दिवाळी-नसती उठाठेव..

अगं ए……..  माझ्या पायजम्याची नाडी कुठे गेली??

इश्शं..अहो काय गम्मत झाली माहितीये का? परवाचीच गोष्ट आहे..दुपारी किनSSSSSई मी किनSSSSSई किटी पार्टी साठी तयार होत होते, तेंव्हाच लक्षात आलं की काळ्या साडी खालचा पेटीकोट थोडा भुरकट झालाय, म्हणून नवीन पेटीकोट मागवला सुन बाईकडून..आणि तिने पण दिला हो अगदी घडी न मोडलेला..हो ना.. नाहितर आजकालच्या सुना एक गोष्ट देत नाही आपल्या सासुला, पण आपली सुन मात्र खरंच गुणाची गं बाई ती…अजिबात कुरकुर न करता दिला तिने आपला नवा कोरा पेटीकोट..

बरं आजकाल नवीन पेटीकोट मधे नाडी नसते ना.. घरी नाडीचं बंडल संपलं होतं.. मी तरी काय करणार?? मला नेमकी ती काळी साडीच नेसायची होती ना, तेवढ्यात कपाटात समोरच तुमचा पायजामा पडलेला दिसला म्ह्टलं.. तसंही तुम्ही हा पायजमा , कुर्ता फारच कमी वापरता, म्हणून काढून घेतली त्या पायजम्याची नाडी..

पण हे सांगा, तुम्हाला नेमकं आजच का घालावा वाटला पायजमा?? नेहेमी तर आपला सुट घालुन फिरत असता??

अगं आज दिवाळी नाही का? धनतेरस आहे आज.. मग आपला भारतीय पोशाख नको का घालायला? रोज तर आहेच ते नेहेमीचेच कपडे.सुट बुट आणि डोक्यावर मुकुट?

किती अशुद्ध बोलता हो तुम्ही?? इतक्या मोठ्या लेखकाचे/ कवीचे पुत्र, आणि धनतेरस काय म्हणता अडाण्या सारखं? चांगलं धनत्रयोदशी म्हणताना जीभ अडखळते का??

आज सुट बुट नाही, पण कुर्ता पायजामा आणि डोक्यावर मुकुट तर घालावाच लागेल. तसा तो मद्रासी सुपर हिरो मात्र बघा आपलं चमन कसं अजिबात लाज नं वाटू देता फ्लॅश करित असतो. पण तुम्ही.. …..????

मी कुर्ता पायजामा वापरत नाही असं कसं म्हणू शकतेस?? मी वापरत नाही तर काय?? आत्ताच तर १३ तारखेच्या निवडणुकीच्या वेळेस आणि छोटे भैय्या च्या युपीच्या प्रचारात हाच तर पायजामा घातला होता मी.. म्हणजे मी वापरतो. तूच आपली काय वाटेल ते ठरवते..

आणि मी हे जे  त्या ‘लाल टॊपीवाल्यांचं’  एवढं काम करतो  ते केवळ तुझ्याच साठी ना? नाहितर मला काय गरज आहे इतकं उन्हा तान्हात कपड्यांशी अजिबात मॅच न होणारी  लाल टोपी घालुन फिरण्याची??  जर मी ते  प्रचाराचं काम केलं नाही तर  नक्कीच ‘ती’ पार्टी निवडुन येईल, जिने तुला नाक घासून माफी मागायला लावली होती ती  🙂

पण मी काही माफी मागितली नाही.कै च्या कै च काय बोलता हो?? मी कधी मागितली माफी “त्या”ची?.

काय  म्हणतेस.. तु नाही पण तुझ्या फालतू बकबकीमुळे मला मात्र नाक घासून पदर -शीः पदर काय म्हणतोय मी, माझा कोट पसरून माफी मागावी लागली होती.    नेमकं ह्याच कारणामुळे आपल्या लेकाचा तो बिलियन्स डॉलर्स खर्च करुन स्पेशल इफेक्स्ट  असणारा सिनेमा कसा आपटला होता?? विसरलीस का?  तुझ्या अशाच मूर्खासारख्या वागण्यामुळे मुलांचं करिअर खराब होतंय, याचा काही तुला सिरियसनेस नाही..

परवाच छोटे भैय्या म्हणत होते, मुंबई मधे आपल्या लोकांची संख्या खूप वाढते आहे. दर महिन्याला एक दोन गाड्या भरुन लोकं इकडे येताहेत.   आपला उमेदवार निवडुन आला, की मग या येणाऱ्या लोकांच्या रेशन कार्ड, व्होटर कार्ड ,नविन झोपडपट्ट्या तयार करायला सहुलियत होईल.

