तुम्ही विमानात किती सेफ आहात?

kf1परवाच एक बातमी वाचली, म्हणे १०० टक्के वैमानिकांची उड्डाणा नंतर अल्कोहोल साठी ब्रिथ ऍनॅलायझर टेस्ट करण्याचा प्रस्ताव आहे. ही बातमी वाचली , आणि काळजात एकदम चर्र्र्र झालं. म्हणजे याचा अर्थ आज पर्यंत १०० टक्के वैमानिकांची   तपासणी होत नव्हती असा होतो. रॅंडम वैमानिकांची तपासणी केली जाते .

शेकडो लोकांच्या जीवनाचा प्रश्न असल्यामुळे पायलट शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या फिट आहे हे सिद्ध झाल्याखेरीज त्याला विमान उडवायची परवानगी दिली जाऊ नये .

पण नियमा प्रमाणे पायलटला एक अंडरटेकिंग द्यावं लागतं, त्यात म्हंटलेलं असतं की मी दारुच्या अमला खाली नाही. हे डीक्लिरेशन ग्राह्य मानलं जातं.

जर एखादा पायलट दारुच्या नशेत असेल, आणि त्याने असं डीक्लरेशन दिलं, आणि जर रॅंडम चेकिंग मधे त्याला चेक न करता सोडण्यात आलं, तर तो बेवडा पायलट तुमचे विमान उडवणार..

म्हणजे जर तुमचं नशिब खराब असेल, तर तुमचा पायलट हा दारुच्या नशेत पण असु शकतो. ( रॅंडम टेस्टींग????)  किती सिरियस मॅटर आहे हे?

या टेस्टींगच्या बद्दल खरी गोष्ट  बाहेर आली जेंव्हा एक किंगफिशरचा इंटर्नॅशनल  विमान उडवणारा एक  पायलट दारू पिउन आलेला  होता. ’रॅंडम टेस्ट’ मधे  तो   पकडल्या गेला. तसेच एका एअरलाइनचे इन फ्लाईट क्रू मेंबर्स पण दारूच्या नशेत सापडले.बरेचदा केल्या गेलेल्या रॅंडम चेक्स मधे काही पायलट नशेत सापडतात.

अगदी फालरू क्रिकेट च्या मॅच मधे पण डोप टेस्टींग केलं जातं.दरवेळी एखादा तरी प्लेअर सापडतोच .  त्यावर इतका गदारोळ उठतो, लाखो लोकं चर्चा करतात , की हे कसं झालं? वगैरे वगैरे.. क्रिकेटमधे कोणाच्या जीवनाचा प्रश्न नसतो तरी पण इतकं सिरियसली आणि मेटॅक्युलसली केलं जातं सगळं.

पण वैमानिक.. ज्याच्या मानसिक वेलबिइंग वर कमीत कमी १४२ ते ३०० लोकांचे  जीवन अवलंबून असते, त्याचे कुठल्याही प्रकारचे टेस्टींग केले जात नाही. इतका निष्काळजी पणा का बरं दाखवत सरकार? कायदे बनवणारे काय आजपर्यंत झोपा काढत होते का?

वैमानिकांच्या टेस्ट बद्दल एक डॉक्युमेंट(DGCA – Aircraft rule 24 – Prohibition on consumption of intoxicating and psychoactive substance.Alcohol and Its Effects) सापडलं नेट वर. त्या मधे प्रोसिजर दिलेली आहे वैमानिकांच्या ब्रिथ ऍनलायझर टेस्ट कंडक्ट करण्याबद्दल. या मधे असं म्हंटलं आहे, की पायलटची तो दारू प्यायला आहे की नाही  ही तपासणी साधारण ६० मिनिटे आधी  केली जाईल. जर त्या टेस्ट मधे पायलट च्या श्वासात अल्कोहोल चे प्रमाण आढळले तर त्याला एकदा तोंड धुवून पुन्हा टेस्ट देण्याची परवानगी देण्यात येईल ( च्या मारीत… कशाला? तोंड धुण्याने काय दारूचा अम्मल कमी होतो की काय?)  . त्यातही जर तो अल्कोहोल पॉझिटिव्ह सापडला तरच त्याला विमान उड्डाणाची परवानगी देण्यात येणार नाही.

जर एखादा पायलट जर ड्रग च्या  अम्मला खाली असेल तर त्याचं काय? त्या केस मधे तो ब्रिथ ऍनलायझर टेस्ट सहज पास होईल, ड्रग च्या नशेत असतांना पण. ’डोपिंग टेस्ट ’चं प्रावधान नाही  या कायद्यांमधे.कायदे बदलले पाहिजे आता…

अगदी १०० सीसी ची बाईक/ किंवा कार चालवतांना पण जर तुम्ही दारु पिउन चालवतांना आढळला, तर मुंबईला स्ट्रिक्ट कारवाई केली जाते. पहिल्या वेळेस दंड असतो दोन हजार रुपये, या दंडासोबतच जेलमधे रहाण्याची शिक्षा पण होऊ शकते. जर हाच गुन्हा पुन्हा केलेला आढळला, ( दुसर्यांदा केलेला गुन्हा असेल तर ) तर त्या माणसाचे ड्रायव्हिंग लायसन्स नेहेमी साठी जप्त केले जाते. आजकाल मुंबई मधे हे चेकिंग स्ट्रिक्ट केल्या गेलंय हल्ली. कारण रोज रात्री बांद्रयाला किंवा मरिनलाइन्स वर होणाऱ्या बाइक , कार रेस मुळे कित्येक लोकांचे जीव गेले आहेत…

