मुली कशा पटवाव्या…

मराठी मुलं किंवा मुली तसे जरा फास्टच असतात प्रेमात पडण्याच्या बाबतीत. तशीही प्रत्येकाचीच इच्छा असते  एकदा तरी प्रेमात पडावं. युजवली जवळपास ९० ट्क्के मुलं ही ’तुझं आहे तुज पाशी, परी तु जागा चुकलाशी’ या उक्ती प्रमाणे आपलं ’प्रेम’ कुठे आहे ते ओळखू शकत नाहीत,ते वेळेवर न ओळखल्या मुळे त्या प्रेमाचं कुठे तरी लग्नं ठरतं आणि मग हात चोळत बसावं लागतं.

प्रेम कोणावर करावं हा तर सगळ्यात मोठा कधीही न सुटणारा प्रश्न. सगळ्यात सोपं म्हणजे बालपणीची मैत्रीण.. ही म्हणजे अगदी सेफ असते. पण होतं काय, की ज्या मुलीला ( मुलींच्या बाबतीत मुलाला) लहान पणी शेंबुड पुसतांना आणि चड्डीची नाडी लोंबतांना पाहिलं असतं, मोठा झाल्यावर त्याची / किंवा तिची ती नाक पुसणारी प्रतिमा काही विसरली जात नाही, त्या मुळे सुरवंटाचं फुलपाखरु झालंय हीच गोष्ट दुर्लक्षिली जाते.. ही गोष्ट बहुतेक ९९ ट्क्के लोकांच्या   बाबतीत खरी असते, अगदी एक टक्का लोकंच या सुरवंटाचं फुलपाखरात झालेलं रुपांतर ओळखू शकतात, आणि खरं सांगतो, तेच लोकं खरे शहाणे असतात.

प्रत्येकच मुलगा कॉलेज मधे गेला, की हिंदी सिनेमातल्या हिरो प्रमाणे एखादी सुंदर मुलगी आपल्या प्रेमात पडणार असं त्याला वाटू लागतं. कधी बरोबर ट्रेक ला गेलो, किंवा कधी एकत्र सिनेमाला गेलो की स्वर्गाला हात पोहोचल्या सारखे वाटतात.

जाउ दे.. वर जे लिहिलंय ते माझे विचार आहेत.. पण …बाळ सामंतांची एक कथा वाचली होती.. की मुली कशा पटवाव्या म्हणून.  हा लेख म्हणजे प्रेम करणाऱ्यासाठी एक रेडी रेकनर होऊ शकतो , असं वाटलं म्हणून थोडक्यात इथे त्यातलेच मुद्दे घेउन लिहितोय.  आरडी मधे जशी कंडेन्स्ड कादंबरी असते तसं.

मागच्या वर्षी अवाज ने ५० वर्षं पुर्ण झाल्याबद्दल एक सिलेक्टिव्ह लेख असलेला अंक काढला होता . त्या मधे दरवर्षीचा उत्कृष्ट लेख  त्यात इन्क्लुड केला होता. त्या अंकामध्ये हा लेख वाचण्यात आला.१९६५ सालच्या आवाज मधे आली होतं हे छापून.मुळ लेख आहे १९६५ चा तेंव्हा कालानुरूप थोडे बदल केले आहेत लिहितांना.

आता यात दिलेल्या कलुप्त्या या फार जुन्या काळच्या आहेत.. तरी पण आजही त्या पर्फेक्ट ऍप्लिकेबल आहेत.यातल्या बऱ्याचशा युक्त्या या मराठी कथा कादंबऱ्यांमध्ये वापरलेल्या आहेत, त्या मुळे कदाचित तुम्हाला असंही वाटेल की हे काय… हे तर सगळं माहितीये आम्हाला….
१) बसमधे आपल्या शेजारी बसलेली आणि नेमकं तिकिट काढण्यासाठी तिच्याकडे सुटे पैसे नसणं, आणी तो खविस कंडक्टर सुटे पैसे द्या नाहितर खाली उतरा असं म्हणणार, तेवढ्यात तुम्ही जवळचे सुटे पैसे काढून देता आणि……पुढे तुमच्यावर अवलंबून कुठपर्यंत केस नेता ते.

२)ट्रेनमधे भरपूर मराठी वाचनीय साहित्य घेउन चला, नशिबाने समोर एखादी सुंदरी असली, तर ती नक्कीच तुम्हाला अहो, ते पुस्तक जरा देता का वाचायला म्हणून पुस्तक मागेल, आणि मग ओळख  …. वगैरे….

३) खूप लोकप्रिय सिनेमाची तिन तिकिटे काढावी. सिनेमा हाऊस फुल्ल जाणार आहे याची खात्री करुनच हे काम करा. सिनेमा सुरु व्हायची वेळ झाली की बाहेर कोणाची तरी वाट पहातोय असा आव आणा, आणि सारखं घड्य़ाळाकडे बघत रहा. हाउस फुल्ल चा बोर्ड लागला की दोन सुंदर तरुणी , ज्यांच्याकडे तिकिटं नाहीत अशांना हेरून त्यांना तिकिटं आहे त्याच किमतीत ऑफर करा.. आणि सांगा की आमचा मित्र यायचा होता पण आला नाही म्हणून….

