आजच भुंगाच्या ब्लॉग वर क्रेडिट कार्डवाल्या कन्येची पोस्ट वाचली.
एक जुनी गम्मत आठवली. एक दिवस माझा मुड खूप खराब होता. सकाळपासून कस्टमर्स सारखे कम्प्लेंट्स करित होते. काही ना कांही इशू होतेच रिझॉल्व न होणारे. नुसता वैताग आला होता. असं होतं बरेचदा.. वाटतं सगळं काही सोडून पळून जावं कुठेतरी.
होता होता लंच टाइम झाला. टुरवर असतांना बाहेरचं खावंच लागतं -अर्थात मला ते आवडत नाही असं नाही पण मुंबईला असलो की शक्यतो रोज घरूनच भाजी पोळी चा डबा आवडतो मला. नेमकं भाजी पण मला न आवडणारी. असतो एखादा दिवस असा..
तर डबा संपवून ऑफिसमधे खाली चक्कर मारायला आणि समोरच्या भैय्या कडे पान खायला निघालो. लिफ्ट मधून बाहेर निघालो तर तेवढ्यात फोनची रिंग झाली.. बोलणं सुरु झालं.. तसा थोडा वैतागलेलाच होतो, म्हणून कोणाला तरी ’पिडायचा’ मुड होताच.
ती:-सर, महेंद्र कुलकर्णी….!! ( प्रश्नार्थक स्टेटमेंट)
मी:-हो..
ती:-सर, आय ऍम कॉलिंग फ्रॉम…. मी ईंटरप्ट केलं…. इंग्रजी येत नाही मला….. मराठीत बोल..
ती एकदम चपापली, आणि मराठीत सुरूझाली. ( पहिली जीत.. )तिचा कॉन्फिडन्स एकदम कमी झाला, तरी पण उसन्या आवेशात तिने बोलणं सुरु केलं…मी एसबिआय बॅंकेतुन बोलत आहे.तुमच्या कंपनीचं नांव आमच्या बॅंकेच्या फॉर्चुन ५०० कंपन्यांच्या यादी मधे आहे, आणि म्हणून आमची बॅंक आपल्याला गोल्ड क्रेडिट कार्ड देणार आहे- आणि ते पण अगदी फ्री….
मी:-अरे वा.. छानच की मग.. अगदी फ्री ना?? की काही पैसे मागाल नंतर.. मी काही देणार नाही बरं का…
ती:- अगदी फ्री आहे सर…
मी:-बरं.. द्या मग.. तशीही बायकॊ कधीची मागे लागली आहेच पाटल्या करुन द्या म्हणून,तुमचं सोन्याचं कार्ड आलं की पाटल्या करुन टाकतो. आता फुकट देताय तुम्ही.. चला, या निमित्याने का होईना बायकोची इच्छा पुर्ण होईल.. बरं हे गोल्ड कार्ड किती ग्राम चं आहे ? मला कमीतकमी ५० ग्रामचं तरी लागेल. नाहितर घरचे पैसे घालावे लागतील.. 🙂
माझं स्टेटमेंट ऐकुन ती अगदी कन्फ्युज झालेली लक्षात आलं..
ती:-सर, तसं नाही, तुम्हाला आम्ही गोल्ड कार्ड देउ..
मी:- तिला मधेच इंटरप्ट करुन आपलंच घोडं दामटलं पुढे…. मग द्या ना बाई. नाही तर मी काय म्हणतो ,हे कार्ड वगैरे देण्यापेक्षा तुम्ही सरळ मला बिस्किट का देत नाही सोन्याचं? चांगलं १०० ग्रामचं द्या..म्हणजे काय मला चांगल्या जाडजूड ५० ग्रामची एक अशा दोन पाटल्या करता येतील, आणि बायको पण एकदम खूष होईल .
ती:- सर आम्ही तुम्हाला गोल्ड कार्ड देणार म्हणजे ते कार्ड दाखवून तुम्ही सोनाराच्या दुकानातून पाटल्या विकत घेउ शकता.
मी:- ओ…..मॅडम काय चेष्टा करता काय गरिबांची- अहो पैसे कुठे आहेत माझ्या कडे.. . अहो तुम्ही आत्ताच सांगीतले ना की तुम्ही मला फ्री गोल्ड कार्ड देणार म्हणून तर मग- आता हे काय म्हणता विकत घ्या म्हणून??मी बोलत होतो , पण मला स्वतःलाच हसू आवरत नव्हतं.
