ब्लॉगेटिकेट्स…

१९९६ च्या सुमारास आपल्याकडे इंटरनेटचा वापर सुरु झाला. तो पण अगदी मोजक्याच स्वरुपात. फक्त ऑफिस मधेच नेट असायचा. नेट आल्यावर सबीर भाटीयाच्या हॉट्मेल ने आणि याहू मेल ने जी क्रांती केली त्या मुळे इंटरनेट सर्वसामान्यांच्या  जवळ पोहोचला. प्रत्येक जण आपापला इ मेल आय डी अभिमानाने सांगु लागला. आता इ मेल आय़ डी असणं यात कसला अभिमान असं कदाचित वाटू शकेल पण  तेंव्हा इ मेल आय डी असणं ही एक अभिमानास्पद गोष्ट होती.

लवकरच इंटरनेट एटीकेट्स वगैरे पण अस्तित्वात आल्या. न सांगताच लोकं त्याचं पालन पण करु लागले. जसे इ मेल फॉर्वर्ड करतांना तुम्हाला ज्या माणसाने तो इ मेल पाठवला आहे, त्याचे नांव , आणि इतर कन्फरमेटरी कॉपी ( सी सी) डीलीट करुन नंतरच पुढे फॉर्वर्ड करणे, की ज्यामुळे त्याच्या प्रायव्हसी चा आदर राखला जाईल. मेल लिहितांना सगळ्या कॅपिटल लेटर्स मधे लिहिला म्हणजे दुसऱ्याला वाचतांना त्रास होतो आणि एकदम अंगावर आल्यासारखा वाटतो, म्हणुन  मग इ मेल्स कॅपिटल लेटर्समधे पाठवणं म्हणजे ओरडणं.. असा अर्थ काढला जाउ लागला, आणि तसा इ मेल पाठवणं  हे अशिष्ठ पणा मानलं जाउ लागलं. नेटीझन्स चा एक वेगळा एटीकेट्स चा कोड तयार झाला -अगदी आपोआप.

गेल्या कांही वर्षांपासून लोकांनी ब्लॉगिंग सुरु केलं. आणि बरेच लोकं ब्लॉग लिहायला लागली. प्रत्येकाच्याच मनात काही ना काही तरी जुन्या आठवणी, करंट अफेअर्स वरची स्वतःची मतं वगैरे असतात. प्रत्येकाचं आयुष्य निराळ्या पध्दतीने गेलेलं असतं. पूर्वीच्या काळी असं होतं की वैचारीक मतप्रदर्शन करणं हे फक्त वृत्तपत्रं -मासिकांचं काम होतं. तुमच्या आमच्या सारख्या लोकांना मात्र कधीच आपली मतं प्रदर्शित करता यायची नाहीत, आणि मतं प्रदर्शित करतो म्हंटलं तर कोणी ऐकायला तर हवं ना?? तसं पेपरमधे वाचकांची पत्र प्रसिद्ध व्हायची. बऱ्याच लोकांना वाचकांच्या पत्रोत्तरात आपलं नांव आलेलं आवडायचं , आणि मग त्या साठी रेगुलरली पत्रं पाठवायचे लोकं. ही पत्रं वाचायला मला आवडायचं. अगदी मासलेवाईक पत्रं असायची. या पत्रांच्यावर पण एक वेगळा लेख होऊ शकतो. लिहा रे कुणी तरी .. चांगला विषय आहे..!! या ब्लॉगिंग मुळे ती सोय उपलब्ध झाली. अगदी महेंद्र कुलकर्णी सारखा सोम्या गोम्या पण काय वाटेल ते लिहू लागला ब्लॉग वर. 🙂 ब्लॉगिंग ही एक वैचारिक क्रांतीच म्हणावी लागेल इंटरनेटवरची.

या पुर्वी सोशल साईट्स नी लोकांची स्वतःला एक्सप्रेस करण्याची ही भूक ओळखून  ही  कमतरता भरुन काढायचा प्रयत्न केला होता. जसे ऑर्कुट फेस बुक वगैरे साईट्स सुरु झाल्या. इथे व  तुम्ही स्क्रॅप्स , कम्युनिटीच जॉइन करु शकता हे लक्षात आलं. सगळी तरुण मंडळी ऑर्कुटवर अक्षरशः तुटून पडली. प्रत्येकाचं एक व्हर्चुअल अस्तित्व तयार झालं. व्हर्चुअल फ्रेंड्स तयार झाले. कम्युनिटी वर जाउन बरेच लोकं लिहु पण लागले. मनातल्या विचारांना एक्स्प्रेस करण्याची संधी दिली या कम्युनिटी नी.

उल्लेखनीय म्हणजे तात्या अभ्यंकर यांची मिसळपाव, मनोगती वगैरे पण मराठी पणाचा अभिमान वाटावा अशी साइट पण सुरु झाली.बऱ्याच लोकांच्या ऑफिस मधे ऑर्कुट बंद करण्यात आलेलं असल्या मुळे ऑर्कुट वरची मित्रमंडळी इथे लॉग इन करु लागली.या साईट्स ला पण खूप वर्दळ वाढली लोकांची.  माझ्या मते इथे या वेब साईट्स बनवणाऱ्यांची एकच चुक झाली, ती म्हणजे कोणीही खोट्य़ा नावाने पोस्ट करु शकतो.. असो.. तो आपला आजचा विषय नाही. लवकरच या सगळ्या साईट्सला पण कंपुशाही ने ग्रासले. आणि म्हणूनच लवकरच त्या सोशल साईट्सचा पण तोच तो पणा मुळे कंटाळा येऊ लागला लोकांना.

कारण एखादी ५००० च्या वर मेंबर्स असलेली कम्युनिटी जरी जॉइन केली तरीही त्या कम्युनिटी वर पोस्ट्स टाकणारे फक्त १०-१२ लोकंच असतात. इतर लोकं कधी तरी एखाद्या वेळेस लॉग इन करतात. फक्त माझी ऑटॊमोबाइल इंजिनिअरिंग आणि इंजिन रिसर्च कम्युनिटी होती तिथे मात्र ८ हजारापैकी २०० लोकं तरी ऍक्टीव्ह होते.

ऑर्कुट वगैरे साईट्सचे दुष्परिणाम म्हणजे लोकं खोट्या नावाने प्रोफाइल्स तयार करणे आणि मग कुठल्यातरी विअर्ड सेक्स्युअल ओरिएंटेशन च्या कम्युनिटिज जॉइन करणे. स्वतःचं वय जर ४० असेल तर २०-२५ सांगुन मुलिंशी चॅटिंग करणारे एक महाभाग पण मला माहिती आहेत. मलाही ते नेहेमी म्हणायचे की तु आपलं खरं नांव आणि खरं वय का लिहिलं आहेस प्रोफाइलवर म्हणून? म्हंटलं मी जरी ऑर्कुटवर असलो, तरीही मला असं एकही काम करायचं नाही की जे केल्यावर मला इतरांना सांगायची लाज वाटावी…. असो..

