‘त्यांची’ जयंती

दोन ऑक्टोबरला काय आहे विचारलं तर शेंबडं पोर पण सांगेल महात्मा गांधी जयंती, पण याच दिवशी दुसऱ्या एका महापुरुषाची जयंती असते, जिच्या कडे सगळे जण पुर्ण दुर्लक्ष करतात.

१९५६ साली दक्षिण भारतामधे रेल्वे चा ऍक्सिडेंट झाला असतांना ह्या गृहस्थाने रेल्वे मंत्री म्हणून ऍक्सिडेंट्ची पुर्ण जबाबदारी स्विकारुन राजीनामा दिला. आजचे गेंड्याच्या कातडीचे नेते ह्या नेत्याच्या चप्पल जवळ पण  उभे करण्याच्या पण लायकीचे नाहीत.हे रेल्वे मंत्री असतांना यांनी पुर्वी असलेला रॉयल फर्स्ट क्लास , ज्या मधे खूपच जास्त फॅसिलिटिज होत्या तो ऍबॉलिश केला होता. आणि सेकंड क्लास ला फर्स्ट क्लास मधे परिवर्तित  केलं. थर्ड क्लास ची अवस्थ, जी अगदी थर्ड क्लास होती, ती बरीच दुरुस्त केली. आणि बेसिक फॅसिलिटिज जसे टॉयलेट वगैरे सुरु केल्या.

हे कॉंग्रेस पक्षाचे पहिले जनरल सेक्रेटरी होते. ह्यांना कॅंडीडेट्स सिलेक्शन चं पुर्ण स्वातंत्र्य होतं, तरी पण ह्यांनी निवडणु्क लढवली नव्हती.पंडित जवाहरलाल यांनी शेवटी त्यांना राज्यसभेच्या मार्गे निवडून आणलं.

होम मिनिस्टर गोविंद वल्लभ पंत यांच्या मृत्यु नंतर १९६१ मधे हे होम मिनिस्टर झाले. यांनी पुढे मंत्री म्हणून राजीनामा दिल्यावर आपलं सरकारी निवासस्थान रिकामं करुन दिलं. तेंव्हा त्यांच्याकडे रहाण्यासाठी पण जागा नव्हती.हा नेता होम मिनिस्टर असतांना ह्याचं स्वतःचं घर नव्हतं. ह्या नेत्याला सगळे  होमलेस होम मिनिस्टर म्हणायचे. ह्या नेत्याने केलेले स्वातंत्र्यपूर्व कार्य पण खुप मोठं आहे.

१९६५ च्या भारत पाक युध्दामधे यांनी ज्या तर्हेने  ’विथ  आयर्न फिस्ट” तो प्रश्न हाताळला, त्या मुळे मी यांना लोह पुरुष म्हणतो..त्यांनी मिल्ट्री ला पूर्णपणे मोकळिक दिली होती, सियालकोट आणि लाहोर पर्यंत अटॅक करण्याची. असा आविर्भाव एकाही नेत्याला  नंतर दाखवता आला नाही. याच युध्दा मधे भारताची शक्ती जास्त आहे  हे दिसल्यामुळे अय्युब खानला गुडघे टेकवण्यास भाग पाडले.

नेमकं ह्याच वेळेस युनायटेड नेशन्स ने युद्ध बंदी करण्याची विनंती केली. रशियाचे पंतप्रधान कोसिजिन ह्यांनी अयुब खान आणि शास्त्रींच्या मधे ताश्कंद ला मध्यस्थी करण्याचे मान्य केले. १० जानेवारी रोजी ताश्कंद ला नो वॉर ऍग्रिमेंट सह्या केल्या गेलं- शास्त्रीजी आणि अय्युब खानमधे.. आणि नेमकं त्याच रात्री या थोर नेत्याचा मृत्यु झाला.. का आणि कसा त्या बद्दल खूपच गूढ आहे.

