स्वगत.. साहेबांचे..

अरे दादु.. हे काय झालं रे……..??  अरे तू तर बोलला होतास की आपलंच सरकार येणार. सरकार आलं की आपण विजय़ मेळावा करु दसऱ्याच्या ऐवजी.. आता काय करणार रे?शिवसेनेची जुनी परंपरा तूमोडीत काढलीस दसरा मेळाव्याची. मला अजिबात आवडलं नाही ते..

आपण जिंकणारच ’   या तुझ्या आश्वासनानुसार मला जरा उमेद वाटत होती . वाटत होतं की आता तरी तू विधानसभेवर भगवा फडकवणार…..आणि मला ह्या दाढी पासून सुटका मिळणार.. पण नाही.. अरे हल्ली मला ह्या दाढीचा खूप त्रास होतो रे.. आधीच मुंबईची गरमी.. नुसता घाम , आणि त्या मुळे सारखा एसी सुरु ठेवावा लागतो.एसी मधे जास्त वेळ बसलं की मग सर्दी खोकला होतो.  तुला कित्येकदा सांगितलंय हे.. पण तु कांही करायलाच तयार नाही. आता जर तु लवकर कांही केलं नाहीस तर मात्र मला शेवटपर्यंत ही दाढी वागवतच फिरावं लागेल.

कुठुन एका क्षणी असं बो्लून गेलो, की विधानसभेवर भगवा फडकवला की मगच दाढी काढीन म्हणून असं होतंय मला.

अरे त्या राजनारायणला पण दाढी काढण्याचा चान्स मिळाला होता. तसं बघशील तर राजनारायणाचा पण तर ्खूपच मोठा होता.. की इंदिरा गांधी च्या विरुध्द जिंकलो तरंच दाढी काढीन म्हणून.. आणि माझा पण तर फारच सोपा आहे.. फक्त विधान सभेवर भगवा फडकवायचा आहे… आणि बस्स्स!!! अरे तेवढं पण तुला जमू नये???  बघ  रे बाबा.. नाहितर ही दाढी घेउनच मला ……. ..

ह्या वेळेस शिवसेनेचे जे जुने खंदे कार्यकर्ते नाहिसे झालेत नां, त्यांची उणीव जाणवते आहे. पूर्वीचे ते दिवस आठवतात मला.. अरे दसरा मेळावा काय आणि सामना मधले ते लेख लिहिणं, मार्मिक मधले कार्टुन्स काढणं …. काय दिवस होते ते…अरे दसरा मेळाव्याला तर शिवाजी पार्क पुर्ण भरुन जायचा !!!!!

याची देहा हे जे शिवसेनेचे इलेक्शन मधे झालेले पानिपत पहाण्याची वेळ आली नां, त्या मुळे तर मला वाटु लागलंय की पुन्हा सगळं सुरळीत होण्यासाठी  ५-१० वर्ष तरी लागतील. अर्थात तु आपल्या भोवतालची मंडळी दुर करशील तर.. अरे  त्यांनी पैसे पण घेतले म्हणतात  उमेदवारांपासुन तिकिटांसाठी?? काय हे?? तुझा काही होल्ड आहे की नाही?

तुला ठाऊक असेलच की इथे लखोबाला पण बोलावलं होतं. म्हंटलं वाटाघाटी करु या.कदाचित तो परत आला तर शिवसेनेला आपला जुना आक्रमकपणा कांही अंशी परत मिळेल, पण नाही.. तो जास्त हुशार निघाला, त्याने आपला वापर करुन घेतला आपलं ’घड्याळ’ दुरुस्त करुन घ्यायला. अरे हो ना, त्या घड्याळात त्या लखोबाचे बारा वाजले होते.