बरं ते ब्लॉग्ज तरी किती तर्हे़चे… अनुभव, वैचारिक, कथा, कादंबऱ्या, कविता, राजकीय, प्रवास वर्णनापासून तर अगदी पाककृतिंचे. प्रत्येकच माणुस हा वयाच्या १६ ते २५ च्या दरम्यान कवी असतोच. आणि ह्याच पिरियडमधे आपण केलेल्या कविता कोणातरी वाचाव्या असं वाटत असतं. आमच्या काळी तर अशा कविता ह्या वहीतल्या शेवटल्या पानावर प्रसवायच्या आणि तिथेच आपला दम तोडायच्या.  ह्या ब्लॉग्ज मुळे बऱ्याच नवीन कवींना पण स्वतःच्या कविता लोकांसाठी प्रसिध्द करता येउ लागल्या. आपली कविता पण कोणीतरी वाचतो आहे, ही जी भावना असते ती खूपच छान असते.. 🙂 कोणी वाचतोय म्हंटलं की मग लिहिण्याचा पण उत्साह वाढतो.

हल्ली तर बरेच वृत्तपत्रातले रिपोर्टर्स पण आपले लेख ब्लॉग वर संग्रहित करुन ठेवतात. एक साधी गोष्ट आहे, आजचं वृत्तपत्र म्हणजे उद्याची रद्दी.. म्हणून तुम्ही कितीही चांगला लेख लिहिला तरी पण तो काळाच्या ओघात विसरला जाउ नये म्हणून ब्लॉग वर टाकणं हे महत्वाचं मानलं जाउ लागलं.एकदा लेख ब्लॉग वर टाकला की तो नेहेमी साठी स्टोअर करुन ठेवता येउ शकतो. नवीन माणुस जेंव्हा ब्लॉग ला भेट देतो , तेंव्हा तो जुने लेख पण चाळतो. म्हणजे ब्लॉग वर लिहिल्यानंतर लेख जिवंत रहातो बराच काळ…!

आता ब्लॉगिंग इतकं साधं आणि सोपं झाल्या नंतर आपोआपच इथले काही नियम एटिकेट्स तयार झालेल्या आहेत हे माझ्या लक्षात आलं. म्हणून मी भुंगा, रोहन, तन्वी, भाग्यश्री ला मेल पाठवला आणि मला या विषयावर ’फिड’ करा म्हणून विनंती केली. सगळ्यांचे मेल्स आल्यावर मग हा लेख लिहायला घेतलाय.इथे ब्लॉगिंग एटीकेट्स , ज्या इ मेल- इंटरनेट एटिकेट्स प्रमाणे आपोआप तयार झालेल्या आहेत..त्या एकत्रित करुन पोस्ट केलेल्या आहेत, ह्या एटीकेट्स मी बनवलेल्या नाहीत हे कृपया लक्षात घ्या….

या मधे दोन भाग प्रामुख्याने आहेत. एक म्हणजे ब्लॉगर्सनी पाळायच्या एटिकेट्स, आणि दुसऱ्यांनी म्हणजे वाचकांनी , कॉमेंट्स करणाऱ्यांनी पाळायच्या एटिकेट्स.

ब्लॉग लिहितांना  स्वतःचेच लेख असावे अशी माफक अपेक्षा असते. आपण ब्लॉगिंग करतो ते स्वतःला एक्स्प्रेस करण्यासाठी म्हणुन इतरांचे लेख स्वतःच्या नावे पोस्ट करणे टाळावे.  जर एखादा लेक आवडल आणि जर तुम्ही तो रिब्लॉग करित असाल तर त्या लेखाच्या ओरिजिनल लेखकाच्या ब्लॉगची यु आर एल नक्कीच लेखाखाली द्या.

काही ब्लॉगर्सची अशिही इच्छा असते की आपलं लिखाण पुनःप्रसिध्द करण्यापूर्वी आपली परवानगी घेतली जावी. शक्य झाल्यास त्या ब्लॉगर ला कॉमेंट टाका आणि परवानगी घ्या. अशी परवानगी द्यायला सगळ्याच ब्लॉगर्सना आनंद होतो- आपला लेख जमलाय म्हणून.. 🙂

जर एखादा फोटो वगैरे .. जो इतर ब्लॉग वर प्रसिद्ध झाला आहे तो तुम्हाला पुन्हा वापरायचा असेल तर फोटो खाली त्या ब्लॉग ची लिंक टाकायला .. कर्टसी… सो ऍंड सो ब्लॉग यु आर एल.. असं जरुर नमुद करा.

कुठलेही लिखाण करतांना संपुर्ण विचार करुन मगच लिहा . ( खरं तर मला हे लिहिण्याचा काहिच नैतिक अधिकार नाही, कारण मी स्वतः तर उगीच विचार न करता ’ उघडला लॅप टॉप की बडव की बोर्ड’ असं लिहितो 🙂 ) इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या.

कॉन्ट्रोव्हर्शिअल विषयावर जर तुम्ही लिहिणार असाल, तर जास्त काळजी पूर्वक कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहित याची काळजी घेउन लिहिणे आवश्यक असते. प्रत्येकाचाच इगो असतोच, तुम्ही जेंव्हा लिहिता तेंव्हा इतरांचा इगो दुखावला जाणार नाही याची काळजी घ्यायलाच हवी.

ब्लॉग वर लिहितांना स्वतःची मतं लिहिणं अतिशय आवश्यक आहे. नाहितर त्या पोस्ट ला वृत्तपत्रातील बातमीच स्वरुप येतं. तुमच्या आमच्या पेक्षा बातमी चांगल्या तर्हेने कव्हर करणारे बातमीदार असतात, त्यामुळे तुम्ही त्या अंगाने लिहिलेले पोस्ट त्या प्रोफेशनल बातमिदारांशी कंपेअर केलं जाउन मिळमिळीत वाटण्याची शक्यता असते.

पर्सनलाइझ्ड अटॅक करणारे लिखाण नसावे अशी अपेक्षा असते. आणि जर केलंच तर ते अतिशय सुसंस्कृत, खुसखुशित, आणि विनोदी  करणे आवश्यक असते. जसे.. तुम्ही तंबी दुराई वाचता कां?? तंबी दुराई फक्त पर्सनलाइझ्ड अटॅक करुनच लिहितो तरी पण त्याच्या लिखाणामुळे ज्याच्यावर लिहिलंय त्याला पण वाईट वाटत नाही. फक्त विनोदी लिखाणातच पर्सनलाइझड अटॅक्स इझिली घेतले जातात.

ब्लॉग वर लिहितांना आपल्याला काय वाटते ते लिहिणं महत्वाचं, लोकांना काय  आवडेल ते लिहिण्याचा प्रयत्न करण्यात तुमची स्वतःची लिखाणाची शैली शिल्लक रहात नाही. स्वतःच्या मतावर ठाम रहाणे आवश्यक आहेच, त्या शिवाय लेख लिहुन होत नाही. पण ब्लॉगर म्हणून जर तुमचं चुकलं असेल तर मोठ्या मनाने ते मान्य करा.त्या मधे काहीच कमी पण नाही.

