भारतामधे खरंच असं होत असतं…..

वापीहुन मुंबईला येतांना ट्रेन मधे एक लहानसा मुलगा, फार तर ३ वर्ष वय असेल,चेहेऱ्यावर  मिशा रंगवलेल्या, डोक्यावर एक जोकर सारखी टोपी. तिला एक लांब  दोरी आणि दोरीच्या टोकाला एक रंगबेरंगी गोंडा. कंबरेवर ची चड्डी सारखी खाली घसरत होती, तिला सांभाळत आणि नाक पुसत तो मुलगा सगळ्यांकडे पहात होता.. त्या  मुलाच्या बरोबर त्याची बहिण बहुतेक दोन वर्षं, बरोबर होते. तिचेही कपडे खुप मळलेले आणि फाटलेले.फ्रॉक खांद्यावरून घसरत होता. फ्रॉकला पाठीमागची बटन्स नव्हती. त्यामुळे लज्जा रक्षणाचे काम पण तो व्यवस्थित करु शकत नव्हता.
.
त्या मुलाच्या हातात एक लोखंडी रिंग.. इतक्या आकाराची की त्यातुन तो मोठ्या मुश्किलीने पास होऊ शकेल एवढी..त्या दोघांच्या बरोबर एक जरा मोठा म्हणजे १२-१३ वर्षाचा एक मुलगा. त्याच्या गळ्यात एक ढोलकी लटकवलेली, तो मुलगा ढोलकी वाजवत होता आणि ही दोन मुलं त्या रिंग मधुन एकदम पास होत होती. तसेच कोलांट्या उड्या वगैरे पण मारत होते.
.
तो लहान मुलगा मधेच थांबला, आणि आपली मान अशा तर्हेने फिरवू लागला, की त्याच्या टोपीचा गोंडा सुदर्शन चक्राप्रमाणे फिरु लागला. ती दोन्ही मुलं अगदी पॅथेटिक दिसत होती.आपलं खेळणं.. म्हणण्यापेक्षा कलाकारी झाली आणि ती दोघंही लहान मुलं डबाभर पैसे मागत फिरु लागली. डबा धरुन तो वाजवत पैसे मागू लागले. पैसे मागण्याचे काम अर्थात त्या लहान मुली कडे होतं.ओंजळीत मावणार नाहीत इतके पैसे मिळाले त्या मुलाला. प्रत्येकानेच एक दोन रुपये दिलेत.
परवा नाशिकला गेलो होतो, तर माझा भाचा आणि भाची दोघंही मार्केटला फिरायला गेले. तिथे डोंबाऱ्याचा खेळ सुरु होता. त्यात एक लहानशी मुलगी फारतर सात आठ वर्षाची असेल.. ती एका लांब ताणलेल्या दोरावर उड्या मारत होती. दोरावर चालणं हे तर आधी पाहिलं आहे पण खाली काहीही  सुरक्षा जाळी नसतांना इतक्या बिनधास्तपणे त्या दोरीवर उड्या मारणारी मुलगी बघितली आणि मनात चर्र्र्र्र झालं. वाटलं, जर ती खाली पडली तर   १० -१२ हाडं तरी मोडतील तिची..!गौतमी ला पण माझ्या प्रमाणेच जो दिसेल तो फोटो काढायची सवय आहे. तिने एक लहानसा व्हिडीओ बनवला त्या लहान मुलीचा.
dombari
आजकाल मुंबईला वगैरे तर डोंबार्य़ाचा खेळ दिसत नाही. पुर्वी हिंदी सिनेमात गेटवे वर डॊंबाऱ्याचे खेळ दाखवले जायचे. हल्ली चाइल्ड लेबरचा कायदा स्ट्रिक्ट झाल्यामुळे बंद झाला असावा, पण लहान गावांत मात्र अगदी ओपनली सुरु असतात असे प्रोग्राम्स..
.
चाइल्ड लेबर म्हणजे फक्त असेच लेबर्स नाहीत. आज नेमकं लक्षात आलं, की रेल्वे स्टेशनवर पॉलिश करणाऱ्या मुलांचं वय १५ च्या वर नाही. समोर चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या मुलाचं वय पण १२-१३ असेल. त्या चहावाल्याला विचारलं, म्हंटलं,अशा तऱ्हेने लहान मुलाकडून काम करुन घेणं कायद्याने गुन्हा आहे, तर तो भैय्या म्हणाला, ये लडका मालिक है.. नौकर तो मै हूं…. आता बोला?? कायद्यातल्या पळवाटा आधी शोधून काढतात लोकं..
.
हाय कोर्टाने आदेश दिले आहेत पोलिसांना, की जी मुलं तुम्ही बाल कामगार कायद्याअंतर्गत सोडवलेली आहेत त्यांच्याबद्दल माहिती सांगा. मध्यंतरी पोलिसांना कोर्टाने विचारले की तुम्ही किती मुलांची  सुटका केली , आणि सध्या ती मुलं कुठे आहेत? यावर पोलिसांनी ५७०० मुलांची सूटका केल्याचं सांगितलं पण ती मुलं कुठे आहेत हे पोलीस सांगु शकले नाहीत.कोर्टाने वर असंही म्हंटलं आहे की जर तुम्ही त्यांना कांही प्रशिक्षण देत नसाल, तर v एखाद्या मेकॅनिककडे काही वर्षं काम केलं की तो मेकॅनिक बनतो.
हे सगळं इथेच संपत नाही. कुठे तरी शारीरिक मेहेनतीची कामं केलेली आपण समजू शकतो. पण अशा लहान म्हणजे अगदी दहा वर्षांच्या मुलींना देह विक्रया करता भाग पाडलं जातं. इथे असंही वाचण्यात आलं की भारता मधे असा समज आहे की दहा वर्षाखालील मुलींच्या बरोबर संबंध ठेवल्यास गुप्त रोग बरे होतात. आता अशा उपायाने रोग तर बरे होत नाहितच पण त्या बिचाऱ्या लहान मुलिंना मात्र या रोगांची लागण होते. भर रस्त्यावर फटके मारायला हवेत अशा लोकांना.