आता इथे दोन तिकिटंएक्स्ट्रॉ कशाला??? तर याचं कारण म्हणजे  मुली एकट्या कधीच सिनेमाला जात नाही्त, एक तर बॉय फ्रेंड तरी असतो,  किंवा एखादी मैत्रीण तरी असतेच.तुम्ही मैत्रिणी बरोबर आलेल्या मुलीचा शोध घ्यायचाय हे ध्यानात ठेवा.. जर एकही मुलगी भेटली नाही , तर तीच तिकिटे.. मी ब्लॅक मधे घेतली आहेत असं म्हणून चढ्या किमतीत कुणाही माणसाला विकून टाका.

४)टॅक्सी साठी उभे आहात, आणि बऱ्याच वेळानंतर टॅक्सी आली की टॅक्सि हायर करुन तिला लिफ्ट ऑफर करा..

५)मुंबईला मरिन लाइन्स वर फिरत असतांना एकदम जोरात पाउस येतो, आणि नेमकी तुमच्या समोर एक सुंदर ललना तयार होऊन कुठे तरी जात असते, जवळपास कुठेच आडोसा नाही, तेंव्हा प्रवास करतांना नेहेमी मोठ्ठी छत्री घेउन चला  काय सांगावं कधी उपयोगी पडेल ते??…..

६) एखादी आपल्या घराच्या आसपास रहाणारी सुंदरी हेरुन ठेवा. तिची रोजची प्रवास करण्याची गाडी हेरुन ठेवा, आणि तुम्ही पण शक्यतो त्याच गाडीने प्रवास करा. एकदा तुम्ही स्टेशनवर उतरलात की शेअर रिक्शा वगैरे साठी ऑफर करु शकता. तिच्या येण्याच्या वेळाचे पण पालन करा. म्हणजे पुढे जमण्याची शक्यता जास्त असेल.

७)मुलींमधले धार्मिक प्रवृत्ती फार वाढीस लागलेली आहे , त्यामुळे सिध्दिविनायक, साईबाबा इत्यादी चलतीच्या देवांच्या मंदिरात जाणं सुरु करा. चेहेऱ्यावर शक्य तेवढे बावळट भाव ठेऊन हातात, फुलांची परडी घेउन रांगेत अशा तर्हेने उभं रहा, की तिच्या नजरेस तुम्ही पडाल.एकदा तिचा विश्वास बसला की तुम्ही इतरांसारखे नाही, तेंव्हा हळूच ओळख वाढवायला हरकत नाही. अरे वा…. तुम्ही पण येता का सिध्दी विनायकाला?? जागृत देवस्थान बरं कां.. असं म्हणत मंदिराच्या कळसालाच बघून हात जोडा आणि पुढे तुमच्याच हातात आहे सगळं….

८)गणपती विसर्जन ,दहीहंडी अशा इव्हेंट्स कधीच चुकवू नका.अशा प्रसंगी मुलींना बाहेर फिरायला खूप आवडतं.

९) टिपीकल मराठमोळ्या मुली या नाटकालाच भेटतातच, इथे पण तशीच दोन तिकिटं एक्स्टॉची आयडिया उपयोगी पडु शकते.

१०)दुचाकी वर लिफ्ट द्या. शक्य होईल तेंव्हा मी तिकडेच जातोय, चला तुम्हाला सोडून देतो, असं म्हणून लिफ्ट द्यावी. हल्ली चेहेरा ओढणीने  झाकून प्रवास करण्याची पद्धत आहे, म्हणजे कोणी ओळखेल याची भिती नसते.

मुलींचे प्रकार  किती तरी   असतात . प्रत्येक प्रकारच्या मुलींशी मैत्री करण्याचे हातखंडे पण वेगवेगळे असतात.

१)स्कॉलर मुली, ज्या केवळ वाचन, अभ्यास यामधेच इंटरेस्ट घेतात त्या.तुम्ही पण शुन्य नंबराचा चष्मा लावून अभ्यासु आहात असा आव आणला, आणि तिला मला ते मेकॅनिक्स फारच जड जातंय हो, किंवा मला सी प्लस जरा समजत नाही, कारण माझं १२वीला व्होकेशनल नव्हतं म्हणून.. वगैरे म्हणावं आणि मदत मागावी.

२)वांड्गमय प्रेमी , अशा मुलींना पुलं , वपु, अशा लेखकांच्या फॅन असतात.यांना गटवायच असेल, तर तुमचं पण त्या विषयातलं ज्ञान भरपूर असायला हवं, जर तुम्हाला पण अशा लेखकांच्या किमान काही पुस्तकांची नावं माहिती असतील तर या प्रकारातल्या मुलींशी गप्पा मारता येतात, आणि तद्नंतर प्रेम पण करता येउ शकतं.