शक्य्तो  लिहिण्याची भाषा शुध्द ठेवा. ( आणि हे मी लिहितोय पण माझं मलाच हसु येतंय.. माझी भाषा कशी आहे हे तुम्ही सगळे जाणताच. ह्र्स्व , दिर्घ च्या तर माझ्या हजार चुका होतात. नेहेमीच कन्फुज्ड असतो मी या बाबतित. ) इंग्लिश ब्लॉग मधे स्पेल चेक जरुर रन करा.

ब्लॉगर ने नियमित लिखाण करणे अपेक्षित असते. कारण प्रत्येक ब्लॉगर चा एक वाचक वर्ग असतो. कुठे तरी वाचलंय, ब्लॉग हा लहान मुलासारखा असतो, त्याल रेगुलर फिडींग आवश्यक आहे. ्कमीत कमी आठवड्यातुन एखाद दोन तरी पोस्ट असावेत.

अनॅमिस कॉमेंट्स जर तुम्ही सुरु ठेवल्या नाहीत तर केवळ इतर ब्लॉगर्सच तुमच्या ब्लॉग वर कॉमेंट्स टाकु शकतात. तुमचे इतर वाचक ज्यांचा ब्लॉग नाही ते कॉमेंट्स पोस्ट करु शकत नाहीत. ब्लॉगर्स वर गुगल आय्डी टाकुन कॉमेंट्स टाकु शकता, पण वर्ड प्रेस वर तशी सोय नाही. कॉमेंट्स चे ऑप्शन्स विचारपुर्वक सेट करा.

सगळ्यात महत्वाचे, तुमच्या लेखावर कॉमेट्स आल्यावर त्या पैकी प्रत्येक कॉमेंटला इंडीव्हिजुअल रिप्लाय केला पाहिजे असं मला वाटतं. एकदम पाच सहा कॉमेंट्सवरचा रिप्लाय एकत्रीत करणं म्हणजे तुमच्या लेखावर कॉमेंट्स लिहिणाऱ्याला पुरेसा रिस्पेक्ट न देणं असं  मला वाटतं. अर्थात, फक्त, आवडला, छान आहे अशा स्वरुपाच्या कॉमेंट्स असतिल तर त्या दोन चार कॉमेंट्स एकत्रित करुन रिप्लाय दिल्यास चालु शकेल, पण विस्तृत कॉमेंट्स ला इंडिव्हिज्युअल रिप्लाय द्यावा .

अनिकेत वैद्य यांनी म्हंटलं की इथे जास्त विझेट्स ची गर्दी असली की , किंवा फ्लॅश विझेट्स असले तर होम पेज लोड व्हायला वेळ लगतो, म्हणुन शक्यतोवर आपले असे विझेट्स लावणे टाळावे. तसेच यु ट्युब किंवा मोठ्या साइझचे ( एक एम बी वगैरे साइझचे) फोटो ग्राफ्स पण लोड व्हायला वेळ लागतो. म्हणून  ते फोटो लहान करुन मगच वापरावे.

फोटो लहान करण्यासाठी मी वापरत असलेली पध्दत म्हणजे त्या फोटो वर राईट क्लिक करुन सेंड टु इ मेल रिसिपंट असा ऑप्शन आला की त्या वर क्लिक करा. तुम्हाला ऑप्शन विचारला जातो, की त्या चित्राचा साईझ कमी करायचा की  तसाच ठेवायचा.. रिड्युस साईझ ऑप्शन वापरा आणि फोटो सेंड करा. आउट्लूक च्या अटॅचमेंट मधे लहान साइझ चा फोटो असेल, त्याला राईट क्लिक करुन सेव्ह करा.

वाचकांसाठी-

ब्लॉगर जेंव्हा एखादा लेख लिहुन प्रसिद्ध करतो तेंव्हा त्या साठी त्याने बराच वेळ आणि एनर्जी खर्च केलेली असते. त्यावर कॉमेंट्स करतांना त्या कॉमेंट्स केवळ लेखावरच असाव्या, पर्सनलाइझ्ड कॉमेंट्स मुळे ब्लॉगर्सला मनःस्ताप होतो. एखाद्या ब्लॉगर ला मानसिक त्रास देण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही हे कृपया लक्षात ठेवा.

स्वतःचे नाव लपवून आणि इ मेल ऍड्रेस न देता कॉमेंट करणे टाळा. जर तुम्ही इ मेल देउन कॉमेंट केली तर ब्लॉगर तुम्हाला रिप्लाय करु शकेल. अनॅनिमस कॉमेंट्स करणं म्हणजे कमरे खाली वार करुन पळून जाणं !! असा भ्याड पणा दाखवु नका. जर ब्लागर आपले विचार स्वतःच्या नावाने मांडतो आहे , तर तुम्ही आपल्या कॉमेंट स्वतःच्या नावाने का मांडत नाही? ऍनॉनिमस कॉमेंट्स इरिटेटिंग वाटतात ब्लॉगर्सला.

स्वतःच्या कॉमेंट्स वर फर्म रहा.आणि विषयाला धरुन कॉमेंट्स द्या. ब्लॉग ला भेट देणारे इतर लोकंही तुमच्या कॉमेंट्स वाचतात हे लक्षात ठेवा, आणि म्हणूनच सर्वमान्य भाषा वापरा.

टोपणनाव असणं काही गुन्हा नाही. टोपण नावाने पण कॉमेंट्स केल्या तरिही चालतिल, पण इ मेल ऍड्रेस जरुर द्या कॉमेंट्स करतांना, म्हणजे ब्लॉगर तुम्हाला रिप्लाय करु शकेल.

हा लेख लिहिण्या साठी भुंगा, भानस, तन्वी, रोहन यांचं खूप सहाय्य मिळालं म्हणूनच हा लेख पुर्ण होऊ शकला. सगळ्यांचे मनःपुर्वक आभार. जर यात काही मुद्दे सुटले असतील तर कृपया कॉमेंट मधे लिहा म्हणजे या लेखात ते ऍड करता येतील.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged , , , . Bookmark the permalink.

60 Responses to ब्लॉगेटिकेट्स…

 1. abhijit says:

  ब्लॉगिंग इटिकेट्सवर मला वाटतं पहिल्यांदा कोणी तरी विवेचन केलं
  मिसळपाव च सदस्यत्व कसं मिळावायचं? त्यांना दोन वेळा विनंती पाठवली. काही उत्तर नाही आले. तिथल्या लेखांवर प्रतिक्रीया पण देता येत नाहीत.

  • अभिजीत
   मिपा वर रजिस्ट्रेशन लागतं? पुर्वी तर अगदी कोणिही कुठल्याही नावाने रजिस्टर करुन पोस्ट करु शकायचा? ही बहुतेक नविन डेव्हलपमेंट असावी. पुन्हा एकदा तात्याच्या ब्लॉग वर जाउन रिक्वेस्ट टाक. ही तात्याच्या ब्लॉग ची लिंक
   http://tatya7.blogspot.com
   अरे तात्याचं रागदारी वरचं लिखाण वाच मस्त लिहिलंय.

