भगुरिया

तरुण मुली आणि तरुण मुलं.. एकत्र जमा व्हायचं, ठरावीक दिवशी आणि मग मुलाने मुलीला पळवून न्यायचं…..

मुलीचे आई  वडील  वगैरे असतांना..

हे मी काय लिहितोय?? वा

चा पुढे म्हणजे कळेल.

मुलगी पळवून न्यायचा  कन्सेप्ट आहे एका जमाती मधे.

इंदौरला पोहोचलो सकाळच्या ६-३० च्या जेट लाईटनी. ऍज युजवल , लेट झाल्यामुळे ८-३० वाजता पोहोचलो इंदौरला. बाहेर आमचा टॅक्सी वाला उभा होताच. त्याने हातातली बॅग घेतली आणि हसून पुढे झाला. आधी पासूनच सांगून टाकलं होतं, की कुठे जायचं आहे ते..पॆटलावद नावाचं एक गांव आहे , इंदौरपासुन साधारणतः १८० किमी असावं.तिथेच एका साईटवर काम होतं.

बदनावर, धार क्रॉस केलं आणि एकदम झबुवा च्या रोडला आम्ही लागलो.एम पी चे रस्ते आता भाजपा सरकार आल्या पासुन बरेच चांगले झाले आहेत. जसं आम्ही धार क्रॉस केलं रस्त्यावर पिवळ्या रंगाचे फेटे घातलेले बरेच लोकलं लोकं दिसू लागले. हे वेगळ्याच पध्दतिने बांधलेले फेटे सारखं लक्ष वेधून घेत होते. कांही लोकांनी बांधणी प्रिंटचे राजस्थानी स्टाइलचे फेटे लाल , हिरवे पण बांधलेले दिसत होते. बोडखा माणुस विरळाच.

स्त्रिया पण वेगळ्याच आदिवासी स्टाइलने साडी नेसलेल्या चांदिचे दागिने घातलेल्या. ड्रायव्हरला विचारले हे कुठले लोकं आहेत?? तर म्हणाला हे ’मामा’ लोकं आहेत. हे सगळे मामा म्हणजे भिल्ल जमातिचे लोकं असतात.या लोकांचे आपले स्वतःची पंचायत असते,स्वतःचे नियम कायदे असतात.  लग्नाची  तसेच डिव्होर्स ची पण पध्दत असते.   अनेक वर्षापासुन चालत आलेल्या  प्रथा अजूनही पाळली जातात.कोणीही कम्प्लेंट करित नाही.

झबुवा, अलिराजपुर कुक्षी या भागात हे लोकं रहातात. राजस्थान ची बॉर्डर जवळ असल्यामुळे त्यांच्या वेशभुषेचा प्रभाव आहे यांच्यावर.

कार चालत होती आणि शेजारुन बरेचसे लहान लहान खेडे जात होते. जवळपास सारखच दृष्य होतं. प्रत्येक गावाच्या वेशीजवळ रंगबेरंगी झेंडे

लावून ठेवलेले होते. मला वाटतं की गावाची चतुःसिमा सुरु झाल्याची ही खुण असावी. एका गावाजवळ पोहोचल्यावर मात्र समोर दोन रस्ते आले. कुठल्या रस्त्याने जायचं ते कन्फ्युजन होतं म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलॊ . तिथे एक दुकान होतं चहाचं, तिथे विचारलं.

ज्या मामाला विचारलं त्याचा उग्र दर्प येत होता. देशी दारु आणि वेगळाच वास होता कसला तरी. समोरच हॉटेल मधे   जलेबी तळणं सुरु होतं. आम्ही परत गाडीत बसलो, मी ड्रायव्हरला विचारलं की हा वास कसला येत होता त्या मामाचा”? तर ड्राय्व्हर म्हणाला, हे मामा लोकं देशी दारु पितात बाजाराच्या दिवशी आणि गुळाची जिलबी खातात. मला जो घाण वास येत होता तो या दोन्ही वासांचे मिश्रण. जो पर्यंत हे लोकं ’हाट’ मधे कच्ची दारु पिऊन गुळाची जिलबी खात नाही तो पर्यंत ह्यांचा बाजार पुर्ण होत नाही.

