हनिमुन..

honeymoonकाय… मस्त वाटलं ना हेडींग बघून? की आता या पोस्ट मधे काहीतरी चमचमीत वाचायला मिळणार म्हणून?? 🙂 तसा हनिमून हा शब्द  ऐकला की अगदी स्वप्नांच्या देशात गेल्यासारखं वाट्त. उगाच ते जुने दिवस आठवतात….जर लव्ह मॅरेज असेल तरी पण हनिमुनची गम्मत काही वेगळीच.त्यामुळे प्रत्येकालाच तो आयुष्यभर लक्षात रहावासा वाट्तो. कांही तरी स्पेशल करावं असं वाटत असतं.

आमच्या विदर्भात लग्न म्हणजे एक मोठा सोहोळा असतो. आदल्या रात्रीच्या सिमंतपुजना पासून तर अगदी सुन मुख होई पर्यंत दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ होते.आणि हे सगळ होई पर्यंत नवरा मुलगा आणि ती मुलगी दोघंही अगदी थकून जातात. घरी गेल्यावर पण पाहुणे वगैरे असतातच. म्हणजे घरी गेल्यावर पण मोकळीक अशी नाहीच.. इथे मुंबईला लग्नं कशी पटापट होतात. सकाळी ८ ला सुरु झालं की ११ वाजे पर्यंत होम, सुन मुख सगळं कांही आवरलं जातं, आणि संध्याकाळी सगळे पाहुणे आपापल्या घरी. मला आवडली इथली फास्ट पध्दत.

हनिमून पिरियड किती दिवस चालणार? लग्न झाल्यावर रिसेप्शन, पाहुणे वगैरेची धावपळ संपली की मग आधी कुलदेवतेचे दर्शन ,कांही लोकांच्या घरी देवीचा गोंधळ , झाला आणि पुजा झाली की मग दोघंही मोकळे होतात, आणि नंतर उरलेल्या वेळात हनिमून,!अशी परंपरा आहे  . ह्या सगळ्या समारंभात वडिलधाऱ्या माणसांच्या दृष्टिने अगदी सगळ्यात कमी महत्वाचा भाग म्हणजे हनिमून.  जी १५ दिवस सुटी मिळते तेवढ्यातच हे सगळं बसवायचं असतं. लग्न तर झालं, पण नौकरी पण महत्त्वाची ना? त्यामुळे एक्झॅक्ट हनिमूनसाठी पिरियड म्हणजे जास्तीत जास्त ५ दिवस ते एक आठवडा.

आयुष्यात हा हनिमुन पिरियड बरेचदा येतो. अरे काय राजे?? असे कपाळावर आठ्या का आणताय? आधी नीट वाचा तर पुढे… तर काय… की आजकालच्या जॉब हॉपिंगच्या कल्चर मधे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे उड्या मारणारे बरेच लोकं असतात. मग नवीन ठिकाणी गेल्यावर, तिथलं वर्क कल्चर, कंपनीचं आपलं स्वतःचं अस्तित्व आणि त्या अनुशंगाने लोकांची कंपनीतली , आणि एकमेकांशी असलेली वागणुक खूप वेगळी असते.नवीन नौकरी.. नवीन बॉस.. आणि वर दिलेलं नवीन कल्चर.. ह्या सगळ्यांशी जुळवून घ्यायला, आणि कामाचं स्वरुप समजावून घ्यायला थोडा  वेळ नवीन   नवीन एम्प्लॉइ ला दिला जातो. या काळात बॉस त्याला काहीच म्हणत नाही. . पण एकदा थोडे दिवस गेले की  मग मात्र….. जे कांही होतं ते असं असतं- खाली दिल्यासारखं…

परवाच आमच्या इथे एका नवीन सेल्स इंजिनिअरला मार्केटिंग मॅनेजर झाप- झाप- झापत होता, आणि तो बिचारा खाली मान घालुन येस सर करित ऐकत होता. म्हंटलं   हनिमून पिरियड संपला रे बाबु तुझा , बच्चे अब दाल आटे के भाव मालुम पडेंगे.

हनिमून नंतरचं पहिलं भांडण आणि नंतर किस हर ऍंड मेक अप.. असं इथे ऑफिसमधे करता येत नाही नां. ( अर्थात बॉस जर …. असो….  🙂 ) त्यामुळे ही बॉस बरोबरच्या  पहिल्या फायरिंगची/ भांडणाची  जखम जरा जास्तच जिव्हारी लागते.उगाच जुनी कंपनी सोडून इथे आलो, तिथेच बरं होतं, चांगलं चाललं होतं कुठुन दुर्बुद्धी सुचली म्हणून इथे या कंपनीत आलो- असं वाटायला लागतं.

