मच्छरदाणितली कुजबुज…

yatch 1

अहो.. ऐकलंत कां?? मी काय म्हणते, भाउजींनी बघा कशी वैनिंच्या साठी मोठ्ठी ’३४ फुट लांबीची याट घेतली विकत ४०० कोटी रुपयांना, नाहितर तुम्ही .. तुमचं मेलं माझ्यावर प्रेमच नाही.

अगं.. असं कसं म्हणतेस, आत्ताच एक दिड वर्षांपुर्विच तर तुझ्यासाठी ती एअर बस एक्स्प्रेस घेतली ना विकत.. २५० कोटी रुपयांना..

शीः.. त्याचं काय मेलं एवढं कौतुक, कधी नाही ते एक गिफ्ट दिलंत आणि आता सारखं उठता बसता, त्याचेच गोडवे गात असतात. आणि ते गिफ्ट पण काय तर म्हणे एअर बस.. आणि ती पण भाउजींच्या याट पेक्षा चक्क १५० कोटी रुपयांनी कमी.एअर बस घेउन तर दिली, पण वापरु नको म्हणता नां.. पेट्रोल वर खर्च केलेले  पैसे भाउजींच्या कंपनीला  मिळतात म्हणून.. हुं??

तुमचं मेलं माझ्यावर प्रेमच नाही, नाहीतर तुम्ही  बघा ना, अजुन ही मला विचारलंच नाही की तुला काय हवंय ?तुमचं माझ्यावर प्रेम असतं ना, तर नक्की नक्की विचारलं असतं  मला, की काय झालं राणिला??   पण माझं मेलं नशिबच फुटकं.. कशी तुमच्यावर भाळली आणि लग्नाला होकार दिला तेच कळत नाही मला आता. कित्ती तरी हिरो  माझ्या मागे होते, पण माझा मेलीचा जीव तुमच्यावर जडला होता नां…. तरी आई म्हणाली होतीच… …………..ह्याच्या पेक्षा दुसरा कोणीतरी बघ जरा व्यवस्थित पैसे वाला.. पण नाही.. माझं मन जडलं होतं ना तुमच्यावर….!!!मीच मेली मुर्ख…..

अहो मी जर सिनेमात राहिले असते नां, तर नक्कीच करोडॊ रुपये कमावले असते आणि आपलं स्वतःचं घेतलं असतं काहीतरी. भाउजी बघा, इतका मोठा पॅलेस बांधताहेत , आणि त्या पॅलेसमधे म्हणे हेलिपॅड पण आहे सगळ्यात वरच्या मजल्यावर…

काय शिंची कट कट आहे तुझी.. काय हवंय तुला सांग, आत्ता आणून देतो.

माहितीये.. मोठ्ठे आले आणून देणारे, तुमच्या कंपनीच्या शेअर्सची तर वाट लागलेली आहे, आणणार कुठुन तुम्ही पैसे ते सांगा आधी -तुमचं बजेट तर कळु दे, की लाडक्या बायको साठी तुम्ही किती खर्च करायला तयार आहे ते..  ..मग तुम्हाला सांगते मला काय हवंय ते….

अगं खर्चाचं काय.. पूर्वीचे दिवस असते तर एखादी नवीन कंपनी लॉंच करुन शेअर्स काढले असते मार्केटला, पण सध्या रेसिशन आहे नां  ..

म्हणजे काय आता पैसे नाहीत ना?? मला वाटलंच होतं…पैसे असले की तुम्ही नेहेमीच उडवून टाकता. थोडे पैसे ठेवायला काय होतं हो तुम्हाला बाजुला? अडी अडचणीला उपयोगी पडतात.. पण नाही…. !!!!!!कधीही काहिही मागा, तुमचं आपलं तेच.. असले पैसे की घाला ‘त्या ‘पोलीटीकल नेत्याच्या   युपी मधे नाहितर त्या कंपनीच्या बोडख्यावर… कधी मेलं थोडे पैसे घरी ठेवत नाहीत.