तुम्हाला त्या लेखकांची काही पुस्तकं तरी वाचावीच लागतील, म्हणजे कधीही डिस्कशनचा मुद्दा निघाला की तुम्हाला पण थोडं बोलता येईल त्या विषयावर. आता या मुलींना कसं ….?? तर अगदी सोप्पं आहे,तुम्ही उपरोक्त लेखकाचं एखादं पुस्तक स्वखर्चाने विकत घ्या, आणि नंतर त्याच्या पहिल्या पानावर.. स्नेही.. श्री.. तुमचं नांव.. यांना सप्रेम भेट असं लिहुन खाली त्या लेखकाची सही करा.. ते पुस्तक तिला भेट द्या.. आणि सांगा की हे लेखक माझे चांगले परिचित आहेत.त्यांनी स्वतः भेट दिलेलं हे पुस्तक तिला भेट द्याल, तर तिचा तुमच्यावरचा विश्वास, अन प्रेम नक्कीच सुयोग्य दिशेने वाढू लागेल… . आणि नंतर…….नंतर काय ते सगळं कांही तुमच्याच हातात आहे.

३) कलावंत:- या प्रकारातली जर तुम्हाला आवडणारी मुलगी असेल तर तुम्हाला, कलाकार, नेपथ्यकार, वगैरे प्रकारात प्राविण्य मिळवावे लागेल.एखादा लहानसा रोल पण त्या नाटकातला पदरी पाडुन घेता आला तर ते पण करावं , म्हणजे तालमीच्या वेळेस ऑफिशिअली तिथे जाता येईल.

जर हे शक्य नसेल तर कमीत कमी तुम्हाला एखाद्या नाट्य मंडळाचा सभासद होऊन तिथे तालीमीच्या वेळेस जाणं येणं सुरु ठेवावं लागेल. रात्री उशीर झाला ( तालिमीला) की मी सोडतो ना घरी.. माझ्या बाईक वर … असं म्हणून लिफ्ट देणं.. वगैरे वगैरे.. बरेच प्रकार आहेत. सुज्ञास जास्त सांगणे न लगे..

४)खेळाडु:- तुम्ही शंभर पाऊंड वजनाचे किंवा लेंग्याची नाडी न सांभाळता येणारे असाल तर कठिण आहे. ट्रेकिंग , वगैरे प्रकारात इंटरेस्ट असणं आवश्यक आहे . ट्रेक ला गेल्यावर आपण कचरा वगैरे कसा आपल्या बॅगेत भरुन खाली आणतो, आणि मग ड्स्ट बिन मधे फेकतो आणी निसर्ग वाचवण्यास हात भार लावतो हे रंगवून सांगा. आणि लिंगाणा सर केला होता ना…. तेंव्हा अशी सुरुवात करा…. म्हणजे ह्या प्रकारच्या मुली लवकर मैत्री करतील.

५)चित्रपट प्रेमी:- अशा प्रकारच्या मुलींची अजिबात कमतरता नसते. विद्वान ब्राह्मणा प्रमाणे, कुठल्या चित्रपटात कोणी काम केलं कोणाचं संगीत आहे, हिरोच्या लहान भावाचं नाव, किंवा होरोइनच्या बहिणीचा वाढदिवस वगैरे माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. चित्रपटातल्या हिरो , हिरोइन्स ची नावं अगदी संध्येतल्या चोविस नावाप्रमाणे पाठ असायला हवित.

केंव्हाही कधीही सिनेमा पहाण्याची तयारी आणि एक्स्ट्रा तिकिट यांचा खर्च करण्याची तयारी ठेवावी लागेल. एखादा खूप गाजलेला सिनेमा जेंव्हा रिलिझ होतो तेंव्हा दोन तिकिटं रांगेत उभं राहुन ऍडव्हान्स बुक करुन ठेवावी.. आणि तिला पण चलतेस का म्हणून विचारलं, तर ती १०१ टक्के हो म्हणणार याची खात्री देतो मी. अशा तर्हेने ओळख वाढवा…!

६)वर्गभगिनी:- हिच्या कडे वर्गातल्या बऱ्याच बांधवांचं लक्षं असतं. तेंव्हा तुमचा नंबर इथे लागण जरा कठिणच , पण काही झालं तरीही प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे.. असंही  होऊ शकतं म्हणून प्रयत्न सोडु नये.