   • Tatyaa says:

    >>अरे तात्याचं रागदारी वरचं लिखाण वाच मस्त लिहिलंय.

    Thx Mahendra.. 🙂

    Tatyaa.

    • तात्या
     ब्लॉग वर स्वागत. आणि ते लिखाण खरंच खूप सुंदर आहे. एकदम दिलसे…
     प्रतिक्रियेसाठी आभार.

 2. अनिकेत वैद्य says:

  महेंद्रजी,
  फ़ार छन लेख लिहीला आहे. अनेक साध्या साध्या गोष्टी असतात परंतू त्या नाही पाळल्या तर खूप त्रास होतो.
  सर्व एटिकेट्स एकत्र वाचालया मिळल्याने आनंद झाला.

  लेखकांसाठी : आपला ब्लॉग सजवताना बरेच लेखक त्यात अनेक widzets टाकतात त्यामुळे ब्लॉग च्या होम पेज वर खूप गर्दी होते. ते टाळण्याचा प्रयत्न करावा. अस मल वाटत.
  रंगसंगती जास्त भडक नसावी. blinking widzets नसावेत. वाचताना त्रास होतो.

  अनिकेत वैद्य.

  • अनिकेत
   गॅजेट्स बद्दल तुम्ही दिलेली माहिती मुळ लेखात इनक्लुड करतो आहे. ब्लॉग साधा असला तरीही फ्रेश रंगसंगती वापरुन त्याला अट्रॅक्टिव्ह बनवलं जाउ शकतं. यु ट्युब्ज चा जास्त वापर केला असला तरिही पोस्ट लोड व्हायला वेळ लागतो.ब्लिंकिंग विझेट्स म्हणजे फ्लॅश बेस्ड विझेट्स मला पण आवडत नाहित.

 3. gouri says:

  blogging etiquettes chhan maandalet tumhi.

  • गौरी
   मला वाटतं ह्याची खरंच गरज होती.. वाचकांसाठी आणि लेखकांसाठी पण- म्हणुन सगळं एकत्र संग्रहण केलंय.

 4. महेंद्रजी,
  खुप छान विवेचन केले आहे. माझ्या सारख्या नवीन ब्लॉगिंग सुरू करणा-यांना खुप शिकायला मिळले या लेखातून. आणि एक गोष्ट ब-याच ब्लोग negative वर लिखाण असते. माझे पण सुरुवतीचे लिखाण हे negative आहे. त्याबद्दल तुमचे काय मत आहे??

  विषयांतर
  तुम्ही मराठी लिहिण्यासाठी कोणते software वापरतात मला मराठी लिहायला खुप जड जाते?

  • आनंद says:

   on behalf of Mahendrajee….. use baraha software for marathi typing can be downloaded from http://www.baraha.com/

  • वरुण
   मी स्वतः बरहा वापरतो. दिपक ने सांगितल्या प्रमाणे ऑन लाइन सॉफ्ट वेअर पण वापरले जाउ शकते. पण बरहा एकदा डाउन लोड केलं की जरी तुम्ही ऑफ लाइन असला तरिही टाइप करता येतं. माझा हा लेख मी प्रवासात टॅक्सी मधे बसुन टाईप केलाय बरहा वापरुन.

 5. Pravin says:

  ब्लॉगेटिकेट्स कागदावर उतरवल्याबद्दल धन्यवाद. 🙂 सगळ्यांच्या मनात असणारे हे ब्लॉगेटिकेट्स बहुदा पहिल्यांदाच कागदावर उतरले असतील. पटकन पेटेंट घेऊन टाका 🙂 ब्लॉगेटिकेट्स ही टर्मही छानच आहे.

  • प्रविण
   बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात पण त्या सगळ्या एकत्र करुन इथे पोस्ट केल्या आहेत.

   मी नुकतंच रिअलाइझ केलं की अजुनही काही लोकं इ मेल्स फॉर्वर्ड करतांना जिथुन इ मेल आला आहे, तो इ मेल ऍड्रेस डिलिट करित नाहित .प्रत्येकाच्या प्रायव्हसीचा आपण आदर केलाच पाहिजे. म्हणुन वाटलं की हे पोस्ट लिहावं.

   इथे लिहिलेल्या पण बऱ्याच गोष्टी लोकांना माहिती आहेत – आणि बऱ्याच नाहित पण. ब्लॉगिंग च्या संदर्भात एटिकेट्स.. माझं म्हणणं इतकंच की प्रत्येकानेच दुसऱ्याचा आदर केला तर जास्त बरं होईल.

 6. सविस्तर झालाय लेख!
  लोकांना ब्लॉगिंग – कमेंटींग या गोष्टी माहित असतात. अर्थात ते काही अंशी टेक्निकल असतील तर! मात्र माझ्या बघण्यात बरेचसे विजिटर्स नॉन-टेक्निकल, हाऊसवाईव्ह, आजोबा हे ही असतात. त्यांना लिखाण आवडते, त्या वर त्यांचे प्रामाणिक मतही असतं, मात्र ‘जाऊ दे’ – ‘लिहु नंतर’, असा विचार करुन ते सोडुन देतात. आता किमान तुमचा हा लेख वाचुन त्यांना बरीच माहिती मिळेल – मिळाली असेल!

  “अगदी महेंद्र कुलकर्णी सारखा सोम्या गोम्या पण काय वाटेल ते लिहु लागला ब्लॉग वर.”
  – मला नाही असं वाटत. ब्लॉग लिहिणे, सोम्या – गोम्याचे काम नाही… विचार पुर्वक – मत मांडणी – त्या त्या विषयाची माहिती – त्यातला इंटरेस्ट – वाचन आणि लिखानाची आवड आणि असे बरेच मुद्दे माहित असावे/ यावे लागतात. नाहीतर निव्वळ कॉपी – पेस्ट ब्लॉगर होता येतं!

  सी.सी. ला ‘कार्बन कॉपी’ असंही म्हणतात – म्हणजे तुमच्या मेलची एक प्रत सी.सी. मधल्या ई-मेल वरती पाठवली आहे – असा त्याचा अर्थ.

  ता.क.: अरे हो! – माझे खरे नाव आता बर्‍याच लोकांना माहित आहे. पण मी सर्वच ब्लॉग्जवरती, माझ्या ब्लॉगच्या नावानेच कमेंट्स देत आलोय, त्यामुळे हीच परंपरा चालु ठेवतोय!

  • दिपक
   ह्या विषयावर तुम्हाला विचारायचे होते , की कांही ब्लॉग्ज वर रेटींग देण्याची सोय असते. म्हणजे लेखन बरे- चांगले- खुपच छान अशा कॉमेंट बॉक्स असतात. तो पण एक चांगला ऑप्शन आहे , टायपिंगचा कंटाळा येणाऱ्यांसाठी. मला वाटतं हा ऑप्शन ब्लॉगर्स मधे अव्हेलेबल आहे पण वर्ड प्रेस मधे नाही

   भाग्यश्री कुलकर्णीच्या ब्लॉग वर वाचलं की वर्ड प्रेस वर पण गुगल फ्रेंड कनेक्ट वापरता येतं म्हणुन.. कसं ते माहिती नाही पण चांगली इन्फॉर्मेशन आहे.

