सुरा ?? छे हो.. तलवार…

म्हणे मराठी माणसाने सुरा खुपसला. बाळासाहेबांचं हे वाक्य वाचलं आणि मनाला ते झोंबल. गेली चव्वेचाळीस वर्ष शिवसेनेने, मराठी माणसांसाठी काय केले ह्याचा उहापोह करण्याची वेळ आलेली आहे असे मला वाटते. आजचा  बाळासाहेबांचा लेख वाचला की मराठी मतदारांनी सुरा खुपसला शिवसेनेच्या पाठीत. छे हो.. सुरा कसला, माझं तर मत आहे की आता मतदारांनी शिवसेनेच्या पाठीत सुरा नाही तर चक्क तलवारच खुपसली आहे मुंबई मधे ,   शिवसेनेचं पुर्णपणे पानिपत झालंय मुंबईला.अक्षरशः खांडॊळी केलेली आहे शिवसेनेची.

राडेबाज म्हणून प्रसिद्ध, आणि म्हणूनच   मराठी माणसाला प्रिय.. जेंव्हा हिंदु मुस्लिम दंगा झाला तेंव्हा शिवसैनिकच उभे राहिले तुमच्या आमच्या साठी. तुम्हा आम्हाला बैहराम पाड्यामधे काय झालं हे माहिती आहेच. आणि जर शिवसेना नसती तर काय झालं असतं हे पण माहिती आहेच. पण जेंव्हा शिवसेनेने आपली इमेज बदलून गांधीगिरी करणे सुरु केले, तेंव्हा शासनाने पुर्ण दुर्लक्ष करणे सुरु केले. बाळासाहेबांनी जरी धमकी दिली , तरी पण त्याकडे कानाडोळा करायचे कॉंग्रेस सरकार.

आम्हाला शिवसेना प्रमुख सावरकरांसारखे प्रिय आहेत,गांधीजींच्या सारखे नाही.

आक्रमक पणा सोडल्यावर, आणि आक्रमक शिलेदार छगन राव, नरायण राव, यांच्याच तर राडेबाज पणामुळे शिवसेनेला मान होता , लोकं घाबरायची… पण आता आज काय परिस्थिती आहे??.. जसे सदा सर्वणकर सारख्यांना तिकिट न देता आदेश ला दिलं तेंव्हाच तिथल्या अपयशावर शिक्कामोर्तब झालं होतं.

मराठी माणसाला आता शिवसेना पेक्षा राज जास्त ऑफेन्सिव्ह असल्यामुळे , केवळ एका धमकी वर सगळे बोर्ड मराठी मधे करायला लावल्या मुळे जवळचा वाटु लागला. मराठीचा तारणहार हा किताब आता राज कडे हळू हळू सरकु लागला, तरी पण त्याकडे शिवसेनेने कधीच लक्ष दिले नाही.

प्रत्येक वेळी, राजने काही केले तरीही दुसऱ्याच दिवशी, उद्धव ’हा तर आमचाच मुद्दा’ म्हणून कॉमेंट टाकायचे. यावर मराठी लोकांचं हे म्हणणं होतं, की तुम्ही हा मुद्दा ( मराठीमधल्या पाट्यांचा)  घेउन  गेली दहाव वर्ष लढताय, तुमचंच सरकार आहे महापालिकेत  , मग पाट्या का हॊ अजुन मराठी मधे झाल्या नव्हत्या?? राजच्या एका हाकेवर सगळ्या पाट्या मराठी मधे कन्व्हर्ट केल्या गेल्या.. की ज्या उध्दवला पण करता आल्या असत्या.

मुंबईला तर शिवसेनाच आहे महापालिके मधे, पण साधारण लोकांना कामासाठी किती त्रास दिला जातो? शिवसेनेचे नगर सेवक, हे लोकांची कामं करण्यापेक्षा स्वतःच्याच बद्दल जास्त विचार करतात ही गोष्ट बाळासाहेबांन जरी माहिती नसली तरीही.. उध्दव ला नक्कीच माहिती असायला हवी. सगळे नगर सेवक भूखंड कुठे आहे हडप करता येण्यासारखा, म्हणून सारखे कार्यरत असतात. बरं इतके करोडो रुपये किमतीचे भूखंड आणायला पैसा तरी कुठुन येतो हो?? याची चौकशी करायला हवी ना सेना प्रमुखांनी.