७)शेजारीण: – शेजाऱ्यावर प्रम करा हा येशु चा संदेश आहे हे खरं, पण शेजारच्य सुमीची आई पण डोळ्यात तेल घालुन तिच्यावर नजर ठेऊन आहे हे विसरू नका.तसेच इतर शेजारी पण तुमच्यावर नव्हे तर तिच्यावर कायम नजर ठेउन असतात, तेंव्हा तुमची प्रत्येक स्टेप ही कमित कमी दहा लोकं पहाणार आहेत हे लक्षात घेउनच स्टेप्स घ्या.तुम्ही काळजी पूर्वक पणे या प्रश्नाचा ध्यास घेतलात तर हा प्रश्न सुटू शकतो अगदी चुटकी सरशी…

८)कचेरीतली सहकारी:-यावर काही लिहायची गरज आहे असं वाटत नाही.आपण सगळे जाणकार आहातच ,काय?? बरोबर नां?

९) मित्र भगिनी:- हे फारच अवघड  नातं असतं.जर तुम्हाला सुंदर बहीण असेल , तर इतर मुलं तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला सिनेमाचे पास, नाटकाचे पास, वगैरे देतील, तुमच्या घरी येण्यासाठी काहीही करायला तयार असतील. हा प्रकार जरा डेंजरसच असतो. तेंव्हा सांभाळुन..

ओळख कशी वाढवावी??   आजकालच्या तरुणांना याची काहीच गरज नसावी.तरी पण, एकदा ओळख झाली की मग.. थापा मारणे सुरु करणे अतिशय आवश्यक आहे. माझं तुझ्यावर प्राणा पलिकडे प्रेम आहे, लाडके, तु माझी झाली नाहिस तर जीव देईन, चल आपण पळून जाउन लग्न करु, इत्यादी प्रकारचे डायलॉग्ज वेळोवेळी ्बोलत रहाणं प्रेम बहरण्यासाठी अतिशय आवश्यक आहे

भेटण्याच्या जागा? चला प्रेम तर जमलं.. आता भेटायला जागा कुठल्या? या मधे ्खूप जागा असु शकतात. पण ज्या सर्व मान्य जागा आहेत, त्या म्हणजे बागा, आर्ट गॅलरीज, चाळीतली गॅलरी, बस स्टॉप , र्लोकलचा प्लॅटफॉर्म, चाळीचा जीना, बॉक्स.. ( हल्ली हा नसतो, पण पुर्वी बॉक्स हा पण एक क्लास होता सिनेमा चा जिथे केवळ दोघांची बसण्याची सोय असायची) समुद्राचा किनारा, आरे कॉलनी चा छोटा काश्मिर अशा अनेक जागा जाणकार लोकं सांगु शकतील.

मी स्वतःचा अनुभव सांगतो, नागपुरमधला असा एकही बगिचा नाही की जिथुन आम्हाला हाकललेलं नाही.. !!! असो!!! वरचा लेख  तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा आहे.

तर मंडळी आता कामाला लागा लवकर.. !!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in विनोदी. Bookmark the permalink.

120 Responses to मुली कशा पटवाव्या…

 1. Avani says:

  महेंद्रजी,
  मस्त लिहिलं आहे. It can be used as good guide lines.

  अनिकेत वैद्य.

  • १९६५ साली लिहिलेलं पण आजही ऍप्लिकेबल होतंय..
   काहिही चेंजेस झालेले नाहित इतक्या वर्षात.. मजा आहे…

  • आनिकेत
   हा लेख ओरिजिनल वाचतांना तर हसुन हसुन पुरेवाट होते.
   खुपच मस्त आहे..इथे तर कंडेन्स्ड स्वरुपात आहे ,
   थोडा फार आजच्या परिस्थितिप्रमाणे बदल करुन..

 2. आनंद says:

  सर्व कॉलेज मध्ये ‘wallpaper’ म्हणून हा लेख माहितीपर विभागात लावला पाहिजे… खूप मदत होईल…. 🙂

  • आनंद
   आजकालच्या मुलांना खरंच गरज आहे कां याची?? मला तरी वाटत नाही.
   सगळे कसे अगदी आधिपासुनच या क्षेत्रात प्राविण्य मिळवुन आहेत. 🙂

 3. anuja269 says:

  महेंद्र भाऊजी,
  जमाना मुलींचा झाला आहे,माझा एकुलता एक लेक वाचवायचा कसा याचा विचार मी करते.खालील आकडेवारी पहा १) रोजचे किमान ४० तरी समस त्यातील ३० मुलींचे
  २) फेस बुक वर ८५ जण त्यातील ६० मुली
  ३) ओर्कुट अजून माझी परवानगी नाही म्हणून शांतता
  व्यवस्थित अभ्यास करून ह्या मेरीट ला येतात,मुलगे खुळ्यासारखे वागतात.हि आकडेवारी समस्त मुलगे पालकांनी दुजोरा दिलेली आहे.मी हि त्यातलीच,इयत्ता ५ वी पासून मुली मोठ्या होतात,शाळेतले मुख्याधापक ते निदान दहा शिक्षक फेस बुक वर खाते उघडून आहेत,हे हि काम करावे लागते कारण लक्ष ठेण्यासाठी.
  आता मुलांचे कसे होणार ?कारण ह्या कन्या.माझ्या ओळखीच्या एका वडिलांनी मुलाचा मोबाईल स्वताकडे ठेवला,ते म्हणाले अग् मी त्याचे वडील बोलतोय,त्यावर ती म्हणाली काही हरकत नाही,आपण बोलू !!!आता बोला !

