चावट -वात्रट आणि आवाज.

ह्या दोन शब्दांमधे किती अंतर आहे? तसं म्हंटलं तर खुप आहे, किंवा अजिबात नाही म्हंट्लं तरीही चालेल.  हे दोन शब्द मनातल्या मनात नेहेमीच फुगडी खेळत असतात. आता फुगडी या साठी म्हणतो, कारण हे दोन्ही शब्द नेहेमी मुलीच वापरतात.बरं ह्या दोन शब्दांमधे साम्य कुठलं?? तर  हे शब्द नेहेमीच मेलेले असतात.. म्हणजे  जसे.चावट मेले, किंवा वात्रट मेले.. 🙂

लग्नाआधी जेंव्हा लग्न ठरलं असतं किंवा ठरण्याच्या बेतात असतं, तेंव्हा तुम्ही कांहीही करायचा प्रयत्न केला, किंवा थोडा पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला की, “च्च्यल्ल, उग्गिच चावटपणा  करु नकोस..” असं म्हणणारी , जेंव्हा ह्या चावट्ट शब्दावरुन जेंव्हा आता बस्स!! वात्रटपणा पुरे…. अशा वाक्यावर  घसरते तेंव्हा लग्नाला कांही वर्षं झाले असे समजायला हरकत नाही.

बरं गम्मत अशी की ह्या दोन्ही शब्दांचे डिक्शनरीत दिलेले अर्थ.. सहज गम्मत म्हणुन पाहिले आज, तर काय असावेत?

चावट = ईन्डिसेंट, ऑब्सेन, व्हल्गर,रुड, क्रूड, डर्टी, ग्रॉस, इम्प्रॉपर.. असे आहेत.. इतका रोमॅंटिक शब्दं आणि त्याचे असे अर्थ?? बहुत ना इन्साफी है ये..

बरं वात्रट= मिस्चिव्हस..

म्हणजे बघा, लग्ना पुर्वी जो चावट असतो तो लग्नानंतर वात्रट होतो..  गम्मत आहे की नाही??मला वाटतं की मुलींना या शब्दांचा नेमका अर्थ माहिती नाही, म्हणुन  लग्ना पुर्वी चावट आणि लग्ना नंतर वात्रट शब्द वापरतात मुली ..

हे दोन शब्द आज कां आठवले?? दर वर्षी दिवाळी आली की लहानपणी मुलांचे मासिक, किंवा फुलबाग ( निटसं नांव आठवत नाही, पण या मासिकात सगळे रंगित प्रिंटींग असायचं, गुलाबी, निळा ,हिरवा फॉंट वापरुन ) आणि चांदोबा चा दिवाळी अंक कधी येतो याची वाट पहायचो, पण थोडं मोठं झाल्यावर या मासिकांच्या ऐवजी ’आवाज’ ची वाट पाहु लागलो.

’आवाज’ !! पाटकरांचा आवाज.. वात्रट वार्षीक आवाज!! बस्स! एकच शब्द आठवतो आवाज म्हंटलं की- वात्रट पणाचा कळस असलेलं वार्षीक !!  चावटपणा, वात्रटपणा आणि अश्लिल पणा.. या मधे एक लहानशी अस्पष्टं रेषा असते. आज पर्यंत आवाज च्या प्रत्येक अंकामधे ती रेषा कधिही ओलांडल्या गेली नव्हती.  आवाज चा वात्रटपणा हवा हवासा वाटायचा. आवाज चा अंक आला की तो वाचुन पुर्ण झाल्याशिवाय खाली ठेवला जात नव्हता.

दिवाळी मधे फराळासोबत मनाला, गुदगुल्या करणारा, थोडा वात्रट थोडा चावट असलेला  आवाज चा अंक असल्याशिवाय दिवाळी आहे असं वाटायचंच नाही.

पण…. आज जेंव्हा या वर्षीचं आवाज आणलं लायब्ररीतुन.. तेंव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आवाज च्या अंकामधे काय आणि किती लिहायचं, कुठपर्यंत ताणायचं, याचं तारतम्य न बाळगल्या मुळे आवाज चा यंदाचा अंक अतिशय अश्लिल  झालाय. लहानसे जोक्स पण अश्लिलते कडे झुकणारे वाटले.  मला थोडं फार चावट वगैरे वाचायला अजुनही आवडतं.. 🙂   (कन्फेशन म्हणा हवं तर) पण अश्लिल आवडतं नाही..