प्रत्येक नगरसेवक बिल्डर बनण्याचा जर प्रयत्न करु लागला, तर मग त्याला इतर नगर सेवकाची कामं करायला वेळ कुठुन मिळणार? नगर सेवकाचं काम म्हणजे वार्डाकरिता मिळालेला  निधी पुर्णपणे उपयोगात आणायचा ( म्हणजे थोडक्यात काय, तर कॉमन संडास बांधायचे, आणि तिथे बाहेर मोठी पाटी लावायची, कार्यसम्राट नगरसेवक . अबकड यांच्या निधी मधून हे काम झाले म्हणून). मराठी लोकं फक्त झोपडपट़्टी मधेच रहातात असा जर नगर सेवकांचा समज असेल तर तो त्यांनी बदलला पाहिजे.

रस्ते, पाणी, स्वच्छता या मुल्भूत सुविधा तरी कमीत कमी प्रत्येक टॅक्स पेअर ला मिळायला हव्या. चोरीची विज- म्हणजे फुकट, पाणी पण फुकट, आणि त्याचे पैसे भरतो कोण तर टॅक्स पेअर! मुंबई मधे विजेचं बिल सगळ्यात महाग आहे. कां??? या सगळ्या गोष्टींवर आवाज उठवायचा कोणी??

इतिहासाचे विकृतीकरण केलेल खपवून घेतले जाणार नाही, म्हणून बाळासाहेब म्हणाले. पण सरकारने धडा बदलला, दादोजी कोंडदेव यांचं नाव काढून टाकलं.. काय केलं हो शिवसेनेने?? साधा निषेध पण नोंदवला नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की लोकांची स्मरण शक्ती  कमी आहे आणि लोकं विसरले असतील. तर तसं नाही.. कृपया आता तरी याची नोंद घ्या..

एवढ्यात शिवसेनेच अस्तित्व जाणवाव असं काय केलंय शिवसेनेने?? नुसत्या बोलाचाच भात अन बोलाचीच कढी.. असं झालंय त्यांचं. उद्धव हा एक कवी मनाचा आर्टीस्ट माणुस.. मला व्यक्तीशः उध्दव बद्दल आदर आहे , तसाच राज बद्दल पण आहे.  मग तो एक्स्प्रेस वे चं नामकरण पुलं च्या नावाने करण्याचं असो , किंवा सागरी सेतु विदा सावरकरांच्या नावे करण्याचा बेत असो.. दोन्ही बेत सरकारने पुर्ण दुर्लक्ष केलं, आणि शिवसेनेने काय केल?? साधा निषेध तरी केला का?? नाही.. कारण ती हिम्मत किंवा तो आक्रमकपणा हारवलाय शिवसेनेचा.  नावाच्या पाट्या मराठी मधे करणे.. हा तर अजेंडा गेली कित्येक वर्षं होता, पण काय झालं??

शिवसेनेचा वाघ आरोळी देतोय असं वाटावं , सगळे सरसावून बसलेले सैनिक त्या अरोळीचं रुपांतर हलकेच  झालं की स्वस्थ बसायचे. त्यांना फक्त आवाज कुणाचा .. शिवसेनेचा….. अशा आरोळ्या देत पुढे घुसायची सवय! नेमकं तेच थांबलं शिवसेनेत. लोकांना पण लक्षात आलं की राज ठाकरे चा आवाज जास्त बुलंद आहे, कांहीतरी ऍक्शन पण आहे राजच्या मनसे मधे…  आणि त्यामुळेच बरेच लोक मनसे कडे ओढले गेले.

