पोस्ट नंबर ३००…………

वर्ड प्रेस मधे ही सोय आहे.. 🙂 तुमच्या ब्लॉग ला आज किती लोकांनी भेट दिली, कुठले लेख वाचले, कुठुन हे सगळे लोकं आलेत? हे सगळं समजतं….काल सहज स्टॅटस्टीक पहातांना सहज लक्ष गेलं आणि लक्षात आलं, की अरे… आज जे पोस्ट असेल ते असेल ३०० वं पोस्ट.. १७ जानेवारी २००९ला हा ब्लॉग सुरु केला आणि आज नोव्हेंबर १ ला ९ महिने १३ दिवस पुर्ण झाले आहेत.  १७ जानेवारीचं पोस्ट हे जस्ट इंट्रोडक्ट्री पोस्ट होतं. त्या मधे हा ब्लॉग कां सुरु करतोय हे लिहिलं होतं..

माझा एक मित्र होता ऑर्कुटवर, त्याचा ब्लॉग होता, पुलं प्रेम म्हणुन. त्याचा ब्लॉग पाहुन असं वाटलं की आपणही मंगेश पाडगांवकरांचा ब्लॉग सुरु करावा. म्हणुन एक पाडगांवकरांचा ब्लॉग आणि एक हा ब्लॉग सुरु केला. कालांतराने लक्षात आलं की पाडगांवकरांच्या कवितांचं कॉपी राईट चं आपण उल्लंघन करतोय, म्हणुन तो ब्लॉग डिलीट करुन टाकला. आणि केवळ हा ” काय वाटेल ते” सुरु ठेवला, आपले अनुभव, मनातले विचार लिहायला.

पहिल्या दिवशी ब्लॉग वर लिहिल्या नंतर दुसऱ्या लगेच पुढचं पोस्टं काय असावं म्हणुन विचार करु लागलो,तेंव्हा मी ग्वालिअर ला होतो, नंतर ठरवलं की अगदी जे कांही मनात येईल ते लिहायचं, आणि दुसरं पोस्ट पण लिहुन झालं.पोस्ट केल्यानंतर वाटलं की ते डिलिट करुन टाकावं.. पण नाही केलं.या पोस्ट वर पण एकही कॉमेंट नव्हती. 😦

पहिली कॉमेंट या ब्लॉग वरची होती तिसऱ्या पोस्ट ला..पहिली कॉमेंट होती भुंगा ची,
. तेंव्हा भुंगा इंग्लंडला होता.ती कॉमेंट वाचली, आणि बरं वाटलं.. आपणही लिहू शकतो हे लक्षात आलं, आणि जे कांही लिहिलंय ते वाचलं जातंय ही भावना पण खुप मनाला समाधान देउन गेली.

तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि उत्साहवर्धक प्रतिक्रियांमुळेच इथपर्यंतचा प्रवास शक्य झाला, अर्थात, पुढे पण तुमची सगळ्यांची साथ राहिलंच..
मनःपुर्वक आभार…

Blog Stats Summary Tables

Total views: 73,859

Busiest day: 662 — Tuesday, September 1, 2009

आज झालेली अवलोकने: 60

बेरजा

Posts: 299

प्रतिक्रिया: 2,800

Categories: 24

Tags: 474

असे निरनिराळ्या विषयांवरचे २९९ लेख लिहुन झाले आहेत, हे लक्षात आल्यावर, मला स्वतःलाच आश्चर्य वाटलं. नंतर जुने लेख वाचुन काढले  कांही.. आर्चिव्ह मधे जाउन.. आणि लक्षात आलं की अनुदिनी लिहिणं सुरु केल्यापासुन माझे मराठी बरेच सुधरले आहे. इंग्रजी शब्दांचा वापर खुप कमी झालाय आधी पेक्षा…. 🙂 असो.. कांही तरी तर फायदा आहे ब्लॉगिंग चा. पुन्हा एकदा, तुम्हा सगळ्यांचे मनापासुन आभार मानुन हे पोस्ट इथेच संपवतोय..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

56 Responses to पोस्ट नंबर ३००…………

 1. sahajach says:

  महेंद्रजी अभिनंदन…मी तुमच्या ब्लॉगची पहिल्या दिवसापासून फॉलोअर आहे. अनेकविध विषयांवरच्या उत्तमोत्तम पोस्ट आणि सहज मांडणी हे तुमचे वैशिष्ट्य…..लिहीत रहा!!!!
  एक चूक आहे २००९ ऐवजी २००८ झालेलं आहे …ते तेव्हढं दुरुस्त करा….