आवाज च्या ’खिडक्या’ ज्या पहातांना थोडी हुर हुर वाटायची-की काय असेल बॉ आतमधे??.. ती आता अश्लिल पणा कडे झुकल्या मुळे  निराशा झाली. इतकी की  घरी आणलेलं मासिक मुलिंच्या हातात पडु नये म्हणुन कपाटात ठेवावं कां ? असंही वाटंत होतं.

बरं विनोदी कथा वगैरे म्हणाव्या, तर सगळ्या कथा, अगदी प्रतिथयश लेखकांच्या पण एकदम रटाळ आहेत. एकंदरीत काय.. तर पाटकर गेल्या पासुन ’आवाज’ बसलाय…  पार बोऱ्या वाजलाय आवाजाचा…पुढल्यावर्षी पासुन आवाज वाचणे बंद!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged , , . Bookmark the permalink.

50 Responses to चावट -वात्रट आणि आवाज.

 1. Sagar says:

  Sir ya post mule mazi ek aathvan jagi zali.maze baba diwalit aavrjun aavaj cha ank aanayche an bahutekda te malach paper masik kinva kahi pustak mhana malach aanayla sangayche.Mazya gavchya fakat bus standvar chya book stall var ya goshti milaychya….tenva mala hi tya aavaj ya ankach aprup hot.An ek secrte gosht sangto AAVAJ ha ank mi ghari chorun vachaycho…..Thanks 4 ur post…tya Chavat aathvani jagya zalya…..Pan kahi hi mhana Aavaj chi majach nyari hoti.An mala aathvat ki ek AAVAJ navach dusr masik pan aal hot.tya baddal aapnas kahi mahiti aahe ka?

  • आवाज नावाचे दुसरे एक मासिक सुरु झाले होते, पण पाटकरांच्या आवाज ची भ्रष्ट नक्कल होतं ते . मी ज्या आवाजावर लिहिलंय ते म्हणजे पाटकरांचा आवाज या नावाने लिहिलं गेलेला आवाज.. लहानपणी हे वार्षीक लपुन वाचायचो… घरुन सक्त ताकिद असायची की आवाज आणु नकोस लायब्ररीतुन म्हणुन.
   आवाज ,मधे प्रसिध्द झालेल्या बऱ्याच कथांवर चित्रपट पण निघाले आहेत, जसे भैरु पैलवान आणि गंगु तेलिणीचा नाव आठवत नाही पण त्या मधे अशोक सराफ होता.

   • समीर says:

    सासू वरचढ जावई

   • Chandrashekhar Chandvale says:

    अनिरूद्द पुनर्वसू यांनी लिहिलेली आवाज दिवाळी अंकातील “कुठला कोण रामदास ” हे विडंबन कविता कुठून मिळेल ?

 2. gouri says:

  rangeet, haataane lihilelaa `phulabaag’ asaayacha. ashok maahimakaraancaa.

  • त्या फुलबाग मधे मस्त गमती असायच्या. क ची करामत, व ची वटवट वगैरे.. आमच्या लहानपणी हॉट अन फेवरेट्स मधलं एक मासिक होतं ते.. बंद पडलंय आता.

 3. mipunekar says:

  mi pan aawaz cha chahata ahe. ya varshicha aawaz pahila navhata. aaj tyacha aawaz aiku aala. Jar sarvanni aawaz kade vinanti waja patra pathavali tar te mul padavar yevu shakatil. Baghato awaz chi kahi site vagaire sapadate ka….

 4. काका आज ऑफीसमधून निघालो तेंव्हा “काय वाटेल ते…” चेक केलं. म्हटलं आज काका आपल्यासारखे अडकले कामात. आज पोस्ट चुकली. पण आत्ता झोपाण्यापूर्वी (अपेक्षेने) पहातो तर काय पोस्ट ३०१ हजार. क्या बात है. मानलं तुम्हाला.

  आत्ता पोस्ट बद्दल – पाटकर गेल्यापासून आवाज बसला हे अगदी खरं. मी देखील परवा कोल्हापूरला बंगलोर बस लागेपर्यंत एका बुकस्टॉलला आवाज चाळत होतो. जरा जास्तच चाळला. मग दुकानदाराने “११० रुपये, घ्यायचाय का? (थोडक्यात खाली ठेवा आत्ता)” असे विचारले. पण ट्रेलर पाहून सिनेमा काही चांगला वाटला नाही. त्यामुळे नाही घेतला.