इतर ठिकाणी शिवसेनेला जे यश मिळाले ते पण जर स्वतःच्या जोरावर आहे असा शिवसेनेचा समज असेल तर तो पुर्ण चुकीचा आहे.भाजपाचे मतदार , जे अगदी जनसंघाच्या काळापासुन दिव्यावर शिक्का मारायचे,( लहानपणी ती घोषणा ऐकलेली अजुनही डॊक्यात घुमते आहे.. मते कुणाला?? जनसंघाला…. )  ते आता  सगळे काही झालं तरीही कॉंग्रेसला मत देणार नाहीत. तुम्ही कुठलाही उमेदवार जरी आणून उभा केला , तरी हा मतदार पक्षाला पुर्ण पणे बांधील आहे. या मतदाराला, उमेदवार, मराठी, की उत्तर भारतीय? वगैरे गोष्टींमधे रस नसतो. ह्यांचं अगदी पक्कं असतं , की भाजपा चा जो कोणी उमेदवार असेल त्यालाच मत द्यायचं. ही मतं काहीही जरी झालं तरीही बदलली जाउ शकत नाहीत. विदर्भामधे जी मतं मिळाली ती मिळाली भाजपाच्या पुण्याईवर. विदर्भात तर शिवसेनेने फक्त इलेक्शनच्या वेळेसच काम केले. इतर वेळेस विदर्भ हा महाराष्ट्राचा एक भाग आहे हे सोयीस्कररीत्या विसरलं जातं.

मुंबईला काय झालं, आई वडील, भाजपचे, किंवा शिवसेनेचे, तर मुलं.. म्हणजे पुढची पिढी ही मनसे ची. म्हणजे एकाच कुटूंबातली मत विभागली गेली. पुर्वी असं नव्हतं. एक कुटुंब प्रमुख सांगेल त्यालाच सगळी मतं जायची. ही गोष्ट विसरले शिवसेना प्रमुख. या नवीन मुलांना तुम्ही कुठल्या बळावर आपल्या कडे खेचण्याचा प्रयत्न केला? एक तरी अशी गोष्ट सांगा…….. काहीच नाही…..!!

बाळासाहेबांना एकच सांगावंसं वाटतं, की शिवसेनेमधे जे उत्तर भारतियांचे वर्चस्व वाढलंय, राज्य सभे मधे जे उत्तर भारतीय पाठवले, इकडे जे उत्तर भारतीय उमेदवार दिलेत, मराठी माणसांनी सांगितलं, की आम्हाला तुम्ही बाजुला ठेवून भैय्या लोकांना जवळ करणार असाल तर ते आम्हाला आवडणार नाही.या सगळ्या गोष्टी पुढे टाळल्या तरच मराठी हदय सम्राटाचा बहुमान कोणी हिसकावून घेऊ शकणार नाही. यावर पुर्वी एक लेक लिहिला होता, तेंव्हाच हा प्रश्न इथे उभा केला होता, की आता सगळे मतदार शिवसेनेला मतं देतिल?? तो इथे आहे..

शिव़उद्योग सेना काय करते आहे आजकाल? मायकेल जॅक्सन चा प्रोग्राम झाला होता, नंतर पुढे काय झालं? हा प्रश्न जरी कोणी विचारत नसेल तरीही प्रत्येकाच्या मनात आहेच ना?? तसं म्हंटलं तर राज ठाकरेंनी पण काहीच केलेलं नाही तरुणांसाठी.

आता तेरा आमदार आहेत निवडुन आलेले, कमीत कमी ते मध्यमवर्गीय तरुण जे सध्या तडीपार झालेले आहेत, त्यांच्यावरच्या केसेस खारीज करण्याचा तरी प्रयत्न करावा राज च्या शिलेदारांनी.. नाहीतरी काय मुंबईच्या बिल्डर्स मधे अजुन काही नवीन बिल्डर्स ची भर पडेल. गळ्यात अर्धा किलो सोन्याची चेन आणि हाताला एक किलोचं ब्रेसलेट घालणारे नवीन बिल्डर्स तयार होतील……

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , , . Bookmark the permalink.