  • अनुजा
   मी तर माझ्या मुलिंना १२वी पास होई पर्यंत इंटरनेटवर इव्हन इ मेल अकाउंटही उघडु दिला नाही. म्हंटलं, मित्र मैत्रिणिंसाठी १२वी नंतर अकाउंट ओपन करा. तो पर्यंत अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल असं एकही काम करायचं नाही.

   अगदी साधी गोष्ट आहे, मुलिंना नेहेमी म्हणत असतो, आता दोन वर्ष अभ्यासात लक्षं द्याल तर बरंय, नाही तर आता जर मजा मस्ती करायला लागलात तर पुढे मात्र फालतु कोर्सला ऍडमिशन घ्यावी लागेल, आणि मग आयुष्यभर काबाड कष्ट करावे लागतिल.. चॉइस तुमचा आहे काय करायचं ते तुम्हिच ठरवा..

   आणि मुलिंनी ऐकलं .. फक्त अभ्यास एके अभ्यास इतकाच इंट्रेस्ट होता १२वी पर्यंत.. नंतर मुलगी १२वी पास झाली, इंजिनिअरिंगला गेली, आणि तिला इ मेल , ऑर्कुट वगैरे अकाउंट ओपन करण्याची परवानगी दिली.. सोबतच, माझा चार पाच वर्षापासुनचा ऑर्कुट अकाउंट पण डिलिट करुन टाकला. असो..
   काही हरकत नाही, दिवस बदलताहेत.. तेंव्हा आपणच जुळवुन घ्यायचं झालं.. !!

  • ni3more says:

   hahahahhahaha anju tumachi comment watchun khup hasu aaale mala as specially ti shevatachi line hahahahhahaha

 4. Rohini says:

  छानच विषय घेतला… आता एकदा मुलगे कसे पटवायचे ह्यावरही होऊन जाऊदे… म्हणजे समस्त सुयोग्य आणि उपवर वाचक कन्यकांना त्याचा उपयोग होईल. 🙂

  • रोहिणी
   बाळ सामंतांनी ते लिहिलं नाही नां.
   आता बहुतेक मलाच लिहावे लागेल.
   त्यांनी अपुर्ण ठेवलेलं काम मलाच पुर्ण करावं लागेल.

   • Nilesh says:

    mi jicha premat padlo .mala ji maza jiva peksha jast awadte tiche pan naw rohini ahe i love my Rohini

    not you rohini.

  • amit says:

   😁😁😂 mulina tyachi vishes garaj nahi ahe.

 5. abhijit says:

  रोहीणी जी अहो मुलिंना कधी गरज लागते का? मुलं एका पायावर रेडी असतात प्रेमात पडायला. हं पण प्रत्येकाने अंथरुण पाहून पाय पसरावे म्हणजे झाले.
  महेंद्र एकदम उत्कृष्ट लेख. वाह. मजा आली.

 6. Manmaujee says:

  एकदम भन्नाट आहे लेख!!!

  चला सुरूवात केली पाहिजे आता!!! 🙂

 7. anuja says:

  भाऊजी,
  अगदी खरय तुमच म्हणण,ह्या जमान्यात सुद्धा आपले संस्कार आपली मुले काटेकोर पणे अमलात आणतात.आपलाच आदर्श मुले निरीक्षण करतात,त्यामुळे संस्कार म्हत्वाचे आहेत.अजिंक्य, आम्हा आई- वडिलांना त्याचे बेस्ट मित्र आहेत असे कौतुकानी सांगतो, तेन्व्हा खरच समाधान मिळते कि योग्य संस्कार खूप म्हत्वाचे आहेत.
  लेख मस्तच झालाय नेहमीप्रमाणे,मजा आली,काळाचे भान पण चपखलपणे सांगितले आपण.

  • विश्वास.. हा सगळ्यात महत्वाचा. माझा अनुभव आहे, घरी इंटर्नेट असतांना पण कधिही मुलिंनी नेट सुरु केलं नाही, मी समोर असल्याशिवाय. मन डायव्हर्ट करणारी कुठलिही गोष्टं, मग भलेही ती खुप चांगली जरी असली तरीही ती ओपन कॅटॅगरी वाल्यांच्या दृष्टीने टाळणेच महत्वाचं ठरतं. थोडं लक्षं विचलित झालं, की लगेच मार्कांवर परीणाम होतो.नंतर चांगल्या कॉलेजेस मधे ऍडमिशन मिळणं कठिण होतं, म्हणुन पहिली प्रायोरिटी ही शिक्षणालाच दिलेली कधिही चांगली. अर्थात, ही मतं व्यक्ती परत्वे बदलू पण शकतात…. !!