  बाकी काय आम्ही वाचत आहोत, तुम्ही लिहीत रहा!!!!!पुन्हा एकदा अभिनंदन…आजवर अनेकांना प्रेरणा दिलीत पुढेही देत रहा!!!!

  • तन्वी
   धन्यवाद..दुरुस्ती केली.. सुरुवातीला एक गम्मत म्हणुन सुरुवात केली होती ब्लॉगिंगची.कशी सवय लागली तेच कळंत नाही. दररोज एक तरी पोस्ट टाकल्याशिवाय समाधान मिळत नाही. जे कांही मनात येइल ते खरडलं जातं इथे..
   प्रत्येक गोष्टी कडे, आजुबाजुच्या घटनांकडे पहाण्याची दृष्टी बदलली आहे माझी. प्रत्येक घटनेमधे एक ब्लॉग दिसतो मला हल्ली.:)
   तुमचे सगळ्यांचे उत्साह वाढवणारे अभिप्राय… खरंच सांगतो, जर मी लिहिलेल्या ब्लॉग्ज ला अभिप्राय मिळाले नसते, तर इतका लांबचा पल्ला कदाचीत गाठला पण नसता.. 🙂

 2. gouri says:

  teenashe posts cha tappa gaathalyaabaddal abhinandan!

  varshabharaapaasoon blog asataanaa maajhyaa posts che sankhyaa 30 cyaa javalapaas aahe 🙂

   • म्हणजे तुम्ही “सीरियल किलर” प्रकारचा बळी ठरलात तर. चला या सीरियलस मुळे काहीतरी चांगलं लोकांसमोर आलं. बाकी कितीही कामाचा व्याप असो किंवा प्रवासाचा ताप असो, तुमची दररोज एक नोंद असतेच. इच्छा तिथे मार्ग ह्यालाच म्हणतात. तुमची ही सवय आमच्या सारख्यांना स्फूर्तिदायक आहे.

    • सिध्दार्थ
     हा एक चांगला पास टाइम आहे माझ्या साठी. उद्या पण जायचंय सिल्व्हासा ला. रात्री पर्यंत परत येइन. बहुतेक प्रत्येक वेळेस असं वाटतं की जमणार नाही पोस्ट टाकणं.. पण होतं मॅनेज हे खरं..

     मी सिरिअल किलर..चा बळी ठरलोय .. 🙂 खरंच..
     टिव्ही वर मला फक्त बातम्या आणि कार्टुन्स पहायला आवडतं, कधी तरी सिनेमा पण पहातो.. पण सिरियल्स?? नो वे!!

     • काका माझ्या पोस्टला दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. संध्याकाळी नेमका मी बाहेर गेलेलो त्यामुळे लगेच Reply देता आला नाही. आत्ता रिप्लाइ केलाय. तुम्हाला कळाव म्हणून पुन्हा इथे reply करतोय.

      • सिद्धार्थ
       मी बहुतेक प्रत्येक ब्लॉग वर एकदा प्रतिक्रिया दिली की पुन्हा जाउन पहातो, त्यावर ब्लॉग धारकाने काही उत्तर लिहिले आहे कां? म्हणुनच मुद्दाम मी स्वतः प्रत्येक पोस्ट ला उत्तर देण्याची सवय लाउन घेतली आहे.
       खरंच मस्त जमलंय ते पोस्ट.. मजा आली.

    • gouri says:

     महेंद्र, मी लहान आहे तुमच्यापेक्षा … ’तुम्ही’ नको – ‘तू’च म्हणा.
     रोज लिहायला वेळ काढणं हा एक भाग झाला … लिहायला सुचणंही तेवढंच महत्त्वाचं. तुमच्या ब्लॉगलेखनाच्या सातत्याइतकंच पोस्टच्या विषयातली विविधता, रोचकता सुद्धा वाखाणण्यासारखी आहे.