36 Responses to सुरा ?? छे हो.. तलवार…

 1. Ajay says:

  मनापासुन वाचला लेख आणि आवडला सुद्धा ! मला वाटत की जशी पिकलेली पान गळतात आणि झाडाला नवी पानं येतात त्याप्रमाणे मनसे चा जन्म झाला आहे. शिवसेनेचा आक्रमकपणा हीच शिवसेनेची ओळ्ख होती. स्वताची ओळख ते विसरलेत. डरकाळ्या फोडणारा वाघ म्हातारा झाला आहे आणि त्याची जागा मांजराने घेतली आहे. मांजरा ने कितीहि गुरकावळ तर डरकाळी नाही फुटु शकत त्यासाठी वाघाचा जन्म लागतो. शिवसेना गेली तर मनसे आहे. पण मराठी टिकविण्यासाठी मराठी माणुस कुणाच्या आधारावर का अवलंबून आहे. आपला विकास आपण स्वत: करावा. कष्ट करण्याची ताकद आणि जिद्द असेन् तर माणुस काय नाही करु शकत, शिवाजींचा इतिहास वाचायचा तो कशासाठी, वाचुन रद्दीत विकण्यासाठी. त्यातुन बोध घेतला तर उत्कर्ष नाहीतर पुन्हा एकदा गुलामगिरी आहेच आपल्या वाटेला.
  असेच वाचनीय लेख लिहीत जा !
  -अजय

  • अजय
   तुम्ही फारच छान लिहिलंत.. अहो, शिवसेनेचा असा पराभव झालेला पाहुन मलाही वाईट वाटलं, पण याला कारणीभुत कोण हे शोधुन आत्मपरिक्षण करण्याची शिवसेनेला गरज आहे. शिवसेनेने मुंबईतला हिंदु , गरिब मराठी वर्ग इतके वर्षं राडे झाले की वाचवला हे विसरुन चालणार नाही. आता शिवसेनेने शस्त्र खाली ठेवलीत आणि राज ने ती उचललीत.. मराठी माणुस आता पुन्हा महाभारताची लढाई लढणाऱ्या अर्जुनाकडे आशेने पहातोय..

 2. Suhas says:

  एकदम रोख ठोक आणि मुद्देसुत…

 3. sahajach says:

  महेंद्रजी मुद्दा नी मुद्दा पटला…..मला वाटतय शिवसेनेनी देखील वाचायला हवाय हा लेख, त्यांना तरी समजू दे ही तलवार उपसायची वेळ का आली…….आणि माझे प्रामाणिक मत हे आहे की मराठी माणसाने पाठीत खंजीर खूपसलाच नाहीये, तो मराठीपणा नाहीच…..हो, पण त्यांच्याकडे झालेल्या दुर्लक्षाला चोख उत्तर, तेही तोंडावर दिलेय….
  कोणे एके काळी बाळासाहेब म्हणजे दैवत होते, आजही आहे पण राज त्यांची जागा घेइल असे वाटतेय…नव्हे त्याने ती घ्यावी अशी सदिच्छा….आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी प्रार्थना….

  • राज ने ती जागा घ्यावी , आणि त्या दृष्टीने त्याने प्रयत्नं पण सुरु केलेले आहेत. आजकाल जरा सेन्सिबल कॉमेंट्स असतात राज च्या. केवळ विद्वेशाच्या आधारावर केलेल्या कॉमेंट्स देणं बंद केलंय राज ने..

 4. Aparna says:

  एकदम वर्मी घाव घातला आहे आणि अगदी बरोबर मतं आहेत…मला वाटतं या राजकारण्यांना सामान्य माणसांना काय वाटतं, काय हवंय याची माहिती हवी असेल तर त्यांनी असे आपल्यातल्यांनी लिहिलेले लेख वाचावेत आणि धडे घ्यावेत…वाईट याचं वाटतंय की मुंबईत (आणि कदाचित महाराष्ट्रात) मराठी लोकांचं भलं व्हावं अशा ताकदीचं आता कोण?? मला सध्या आपल्या राजकारणातलं फ़ार कळतंय असं नाही पण एक भाबडा आशावादही आता वाटत नाही….हे सर्व राजकारणी मधल्या मध्ये मुंबईत आधी मराठी माणुस तडीपार करतील आणि मग उरल्या महाराष्ट्राचं अजुन काय लोणचं घालतील नेम नाही…

  • अपर्णा
   बाळासाहेबांच्यावर ही वेळ यावी.. याची देही डोळा हे दिवस पहावे लागावे याची खरंच खंत वाटते. पण त्याच सोबत असंही वाटतं की आता राज तरी कमित कमी थोडा जास्त कॉशस राहिल या बाबतित..

