कन्फेशन….. (अनटोल्ड )

’ती’च्या घरी ’ती’

बाल्कनी मधे ती बसली होती.. समोर लावल्या रंगीत दिव्यांच्या  माळेतले  दिवे एका पाठोपाठ धावत होते. ती बसली होती एका रॉकिंग चेअर मधे… ती चेअर हलकेच हलके हलके मागे पुढे होत होती. समोर लांब  दोऱ्याला लटकला आकाश कंदिल  माग  पुढे हेलकावे खात होता… त्याची सावली मागे पुढे होत होती.. तिचं लक्षं गेलं समोर भिंतीवर लावून ठेवलेल्या ट्रॉफिज कडे.

त्यातली ती लाइफ टाइम अचिव्हमेंट ऍवॉर्ड वाली ट्रॉफी तिच्या नजरेला खुपत होती. ही ट्रॉफी स्वीकारणं म्हणजे आपलं करिअर संपलं, आपण आपल्या करिअरच्या अत्युच्च पातळीवर पोहोचलो. म्हणजे…………….? म्हातारी झाली की काय मी?????? चेहेरा बघा माझा, एखाद्या सोळा वर्षाची मुलगी पण लाजेल मला बघून. माझी फिगर बघा .. इतकी मेंटेन केलेली आहे, योगा करण्यात कधीच खंड पडु दिला नाही.  जिममधे पण रोज जाते.

खोटं कशाला, अगदी खरं सांगते,  अजुन ही माझे पहिल्या लग्नातले  कपडे मला घट्ट करुन घालावे लागतात.. एकाही ब्लाऊजची शिवण उसवुन बाह्या किंवा अंगात मोठं करावं लागत नाही,उलट्र प्रत्येक ब्लाउझ ऑल्टर करावे लागते. मी अगदी आहे तशी आहे, माफ करा.. आहे तशी म्हणण्यापेक्षा मी होती त्यापेक्षा पण सुंदर दिसते. कांही लोकं लिहितात की हिचं शापित सौंदर्य आहे…. पण आपण कोणाचं तोंड थोडी धरु शकतो ?तसं फेस लिफ्टिंग करुन घेतलय , पण ते तर सगळेच करुन घेतात.

हा एकटेपणा खायला उठतोय. इतके पुरुष आले आयुष्यात, पण या आयुष्यातल्या सांझ वेळी मात्र मी एकटीच.. त्याने पण साथ सोडली. असं वाटलं होतं की तो तरी साथ देईल. पण शेवटी ती निघाली ना खमकी.. आणि तिनेच त्याला फितवलं.. चांगला प्रेमात पडला होता… म्हणायचा, की तुझ्या साठी मी सगळं जग सोडून देईन, पण मेल्याने आपली बायको पण नाही सोडली. तो बसलाय मस्त पैकी मुला/मुलीच्या मधे, नातवंड खेळवत… नाहीतर मी… इथे .. एकटी .. त्याने केलेली बेवफाई आठवत….

दिवाळी पेक्षा मला होळी जास्त आवडते, कारण होळी म्हंटलं की माझं त्याच्या बरोबर शुट केलेलं गाणं सगळीकडे वाजत असतं. कदाचित ते गाणं माझ्या खऱ्या आयुष्याशी साधर्म्य साधणारं असेल म्हणून आवडत असावं….

माझं आयुष्यच अशा कॉंट्रोव्हर्सी मधेच गेलंय. काय करणार? माझ्या कांही समवयस्क नट्या आता पॉलिटिक्स मधे गेल्या आहेत. हे भारतीय पॉलिटिक्स पण मोठं मजेशीर आहे. एक नटी जिने कमीतकमी ५ दा तरी आत्महत्येचा प्रयत्न केलाय ती पण निवडुन देऊ शकतात? कसं काय बुवा?? हं….सहज शक्य आहे.. आठवा.. गोविंद.. गोविंद…..!!!