मला अजूनही वाटतं की भारताला शास्त्रिजींच्या सारख्या   पंतप्रधानांची गरज आहे. पाकिस्तानला आपली जागा दाखवून देणारा…एक लक्षात घ्या, त्या पिरीयडमधलं शास्त्रिजिंचं पारडं खूप जड होतं, आणि अय्युब खान अगदी हतबल झालेला होता. शास्त्रिजिंच्या मृत्युमुळे अय्युबखानाला थॊडी उभारी नक्कीच मिळाली. ताश्कंद च्या वाटाघाटी साठी आमचे पंतप्रधान जातात, आणि परत येते ते त्यांचे शव!

या प्रकारामधे काहीच चुकीचे  वाटत नाही? ह्यांच्या मृत्यु नंतर इंदिरा गांधी नी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.कदाचित शास्त्रिजी असते तर पाकिस्तानची………….असो.. जर आणि तर ला काहीच महत्व नसतं..

भारतामधे हरित क्रांती चे जनक म्हणून यांना ओळखलं जातं. जय जवान जय किसान.. हा नारा म्हणजे केवळ नारा नव्हता… या मधे सगळ्यांच्या भावना ओतलेल्या होत्या..वेरावळचं -सोरटी सोमनाथ मंदिराचं बांधकाम यांच्या पुढाकाराने सुरु झालं. हे मंदिर बांधलं तेंव्हा जवाहरलाल नेहेरु यांनी पण या मंदिराच्या बांधकामाला विरोध केला होता- अल्प संख्यकांच्या भावना दुखावतील म्हणून. पण या लोह पुरुषाने मात्र कोणाचीही पर्वा कधीच केली नाही.आजकालच्या बोटचेप्या धोरणांच्या नेत्यांपेक्षा हा नेता खूपच वेगळा होता…

भारताचे तिसरे पंतप्रधान.. ज्यांच्या कामगिरीला आज सगळे कॉंग्रेसी हेतुपुरस्सर विसरले आहेत , पण भारतीय जनता त्यांच्या योगदानाला कधीच विसरणार नाही.
आजच्या दिवशी त्यांची आठवण काढून श्रध्दांजली अर्पण करावीशी वाटली  म्हणून हा ब्लॉग…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय... Bookmark the permalink.

40 Responses to ‘त्यांची’ जयंती

 1. sahajach says:

  सहमत…..आणि त्यामुळेच ही पोस्ट भावली…..आमच्या आजोबांनी व्यक्त केलेली गांधिजींविषयीची जहाल मतं ऐकून त्यांच्याबद्दलचे मतं नंतर स्वत:ला थोडीफार अक्कल आल्यावर देखील बदलले नाहीत….आजचा दिवस खरच मोठा आहे तो शास्त्रीजींच्या जयंती मुळे…त्यांच्या विषयीचे मुर्ती लहान पण किर्ती महान हे मत मात्र आजतागायत बदलले नाही…..आपल्या देशात कुंभार थोडे आणि गाढव्रे जास्त आहेत हे अश्या दिवसांना तर अधिक जाणवते….सगळा स्वार्थी बाजार आहे राजकारणात….ते कशाला अश्या सच्च्या नेत्याची पर्वा करतील…पण भारतीय जनता नाही विसरणार त्यांना …..

  • कित्येक लोकांना आज शास्त्री जयंती असते हे पण माहिती नसते . शाळांमधे पण काहिच सांगितलं जात नाही. गांधी घराण्याचं महत्व कमी होऊ नये म्हणुन हेतुपुरःसर शास्त्रिजिंना डावललं गेलं असं माझं मत आहे.

 2. Nilesh Joglekar says:

  Blog faar awadla. Shastrijin sarkhe nete ata hya deshat nahit he bharatacha durdaiva ahe

  • निलेश
   सरकार जाणिव पुर्वक त्यांची आठवण मिटवायचा प्रयत्न करते आहे, ह्याचं वाईट वाटतं. कमित कमी श्रद्धांजली चे तर नक्किच हकदार आहेत ते. त्यांचं ६५ च्या युध्दातलं योगदान विसरुन चालणार नाही.