 5. संजिव सिध्दुल says:

  ‘…….आई वडिल, भाजपचे, किंवा शिवसेनेचे, तर मुलं.. म्हणजे पुढची पिढी ही मनसे ची. ……….. ही गोष्ट विसरले शिवसेना प्रमुख. या नविन मुलांना तुम्ही कुठल्या बळावर आपल्या कडे खेचण्याचा प्रयत्न केला?’
  अगदी बरोबर लिहिलात काका.
  बाळासाहेबांबद्दल पूर्ण आदर असुनही थोडं स्पष्ट बोलतो, बाळासाहेब स्वतःच्या मुलाला व पुतण्याला सुद्धा समजावू शकत नसतील तर इतर मुलांना तरी पक्षाकडे कसे खेचणार?

  • संजीव
   बाळासाहेबांचं आता वय झालंय. ही सगळी कामं करायची ती उध्दव ने.. पण नेमकं ह्याच गोष्टी कडे दुर्लक्ष केलंय उध्दवने. आणि आता त्याचीच फळं आहेत हे इलेक्शनचे निकाल. त्याच्या सभोवती असलेले सल्लागार काय सल्ला देतात त्यावर उध्दवचे निर्णय अवलंबून असतात.

 6. bhaanasa says:

  ज्या मुद्द्यावर माननीय बाळासाहेबांनी कोण्या एके काळी लोकांच्या ह्रुदयात प्रवेश केला…शिवसेनेची स्थापना केली तोच मुद्दा आज सहजी हरवून गेलाय. काळाच्या ओघात त्याची धार अजूनच लखलखीत व्ह्यायला हवी होती. इतके बाळकडू जर घरातच मिळाले होते( राजला मिळाले आमच्याच घरातून आणि आता तो आमच्यावरच उलटलाय वगैरे बोलताना स्वत:लाही मिळालेय हे उध्दवा तू विसरलास का? ) ना मग तरिही आजची वेळ कशी आली? महेंद्र मला खरेच वाटत नाही अजूनही की सदा सर्वणकरला डावळून आदेशला तिकीट देणे म्हणजे स्वत:च्या पायावर स्वत:च मोठ्ठा धोंडा पाडून घेतला. मध्यमवर्गीय माणूस सगळया गोष्टींची नोंद ठेवत असतो. भैय्या उमेदवार शिवसेनेतून उभा राहिला तिथेच सगळे संपले. हा धक्का सगळ्यांना भारी पडला….. परिणीती समोर आहेच. आता कोणी कोणाच्या पाठीत खंजीर मुळात खुपसला हे स्पष्टच झाले की.
  महेंद्र अतिशय मुद्देसुद परामर्ष.

  • श्री
   माझं ऑफिस जेंव्हा वरळीला होतं, तेंव्हा त्या भागात रोज जाणं असायय्चं. सदा सरवणकरांच्या बद्दल लोकं फारच चांगलं बोलायचे दादरचे, म्हणायचे, कुठलंही काम असलं तरिही हा माणुस समोर येउन मदत करणार याची खात्री होती… प्रत्येक कामा मधे हिरारिने पुढाकार असायचा. शिवसेना ही मुळ अवलंबुन आहे आपल्या ऍग्रेसिव्हनेस वर.. जर तोच हरवला, तर शिवसेना शोधायची तरी कुठे?? म्हणुनच जेंव्हा सदा सरवणकरांनी सेना सोडली , तेंव्हाच जाणवलं, की नारायणराव, छगनराव सोबतच एक चांगला कार्यकर्ता गेला सेनेतुन.
   छगन भुजबळ, जेंव्हा सेनेत होते, तेंव्हा त्यांनी विधानसभा गाजवुन सोडली होती. आता तुम्हीच सांगा, दुसरा कुठला नेता इतका ऍग्रेसिव्ह होता का विधान सभेत … ? नाही.. कोणिच नाही!! म्हणुन म्हणतो, असे खंदे नेते आवश्यक आहेत सेनेला .
   आदेश बांदेकर यांचं काय कॉंट्रिब्युशन आहे ? असो.. हा पुर्णपणे वादाचा मुद्दा आहे.. टिव्ही वरची लोकप्रियता इथे एन्कॅश करता आली नाही.