मी इतकी ’खुबसुरत’ पण एकटी… आजही…….समोरचा समुद्र, खारा वारा, दुरवर दिसणारं क्षितीज.. जमीनीशी भेटणारं.. दुर कुठे तरी, मी पण वेड्यासारखी धावत होती क्षितिजाला भेटायला…………. मी माझं आयुष्य घालवलं मृगजळामागे धावणाऱ्या हरणाप्रमाणे….
—————————————————————————————————————————————–

’त्या’च्या घरची ’ती’

तो आपला विग लाउन टिव्ही समोर बसला होता. टिव्ही वर त्याचाच एक सिनेमा सुरु होता. नटी नेमकी मेली ’ती’च होती. तिला पडद्यावर जरी पाहिलं तरीही मस्तकात तिडीक उठते…

एका इंटेलेक्चुअल  सुसंस्कृत बापाचा मुलगा म्हणून जेंव्हा तो भेटला तेंव्हा त्याच्या  त्याने यशस्वी अभिनेता म्हणून नाव कमावलं  नव्हतं तरी पण   त्याच्या प्रेमात पडले. माझ्या मागे तेव्हाचे बरेचसे यशस्वी कलाकार लागले होते लग्न करायला पण या   अयशस्वी अभिनेत्त्यांच्या यादीमधे असलेल्यावर माझं मन जडलं होतं आणि म्हणूनच मी सगळ्यांना नकार दिला….तेंव्हा  मी मात्र होते एक यशस्वी हिट चित्रपट देणारी अभिनेत्री! हे लिहिण्याचं कारण एवढंच की मी त्याच्या साठी किती त्याग   केला म्हणून सांगणं नाही.. तर आमचं एकमेकांवर खरं प्रेम होतं हे सांगायला लिहिलं सगळं..

एका सुसंस्कारित आणि कवी लेखकाच्या कुटूंबातून आलेला तो ,एके काळचा आपल्या व्हॅल्युज ला पैशापेक्षा जास्त महत्त्व देणारा तो, सिनेमाच्या सेट वर झालेल्या अपघातानंतर मृत्यू- उशी झुंज देणारा तो – आणि …देश भर त्याच्या लवकर बऱ्या होण्याची प्रार्थना करणारे सर्वधर्मीय लोकं… डोळे उगिच भरुन आलेताणि तिचे …. नंतर जेंव्हा आपणच काढलेली एंटरटेनमेंट कंपनी गाळात गेली तेंव्हा नैराश्यात बुडालेला ’तो’, इलेक्षन मधे उभा राहुन निवडुन आलेला तो, नंतर थोडा प्रॉब्लेम आल्याबरोबर घाबरुन गेलेला तो, आयुष्यभराची पुंजी ला्वून सुरु केलेली कंपनी गाळात गेली तेंव्हा एखाद्या मॅनेजरने कारकुनाचे काम करावे, तसे टिव्ही वर काम करुन पैसे कमावणारा तो…..प्रत्येक वेळी त्याच्या शेजारी मी उभी होते.. खंबीर पणे..जुहू पासून सिध्दीविनायकाच्या मंदीरा पर्यंत त्याच्या वेल बिइंगची प्रार्थना करित अनवाणी चालत जाणारी… किती तरी गोष्टी आठवल्या एकदम.

सर्र्रकन डोळ्यापुढे चेस बोरड नजरेसमोरुन सरकला.हो आयुष्याचा चेस बोर्डंच.. सारीपाट जुना झालाय. माझ्या आयुष्यात आलेले प्रत्येक पात्र म्हणजे चेस बोर्डवरच्या सोंगटी सारखे होते. मी एकटी वजीर.. राजाला सांभाळणारी. कोणी राजाला चेक देउन चेक मेट करु नये म्हणून डोळ्यात तेल घालुन जपणारी.म्हणूनच म्हणते माझं आयुष्य म्हणजे चेस चा खेळच आहे. हा राजा कधीही एक घर चालतो पण कुठल्या दिशेला ते सांगता येत नाही.