   • दुवे:
    स्वहोस्टेड वर्डप्रेसवर फ्रेंड्स कनेक्ट
    रंगकर्मी
    आउटब्रेन
    गुगल फ्रेंड्स कनेक्ट वर्डप्रेसच्या फ्री होस्टींगवरती नाही करता येत. कारण त्याच्या विजेटच्या कोड मध्ये जावास्क्रिप्ट आहे, जी वर्डप्रेस काडुन टाकते! हां, मात्र तुमचा ब्लॉग किंवा साईट स्वहोस्टेड असेल तर त्यासाठी माहिती या साईटवर आहे.

    पोस्ट रेटींग: रास्त कल्पना आहे.
    वर्डप्रेस साठी आपण जसे वरती रेटींग स्टार दिले आहेत ती सोय फ्री होस्टींग मध्येही आहे. शिवाय त्यातील लेबल कस्टमाईज करता येतात. वर्डप्रेसला लॉगिन करुन – रेटींग टॅबच्या – सेटींग्ज मध्ये जाऊन – कस्टमाईज लेबल मध्ये – खाली दिलेल्या शब्दांच्या ऐवजी – मराठी शब्द वापरता येतीलः
    votes: मते
    rate this: यावर आपले मत नोंदवा
    1 star = टाकाऊ
    2 star = ठीक
    3 star = सुमार
    4 star = छान
    5 star = उत्कॄष्ट
    Thank You = आभार
    Rate Up = वरचा दर्जा
    Rate Down = खालचा दर्जा

    ब्लॉगरसाठी आउटब्रेन या साईटवर ही सोय आहे. त्याचे मराठी रुपांतरण मी रंगकर्मी या साईटसाठी करुन दिलयं!

 7. फार छान आहे लेख. ब्लॉगरने पाळायच्या एटिकेट्सवर एवढा विचार मी केलेला नव्हता. आता करेन. कॉमेंटस् ना उत्तर दिलं पहीजे हेही खरच. आज पासून सुरवात करतो. एवढ्या गोष्टी लक्षात आणून दिल्याबद्द्दल धन्यवाद.

  • नरेंद्र
   जर तुम्ही उत्तर दिलं तर कॉमेंट लिहिणाऱ्याला आपल्या कॉमेंटची दखल घेतली गेली म्हणुन बरं वाटतं. म्हणुन कॉमेंट्स चा रिप्लाय द्या, जेणेकरुन कॉमेंट करणारा, पुन्हा नविन लेखावर पण कॉमेंट देइल.

 8. mugdha says:

  प्रत्येक प्रतिसादाला रिप्लाय देणे हे मी तुमच्याच कडुन शिकले. नियमितताही तुमच्या आणि अनिकेत, भानस यांच्याकडुन शिकले. नेहमी होत नाही पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हफ़्त्यातुन २ तरी लेख लिहायला लागली आहे.
  ब्लॉग वर लिहितांना आपल्याला काय वाटते ते लिहिणं महत्वाचं, लोकांना काय आवडेल ते लिहिण्याचा प्रयत्न करण्यात तुमची स्वतःची लिखाणाची शैली शिल्लक रहात नाही.>> अगदी अगदी..आपली शैली महत्वाची…
  मला खुप आवडला हा लेख!!

  • मुग्धा
   कन्सिस्ट्न्सी आवश्यक आहे . नाहितर बघा तात्या अभ्यंकर च्या ब्लॉग सारखा सुंदर ब्लॉग पण दुर्लक्षित रहातो. अर्थात तात्या हल्ली मिपावर बिझी असतो , तरी पण…
   बरेचसे वाचक डायरेक्ट तुमच्या यु आर एक वरुन इथे भेट देतात. त्यांना जर काही नविन वाचायला मिळालं नाही तर त्यांचा इंटरेस्ट संपतो आणि मग ते पुन्हा भेट देत नाहित..

 9. rohan chaudhari says:

  वा… कामावर आल्या आल्या बघतो तर काय … मस्त विषयावर ‘शाळा’चं घेतलीस की तू रे दादा.
  आणि सोम्या-गोम्या काय रे ??? तुझ्या सारख्या मा..त्त..ब..र.. लेखकाकडूनचं अश्या पोस्ट अपेक्षित आहेत. एक एक मुद्दा मस्तच मांडला आहेस …

  स्वतःची मते मां डणे, मुद्देसुत कमेंट्स देणे ह्या सारख्या बऱ्याच गोष्टी मी काही प्रमाणात तुझ्याचकडून शिकलो आहे 😀

  पण माझे कसले सहाय्य मिळालं रे तूला? मी तर काहीच मदत केलेली नाही.. 🙂

  • रोहन
   अरे बरेच दिवसांपासुन हा विषय मनात घोळत होता, या विषयावर लिहायचा. म्हणुन तर तुम्हा लोकांना मेल पाठवला.. आणि मग हे पोस्ट… मला असं वाटतंय की एक वेगळं पेज उघडुन तिथे हे ब्लॉग एटिकेट्स ठेवावे म्हणजे काळाच्या ओघात मागे पडणार नाहित.
   अरे त्या बिननावाच्या कॉमेट्स मुळे तर सगळेच लोकं (इथे नावं देत नाही) त्रस्त झाले होते. असो…

 10. vikram says:

  महेन्द्र खुप छान आनि महितिपुर्ण लेख

  मि तसा नविनच आहे तरिहि वरिल सर्व नियम काटेकोर पाळण्याचा प्रयत्न करत असतो
  तेवढे शुद्ध लिहण्याचे काटेकोर जमते असे नाहि पण प्रयत्न तरि करतो.

  तरिहि काहि चुका असतिल तर नक्किच सुधारणार आहे

  धन्यवाद

  • विक्रम
   मी पण तसा नविनच आहे ब्लॉगिंग च्या क्षेत्रात. जानेवारी १७ २००९ ला हा ब्लॉग सुरु केलाय. हळु हळू शिकतोय नविन नविन गोष्टी. शक्य तेवढं आपल्या साईडने प्रयत्न करावा चांगलं आणि स्वतःच्या मनातलं लिहिण्याचा. बस्स्स!!

 11. anuja says:

  नमस्कार महेंद्र्जी,
  ब्लॉग चा शिष्टाचार,अभिव्यत करण्याचे हे सर्व अलिखित नियम लेखक,वाचक ह्यांना मार्गदर्शक
  निश्चीत होतीलच.आपले प्रतीक्रीयान साठीचे उत्तर पण प्रेरक असते.सणासुदी च्या दिवसात रोजच्या पोस्ट च्या ठिकाणी शुभेस्च्यान साठी एक कोपरा तयार करावा,माझ्या दिवाळी शुभेश्च्या उदयन पोस्ट वर दिल्या कारण आपले गप्पाटप्पा सदर लक्षात आले नाही,ब्लॉग चा विषय व शुभेश्च्या ताळमेळ बसत नाही हे लक्षात येत होते,पण सुचले नाही.आपणास माझी भावना माझ्या चार ओळीत पाठवली आपणास आवडली,धन्यवाद.
  प्रतिक्रिया म्हणजे अर्जुनाचा बाण,काही चुकले,तर इकडून सुधारता येत नाही.आपणा सर्वाना ताबडतोब संपर्क साधून चूक सुधारा मग पब्लिश करा,असा काही उपाय आहे का?
  मला इमेल वर उतर पाठवलेत तरी आवडेल.