 3. माझे वाचन “त्या” मानाने कमी आहे. त्यामुळे आपले पोष्ट वाचून ज्ञानात खरोखर बहुमुल्य भर पडली…

  • शिरिष
   प्रतिक्रियेकरता आभार..ताश्कंद ला काय झालं हे तर शेवटी गुलदस्त्यातच राहिलं. त्या विषयावर असंही म्हंट्लं जातं की त्यांचा विषप्रयोग करुन खुन करण्यात आला, कारण, त्यांचं जिवंत रहाणं अय्युब खानच्या दृष्टिने हिताचे नव्हते. असंही वाचण्यात आलेलं आहे की त्यांच्या मृत्यु मागे *** चा पण हात होता. आता काय असेल ते असो, पण कागदपत्री त्यांचा मृत्यु हार्ट अटॅकनेच झाला.

   • India, The Mother हे योगी अरविंदांच्या मदरचे पुस्तकात ह्या प्रकरणावर थोडा अध्यात्मिक प्रकाश टाकण्यात आलेला आहे… मदर कडून… अवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे.

   • मृत्युपूर्वी शास्त्रीजींना दोनदा हार्ट अटॅक येवुन गेला होता !

 4. vikram says:

  भारताचे तिसरे पंतप्रधान.. ज्यांच्या कामगिरीला आज सगले कॉंग्रेसी हेतु पुरस्स्सर विसरले आहेत , पण भारतिय जनता त्यांच्या योगदानाला कधिच विसरणार नाही.

  अगदी मनातले बोल

  जय जवान जय किसान

  • विक्रम
   प्रतिक्रियेकरता आभार.

  • शास्त्रिजींच्या म्रुत्यु बाबत मी मुद्दाम लिहायचं टाळलं होतं. उगिच कॉंट्रोव्हर्सी नको म्हणुन. कच्छच्या रणामधे काला पहाडी म्हणुन एक जागा आहे, भुज च्या जवळ. ( जवळ म्हणजे १२५ कि.मी. असेल) तिथुन युध्द झालं असं वाचलंय.. तुझा बराच अभ्यास आहे इतिहासाचा . एक चांगलं पोस्ट लिही पाकिस्तानची युध्दं या विषयावर..
   मी स्वतः परिवारातला, त्या मुळे मी एक पोस्ट लिहिणार आहे श्री गुरुजींच्या वर.. 🙂

 5. humans stay alive for max 100 years.

  No one can stay alive for 140 years.

  How long this farce shall continue??

  • ह्या सगळ्यांना सरकारी देवत्व प्राप्त झालेलं आहे. आता एकदा देव म्हंटलं की मग नेहेमी साठीच चालणार ह
   इंग्रजी मधे एक म्हण आहे, कॉल हिम अ मॅड डॉग ऍंड शुट हिम..
   ……त्याच धरतिवर.. कॉल हिम अ गॉड, ऍंड बिल्ड श्राइन्स… वर्शिप हिम.. 🙂
   अश्वत्थाम्या प्रमाणे हे सगळे चिरंजीव आहेत.
   अजुन कांही वर्ष तरी नक्किच चालणार हा फार्स..

 6. आपल्या मतांशी सहमत! खात्रीशीर नाही, पण मला वाटते शंभरातले ९०-९५ लोक तरी आज गांधी-जयंती आहे असंच म्हणतील. सोप्प आहे – सुट्टी त्याच नावाने मिळते ना! शास्त्रींजींना भावपुर्ण श्रध्दांजली!