     • गौरी
      इथे ब्लॉग वर लिहिण्याच्या स्टाइल वरुन वय लक्षात येत नाही. उगिच कुणाचा नकळत अपमान न व्हावा, म्हणुन बहुवचनी संबोधन लिहितो मी.पण आता समजलंय तु लहान आहेस, तेंव्हा या पुढे संबोधन “तु”च असेल.. शुभेच्छांकरिता आभार.:)

 3. संजिव सिध्दुल says:

  काका अभिनंदन !!!
  तसं मी तुमच्या ब्लॉग बद्दल माझ्या मित्राकडून ऐकून होतो, पण वाचायचं टाळत होतो. कारण ह्या blogging मधे बराच वेळ जातो.
  एकदा सहज म्हटलं पाहू कसं लिहितात ब्लॉग ! आणि त्या दिवसा पासून नियमित वाचतोय!
  आता तर मलाही ब्लॉग लिहावसं वाटतंय ! पण डिसेम्बर संपेपर्यंत तरी वेळ नाही. त्या नंतर नक्की प्रयत्न करीन.
  असेच छान छान ब्लॉग लिहा.
  ३०० ब्लॉग पूर्ण झाल्या बद्दल पुनश्च अभिनंदन आणि पुढील लिखाणासाठी शुभेच्छा !!!

  • संजीव
   जर तुम्ही विद्यार्थी असाल , तर शक्यतो इतक्यात सुरु करु नका ब्लॉगिंग. ह्यामधे बराच वेळ जातो ही गोष्ट अगदी शंभर टक्के खरी आहे. एकदा पोस्ट टाकलं, आणि वेळ नसला तर सेल फोन वरुन कॉमेंट्स अप्रुव्ह केल्या जातात. सारखं चुकल्या सारखं वाटत रहातं. हा उद्योग अभ्यासाच्या रगाड्यतुन बाहेर निघाल्यावरच सुरु करावा असे माझे मत आहे. तसे विशाल वगैरे काही मुलं करताहेत ब्लॉगिंग.. पण.. !!

 4. तींशे पोस्ट म्हणजे काही साधी गोष्ट नाही. सप्टेंबर पासून मी सुद्धा ठरवलं रोज एक तरी पोस्ट लिहायचं. काही वेळा शक्य होत नाही. पण ‘दिसा माजी काही ते लिहावे’ असं समर्थ वचन आहे. तुम्ही ते पाळलं, अभिनंदन. लिहीत रहा.

  • नरेंद्र
   बरेचदा असं वाटतं की आज जमणार नाही. कधी कधी एकाच दिवशी दोन पोस्ट असतात.. म्हणजे शेवटी गोळाबेरीज बरोबर होते. लिहुन झालं की हलकं वाटतं.. कांही तरी केल्याचं समाधान… 🙂

 5. सचिन says:

  अभिनंदन काका.

  लिहित रहा.

 6. Aparna says:

  अभिनंदन!!!! ek confession sagale wachata aale nahit…pan khup sare wachun kadhale aahet..ani jamtil tithe commentlay…ani khara sangyachya tar sarvach post darjedar astat he tar aahech….aata lawkarach 300 che 3000 houn jau det…ani ho yasathi ekda talya pan jhalya pahijet….:)

  • अपर्णा
   शुभेच्छांबद्दल आभार. आधीचा २०० चा टप्पा अगदी नकळंत पार पडला, पण ह्या वेळेस मात्र लक्षात आलं की ३०० ला पोहोचलो म्हणुन… सगळे पोस्ट वाचुन काढणं जमत नाहीच.. मी जेंव्हा रिकामा वेळ असतो तेंव्हा इतरांचे ब्लॉग्ज वाचतो. ३००० पण होतिल, तुमच्या शुभेच्छा सोबत राहिल्या तर..