  बाकी ” चावट आणि वात्रट हे शब्द नेहेमीच मेलेले असतात.. म्हणजे जसे.चावट मेले, किंवा वात्रट मेले..” हॅट्स ऑफ

  • आज सिल्व्हासाहुन परत येतांना टॅक्सी बंद पडली वाटेत, म्हणुन घरी परतायला वेळ झाला. तरी पण एक लहानसं पोस्ट टाकल्या शिवाय रहावलं नाही. :)बरं झालं नाही घेतला ते .. अगदीच रटाळ आहे अंक या वेळचा. त्या ऐवजी बेस्ट ऑफ आवाज आहे ३५० रुपयांना, तो घ्या.. मस्त आहे एकदम. त्या मधे गेल्या पन्नास वर्षातल्या बेस्ट कथा आहेत.

 5. मस्त लेख लिहिला आहे.वाचून खूप करमणूक झाली.

 6. लेख तुम्ही नेहमीप्रमाणेच छान लिहिला आहे. आवाज मीही वाचत होते. लहानपणी अर्थातच गुपचूप. मात्र गेल्या काही वर्षात आवाजच काय कोणताही दिवाळी अंक वाचण्याची सवड मिळाली नव्हती. ह्या वात्रट, चावट किंवा जे काय असेल ते, त्याची एक गोष्ट पाहिलीत तुम्ही? हा प्रकार इंटलेक्च्युअल असतो. कोणताही वात्रट जोक्स, गाणी, कृती या सा-या प्रकारांमधे मेंदूचा वापर असतो. तसा तो इतर दैनंदिन कृती करतानाही असतो. पण इथे कौशल्य पणाला लागतं. आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ व्यक्त करताना मर्यादाभंग होणार नाही याची काळजी घेऊन केलेली धिट शृंगारिक कृती म्हणजे चावटपणा किंवा वात्रटपणा असं मला वाटतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत झालं.

  कृष्णाच्या गोपींबरोबर केलेल्या रासक्रिडेला आपण ’लीला’ म्हणतो, तीच कृती दुर्योधनालाही अभिप्रेत होती. मात्र, द्युतप्रसंगामधे भर दरबारात जबरदस्तीने बोलावलेल्या द्रौपदीसमोर ही कृती व्यक्त करताना दुर्योधनाने उघडी मांडी थोपटून अश्लिलतेचं प्रदर्शन केलं आणि तो खलनायक ठरला.

  वात्रटपणा, चावटपणा अलौकिकपणाची पातळी सोडून खाली उतरला की तो अश्लिलपणा होतो. तरीदेखील या पातळीच्या मोजमाप पट्टीला काळाचं बंधन आहेच. कारण पूर्वी सिनेमात दोन फुलं एकमेकांना बिलगलेली दाखवली की नायक नायिका रोमान्स करतात हे आपण गृहीत धरायचो. तेच आता ’आशिक बनाया आपने’ सारख्या गाण्यांमधून उघड रोमान्स दाखवूनही आपण त्याला अश्लिल म्हणू शकत नाही कारण त्याला कलात्मकतेची जोड आहे.

  आणखी एक उदाहरण म्हणजे मराठी ’ब्रह्मचारी’ या चित्रपटात मिनाक्षी शिरोडकरांनी स्विमिंग सूट घालून गायलेलं गाणं -’यमुना जळी खेळू’. त्या काळी ते गाणं पाहून कित्येकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आज स्विमिंगसूटला कुणी तरी अश्लिल म्हणेल का? काळानुसार अश्लिलतेची व्याख्या बदलते ती अशी.

  ’चोली के पिछे क्या है’ हे गाणं जवळ-जवळ अश्लिलतेची सीमा गाठूनही चावट गाणं यासदरात मोडतं कारण नायिका म्हणते ”चोली में” दिल है मेरा’. (या गाण्यात प्रश्नातला ’चोली के पिछे’ व उत्तरातील ’चोली में दिल है’ हा शब्दांमधला फरक बहुधा गाण्याला अश्लिलतेकडून चावटपणाकडे खेचत असावा, नाहीतर हे गाणं कायमचं निषिद्ध झालं असतं. तरीदेखील अशी गाणी आपण लहान मुलांसमोर पहात नाही कारण त्यात थोडाफार छुपा शृंगार असतोच. स्थळ, काळ वेळेचे भान राखून शृंगार कितपत व्यक्त केला जावा याचं लहान मुलांना ज्ञान असूच शकत नाही म्हणून बहुधा ’अशी गाणी पाहून लहान मुलांच्या मनावर विपरित परिणाम होईल’ असं म्हटलं जात असावं.

