रजनीकांत …

माझा एक अन्ना मित्र आहे. तो रजनीचा अगदी भक्त!! मला तर वाटतं की रोज रजनीची पुजा घालत असेल तो  सकाळी उठल्या नंतर. रजनी म्हणजे आपला रजनीकांत गायकवाड हो.. तुम्हाला काय ती टिव्ही वरची रजनी वाटली का?

ह्या अन्ना लोकांना इतर कोणालाही कांहीही म्हंटलं तरीही चालतं, पण यांचं कुलदैवत असतं, अम्मा आणि रजनी.. एक वेळ यांच्या अख्ख्या खानदानाला शिव्या घाला, या अन्ना लोकांना कांहीच वाटत नाही, पण रजनी किंवा अम्मा ला कांही म्हंटलं तर यांच्या गोट्या कपाळात…..

पुजा घातल्या नंतर नैवेद्य कसला दाखवत असतील म्हणता??  अहो इतकी साधी गोष्ट तुम्हाला लक्षात येत नाही – सिगारेट , आणि काड्यापेटी!!!!  त्याचं आवडतं काम  म्हणजे सिगारेट हवेत उडवणे आणि मग ती पेटवणे.

ह्या रजनीला एकही काम सरळ करता येत नाही. अगदी साधी सिगारेट पाकिटात काढून पेटवण असो, किंवा शेड्स डोळ्यावर चढवणे असो.. प्रत्येक गोष्ट कशी शिस्तीत श्टाइल मधे असते रजनी ची. याच्या इतकी स्टाइल मारणं कुठल्याच हिरोला जमत नाही. मला तर वाटतं की हा माणुस रोज आरशापुढे उभा राहुन रोज वेगवेगळ्या स्टाइल्स चा सराव करीत असावा..

रजनीकांत चे कांही यु ट्य़ुब वर सापडलेले सीन इथे पोस्ट करतोय…  हा पहिला आहे ऍक्शन सिक्वेन्स..

हा दुसरा पण असाच अफलातून मारा मारी चा सिक्वेन्स.

आणि हा व्हिडीओ जेंव्हा पाहिला तेंव्हा  तर हसुन ह्सुन पोट दुखलं. एक चिता एका हरणाचा पाठलाग करतोय, आणि.. पुढे स्वतःच पहा ना…

ही एक  रजनी ला वापरुन केलेली कॅस्ट्रॉल ची जाहिरात.  या जाहिरातींच्या वर  कॉमेंट्स नको , सरळ बघायच्याच..

रजनी चोराला कसं पकडतो.. ते पहा इथे…

एका बुलेट ने तिघांना कसे मारायचे?? इथे बघा.. रजनी स्टाइल…

हा हरहुन्नरी कलाकार हिंदी मधे मात्र फारसा चमकला नाही. तसे याचे चित्रपट येउन गेले हिंदी मधे पण , ते कांही फारसे चालले नाहीत, आणि हा परत चन्नै ला गेला. तिकडे ह्याचं स्टेटस अगदी एखाद्या राजा प्रमाणे आहे.. लोकांच्या मनावर राज्य करणारा ’राजा’!!!
कोणी कांहीही म्हणा, ह्याचे हिंदी मधे डब केलेले चित्रपट  म्हणजे पर्वणी असते…मला तरी आवडतात..!!

डीडीच्या ब्लॉग वरचा रजनीवरचा हा लेख पण वाचु शकता.. इथे..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , . Bookmark the permalink.

12 Responses to रजनीकांत …

 1. रजनीकांत म्हणजे रजनीकातं गायकवाड नव्हे, शिवाजीराव गायकवाड. बाकी आमच्या रजनीचे चित्रपट तुम्हाला आवडतात हे ऐकून बरं वाटलं. रजनीकांतवर माझ्या ब्लॉगवर आधी खूप खरडलं आहे. आणखी एक…रजनीला स्टाईल किंग म्हणतात मात्र तो स्वतः स्टाईल करत नाही. त्याच्याविषयी तमिळनाडूत एक वाक्य प्रसिद्ध आहे…रजनी स्टाईल नाही मारत, तो जे करतो ती स्टाईल होते.

