विमानातले प्राणी….

विमानात उंदीर शिरला म्हणून विमान ग्राउंड करण्यात आलं . अशी बातमी वाचली होती.   त्या बातमीवर बरंच चर्वण पण झालंय. थोडा वेळचं झाला हा लेख लिहायला. पण हा लेख लिहिण्यास सांगितले आमचे परम स्नेही  स्वामी राजरत्न यांनी.. म्हणून  लिहिलाय हा लेख.

थोडा चेंज – थोडी मस्ती – थोडी मस्करी म्हणजे हा लेख……केवळ विनोदाच्या अंगानेच घ्या.. नथिंग पर्सनल अबाउट इट ….

तुम्ही कधी थोडं उशिरा विमानात शिरला आहात का समोरच्या दारातून? तुम्हाला बरेच प्राणी दिसतील बसलेल. प्रत्येक प्राणी आपापल्या वैशिष्ठ्या मुळे उठून दिसणारा. आता विमानात प्रवास करतांना आपण समोरच्या भागात बसलेले  ( बिझिनेस क्लास मधे) मोठे मोठे गेंडे, हत्ती, आणि तसेच त्याही पेक्षा हिंस्त्र प्राणी पहातो.आता इतके मोठे  आणि भयानक प्राणी असतांना पण कधी विमानाचं उड्डाण थांबत नाही. पण तो पिटुकला जेरी विमानात शिरला असं लक्षात आल्याबरोबर विमानाचं उड्डाण थांबवलं गेलं.  पिटुकल्या जेरीने सगळ्यांना जेरीस आणले,  विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आलें .

या बिझिनेस क्लास मधे प्रवास करणारे बऱ्याच प्रकारचे गमतीशीर प्राणि असतात.एक प्रकार म्हणजे अगदी मुंबईच्या गर्मी मधे पण थ्री पीस सुट घालुन , टाय ची गांठ गळ्याभोवती आवळून आणि घराभोवतीचं एक बटन कसरत करुन लावल्यामुळे बेढब दिसणारे पोट सावरीत(हा प्राणी जेंव्हा उभा असतो तेंव्हा याच्या कोटाचे बटन बंद होते, पण हा खुर्च्यांमध्ये बसला, की मग मात्र बटनवर इतका ताण येतो, की ते कुठल्याही क्षणी तुटून पडेल असे वाटते…….)समोरच्या सॉफ्ट  ड्रिन्क चे घुटके गेत बसलेला इंडस्ट्रिअलिस्ट . .ह्या  प्राण्याला पाहिलं की गेंडा,किंवा हत्ती आठवतो. गेंडा अशा करता म्हणतो कारण याच्या अंगावर मासाची आणि कातडीची गेंड्या प्रमाणेच पुटं चढलेली असतात.

एखादा सडपातळ स्मार्ट , फिकट रंगाची पॅंट, त्यावर लाइनिंगचा शर्ट, त्यावर बहुतेक डार्क कलरचा बलेझर.. असणारा.. बहुतेक सेल फोनवर कोणाला तरी झापत किंवा ब्लॅक बेरी  वर ई मेल ला रिप्लाय देत… हा नक्कीच  कुठल्या तरी एका मल्टी नॅशनल कंपनीचा व्हाइस प्रेसिडेंट…  एखाद्या स्मार्ट अल्सेशिअन सारखा.कधी तरी हा माणुस तुम्हाला वाघा सारखा पण दिसतो.

दुसरा प्रकार म्हणजे रंगाने अगदी परमनंट देशस्थी रंग घेउन, स्वच्छ परीटघडीच्या खादी चा कुडता, पायजामा, आणि पायात कोल्हापुरी चप्पल. खिशामधुन डोकावणारी  टोपी, अंगावरचे कपडे स्टार्च केल्यामुळे अगदी कडकडीत झालेले. डोळ्यावर बहुतेक चष्मा. तोंडात पान पराग चा तोबरा भरलेला, किंवा पान चावत असलेला. अंगावरचे कपडे इतके कडक की खाली बसला तर कपडे काचे प्रमाणे खळ्ळकन फुटतील असे.चष्म्या मधुन रोखून पहाणारे कावेबाज धुर्त डोळे.

