चाटवाला…

रवी म्हणाला, तुझं ब्लॉगिंग चांगलंच सुरु आहे रे.. मी तुझा ब्लॉग फॉलो करतोय. म्हंटलं, काय?? तु पण? अरे तुला मराठी एक पान वाचायला अर्धा तास लागतो, आणि तु  मराठी ब्लॉग वाचतोस? मला आश्चर्याचा धक्काच बसला. म्हणाला, अरे तु एक मित्र , जर तु लिहिलेलं मी नाही तर कोण वाचणार ?? आणि हे वाक्य अगदी अशा आविर्भावात की, बस्स…

म्हणाला, आता  मराठी चांगलं यावं म्हणून मी पण जरा जास्तच इंटरेस्ट घेतोय मराठी मधे.लहानपणापासून महाराष्ट्रा बाहेर म्हणजे कानपुरला राहिल्यामुळे फक्त बोली मराठी येते रवीला. फारसं लिहिता वगैरे येत नाही, आणि वाचनाचा पण कंटाळा, त्यामुळे तो माझा ब्लॉग वाचतो हे कळल्यावर मला धक्काच बसला.

म्हणाला,,बरेचदा असंही वाटतं की तुझ्या बायकोचे लेख तुझ्या नावाने खपवतोस.. !!!!रागानेच त्याला म्हणालो,जर समोर असतास ना, तर नृसिंहावतार प्रमाणे कोथळाच काढला असता तुझा.. जरा रागानेच म्हणालो. इतका इन्सल्ट?? बहुत ना इन्साफी है ये.. च्यायला, मित्र झाला म्हणून काय झालं , काहीही म्हणायचं का… आता असे मित्र असल्यावर शत्रु कशाला हवेत? 😀 बायको लिहिते म्हणून काय मला लिहिता येत नाही का? साला अगदी वर्मावर बोटं ठेवतो. अस्सा राग आला, पण काय करणार.. म्हंटलं ते जाउ दे.. काय सध्या कुठे आह्से? भॆटायचं कां??

पण हा मात्र विषय बदलायला तयारच नव्हता.

मनातल्या मनात म्हंटलं..अरे बाबा, मला ब्लॉग बद्दल बोलायचं नाही हे तुझ्या लक्षात येत नाही का??..

अरे तुझा ब्लॉग म्हणजे चाटवाल्याच दुकान झालंय. मला काही लक्षातच येईना. म्हणाला, अरे कुठलाही विषय घेउन लिहितोस.. नुसती भेळ असते तुझे लेख म्हणजे. बरेचदा असंही वाटतं वाचतांना की तु खूप कन्फ्युज्ड आहेस , तुला स्वतःलाच नीटसं कळलेले नाही तुला काय लिहायचंय ते..

लिहिलेलं वाचतांना, कधी असं वाटतं की तुझं व्यक्तिमत्त्व खुप पारदर्शी आहे, कधी वाटतं की तू काहीतरी लपवून ठेवतो आहेस,लिहिलंय बरंच पण तुझ्याकडे लिहिण्यासारखं बरंच आहे अजुन ही, जे तु मुद्दाम लिहिलेलं नाही..

कधी तरी चुकून एखादा लेख इतका चांगला असतो, की माझी खात्री असते की तू नक्की कुठुनतरी कॉपी केलं असावं. आता इथे पण रवीचा कुजका स्वभाव दिसतोय , “म्हणे चुकून… कधी तरी”… आता मी काय इतका का वाईट लिहितो, इथे तरी म्हणताना नेहेमीच असं वाटतं असं म्हंटलं असतं तर काही वाया गेलं असतं का?? पण नाही- काही तरी कुजकट कॉमेंट केल्याशिवाय बरंच वाटत नाही रवीला.. पण शेवटी अगदी जवळचा मित्र आहे, त्यामुळे त्याने कांहीही म्हंटलं तरीही मला काही वाटत नाही.