सगळं काही व्यवस्थित झालं होतं, पण त्या मैद्याच्या पोत्याने  त्याचा वाढदिवस साजरा केला आणि त्याला पटवले, आणि आपल्या हातात आला आहे असं वाटतच होतं तेवढ्यात तो सटकला हातातून… लखोबाने त्या मैद्याच्या पोत्याला घाबरवायला वापरलं आपल्याला…. काय करणार?? उपमुख्यमंत्री या पदावरच जर त्याला खूष व्हायचं होतं तर.. आपल्याकडे पण देता आलं असतं…

’तो ’ पण तसा बरा होता ..एनकाउंटर मधे जायचा, त्याला वाचवला.. आणि काय मिळालं आपल्याला? धोका… सगळे जयचंदाची अवलाद आहेत झालं. मला असं वाटतं की माझ्या प्रमाणेच ्तू पण जर किंग मेकर राहिला असतास तर नक्कीच मुंबई वरचा, मराठी माणसाच्या मनावरचा कब्जा कधीच सुटला नसता. अरे त्या दंगलीमधे शिवसैनिकांनी तर वाचवले नां लोकांना.. लोकं कसे विसरतील??

त्या भैय्या लोकांचा मुद्दा राजने चांगला वापरला. अरे  त्याने फक्त कांही भैय्यांना मारहाण केली बस..मराठी लोकांसाठी अजुन तरी का्हीच केलं नव्हतं, पण केवळ, त्या थोड्या मारहाणीमुळे आणि मिडियाने त्याला जे बॅशिंग केलं त्यामुळे तो एकदम नॅशनल टिव्ही वर रोज दिसू लागला. .तेवढ्यात तो एक भैय्या मुलगा आला होता ना बस मधे रिव्हॉल्व्हर घेउन फिरणारा.. त्या मुळे पण खूप मदत झाली राज ला . आणि त्याच मुळे तरुणांच्या मनात जागा बनवु लागला. त्याला नाकारणे कधीच शक्य होत नव्हते मिडियाला आणि मराठी तरुणांना पण..

आणि या पिरियड मधे तुझा आवाज एकदम बंद झालेला होता. अरे तु कसा बोलशील? भैय्या लोकं घेतले आहेत ना शिवसेनेमधे? मग कसा बोलणार तु यावर? ‘मराठी’ ते ‘हिंदुत्व’ हा प्रवास फार महाग पडला शिवसेनेला.

खरं तर आपण मराठी मुद्दा सोडायला नको होता. भाजपा बरोबर युती केली की ती हिंदुत्व वादी मतं कुठेही जात नाहीत. अगदी इकडचा सुर्य तिकडे उगवेल पण संघाची मतं नेहेमीच भाजपंला मिळणार. तेंव्हा ती तर आपली हक्काची मतं होती. आपण फक्त मराठी मतांवर कॉन्सन्ट्रेट केलं असतं तरीही चाललं असतं.

मला वाटतं  आपण भैय्या लोकांना शिवसेनेत स्थान देउन बसलो, म्हणून आपण त्या विषयावर कांही च बोलु शकलो नाही, आपली  बोटं सापडले होते नां त्या दगडाखाली, त्या मुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्थिती झाली होती आपली.

आता   भैय्या लोकं कुठे आहेत आपल्याबरोबर?? जेवढे आहेत तेवढे गेले तरीही हरकत नाही, पण पुन्हा मराठी माणसाचा मुद्दा उचल आता. आणि थोडा अपिअरन्स बदल रे.. किती हे तुझे केस वाढलेले? कसा दिसतोस रे तु? जरा व्यवस्थित कटींग वगैरे कर ना म्हणजे जरा बरा दिसशील.. त्या राज ला बघ, कसा छान बारीक केस कापून असतो ते.

त्याने  मराठी पाट्यांसाठी जे केलं ते तुला का नाही करता आलं रे?? आपलेच लोकं आहेत ना महापालिके मधे??असा कितीसा वेळ लागला असता रे?? एखाद्या मॉल ला फोडायला कांही पोरं पाठवायची .. एक मॉल जर फोडला असतास ना, तर सगळ्या मुंबईच्या पाट्या मराठी मधे झाल्या असत्या. पण नाही.. तु इतका मवाळ, की तू काहीच  न करत बसला,

राज रोज त्यावर कांही तरी बोलायचा, पण तु मात्र मुग गिळून गप्प बसला होतास.अरे एक धमकी दिली असतीस ना तरीही चाललं असतं,सगळ्या पाट्या मराठीत झाल्या असत्या… पण तु मात्र फक्त ‘हा आमचाच मुद्दा’ म्हणून मिडीयाला सांगत राहिलास. अरे गेली दहा वर्षं हा तुझाच मुद्दा होता, पण तू ह्या मुद्यावर काहीच केलं नाहीस नां?? म्हणून तर राजने केलं.. आणि याचा फायदा पण घेतला. तू नुसता मुद्दा धरुन बसलास ..