  चावट, वात्रट नि अश्लिल या सर्व शब्दांमधून शृंगारीक कृती अभिप्रेत असते मात्र, केवळ शब्दप्रयोगाच्या फरकामुळे कृतीला चांगल-वाईट किंवा निती-अनितीचं लेबलं लागत असावं. चावट मेले, वात्रट मेले मधील ‘मेले’ हा शब्द कृतक् कोपाने उद्गारला जात असावा. ’आवडतंय’ पण कुणी पाहिलं तर काय म्हणेल? या भितीपोटी हा शब्द उच्चारला जात असावा. अश्लिल मेले असं कुणी म्हणताना दिसत नाही कारण अश्लिल चाळे चारचौघांना पहायला मिळावेत अशी कुणाही सभ्य स्त्री-पुरुषाची इच्छा नसते.

  काही वर्षांपूर्वी मी सुहास शिरवळकरांची एक कादंबरी वाचली होती (नाव आता लक्षात नाही, आठवल्यास इथेच प्रतिक्रियेत लिहीन.) त्यातील काही उदाहरणे वाचून आणि तुमचा लेख वाचून हे मनोगत व्यक्त करण्याची प्रेरणा मिळाली. माझ्या बुद्धिनुसार लिहिलं आहे. चूकभूल द्यावी घ्यावी. धन्यवाद!

  • आनंद says:

   ओह्ह…हे वाक्य दुर्योधनाने म्हटले आहे होय… कृष्ण करे तो रास लीला, हम करे तो character ढिला. 🙂

  • कांचन
   तुमची सुंदर प्रतिक्रिया वाचली. मला तर वाटतं की इतकं चांगलं मुल्यमापन मला कधिच करता आलं नसतं.

   “आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ व्यक्त करताना मर्यादाभंग होणार नाही याची काळजी घेऊन केलेली धिट शृंगारिक कृती म्हणजे चावटपणा किंवा वात्रटपणा असं मला वाटतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत झालं.”
   मिनाक्षी शिरोडकरांचं यमुना जळी या गाण्याला त्या काळात नावं ठेवणारे लोकं होतेच. पण आज तेच गाणं बघतांना कांहीच वाटत नाही. कारण त्या काळात जे अश्लिलतेच्या सिमेवरचं मानलं गेलं होतं, ते आज अगदी सहज सम्मत झालंय.
   बरसात मधे हिरोइनला आज बिकिनी मधे पहातांना आज जरी कांही वाटत नसलं तरिही, त्या काळी तो सीन एकदम बोल्ड सीन म्हणुन प्रख्यात होता. आज त्या सीन पेक्षा जास्त एक्स्पोझर टिव्ही वर दाखवलं जातं.
   मी लहान असतांना मला बॉबी पाहु दिला नव्हता, मग मी घरुन पैसे चोरुन तो सिनेमा पाहिला होता. सांगायचा उद्देश हा, की त्या काळी, म्हणजे मी लहान असतांना तो सिनेमा मुलांनी पहाण्या योग्य नाही असं वडिलधाऱ्या माणसांचं मत होतं. पण त्या सिनेमात आज पहाल , तर कांहीच नाही दाखवलेलं..

   तुम्ही ते लेडी चॅटर्लीज लव्हर नावाचं पुस्तक वाचलं कां? त्या पुस्तकावर कोणे एके काळी बंदी होती, अतिशय सुंदर कोर्ट केस आहे त्या पुस्तकात.

   कदाचीत कालानुरुप या शब्दांच्या व्याख्या पण बदलत जातील.

 7. Nishikant says:

  Kaka.. Ekdum Mastach lihilaay.I used to like Jatra as well. Started reading blogs last weeks. And finished ALL of your blogs. You can call me Blogomaniac ;). Need some information. I want to know some book shops where i can get good marathi magazines and books in goregaon/malad (west). Could you please suggest some.
  Thanks a lot.. And keep writing..

  • गोरेगांव मालाड पेक्षा दादरला गेलात तर आयडियल बुक स्टोअर्स आहे ना, छबिलदास शाळे जवळचं, तिथे सगळं कांही मिळतं. गोरेगांव/मालाडला कांहिच मिळत नाही. 😦 अरे हो. जत्रा आणि मोहिनी पण असायचं , ते अजुनही मिळतं, पण आवाज ची मजा आवज मधेच!!!