 7. bhaanasa says:

  ”मूर्ती लहान पण किर्ती महान’जर तर मध्ये पडण्यात काहीच अर्थ नाही तरिही मनात येतेच की शास्त्रीजी अजून जगले असते तर कदाचित आपण काही चांगल्या गोष्टी अनुभवल्या असत्या. अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करण्यात व स्वत:ची तुंबडी भरण्यात मग्न लोकांना काही काळ थोपवले गेले असते.पण आपले दुर्दैव शास्त्रीजींच्या जाण्यापासून सुरू झाले ते आजही सुरूच आहे. तू म्हणतोस तसे खरेच अनेक जणांना आज शास्त्रीजींचीही जयंती आहे हे माहीतही नाही.भुंगाशी सहमत.या महान माणसाला भावपुर्ण श्रध्दांजली. नेहमीप्रमाणे आजची पोस्ट भावली.

  • सोरटी सोमनाथ च्या मंदिराच्या वेळेस त्यांना रा.स्व.संघाने पण सपोर्ट केला होता. पण १९४८ च्या संघ बंदी मुळे बरिच ताकत कमी झाली होती संघाची. जाउ दे.. या वर एक नविन पोस्ट लिहिन नंतर. १९४८ ची संघ बंदी…

   • ह्या पोस्ट कॉमेंट्सचा स्वतंत्रता दिवस साजरा झाल्याबद्दल शुभेच्छा…

    तसा १५ ऑक्टोबर हा कलामांचा जन्मदिवस आणि जागतिक अंध सहाय्यता दिवसही गणला जातो…

    🙂

 8. rohan says:

  “त्यांची जयंती” असे पोस्टचे नाव वाचल्यावर मला अर्थात गांधीजयंतीवर पोस्ट असणार असेच वाटते होते पण हटके पोस्ट लिहिली नाही तर तो महेंद्र दादा कसला … 🙂

  नेहमीप्रमाणे पोस्ट एकदम मस्त झाली आहे. शास्त्रीजींबद्दल मला सुद्धा फारसे ठावुक नाही आहे. पण १९६५ चे युद्ध हा त्यांच्या कारकिर्दीचा परमोच्च बिंदु ठरला हे नक्की. १६६५ च्या युद्धाची सुरवात खरे तर कच्छचे रण येथून सुरू झाली हे बरेच जणांना माहीत नसते.

  शास्त्रीजींनी तेंव्हा म्हटले होते,”पाकिस्तान जरा तारतम्यबुद्धि आणि सामंजस्याची अशीच पायमल्ली करत राहिला आणि भारतावरील आक्रमणाचा पाठपुरावा करणे त्याने सोडले नाही तर भारतीय सेना मातृभुमिचे संरक्षण करण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही आणि त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी यथायोग्य रणनितीचा अवलंब करण्यास मागेपुढे बघणार नाही.”

  १९६५ मध्ये पाकिस्तानने सुरू केलेल्या ऑपरेशन जिब्राल्टर, ऑपरेशन बक्शी आणि ऑपरेशन ग्रँड स्लॅम या तीनही ऑपरेशन्सचा धुव्वा आपण उडवला त्याचे राजकीय श्रेय हे संपूर्णपणे शास्त्रीजींचे. ह्यावर खरं तरं एक ब्लॉग पोस्ट होऊ शकेल रे दादा. तरी मी लडाख ब्लॉगमध्ये १९६५ बद्दल काही लिहिला नाही आहे.

  त्यांचा मृत्यू संशयास्पद आहे. नेताजी आणि त्यानंतर शास्त्रीजीं या दोघांच्या अकाली जाण्याने देशाचे मोठेच नुकसान झाले. फायदा कोणाचा झाला ते सर्वांना माहीत आहेच… “त्यांच्या” जयंती निमित्त त्यांना श्रध्दांजली … !

  जय जवान… जय किसान… !

