लोकशाहीचं चांगभलं…

नुकतंच इलेक्शन आटोपलं. एखाद्या वेश्येने गरत्या बाईचं सोंग वटवाव तसे अनेक कॅंडीडॆट्स वागत होते. बरं, सगळ्या मतदारांना पण हे सगळं व्यवस्थित पणे माहिती असलं, तरीही ते अगदी भाविक पणे ऐकत होते त्यांची मुक्ताफळे.

प्रत्येक नेता निरनिराळे हातखंडे वापरत होता मतं मिळवण्यासाठी. एका गोष्टीची लालूच होती, की एकदा निवडुन आलो की मग काय, जितके खर्च केले, त्याच्या शंभर पट कमावता येतील. साईड बाय साईड समाज सेवाही होतेच आहे.पुर्व निर्वाचित कॅंडीडॆट्स आपण गेल्या पाच वर्षात कसे कामं केले हे रंगवून सांगत होते.

मतदानाच्या आधी ,पेपरला रोज रम्य आणि सुरस बातम्या येत होत्या. सकाळी पेपर उघडला की अरेबियन  नाइट्स प्रमाणे  रोज   ब्रेकिंग न्यूज असायची.. रोज नवीन  गोष्टी बाहेर येत होत्या.अर्थात,  त्या गोष्टींवर विश्वास ठेवावा की डिस्कार्ड कराव्या हे कन्फ्युजन होतंच. कधी काही कोटी रुपयांच्या नोटा एका कार मधे सापडल्याची बातमी असायची, तर  कधी एका कार मधे दारूच्या बाटल्यांच्या पेट्या सापडल्या अशिही बातमी असायची. त्याच बरोबर असंही वाचण्यात आलं की या पैशावर कॊणताच कॅंडीडेट आपला हक्क सांगत नाही. किती आश्चर्य आहे नं?? कोट्यावधी रुपये असे सोडून द्यायला तयार होते कॅंडीडेट.असंही वाचण्यात आलं की  काही ठिकाणी झोपडपट्टीमधे बऱ्याच झोपड्यांचे केबल टिव्ही चं क३-४ वर्षांचं बिल भरलं, तर कुठे  गरिबांना साड्या वाटल्या. ( या निमित्ताने का होईना , पण बराच काळा पैसा आला मार्केटमधे )

एक कॅंडीडॆट तर अंगठी बहाद्दर.. त्याने तर खिशामधे अंगठ्याच ठेवल्या होत्या, कोणी भेटला की सरळ त्याच्या बोटामधे अंगठीच सरकवायचा.

कांही ठिकाणी तर खोट्या नोटा पण वाटल्या गेल्या असंही समजलं. जर होतकरु लोकप्रतिनिधीच जर असं करु लागले तर या बाबतीत न बोललेलेच बरे.. यातल्या बऱ्याचशा गोष्टी ऐकीव आहेत..

ह्या तर आपल्या अगदी नेहेमीच्याच  चालणाऱ्या गोष्टी, असंच म्हणताय कां?? हं.. तसं असेल कदाचित . पण काही ठिकाणी अशा बातम्या कानावर पडल्या की त्यांचा उहापोह केल्याशिवाय रहावलं नाही म्हणून आजचा हा ब्लॉग .

काल एक मेल मिळाला, त्या मधे लिहिलं होतं की हिंदुओंको मिटाने के लिये,   ***** को व्होट दो. अशा प्रकारची पत्रकं काढून वाटण्यात आली होती एका मस्जिद मधे. बरं ही पत्रकं छापणारे कोण?? तर ऑल इंडीया मस्जिद कमिटी. आता मला हे कळत नाही की एखादा माणुस धर्माच्या नावावर, किंवा द्वेशाच्या राजनीती वर निवडणुक लढवतो, आणि त्यावर काहीही ऍक्शन घेतली जात नाही. इतक्या उघडपणे धमकीचे पत्रकं वाटले जातात… ! काल मी तो स्कॅन्ड फोटो नेट वर पण टाकला होता. पण नंतर काढून घेतला, कोणाला हवा असेल तर मला मेल करा, मी अवश्य पाठवीन.