 8. bhaanasa says:

  हा…हा…महेंद्र मस्त झालेय रे पटवापटवीचे धडे. ह्म्म्म्म…हातखंडे जुनेच असले तरी त्यातले काही अजूनही चालत असावेत.[:)] ए पण तू काही म्हण हां, मस्त दिवस असतात नाही ते….एकदम भावूक-पोटात फुलपाखरे, काळजात हुरहुर….वाट पाहणे आणि पाहायला लावणे…..

  • श्री
   गेले ते दिवस… 😦
   पण आठवणी आहेत नां त्या.. त्यांच्यावरच आता पुढचं आयुष्य काढायचं 🙂
   तुला खरंच सांगतो, अगं असा एकही बगिचा नव्हता नागपुरमधला की जिथल्या वॉचमनने आम्हाला हाकललं नाही असा.. पण तरिही आम्ही आलटुन पालटुन सगळे बगिचे पालथे घालायचो..मजा यायची.. 🙂

   आणि ते एक्स्ट्रॉ तिकिटांचं तर मी बरेचदा केलंय.. हा प्रकार त्या ओरिजिनल लेखात नव्हता. ती माझी ऍडिशन आहे.. 🙂 अनुभवावर पारखुन लिहिलेली.. अरे काय करणार?? मला सिनेमा पहातांना सुंदर मुलिंची कंपनी आवडायची… :)म्हणुन असं करावं लागायचं पुण्याला असतांना..

 9. ajayshripad says:

  आहो दादा आता काय करावं, मुली बघायला जावं लागतय आम्हाला….! हे काय आमच्या कामाचं नाय…! 🙂

  • अजय
   प्रयत्नांती परमेश्वर.. जमेल हो.. प्रयत्न करा. आणि माझ्या लेखामधले पहिले दोन पॅरिग्राफ्स पुन्हा एकदा वाचा..

 10. महेंद्रजी ,
  अहो मुली पटतात!!!!!!!! पण त्यापैकी लग्नाला योग्य मुलगी कशी ओळ्खायची?

  हीच गरज आहे आत्ता !! कारण एवढ्या सगळ्या सुंदर मुलींमधून एक मुलगी शोधणे खुप अवघड असते!!

 11. ajayshripad says:

  हा बरोबर.. आत्ताच लागतो शोधकार्यास…! देव करो लवकर भेटली तर बर होईल 🙂

 12. ajin115 says:

  हा तर ईयत्ता आठवीतला धडा पाहिजे म्हणजे ग्राजुएट होईपर्यत प्रत्येक मुलाचे एकदातरी भले होईल.

 13. mugdha says:

  मस्तं झालाय लेख! मज्जा आली…

 14. Sagar says:

  Chan aahe lekh…..Pan mi already premat padloy ….:)

  • प्रेमात पडलात? आता शेवटचं वाक्य पुन्हा वाचा आणि …. सगळे बाग बगीचे शोधुन काढा.. 🙂 आणि आमचा रेकॉर्ड मोडुन दाखवा.

 15. Kiran Aher says:

  LOL … Really funny and true 😛
  If I had read this before then for sure she was mine 😦

 16. sachin says:

  best katha ahe kon jar mazyavar prem karnar asel tar mazya imelvar sampark kara

 17. Smita says:

  Kaka, Mastach. Premat padavas vatanarya sarvanna hya guidelines lagu. hallichi pidhi jara jast agau ahe. tyana barobar mahit aste mulina gatavane ha prakar. vegalya prakare ,va muddesudh lekh ahe. Jyana pori patavata yet nahit tyna hi post jarrur vachayla sangayla havi.

 18. Jayshree says:

  HI …..

  गमतीशीर अणि रियल आहे पोस्ट …. छान वाटल वाचून 🙂

 19. Jayshree says:

  🙂

  धन्यवाद !

 20. dhanraj says:

  kuni sangave mala prem mhanaje kaay?

 21. अमृत says:

  CALL ME NOW 9767423110

 22. ameya ajit patil says:

  महेंद्रजी अतिशय मौलिक माहिती दिलीत.
  सध्या इंटरनेट चा जमाना असल्यामुळे नेट थ्रू मुली कशा पटवाव्यात हेही वाचायला आवडेल.
  “माकडाच्या गळ्यात चंद्रहार”असही आमचे एक निरिक्षण आहे.त्यामुळे आमच्यासारख्यांची गोची होते हो.

 23. vaibhav says:

  Lekh Chaan Ahe Ani Mahtvache Mhanje Mala Madat Hoel Ase Vatate Ahe…..Baki Baghu Kay Hoel Te…….?

 24. sushil says:

  mala avdala far ha lekha mala ata yacha upayog karavsa vatato.