त्याच्या आयुष्याच्या चेस बोर्ड वर तिला दुसरी “ती” ने पण आपलं स्थान पटकावलं होतं. कायम घोड्यासारखी अडीच घरं व्यापून चालणारी. प्रत्येक वेळेस घोडा जसं आठ घरं ब्लॉक करतो तशीच हिची पण मेंटॅलिटी. सुरुवातीला जेंव्हा तिच्याबद्दल कळलं , तेंव्हा खोटंच वाटलं. पण नंतर लक्षात आलं की ती गोष्ट अगदीच खोटी नसावी. खेळतांना झालेल्या एका चुकीमुळे राजा चेस बोर्डच्या मध्य भागी आला होता , तेंव्हाच तिने घोड्याच्या चालीने आठ घरं व्यापून चेक दिला होता.मला मात्र काय करावं हेच समजत नव्हतं. सगळीकडे तिच चर्चा होती, पेपर मधे पण तेच छापून यायचं.

मी स्वतः तर त्याच्या साठी ’अभिमान’ नको म्हणून काम करणं बंद केलं होतं. माझं आयुष्य त्याच्याच करिअरशी निगडीत करुन ठेवलं होतं. प्रत्येक ठिकाणी मीच माघार घेतली होती .पण इतकं सगळं करुन ’ती’ने कावा साधलाच.शेवटी ह्या सगळ्यातून बाहेर कसं यायचं?? मी एक प्यादं (   आमची मुलं) पुढे सरकवली.. आणि याच चालीमुळे चेक मेट वाचला आणि घोड्याला मागे फिरावं लागलं होतं.

———————————————————————————————————————————————————-

परवाच्याच फिल्म फेअर अवॉर्ड मधे दिसली होती ती. तशीच सुंदर.. आणि तिच्या कडे तिरक्या नजरेने पाहिले.. ती रंगवलेला चेहेरा घेउन खोटं हसु चेहेऱ्यावर वागवत कांजिवरम सिल्क च्या साडीच्य़ा पदराशी चाळा करित बसली होती…. स्टेजवरच्या शुन्यात नजर लाउन.. इतक्या सगळ्यांच्या मधे असूनही एकटी……..

कधी तिच्या कडे तर कधी आपल्या फिगरकडे नजर जात होती, छे:.. कसली कम्पॅरिझन होऊच शकत नाही. कुठे ती अन कुठे मी!!पण लक्षात आलं, की जरी ती माझ्यापेक्षा सुंदर असली तरीही जिंकले ’मी’, कारण माझ्या शेजारी ’तो’ होता , फक्त माझाच.. आणि अधिकाराने त्याच्या दंडात  बोटं घट्टं रुतवले..आणि त्याच्या खांद्यावर तृप्तपणे डोकं टेकवलं..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक. Bookmark the permalink.

13 Responses to कन्फेशन….. (अनटोल्ड )

 1. ravindra says:

  छान!!!!!!
  दीपावलीच्या आपणास, आपल्या घरच्या मंडळींना व आप्तेष्टांना हार्दिक शुभेच्छा!!!

 2. आनंद says:

  सुरेख! खरोखरीच ते लोक same to same विचार करत असतील का ?

  दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

  • घरोघरी मातीच्या चुली.. आमचं एकदा आय आय एम मधे ट्रेनिंग सुरु होतं, तेंव्हा फॅकल्टीने छान सांगितलं होतं, एखाद्याचा सोशल स्टेटस मुळे तुम्ही प्रभावित होऊन जाउ नका. जस्ट इमॅजिन दॅट “पर्सन” सिटिंग ऑन कमोड इन द मॉर्निंग.. आणि खरंच सांगतो, एकदा असा विचार केला की तो माणुस अगदी आपल्या पातळीला येउन पोहोचतो..
   काय वेगळा विचार करणार आहेत ते?? मला तरी काही वेगळं विचार करित असतिल असं वाटत नाही.. 🙂

 3. bhaanasa says:

  ह्म्म्म्म……. माणूस शेवटी त्याच्या मनात एकटाच असतो. लौकीकात कोण जिंकले कोण हरले हाच हिशेब मांडत आयुष्य संपतात. एकदा का सारीपाटावर व्यक्ती आली की तिला प्याद्याने मारा वा वजिराने तीचा ठसा कायमचा शिल्लक राहतोच. महेंद्र, आजकाल तुझा सिलसिला मस्त सुरु आहे रे.:)

  • अग, हा एक नविन प्रकार ट्राय केलाय.. उगिच एखाद्याच्या मनात शिरायचं आणि त्याला काय वाटतं असेल ते लिहायचं . परवा एक रिपिट फिल्म फेअर अवॉर्ड चा कार्यक्रम सुरु होता टिव्ही वर त्या ठिकाणी तिची देहबोली पाहुन हे सुचलं.