 7. सन्माननीय मित्र आणि मैत्रिणींनो,

  आपण एक गोष्ट ठेवली पाहिजे कि बाळासाहेब आता राजकारनात सक्रिय नाहियेत आणि त्यानी असुहि नये. त्यांनी आता केवळ आराम करावा. वय वर्षे ८२ असताना हि अजुनहि जर लोकं त्यानीच कामे करावे हि आशा बाळगुन असतील तर त्यांची मला किवच येईल.

  आणि साहेबांबद्द्ल एक गोष्ट लक्षात ठेवा कि, बाळासाहेब आहेत म्हणुन मुंबईत मराठीची शान आहे. बाळासाहेब आहेत म्हणुन भगवा मानाने फडकताना दिसतोय नाहितर सग़ळिकडे या राजकारण्यांनी निळे आणि हिरवे झेंडॅंच फडकवले असते, कारण मते त्या मुळेच मिळतात ना. अत्ताची परिस्थीती काहिहि असो पण बाळासाहेबांच्या कामा बद्दल त्यांच्या मराठि स्वाभिमाना बद्दल कोणिहि शंका घेऊ नये.. मी तर म्हणतो कोणि तसे धाडस हि करु नये ना कोणास करुन द्यावे.

  • आशिष
   ही गोष्ट त्रिकालबाधित सत्य आहे की बाळासाहेबांच्या मुळेच आपण ’त्या’ दंग्यामधे तग धरु शकलो. मी पण माझ्या लेखात हे आधिच लिहिले आहे, आणि त्या बद्दल प्रत्येक मराठी माणुस शिवसेनेचा पर्यायाने त्यांचा ऋणी राहिल. तुम्हाला असं वाटतं नाही कां, की जर उत्तर भारतियांना इथे जास्त महत्व दिलं गेलं नसतं, तर कदाचित आजचा निकाल वेगळा लागला असता? मला असं वाटतं की मराठी माणसांची मतं टेकन फॉर ग्रांटेड धरुन उत्तर भारतियांची मते मिळवायला त्यांना तिकिटं दिलित.. तेंव्हाच मी हा प्रश्न उपस्थित केला होता, की आता शिवसैनिक भैय्या लोकांना मतं देतिल की मनसेच्या मराठी उमेदवाराला? आणि नेमकं तेच झालं.. सगळी मराठी मतं मनसेला पडली.

 8. rohan says:

  बाळासाहेब म्हणतात की मराठी तरुण मुलांना शिवसेनेने केलेल्या त्यागाची आणि कामाची कदर नाही. असे काय केले आहे ह्यांनी ??? तू बोललास तसेच “कुठल्या बळावर ह्यांनी आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला?” उत्तर आहे शून्य.

  राजने सुद्धा अजून काही तसे केलेले नाही आहे पण एक नविन पक्ष म्हणुन त्यावर विश्वास टाकलाय तरुण पिढीने. आता बघुया काय करतोय तो. निवडणूकीनंतर त्यांची IBN-लोकमतला दिलेली मुलाखत सुद्धा चांगली होती. बघुया आता २०१४ चा अजेंडा कसा मांडतोय तो. शिवसेनेची पुनरावृत्ती नको इतकीच इच्छा … !