  • अनुजा
   इथे ह्या ब्लॉगच्या टेम्प्लेट मधे दोन ऑप्शन होते, की तुम्ही टॉपिक्स किंवा पेजेस इथे हेडरच्या जवळ दाखवु शकता. पण जेंव्हा मी टॉपिक सिलेक्ट केला तेंव्हा पेजेस गायब झाले. माझ्या ब्लॉग वर गप्पा टप्पा म्हणुन एक पेज आधिपासुनच होते. ते पुन्हा वर आणले ( हेडर जवळ) आणले आहे. तुमची सुचना अगदी योग्य आहे.
   शुभेच्छांसाठी एक वेगळं पेज सुरु करावं.. किंवा या गप्पा टप्पा पेज वर पण अवांतर गप्पा मारता येतात. कॉमेंट अप्रुव्ह करतांना त्यामधे बदल करता येतात , पण तसे बदल केले तर ज्याने ती कॉमेंट लिहिली आहे त्याचा उपमर्द होतो असे मला वाटते, म्हणुन ’जशी आहे तशी’ कॉमेंट मी प्रसिध्द करतो.

 12. Rohini says:

  सुंदर आणि माहितीपुर्ण झाला आहे लेख… नविन ब्लॉगर्स साठी तर फारच उपयुक्त… सगळे मुद्दे व्यवस्थित मांडले गेले आहेत आणि वाचताना ते पटतात सुद्धा. नियमीत पोस्ट टाकायला हवी आणि प्रत्येक विस्तृत कॉमेंट ला वेगळं उत्तर द्यायला हवं. अगदी पटतं. बरेचदा मला माझ्या व्यापांमुळे असे करायला जमत नाही. तरी पुढे तसे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील. तुमचा ब्लॉग अनेक नविन ( आणि माझ्यासारख्या जुन्या सुद्धा 🙂 ) ब्लॉगर्स ना आदर्श ठरावा.

  • रोहिणी
   तु जेंव्हा कॉमेंट देतेस तेंव्हा तुझ्या ब्लॉग ची लिंक देत नाहिस.. ती देत जा म्हणजे इतर वाचक जर तुझ्या नावावर क्लिक करतिल तर त्यांना पण तुझ्या ब्लॉग ला व्हिजिट देता येईल.
   आणि नियमित पोस्ट साठी काही फार वेळ लागत नाही. फक्त प्रयत्न करित रहा.. 🙂 होईल….नविन पोस्ट तयार. 🙂

 13. काका खूपच माहितीपुर्ण लेख. हा लेख वाचूनच शिकण्यासारखे खूप आहे. नव्या-जुन्या सगळ्या बलॉगर लोकांनी हा लेख वाचायलाच हवा. खूप फरक पडेल. marathiblogs.net ने “माहिती” ह्या सदराखाली ही नोंद समाविष्ट करण्यास हरकत नाही.

 14. १. ब्लॉगर म्हणुन जर तुमचं चुकलं असेल तर मोठ्या मनाने ते मान्य करा.त्या मधे काहिच कमी पण नाही.
  २. तुमच्या लेखावर कॉमेट्स आल्यावर त्या पैकी प्रत्येक कॉमेंटला इंडीव्हिजुअल रिप्लाय केला पाहिजे ….
  ३. अनॅनिमस कॉमेंट्स करणं म्हणजे कमरे खाली वार करुन पळुन जाणं !!

  अप्रतिम!

  सर्व अनुदिनीकार आणि वाचकांनी वाचावा असा लेख आहे. अहो, ब्लॉग लिहिणं हे सोम्या गोम्याचं काम नाहीच. महेंद्रजी, तुम्ही उघडला कॉम्प्युटर की टंकायला सुरूवात असं जर करत असाल, तर याचा अर्थ तुमच्या लेखनाला वैचारिक बैठक आहे. त्याशिवाय का असं चटकन लिहिता येईल. तुम्ही खूप सुंदर आणि मुद्देसुद लिहिता त्यामुळेच तुमचे लेख वाचनीय आहेत. सिद्धार्थच्या प्रतिक्रियेला अनुमोदन! ही गोष्ट एटिकेट्स मधे येते की नाही मला माहित नाही पण वाचकांनी लेख वाचल्यावर प्रतिक्रिया देण्यात कंजुषी करू नये असं मला वाटतं. आवडला नाही लेख तर ’आवडला नाही’ अशी परखड प्रतिक्रिया मिळाल्यावर एक अस्सल अनुदिनीकार त्यावर नक्कीच विचार करेल, किंबहुना अशी प्रतिक्रिया मिळणं हे त्याच्याच फायद्याचं असेल. मात्र, केवळ खिल्ली उडविण्यासाठी देण्यात येणा-या अनाम प्रतिक्रिया वाचल्या की क्रमांक ३ मधे उल्लेखिल्यासारखं वाटतं.

  • वाचकांनी प्रतिक्रिया देण्यात कंजुशी करु नये ही गोष्ट मला पण मान्य आहे. पण ब्लॉगर च्या ब्लॉग वर प्रतिक्रिया देणे खुप त्रास दायक ठरतं वर्ड प्रेस वाल्यांना. माझं बरेचदा असं होतं की प्रतिक्रिया द्यायला जावं , तर पेज एरर येते. आणि मग पुन्हा सगळं लिहिण्याचा कंटाळा येतो.
   जर आवडला नाही असेल तर का आवडला नाही हे सांगितलं तर जास्त बरं होइल.. अर्थात शेवटी वाचकांच्याच टायपिंग क्षमतेवर अवलंबुन आहे ह्या कॉमेंट्स.. :)बऱ्याच लोकांना खुप जास्त टाइप करायला आवडत नाही.

 15. Pingback: Twitter Trackbacks for ब्लॉगेटिकेट्स… « काय वाटेल ते…….. [kayvatelte.wordpress.com] on Topsy.com

 16. sahajach says:

  महेंद्रजी मस्त माहितीपुर्ण झालाय लेख…..स्वत:ला सोम्या गोम्या म्हणालात पण तुम्ही जर सोम्या गोम्या असाल तर असेच आणि यावेत म्हणजे आम्हाला नवन्वीन विषयावरील अभ्यासपुर्ण आणि माहितीपुर्ण लेख वाचायला मिळतील…बाकी शुद्धलेखनाचा सगळ्यांचाच गोंधळ होतोच थोडाफार….टाळायचा प्रयत्न मात्र नक्की व्हावा.
  परवाच तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे मला स्वत:ला एटिकेट्स ला मराठी प्रतिशब्द ’शिष्ठाचार’ वा ’संकेत’ आहे हे नंतर आठवले….
  आम्हा सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करून तुम्ही ’लिहीलेले एटिकेट्स’ बाबत आधि केले मग सांगितले हे सिद्ध केलेत…
  नेहेमीप्रमाणे खणखणीत नाणं झालाय लेख….

