवयच लागलेली आहे मिडीयाला. त्या कॅटल क्लास च्या कॉमेंट मुळे मला पण थोडा राग आलाच होता, पण नंतर इन द लाइटर व्हेन जेंव्हा बघितलं , आणि ते वाक्य जेंव्हा वाचलं ,तेंव्हा तितकंसं मनाला बोचलं नाही ते वाक्य, उलट मला हसु आलं.. फॉर अ मोमेंट..
शशी विमानातल्या एकॉनॉमी क्लास ला कॅटल क्लास म्हंट्लं,तर इतकी बोंबाबोंब केली मिडीयानी, जर शशी एखाद्या दिवशी मुंबईच्या लोकलने प्रवास करा असं म्हंटलं तर मुंबईच्या लोकलला काय म्हणेल शशी??
एखाद्या खाण्याच्या वस्तुच्या डब्यात जसे झुरळं तयार व्हावेत तशी परिस्थिती असते मुंबईच्या लोकल्सची.लोकल हा इशु नाही आजच्या लेखाचा. जस्ट लिहिण्याच्या ओघात आलं म्हणुन लिहिलं झालं.
तर आजच्या पेपर मधे शशी थरुरच्या कालच्या ट्विट वर पुन्हा गदारोळ उठवायचा प्रयत्न सुरु केलाय मिडीयाने. असं काय लिहिलं होतं त्यानी?? खरं तर ते ट्वीट मी पण पाहिलंय.त्या ट्विट मधे कांहिही ऑफेन्सिव्ह नाही. ते ट्विट असं आहे..
” Have ridiculously full schedule tomorrow with 17 meetings / engaements. You always pay price when u come back from a trip“
.त्यामुळेच कदाचित असेल की त्याच्या प्रत्येक ट्वीट वर मिडियाची तिक्षण नजर असते. त्याने कुठलेही ट्विट केले की लगेच मिडिया त्या ट्वीट चा अर्थ लावण्यात मग्न असतात. मग कुठलेही साधे सरळ ट्विट पण तोडु फोड करुन किंवा त्याचा नसलेला अर्थ लाउन प्रसिध्द केलं जातं वृत्तपत्रात.. ….आज काय तर म्हणे शशीला कामाचा कंटाळा आलाय….असा अर्थ काढलाय वरच्या ट्विट चा! 😀
त्याचे ट्विट्स वाचल्यावर लक्षात आलं की हा पण अगदी आपल्या सारखाच एक सामान्य माणुस आहे. ज्याला पण कधी तरी ह्युमर हवंसं वाटतं , तर कधी तरी काम इतकं वाढून जातं की कामाचा पण कंटाळा येतो. अर्थात, यामधे मला तरी काहिच वावगं वाटलं नाही.
शशी थरुरच्या नावाने नुसती बोंबाबोंब करणाऱ्या मिडीयाने त्याच्या सॉफ्टर साईडला नेहेमीच नजर अंदाज केलंय. केरळामधल्या एका १७ वर्षाच्या मुलिचे दोन्ही पाय रेल्वे ऍक्सिडेंट मधे कापल्या गेले. तिच्याबद्दल त्याने जेंव्हा ट्विट केलं तेंव्हा बऱ्या फॉलोअर्सनी तिला मदतिचा हात दिला. तिच्या आर्टिफिशिअल लिंब्स चा , आणि ऑपरेशन चा खर्च पुर्णपणे या ट्विटमुळे निघाला.
भारतिय मिडीयाला सारखं मायावती, लालू यादव, मुल्लायम सिंग सारख्या “लर्नेड” लोकांशी डिल करण्याची सवय झालेली असल्या मुळे शशी थरुर सारख्या उच्चशिक्षित आणि ऍरिस्टोक्रॅट पर्सनॅलिटीला सारखं पाण्यात पहाण्याशिवाय काहिच करु शकत नाही.तसं आपले पंतप्रधान किंवा चिदंबरम पण हार्वर्ड ग्रॅज्युएट आहेत. पण दोघांचिही रहाणी अतिशय साधी असल्यामुळे ते लक्षात येत नाही.
शशी थरुरचा म्हणजे इतर सोम्या गोम्या राजकारण्यांप्रमाणे नाही, की जो इतर राजकारण्यांप्रमाणे लोकसभेमधे मारा मारी, किंवा आरडा ओरडा करेल असा!! तो एक सुशिक्षित नेता आहे, आणि अशा प्रकारच्या नेत्यांचीच आज आवश्यकता आहे भारताला. नुसते स्वतःचे पुतळे उभे करणाऱ्या त्या मायावती पेक्षा , किंवा गुंड, खुनाचे आरोप असलेले, जेल मधे राहुन इलेक्शन जिंकलेले, भाईगिरी करणारे नेते.. यांच्या पेक्षा शशी थरुर खुपच वेगळा आहे, आणि नेमकं हेच मिडियाला सहन होत नाही.