गावामधे लहान सहान दुकानं तर होती पण  अजुन ही हे लोकं धनुष्य बाण वापरताना अंगठा वापरत नाहीत. स्वतः भिल्ल असल्याचा यांना खूप अभिमान असतो. मला खरं तर आश्चर्यच वाटलं, की आजच्या युगातही असे लोकं आहेत म्हणून.

हे भिल्ल लोकं कुक्षी, अलिराजपुर झबुवा या भागात रहातात.या भागात रात्री प्रवास करणे धोक्याचे आहे असं म्हणतात.  जर तुमची कार बंद पडली तर तुम्हाला हमखास लुटले जाईल, म्हणून शक्यतोवर जास्त रात्री प्रवास करु नये या भागात. हे सगळे भिल्ल लोकं शेतिवाडीची कामं करतात, किंवा इतर वेळेस मात्र इंदौर ,धार वगैरे शहरात जाउन पडेल ती कामं करतात.

या लोकांची पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे लग्नाची. त्याला म्हणतात भगुरिया .. भगुरिया करता तरुण आणि तरुणी वर्षभर वाट पहात असतात..वर्षात ठरावीक दिवशी होळीच्या जवळपासचा दिवस असतो हा.

एका गावात यांचा मेळा भरतो. तरुण मुलं आणि मुली , त्यांचे पालक इथे येतात. लग्नाळु मुलं , मुली एक मेकांना भेटतात. जर एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडली तर मग तो मुलगा त्या मुलीला पान ऑफर करतो.   त्या मुलींने पान खाल्लं तर त्याचा अर्थ त्या मुलीची लग्नाला संमती आहे.

मग तो मुलगा आणि मुलगी दोघही पळून जातात. एकदा पळुन गेल्यावर ,सगळे नाते वाईक त्या मुलीला आणि मुलाला शोधतात, जर ते सापडले तर त्या मुलाला खुप चोप दिला जातो , आणि जर सापडले नाहीत तर मग कांही दिवसांनी त्या दोघांचे लग्न लावून दिलं जातं.हे सगळं ऐकल्यावर माझा विश्वासच बसला नाही. पण नंतर म्हंटलं की ….चलो.. ऐसा भी होता है.. !!

मी पुर्वी नागपुरला असतांना  छत्तीसगढ मधे पण बरंच फिरलो आहे. चिरिमिरी, अंबिकापुर वगैरे.. त्या बद्दल आणी तिकडल्या आदिवासी लोकांच्या बद्दल नंतर पुढे कधी तरी…  🙂

इन्सिडन्टली मी या वेळेस काढलेले फोटो डिलिट झाले म्हणुन नेट वर शोधुन एका ब्लॉग वरचे फोटो इथे पोस्ट करतोय.. तुम्हाला अजुन काही फोटॊ बघायचे असतील तर त्या ब्लॉग ला अवश्य भेट द्या.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , . Bookmark the permalink.

19 Responses to भगुरिया

 1. bhaanasa says:

  अरे बापरे! म्हणजे सापडले तर मुलगा मेलाच म्हणायचा.खरेच वाटत नाही असे सगळे होते आजही. हे असे स्वत:ची पंचायत व कायदे-न्यायनिवाडे अजूनही बरेच जमातीत चालू आहेत[:)]. अजूनही अंगठा वापरत नाहीत म्हणजे खरेच मानले पाहिजे. भिल्ल लोकांबद्दल थोडेफार ऐकले होते आज अजूनच सविस्तर भर पडली.