.जरी हा कायद्याने गुन्हा असला, तरीही हा व्यवसाय अगदी धडाक्यात आणि ओपनली सुरु असतो. गुगल वर व्हिडीओ सर्च केला तर इतके  बिभत्स व्ह्डीओ पहायला मिळाले, (यु ट्य़ुब वर नाही) की अगदी किळस यावी.

.इस्लाम मधे प्रोफेटने पण सहा वर्षाच्या मु्लीशी लग्न केल्याचा  दाखला आहे. त्यामुळे इस्लाम मधे धर्माच्या नावाखाली अजूनही चाइल्ड मॅरेज केले जाते. राजस्थानात तर लग्नाच्या नावाखाली ऑफिशिअली मुली विकण्याचा धंदा चालतो. आपल्याला हे सगळं माहिती असून सुद्धा आपण मात्र ’बालिका बधु’ सारखे सिरियल्स आवडीने पहातो. आपली मानसिकताच तशी झालेली आहे.

इथे मी सिलेक्टेड क्लिप्स दिलेल्या आहेत. यु ट्युब वर भरपूर माहिती आहे , पाहिली तर खरंच आपण या जगामधे का जगतो? आणि लोकं असे का वागतात? ह्या विचारानेच जीव देण्याची इच्छा होते..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , . Bookmark the permalink.

8 Responses to भारतामधे खरंच असं होत असतं…..

 1. ravindra says:

  आपण ह्या वेळी एक वेगळा व समाज्याचे विभत्स रूप दाखवणारा लेख लिहिला आहे. लेखात लहान मुलांच्या कामाबद्दल लिहील आहे. याबद्दल इतक लिहू शकतो कि परिस्थिती माणसाला काय करायला लावेल याचा नेम नसतो. प्रत्येक मुलाला लहानपण जगायला आवडत असत. पण परिस्थिती तसे करू देत नाही. त्याला घर चालविण्यासाठी हातभार लावावा लागतो. यास ती मुल नाही अशिक्षा व त्यांचे पालक जवाबदार असतात. पूर्वी घरात काम धंदे नसतांना ५,६,७,८ अशी मुलांची संख्या असायची. ते घर चालणार कस. लहानपणापासूनच काम करावी लागायची. त्यातूनही ज्यांनी शिक्षण घेतलं ती वर गेली.(स्वानुभव). आज हि आपण जे चित्र बघतो आहोत त्यास मुख्यत्वे करून अशिक्षाच जवाबदार आहे. महागाई, टी.व्ही. चे झगमगते विश्व, मोबाईल हे सुद्धा जवाबदार आहे. तुम्ही विचार करा महिन्द्रजी,आज मोबाईल सारखी गरिबांना अनावश्यक वस्तू प्रचंड स्वस्त आहे. (काही जाहिराती होत्या वडा-पाव पेक्षा हि स्वस्त मोबाईल अश्या). मात्र खायच्या सर्व वस्तू महाग आहेत. हा विरोधाभास नाही का. मला वाटत जर प्रत्येक गरिबाने दोनच मुल अस ठरविले व काहीही करून मुलाला शिक्षण दिल तर समाजात थोडा फार तरी बदल दिसून येईल. प्रत्येकाने चादर बघून पाय पसरल्यास चित्र पालटेल. पण या टी.व्ही. च्या झगमगत्या जमान्यात हे कदापि शक्य वाटत नाही.

