चविने खाणार इंदौरला- २

इंदौरला गेलो आणि परत आल्यावर खादाडी ची पोस्ट नाही ….?? हे कसं शक्य आहे?? इंदौर म्हणजे खवैय्यांचं ठिकाण. आधीच्या पोस्ट मधे बऱ्याचशा जागा कव्हर केल्या आहेतच, तरी पण त्या जागांच्या व्यतिरिक्त इतर जागा इथे कव्हर करतोय.

इंदौरला पोहोचलो आणि सरळ साईटला जायला म्हणून टॅक्सिमधे बसलो. जेट लाइट या भिकार एअरलाइन्सने प्रवास केल्यावर , डिप्लेनिंग झाल्याबरोबर खूप भूक लागलेली होती. विमानात शंभर रुपयाला सॅंडविच, वगैरे अव्हेलेबल होते.  कोल्ड रोल्स.. व्हेज आणि चिकन पण होते. पण ते थंड सॅंड्विच मला अजिबात आवडत नाहीत, विचार केला, की इंदौरला उतरलो की सरळ कुठे तरी मस्त पैकी गरमा गरम पोहे हाणु या.

कारमधे बसलो, आणि सरळ पेटलावद , झबुआ च्या दिशेने प्रवास सुरु केला. इंदौर शहरात न जाता, सरळ बायपास पकडून आम्ही निघालॊ. एका ठिकाणी हॉटेल अरुण मधे पोहा आणि समोसा फेमस आहे असं ड्रायव्हर म्हणाला, आणि त्याने गाडी लावली पार्किंग मधे. आम्ही जरा घाईत होतो, त्या मुळे फारसा वेळ ना घालवता नाश्ता आटोपून झबुआ रोडला लागलो.  चांगलं खाय़ला असलं पण  जर वेळ नसेल तर जस्ट पोट भरणं हाच उद्देश असतो. इतर गोष्टींकडे लक्ष जात नाही फारसं.

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहेमी प्रमाणे ५६ दुकानला व्हिजीट झाली. लवंग शेव, लसुण शेव, आणि रतलामी शेव विकत घेतली आकाश के नमकीन मधून.तसंही आकाश के नमकीन प्रसिद्ध आहेतच इथले , आणि मुलींना पण खूप आवडतात..

091020092022मधुरम मधून थोडं स्वीट्स घेतलं विकत . मधुरम मधल्या मिठाईची मजाच निराळी.मुंबईची मैदा युक्त पेढा आणि मिठाई खाउन खूप कंटाळलेला होतो.

मधुरम मधे गेल्यावर पहिले  एक (मिश्रण) ड्रिंक मिळतं , ते म्हणजे लस्सी, रबडी, ड्राय फ्रुट्स चं मिक्स.. अफलातून ड्रिंक आहे हे.. या वेळेस बरेचसे फोटो ग्राफ्स डिलिट झाले कम्प्युटरला कॉपी करतांना. अगदी ४-५ फोटोच शिल्लक आहेत.ह्या ड्रिंक चा फोटो पण डिलिट झाला. पण एक सांगतो , कधी इंदौरला गेलात तर मधुरम मधलं हे  पेय नक्कीच ट्राय करा. अप्रतिम चव असते ह्याची..ह्याला काय म्हणतात ते विसरलो आता.

आणि एक ग्लास घेतला की बस्स..इतकं जड  असतं पचायला, की दिवसभर भुक लागणार नाही याची गॅरंटी… अहो सहाजिकच आहे नां.. रबडी+श्रीखंड+दुध+ड्रायफ्रुट्स.. !! डायटींग वाल्यांनॊ , हे तुमच्या साठी नाही..

091020092014हे सगळं खाणं झाल्यानंतर मात्र ठरवलं, की फार जास्त झालंय, तेंव्हा आजचं लंच स्किप करावं.ठरवल्या प्रमाणे वागणं फारच कमी वेळेस जमतं.

असं ठरवलं की मग खाताना उगाच जास्त गिल्टी वाटत नाही..:)

मी जेवायला बसलो की गिल्टी कॉन्शस मुळे स्वतःलाच बजावत असतो, की आज गोड खायचं नाही,पण जेंव्हा ते समोर येतं तेंव्हा मी थोडा केलेल्या निश्चया पासून ढळतो.. स्वतःच्या मनाला समजावत, की बाबा रे हे तुला चालत नाही तू जास्त गोड खाउ नकोस वजन वाढेल.. वगैरे वगैरे… आणि मग मनसोक्त ताव मारतो समोर येईल त्या वस्तुवर.. आणि अशी आवडीची गोष्ट असेल तर मग .. क्या कहना??