 7. Sagar says:

  Abhinandan…….Asch lihit raha……….all d best

 8. ravindra says:

  अभिनंदन महेंद्र राव, फक्त ९ महिने आणि १३ दिवसात ३०० वी पोस्ट लिहिल्याबद्दल. खूप आनंद मिळतो लिहिल्याने आणि वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या तर सोने पे सुहागा च. मी तर खर सांगायला हरकत नाही निव्वळ ब्लोग वर खूप विषय टाकायचे आहेत म्हणून राजा घेवून टाकली आहे १० दिवस. 🙂

  • आमच्या घरी तर ब्लॉग वर लिहायला बसलो म्हंटलं तर सौ. ला फार काही आवडत नाही माझं ब्लॉगींग करणं.. तुम्ही तर चक्क दहा दिवस सुटी घेतली आहे.. 🙂 आमच्या घरी तर महाभारत होईल असं काही मी केलं तर.. 🙂 मी पणं सुटी काढणार आहे, पण सुटी मधे चक्क एकटाच फिरणार आहे गावांकडे.. मुलींची परिक्षा आणि क्लासेस आहेत , नेमके त्याच पिरियडला.. 😀

   • ravindra says:

    मी सुद्धा एकटाच फिरायला जायचा विचार करतोय. इंदोरला जाईन म्हणतो आहे. सुट्टीत इतर हि काही काम करायची आहेतच ब्लॉगिंग सोबत.

    • एकटं रहाणं पण कधी तरी बरं वाटतं.. मला तरी. एकटेपणा पण एंजॉय करु शकतो मी. 🙂 चांगली कल्पना आहे इंदौरला जायची, जुने मित्र वगैरे भेटतील.:)

 9. Rohini says:

  मनापासुन अभिनंदन… 300 पोस्ट्स म्हणजे काय गम्मत नाही 🙂 … आणि पोस्ट्स मधे देखिल विविधता केवढी. Hats off. काही काही ब्लॉगर्सना (माझ्यासारख्या :)) जे वर्षानुवर्षे जमत नाही ते तुम्ही केवळ 10 महिन्यांत केलत. खरंच ग्रेट. आता लवकरच पाचशेवी पोस्ट येऊ देत :). शुभेच्छा.

  • रोहिणी

   शुभेच्छांकरता आभार.
   ऍव्हरेज दररोजचं एक पोस्ट होतं. अमिताभ बच्चन चा आदर्श ठेवला होता. म्हंट्लं, त्याला जर वेळ मिळू शकतो, तर मला कां नाही??

 10. Pravin says:

  Congrats Mahendra,
  >>ऍव्हरेज दररोजचं एक पोस्ट होतं. अमिताभ बच्चन चा आदर्श ठेवला होता. म्हंट्लं, त्याला जर वेळ मिळू शकतो, तर मला कां नाही

  Well said, I ll keep this on mind. Need to get rid of procrastination of writing blog 🙂

  • प्रविण
   धन्यवाद.. अहो एक पोस्ट लिहिण्याइतका वेळ सहज मिळू शकतो.. माझा अनुभव आहे.मी तर बरेचदा प्रवासामधेच लिहुन सेव्ह करुन ठेवतो.

   • Pravin says:

    The problem is not about getting time, the real problem is my mental ability to think something new to write everyday 🙂

    • प्रविण
     मला पण बरेचदा सकाळी काहीच कळत नाही की आज कुठल्या विषयावर लिहावं ते, पण नंतर संध्याकाळपर्यंत सुचतं.. अर्थात किती दिवस सुचेल ते सांगता येत नाही. मग येते, ओढुन ताणुन लिहिलेलं पोस्टं, जे कधिच पुर्ण होत नाही.. ( माझं तरी )
     पण मनापासुन लिहिलेल्या पोस्टची मजाच वेगळी.. 🙂

 11. खुप खुप अभिनंदन आणी पुढील लिखाणासाठी मन:पूर्वक शुभेच्छा … !

 12. bhaanasa says:

  महेंद्र,अभिनंदन!अभिनंदन!!अभिनंदन!!![:)]
  काय म्हणू…..? तू अमिताभचा आदर्श ठेवलास मी तुझ्या प्रेरणेचे,प्रोत्साहनाने नेटाने प्रयत्न करत आहे. काल तुला म्हटले तसे वाचक तुझ्यावर भरभरून प्रेम करतात हे पाहून अतिशय आनंद होतो.अनेकविध विषय तितक्याच प्रभावीपणे तू हाताळले आहेस व पुढेही असेच मनमोकळे व चौफेर लिखाण करशील यात शंकाच नाही. तेव्हां तू लिहीत राहा आम्ही वाचत राहूच.