  • देवीदास
   अहो, मला तर अगदी मनापासुन आवडतो तो . त्याच्या सिनेमामधे कसा जिवंतपणा असतो.. तिन तास निखळ करमणुकिची खात्री. तुमच्या ब्लॉगवरचा लेख पण वाचतो आता एकदा शोधुन.
   तुम्ही नांवातलं जे करेक्शन सांगितलंत त्या बद्दल आभार !

 2. After watching Rajani VDO’s I am feeling bad. I think I wasted Oxygen till date. Never had fight with anybody. No violence around. Tasteless life…

  Anyways I agree that Rajani’s movies rock. If one can accept illogical things then there is nothing entertaining like Rajani.

  I know one more dialog from his movie “Baba” He used to introduce himself as “I am BABA. B to A to B to A”.

 3. सॉलीड! मला पण आवडतो रजनीकांत. रजनीकांतचा ’त्यागी’ (नाव चुकलेलंही असू शकतं) नावाचा एक सिनेमा मी पाहिला होता. त्यात व्हिलन हिरो-हिरोईनच्या दिशेने गोळी मारतो. मग रजनी त्या दोघांना वाचवण्यासाठी बुलेटच्या बरोबरीने पळताना दाखवलाय. पुढे तो हिरो हिरोईनसमोर जाऊन उभा रहातो आणि ती बुलेट रजनीच्या छातीत शिरते असा सीन होता. हा प्रकार खोटा आहे, हे माहित असूनसुद्धा रजनीने हिरो-हिरॉईनला वाचवल्याचं कौतुक वाटलं होतं. त्याचा ’हम’ सिनेमात एक डायलॉग होता – त्यीन से बले दो, दो से बला येक! रजनीच्या दाक्षिणात्य उच्चारांमुळे मला हा डायलॉग खूप आवडायचा.

  • रजनीकांत आवडतो म्हणायला खुप धैर्य लागतं.. आणि तुमच्या मधे पण ते आहे..
   मला रजनी कांत आणि चीरंजीवी ( तेलगु नट ) चे सिनेमे आवडतात पहायला. 🙂
   देविदास ने म्हंटल्या प्रमाणे,
   ” रजनी स्टाइल मारत नाही, तो जे करतो ती आपोआप स्टाइल होते”
   . त्याचे हिंदी उच्चार मजेशिर आहेत, पण कधी लक्षात आलं नाही. आज तुम्ही लिहिलंत म्हणुन खास पुढल्या वेली लक्ष देउन ऐकीन.

 4. आनंद पत्रे says:

  अहो आश्चर्यम्! कांचन आणि महेन्द्रजी ‘रजनी महाराजांचे’ पंखे…
  मला त्याचा ‘चालबाज’ तेव्हडा आवडतो, बाकी ‘भूल भुलैया’ चा तमिळ मेक पाहून कंटाळा आला होता, चंद्रमुखी बहुतेक…

  • आनंद
   लार्जर दॅन लाइफ कॅन्व्हास असतो त्याचा तामील सिनेमा. मला तर खरंच आवडतो.. थोडा लाउड असला तरीही..करमणुक चांगली असते.

 5. AMOL MENDHE says:

  रजनीचा फॅन मी पण आहे…. त्याच्या शिवाजी या चित्रपटाची कथा आवडली मला

 6. radhika says:

  mala pan avdato rajnikant. madhe tyache barech jokes ale hote…………
  Mahendraji , aple lekh kharch avdatat. mi nehmi vachte……………………..
  thanks…………………………….

 7. Rajesh says:

  marathi manus aahe yacha abhiman aahe.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s