अगदी कुणीही नाही सांगितलं तरी या प्राण्याशी मनातल्या मनात तुलना केली जाते कोल्ह्याशी.. किंवा लांडग्याची. असं वाटतं की हा प्राणी बसलाय वाघाची शिकार झाली की उरलेलं मांस पळवायला.

ह्याच्या बरोबर चार दोन चमचे पण असतात जे नॉर्मली एकॉनॉमी क्लासचे तिकिट काढुन आलेले असतत. बहुतेक या चमच्यांचा सिट नंबर पहिल्या दोन ओळीत असतो. हे लोकं विमान उडले की सारखे बिझिनेस क्लास मधे फेऱ्या मारत असतात. लाळघोटे लूत भरलेले कुत्री आठवतात.

एक प्रकारचा एक शामळू प्राणी तुमच्या आमच्या सारखा, लक्षात येतं की हा प्राणी इथल्या प्राण्यांमधे मिस फिट आहे. शिकारी वाघांच्या कळपात एखादं हरिण कसं स्वतःला सांभाळून बसेल  असतं तशी याची अवस्था असते. ंथोडासा उगिचच गांगरल्या सारखा दिसतो हा प्राणी.एअर होस्टेस ने येउन विचारलं की वॉतरमेलन जुस की ओरेंज जुस.. तर हा माणुस हमखास ’आय विल हॅव वॉटर प्लिज’  असं म्हणणार.कितीही इच्छा असली तरीही इथे खाण्याचं ऑर्डर घ्यायला आली की हा माणुस फक्त चहा मागणार.. कदाचित मी नेहेमीच बिझ क्लासने प्रवास करतो असं दाखवायला असावं असा माझा अंदाज आहे.   असा प्राणी बहुतेक कॉम्प्लिमेंट्र्ग अपग्रेड व्हाउचर वर प्रवास करतोय हे न सांगता समजते..

काही लाल तोंडाची बहुतेक हाफ पॅंट घातलेली,स्त्रिया असेल तर हिंदुस्थानी पध्दतीचा पंजाबी ड्रेस, किंवा अगदी तोकडा स्कर्ट, यांच्या गप्पा सुरु असतात, इंडीया इज सो चीप.. वी डाइन फॉर जस्ट १५ पाउंड्स इन फाइव स्टार हॉटेल… अशा गप्पा सुरु असतात. ह्यातला माणुस अगदी लाल बुंद.. थोडा गोव्याच्या उन्हाने रापलेला चेहेरा, त्या बाईने पण अगदी तोकडं वरचं शर्ट घातल्यामुळे, सनबाथच्या वेळेस घातलेल्या कपड्यांचे पांढरे स्पॉट्स ..

यांना पाहिलं की टेडी बिअर आणि सुंदरसं पामेरिअन आठवतं..किंवा कधी तरी लाल तोंड्या माकडाची आठवण येते.

कांही भारतीय ( हे बहुतेक गुज्जु किंवा पंजाबी असतात, मराठी बहुतेक एकॉनॉमी क्लासमधेच असतात), पण भारतीयत्वाची लाज वाटते म्हणून असेंटेड इंग्रजीत बोलणारे. हे लोकं बहुतेक डोक्यावर उलटी बेस बॉल कॅप, टी , जिन्स , पायात  नायके शुज.. असा अवतार. मधेच सोबत असलेली गुज्जू अम्मा जीला जिन्स सुट होत नसली तरिही  लो वेस्ट जिन्स घातलेली. जर आयल सिट वर असेल तर  टी शर्ट वर गेल्या मुळे जिन्स मधुन अंडरगारमेंट्स दिसणारी.. बिभत्स स्त्री.. ह्यांना पाहिलं की डॉबरमन कुत्र्यांच्या ग्रुप मधे देशी कुत्रा शेपूट कापुन सोडला तर कसं?? त्याची आठवण होते.

तर मंडळी मला हे म्हणायचं होतं की इतकी विविध पद्धतीचे प्राणी चालतात, मग त्या बारक्या ’जेरी’ ला का म्हणून आलाऊ करत नाहीत हे एअरलाइन्स वाले??