पैसे पैसे….   जळ्ळी मेली ‘युपी ‘  आणि कंपनी ती….  गुलाबी गाल फुरंगटून ती म्हणाली.. डोळ्याच्या पापण्या उघडझाप करित त्याच्या कडे पहात… 🙂

अगं असं काय करतेस..पुर्ण ऐकुन तर घे.. फारच सोपंय , इलेक्ट्रिसिटीचे भाव वाढवून टाकतो ना २ रु. ५० पैसे युनिटमागे, म्हणजे काय होईल , सगळे मराठीचे तारणहार थोडं तोडफोड वगैरे करतिल, आपल्याला धमक्या देतील, मग आपण घाबरल्या सारखं दाखवायचं आणि २रु.५० पै. ची वाढ १रु.५० पैशांवर उतरवायची. अगं.. प्रत्येक युनिटमागे दिड रुपया म्हणजे महिन्याला ४०० कोटी सहज येतिल..

आता ’ती’चा चेहेरा उजळला होता.. माझा गुणाचा गं तो नवरा.. आणि ती एकदेम गळ्यातच  पडली. कानाच्या पाळीला हलकेच चावत ,डोळ्याच्या पापण्यांनी त्याच्या गालाला गुदगुल्या करित म्हणाली, अहो.. आम्हाला किनई…… आम्हाला किनई………….

अगं बोल ना लवकर… किती वेळ तेच ते .. काय हवंय तुम्हाला??

हॅट मेलं.. आम्ही आपलं इत्तक प्रेमाने जवळ यावं, आणि तुम्ही…. जाउ दे.. काही नको मला…..तुमचं मेलं आमच्यावर प्रेमंच नाही….

अगं सांग नां राणी, काय हवंय तुला? मी कधी तुला नाही म्हटलंय का कधी कुठल्याही गोष्टीला?

बरं ऐका तर…. तुम्ही ती बातमी वाचली आहे का??

कुठ्ली गं??

moonअहो तिच, चंद्रावर म्हणे पाणी सापडलंय.. आणि ओबामाने पण म्हणे तिथे बॉम्ब ब्लास्ट केलाय चंद्रावर.. मस्त पैकी एक खोल खड्डा तयार झालाय म्हणे.. आपण किनई, त्या खड्ड्यामधे पाणी जमा करु, आणि त्या खड्ड्या शेजारीच एक मोठासा प्लॉट घेउन मस्तपैकी पॅलेस बांधु या कां??त्या खड्यातल्या पाण्यामधे मस्तपैकी बदकं सोडू आपण.. 😀 कित्ती छान वाटेल नं संध्याकाळच्या वेळी मस्तपैकी गरम गरम मसाला चहाचे घोट घेत समोर बसायला??

त्या पॅलेस मधे किनई, आपण, स्पेश शिप लॅंडिग पॅड पण बनवु या.. तुम्ही आपलं ओबामाला सांगून एक प्लॉट बुक करुनच टाका, किमती वाढायच्या आत. नाहितर भाउजी आहेतच, ते कदाचित सगळा चंद्रच घेउन टाकतील विकत वैनींसाठी , मग आपल्याला जावं लागेल शनीच्या चंद्रावर. खूप दुर आहे म्हणतात तो चंद्र….. आपला हा पृथ्वी जवळचा चंद्रच बरा…

कौतुकाने बायको कडे पहात.. कित्ती हूशार आहेस गं तु.. पण मला असं वाटतंय की आपणच पुर्ण चंद्र विकत घेउन टाकला तर?? म्हणजे काय आपण आपली चोरवडची वडिलोपार्जित जमीन विकून टाकु आणि चंद्रावर इन्व्हेस्टमेंट करु ..तिथे आपण मस्त पैकी एक शॉपिंग कॉम्प्लेक्स उघडू या. सेव्हन स्टार हॉटेल पण उघडू , तिथे आपण खास हनी मुन सुट बनवू आणि भाड्याने देऊन खूप पैसे कमाऊ.. कशी वाटते आयडीया??