  • श्री
   अरे बापरे.. कशाला उगिच प्रतिक्रिया टायपत बसलिस? नंतर लिहाची नां.. एवढी काय घाई होती?? काळजी घे..

 13. आनंद says:

  महेंद्रजी अभिनंदन! तुमच्या पोस्ट तर मस्त असताच पण वाचकांच्या प्रत्येक प्रतिक्रियेला मनापासून दिलेला रिप्लाय देखील वाखाणण्याजोगा. ५०० पोस्ट करिता शुभेच्छा.

  • आनंद
   धन्यवाद. आज दिवसभर सिल्व्हासाला गेलो होतो. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया सेल फोन वरुनच अप्रुव्ह केल्या. पण त्यावरुन उत्तर देता येत नाही. म्हणुन आता घरी आल्यावर बसलोय रिप्लाय करीत.

 14. anukshre says:

  अभिनन्दन!
  आपण असेच लिहित रहा. शुभेश्च्या.

 15. Rajeev says:

  ९ महीने आणी १३ दीवस.. ४ दीवस उशीर ?
  हरकत नाही, बाळ गुट्गुटीत आहे……….
  बाळांत बुवा मजेत आहेत……………………
  बरेच लोक ब्लोग मधे बालचेश्टा बघायला येत असतात,
  बाळ असेच वाढत राहो..
  असेच बुध्धीमान राहो…
  ….बाळांत बुवां ना “रम”वायला येतोच..

  • राजीव
   याच प्रश्नाची वाट पहात होतो, की डिलिव्हरी चार दिवस लेट का झाली ते?? आणि तुझ्याकडुन ही कॉमेंट आली..
   बाळ ’रम’वायला कधी येतोस?

 16. पुढील पोस्ट्स साठी शुभेच्छा… असेच आम्हाला नवनवीन विषय देत राहणे. लिहिणाऱ्याने लिहीत जावे, आम्ही क्षुद्रांनी वाचत जावे. न जाणो कधीतरी तुमच्यासारखे आम्ही पण मस्त मस्त लिहू.

 17. महेंद्रजी,
  … माफ करा… बराच दिवस ऑफ होतो… दिवाळी… काम… आणि त्यात कालचा आजार.. आपल्या बर्‍याच पोस्ट वाचायच्या राहिल्यात… विकेन्डला वाचीन..!

  ब्लॉगच्या ३०० व्या पोस्ट बद्दल मनःपुर्वक अभिनंदन! आणि नववर्षाची सुरुवात लाखाच्या वरच्या विजिटर्सनी होऊ द्यात ही शुभेच्छा! आपल्या ब्लॉगवर पहिला कमेंटर म्हणुन मलाही [उगाचच?] अभिमान वाटु लागलाय..!

  मी वाचलेल्या त्या पोस्ट बद्दल – असं मनमोकळं – बिंधास्त लिखान मी आजपर्यंत वाचल नव्हतं .. त्यामुळं कमेंट दिल्याशिवाय पुढे जाणं चुकीचं वाटलं आणि मी कमेंट टाकली.. आणि तेंव्हापासुन – एक बिंधास्त – मनमुराद ब्लॉगर आणि त्यांचे लेख यांची अनुभुती घेतोय! आपले लेख आणि लेखन असेच वाचायला मिळो ही अपेक्षा!

  अनेक शुभेच्छा!

  • अरे हो. तुमची तब्येत ठिक नव्हती नां? आता कशी आहे?
   मला सकाळी थोडा ताप होता, पण कावळ्याचं पाप (क्रोसिन) घेतलं आणि आता बरंय. ब्लॉग सुरु केला तेंव्हा कधीच असं वाटलं नव्हतं की इथे इतके दिवस मी टिकेन म्हणुन. कारण एखादी गोष्ट सातत्याने करणे मला फारसं जमत नाही. कंटाळा येतो लवकरंच.. पण अजुन तरी इंट्रेस्ट शाबुत आहे. बघु या कुठपत रहातो ते..