  • तन्वी
   खरंच तुम्हा सगळ्यांच्या इनपुट शिवाय हा लेख झालाच नसता. सगळ्यांच्या सहभागामुळेच सगळे पॉइंट्स एकाच लेखात कव्हर करणे शक्य झाले.
   शुध्द लेखन ह्या बाबतित मी कच्चा आहे, म्हणुन तर शुभानन गांगलांचा फॅन आहे.. त्यांचा खुप अभ्यास आहे बरं कां या विषयावर. तुम्हाला पाठविन त्यांचा इ मेल आय डी.

 17. anuja says:

  महेंद्रजी चंद्र नमस्कार,
  पृथ्वीवर साधा नमस्कार, आपण पाणी मिळाले कि चंद्रावर राहायला जाणार म्हणून चंद्र नमस्कार. तुम्ही आईकले असेलच कि चंद्र जमीन कधीच विकायला सुरुवात झाली आहे. अंबानी तर बहुतेक म्हणे पुढच्या यानातून सिमेंट विटा पण पाठवतील.
  मी भावापासून लांब राहते म्हणून, चंद्राला ओवाळीते. आता हे काम सोपे होईल. कारण अंबानी हि जबाबदारी स्वीकारतील. माझा हा आनंद ह्या attachment सहित ब्लॉग वर पोस्त लिहावी कारण ब्लॉग मी अंबानीच्या आधी अंतराळात पोहोचविला आहेच. त्याचा हा वास्ता.
  बिचारा चंदामामा, लोकांनी त्याला खिंडारे पाडीली (हा वेगळा विषय होईल).

  -अनुजा

  • छान विषय आहे. विनोदी लेख लिहायचा प्रयत्न करतो. धन्यवाद वगैरे लिहिलं की खुपच फॉर्मल वाटतं, म्हणुन मी धन्यवाद वगैरे शब्द अगदी कधी काळी कॉमेंट्स टाकणाऱ्यांसाठी राखुन ठेवलाय. 🙂

 18. मान्यवर,
  सुरेख विवेचन केलेत आपण… सगळ्या मराठी ब्लॉगलेखकांसाठी एक कार्यशाळा देखील घ्या… गेलाबाजार गेट-टू-गेदर तरी 🙂
  बाकी तुमच्यासारखे चिकाटीचे लेखक माझे प्रेरणास्थान आहेत माझ्या (अनियमित आणि सुमार दर्जाच्या) ब्लॉगसाठी !!!

  • विक्रांत
   कार्यशाळा वगैरे घेण्याची पात्रता नाही माझी. आणि हा लेख जरी मी पोस्ट केला असला तरिही बराचसा फिडबॅक मला मित्रमंडळींकडुनच घेतलाय. हे पोस्ट आम्हा सर्वांच्या तर्फे आहे माझं एकट्याचं नाही. गीतेत सांगितल्या प्रमाणे ’ मी केवळ निमित्य आहे’

 19. Aparna says:

  aapan ha wishay hatat ghetalat he faar bare kelet..karan aapan itka niyamit blogging karta tyamule hya wishayawar aapan adhikarwanine bolu shakta…
  Comments baddal aaple mat agadi patale…mi kahi blogs war aajkal comments takat nahi karan blogwale itkae uccha pratiche lihitat pan tyana aaplya comment chi dakhal ghyawishi watat nahi mag kashala ugach asa watata…..mi swata majhya pratek comment la uttar dete…aata pasun wegli wegli uttare pan dyayala suruwat karen….

  • अपर्णा
   मी पण अशा ब्लॉग्ज वर कॉमेंट टाकणं टाळतोच. असं वाटतं की ब्लॉग लेखक स्वतःला खुप जास्त शहाणा समजतोय म्हणुन माझ्या कॉमेंट ला इग्नोअर करतोय.

 20. bhaanasa says:

  महेंद्र, जियो रे. खूपच मुद्देसुद आणि अतिशय महत्वाचे विवेचन केलेस बघ. ब्लॊग सातत्याने व चौफेर लिखाणाने कसा नेहमी जिवंत ठेवावा हे तुझ्याकडून शिकायला हवेच:) उगाच स्वत:ला सोम्यागोम्या कशाला म्हणतो आहेस? हेहे.ब्लॊग लिहीणारा हा नेहमीच स्वत:चे विचार-मत-अभिप्राय-विवेचन मांडत असतो. मग ती कथा असो किंवा कविता, लेख असो किंवा समाज/राजकारण/बातमी या कशाचाही त्याला पोचलेला/समजलेला भाव तो मांडत असतो.हे लक्षात घ्यायला हवे. समाजात वावरताना अनेक गोष्टी आपल्याला फार खटकतात/त्रास देतात आपण आपल्या परीने प्रयत्न करतो पण नेहमीच ते शक्य नसते.खंत राहतेच. ह्याचा अर्थ आपण हात झटकून मोकळे झालो असा नसतो.असो. बिननावाने टिपण्या टाकण्याबद्दल तू आधीच एक चांगला लेख टाकला आहेसच.आजही पुन्हा लिहीलेस, बरे केलेस. असभ्यपणा न करताही मुद्दा मांडला जाउ शकतोच ना. मत मतांतर असणारच व ते सगळ्यांनी गृहीतच धरले आहे. जो माणूस दुस~याच्या मताचा आदर करू शकत नाही तो एखाद्या गोष्टीला दुसरे पदर असू शकतात हा विचारच करू शकत नाही ना?
  अतिशय उत्तम परामर्ष घेतला आहेस. माझ्या मनात बरेच दिवस सलणारे मुद्दे निवले. अनेक धन्यवाद.

  • ह्या विषयावरचा लेख लिहिणं म्हणजे तारेवरची कसरत आहे हे आधिच समजुन चुकलो होतो, म्हणुनच तर तुम्हा सगळ्यांची मदत घेतली लिहिण्यापुर्वी.. 🙂
   परवाचिच गोष्ट आहे, एका लेखामधे शिवाजी महाराजांचा उल्लेख अनवधानाने शिवाजी म्हणुन केला गेला. याचा अर्थ हा नाही की मी शिवाजी महाराजांना मान देत नाही, किंवा माझी इच्छा त्यांना मान द्यायची नव्हती. लिहिण्याच्या ओघात अनवधानाने झाले होते ते.
   पण एका वाचकाने कॉमेंट टाकली अगदी अर्वाच्य भाषेत, माझी चुक झालेली होतीच म्हणुन मी ती चुक दुरुस्त केली आणि त्याला मेल पण पाठवला . असंही वाटलं होतं , की हाच मुद्दा तो थोडा चांगल्या भाषेत पण लिहू शकला असता. आपले संस्कार का विसरतात लोकं ??
   असो..

 21. Sanosh says:

  कानोकानी.कॉम वर तुमचा हा लेख टॉप ५ मधे पोचला आहे.. माझा त्याच्याशी संबंध नाही. एक वाचक म्हणून तुम्हाला कळवावेसे वाटले इतकेच. अभिनंदन !