मिडीयाच्या लोकांना जास्त हुशार (म्हणजे त्यांच्या पेक्षा) लोकं आवडत नाहित.. त्यांना डंब ऍंड डंब लोकंच ज्यांचा बुध्यांक त्यांच्यापेक्षा कमी आहे असेच लोकं आवडतात.. धोतराचा सोगा सांभाळत पैशाच्या पेट्या रिचवणाऱ्या नेते लोकं मिडीयाला आवडतात. दुधाची पिशवी जमिनिवर ठेवल्यावर दिसणाऱ्या शरिर यष्टीचे नेते हेच खरे नेते असं जर्नॅलिस्ट लोकांना वाटतं की काय हा प्रश्न मला नेहेमिच सतावतो.
जर्नॅलिझम क्षेत्रात आजकाल पुर्वी प्रमाणे विचारवंत कमी होत चालले आहेत. जे कोणि आहेत ते सगळे कुठल्या ना कुठल्या पक्षाचे भोंपु बनलेले आहेत. विद्याधर गोखले, अरुण टीकेकर, माधव गडकरी, किंवा अरुण शौरी असे अनेक जर्नॅलिस्ट होऊन गेले.( कुमार केतकर पण मला आवडतात, त्यांचं लिखाण पण वाचनिय असतं-जरी ते गांधी घराण्याचे भोंपु असले तरिही मला आवडतात). पण आजचे जर्नॅलिस्ट काय करतात? तर नेट वर बातम्या वाचुन त्याच बातम्या थोड्या फरकाने छापुन नुसती पानं भरतात पेपरची. स्पेशिअली इंग्रजी वत्तपत्रात तर चक्क बातम्या ढापलेल्या असतात ब्रिटिश मिडीया किंवा अमेरिकन मिडियाच्या..
तर हे असे जर्नॅलिस्ट जेंव्हा शशी थरुर सारख्या वयाच्या २० व्या वर्षी राजिका कृपलानी यंग जर्नॅलिस्ट ऍवॉर्ड मिळवणाऱ्या , तसेच १९८८ मधे स्विट्झरलॅंडला वल्र्ड इकॉनॉमिक फोरमने शशी चा “वर्ल्ड लिडर ऑफ टुमारो” म्हणुन गौरव केला होता- अशा माणसाच्या नावाने ओरडा करणे निव्वळ मुर्खपणा आहे असं मला तरी वाटतं.. त्याच्या नावाने शिमगा करण्यापेक्षा, त्याच्या क्वॉलिटीज पैकी १० ट्क्के जरी मिळवायचा प्रयत्न केलात ना, तरिही तुम्ही यशस्वी जर्नॅलिस्ट होऊ शकाल…
बदकांच्या कळपात एखादा राजहंस आला तर बदकं त्या राजहंसाला जसं ट्रिट करतात ,तसं ट्रिट करणं सुरु आहे शशी थरुरला मिडायामधे.. इंडीयन मिडीया शुड ग्रो अप…अजुन काय लिहावं यावर? मला वाटतं माझा मुद्दा मी स्पष्ट लिहिलाय..
संपूर्णपणे सहमत. धोतराचा सोगा सांभाळत पैशाच्या पेट्या रिचवणाऱ्या नेते लोकं मिडीयाला आवडतात. दुधाची पिशवी जमिनिवर ठेवल्यावर दिसणाऱ्या शरिर यष्टीचे नेते हेच खरे नेते…….पर्फेक्ट,:D
भाग्यश्री
इथे लोकांना सारखं चटपटीत बातमी आवडते.. मग ती कसलिही असो… इव्हन अ कुक्ड न्युज आल्सो इज वेलकम..
हो, मुद्दा अगदीच स्पष्ट आहे!
आपल्या मिडियाला नेहमीच गरच असते ती बेकिंग न्युजची.. मग ती कुणाच्या मयताची का असेना.. त्यासाठी गिधाडगिरी करायला तयार. महत्त्वाचं म्हणजे, जे मला वाटलं – की आपल्यात तरुण – शिक्षित – काहीतरी नविन करण्याचा जोम असणार्या नेत्यांपेक्षा म्हातार्या – त्याच त्या जातीयतेच्या दिवट्या पाजळणार्या – गुंड आणि !@#%#$%# अशा नेत्यांचीच चलती आहे!