 8. Nishikant says:

  Dhanyawaad 🙂

  • My pleasure.. जुनी पुस्तकं हवी असतील तर धोबी तलावाजवळ, आणि दादर वेस्ट ला दुकान आहे . खुप फेमस आहे, कोणिही सांगेल.. 🙂

 9. सुहास शिरवळकरांच्या त्या कथेचं नाव आहे – कळप.

  • अच्छा :). मी वाचलेली नाही. तसंही माझं कथा/कादंबऱ्या वाचणं कमी झालंय.. हल्ली फक्त करंट अफेअर्स जास्त वाचले जातात.. बस्स!!

 10. Rajeev says:

  रंगीत प्रींट आणी हस्त लीखीत असा एकच अंक
  “फ़ुलबाग”
  “फ़ुलबाग”
  “फ़ुलबाग”
  “फ़ुलबाग”

  आता उदाहरणे बघ
  पाटकरांचा आवाज ——वात्रट
  जुने मेनका,बया——–चावट
  आताचे बया————बीभत्स xxx sheeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee

 11. Rajeev says:

  आता स्वामी राजरत्नानंद म्हणतात,

  खट्याळपणा,चावटपणा, वात्रटपणा, टवाळपणा, ही सर्व जवळीक
  नीर्माण करण्याची प्रगल्भ बुद्दीच्या मानवाला लाभलेली नीसर्गद्त्त
  देणगी आहे.
  एकटाच माणूस एकांतात असे काही करायला लागला की त्याला …वेडा म्हणतात,
  समाजात करायला लागला की……ट्वाळ म्हणतात,
  लैंगीक चेष्टा ( बाकीच्यांना आवडणार्या ) ….वात्रट म्हणतात,
  आवडून ही, त्या आवडल्या नाहीत असे भासवीणारे त्याला ..चावटपणा असे संबोधतात,

  पुढील पायरी ही नीसर्ग नीयमाच्या जवळ आहे.. त्या मुळे उत्पत्ती होते..
  त्याला जीवा-शीवाचे मीलन म्हणतात,
  ह्यात जो खट्याळपणा,चावटपणा, वात्रटपणा, टवाळपणा आणतो त्याला वीक्रूत म्हणतात

 12. मेलेल्या चावट व वात्रट यांना जिवंत केलत… 🙂

 13. bhaanasa says:

  किशोर, चांदोबा, गोट्या….आमच्या घरी नेमाने येत.विचित्र विश्वही येत असे, आवडती मासिके.:)
  मला वाटते चावटपणा करू नकोस किंवा चल चावट मेला/कुठला हे शब्द सहसा होणा~या नव~याला/झालेल्या नव~याला( लग्न झाल्यानंतर मूल होईतो )/ किंवा जवळच्या मित्राला संबोधले जातात. लग्न जरा जुने झाले की पुरे झाला वात्रटपणा….ओघाने येते. पण इथे आणखी एक भागीदारही हा ’वात्रट ’ शब्द शेअर करतो. तो म्हणजे झालेले मूल-मुलगा असू दे की मुलगी. छल वात्रट कुठला/कुठली…..:)किंवा किती वात्रटपणा करशील रे? सहसा मुलांनाच उद्देशून आई करवादत असते-मात्र या वात्रटपणाच्या तक्रारीत खूप राग नसतो. तिची तक्रार/कुरकुर असते.थोडाफार वात्रटपणा मुल करणारच हेही गृहीत असते.
  आवाज वाचला नाही अनेक वर्षे झालीत. या वर्षी तर एकही दिवाळी अंक वाचायला अजून मिळाला नाही.:( पण ब~याच अंकावरील प्रतिक्रिया अनेक ठिकाणी वाचल्या…काही खास दम नाही हेही कळले.
  महेंद्र बाकी चावट-वात्रट खूश झाले बरं का.:)

  • अरे हो.. वात्रट पणा हा शब्द मुलांना पण वापरला जातो. पण मी जेंव्हा लिहिलं तेंव्हा केवळ एकच नातं डोक्यात होतं. दिवाळी अंक नाही मिळाला? हं… दिवाळी अंकाशिवाय दिवाळी म्हणजे थोडं अवघडंच आहे नाही? तिन दिवस दिवाळीचे मस्त फराळ आणि दिवाळी अंक, सोबतंच फटाके.. लहानपण काय मस्त होतं नां?

 14. mala pan devganri madhe post karayche ahe. tumi devnagri madhe kasa lihayche?