मधुरम वाल्याने पेठ्याचं पान.. एक नवीन मिठाई दिली खायला . अप्रतिम टेस्ट होती. घरच्या साठी पण बांधुन घेतली. तिकडूनच थोड्य़ा कस्टमर्सला भेटायला गेलो.. आणि दुपारी दोन वाजे पर्यंत नुसता कामातच बिझी होतो.

091020092017आमचा डिलर शर्माजी बरोबर होताच. म्हणाला आज तुम्हाला एका बेस्ट जागी नेतो.. मी म्हंटलं सुध्दा.. अरे नको आता, सरळ रात्रीच बघु या. .. त्यानेच आठवण करुन दिली , रात्री ८-३० ची फ्लाईट आहे, म्हणजे इथून ६ वाजताच निघावे लागेल. ट्राफिक खूपच असतो,   एक तास तरी लागेल. तेंव्हा रात्रीचं जेवण विसरा.. आपण थोडं थोडं लाइट खाउ या काहीतरी..

कार त्याने वळवली आणि एका दुकानासमोर पार्क केली. राम बाबु के  पराठे …  आग्रा का मशहुर पराठेवाला दुकान अब इंदौर मे..थोडं बेसमेंटला होतं दुकान एका मोठया कॉम्प्लेक्स मधे. माझा खाण्यातला इंटरेस्ट आमच्या सगळ्या मित्रांना आणि नेहेमीच्या संबंधातल्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे कुठेही गेलॊ की आमचे मित्र वगैरे आवर्जून चांगल्या जागा दाखवतात. पराठे आणि लाईट??  धन्य हो!!! काय म्हणणार? मुकाट्याने गाडीतून उतरलो आणि त्या हॉटेल कडे मोर्चा वळवला.

091020092016हॉटेल मधे शिरल्या बरोबर एक समोर थंडगार पाण्याचे ग्लासेस आणून ठेवले. अजुन ही फारशी भुक लागलेली नव्हती. सकाळचं अजुन उतरलेलं नव्हतं.सेटल झाल्यावर मेनु कार्ड बघितलं, मी म्हणालो, मला एक आलुपराठा, एक मटर मेथी पराठा अऔर.. .. शर्माजींनी थांबवलं.. म्हणाले इथे एक पराठा संपवा, नंतरच दुसरा ऑर्डर करा. कारण एकाच पराठा पुरेसा होईल कदाचित.. आम्ही चौघं होतो, मग असं ठरलं की मेथी-मटर पराठा, दाल ( उडद-मुंग दाल )पराठा,स्विट  कॉर्न पराठा, आणि मिक्स व्हेज पराठा मागवून शेअर करु या..

थोडं थांबावं लागलं . कंटाळा येउ नये म्हणून त्याने मातीच्या कुल्हड मधे मसाला ताक आणून ठेवलं. या मातीच्या कुल्हड मधे चहा किंवा इतर काहीही प्यायला मला खूप आवडतं. एक वेगळा मातीचा वास येतो तो मस्त वाटतो.पराठ्यांची वाट बघत आम्ही ते ताक संपवलं, आणि रिपीट केली ऑर्डर..

जवळपास दहा मिनिटांच्या नंतर समोर थाळी आणून ठेवली. त्या थाळी मधे पराठा, आलु का झोल, आणि लाल भोपळ्याची एक वेगळ्या प्रकारे केलेली भाजी,आणि कढी.. इतकं होतं. सोबतच चिंचेची चटणी. या चटणीची स्पेशॅलिटी म्हणजे यात फक्त चिंच गुळ नव्हता, तर त्या मधे  भरपूर सुंठ घातलेली होती. सुंठेमुळे एक मस्त पैकी फ्लेवर आला होता त्या चटणीला.

पराठ्याचा एक तुकडा मोडला आणि तोंडातून शब्द बाहेर पडले.. वाह!!! क्या बात है.. शर्माजी माझ्या कडेच माझ्या रिऍक्शन कडॆ पहात होते. मला आवडलेलं बघून त्यांचा पण चेहेरा उजळला. इथे पराठ्यामधे कांदा, लसुण अजिबात वापरले जात नाही. चार तुकडे होते प्लेट मधे , प्रत्येक पराठ्याची चव वेगळी.. अप्रतिम.त्यातल्या त्यात मला मेथी मटर मिक्स पराठा खूप आवडला .