  • रवींद्र
   ह्या विषयावर बरंच काही आहे नेट वर. पण असे व्हिडीओ असले तरिही पहाण्याची इच्छा होत नाही. अशा बातम्या पण आपण स्किप करतो नेहेमी.

 2. bhaanasa says:

  महेंद्र, खरेच किती भयानक आणि भयावह आहे हे सगळे.चाईल्ड लेबरचे लैंगिक शोषणही केले जातेच.म्हणजे जीवघेणे काम, कमी पैसा व मानसिक व शारीरिक बलात्कार.जगण्याची इतकी किंमत मोजावी लागल्यावर यांची मानसिकता काय होत असेल याची कल्पनाही करवत नाही.

  इतक्या छोट्या जागेत सहा मुली कश्या मावल्या असतील. आणि सोडवल्यावर त्यांना असेच वार्यावर सोडून दिले. वर तो पोलीस ऒफिसर आश्वासन देतोय की त्यांना काहीच होणार नाही. असे असते तर त्या इथे आल्याच नसत्या ना?
  हे गुप्त रोग बरे होणे प्रकाराची वदंता मीही ऐकलीय.किती प्रकारे मुलींचे दुर्दैव असावे. तू म्हणतोस ते मलाही समजत नाही, ’ बालिका बधू ’ सारखी सिरियल सगळे जण अतिशय आवडीने-इनव्हॊल्व्ह होऊन कसे काय पाहू शकतात. म्हणजे अत्याचार होणे हे गृहीतच धरलेले आहे ना? ही विचारधारणा जर सामान्य लोकांमध्ये इतकी खोलवर रुजलेली असेल तर हे सगळे कसे बदलायचे? काही क्लीप्स पाहिल्या तेव्हा मात्र खरेच वाटले की माणूस हा जनावरापेक्षाही क्रूर आहे व त्यापेक्षा नीच व स्वार्थी आहे. जे लोक असे वागतात त्यांना नुसते फटके नाही रे वाळवंटातला कायदाच हवा तिथे. असे १०० लोकांबरोबर झाले ना की अशी जबर दहशत बसेल की अशी कृत्ये करण्याआधी किमान एकदा तरी विचार करतील.

  खूप महत्वाचा मुद्दा मांडलास.

  • भाग्यश्री
   मी तिथे फक्त एक भाग पोस्ट केलाय. ह्या व्हिडीओ चे तिन भाग आहेत. एक ब्रिट येउन भारतामधे हे सगळं करु शकतो , मग भारतिय कां नाही? हाच प्रश्न मला सतावत होता. पोलिस रेडच्या जस्ट आधी सगळ्या ब्रॉथेल्स वर निरोप जातो की आज रेड होणार आहे म्हणुन, आणि नंतर मग सगळ्या आक्षेपहार्य मुलिंना दुर नेउन ठेवलं जातं. त्या मुळे रेड च्या वेळी काहिच मिळत नाही.

 3. Aparna says:

  मला व्हिडिओ पाहावणार नाहीत म्हणुन मी पाहिले नाहीत पण आपण म्हणता तसंच…अशा गोष्टी कळल्या की खरचं उबग येतो अशा मनोवृत्तीचा.
  BTW मागच्या वर्षी दिवाळीत मी बोरीवलीत डोंबार्याचा खेळ पाहिलाय बरं आणि वासुदेव सुद्धा. मला त्या मुलीची दया आली आणि कधी कधी वाटतं की यांना घेऊन फ़िरणारे त्याचे खरे आई-बाप तरी असतील का?? म्हणून मी सरळ तिला खाऊ आणि कपडे दिले पैसे द्यायच्या ऐवजी..
  आणि कायद्यातल्या पळवाटा काढण्यासाठी आपला क्रमांक वरचा लावला पाहिजे नाही???

  • अपर्णा
   हा विषय तसा फार हळवा करणारा. म्हणुन खरं तर यावर लिहायला आवडत नाही कोणालाच. पण बाल कामगार लिहितांना ओघा ओघाने आलं म्हणुन लिहिलं.
   पण एक विनंती आहे, व्हिडीओ जरुर पहा. त्याशिवाय या सिच्युएशनची ग्रॅव्हिटी लक्षात येणार नाही. केवळ २ वर्षाचं पोर गिट्टी फोडतंय… हॉरिबल…

 4. sonali says:

  kay balav kay lihav tec kalat nahi, jitka vichar karu titka kamic aahe. ha vishay jasa jelava tasa jelto jasa valava tasa valto, pan utter shevat paryant bhetat nahi. pratek jan mahnatat kay karav kay karav.

  • सोनल
   पण जर प्रश्न माहिती असेल तर उत्तर शोधण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाऊ शकतो. प्रतिक्रियेसाठी आभार.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s