तसा, छोटे भैय्याच्या सोबत हल्ली ‘बाबा’ पण बराच काम करतो पार्टीचं. न लाजता लाल टोपी घालुन प्रचार करित असतो. तुला माहिती नसेल, ‘बाबा’  ने तर आपल्या सख्ख्या बहिणीच्या विरुद्ध प्रचार केला होता या इलेक्शन मधे माहितीये?? आता असे लोकं आहेत म्हणून तर छोटे भैय्या टिकुन आहेत.

आपल्या लोकांची संख्या वाढली की मग मात्र इथे तुला अगदी मोकळे पणाने स्टेजवर हम हिंदी है असं अभिमानाने म्हणता येईल.

बरं ते मरु देत हो.. मला काय करायचंय त्याचं..बरं आता निघालात तरी कुठे? मी म्हणते कुठल्यातरी मंदिरात जाउन यायचं कां? म्हंटलं, आज दिवाळीचा दिवस, दिवे लावायचा- एखाद्या जागृत मंदिरात जाउन आलो असतो, की सुनबाईचं कडक मंगळ शांत कर रे बाबा म्हणून.. वंशाला दिवा पण हवाच ना??

कार्ट्याने तर दिवे लावूनच ठेवलेत, आपल्यापेक्षा जास्त अनुभवी मुलीशी लग्न करुन बसलाय. काय करावं? कसं बोलावं काही काही कळत नाही..

शेवटी आपलाच दाम खोटा ना.. तिला काय म्हणायचं, ती तर परक्या ची लेक ना?? पण आपलं कार्टं, लग्नं झाल्याबरोबर गेलं लगेच घर सोडून वेगळं रहायला… इतका मोठा बंगला आहे, म्हणते मी.. काय गरज आहे वेगळं रहायची??  पण नाही.. म्हणे वेगळं रहायचं……जाउ दे.. मेलं आपलंच नाणं खोटं.. दुसरं काय?

अगं हे काय बड बड लावली आहेस?? काय झालं तुला? कशाला इतकं वाईट वाटून घेते आहेस?? उगाच काहीतरी बड बड करु नकोस..ते आपल्या संसारात सुखी आहेत ना.. झालं तर.. कशाला उगाच त्रास करुन घेते आहेस? आणि दोघंही तुला भेटायला येतात ना नेहेमी??मग काय प्रॉब्लेम आहे तुला?—– बरं सांग लवकर कुठल्या मंदिरात जायचं??

तिरुपतीला जाउ या कां? ते   मित्र आहेत ना छोटे भैय्याचे , जे पॉवर प्रोड्युस करणार आहेत तिकडे युपी मधे!!! त्यांची एअरबस एक्सप्रेस.. ती घेउन जाऊ या आपण.. रात्री पर्यंत परत येऊ. आणि ते पण तर आता आपल्या लाल टोपी परिवारातले ना? काय हरकत आहे म्हणते मी त्यांचं विमान नेलं तिरुपतीला तर?? हवं तर, पेट्रोल आपण टाकु…(!)

नकॊ त्या पेक्षा आपलं जुहुचं हरे क्रिश्ना मंदिरंच बरं.. कारण नंतर ’सरकारांना’ भेटायला जाणं जास्त महत्त्वाचं आहे.  म्हणजे काय -बाळ राजांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर ’सरकार’ आपल्या बाजुने बोलतील..

कित्ती हुशार हो तुम्ही……

मग ?? हुशार नसतो, तर इथे मुंबईत येउन आपला  जम कसा बसवला असता? सगळे उत्तर भारतिय हुशारच असतात…. म्हणूनच इथे सेट होतात. तो संजय नाही?? ‘सरकारांचे’ पाय धरुन मोठा झाला, आणि आता ‘सरकारचेच’ पाय ओढून मंत्री बनला.. असंच करायचं असतं इथे रहायचं तर.

बाळराजांचं ठीक आहे, पण ’त्या’ दुसऱ्या चं काय? त्याला कसा कंट्रोल करणार?? तो थोडीच सरकारांचे ऐकणार आहे? त्याचे मावळे तर धुडगुस घालतील पुढे मागे वेळ पडली तर..??

” त्यांचं ” म्हणतेस होय?.. अगं सोप्पं आहे, त्यांच्या कुंजात जायचं सोबत दहा विस पत्रकार, कॅमेरे न्यायचे सोबत. आणि सगळ्यांच्या समोर माफी मागायची बस्स!! झालं.  बस्स.. इतकीच त्यांची अपेक्षा असते.. तेवढं केलं की झालं.ते मनाने फारच मोठे आहेत. माफी मागितली की झालं.. लगेच माफ करतात.