असं वाटतं ना की हनिमून पिरियड जर आयुष्यभर चालला, किंवा थोडा जास्त चालला तर कित्ती मज्ज्ज्ज्जा येईल ? हो की नाही??? अहो सहज शक्य आहे ते. आजच  एक बातमी वाचली आज एक महाशय  डेव्ह नावाचे आहेत, की ज्यांचा हनिमून हा चार वर्षं चालला. युरोप मधे कुठल्याशा गावात टॉपशॅन ( डेव्हॉन -यु के) ( नावं पण अशी विचित्र असतात की मराठीत प्रोनाउन्स करायला पण कठीण  )  डेव्ह आणि हेझल या दोघांनी लग्न केलं . नंतर हनिमूनला म्हणुन एका फक्त ५० फुटी मॉडिफाय केलेल्या बोटीने त्यांनी पुर्व युरोप, आफ्रिका, अटलांटिक, कॅनरी आयलंड,अमेरिकेला वळसा घालुन १४ हजार माइल्सचा प्रवास केला. हे सगळं करायला त्यांना लागले ४ वर्षं.. 🙂

चार चार वर्ष हनिमून.. आणि हो, जेंव्हा ते हनिमून हून परत आले तेंव्हा त्यांच्या बरोबर एक दोन वर्षांची गोंडस मुलगी पण त्यांना झालेली होती. आहे की नाही मज्जा??

जर तुमचं लग्नं झालेलं नसेल तर हा आदर्श जरुर ठेवा डोळ्यापुढे.. चार वर्षं नाही, तर कमीतकमी चार महिने तरी—-????आणि जर लग्न झालेलं असेल तर उरलेला बॅक लॉग भरुन काढा.. 🙂

मुळ बातमी इथे आहे …

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , . Bookmark the permalink.

26 Responses to हनिमुन..

 1. बाबौ! पाश्चात्य लोकांचं सगळंच न्यारं!
  डेव्हचा हनिमून वाचून ’जॅक एन्ड जिल’ कवितेवर कॉलेजमधे ऐकलेली एक वात्रट कविता आठवली.

 2. काका फारच Motivated पोस्ट आहे. जबरा… माझ्या लग्नाचा आणि बायकोचा काही पत्ता नाही अजुन पण आत्ता दिवाळीला घरी कोकणात जाईन तर बोट बांधायची ऑर्डर देऊन ठेवतो. बरेच दिवस लागतात बोट बांधायला, नंतर ऐनवेळी धावपळ व्हायला नको. 🙂

  • मला पण हा कन्सेप्ट खुप आवडला. म्हणुनच इथे कव्हर केलाय.
   चार वर्षं नाही तरी कमित कमी चार पाच महिने तरी जायला हरकत नाही.
   कार घेउन पण भारत भर फिरायचं म्हंटलं तरिही एखादा वर्षं लागेलच.. 🙂

 3. तो says:

  सॉफ्टवेर indusrtry मधे induction/training period ला पण आम्ही हनीमून period म्हणतो.
  मी अजुन लग्न न जालेल्या category तला आहे…..४ महिन्यांचा हनीमूनचा आदर्श नक्की ठेवीन…. 🙂

  http://to99.wordpress.com/

  • चार महिने कमित कमी म्हणतोय मी. जास्त कितिही असु शकतं… 🙂 शुभेच्छा..इन ऍडव्हान्स.. 😀

 4. Jack and Jill went up the hill
  to fetch a pail of water
  God knows what they did up there
  and they came down with a daughter.

  पहिल्यांदा असं काहीतरी टाईप केलं.

 5. You are welcome! ती बातमीची लिंक चालत नाही.

 6. Rajeev says:

  अरे बाबांनो……
  एकदा केलेली चूक परत परत करण्यात….तीही महीनों महीने……
  गाढव देखील करत नाहीत…..पण माणूस म्हणजे….

  स्वामी राजरत्नानंद काय सांगतात ते पाहा….
  (राडा कामाकर्दमाचा मनू करू जाणॆ वीहार तयात..
  वंश वाढावा तेव्हढीच गोडी चाखावी सुजाणानी…..)

  • स्वामी राजरत्नानंद… तु धन्य आहेस!!!
   🙂 😀 😛
   पण चार वर्षं.. दोघंच दोघं एकमेकांचं डोक्याला डोकं लावत.. काय केलं असेल बरं???