कधी तर असंही वाटतं की तू जे काही मला वाटतं तेच लिहिलंय. जर कधी मला लिहावं लागलं असतं ्तरीही मी असंच लिहिलं असतं. मी नुसतं स्माईल दिलं. आणि म्हटल, रव्या, लेका चाटवाल्याकडे तुझ्या ऑर्डरप्रमाणे डिश मिळते, त्यातही तुला हवी असेल तर तिखट जास्त , किंवा आंबट जास्त.. जसं हवं तसं मिळतं.भैय्या रगडामे तिखा चटनी जादा डालो.. म्हंटलं की झाला, भैय्या तुला हवं तसं करुन देणार.. 🙂

इथे तसं नाही.. मला जे काय वाटेल ते मी इथे लिहितो,  मनापासून एखाद्या  विषयावर लिहावेसे  वाटल्याशिवाय मी कधीच  लिहित नाही,किंवा लिहितांना हे इतरांना आवडेल कां असा विचार नसतो. केवळ आपले मनातले विचार मांडणे हाच एक उद्देश असतो.. जर एखादा विषय मनाला भिडला, किंवा एखाद्या गोष्टीने जर डिस्टर्ब झालो तरच मी त्यावर  मला जे काही वाटेल ते लिहितो. आणि एकदा लिहुन झालं की एकदम हलकं वाटायला लागतं.

पण वेगवेगळ्या विषयांवरचे लेख म्हणशील तर ठीक आहे..एका अर्थाने रवी म्हणाला ते खरंय.. आजकाल वृत्तपत्रांमधेही प्रत्येक विभागा साठी निरनिराळे करस्पॉंडन्ट्स असतात. शेअर्स साठी वेगळा, सामाजिक वेगळा, चित्रपट वेगळा. इथे एकच ’मी’ सगळ्या विषयांवर लिहितो म्हंटलं तर हा ब्लॉग म्हणजे भेळवाल्याच दुकान… मग म्हणता येईल चाटवाल्या दुकानासारखा ब्लॉग झालाय माझा म्हणून..  .

मला माहिती आहे हा लेख पण रवी वाचणार आणि मग माझं अर्धा तास तरी बौध्दीक घेणार.. ..आणि रवी.. मी तयार आहे रे….. चल उचल फोन लवकर… 🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक. Bookmark the permalink.

9 Responses to चाटवाला…

 1. नेटवर बसले की आपोआप आपल्या ‘काय वाटेल ते’ चाट च्या दुकानात ओढले जाणारे माझ्यासारखे बरेच खवय्ये आहेत इथे …हया चाटची लज्जत काही वेग़ळिच आहे हो …
  आय ऍम लविन ईट…!!!

 2. तुम्हाला आणी तुमच्या हया चाटचा आस्वाद घेणारया असंख्य वाचकांना विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा…

 3. rohan says:

  आयला … टोपिकचे नाव वाचून पटकन वाटले की अजून एक खादाडी पोस्ट. हा हा हा … बघतो तर काय … 😀 बाकी दादा तू एकदम हटके आणि तगडा ब्लोगर आहेस. तू असाच लिहित रहा आणि आम्हाला तुझ्या चाटच्या दुकानात आणत रहा.

  … विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा … 🙂

  • रोहन
   खादाडी नाही ते आधिच क्लिअर केलं. एक लहानसा फोन कॉल आणि त्यावर मित्राने झापल्यावर मग कसं होईल.. त्याला पब्लिकली रिप्लाय केलाय .. चेष्टा म्हणुन..
   द्सऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..

 4. Nilesh Todarmal says:

  waril comments madhe majhe manatale mandale aahech …. mhanun vegale kahi lihinaar nahi…

  Vijayadashmi chya Hardik Subhechya!!!

 5. bhaanasa says:

  हाहाहा, सही आहे.महेंद्र, मला बाबा तुझ्या ह्या चटकमटक चाटच्या दुकानात दररोज फेरी मारायला आवडते.:)मस्त. लगे रहो.

 6. anuja says:

  महेंद्रजी नमस्कार,
  आपले लेख मी नियात्मित वाचतेच पण काही सेव करून ठेवलेत पुन्हा वाचण्या करिता,विविध विषयांवरचे लिखाण असेच करीत राहावेत,प्रतेय्क वेळी मी कॉमेंट्स देत नाही कारण सचिन तेंडूलकर छानच खेळतो,एक्खाद वेळ नसेल खेळला पण व्यक्ती आहे तिथे असे चालायचेच,बाकी रवी मित्राचे निमित्त म्हणून…..हा स्वंवाद साधला.

  रोहन माझ्या ठाण्याचाच,त्याला उत्तर द्यायला मला नेट वर प्रोब्लेम येतो.पब्लिश होत नाहीत.त्याचे हि लेख आवडतात.रवी ऐवजी रोहन ला माझा निरोप सांगा.
  लिखाण चाबूक……
  anuja
  (muscat)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s