ती:- समजावणीच्या सुरात.. अहो सर, आमची बॅंक तुम्हाला गोल्ड कार्ड देईल. ते कार्ड वापरलं की तुम्हाला घेता येइल पाटल्या..सोनाराच्या दुकानातून.
मी:- अहो मग द्या ना लवकर.. उगाच जास्त वेळ लावू नका.
ती:- सर तुम्ही काय करता??
मी:- मी काहीच नाही करत. आता जेवण झालं, बाहेर चाललोय बिडी ओढायला. आमचं ऑफिस एसी आहे नां, आतमधे बिडी ओढता येत नाही हो..हा एसी खुप खराब असतो बरं तब्येतिला. कधीच बसू नये एसी मधे. पण आता काय करणार, शेंट्रल एशी बसवलाय न हो.. लई त्रास होतो बघा, सारखे सांधे दुखतात माझे, तुम्हाला एखादं औषध माहिती आहे का हो?
ती:_ म्हणजे तसं नाही सर, पण तुम्ही कुठल्या पोस्ट वर काम करता या कंपनीत?
मी:- सिनियर चपराशी आहे मी इथे. पण तुम्हाला काय करायचं, मॅडम तुम्ही आपलं सोन्याचं कार्ड द्या लवकर तुमच्या बॅंकेने आधीच अप्रुव्ह केलेलं… म्हणजे झालं..ओ मॅडम ते औषधाचं….. सांगा नां…
ती:- सर तुम्हाला क्रेडिट कार्ड म्हणजे खरंच माहिती नाही??
मी:- मला माहिती आहे ते.. तुम्ही आत्ताच सांगितलं ना .. गोल्ड कार्ड देते म्ह्णून… कधी ते बोला लवकर? आता इतका वेळ बोलतोय तुमच्याशी.. लवकर सांगा कधी देताय ते??
ती:- समजावणीच्या सुरात, क्रेडिट कार्ड म्हणजे काय ते समजावून सांगु लागली..
मी:- मधेच इंटरप्ट करुन.. मॅडम अहो ते सगळं मला काय सांगु नका, तुम्ही आधी म्हटल्याप्रमाणे सोन्याचं कार्ड द्या लवकर…
ती:- सर तुमचे कोणी ऑफिसर वगैरे आहेत का??
मी:- अहो मॅडम, त्यांना खूप पैसा मिळतो, मलाच गरज आहे सोन्याची, तेंव्हा सायबाला नाही तर मलाच द्या सोन्याचं कार्ड, तुम्हा लोकांचं असंच असतं, गरिबाला कधीच मदत करणार नाही. पैसे वाल्याला अजुन द्याल तुम्ही गोल्ड कार्ड. ओ, मॅडम, द्या की जरा गरिबाला, लई उपकार होतील बघा., नांव घेईन हो मी अन माझी बायको आयुष्यभर तुमचं…
आता ती कन्या अगदी पुर्ण कन्फ्युज झाली होती.. तिला हेच कळत नव्हतं की मी टाइमपास करतोय की खरं बोलतोय ते.सर तुम्ही खरंच चपराशी आहात कां???
मी :-नाही.. मी चपराशी नाही हो.. तुम्हाला सांगितलं ना, सिनियर चपराशी आहे म्हणून.. 😛
माझ्या बरोबर माझा मित्र रोहित पाटील होता, तो अगदी तोंड दाबून हसणं दाबत होता. त्याला अगदी रहावत नव्हतं..
ती:- सर माझी चुक झाली, मी तुम्हाला नंतर फोन करते..
मी:- अहो मॅडम फोन ठेउ नका.. ते सोन्याचं कार्ड कधी पाठवणार ते सांगा आधी..
असाच तिला अजुन जवळपास पंधरा मिनिटे छळलं. शेवटी तिने वैतागून फोन बंद केला..
दोन दिवसांनी त्याच मुलीचा पुन्हा फोन आला.
अर्थात माझ्या लक्षात आलं नाही की ही त्या दिवशीची मुलगी असेल म्हणून.आता इतके फोन्स येतात तेंव्हा लक्षात रहात नाही हो आवाज वगैरे. तिने इंग्लिश मधे बोलणं सुरु केलं, आणि मी नेहेमी प्रमाणे अगदी सहज पणे रिप्लाय केला इंग्लिश मधे, आणि तिच्या लक्षात आलं की मी तिची चेष्टा केली होती चार दिवसांपूर्वी .