असंही ऐकण्यात आलंय, की रावसाहेबांना मतं द्या म्हणून अमरावतीच्या मस्जिद मधे अनाउन्स करण्यासाठी म्हणे दिल्लीहून खास मोठे इमाम साहेब आले होते. राजनीती मधे धर्माचा रंग भरण्याचं काम जर हिंदुंनी केलं तर ते जातीयवादी ठरतात.

मस्जिदचा किंवा धर्मगुरुंचा इलेक्शन मधला रोल आता काही नवीन राहिलेला नाही.प्रत्येक इलेक्शनला फतवा काढला जायचा की कुणाला मतदान करायचं ते मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मतं केवळ एकाच गोष्टीवर एकत्र केली जाऊ शकतात, ती म्हणजे- इस्लाम खतरेमे है…. जेहाद!! आता निरक्षर वर्ग मोठा असल्यामुळे जास्त फावतं या धर्म गुरुंचं..

आपल्या शंकराचार्यांचं कोणी ऐकेल तरी कां? किंवा त्यांचं नाव तरी माहिती आहे कां कोणाला?? मला पण माहिती नाही………!!म्हणूनच हिंदु धर्म गुरुंचा इलेक्शन वर अजिबात होल्ड नसतो. आपला समाज हा सुशिक्षित असल्यामुळे आपण सहजपणे कोणाच्या आहारी जात नाही.हे पण एक कारण आहेच.. प्रत्येक गोष्टीला तर्काच्या कसोटीवर घासून पहातो आपण.

रमजान महिन्यात सगळे नेते इफ्तार पार्ट्या करतात -ते केवळ या लोकांशी संबंध कायम करायचे म्हणूनच….

जो पर्यंत त्या मुस्लिम बहूल भागातली मतगणना सुरु झालेली नव्हती तो पर्यंत सुनिल पुढे होता, पण त्या भागातली मतं मोजणी सुरु  झाली आणि रावसाहेबांनी एकदम मुसंडी मारली पुढे सुनिल देशमुखांसारखा खंदा नेता हरला जाउ शकतो, जातिय शक्तींच्या आधारे. मी सुनिल चा फॉलोअर नाही हे कृपया लक्षात घ्या.

रावसाहेबांची सिट खूपच महत्त्वाची होती कॉंग्रेसच्या दृष्टीने. त्यांना जिंकण्यासाठी सगळे प्रयत्न केले गेले. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं, की सोनिया गांधी या नागपुरला आल्या होत्या, पण त्यांनी अमरावतीला जाणं टाळलं. यातलं गौडबंगाल काही समजलं नाही.

जाउ द्या.. आता पर्यंत निकाल जाहीर झालेले आहेत, बघत रहायचं पुढे काय होतं ते..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

19 Responses to लोकशाहीचं चांगभलं…

 1. मी कोण? says:

  म्हणजे तिकडचे मुसलमान हिंदु धर्माचरण करू लागले म्हणा की. कारण असेच कहितरी मार्मिक लिखाण आचार्य अत्रे आणि बाळ ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी केले होते. वाचा आणि थंड घ्या वगैरे…
  जय हो!

  • बाबरी शहिद कर दी इन लोगोने.. आणि नेमका ६ डिसें.०८ ला मी भेंडी बझार ला गेलो होतो.तेंव्हा ते जळजळीत भाषण ऐकलं होतं मस्जिद मधलं. चक्क लाउडस्पिकरवर बोलत होते.त्या विषयावर नंतर टाकु या पोस्ट..

 2. raghu says:

  kaka, aata ya sagalya goshtiwar kay bolnar.. lokshahi mhanat sagal manya karayach.. aapalech dat ani aapalech oth.. ek jan kahi karu shakat nahi sagalyani prayatna kele pahijet. aso lekh chhan aahe.. please mala to scanned photo pathava.

  • रघु
   याच देशात जॉर्ज फर्नांडीस,मधु दंडवते, अटलबिहारी यांच्या सारखे नेते झाले आहेतच नां??
   पण आजच्या लॉट मधे असे किती नेते दिसतात??
   —शुन्य!!!!