दिपक ,
आपल्या देशात असे किती नेते आहेत की ज्यांना स्वतःचा इ मेल स्वतः पाठवता येतो? मला वाटतं अगदी बोटावर मोजण्याइतके असतिल. जे नविन ब्रिडचे नेते आहेत त्यांना कामं करु द्या.. ट्विटर हे जनतेशी संपर्क ठेवण्याचं एक साधन आहे हे किती नेत्यांना ठाउक आहे??
good one!!
अर्चना
धन्यवाद… 🙂
अगदी बरोबर. या बरोबरच राजकारणी (आणि सिने अभिनेते ही) यांना पर्सनल लाइफ असते हे लोक आणि मीडीया का विसरतात. मागे त्या शिल्पा शेट्टी च्या किस चा अगदी किस पाडला होता आता शशी थरूर च्या मागे पडलेत.
इन अ लाइटर वेन
जर शशी एखाद्या दिवशी मुंबईच्या लोकलने प्रवास करा असं म्हंटलं तर मुंबईच्या लोकलला काय म्हणेल शशी??
उत्तर : शी शी 🙂
प्रविण
शिल्पा शेट्टीची केस पण तशिच होती.. विनाकारण पिडलं तिला मिडियाने.
हे बाकी एकदम मस्तं.. बरं कां.. छान सुचलं तुम्हाला..
जर शशी एखाद्या दिवशी मुंबईच्या लोकलने प्रवास करा असं म्हंटलं तर मुंबईच्या लोकलला काय म्हणेल शशी??
उत्तर : शी शी
Khara aahe.. lekh awaDala..
निलांबरी
प्रतिक्रिये करता आभार…
एकदम राइट ऑन पोस्ट आहे.
khupach chhan lihilat tumhi, ekadam 100% sahamat. pan kay karan nivadoon dyayala chorach aahet sagale,ek chor nivadoon dyayacha? chagala neta milan khupach durapast zalay ajkal tyat ya midia valyani khup dhurada udawala ahe.Jara yache financer kon ahe he paha mag khar kay te kalel apoap.aso aaliya bhoaga….
अप्रतिम लेख. १००% सहमत
कांचन,
धन्यावाद..
मिडिया तर दोषी आहेच, पण खरा जवाबदार माझ्या मते प्रेक्षक आहे. ज्या TRP साठी हे सगळे होते, ती म्हणजे किती लोकांनी ते चैनल/प्रोग्राम पहिला, जर आपण चांगले कार्यक्रम स्वीकारू तर त्यांना ते दाखवावे लागतील…फालतू न्यूज व फालतू प्रोग्राम चवीने पाहणारे कमी नाहीत….
आनंद
किती परसेंट लोकांना शशी थरुर बद्दल माहिती होती?? माझ्या मते या कॉंट्रोव्हर्सी च्या पुर्वी अगदी १० टक्के लोकं त्याला ओळखायचे. आता ९० टक्के ओळखतात. सगळ्या चॅनल्स नी जर एकच इशु घोळुन घॊळून दाखवला तर लोकांना पण तेच खरं वाटु लागतं.
अगदी अशिच केस होती वृन्दा कराथ च्या बाबतित ..आठवते कां, रामदेव बाबा विरुध्द वृंदा??
लोकांचा दोष पण अर्थात आहेच, पण सगळेच चॅनल्स हे बातम्या पण करमणुक प्रधान करण्याच्या मागे आहेत आजकाल.. आणि त्याच्याच अंतर्गत ही बातमी आऊट ऑफ प्रपोर्शन ब्लो अप केल्या गेली- करमणुक प्रधान करण्यासाठी… जास्तित जास्त लोकांनी पहावी म्हणुन…
इन द लाइटर व्हेन जेंव्हा बघितलं , आणि ते वाक्य जेंव्हा वाचलं ,तेंव्हा तितकंसं मनाला बोचलं नाही ते वाक्य, उलट मला हसु आलं.. फॉर अ मोमेंट..
शशी थरूरचे ते वाक्य लाइटर व्हेनमध्ये वाचणे कसे शक्य आहे? पत्रकारांना आणि सामान्य जनतेला तर सोडूनच द्या, पण सोनिया गांधींनाही ते वाक्य विनोदी वाटलेले नाही. आजही शशी थरूर काहीतरी आचरटासारखे बोलले आहेत. त्यांना एकदा मुंबईच्या लोकलगाडीतून नाही तर मालगाडीतून प्रवास करायला लावला पाहिजे, त्याशिवाय त्यांची जिरणार नाही.