ती मुलगी लगेच मराठीत बोलायला लागली,सर मी तुम्हाला फोन केला होता चार दिवसांपूर्वी, तुम्ही मला म्हणालात, की इंग्लिश येत नाही तुम्हाला, आणि तुम्ही सिनियर चपराशी आहात म्हणून…:)
ती म्हणाली सर ( स आणि र मधे खूप अंतर होतं. अगदी लाडात येउन बोलायला लागली होती ती), तुम्ही माझी मापं काढलीत नां??
मी म्हंटलं, माझं कुठे गं तेवढं भाग्य. लहान पणी वाटायचं की आपण कासार व्हावं, आणि चांगल्या चांगल्या मुलींच्या हातामधे बांगड्या भराव्या म्हणून, किंवा लेडिज टेलर व्हावं.. ( कशाला ते लिहित नाही, जास्त वात्रटपणा शोभत नाही या वयाला ) पण नव्हतं ना आमच्या नशिबात.. कशी मापं काढणार?
असु दे….. तिने तेवढ्यात मला ’त्या’ दिवसाची आठवण करुन दिली आणि फोन वर मनसोक्त हसायला लागली, म्हणे सर तुम्ही ग्रेट आहात हं….क्रेडिट कार्ड वालीला फोन बंद करायला लावलात. ती पुढे म्हणाली, सर त्या दिवशी ची ती आयुष्यातली पहिलीच वेळ बरं का, की मी स्वतः फोन कट केल्याची..
मी तिला म्हट्लं. मला माफ करा, त्या दिवशी जरा मुड खराब होता, आणि तुमच्याशी बोलल्यावर एकदम फ्रेश वाटायला लागलं.. धन्यवाद.. मला वाटतं की मी पहिलाच माणुस असेल तुला धन्यवाद देणारा.. आणि हसून बाय म्हणून फोन बंद केला…
भन्नाटच!
हसत – हसतच पोस्ट वाचली.. 🙂 म्हणजे अजुनही हसु आवरत नाही…:) महेंद्रजी… सि. चपराशी… सोन्याचं कार्ड…. बायकोच्या पाटल्या…. ! मला तर अजुनही विश्वास बसत नाही की एवढं सिरिअस लिखान करणारे आपण अगदी अशा “मुड” मध्येही अशी फिरकी घेऊ शकता! मान गये, स…र!
ता.क. – मला अशी फिरकी घ्यायचा चान्स कधी मिळालाच नाही.. पण आता मात्र माझ्याकडे तसा “कंटेंट” सुध्दा आहे!
तुमचं पोस्ट वाचलं आणि एकदम आठवली ही गोष्ट . साधारण एक वर्षभरापुर्वीची आहे . त्या दिवशी मला पण एकदम फ्रेश वाटायला लागलं तिच्याशी बोलल्यानंतर.
एकदा एका क्रेडिट कार्ड वालिला मी महिनाभर रोज फोन करायला लावला होता. ती मला लोन ऑफर करित होती, पण चिकाटी ची कमाल आहे बरं कां. रोज तिला मी सांगायचो, की आज बिझी आहे, उद्या फोन करा. महिनाभर रोज फोन केला तिने.. शेवटी एक दिवस कंटाळुन बंद केलं फोन करणं..
हा हा 🙂 मी सुरुवातीला सांगतो की बाबा / बाई मला इंट्रेस्ट नाहीय, पण तरी सुद्धा फोन ठेवला नाही(जो ते ठेवत नाहीतच) तर फोनवर बाबा असेल तर जितके सुमधुर शब्द वापरता येतील तितके वापरायचो आणि बाई असेल तर सिनेमा, हॉटेल मध्ये डिनरला वगैरे बोलवायचो. मग बरोबर फोन ठेवायच्या खाली. एकीला तर चक्क लग्न करशील तर कार्ड घेईन म्हणून सांगितल होतं
“एकीला तर चक्क लग्न करशील तर कार्ड घेईन म्हणून सांगितल होतं”
This is some thing unique. 🙂
जबरी … हा हा .. हसून हसून पुरे वाट … बाकी तिचे आणि तुझे दोघांचे शेवटचे वाक्य आवडले बरं का .. एकदम हटके शेवट. 😀
रोहन साठी
तुझ्या ब्लॉग वर कॉमेंट टाकता येत नाही असं अनुजा चं म्हणणं आहे. जरा बघ काय प्रॉब्लेम आहे तो सेटिंग मधे. कदाचित तु फक्त ब्लॉगर्स च्या कॉमेंट्स अप्रुव्ह केल्या असशिल.. जरा बघ काय आहे ते..