असो.. अजुन काही प्राणी जर तुम्हाला पाहिल्याचे आठवत असतील तर इथे जरुर लिहा कॉमेंट्स मधे..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in विनोदी and tagged , , . Bookmark the permalink.

20 Responses to विमानातले प्राणी….

 1. सुधीर says:

  मस्त. अगदी हुबेहुब वर्णन केले आहे. आवडले.

 2. bhaanasa says:

  महेंद्र, विनोदी अंगाने घ्या म्हणता बरेच शालजोडीतले मारलेस की. चपखल आहेत बाकी वर्णने. भारतीय आहोत याची लाज वाटणारे लोक सततच आजूबाजूला असतातच. आजकालची सोकॊल्ड फॆशन आहे बाबा ती. बाकी ते गुज्जू व अजूनही आहेत असे काही ज्यांचे अवतार पाहीले की अक्षरश: किळस येते व लाजही वाटते.( यात काही वेळा पुरूषही असतातच )यांचे वचावचा बोलणे, वाटेल तसे वागणे पाहून आपल्या भारताबद्दल इतर देशातील लोकांची काय मते होत असतील:(
  कॊम्प्लिंमेंट अपग्रेड व्हॊवचर चे वर्णन मस्तच केलेस. आवडला.

  • भाग्यश्री
   हे सगळे नेहेमी दिसतं. कधीही प्रवास करतांना पहा.. असंच काहिसं चित्र असतं.

 3. rohan says:

  अरे … मी दर महिन्याला विमान प्रवास करतो पण इतका निरिक्षण नाही करत रे बाबा… हा.. हा.. हसून पुरे वाट. कसले एक-एक नमूने प्लेनमध्ये भेटतात हे खरे मात्र.

  आपल्याला झेपणार नाही इतके खाणारे आणि पिणारे लोक सुद्धा असतात. आता अश्या लोकांना कुठल्या प्राण्याची उपमा द्यायची बरे??? तूच सांग.. मला तर काही सुचत नाही आहे… 🙂

  • रोहन
   ते पिणारे नमुने.. एअर होस्टेस आली की ती पुन्हा येते की नाही म्हणुन एकदम चार चार पेग्ज किवा एकदम दोन तिन बिअर समोर घेउन बसणारे ,,,, बरेचदा पाहिले असतिल . पण ते असतात एकॉनॉमी क्लास मधे.
   दुबई रिटर्न केरळी लोकं पण मस्त असायचे. पुर्वी जेंव्हा ते दुबईहुन यायचे तेंव्हा त्यांच्या सामानात टु इन वन, टिव्ही नक्किच दिसायचा.ही गोष्ट आहे ८४ ची.

 4. sahajach says:

  हुबेहूब वर्णन केलतं…..या गुज्जू बायांचा एकूणातच ड्रेसिंग सेन्स जबरदस्त असतो…..माझा नवरा त्यांना ’दिखाओ ढकाओ’ म्हणतो म्हणजे एकाद्याचे असेल ईच्छा तर पहा यांची हरकत नाही…यांचे नवरे ३/४ पॅंट्सच घालतात…..पण साउथ ईंडियन्सही कमी नाहित हं!!!! आपल्या प्लेनमधे नसतात ते….पण मस्कत एअरपोर्टवर ९५% जनता तीच….यांच्या बायका टाईट जिन्स घालतात, त्यावर भडक टॉप्स, त्यावर यच्चयावत दागिने, टिकली ई. आणि पायात सॅंडल्स…..कमरेचा घेर त्याला काय शोभते वगैरे प्रश्न गौण मानत हे कुटूंब निघालेले असते……
  बाकी ते ईंग्रजाळलेल्या भारतीय भाषा बोलणे हे तर विमानतिकीटाबरोबर फ़्री असावे….ज्याचा अनेक जण फायदा घेतात….
  मजा आली लेख वाचून…

  • ’दिखाओ ढकाओ’ अगदी बरोबर ठेवलंय.. 🙂 . त्या मल्याळम बायकांच्या बद्दलचं रिडींग पण अगदी बरोबर आहे. पुर्वी हे लोकं आखातातुन परत यायचे तर इकडे घामाच्या धारा.. आणि त्या मधे नविन कोरा सुट घालुन , समोर मोठी ट्रॉली, सगळ्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सनी भरलेली अशी घेउन नेहेमी दिसायचे. इकडे घामाने ओले गच्च व्हायचे पण , अंगातला कोट काही काढत नव्हते ते दक्षिण भारतिय लोकं.