  • राजमधे एक वेगळाच आक्रमक पणा आहे. आणि त्याच मुळे तरुण आकृष्ट झालाय मनसे कडे.
   शिवसेनेमधे तोच मिसिंग आहे. आयबीएन लोकमत ला दिलेली मुलाखत म्हणजे पहिली सेन्सिबल मुलाखत आहे राज ची.
   या भाषणामधे त्याने बराच समतोल साधला आहे, आणि वैचारिक दृष्ट्या पण परिपक्व वाटतं ते भाषण..
   आधिच्या मुलाखती आणि भाषणं मला अजिबात आवडली नाहित.

 9. kedar says:

  शाहिस्तेखाना सारखे गाफील राहिल्याने चार बोटे गेली आहेत शिवसेनेची आणि तोंड लपवायची वेळ आली आहे. पुढे विचार केला नाही तर कोथळा सुद्धा बाहेर येऊ शकतो

 10. शिवेसेनेचं नाव आहे ते बाळासाहेबांच्या जिवावावर. त्यांचा वारसा चालवणारा लायक उमेदवार त्यांच्याकडे असूनही त्यांनी त्याची ‘अक्करमाशा’ या शब्दात उपेक्षा करून आपल्या मुलाला गाडीवर बसवण्याचा धृतराष्ट्रपणा केला. दुस-या पक्षाला शिव्या दिल्या म्हणजे निवडणूक जिंकता येत नाही, हे बाळासाहेबांसारख्या अनुभवी माणसाला आमच्यासारख्या लिंबूटिंबू लोकांनी सांगणं म्हणजे सूर्याला मेणबत्ती दाखवण्यासारखं आहे. पण वस्तूस्थिती ही आहे की बाळासाहेबांनी आणि उद्धवनेही आता आत्मचिंतन करावं. इतर पक्षांप्रमाणे शिवसेनेनेही आपल्या पॉलिसीज बदलल्या आणि मराठी माणसाचा विश्वास गमावला.

  • लोकल इशु बेस्ड पार्टी जेंव्हा नॅशनल बेस होण्याचा प्रयत्न करते तेंव्हा असंच होतं.
   त्यांचं स्टॅंडींगच होतं मराठी माणुस या संकल्पनेवर.
   आणि नेमकं, जेंव्हा त्यांनी सर्वसमावेशक मार्ग अवलंबिला , तेंव्हा ते इतर समाजा विरुध्द काहिच बोलु शकले नाहित.
   मराठी ते हिंदुत्व.. हा प्रवास फारच महाग पडला शिवसेनेला. मराठी च्या बाजुने बोललं तर इतर भाषिक नाराज होतिल ,
   म्हणुन बोलायचं नाही, असं बोटचेपे पणाचं धोरण चुकलं असं मला वाटतं.
   लोकल इशु पासुन घेतलेली फारकत हा सगळ्यात मोठा पुलिंग डाउन फोर्स आहे शिवसेनेसाठी.

 11. अगदी मुद्दा न मुद्दा पटला या लेखातला…खरच शिवसेनेला आत्म्परिक्षणाची गरज आहे आता ,माननीय बाळासाहेबानि पुत्रप्रेमाने ‘तो’ निर्णय घेतला नसता तर राज,राणे आणी बरेच एक्टिव नेते ही आज शिवसेनेत असते आणी निकाल काही वेगळाच असता..जावून दे हया जर तर च्या गोष्टी…पण यामध्ये नुकसान होत आहे ते मराठी माणसाचेच म्हणून तर मराठी माणसाला ही तलवार उचलावी लागली.महाभारतात ध्रुतराष्ट्राने पुत्रप्रेमाने पांडवावर अन्याय केल्यावर त्याचा शेवट कसा झाला हा इतिहास माननीय बाळासाहेबांना माहीत आहेच…

  • देवेंद्र
   मा. बाळासाहेबांवर ही वेळ यावी याचं वाईट वाटतं.
   असो.. आता बघु या पुढे काय होतं ते…
   मनसेचे आमदार जर विधानसभा गाजवू शकले तरंच फायदा. नाहितर..
   पुन्हा जैसे थे!!

 12. आणी हो तुम्ही शेवटी ज्या सोनेरी माणसाचा उल्लेख केला आहे त्याला राजनी समज दिली आहे आता तो विधानसभेतील शपथविधिनंतर त्याचे अलंकार काढून ठेवणार आहे.