खरंच  हो, खूपच मस्त आहे आयडिया,  लहानपणापासुन आईला बघायची ना चंद्राला ओवाळतांना, तेंव्हा पासुनच मला हवा होता तो चंद्र.. आईला पण बरं होईल जेंव्हा हवं तेंव्हा ओवाळायला, नाहितर काय हो.. अमावस्येला खूप प्रॉब्लेमच यायचा नां…..बिच्चारी ची मान लागून यायची चंद्र शोधुन.. पण आता बरं होईल , चंद्रावरंच रहायला गेलो, की सरळ खाली बघुन तिला ओवाळता येइल चंद्राला..

मस्तंच हो.. आणि तिने त्याच्या गळ्यात हात घातला, त्याचा सेल फोन बंद केला, लॅंडलाइनचा रिसिव्हर उचलुन ठेवला, रिमोट कंट्रोलने एसी चा थंडावा कमी करुन , त्याच रिमोटने दार बंद केलं…… ..अंगावरची सोलापुरी चादर दुर फेकली पंखा फुल स्पिडवर करुन -मच्छरदाणी चारही बाजूंनी नीट खोचली……………अरे बस की आता किती लिहायचं.. …  🙂

हो.. त्यांच्याही घरच्या मच्छरदाणीत अशीच कुजबुज होत असते बरं का.. फारसं काही वेगळं नसतं…….त्यांचं पण आयुष्य….. :

मित्रांनॊ, हा विषय अनुजाने दिला, आणि मला पण ्खूप आवडला, म्हणून हा लेख लिहलाय.. खरं तर विनोदी लिहिण्याचा मला काही फारसा सराव नाही, तरी पण एक   नवीन प्रयत्न  .. .. वरच्या लेखामधले ’ती’ आणि ’तो’ कोण आहे हे वेगळं सांगायची गरजच नसावी… 🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in विनोदी and tagged , , , , , . Bookmark the permalink.

56 Responses to मच्छरदाणितली कुजबुज…

 1. mandar says:

  हा हा हा हा हा हा हा पूर्ण सात मजली हसतो आहे… काका तुम्ही तर या लेखात हास्याचे पीकच लावले आहे…
  मी तर अजूनही हसतोच आहे… हसून हसून पोट पार खोल गेलय…. मस्त सुचत गेल तुम्हाला… खरच हे लोक असे बोलत असतील कुणास ठाऊक… खूपच विनोदी लिहिलंय तुम्ही.. मस्त..

  • मंदार,
   कालच लिहिणार होतो, पण काय लिहावं हे सुचत नव्हतं..
   पण आज जेंव्हा लिहिणं सुरु केलं तेंव्हा मात्र, हे असा लेख तयार झाला.. !!

 2. tanvi says:

  मस्त!!!! अमितला नकोय दाखवायला हा लेख…..मागे धनंजय दातारांनी त्यांच्या बायकोला ’रोल्स रॉईस’ दिली तेव्हा मी पण त्याला असेच पिडले होते….म्हटलं बघ आज काल मराठी नवरे सुद्धा असल्या गिफ्ट्स देतात…..
  तुमच्या लेखातल्या ’तो’ आणि ’ती’ बद्दल काय बोलावे…..तुम्ही फक्कड विनोदी लिहीलेले आहे…मजा आली वाचतांना…..

  • अनुजाने दिला हा विषय परवाच्या कॉमेंट मधे म्हणुन प्रयत्न केला. आधी नासा वर लिहिणार होतो.. इंडियन्स इन नासा. म्हणजे नासामधल्या सायंटिस्टची बायको काय म्हणेल?? असा विषय होता डोक्यात, पण लिहिणं सुरु केलं तेंव्हा आपले ’साहेब’ आपोआप अवतिर्ण झाले स्क्रिन वर …..:)

 3. काका जबरा… लेख साही झाला आहे.

  आपल्यासाठी हा विनोदाचा भाग झाला पण “त्यांच्या”साठी हे वास्तव देखील असु शकेल. “ते” कदाचित चंद्र-सुर्यापलीकडे देखील गेले असतील. आपण मध्यमवर्गीयांच्या कल्पनाशक्तीच्या बजेटमध्ये देखील चंद्राच्या पुढे विचार शक्य नाही. अगदी विनोदाच्या अंगाने देखील…

  बाकी तुम्ही विनोदी लेख देखील तितक्याच ताकदीने आणि खुसखुशीत लिहिता हे वेगळे सांगायची गरज नाही.