रामदेव विरुद्ध वृंदा या घटनेत, वृंदा नावाच्या खत्रूड बाईने रामदेवबाबांच्या औषधांत मानवी हाडे सापडली असा घाणेरडा आणि तद्दन खोटा आरोप केला होता. रामदेवबाबांच्या आव्हानानंतर आणि सरकारी प्रयोगशाळांनी केलेल्या तपासणीनंतर वृंदा पार उताणी पडली. तिने त्यानंतर आजपर्यंत डोके परत वर काढलेले नाही, तोंड उचकटणे तर सोडूनच द्या..
अभिप्रायाबद्दल आभार.
आणि हसु येण्याचं कारण हे की मी ते स्वतः बरेचदा एक्स्पिरिअन्स केलंय… अगदी तशिच वागणुक असते आजकाल एअरलाइन्सची…
त्या अभिप्रायाला इंग्लिश मधेच वाचलं तर इतकंसं बोचत नाही ते वाक्य. जसं कालचं ट्विट , त्याचं जे मराठित भाषांतर केलंय ते अगदी विचित्र आणि पुर्व ग्रह दुषीत आहे. अर्थाचा अनर्थ होतो अशा भाषांतरा मुळे.
आणि सोनिया गांधींची कॉमेंट ही पण लोकांना बरं वाटावं म्हणुन दिलेली कॉमेंट असावी.
आता आपल्या पत्रकारांना हव्या तशा लोकांना तिकिटं दिली जात आहे. जसे दहावी पास .. महाजन कन्या, किंवा आदेश बांदेकरांच्या सारखे अभिनेते…
मिडियाने विनाकारण तिळा एवढ्या इशु चा पहाड बनवलाय असं माझं मत आहे. शशी थरुर स्वतः एक प्रतिथयश पत्रकार आहे, इंग्रजी बोलीभाषेतिल वाक्य जर बोचत असेल तर… काय करणार?? असो…
काका, मी आपल्या मताशी सहमत आहे, मिडीयाला फक्त त्यांच्या पोटाचा प्रश्न कसा तात्पुरता सुटेल याची चिंता असते, पण त्यांच्या या अशा वागण्यामुळे कित्येकदा नाहक ज्यांचा काहीही दोष नाही, ते दुर्दैवीपणे गुंतले जातात. ट्विटर ही एक प्रभावशाली आणि सर्वांशी नाते जोडणारी सोशल कम्युनिटी आहे, जीच्याइतकं प्रभावशाली टूल ज्याद्वारे थेट कोणासोबतही संवाद साधता येत असेल, असे अजुनही अस्तित्वात आले नसेल कदाचित…! आणि लोकशाही मध्ये जर प्रत्येकाला आपले विचार स्वतंत्रपणे मांडण्याची मुभा असेल तर त्यात इतर नेते एवढे गचाळपणे वागतात त्या दृष्टीने पाहिले तर शशी थरूर सारखे नेतेच कधीही चांगले…! आणि कशाचेही स्वातंत्र्य आहे असे समजून आपल्या मताप्रमाणे वागणार्या मिडियाला नाहीत का काही “रुल्ज” आपल्या संविधानात..? आणि काका, खरचं अशी तुरळक नेते-मंडळी सापडतील की ज्यांना स्वतः इ-मेल पाठवता येत असेल, असे असेल तर ट्विटर तर खुप दूरची गोष्ट आहे…! उदाहरण पाहा ना, मागे बातमी ऐकली होती की बिहारचे मुख्यमंत्री मुलायम सिंगांनी “कॉम्प्युटर वर बंदी” आणायचा कायदा काढला म्हणून, कारण काही एक सांगितले असो, पण दिसते असे की स्वतःला काही येत नाही हे लपवण्यासाठी “काय वाट्टेल ते….!”
विशाल,
मी नेहेमी स्वतःला जे वाटेल तेच लिहितो. कारण लोकांना जसं हवं तसं ,किंवा लोकांच्या आवडिचं लिहिण्याचं काम आहे पत्रकारांचं.. 🙂
पत्रकारांना पण काहितरी इशु हवाच असतो, तो इथे मिळाला… बस्स!!
what nxt?
महेंद्र,
खरच छान,
यावरुनही इंटरनेट आणि social network ची महती कळावी. वृत्तपत्रात किंवा टीव्हीवर असणार्या सुमार बातम्यांची माहिती सगळ्यांना कळते.
शशी थरूर सगळ्यांना माहित झालाय हे ही खरंय. त्यामुळे प्रसारमाध्यमं संकुचित विचारानं का होईना, लोकांपर्यंत नेत्यांना पोहोचवतातही.