 9. सगळंच चुकीचं वाटतं! मला नक्की माहीत नाही, वाचनाची गरज आहे. पण जे ऐकलंय ते असं की त्याच दिवशी ’नो वॉर’ करारावर सही केल्याने, विश्वासार्हता प्रकट करण्यासाठी शास्त्रीजींनी प्रथमच त्यांना वाढण्यात आलेल्या भोजनाची शहानिशा न करता, ते भोजन सेवन केलं होतं म्हणे.

  • त्यांच्यावर विष प्रयोग केला गेल्यामुळे कुणाचा फायदा झाला हे सगळेच जाणतात. आणि कदाचित म्हणुनच पोस्ट्मॉर्टेम पण केलं गेलं नव्हतं.. असो..

 10. Rajeev says:

  एका ही भाडखाउ टी.व्ही. वाहीनी वर शास्त्रीजीं च्याबद्दल
  पाच मीनीटांचा कार्यक्र्म नसावा ???
  सगळे मात्रुगमनी आहेत……

 11. Rajeev says:

  लाल बाहादुरजी हे मुळचे “श्रीवास्तव”
  कोंग्रेस ला ब्राम्ह्णण कसे चालतील…?

 12. Rajeev says:

  गांधीजी हे बापू …
  तर..
  शास्त्रीजी हे बाप होते..

  .

  • शास्त्रीजी सगळ्यांचेच बाप होते, म्हणुन तर त्यांचा संशयास्पद मृत्यु झाला. यातच सगळं काय ते आलं. आणि कॉंग्रेस सरकार कन्व्हिनिअंटली सगळं विसरवण्याचं काम करतंय याचं वाईट वाटतं.

 13. ravindra says:

  माझे आदर्श(१) महात्मा गांधी (२) लाल बहादूर शास्त्री (३) रवींद्र नाथ टागोर

 14. शास्त्रीजींवर दोन वाचनीय लेख –

  Why has history forgotten this giant? – http://www.rediff.com/news/2004/oct/06spec1.htm

  The politician who made no money – http://www.rediff.com/news/2004/oct/07spec1.htm

 15. खुप छान पोस्ट (नेहमीप्रमाणेच :)) ९९.९९% लोकांना आज माहिती नसेल की आज शास्त्रीजींची जयंती आहे, शास्त्रीजी म्हणजे फारच थोड्या कॉंग्रेसच्या लोकांपैकी आहेत ज्यांनी खरच देशासाठी काहीतरी केले. पोस्ट बद्दल thanks, शेअर करतोय बाकीच्यांनाही कळुदेत..

 16. सुरेख लेख … बझवर शेअर करतोय …
  राजीवजी म्हणतात त्याप्रमाणे….
  गांधीजी हे बापू …
  तर..
  शास्त्रीजी हे बाप होते….

 17. ह्या महान नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली… ह्यांच्या सारखा नेता होणे शक्य नाही !!

  आपल्याला जाणूनबुजून ह्या इतिहासापासून दूर केलं आहे ह्या गांधी परिवाराने … ^%$%$#%#(*

  • सुहास
   लोकमान्य टिळक, सावरकर आणि शास्त्रीजीं सारख्या सगळ्या लोकांना विसरून जावे लोकांनी हीच अपेक्षा आहे सरकारची..

 18. काका मस्त आहे पोस्ट, शेअर करत आहे.

  • नागेश
   दोन वर्ष जुने पोस्ट आहे, आज जेंव्हा शास्त्रीजींचा अजिबात कुठे उल्लेख दिसला नाही तेंव्हा पुन्हा पोस्ट केलंय आज फेसबुक वर

 19. महेश कुलकर्णी says:

  बापुजीचा सर्वच राजकीय पक्ष नेहमीच उदो उदो करीत आहे , जय जवान जय किसान म्हणारे शास्त्रीजी आता त्यांना नको आहे, आशा महान नेत्याला सलाम त्याची नोद सर्व पक्षाने घ्यावी,व आदर्श घ्यावा,सुदर,सर्वाना माहिती करून दिली,,

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s