  • सिध्दार्थ,
   तंबी दुराई माझा फेवरेट आहे नां.. गेली दहा वर्षं न चुकता दर रविवारी तंबी वाचतो, आणि मगच दिवस सुरु करतो.. 🙂 त्याचाच परिणाम असावा, की हल्ली असे लेख पण सुचताहेत लिहितांना..

   • अरे सही… मी देखील आठवडाभर लोकसत्तावर नुसती नजर टाकतो पण रविवार लोकरंग, हास्यरंग अगदी न चुकता. हल्ली त्यातले अकबर बिरबलचे किस्से आणि नायगावकर काकाचा कट्टा अगदी मस्तच…

 4. आनंद says:

  लेख फक्कड जमलाय.

  • आनंद
   धन्यवाद.. तुम्हा लोकांच्या कौतुकामुळेच तर नविन लेख लिहिण्याचा हुरुप येतो. 😛

 5. लय झँक झाला आहे हा लेख ..
  चंद्र विकत घेण्याची कल्पना भन्नाट …
  हसून हसून पुरेवाट झाली..

 6. manmaujee says:

  एकदम फक्कड़ झाला आहे लेख!!! तुम्ही लिखानाच्या बाबतीत बाकी अष्ट्पैलु आहात बघा!!!

  “डोळ्याच्या पापण्यांनी त्याच्या गालाला गुदगुल्या करित म्हणाली, अहो.. आम्हाला किनई…… आम्हाला किनई………….” . . लय भारी बघा!!! कस काय सूचत हो तुम्हाला!!!

 7. anuja says:

  आहा! महेंद्रजी,
  होते आपणाकडे चंद्र मणी, गुम्फिलात सुंदर चंद्रहार तुम्ही,
  प्रत्येक मणी चमकला,चंद्र सुद्धा खुश झाला नभांगणी,
  घडणावळीत दिसले अनेक पैलू,लक्ख हसली चांदणीही मनी,
  नक्षत्रांनी चंद्रा कडून पत्ता घेतला,सोनाराने१०८% दागिना घडविला

  • अनुजा
   खुपच सुंदर प्रतिक्रिया दिलित तुम्ही..
   अहो, तुम्ही विषय दिला म्हणुनच सुचलं हे..
   धन्यवाद वगैरे म्हणत नाही, खुपच फॉर्मल वाटतं ते..
   तरी पण आभार…

 8. bhaanasa says:

  महेंद्र, मी व नचिकेत खूप हसलो. एकदम धमाल झालाय रे.हे संवाद जिकडेतिकडे असायचेच फरक फक्त मागणीचा. बाकी आख्खा चंद्रच विकत घेउन टाकायची आयडीया तू आत्ताच त्याच्या कानावर घालून टाक:).आणि हे दर आधी जास्ती वाढवायचे आणि मग उतरवल्यासारखे करायचे हे सत्यही तू सही मांडून टाकलेस. चला रविवार सकाळची सुरवात छान झाली रे.

  • भाग्यश्री
   ह्यात थोडी अतिशयोक्ती असली तरीही असं होऊ शकतं.
   विज दरांचा मी स्वतः अनुभवलं आहे .
   त्यांनी टेकओव्हर केलं आणि विजेचं बिल डबल यायला लागलं..

 9. Aparna says:

  खो खो खो….एवढीच कॉमेन्ट दिली तर चालेल का?? मला जोरजोरात हसताना कसं लिहायचं ते कळलं नाही म्हणुन विचारते…
  आणि हो इथे आता दिवाळीची ओवाळणी झाली की हा लेख मी नक्की तिकडच्या स्वारीला वाचुन दाखवेन..म्हणजे जगात तो एकटाच असा नवरा नाही हे त्याला कळेल…..