 3. Pravin says:

  Exactly, now these people wont come to us till next election. Next 5 yrs they ll spend in collecting money that was spent for this election. BTW send that email to me, curious to read it.

  • लोकशाही सांभाळण्याची आपली लायकी नाही असं मला तरी वाटतं. हा पण एक धंदा करुन ठेवलाय या लोकांनी.

 4. सचिन says:

  लोकशाही ची घराणेशाही केलीये या लोका॑नी.

  केतकरांचा लेख खरच विचार करायला लावणारा आहे.

  लोकही आता पैसे दिले तरच मतदान करायला येतात.

  • लोकांनी जरा शहाणपणा दाखवायला हवा.
   इथे पैसे घ्यावे, दारुच्या बाटल्या पण घ्याव्या
   — पण मतं देतांना मात्र फक्त आपल्या आवडिच्या कॅंडीडॆटलाच द्यावं.
   पैशामुळे मतं विकली जाउ नये, तरच लोकशाही कायम राहु शकेल.

 5. Hya Rajkarnilokna koni sangel ka sateyet yenepesha desh mahatwacha ahe

  • देश महत्वाचा ?? कॊण म्हणतो असं??
   राजकारणात सत्ता हिच महत्वाची, असं प्रत्येक नेता म्हणतो.
   आजच्या अग्रलेखात बाळासाहेब म्हणतात की सत्ता मिळाली असती तर काही काम करत आलं असतं.
   काय बोलणार यावर?

 6. पणॅ या वेळी एक बरं झालं, पप्पू कलानी, अरूण गावळी, पुण्याचा तो मानकर का फानकर, सदा वणवणकर, पद्मसिंहाचा लेक, स्वरोपसिंह नाईक हे हरले. हितेंद्र ठाकूरची वसई मधून उभं रहाण्याची हिम्मतच झाली नाही. कणकवलीला नारायण राणेच्या उमेदवाराने माती खाल्ली. तेव्हा मतदार शहाणा होतोय, थोडी वाट बघायला हवी.

 7. संजिव सिध्दुल says:

  काका, काही दिवसांपासुन मी तुमचा ब्लॉग वाचतोय.
  छान लिहिता आपण. मुख्य म्हणजे विषय छान असतात.
  आपण उल्लेख केलेलं पत्रक कोणतं हे मला माहित नाहि. पण माझ्याकडे एका पत्रकाची स्कॅन्ड कॉपी आहे. लिंक देतो पहा.
  तुमच्याकडे असलेल्या पत्रकाची कॉपी मला मेल करा.
  लोकजागृती बद्दल धन्यवाद आणि पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!
  http://images.orkut.com/Main#AlbumZoom?uid=8311726876220109119&pid=1255428269215&aid=1255403060$pid=1255428269215

  • संजिव .
   माझ्याकडे असलेलं पत्रक इ मेल केलंय.
   पण तुम्ही दिलेलं पत्रक मला पहाता आलं नाही,
   कारण माझा ऑर्कुट अकाउंट नाही.

 8. संजिव सिध्दुल says:

  हा तोच फोटो आहे, जो मी माझ्या orkut वर टाकला आहे.
  हे पत्रक ऑल इंडीया मस्जिद कमिटीने काढलयं ह्यात काही विशेष नाहि.
  पण यावर ‘राष्ट्रवादी'(????)चं चिह्न असूनही, कोणत्याच राजकीय पक्षानं(निदान सेना अणि भाजपा!) याचं विरोध करू नये ह्याचं आश्चर्य वाटतं

  • मला पण तेच वाटत्तं.मी हा मेल शिवसेनेला पाठवलाय. हे सिध्द करणं अतिशय अवघड आहे की हे पत्रक ’त्यांनीच’ छापलंय .. म्हणुन कदाचित असावं….अमरावतीला म्हणे त्या शाही इमाम ने तर फतवा काढला होता, आणि अनाउन्स केलं होतं की रावसाहेबांच्या विरुध्द मत म्हणजे इस्लाम च्या विरुध्द मत.

 9. मनोहर says:

  People get the government they deserve ही बाब लोकशाहीतच जास्त खरी आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s