इतर पराठे पण चांगले होते चविला.  पराठा म्हंटलं की आपल्या नजरेसमोर तव्यावर थोडं तेल किंवा तुप लाउन केलेला पराठा हे चित्र डोळ्यापुढे येते.. इथे मात्र तसं नाही. पराठा हा तुपात चक्क तळलेला असतो. सोबत असलेला आलू का झोल म्हणजे बटाट्याची भाजी, भरपूर पातळसर रस्सा असलेली , ह्या भाजी बरोबर पराठा अप्रतिम लागतो. सोबतच ती कोहोळ्याची ( लाल भोपळ्याचा लच्छा) थोडा आंबट गोड चविचा असतो, तो लच्छा म्हणजे पण स्पेशॅलिटी आहे या रामबाबुची. तळल्या मुळे तो पराठा  एकदम क्रिस्पी असतो-कडक पणा नाही तर खमंग पणा येतो तळल्यामुळे. बहुतेक शॅलो फ्राय करित असतील ..

पहिलं सर्व्हिंग संपलं.. एका पराठ्यामधेच पोट भरलं होतं, पण शर्माजी म्हणाले, इथला पापडका पराठा ट्राय करो.. म्हणून आम्ही तो पापडाचा चुरा भरलेला पराठा मागवला. फारशी भुक नसतांना पण  सगळं संपलं..

स्विट डिश???? शर्माजींना नको म्हंटलं स्विट डिश. कारण फुल झालो होतो. तरी पण थोडा एक स्पेशल आयटम ट्राय करो म्हणुन त्यांनी  शेवटी स्विट डिश म्हणून पुन्हा  आर के पी स्पेशल स्विट पराठा मागवला.

हा स्विट पराठा म्हणजे एक ’वाह’ डिश.. समोर ठेवला त्याने आणि दोनच मिनिटात संपला. या पराठ्यामधलं स्टफिंग होतं, ग्रेटेड पनिर, मावा, बदाम, पिस्ता, काजु …. केशर वगैरे वगैरे.. अल्टिमेट डिश होती ही. पहिल्यांदा तर एकच मागवली होती, पण नंतर पुन्हा एक रिपीट केला.

आणि शेवटी पुन्हा एक ग्लास कुल्हडमधलं ताकं संपवून जेवण संपवलं.. आणि नक्की ठरवलं.. की आता उद्यापर्यंत काहीच खायचं नाही…. 🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा and tagged , , . Bookmark the permalink.

18 Responses to चविने खाणार इंदौरला- २

 1. sahajach says:

  तुम्ही ना हे खवय्येगिरीचे लेख लिहा पण ते फोटो नका टाकत जाउ…..आधिच तुम्ही मस्त वर्णन करता लगेच खावेसे वाटते, त्यात भर ते फोटो म्हणजे कहर!!!!! येव्हढे प्रकार परोठ्याचे, आमच्या पाकिस्तान्याला येतात का विचारले पाहिजे……..

  • फोटो तर बरेच डिलिट झाले कॉपी करतांना … 🙂
   दिल्लीच्या पराठेवाली गली मधे ( चांदनी चौक मधे) खाल्लेल्या पराठ्यांची आठवण झाली.
   हे हॉटेल खरंच मस्त आहे एकदम. स्पेशॅलिटी आहे या लोकांची पराठ्यामधे.
   पाकिस्तानी शेफ?? विचारुन पहा..

 2. Manmaujee says:

  एकदम चवदार!!!! मजा आली पोस्ट वाचताना!!! चला आत आज पराठे हाणले पाहिजे!!!

  • मनमौजी
   पराठे तर निश्चितच हाणले पाहिजेत, आणि ते पण चांगल्या तुपात तळलेले.. 🙂
   डायटींग ची काळजी न करता…. 🙂
   मी तर त्या दिवशी रात्री खरंच जेवलॊ नव्हतो, इतकं हेवी झालं होतं..