कुठल्या ब्लॉग वर? लडाख की सर्वच ??? मी बघतो आत्ता लगेच…
Mail kelay.. ladakh blog bahutek.
सह्ही….आश्चर्य असे की ह्यांना नंबर्स मिळतात कुठून ? आपले सर्विस provider’s नंबर डाटाबेस विकत असतील बहुतेक….
दु नॉट डिस्टर्ब मध्ये रजिस्टर केल्या पासून माझी अश्या काल्स पासून सुटका झाली पण SMS पासून काही सुटका नाही झाली….
विमानात आपण जे कॉंटेस्ट टु विन फॉर्म्स, किंवा मॉल्स मधे फ्रि गिफ्ट साठी जे फॉर्म भरतो ( महिंद्रा हॉलिडेज), तसेच इंडस्ट्रियल एक्झिबिशन्स करता आपण गेल्यावर जेंव्हा बिझिनेस कार्ड देतो, तेंव्हा ही सगळी डीटेल्स बाहेर जातात. माझ्या मुलिच्या क्लासमधे नंबर दिल्यापासुन पण बराच वैताग वाढलाय.
खरच आज खूप दिवसानंतर इतका हसलो आहे मी. भन्नाट म्हणाव का झकास तेच कळत नाही. पण आश्चर्याची गोष्ट हि कि तुम्ही मूड खराब असतांना अशा प्रकारे फिरकी घेतली.मला हि बर्याच वेळा असे फोन येतात मी सरळ ठेऊन देतो. पण आज हसून हसून लोटपोट झाल्या सारख वाटल. छ्छ्छ्छ्छ्छ्छान
रविंद्र
प्रतिक्रिये करता आभार. तसा विनोदी लिहिणं माझा पिंड नाही, पण काल सहज प्रयत्न केला. तसा प्रयत्न पण करावा लागला नाही, जसं झालं तसं लिहिलं..
महेंद्र, आज दिवसभर खूप गडबड झाली. ब्लॊगवरही काही टाकले नाही, तुझी पोस्टही आत्ता वाचली. दुपारीच का नाही वाचली म्हणून हळहळले. हसून हसून पुरेवाट झाली.त्या पोरीचा गोंधळलेला चेहरा डोळ्यासमोर येत होता. सहीच रे. एकदम धमाल पोस्ट झाली आहे.:) आपल्या इथले माहीत नाही पण इथे तुम्ही कुठल्याही स्टोअरचे कार्ड घेतले ना की तुम्हाला प्रत्येक गोष्टीत डिस्काऊंट मिळते पण तुमची सगळी माहीती अशा कॊल्ससाठी दिली जाते. मग वैताग सुरू. त्यात माझ्या नावाचा तर पुरा बट्ट्याबोळ……हेहे.
मजा आला आज.
भाग्यश्री
तुझं नांव ती फिरंगी बया कसं घेत असेल ह्याचा विचार करुनच हसु येतंय. इतकं कठिण नांव.. बापरे.. 🙂
एकदम धमाल लेख आहे हा तुमचा ….:D
maza navara ase ph aale ki tyana sangato aata busy aahe tuza no. de mi vel milala ki ph karato…samorachyla ph cut karnyashivay paryayach nasato….aata savayine mi pan hi idea karayala shikale
काका, ईनोदि लिखान लय झँक झालय बघा.
हा हा हा….मजा आली वाचतांना…..सद्ध्या आम्हाला पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी कन्सल्टंट्स कडून जागा घ्या म्हणून फोन येत असतात…..एका गावाला घ्यायची नाही म्हटल की दुसरा ऑप्शन तयार असतो त्यांच्याकडे….मी सरळ अमितच्या हातात देते फोन …त्याने एकदा सुसंवाद(?) साधला की पुन्हा काही ते आमच्या फंदात पडत नाहीत…..
देवेंद्र, मेघना, सचिन,तन्वी
प्रतिक्रियेकरता आभार..
mastch aahe post!!!
