साहेबांकडुन कान उघाडणी..

अरे…. दादु..  काय रे.. तू तो ब्लॉग वाचलास वाटतं – काय वाटेल ते?? नाही, महेंद्रने सुचवल्या प्रमाणेच वागणं सुरु केलंस म्हणून म्हटल.तो मराठी पाट्यांचा मुद्दा आता तू वर तर घेतला आहेस.. पण ते कोण टिकोजी राव आहेत ते कोर्टात जायचं म्हणताहेत. अरे आमच्याच महाराष्ट्रात हे असे मराठी पाट्या लावणार नाहीत म्हणून कोर्टात जातात . लवकर ऍक्शन घेतली नाही तर मात्र   सेशन कोर्ट, हाय कोर्ट ते सुप्रीम कोर्ट हा सगळा प्रवास होईपर्यंत तुला पण म्हातारपण येईल, आणि मुंबईतल्या पाट्या तशाच रहातील इंग्लिश मधे.. … अशा लोकांना कोर्टापेक्षा सेनेची भाषा जास्त कळेल..

मला तर वाटतं तू तिथे पाठवावीत पोरं, त्यांना ’शिकवायला’ म्हणजे ते मान्य करतील .एक धमकी पुरेशी आहे रे.. एक धमकी दे फक्त, एक पत्रकार परिषद आणि बस्स!! बघ कसं पटकन काम होतं ते…आपली पोरं तिकडे गेली ना की सगळ्य़ा पाट्या होतील इंग्लिश मधे.. आपोआप.. “पेंडींग पिटिशन इन द कोर्ट”!

आणि हो, त्या नगरसेवकांनी हे काय नवीन फॅड काढलंय?? आता म्हणे   ते   पार्किंगचे रेट्स वाढवणार आहेत म्हणे ५ ते १० रुपयांनी. हे असे निर्णय कसे काय घेउ शकतात रे तुझे नगर सेवक??  यावर पुन्हा अशीही मखलाशी केली जाते आहे की हे “ठेकेदार” लोकं स्थानिक लोकांना ( मराठी नाही….. स्थानिक ??) तिथे पार्किंग लॉट मधे कामाला ठेवतील. आणि त्या साठी ५-१० रुपयांची भाव वाढ.. अरे इतके  का षंढ झाले आहेत तुझे लोकं? की त्या ठेकेदाराच्या कानाखाली दोन वाजवून मराठी पोरांना कामावर लावू शकत नाही?? त्या साठी ते ठेकेदार तुमच्या कडून पैसे जास्तीचे घेणार..

बरं आता थोडा हिशोब, आता, असं बघ, फोर्ट ला काळा घोडा जवळचा पार्किंग लॉट.. त्या   पार्किंग मधे साधारणपणे  दररोज कमीतकमी १००० वाहनं उभी केली जातात.. हा अगदी ढोबळ मानाने अंदाज आहे. म्हणजे त्या ठेकेदाराला रोजचे कमीतकमी ५-१० हजार   जास्तीचं उत्पन्न ठेकेदाराला दररोज …..असे १५० लॉट्स आहेत, म्हणजे रोजच १.५लक्ष रुपये जास्त मिळतील त्या ..

सरळ सरळ दिसतंय की इथे कुठल्यातरी नगरसेवकाचे हात ओले केले जात आहेत ते.. अरे इथेच तर तुझं लक्षं असलं पाहिजे.. कार्याध्यक्ष म्हणून.. ह्यांचा हा कावा  कळला नाही का तुला??  अरे किती हा साधेपणा तुझा?? तुला असं वाटतं का की मराठी माणसं   मुर्ख आहेत म्हणून?? हे जर असंच सुरु राहिलं तर पुढल्या वेळी आहे तितके पण नगरसेवक निवडुन येणार नाहीत याची खात्री ……हरे राम.. हरे राम…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , , . Bookmark the permalink.

6 Responses to साहेबांकडुन कान उघाडणी..

 1. Pravin says:

  बरोबर अगदी. आजच्या सामनात अर्धी मुंबई परप्रांतीयांची म्हणून बातमी आहे. शिवसेना बहुतेक जुनेच मुद्दे पुन्हा उकरायला लागली आहे. अन् आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्राधान्य राज ने उचलल्या मुद्द्यांनाच देत आहे. बघू काय होतय ते

  • प्रविण
   जे कांही करताहेत त्या मधे पण असा जिवंतपणा अजिबात नाही. अगदी सुमार ऍक्शन प्लान आहे. नक्कीच फेल होणार..

 2. ह्या रेटने ४४ चे ४ व्हायला वेळ लागणार नाही. मग अमुक ने तमुक खुपसलं वैगरे डायलॉग मारत बसायचे…

  • सिध्दार्थ
   ह्या लोकांना वाटतं की सगळी जनता मुर्ख आहे, आणि अक्कल फक्त यांनाच आहे.
   मुंबई महापालिके मधे कांहीच काम करित नाहीत. साधा कार्पोरेटर पण इथे हातात सोन्याचे साखळदंड आणि पाचही बॊटात सोन्याच्या अंगठ्या घालुन मिरवतांना दिसतात.
   पार्किंग मागे पाच-दहा रुपये वाढवणं म्हणजे हा वर्षभरात सरळ एखाद कोटी रुपयांचा गेम नक्कीच आहे. माझे दिलेले आकडे अगदी खुपच कॉन्झरवेटिव्ह आहेत.
   अशा वागणुकी बघुन वाईट वाटतं. इथेच बाळासाहेब, उध्दव यांनी हस्तक्षेप करायला हवा . पण …………..?

   • निदान २२ ऑक्टोबर नंतर तरी अक्कल ताळ्यावर यायला हवी होती. असो बुडत्याचा पाय खोलात. मला फक्त बाळासाहेबांबद्दल वाईट वाटते. He don’t deserve to see such days.

    • अगदी खरंच मनापासुन वाईट वाटतं, बाळासाहेबांकडे पाहुन.
     आपल्या हातात कांहिच नाही, फक्त पहात रहाणं काय होईल ते..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s