 3. Raghu says:

  mahendraji, tumhi khupach chhan lihita. me na chukata roj tumacha blog wachato. ani khanya baddalachya tumahcya sagalya post mhanaje mejawani asate, karan tumhi kelel varnan ani tyatale photo ya mule bhuk lagate..!! nahi tar khawalate. Dieting karun konach bhal zal nahi ya matacha me aahe.. jya pota sathi sagali dhadpad karato tyalach upashi thevayache hech muli mala patat nahi.. asach halak-fulak, kadhi vichar karayala lavanar lekhan karat jaa mhanaje amhala wachayala chhan posts milat jatil.

  • रघु
   मनःपुर्वक आभार. तुम्हा लोकांच्या इतक्या सुंदर आणि उत्स्फुर्त प्रतिक्रियांमुळेच लिहिण्याचा उत्साह वाढतो . वेगवेगळे विषय घेतले की मग तोच तो पणा येत नाही म्हणुन एकाच टाईपचे लिखाण टाळतो. प्रतिक्रियेकरता खुप खुप आभार.

 4. jkbhagwat says:

  Hi Mahendra Saheb ,
  The drink you took at Madhuram is called Shikanji .The original Shikanji is available in Sarafa .Try it when you go to Sarafa
  Regards
  JKBhagwat

  • धन्यवाद.
   मी अगदी पुर्ण विसरुन गेलो होतो त्याचं नांव..
   शिकंजी.. अल्टिमेट ड्रिंक आहे ते..
   एक ग्लास घेतलं की बस्स!!
   सराफा मधे पण कोपऱ्यावर घेतलं होतं ते एकदा. इंदौरला कुठेही घ्या मस्तंच मिळतं..
   तसेच सपना संगिताच्या समोर पण एक आहे दुकान .. तिथे पण छान मिळते ही शिकंजी.

 5. Aparna says:

  खाण्याबद्द्ल वाचायचं म्हणजे पोटात गोळा येतो कारण इथे काही मिळणार नसतं आणि छान छान फ़ोटो पाहुन पोटोबा भरणार नसतात….तुपात तळलेला पराठा नुस्तं मनातल्या मनात कल्पना करायलाही अवघड जातंय…..खा खा….चंगळ आहे तुमची बुवा…

  • अपर्णा,
   कसली मस्त टेस्ट असते म्हणुन सांगु.. अगदी अल्टीमेट.. घरी आल्यावर सौ. ला सांगितलं तर ती म्हणते, वजनाकडे लक्ष दे.. पण काय करणार.. कंट्रोलही नहीं होता…. :)आता तर काय दिवाळिच आहे आज पासुन.. नुसतं खाणं आणि खाणं…

 6. तुमची खवय्येगिरिची कोणतीही पोस्ट वाचली ना की तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही.
  एकदम खमंग लेख …

  • देवेंद्र
   आहेच तशी ती जागा. इंदौर इज इंदौर..
   खाण्याची चंगळ फक्त इंदौरलाच असते असं माझं मत आहे.
   प्रतिक्रियेकरता आभार…

 7. rohan says:

  मध्ये ४-५ दिवस गडबडीत होतो त्यामुळे राहून गेली होती ही पोस्ट वाचायची. खादाडी पोस्ट आणि मी मिस करेन हे अशक्य नाही का… 😀

  आम्ही राजस्थानला गेलो होतो तेंव्हा ‘रबडी+श्रीखंड+दुध+ड्रायफ्रुट्स’, कुल्हडमधले ताक खूप एन्जॉय केले होते. नशीब जेवून वाचतोय मी ही पोस्ट नाहीतर तुझे ते पराठ्याचे वर्णन ऐकून मला भूक लागली असती सॉलिड… 🙂

  • अरे ते पराठे खरंच अप्रतिम होते रे.. अजुनही चव रेंगाळते आहे जिभेवर…अख्ख्या आठवड्याच्या डायटची वाट लागली.
   तु जे प्यायलास त्याला पण.. शिकंजी म्हणतात .. मी नांव विसरलो होतो… खुपच सुंदर असते त्याची चव.. इतका सगळा माल मसाला असल्यावर चांगलं न लागायला काय झालं?त्या पेयाला

 8. mipunekar says:

  आई शप्पथ !!!! जबरदस्त !!!!!!!
  वाचूनच भूक लागली आहे.

 9. sagar says:

  Aata mi tharvalay tumchi khanychi ek hi post vachaychi nahi.Hi mazi pahili v shevtchi post….Aho itk lihita ki jam bhook lagte an mi rahato hostel var….Khanar kai Kappal……..Btw nice post…….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s