मी तर म्हणते, दिवाळीच्या मिठाईचा डबा पोहोचता करु या आपण उभयता जाउन. गेला बाजार.. ‘तुमचं ते कुछ मिठा हो जाय वाल ‘पाकीट दिलं तरी पण चालेल..हवं तर मी पण येते तुमच्या सोबत कुंजावर, आणि मोठ्या साहेबांना  भेटायला…

बरं चल लवकर फराळाचं दे काय केलं असेल ते म्हणजे आपण  उभयता जाउन येऊ दिवाळी च्या शुभेच्छा द्यायला……तर मंडळी   ………..ते दोघं तर निघाले तिकडे ’सरकारांना’ आणि कुंजावर दीवाळी शुभेच्छा द्यायला. बहुतेक काकी बाहेरच बसतील गाडी मधे कुंजावर जातील तेंव्हा.. जाउ द्या,त्यांना हवं ते करु द्या…. आपल्याला काय करायची आहे नसती उठाठेव??

. ………………………..  तर मंडळी. दीवाळी च्या या शुभ मुहुर्तावर तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या कुटुंबियांना हार्दीक शुभेच्छा. खरं तर इतकंच लिहायचं होतं,…………………… पण बघा नां.. किती मोठं पोस्ट झालंय ते..
पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना दीपावली अभिष्टचिंतन करुन पोस्ट संपवतो..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सण and tagged , , , . Bookmark the permalink.

31 Responses to दिवाळी-नसती उठाठेव..

 1. काका आणखी एक जबरा लेख … तुम्ही एवढं छान लिहिता. एखाद्या संपादकाशी संपर्क करून पहा. ह्या सगळ्याचे एक छान पुस्तक छापले तर कितीतरी लोक तुमच्या लेखनाचा आनंद घेऊ शकतील.

  बाकी तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबीयांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा!!!

  • सिध्दार्थ
   अगदी हे असे लेख टेम्पररी व्हॅल्यु असलेले असतात.
   करंट इशु ला धरुन असलेले लेख , काही दिवसांच्यानंतर मात्र अगदी असंबध्द वाटतात.
   आणि सौ. ऑलरेडी आहे त्या फिल्ड मधे- पत्रकारितेच्या..
   म्हणुन मी आपला ब्लॉग वरंच बरा… 🙂

 2. anuja says:

  सुतावरून स्वर्ग गाठता येतो,तसे नाडी पकडून नसती उठाठेव करून बर्याच धाडी घातल्या कि भाऊजी तुम्ही,विचारात पडले मी काय प्रतिक्रिया देऊ.पण ह्यापेक्षा स्टार चांदणी बनवणे सोप्पे आहे.त्या उठाठेवी मुळे कामाला तरी लागलो.पण ह्या उठाठेवी मुळे चांदण्या चमकल्या.नाडीची पकड चांगली जमली

  • अनुजा
   हा नाडीचा प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात येतो,म्हणुन जरा जास्त जवळचा वाटतो.
   कधी ना कधी तरी आलेला असतो. एक तर नाडी सापडत नाही,
   आणी सापडली तर टोक आत गेलेलं असतं..
   दिवाळीच्या शुभेच्छांचं पोस्ट लिहायला घेतलं होतं , तर हे झालं..
   .

 3. bhaanasa says:

  महेंद्र, काय रे abc असे चालू केलेय का? नाही म्हणजे परवा A झाला आज B आता उद्या ……हेहे. मस्त झालीये पोस्ट. सूतावरून स्वर्ग….. अं नाही सॊरी नाडीधरून शेवटी टोक गाठलेस की…:)