 10. मनाली says:

  नमस्कार
  हसुन हसुन पार वाट लागलि माझी…
  मस्त झाला आहे लेख….
  A – 1

  मनाली

 11. anuja says:

  महेंद्र्जी,
  अपेक्षा वाढवल्यात कि तुम्ही,अपेक्षा जिथे तिथेच आपलेपणा असतो.खूप काही सुचविणार नाही,पण मांडू का विचार म्हणून,जरा वेळ घेतला, bloganche एकत्रित पणे एक दिवाळी अंक मिळेल का वाचावयास,सर्व विषय समावेशक असेल,किंवा सर्वे बेस्ट पोस्ट,सर्वांच्या एकाच ठिकाणी मिळतील,दिवाळी खूपच जवळ आली,नसेल शक्य तर वर्षातून एकदा अंकानिमित एकत्र या.
  सर्वांचे निश्चित सहकार्य मिळेल,कळवा मला,माझ्याकडून मदत १०८% ,आवडेल मला.निदान २०१० चे स्वागत मराठी ब्लॉग्स च्या वार्षिक अंकाने होऊ दे,हि सर्वांची जवाबदारी ,महेंद्र्जी न सुचविले कारण सर्वे ब्लॉग्स मालकांचे ते आवडते आहेत.विचार सर्वांनी करा

 12. Sonal says:

  sahich….maja aali wachun. wegla prayatna nakkich yashswi jhalay! ajun wachayala aawdel.

 13. सॉलिड्च!
  सकाळची सुरुवात अशी हसरी झाली… राहुन – राहुन तिचं लाडिकवाणं मागणं आठवणार..दिवस मस्त जाणार…!!!

  • दिपक
   अहो , प्रत्येकालाच हे फेस करावं लागतं, एखाद्याला चंद्र मागितला जातो, तर आपल्या सारख्या लोकांच्या घरी साडी , दागिना.. बाकी काही वेगळं नसतं .. 🙂

 14. अशीच एक छोटी पोस्ट मी टाकली होती – माझा पती – करोडपती म्हणुन!

  • अरे हे पोस्ट कसं सुटलं?? वाचलं नव्हतं आधी. मस्त आहे .. आजकाल मराठी माणसं पण रोल्स देतात बरं कां.. सांभाळुन..

 15. क्लास वन !!!

  २७ मजली अटलांटिस सारखे हसता हसता पुरेवाट झाली.

 16. Rajeev says:

  नवीन बालगीत….

  राजाचा पाहा थाट..
  राणी साठी घेतली याट..
  त्यात जेवायला सोन्याच ताट.
  त्यावर ही झाली कमान……..
  राजाच्या भावाच वीमान……..
  राजाची फ़ाट्की प्रजा………..
  चीमटी घेउन पोटाला ..
  शेअर घेते मोठाला…….
  डीवीडंट ची स्वप्ने मोठी..
  प्रजेची बुद्धी नाठी !!

  • चीमटी घेउन पोटाला ..
   शेअर घेते मोठाला…….
   डीवीडंट ची स्वप्ने मोठी..
   प्रजेची बुद्धी नाठी

   हे दाखवायला पाहिजे आमच्या गुज्जु मित्रांना.. 🙂
   आणि स्वामी राजरत्न, हे बाल गीत नाही रे बाबा.. हे तर चक्क थ्री एक्स रेटींग असलेलं गीत आहे.. 🙂

 17. laxmi says:

  mastach…vinodi lekh dekhil chhan lihita tumhi.
  ha tambi durai kon??

  • गेली दहा वर्षांपेक्षा जास्त हा माणुस ( नक्की कोण आहे ते माहिती नाही) रविवारच्या लोकसत्ता मधे दोन फुल एक हाफ नावाचे सदर लिहितो. माझा फेवरेट आहे तो.. 🙂

 18. हेमंत आठल्ये says:

  खूपच छान आहे. तुमचा ब्लॉग मी नेहमी वाचतो. पण आजचा हा लेख खरंच उत्तम आहे. आवडला.