 25. तुमचा लेख खुप चान्ग्ला आहे. पन मी नेहमि मुलीच्य पासुन चार हाथ लाम्ब असतो.
  मि प्रतेक मुलीला बहीनी च्या नजरेने पाहतो.
  pathan.suleman786@gmail.com

 26. GURUNATH says:

  मी स्वतःचा अनुभव सांगतो, नागपुरमधला असा एकही बगिचा नाही की जिथुन आम्हाला हाकललेलं नाही

  mera shak sahi nikala, case solved!!!! situational temporal interlinking…. vatrat mulga, fashion, nagpur madhle bagiche!!!!!

  BTW ,Ngp la basnya sathiche best bagiche sanga!!!! 😀

 27. Gurunath says:

  Dangerous naka mhanu!!!, chikitsak mhana!!!!…..

  vayachya 7vya varshi pasun leather binding madhle original Sherlock Holmes vachale ki ase hote!!!!

  elementry, Dr.Watson……. Aaishapat!!!!, Tarun jhalo tari I prefer Sir Arthur Conan Doyle over Mills and boons!!!! 😀 😀

  • हा हा हा.. चिकित्सक काय आणि डेंजरस काय दोन्ही गोष्टींचा परीणाम एकच !
   शेरलॉक होम्स?? हम्म्म्म!! तरीच त्याचा इतका परीणाम झालाय .

 28. Gurunath says:

  Compliment:- Tumcha blog FB chya barobarine (kakanbhar saras mhna) ADDICTIVE aahe!!!!,

  • Thanks 🙂 सुरुवातीला मला पण काही खात्री नव्हती, पण नंतर हळू हळू लिहायला शिकलो.. 🙂 ऑर्कुट सोडल्याने जे काही चांगले झाले, त्यातली ही एक गोष्ट -म्हणजे माझे लिखाण सुरु झाले.

 29. santosh says:

  khub chhan mahiti thanks

 30. sandeep kalane says:

  gunvan kase hota eil yavar lekh liha.. faltu lekh tar faktt falatu lok lihatat, chagale bodh dusaryala dene hech chagale,tas tumache pan kahi chukale nahi ,karan pratikriya varun lkashat yete ki faltu lok bharpur ahet, by sandeep kalane9921424134

  • संदीप
   जीवनात बरेच रंग आहेत- प्रत्येकच गोष्टीकडे सिरियसली पाहीले तरजीवन नीरस होईल.. ब्लॉग वर लोकं येतात ते हलकं फुलकं वाचायला… लेक विनोदी लिहिलेला आहे- तेंव्हा त्याकडे विनोदाच्या दृष्टिने पाहणे जास्त योग्य ठरेल.
   एकांगी , किंवा एकाच विचाराने प्रभावित होऊन जगणे म्हणजे मानसिक रोगाचे लक्षण आहे, असे जॉर्ज बर्नाड शॉ ने म्हटले आहे.

 31. kishor says:

  Good one.

 32. NILESH says:

  INTERESTING TIPS

 33. best ahe mi vachalo mala phar avadala hallichi pori ata lay balatana disatahetaho pakt paisevalyan kadecha bagatat cangale man makale man asalelyan kade dunun sudda pahat nahi!

 34. आजकाल अशा टिप्सची कुणाला फार गरज भासत असेल असे वाटत नाही. आताची सातवी आठवीतली पोरही पटवा पटावी विषयी बोलत असतात. ( शाळा पहिलाच असेल. ) पण मस्तच आहे लेखन.

  • विजय,
   ब्लॉग वर स्वागत.. अहो हा एक विनोदी लेख आहे, विनोदी म्हणून वाचायचा आणि सोडून द्यायचा.

 35. prasad says:

  maza eka hatacha aani payacha problem aahe me software engineering chy 2nd year la aahe me kse ekhadya mulila patvu plase guide me

  • प्रसाद
   बरेच दिवस विचार करतोय काय उत्तर लिहावं याचा.. बऱ्याच गोष्टी आपोआप होत असतात, अशा मेकॅनिकली ठरवून होत नाहीत.. 🙂

 36. far far chan ahe ha lekh ,,pahilyanda vachla ahe mulkinna patvnyacha upay. parantu muli patavtana adiadchani yenar nahit na… thanks sangitlya baddal

 37. @ NITIN @ says:

  khup chhan vatala ha lekh, thod hasu hi aale ani lekha baddal khup reality vatali……kharch khup chhan…..

 38. Deepak Chalke says:

  khupch chan tips ahet…thank u so much sirji

 39. ajay dhote says:

  Yatale barech prayog aadhich karun baghitale , chagale tasech asech anubhaw aale ,Rahilele farmule karun baghto.

 40. Suhas Adhav says:

  tips tar ekdam filmy vat-tat …pan kharch aashane kahi hota ka …mala aasa mhanaychay ekdam anolkhi vyaktishi kasakay hya tips work hot aastil…..aaso jab lagun ekda suralit houde sagla mag baghu konti work hote 😛
  pan aata tari vidyarthi dashet ek goshta khari vate ti mhanje
  “pyar ka chakar bada bhayankar ,jai shiv shankar jai shiv shankar ” 😀

 41. sumit says:

  me diploma mechanical engineeringchy 2nd year la aahe. me kse ekhadya mulila patvu plase guide me.