 18. laxmi says:

  अभिनंदन!!!
  नेट कनेक्षन बंद झाल्यामुळे मला रिप्लाइ लवकर देता आला नाही
  पण वाचून आनंद झाला की तुमची ही ३०० वी पोस्ट आहे.खूप दिवसांपासून मी तुमचा ब्लॉग वाचते.
  कारण सर्व विषयांवर तुम्ही लिहिता मग त्यामध्ये सामाजिक,आर्थिक,राजकीय अगदी विनोदी देखील.
  कुठलाही विषय वर्ज्य नाही.आणि म्हणूनच मला तुमचा ब्लॉग आवडतो.

  ब्लॉग मध्ये प्रत्येक कॉमेंटला उत्तर देत असल्यामुळे ब्लॉगला खूप liveliness(जिवंतपणा) आल्यासारखे वाटते.

  तुम्ही असेच लिहीत राहावे..

  • लक्ष्मी
   शुभेच्छांकरिता आभार. अहो, जेंव्हा वाचक इतक्या मेहेनतीने टाइप करुन कॉमेंट पोस्ट करतात ,तेंव्हा रिप्लाय हा दिलाच पाहिजे . 🙂 बरेचदा असं वाट्तं की आज कांहीच विषय नाही लिहायला!! एकदम ब्लॅंक वाटतं, तरी पण कांहीतरी लिहिलं जातंय.. दररोज.. बघु कुठपर्यंत जमतं ते..

   • laxmi says:

    अहो मी देखील तुमच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने खूप लहान आहे .मला सुद्धा तुम्ही “तू”च म्हणा.
    बाकी ब्लॉगिंला एक प्रकारे चर्चेच रूप दिलय. एकदम मस्तच.

 19. तिनशेव्या पोस्टसाठी तुमचं मन:पूर्वक अभिनंदन. अहो, किती अनुभव तुम्ही शेअर केलेत आमच्याबरोबर या पोस्टसमधून. मी तुमच्या ब्लॉगवर तशी उशीराच आले पण जुने पोस्ट अजूनही वाचतेय. गेले काही दिवस इंटरनेटचं बिनसलं होतं त्यामुळे काहीच नीट वाचता आलेलं नाही. खूप मस्त वाटत असेल ना, सर्व पोस्टस एका ओळीत पाहून. तुमचं लेखनही नावीन्यपूर्ण, सोप्या व समजेल अशा भाषेत असतं त्यामुळे वाचकवर्ग न मिळता, तरच नवल होतं. लिहित रहा. तुम्हाला लिहिण्याची दृष्टी लाभली आहे. तुमच्या ब्लॉगवर लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही वाचण्याजोग्या असतात. एकदा प्रतिक्रिया देऊन भागत नाही. तुमचा लेखच असा असतो की प्रत्येकाच्या प्रतिक्रियेतही काही ना काही निराळं सापडतंच. म्हणून मी तर तुमच्या एका ब्लॉगपोस्टला किमान चार ते पाच वेळा भेट देतेच. ऑफिसचं काम सांभाळून ब्लॉग लिहिण्यासाठी वेळ काढायचा म्हणजे तोंडच्या गप्पा नाहीत. तुमच्या सौ.ना एकदा लेख आणि प्रतिक्रिया वाचायला द्या. इतर मासिकं पुस्तकं वाचणं सोडून देतील त्या. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

  • कांचन
   कांही फार वेळ लागत नाही इथे लिहायला. एखादा लेख लिहायला फार तर एक तास लागतो. एकदा विषय पक्का ठरला की झालं.. पण विषय सापडायला दिवसभर डोक्यात तो भुंगा फिरत असतो… की आज काय पोस्ट टाकायचं म्हणुन!!!सौ. सध्या मराठी चरित्रकोशाच्या साहित्य खंडाचं एडीटींग करते आहे. त्या मुळे ति आपल्या कामात बिझी.. आणि मी इकडे.. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s