 7. Rajeev says:

  मा्झ्या मोटर सायकल चे बरेचपार्ट सारखे वापरल्यानी खराब झाले..
  ओईल बद्लून बघतो… कंपनी सांगा!!!!!!!!!!!!!!!!!

 8. Rajeev says:

  आमच्या ओळखी चे एक आजोबा आजी आहेत..
  १४ अपत्ये….
  पहीले वय वर्शे ६४..
  शेन्डेफळ………२३..
  अब बोल.!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

  • जुन्या काळी वाइफ म्हणजे काय अर्थ व्हायचा माहिती आहे कां??
   वुमन इन्स्ट्रुमेंट फॉर एंटरटेनमेंट….
   आजोबांनी भरपुर करमणुक करुन घेतलेली दिसते. ’ह्या’ कामाव्यतिरिक्त ते काय करायचे?? म्हणजे काही काम वगैरे..?? 😀

 9. ravindra says:

  ज्याचे त्याचे भाग्य नाही का.

  • रवी
   अहो, हे भाग्य पण अगदी वेल प्लॅंड असतं ह्या लोकांचं आणि नेमकं प्लॅन केल्या प्रमाणे सगळं व्हावं या साठी मात्र भाग्य हवेच… 🙂
   आपण एखादी गोष्ट प्लान करा , नेमकी कुठेतरी माशी शिंकते आणि सगळं फिसकटतं.. 😦

 10. bhaanasa says:

  महेंद्र, तू म्हणजे पण ना,:) आजकाल बरेच आयटीवाल्यांना हनी इथे तर मून तिथे अशा परिस्थितीत महीने सोड वर्षे काढावे लागत आहेत.चार वर्षे-चार महीने जाऊदे राजेहो निदान आम्हाला काही दिवस एकत्र तरी राहू देत अशी वेळ आलीये.काय करता पोटला मारून चालत नाही ना.:D पण खरेच लव मॆरेज असूदे नाहीतर अरेंज मॆरेज शिवाय एकदा नव्हे तर शक्य असेल तितक्यांदा हनिमून करावा. म्हणजे काय आहे ना की पन्नाशीनंतर हनिमूनला गेले की, आधीच्या आठवणी काढून जास्त करमणूक होईल. बाकी १४ अपत्ये म्हणजे धन्यच पण या सगळ्यांना खायला-प्यायला घालायचे म्हणजे….अबाबा सगळीकडे कष्टच कष्ट.हेहे.

  • ’हनी इथे तर मुन तिथे’ 😛
   ही परिस्थिती आता इथे तरी बदलते आहे, आय टी मधे जॉब्ज वाढले आहेत. जवळपास २५ हजार लोकांना टाटा कन्सल्टन्सी नौकऱ्या देणार अशी बातमी आहे. आउट सोअर्सिंग पुन्हा सुरु होतंय.. फायनान्शिअल इन्स्टियुट्स पैसा पुन्हा गुंतवत आहेत, जी डी पी ग्रोथ वाढते आहे, म्हणजेच एकॉनॉमी बलिष्ठ होण्याची लक्षणं आहेत ही सगळी.
   मुलं मोठी झालीत की जरा बंधनं येतातंच कुठे जायचं म्हंटलं की. नेमकं परिक्षा, क्लासेस या जंजाळातुन सुटकाच नसते मुलांची, आणि मुलांना घरी ठेउन आपण बाहेर निघु शकत नाही. दर वर्षी एल टी सी म्हणजे पेपर लिव्ह होते आणि घरीच बसुन रहातोय गेली ३ वर्षं.. 😦

 11. anuja says:

  महेंद्रजी,
  नमस्कार,भन्नाट लिहिलेत,बातमी आणि अनुभव ह्यांची जुळवणी अप्रतिम,जेजे काही ब्लॉग वर ल्हिता ते संकलन करून पुस्तिका छापा,नेटवर न येणार्यांकरिता भेट देऊ शकु.ब्लॉग कौटुंबिक न राहता वैश्विक केलात त्यातच प्रगल्भता ठळक पणे दिसते,गंभीर विषय,विनोदी,रुचकर,वैचारिक इत्यादी विषय सहजच आमच्या पचनी पडतात.
  मेल मिळाली,रोहन ला प्रतिक्रिया पाठवीन,आभारी आहे.
  anuja

  • अनुजा
   प्रतिक्रिये करता आभार..
   इतक्यात तरी काही तसा विचार नाही, पण नंतर पुढे पहाता येईल. 😀

 12. Rajeev says:

  kanchan –buck up.. good char-olee

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s