  • हेमंत
   प्रतिक्रियेकरता आभार.. विनोदी लिहिण्याचा आता प्रयत्न सुरु ठेवायला हरकत नाही असे वाटते. 🙂

 19. ravindra says:

  अप्रतिम!!! कदाचित पुढे असे होईल हि. आपण चंद्रावर राहण्याची व्यवस्थाच तर करीत आहोत. मी यावर एक पोस्त टाकली आहेच “चांद पर पाणी” वाचली असावी.

  • “तो” काहिही करु शकतो. कदाचित चंद्र पण घेईल विकत.थोडी अतिशयोक्ती आहे पण- काय सांगावं??प्रतिक्रियेकरता आभार..

 20. hehe… bhari ahe post !! 😀

 21. sonal ambekar says:

  agdi……. sangu kay tumhi kasli hi kalpana keliy.mast cha a.
  ase vatate ki tumhi….chorun tar nahi na tyanchya gappa aaiklya.
  khup hasun -hasun mi vacle..agdi te drushya mazya samor ubhe kele tumhi.
  khup cha chan.

 22. Dilip says:

  सुन्दर !! Very Good !!

  पण लेखात …
  “हिरो माझ्या मागे होते” …
  “सिनेमात राहिले असते नां, तर नक्कीच करोडॊ रुपये कमावले सते” …
  “तुमच्या कंपनिच्या शेअर्सची तर वाट लागलेली आहे” वगैरे उघड उल्लेख टाळले असते तर लेख जास्त परिणामकारक झाला असता असे वाटते. मराठी मनसे ‘ता…’ वरून ‘ताक-भात’ बरोब्बर ओळखतात, (एवढेच नहीं तर ताकभाता बरोबर चटनी-लोणाच-पापड़ आहे हे ही ओळखतात, नहीं का ?
  जेवढा अर्थ जास्त गर्भित असेल तवढे उत्तम ……… तरीही हरकत नाही ……..

  सुन्दर !! Very Good !!

  • दिलिप
   लिहितांना जे काही सुचेल ते अजिबात विचार न करता लिहित जातो. एकदा लिहुन झालं की काहीच बदल करित नाही, कारण तसं केल्यावर मग त्या पोस्ट मधला चार्म निघुन जातो. आशया पेक्षा शब्दाकडे जास्त लक्षं जाते. उघड उल्लेख हा अगदी अनवधानाने आला होता- मुद्दाम केलेला नाही.
   मराठी माणसं ता वरुन ताक भात, काय सगळा मेनुच ओळखु शकतात.. हे अगदी खरंय.. 🙂 प्रतिक्रियेकरता आभार..

 23. Dilip says:

  महेंद्र, मी रोज वेळात वेळ काढून तुजा blog वाचतो कारन मला तुझे सर्व लिखाण फारच आवडते.

  आणखी एक सांगायचं म्हणजे, मला तुझं कौतुक अशासाठी वाटतं की तू तुज्या ब्लॉग शी संबधित प्रत्येकाला वैयक्तिकरित्या आणि विलम्ब न करता उत्तर देतोस !!

  मी तुझ्या पेक्षा वयानं (थोडा) मोठा आहे म्हणून एकेरी उल्लेख केला. तू सुद्धा मला एकेरी उल्लेख करुन संबोधलेस तर मला आवडेल !! तुला चालेल ना ?

  • दिलिप
   धन्यवाद. इथे माझ्या वयाचे फारच कमी लोकं आहेत. अगदी बोटावर मोजण्याइतके . बाकी सगळे अगदी लहान आहेत. एकेरी उल्लेख केलास तरीही काही हरकत नाही. ब्लॉग वर लिहिणं हा छंद झालाय. कधी टुर असला तर राहुन जातं, पण अदरवाइज नक्कीच पोस्ट टाकतो कुठलंतरी.
   हा एक चांगला छंद आहे, वेळ पण जातो, आणि बुद्दी पण शाबुत रहाते 🙂

 24. Sharda Morya says:

  Khoop Chaan…………….

  • ्शारदा,
   इतक्या जुन्या लेखांवर पण आवर्जुन प्रतिक्रिया देता, त्याबद्दल मनःपुर्वक आभार..

 25. sandeep salunke says:

  koojbooj very great

 26. bapu says:

  lay bhari…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s