आता मराठी मधे म्हणजे देव नागरीमधे , याचा फायदा त्या अनपढ भैय्या लोकांनाच होईल असं म्हणतोस होय?? अरे पण…….

इतका मोठा सेट बॅक मिळालाय आणि त्या राजला ला इतका मोठा लिड मिळालाय की ह्या लिडचा तो जर त्याने चांगला फायदा करुन घेतला तर नक्कीच तो खूप पुढे जाईल तुझ्या ,आणि मग  बहुतेक मला ही दाढी आयुष्यभर वागवावी लागेल. महाभारतातल्या ध्रुतराष्ट्रा सारखी स्थिती होऊ देऊ नकोस रे माझी. नाहीतर लोकं म्हणतील पुत्रप्रेमामुळे हस्तीनापुराची वाट लावली होती ना धृतराषट्राने तसे केले ह्यांनी  ………….

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , , . Bookmark the permalink.

22 Responses to स्वगत.. साहेबांचे..

 1. Sarika says:

  Solid likha…. aavdal

 2. Suhas Zele says:

  महेन्द्र, Simply Great .. अप्रतिम

 3. aativas says:

  वा! साहेबांनी आणि उद्धवसाहेबांनी वाचायला हव हे… भाउबंदकीत आपण आपलीच वाट लावून घेतो.. मराठी माणसाची रीतच आहे ती!

  • जर हे दोन भाउ एकत्र झाले तर सरळ मेजॉरिटी आहे मराठी मतांची.. पण?? या पण नेच सगळी गोची करुन ठेवली आहे.

 4. आनंद says:

  ‘कमोड’ वर बसवून एकेकाची तासताय तुम्ही! मस्त !

  • आनंद
   तुम्ही पण ब्लॉग लिहा आता..
   अहो तुमची एक लहानशी कॉमेंट वाचुन हसता हसता पुरेवाट झालेली आहे.. अजुनही हसतोच आहे

 5. bhaanasa says:

  हाहा…. सही रे. विश्लेषणावर विश्लेषण….मस्त.

 6. “धृतराष्ट्र” ही एकच उपमा सगळ्या झाल्या गोष्टींच विश्लेषण करायला पुरेशी आहे. वाईट एकाच गोष्टीच वाटत की हा “धृतराष्ट्र” डोळस होता. बाकी पंत गांधारीच्या भूमिकेत शिरले. दुर्योधन बावळट आणि मवाळ निघाला. कुणी शकुनी बनून फासे फेकूच शकला नाही.

  • अरे क्या बात है.. वाह.. मस्त लिहिलंत..
   अहो, इथे पण शकुनी आहेच नां फासे फेकणारा.. पैसे घेउन भैय्या लोकांना सिटा वाटणारा….

 7. Pravin says:

  ha ha, apratim. hyach bhaavana asateel saahebanchya. Saamnachya agralekhat lavkarach chaapoon yetil 🙂

  • सामनाचा अग्रलेख हल्ली साहेब लिहित नाहीत. त्यांच्या नावाने कोणितरी दुसरा लिहितो असे ऐकले आहे.

 8. madhuri says:

  mast. aple mediawale kahi goshtina bhalte mahatva detat ani te kahi lokanchya faydyache tharte

  • जे कांही लोकांना वाचायला आवडते, तेच देतात मिडियावाले छापुन..
   जशी मागणी तसा पुरवठा हे तंत्र इथे ही सांभाळले जाते.

 9. abhijit says:

  वाह महेंद्रजी अगदी साहेबांच्या मनातलं बोललात. पत्रकार व्हा आता !

 10. ravindra says:

  simply great. bar ka.

 11. Vijay Shelke says:

  Great!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s