नंतरही बरीच सारवासारव (!) म्हणून प्रकरण झाले आहे. पण माझ्यामते, शशीने, उगाच वागण्यात बदल करू नये….. जसा आहे, तसाच वाग….. सगळ्यांच्या नाकावर टिच्चून! म्हणजे सगळ्यांची प्रगती तरी होईल.
प्रशांत
प्रतिक्रियेकरता आभार..
खूप आधीपासून शशी थरूर ट्विट करत आहेत
परंतु आता ते मंत्रिमंडळात आहेत आणि देशाच्या सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व हि करत आहेत याचे भान हि ठेवले पाहिजे
अशा पदावर असणाऱ्या माणसाकडून थोडेसेहि चुकीचे वा खटकणारे वक्तव्य आले तर त्याचा इशू होणारच
त्यामुळे social site वर लिहिताना व्यक्तीने तारतम्य बाळगले पाहिजे असे मला वाटते
ट्विट्स मधे अगदी कमी शब्दामधे मनातली गोष्ट पोस्ट करायची एवढंच असते. ओबामा पण ट्विट्स करतात असं ऐकलंय. त्यांचे अगदी साधे ट्विट्स पण मराठी पेपर्सनी तोड फोड करुन वाटेल तो अर्थ लावलेला माझ्या लक्षात आलं . कारण मी स्वतः शशी ला फॉलो करतो. त्याची भाषा शैली मला खुप आवडते. अतिशय हुशार व्यक्ती म्हणुन मला शशी आवडतो. इतर गबाळ्या अशिक्षित नेत्यांपेक्षा खुप बरा वाटतो तो.प्रतिक्रियेकरता आभार..
हो मान्य शशी हे एक चांगले माणूस असतील परंतु
देशाच्या सर्वसामान्य जनतेचे जिला मुलभूत गरजा हि पुरेश्या मिळत नाहीत अशा जनतेचे
प्रतिनिधी म्हणून किती योग्य आहेत असा प्रश्न पडतो असो
🙂
@Suddhamati, vikram
तुम्हाला अजूनही शशी थरूर काय म्हणाले हे कळलेच नाही वाटतं….
हे म्हणजे, हिंदीत “बच्चोंको शिक्षा देनी ही चाहिये” चा मराठीत “मुलांना शिक्षा केलीच पाहिजे” असा विपर्यस्त अर्थ काढल्यासारखा झाला.
ज्यांना नाही कळलं, त्यांच्यासाठी….. विमानात ईकॉनॉमी क्लासमधे प्रवाश्यांना बसण्यास खुपच कमी जागा असते. त्यामानाने रेल्वेत स्लीपर क्लासचीही भरपुर मोकळीचाकळी जागा असते. म्हणून कॅटल क्लास असा वाक्यप्रयोग विमान कंपन्यांची नफाखोरी दाखवण्यासाठी आहे, जसं काही जनावरांनाच कोंबून भरलं जातं गाड्यांमधे, तसं.
शशी थरुरना कोणीतरी विचारलं की ते “कॅटल क्लास”ने प्रवास करतील का? त्याचं होकारात्मक उत्तर देण्यासाठी त्यांनी तोच शब्द वापरला….. यात वाईत काय बुवा?
मोठ्या मंत्र्याने हास्यविनोद करण्यावर अजून बंदी नाही आली अजून.
मान्य आहे की सर्वसामान्य माणुस त्याहीपेक्षा वाईट परिस्थितीत आहे, लोकलची गर्दी तर अतीच आहे. आणि ते सुधारणंही अपेक्षित आहे, पण सगळ्याच गोष्टींचे उपाय एका दिवसात येत नाहीत. आणि सगळ्याचसाठी पैसे लागतात. एकटे शशी थरुर काय करणार?
@Prashant
मला त्यांना काय म्हणायचे होते ते समजले परंतु
तुम्ही जे वर उधहरण दिले आहे नेमके तसेच झाले आहे का ?
विनोद करायला कोणीही बंदी नाही केली हो
परंतु सार्वजनिक ठिकाणी बोलताना लोकांनी भान ठेवले पाहिजे हि रास्त अपेक्षा असणे चुकीचे नाही
ज्यांना ईकॉनॉमी क्लास हा गुराढोरांचा वाटतो त्यांना त्यापेक्षाही हलाखीच्या परिस्थिती जगणाऱ्या माणसाची परिस्थिती काय समजायची ? किंवा त्यांच्याबद्दल त्यांचे मत काय असू शकते याचा विचार न केलेलाच बरा
Pingback: मोदी-थरूर…. थरार « काय वाटेल ते……..