सिक्युरिटी  नियम , हे जर कार किंवा बाईक चालणाऱ्यांसाठीचे इतके कठिण आहेत, तर मग वैमानिकांच्या साठी , ज्यांच्यावर शेकडो लोकांचे आयुष्य अवलंबून आहे, त्यांच्यासाठी का नाही? जर एखादा वैमानिक, दारू पिऊन कामावर आढळला तर एकदा वॉर्निंग देउन , दुसऱ्या वेळेस त्याचे फ्लाईंग लायसन्स कॅन्सल केले गेले पाहिजे. तसेच, त्यांची डोपिंग टेस्ट पण घेतली गेली पाहिजे  .

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , , . Bookmark the permalink.

15 Responses to तुम्ही विमानात किती सेफ आहात?

 1. ravindra says:

  खरच आहे. हल्ली विमानाने प्रवास करणे म्हणजे कठीणच झाले आहे. विमानानेच कशाला हवाई प्रवासच कठीण होऊन बसला आहे. मागे किती घटना घडल्या. नुकताच मी यावर “मामांचे विमानारोहण” हा लेख माझ्या मना वर टाकला आहे.

  • रिसेंटली म्हणजे मागच्या महिन्यात एक पायलट ग्राउंड केला गेला किंग फिशरचा.. खुप सिरियस गोष्ट आहे. आता मात्र मला पण भिती वाटायला लागली.
   तो पायलट एक इंटर्नॅशनल फ्लाइट घेउन जाणार होता, म्हणजे किती सिरियस गोष्ट आहे बघा. कमित कमी ४ तासांची फ्लाइट . जर त्याला पण रॅंडम चेक मधे सोडुन दिलं असतं तर??

 2. rohan says:

  हो रे … असा विचार केलाच नव्हता कधी की हे वैमानिक सुद्धा नशेमध्ये विमान उडवत असतील… खरच असा कायदा हवा आणि असेल तर तो बदलायला हवा… मी तर दर महिन्याला उडतो की इकडून तिकडे … 😦

  • काळजी करण्यासारखीच गोष्ट आहे.

  • … पण एक प्रवासी म्हणुन आपण कसं चेक करणार? समजा, पिऊन नाही आला, तरी आतमध्ये अगदी “जंगी सोय” आहेच ना?

   • दिपक
    इंटरनॅशनल फ्लाइट मधे फ्लाईट लॅंड केल्यावर पण चेक केले पाहिजे अल्कोहल साठी ब्रिथ अनॅलायझरवर.. हा एक नविन ऍंगल आहे प्रॉब्लेमचा.

 3. bhaanasa says:

  खरेच की माझ्या मनातही हा प्रश्न डोकावलाच नव्हता कधी. कारण मी असे गृहितच धरले होते की कुठल्याही विमानाचा पायलट दारू पिऊन विमान उडवणारच नाही. म्हणजे हे असेच असायला हवे आणि असणारच पण प्रत्यक्षात तसे नाही हे वाचून भीतीच वाटली. आता प्रत्येक प्रवासाच्या वेळी शंका येणार,:(.

  • इतके रिलॅक्स्ड कायदे आहेत त्यामुळे त्यांना कांहीच भिती नसते ..काळजी तर वाटतेच. बरं डोमॅस्टीक फ्लाईट्स मधे दारु मिळत नाही, पण इंटर्नॅशनल फ्लाइट्स मधे तर विमानातच दारु मिळते. दिपक चा प्रश्न अगदी योग्य आहे, जर पायलट विमानात टेक ऑफ नंतर दारु प्यायला तर???

 4. Rajeev says:

  एखादे वीमान रस्त्यावरून चाललेले दिसू शकेल,
  लै मज्जा यील भौ !!!!!!
  तसे आपल्या देशात पाईपाई जाणारे बरेच जण प्रत्यक्शात
  उडत जाताना दिस्तातच की !!!
  ( आता मी ही पायलट होउ शकतो ….)

  rajeev

  • राजीव
   लै खास.. बरं कां.. पुढल्या वेळेस तुझ्याकडे आलो, की ती कपाटातली संपवुन लोकांना उडायला लाउ.. 🙂

 5. Pravin says:

  विमानात कमीत कमी रॅंडम चेकिंग तरी होते. पाच पाच हजार लोकांना एकावेळी घेऊन जाणार्‍या ट्रेनच काय. मला नाही वाटत त्यांची अशी काही चेकिंग होत असेल. आणि झालीच तरी त्यांना प्रवासात दारू मिळवणे जराही कठीण नाहीय. मग नशेत एखादा लाल सिग्नल हिरवा समजणे काही कठीण नाही.

  • रेल्वे मधे .. अरे हो .. ते माझ्या लक्षात आलं नाहीच. कदाचित वाचण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणुन लक्षात आलं नसेल. पण इथे विमानात तर १०० टक्के मृत्यु आहेच ठरलेला..

 6. आनंद says:

  आपण सगळे ‘दैवावर’ जगतो… दैव बलवत्तर असेल तर ठीक नाही तर यमराज आहेत जागोजागी…

 7. atul says:

  malapan vimanatun prwas karayci khup iccha “hoti” pan mumbai local is the best

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s