  • यांच्या डिव्होर्स मधे अक्षरशः पंचायती समोर काडी मोडली जाते. मग त्या पंचायतीला दारु, कोंबडीचंं जेवण द्यायचं, अशी प्रथा आहे, विचित्र प्रथा वाटतात. पण अजुनही अस्तित्वात आहेत याचं नवल वाटतं.
   आणि हे फोटो जे आहेत तो प्रोफेशनल फोट्ग्राफर आहे.. 🙂

 2. anuja says:

  भगुरीया, ह्या जमाती बद्धल माहिती आवडली,बरे झाले आपण फिरता त्या मुळे आम्ही पण फिरून येतो,फोटो नेट वरचे असले तरी पुरेसे बोलके आहेत.मस्तच !

  • अनुजा
   तो प्रेस फोटोग्राफर आहे ज्याच्या ब्लॉग वरुन फोटो घेतले आहेत तो.. त्याच्या ब्लॉग वर इतर फोटो पण खुपच मस्त आहेत. जरुर बघा.

 3. Pravin says:

  सॉलिड आहे. मला पण पळून जाऊन लग्न करायचं होत, पण दोन्ही घरच्यांनी परवानगी दिल्याने तो बेत फसला 😦

  • प्रविण
   पळुन जाउन लग्न करायचे होते?? अरे बापरे.. 🙂 मला पण!!!! अगदी खरंच सांगतोय.. पण काय करणार, घरच्यांनीच करुन दिलं नां…

 4. Rohini says:

  मी पण वाचलं आहे ह्या प्रथेविषयी… मस्तच कंसेप्ट आहे. आणि शिवाय मुलीच्या पालकांना जोडे चपला देखिल झिजवायला नको 🙂

 5. ravindra says:

  हा लेख वाचल्याने मला माझे बालपण आठवले. मी महाराष्ट्रीयन, जन्म येथील पण १९६८ पासून आंम्ही पोटाची खळगी भरायला नेपानगर येथे राहिलो.तेथेच मी शालेय शिक्षण पूर्ण करून इंदोरला इन्जिनिअरिन्ग केल. त्यामुळे मामा लोकांशी जवळून संबंध आला होता. मला असे आठवते हि लोक होळीला एकत्र येऊन नाचतात, गातात व आवडेल त्या मुलीला पळवून नेतात. असो वर्णन लय भारी केल आहे बर का!!!

  • रविद्र
   मी जेंव्हा यांच्याबद्दल ऐकलं तेंव्हा आधी तर विश्वासच बसला नाही की अशी काही प्रथा असेल म्हणुन.
   पण मग नंतर बस्तर मधली घोटुल प्रथा मी एकदा पाहिली होती बस्तर मधे – जगदलपुरच्या भागात.ती आठवली,.. त्या रात्री सगळे तरुण तरुणी एकत्र येतात आणि ज्याला जो कोणी आवडेल त्याच्याबरोबर रात्र घालवतात. जर पार्टनर आवडला तर लग्न , नाही तर जय रामजी की!!!
   त्या प्रथे पुढे ही तर खुपच वेगळी आणि साधी वाटली. 🙂

 6. काय थ्रिल असेल ना मुलीला तिचे कुटुंब समोर असताना पळवुन न्यायच …

 7. बघुया काय लिहल आहे नशिबात ते …अजुन तरी पळवुन नेण्यासाठी कोणी मिळाली नाही …:)

 8. manmaujee says:

  अहो हे काय आता नवीन!!! काय म्हणता चान्स घेऊ का मी पण तुम्ही मार्गदर्शन करणार असाल तर!!! he. . he. .

 9. Rajeev says:

  च्यायला
  लग्न झाल्यावर पळून जाण्याची प्रथा असेल अश्या
  जमातीचा शोध घेतो आहे….
  कुठे सापडली तर बघ…. त्यांच्यात सामील होउ !!!

  • लग्न झाल्यावर पळुन जायची जमात आहे नां..
   फक्त आपापल्या बायको बरोबरच पळुन जावं लागतं त्या जमातीमधे.
   जास्त माहिती हवी असेल तर सांग.. देतो माहिती. 🙂

 10. Pingback: वंडरफुलम…. « दवबिंदू

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s