 42. wa chan qweeytxjd fj efe efe elvh lkcv

 43. किशोर says:

  खरच छान वाटले

 44. amit patil says:

  very nice tips

  thanks

 45. ganesh says:

  lagn zalyawar pan ashach prakare muli patwaychya ka

 46. संदीप says:

  मुलगी पटवायला दम लागतो मित्रानो ! जो सगळ्या मुलांमध्ये नसतो. भित्रेपणा बाजूला सारून भिडस्त व्हावे लागते.
  मुलगी पटवणे सोपे असते मित्रांनो! प्रेम निभावणे अवघड असते !
  अजून बरेच काही आहे मित्रांनो , शब्दांत सांगणे अवघड आहे.

 47. shubhalaxmi says:

  kaka post chan ahe pn……… hmmmmm aaj kal muli ptvne konala sangav lagt nahi…. muli ptvayla sgle tyar pn prem krayla matr sgle plun jatat………
  ashi hi mul, dur rahilel br….. hahaha

 48. Dagadubhau says:

  NUMBER 1 HOT RAO.Changala time pass jhala.

 49. AMIT says:

  JUNE VICHAR SODA AATA ! NAVIN TECNOLOGINE PREM KRA. TRACH YASH MILEL.!!!!

 50. स.स. उल्हारे says:

  उत्कृष्ट लेख. वाह. मजा आली.

 51. स.स. उल्हारे says:

  आजकालच्या तरुणांना हा लेख म्हणजे जरा जास्तच वाटनारा आहे. ते हे करु शकनार नाही. तरुणांना आजकाल shortcut पाहिजे. आणि लवकर व्हायला पाहिजे.

 52. akshay says:

  mag vad pachchi…!

 53. आता मुलीनी मला पटवले पाहिजे ह्या साठी माझ्यात नक्की काय आणि कोणते बदल करू नि माझे व्यक्तिमत्त्व कसे घडवू इन शोर्ट वळू बनण्याच्या प्रोसेस वर पुढील लेख लिहा बर

 54. Malta mulgi pataachi aaha

 55. satish d rakshe says:

  लग्नआगोदार हे कधीच जमले नाही
  पण अत्ता असे वाटते एखादी मैत्रीण असावी…

 56. satish d rakshe says:

  लग्नआगोदार हे कधीच जमले नाही
  पण अत्ता असे वाटते एखादी मैत्रीण असावी…
  छान लिहिले आहे …..मस्त

 57. दता पोटळे says:

  लेडीज पटवणेचे टीप मराठी मध्ये

 58. दता पोटळै says:

  लेडीज कशी पटवण्या टिप

 59. गजानन says:

  aaho dada.
  khup chan lekh…ahe pan halli muli patatat pan khare prem kuthe disat nahi. halli prem manje sarv timepassch kartat.tyamule first love gayab hot challay. halli pratek mulinche satat bf badlat astat ashya muli pataun tari kay upayo. mazya mate tari sarv sarkhaych astat.

 60. DEVIDAS RAMBHAU RAKSHE says:

  Best mahendr bhau

 61. sandip patil says:

  Khup change vacuum bar vital.

 62. Kailas says:

  मला पण खूप आवडला हा लेख

 63. vishal Doiphode says:

  Nice guidance…

 64. anand says:

  Kay rav ;agodar bhetala nahi; attach porala shikavato attapasun .age 4 month

 65. pravin patole says:

  Lay bharee
  Mla khup aawdla

 66. Yogesh Kute says:

  लय भारी!!!

 67. prakash says:

  mast

 68. शैलेश शिंदे (ताहेरपूर) says:

  या मधे जे काही आहे ते माझ्या काहीच कामाचे नाही माझी प्रियसी माझ्या वर नाराज व मला सोडून गेली तिला परत कसे खूप खूष करू….ते सांगा

 69. Amit says:

  👌👌👌👌😘

 70. ashok says:

  ज्या क्षणी तुला वाटेल कि, हे नात तोडण्याची वेळ आली आहे …
  तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि,
  “हे नात एवढा काळ का जपलं …का जपलं…?”

 71. Rushi natkar says:

  He ata kahi upyogach nahi mulpan ata smart zalyat

 72. yuvi says:

  Muli samor jast style dakhu naka

 73. amol says:

  aj chan vatl ha lekh vachun pan mala ji avadti tila mi avto ka nahi hai mahit nahi me tichyvar 10 std pasun love karto ata me 12 std la ahe ani mi tila follow karun tichych class made science la addimission getl tari pan kay jamat nahi kay upay asal tar fb kiva gmail var patava nakki plz

 74. खुप छान लेख आहें!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s