Thanks Yogesh.. 🙂
पिडण्यावरुन आठवले… पूर्वी एक ऑडिओ क्लिप आली होती मेल वर…. कॉल सेंटरची… एक माणूस कॉल सेंटरला त्रास देतो… आता त्याची एक मी पोस्ट टाकतो. 🙂
(हे बरंय… आपण एकमेकांना पोस्ट लिहायला प्रवृत्त करतोय.)
sahi aahe …..
आणि कॉल सेंटरची पोस्ट टाकली.
ऐकली.. मस्त आहे..
एखाद्या व्यक्तीचा मूड गेल्यावरही
कोणाची फिरकी घेण्याचा ‘मूड’ आलाच तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण
हा हा
बाकी त्या मुलीचे नाव काय होत ?
विक्रम
तिचं नाव विचारलं नाही, म्हणुनच तर क्रेडिट कार्ड वाली कन्या लिहिलंय.. 🙂
प्रतिक्रियेकरता आभार.
zabrdast
malahi ase calls yet astat pan tyana kay uttar dyayche he mala kalat navte. idea dilyabaddal dhanyawad.
अतुल
एकदा ट्राय करा. एखाद्या वेळेस तुमचा आवाज खुपच छान आहे हो.. म्हणुन पण पिडता येतं.
mala marathitun pratikriya kashi dyaychi he sanga. maza e mail id “atul14311@yahoo.com”
http://www.google.com/transliterate/indic/Marathi use this link to type and then cut paste in the comment window…
khup cha chaan.. tumcha ha blog khupach refreshing hota… ase prakar me airtel/vodafone ani baraych credit cards chya phones saathi kele hote…… khup majja yete…..
Mahendra tumhi kuthle software use karta marathi madhye write karyna saathi he saangu shakal ka.. plss….
mi baraha.com software use karato. ekda download kele ki maga te off line pan vaparata yete. free d/l available ahe.
खूपच छान आहे लिखाण.
Vijay
Thanks for the comments.
ha ha ha…sahi aahe….tumhi bhaltech miskil aahat he mala tasa pan watalach hota…ikde US madhe incoming free naste tyamule asle udyog nidan mobile war tari hoat nahit….ani do not call madhe register kela ki land line la pan marketting che calls shakyato yet nastat…pan bharatat incoming free aslyacha (gair) fayada barech jan ghetat na….
अपर्णा
प्रत्येका मधे एक लहान मुलगा असतोच, त्याला जिवंत ठेवायचा प्रयत्न करतो नेहेमी. 🙂
masttch… next tine me pan try karen..
Best luck.. 😀
SAHI KHOOP CHAN . KAHI TARI NAVAIN.
Amit
thanks for the Comment..
sahi ahe ekdum hasun hasun vaat lagliye………..mast firaki ghetali bhichari क्रेडीट कार्ड वाली कन्या….
ज्योती
लिहितांनाच मी पण खूप एंजॉय केलं होतं. विनोदी लिहीतांना मजा येते पण लवकर विषय सुचत नाहीत हा प्रॉब्लेम आहे.
वाह वाह, मजा आली वाचायला !!!!
मी चपराशी नाही हो.. तुम्हाला सांगितलं ना, सिनियर चपराशी आहे म्हणून
Lolz..
Thanks. Kanchan!
Kharach khupach chan, mud khrab astana sudha bicharichi vat lavlit
प्रतिक्षा
ब्लॉग वर स्वागत 🙂
किंवा लेडिज टेलर व्हावं.. ( कशाला ते लिहित नाही, )
आम्ही चार मित्रांनी मिळुन लेडिज टेलर डीप्लोमा करायचा ठरवला होता १०वी ला असताना!!!! पण काही जमलेच नाही हो!!!!!!!! 😀 😀 😀 😀 😀 😀
मी recently या ब्लॉग ची वाचक झाले आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा हाच लेख वाचला … १ नंबर लेख आहे. हसून हसून वाट लागली , हा लेख बस मध्ये वाचला .. पुढच्या सीट वरचे लोक वळून वळून बघत होते की अशी का हसत आहे म्हणून .. (कदाचित मी ‘येरवडा’ ची बस सोडून चुकून चिंचवड च्या बस मध्ये चढले की काय असं त्यांना वाटत असावं ) 😀
गायत्री
ब्लॉग वर स्वागत.. आणि प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.