 22. ravindra says:

  इंटरनेट आपल्याकडे १९९६ मध्ये आले पण प्रथम इंटरनेट कफे फोर्ट मुंबई येथे १९९८ मध्ये सुरु झाला होता. दर होता रु.९०/- तासाला. त्याच काळात मी जपानला गेलो होतो तेव्हा तेथे ई-मेल करण्याचे एका अमेरिकन मित्राने शिकविले होते. एक नवीन माहिती मिळाली कि कॅपिटल लिहिल्याने अंगावर आल्या सारखे वाटतेव वाचतांना त्रास होतो ई-मेल कॅपिटल मध्ये पाठविणे म्हणजे ओरडणे. असो लेख अतिशय उत्तम आहे

  • रविंद्र
   प्रतिक्रिये करता आभार.कॅपिटल मधे इ मेल पाठवला होता म्हणुन एका कस्टमरने चांगलीच कान उघाडणी केली होती .. म्हणुन पक्कं लक्षात राहिलं ते.. 🙂

 23. मी says:

  महेन्द्रजी,
  ब्लॉगर्स एटिकेट्स भन्नाट जमल्यात. मागे भुंग्याने काही टिपा दिल्या होत्या.
  कधीतरी शक्य असल्यास वाचकांसाठीच्या [ विशेषत: मराठी ब्लॉगर्ससाठी] एटिकेट्स ची जंत्रीही दिली तर आनंद वाटेल, अर्थात आपल्याला वेळ आणि विषय विचाराधीन असेल तर 🙂

 24. महेंद्रदादा,
  मस्तच आहे हा लेख. माझ्यासारख्या नवख्या साठी तर खुपच छान. माझा blog wordpress var आहे. तुमचे वर उजव्या कोपर्यात दिलेले विजेट मी तिथे कॊपी करण्याचा प्रयत्न केला, पण तिथे विजेट्स मध्ये गेल्यावर पेस्टचा ऒप्शनच हायलाईट होत नाही. असो.
  तुमचे बाकीचे लेखही वाचेन निवांत आणि प्रतिसादही देइन.
  माझा ब्लॊग : http://www.magevalunpahtana.wordpress.com एक नजर मारा वेळ मिळाल्यास.

  धन्यवाद.

  सस्नेह,

  विशाल कुलकर्णी

  • तुमच्या विजेट्स मधे टेक्स्ट म्हणुन एक ऑप्शन आहे. त्यावर क्लिक केल्यावर एक टेक्स्ट बॉक्स विजेट उघडते , तिथे हे पेस्ट करायचं.
   Arbitrary text or HTML दिसेल, तिथे हे पेस्ट करायचं. प्रतिक्रियेकरता आभार. तुमच्या ब्लॉग ला पण भेट दिली, कॉमेंट तिथेच पोस्ट करतोय..

 25. tejali says:

  kaka..thanks a lot..:)

 26. काका मी ब्लॉग लिहायची प्रेरणा तुमच्याकडून घेतली. बहुतांशी नवशिक्या ब्लॉगर
  प्रमाणे ह्या विषयात गती शुन्य असल्याने बरीच माहिती नेट वर शोधून तर एकदा चक्क आपली ओळख पाळख नसतांना तुम्हाला हक्काने चेहरा पुस्तकावर संदेश पाठवून मदत मागितली. अडनावबंधू असल्याने काका मदत करतील अशी आशा होती. मागाहून कळले काका कोणत्याही नव्या ब्लॉगर ला मदत करतात.
  मला आता ब्लॉग काढून काही महिने झाले आहेत. आणि चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. अश्यावेळी एक पोस्ट माझा ब्लॉग जेव्हा नवीन होता तेव्हा तांत्रिक , नैतिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मला मदत केली ,तेही प्रत्यक्ष ओळख नसतांना त्यांचे आवर्जुन आभार मानण्याची एक पोस्ट लिहायची आहे.
  माझ्या मते कोणताही नवीन ब्लॉगर ला सुरवातीला व पुढे वेळोवेळी जुन्या नंत्या ब्लॉगर ची मदत होते. त्यांचे आभार मानणे हे प्रत्येक ब्लॉगर चे प्रमुख नैतिक कर्तव्य आहे , हा एक ब्लॉगर च्या शिष्टाचाराचा एक प्रमुख भाग असल्याचे मी मानतो.
  ह्यामुळे मदत करणाऱ्या व्यक्तीचे नाव तुमच्या पोस्ट मुळे तुमच्या वाचकांना कळतात. व त्यांना पुढेमागे ब्लॉग सुरु करायचा असेल तर ह्या जुन्या जाणत्या व्यक्तींना ती वाचक मंडळी संपर्क साधू शकतात.
  मी तर काकांचे नाव घेऊन खूप जणांना हक्कने मदत मागितली आहे व त्यांनी ती तत्परतेने दिली सुद्धा आहे. त्यांचे आभार मानणे केलेल्या मदतीला योग्य ती प्रसिद्धही देणे हा एक प्रमुख ब्लॉगर शिष्टाचार मला वाटतो.

  • निनाद,\
   मराठी ब्लॉग विश्वात तरी अजून सलिल, भुंगा दिपक, कांचन हे सगळ्यांनाच मदत करतात. त्यांचे ब्लॉग म्हणजेच एक मदत केंद्र आहे ब्लॉगर्स साठी. मी फक्त वर्डप्रेस मधे मदत करू शकतो ( जी कोणालाच लागत नाही , कारण फारच कस्टमर फ्रेंडली आहे वर्डप्रेस 🙂

 27. मला तुमच्या ब्लॉगची लिंक अपर्णा पी यांजाडून मिळाली. मला ब्लॉगिंग हा विषय नवीनच आहे आणि तुमचा लेख वाचून बऱ्याच ऑनलाईन एटीकेट्स विषयी माहिती झाली – त्या बद्दल धन्यवाद! खरं तर मी manaswinispeaks.blogspot.co.uk हा माझा ब्लोग माझ्या पुस्तकांच्या promotionसाठी वापरते आणि वाचकांसाठी quizes वगैरे टाकून माझ्या गोष्टीमधील charactersची अधिक माहिती देते. ब्लॉगचा असा ही वापर करता येतो म्हणून मुद्दामून हे लिहिले. असेच छान छान माहितीयुक्त ब्लॉग लिहित रहा! All the best!

  • मनस्विनी,
   मनःपुर्वक आभार. मध्यंतरी कामाच्या व्यापामुळे ब्ॉग पासून दूरच होतो, कारण एकदा ब्लॉग वर आलो, की लिखाणाची इच्छा होते, आणि मग कामाकडे दुर्लक्ष होतं. प्रतिक्रियेसाठी आभार.

 28. Vidyullata Doshi says:

  ब्लॉगबद्दल मला अतिशय उत्सुकता आहे त्यामुळे गेले काही दिवस मी ब्लॉग वाचन सुरू केले आहे. आपण अतिशय उत्कृष्ट व उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s