 5. anuja says:

  म्हेन्द्रजी मजेत घ्या हं …………….
  चेहरे पाहून गेल्या जन्मातील कोण ? हा स्वतः बद्दल व गाडीतल्या सगळ्यान करिता माझ्या मैत्रिणींचा व माझा छंद होता ,त्याचीच आठवण झाली. छंद व छांदिष्ट पोस्ट झाली का लिहून ? कळवा मला .

  • अगदी बरोबर ओळखलंत.. मला पण तो छंद आहेच. समोर एखादा नविन माणुस आला, की मनातल्या मनात त्याचं पुर्ण इव्हॅल्युएशन करतो मी. छंदिष्ट पोस्ट लिहिलेली नाही अजुन तरी , पण टॉपिक मस्त आहे छान पोस्ट होईल यावर. 🙂

 6. Rohini says:

  छानच झाला आहे लेख… मजा आली वाचताना. विमानात सापडणारा अजुन एक प्राणी म्हणजे वाघाचे कातडे पांघरलेले गाढव किंवा पांढरा रंग फासुन हंसाचा / कबुतराचा आव आणणारा कावळा, कधिकधी डोमकावळा :-). आणि खरोखरिचे डास असतातच गुणगुणायला.

  • रोहिणी..
   वाघाचं कातडं पांघरलेला गाढव. हा प्राणि पण कमित कमी एक तरी असतोच फ्लाइट मधे. 🙂 आणि हे कावळे पण खुप सापडतात.प्रतिक्रियेकरता आभार..

 7. आल्हाद alias Alhad says:

  “सनबाथच्या वेळेस घातलेल्या कपड्यांचे पांढरे स्पॉट्स ..”

  व्वा! काय निरीक्षण आहे!!

 8. Ganesh says:

  महेन्द्र सर, आती उत्तम झला आहे हा लेख….काय सनसनीत वर्णन केले आहे तुम्ही…..एकदम तल्लख निरीक्षण..
  आपल्या बाजूला असे नमुने नेहमीच पाहतो…पण त्यांचे यथार्थ वर्णन केलेत..बर हे जे भारतीय असेंटेड इंग्रजीत बोलणारे…ह्यांची सुरवात एरपोर्टपासूनच होते (ई)विंग्रजी बोलायला….त्याना पाहून कधी हसू येत आणि कधी वैताग पण येतो त्यांच्या पचर पचरचा …ह्या २६ ला होतो आहे पुन्हा विमान प्रवास मी पण ह्या वेळेस थोडे निरीक्षण करतो थोडेसे ह्या प्राण्यांचे ….

  • गणेश
   अगदी फुल्ल टाइमपास असतो.. अगदी एअरपोर्ट पासुनच हे प्राणी लक्षात येतात. मला तर ही सवयच लागली आहे कोणिही दिसलं की त्याच्या बद्दल विचार करायची.. प्रवासाकरिता शुभेच्छा..

 9. Rajeev says:

  महेंद्र राजा,
  आमच्या वीनन्ती वरून छानच लेख लीहीला..
  आता चेन्नई ला जातांना वीमानात
  मी ढेन्चू.. ढेन्चू… ओरडायला मोकळा झालो..
  (आतला आवाज )
  १४/१५ रो मधे कचरा ठेवून लोळायची सोय व्हावी..
  ( इन्डीगो मधे सर्वत्र अस्ते तशी )

  गर्दभ गुरू … स्वामी राजरत्नानंद….

  • राजिव
   जरुर जा आतल्या आवाजात ओरडत. म्हणजे तुझ्या मागे कोणिच उभं रहाणार नाही. आजकाल बोइंग ८०० सिरिज मधे सोळा नंबर सिट जवळ ( इमर्जन्सी एक्झिट) जवळ लोळायला जास्त चांगली जागा असते.. 🙂

 10. Nilesh says:

  Chhan lekh aahe..majja aali vachtana 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s