 4. Rajeev says:

  एक होता नट, एक होती नटी,
  अभीनय होता छान, नाती होती खोटी……
  लोकां साठी होते त्यांचे प्रेम,
  उल्लु बनवायचा त्यांचा गेम……………….
  भीकार, रद्दी पीक्चर चालवायचा आटा पीटा,
  मूर्ख लोकांच्या पळवायच्या नोटा………….
  गद्दे पंचवीशीची सारी मुले ,
  कुठल्याही गाण्यावर त्यांची मान डोले….
  त्याच्या मधे दीसे नवरा, तीच्या मधे बायको..
  सारी पीढी त्यांच्या जोडी साठी सायको.. ….
  तीची जोडी रोज वेगळी,
  त्याची आवड फ़ारच आगळी……………….
  त्याला कळले होते, जीवन म्हणजे सीनेमा नाही,
  तीला कश्याची परवा नाही……………………..
  त्यांची नाती का जुळली नाहीत..
  त्याचे कारण देवालाच माहीत……………………..

  का तू काढतो खपल्या ?
  तुझ्या दीवाळीच्या फ़तूकड्या संपल्या ?
  खड्यात गेली ती दोघी,
  घरात सूखात बस उगी.
  आपण कराव्या आपण चाकर्या..
  फ़ुकट का भाजायच्या लश्करच्या भाकर्या?

 5. महागाई वाढली आहे फार
  म्हणुन फटाक्याचा खर्च परवडेना आजकाल,
  म्हणुन मी हल्ली, असंच काहितरी लिहितो
  आणि नंतर होणारे आवाज,
  फटाकड्यांचे म्हणुन एंजॉय करतो.

 6. Rajeev says:

  अरे,
  अचानक लक्श्यात आलेकी..मद्र देशात हींदी भा्षा ( आणी माणसे )
  ह्यांना सक्त वीरोध होता..
  आता गणेशन आणी बच्चन ह्यात शेवटी “न” च आले !!!
  (एक दूजेके लीये !!!!!!!!!!!!!!!!)
  “जयां” नी “भाद्दूरी” बघीतली,
  त्यांच्या सोज्वळ पणावर “मयखान्या” ची ऊंची ही भाळली….

  • त्यांच्या सोज्वळ पणावर “मयखान्या” ची ऊंची ही भाळली….:
   अरे क्या बात है.. वाह.. तु कवीच व्हायचास,
   पण आर्किटेक्ट कसा झालास तेच कळत नाही.. 🙂

 7. Manmaujee says:

  माझ्याकडून ही पोस्ट मिस झाली होती. . .आजच वाचली. . खरच एकदम भन्नाट झाला आहे !!!

  एखाद्याचा सोशल स्टेटस मुळे तुम्ही प्रभावित होऊन जाउ नका. जस्ट इमॅजिन दॅट “पर्सन” सिटिंग ऑन कमोड इन द मॉर्निंग. . .very true!!!!

  • मनमौजी
   लहानसं वाक्यं कधी कधी मनामधे घर करुन बसतं.. तसंच हे एक वाक्य.. !!
   ते पण रोज काही २५पोळ्या खात नाहित,
   तुमच्या आमच्या प्रमाणेच ३-४ पोळ्या आणि वरण भात खातात..
   दे आर नॉट सुपर ह्युमन्स.. पण लोकं त्यांना उगिच घाबरतात..
   तुम्ही खाता तो गहु जर २० रुपये किलो असेल ,तर त्यांचा फारतर २५ च्याभावाचा असेल..
   बाकी काहिच फरक असु शकत नाही..:)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s