 4. Rajeev says:

  आज काल साहेब लोकांच्या हातात “पेटी” अंगात “कोट” असतो.
  आणी त्यांच्या “नाड्या” कोणाच्या तरी हातात असतात.
  पुर्वी लहान मुलींच्या ” कल्पना” साड्या मीळायच्या, त्यांना
  नाड्या असायच्या, फ़क्त त्याच वयात त्या लहान मुली स्वता:च्या
  नाड्या स्वत:च्या ताब्यात ठेवायच्या, (मोठ्या झाल्या की,
  ईतरांच्या ही नाड्या त्यांच्या ताब्यात घेण्यात तरबेज होतात)
  आणी मह्त्वा ची गोश्ट की, भारतीय पोशाख म्हणजे धोतर !!!
  धोतराला नाडी लागत नाही..
  परवा एक आयटम दूकानात नाडी वीकत घेत होती..
  आता तीच्या नवीन अल्ब्मम मधे फ़क्त तीच नाडी हाच तीचा पोशाख असणार म्हणे !!!
  आता सायं काळी सुर्य मावळल्यावर “धनत्रयोदशी” असा उचचार तरी करता येईल का ?
  अब बात रहन हौ भैय्यन की, तो मनवामा समज़ रखो का
  लाल टोपी यह लंगूरन का पिछवाडनका रंगका माफ़ीक होवन है अऊर
  धोती, लाल टुपवा, चौकडीवाला गमछा अहीतो बंबई का असलन ड्रईस कोडवा हुई जान वाला हो.
  अब “राज” की बातन हुवा के सरकारन की , कोई”धनुस” कीसीके “हात”मे लईके रईल गाडीका ईंजनका
  धूआसे बच के ” घडी” के तरफ़ नजर राखो ..और जोरनसे बोलो, बंबई चालो…

 5. Nilesh says:

  sahi aahe ha lekh…

 6. rohan says:

  काय रे बाबा..सुटला आहेस एकदम. जबरी लिहितो आहेस. हा.. हा.. तू खरच एखादे पुस्तक किंवा एखाद्या पेपर मध्ये लिहायचा विचार कर. तंबी दूराईला जरा सुट्टी मिळेल.. 😉

  बाकी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या ‘खादाडी’ शुभेच्छा … !

 7. ajayshripad says:

  वाह-वाह…! एकच नंबर दादा….!
  बरका आपल्याला आणी आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…..!

 8. Manmaujee says:

  भन्नाट लेख झाला आहे!!!! दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

 9. saee says:

  Hello
  Wish you and your family a very happy Diwali. 🙂

  • सई,
   शुभेच्छांसाठी आभार. तुम्हाला पण, आणि तुमच्या कुटुंबियांना पण दिवाळीच्या शुभेच्छा..

 10. हेमंत आठल्ये says:

  तुम्हाला, तुमच्या कुटूंबियांना, मित्रांना, आप्तेष्टांना व नातेवाईकांना, सर्वांनाच ही दिपावली आनंदाची जावो; येणारे वर्ष समृद्धीचे व भरभराटीचे जावो ही सदिच्छा!

  पुन्हा एकदा दिपावलीच्या लाख लाख शुभेच्छा!

 11. Pravin says:

  Swaallid Swaallid ekdam 🙂 Deepaawaleechyaa haardik shubhechchaa

 12. Raghu says:

  काका अजुन एक उत्तम लेख….. रोजचे उदाहरण घेऊन जे काही शाल-जोडे दिले आहेत ते खूप आवडले.
  तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना ही दिपावली आणि येणारे वर्ष आनंदाचे, सुखसमाधानाचे, समृद्धीचे व भरभराटीचे जावो ही सदिच्छा…..

  • रघु
   प्रतिक्रिये करता आभार. ही दिपावली तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुख , समृध्दीची जाओ हीच सदिच्छा…

 13. Manju says:

  Mahendre jee,
  lihitana hi hasatech ahe.mastach ahe ha lekh.pratek veli comment dena hot nahi.pan aaj rahavalach nahi.
  Diwalichya hardik shubhechha.

  • मंजु’
   अहो तुमच्या प्रतिक्रियांमुळेच तर नविन लिहायचा हुरुप मिळतो. मनःपुर्वक आभार..

 14. Girish says:

  MBK awsome…wish u and ur family happy diwali!!

 15. दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा….

 16. आनंद says:

  >> ” त्यांचं ” म्हणतेस होय?.. अगं सोप्पं आहे, त्यांच्या कुंजात जायचं सोबत दहा विस पत्रकार, कॅमेरे न्यायचे सोबत. आणि सगळ्यांच्या समोर माफी मागायची बस्स!! झालं. बस्स.. इतकीच त्यांची अपेक्षा असते.. तेवढं केलं की झालं.ते मनाने फारच मोठे आहेत. माफी मागितली की झालं.. लगेच माफ करतात.

  सह्हीच! आवडला लेख…. एकदम….

  • आनंद
   प्रतिक्रियेकरता आभार. काल दिवसभर ऑन लाइन झालोच नाही. कॉमेंट्स पण सेल फोन वरुनच अप्रुव्ह केल्यामुळे इथे रिप्लाय द्यायला उशिर होतोय.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s