  • देवेंद्र
   ते ऐकलंय मी पण.. त्याचं म्हणणं.. असुदे.. त्यावर एक मस्त पैकी विनोदी लेख होऊ शकतो.. लेखच लिहितो वेगळा.

 13. laxmi says:

  excellent post as usual.
  i also saw d interview.. its good.
  but manse didnt hav any other aggresive politician other dan raj thakre.

  • राज ठाकरेंचा ऍग्रेसिव्हनेस बराच कमी झालेला आहे. आणि हे लक्षात येतं त्या इंटर्व्ह्यु वरुन . इतर लोकं , जे निवडुन आलेले आहेत त्यांना ट्रेनिंग द्यावं लागेल विधानसभे मधे कसं ऍग्रेसिव्हली प्रत्येक इशु घ्यायचा ते. मला वाटतं जमुन जाईल ते.. 🙂

 14. मनसेचे १३ आणि युतीचे तीनतेरा…
  Saffron Allianceने आता तरी शहाणे व्हा…!!!

  • तिन तेरा तर वाजले,
   पण अजुनही समज आलेली नाही.
   पुढच्या वेळेस १२ वाजतिल, असंच चालत राहिलं तर..

 15. Pravin says:

  उद्धव निकालाच्या चार दिवसानंतर आज मीडीया ला सामोरे गेले. म्हणाले की पराभवाची कारणमीमांसा करणार आहेत. त्यांना हा लेख उपयोगी पडेल. शिवसेनेने मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्दा अजिबात सोडू नये अन् त्यासाठी गरज पडल्यास आक्रमक व्हावे. कमीत कमी आता तरी शिवसेनेने मनसे ला मते फोडण्याबाबत दूषणे न देता त्या पक्षाचे अस्तित्व मान्य करून पुढची रणनीती आखावी.

  उद्धव आणि राज मध्ये मला राज जास्त उजवे वाटतात. त्यांच संभाषण कौशल्य उद्धावच्या मानाने बरेच चांगले आहे आणि ते पोलिटिकली करेक्ट गोष्टी करतात. आता पाहू १३ आमदारांच्या जोरावर काय करतात ते.

  • प्रविण
   राजचं बोलणं इतक्यातंच सुधरलंय . पुर्वी जे बोलायचे ,ते तर खुपच क्रूड होतं बोलणं.. हळू हळू डेव्हलप होताहेत..

 16. Sevakram says:

  pharach chhan lihita tumhi,lekhat jivant pannabarobar ek dhag ahe, jagate raho.

  • मनःपुर्वक आभार. मनात जे कांही येतं ते लिहितो झालं.
   तुमच्या अभिप्रायामुळे आणि कौतुकामुळे जास्त हुरुप येतो लिहायला..

 17. Meghnad says:

  mahendra sir tumache lekh vachayala khup maja yete.

  specially i like that Bachelor life articles.

  i am also thinking to share my thoughts here at wordpress in marathi.
  but i am not able to type in marathi.

  can u plssss help me regarding marathi writing.

  • मराठीमधे टाइप करण्यासाठी मी बरहा हे सॉफ्ट वेअर वापरतो. हे सॉफ्ट वेअर पुर्णपणे विनामुल्य डाउनलोड करता येते. http://baraha.com—– या साईटवरुन. अतिशय सोपं आहे वापरायला. प्रयत्न करा..

 18. मेघनाद says:

  सर धन्यवाद हे ऍप्लिकेशन खुप छान आहे. मि आधी वापरले आहे, फ़क्त जरा विसरलो होतो.
  आता मि पण काहि तरी माहीती लिहिण्याचा प्रयत्न करीन.

  धन्यवाद सर.

  • शुभेच्छा.. जरुर लिहा.. मी आधी इंग्रजी मधे अनुदिनी लिहिणार होतो, पण नंतर मराठी मधे सुरु केली. इंग्रजी मधे वाचक जास्त मिळतात म्हणुन तो विचार होता.. पण … शेवटी मायबोलीच जवळची वाटते..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s