 15. Rohan says:

  “जेंव्हा ह्या चावट्ट शब्दावरुन जेंव्हा आता बस्स!! वात्रटपणा पुरे…. अशा वाक्यावर घसरते तेंव्हा लग्नाला कांही वर्षं झाले असे समजायला हरकत नाही.”

  हा अनुभव बोलतोय ना रे दादा… 😉

  बाकी ते ‘आवाज’ मी सुद्धा नित्य नियमाने वाचायचो (म्हणजे बघायचो 😉 ..) दरवर्षी… आता बंद झालय.

  • अनुभवंच लिहिला असतो इथे बहुतांशी, फक्त हा अनुभव आहे .. असे नमुद करित नाही मी.. 🙂
   या वर्षी आवाज घेतला नाहीस ते बरं केलंस.. अगदी टुकार आहे यंदाचा अंक.. पण जर आयडीअल ला गेलास तर निवडक आवाज म्हणुन एक अंक आहे गेल्या पन्नास वर्षातील आवाज मधल्या दरवर्षी एक या प्रमाणे कथांचे कलेक्शन .. .. तो जरुर घे.. मस्त आहे एकदम..

 16. Abhishek Mule says:

  मी सहमत आहे मलाही या वेळेच ‘आवाज ‘ अंक आवडला नाही !! एकंदरीच सगळेच दिवाळी अंक पूर्वीसारखे राहिलेले नाहीत विनोदी अक्नांची घसरण चालू आहे !!

 17. suren says:

  shrungar,ashlil, bhibhatsa aani chawatpanat fark kay?

  • चावट आणि वात्रट यातला फरक तर वर दिलेला आहेच. बिभत्स म्हणजे जे पहातांना अतिशय घृणा निर्माण होईल असे.
   अश्लिल.. म्हणजे अश्लिलच.. दूसरा शब्द नाही, आणि इथे जात एक्स्पेन पण करता येत नाही..
   आपल्या साहित्यामधे नवरस म्हंटले आहेत त्यातले हे काही निवडक !

 18. VINAYAK SHAHAPURKAR says:

  Patkaranchya Awazbaddal apan je kahi lihilant te yogya vatal. Mi pan lahanpanapasun Awajacha vachak aahe, Mazya sangrahat 1982-83 pasunache ank hote te sarva ank mazya patnine raddivalyala dile. Hya varshicha “AWAZ” mazya mulinpasun dur thevanyachi kasarat karavi lagat ahe. Chavat, vatrat, vaigere baddal khup chan lihilat,

  Dhanyawad.

  • विनायक
   आवज शिवाय दिवाळी अजूनही होत नाही माझी. हल्ली आवाजमधले गेल्या पन्नास वर्षातले सिलेक्टेड लेख असलेला एक संग्रह निघाला आहे. किम्मत ३५० रू. नक्की घ्या विकत. खूप छान आहे. प्रतिक्रियेकरता आभार.. 🙂

 19. geeta says:

  pan halli ha shabda pryog nahi hot .. halli

 20. geeta says:

  halli ha naughty ha shabd praoyog khup hoto….tumche blog wacle ke mala English cha visar hoto aani aase watate ki marathi bhashevar punha jam basu lagly. karan hali jastit jast English bhashecha shabd Pryog hot aahe……..thanku sir

  • ,गीता
   मराठी मधल्या शब्दांची नजाकत इंग्लिश शब्दांमधे नसते. बायको इश्श म्हणून लाजली, की अजूनही कसं मस्त वाटतं पहायला तिच्या आविर्भावाकडे! जो वात्रट पणा चावट मधे आहे तो नॉटी मधे नाही. शब्द एकदम मनाला भिडणारे आहेत मराठीमधले.. नाही का??
   डोळे मोठे करून अय्या खरंच???? म्हणून एखाद्या मुलीने म्हंटले, की कलेजा खलास झाला.. अशी गत व्हायची आमची !! 🙂
   ज्या भावना मातृभाषेत जास्त योग्य रित्या व्यक्त करता येतात, त्या इंग्रजी मधे नाही, हे माझं खरं खरं मत आहे 🙂

 21. nitinbhusari says:

  दिवाळी अंक ………………….
  आम्ही लहान असतांना आमच्याकडे आवाज आणत नव्हते …….
  पण चंद्रकांत आणि धनंजय आवर्जुन असायचे.

  • चंद्रकांत मधे दीर्ध कथा असायच्या 🙂 मला आठवतं ते मासिक. धनंजय डीटेक्टिव्ह मासिक पण आठवतं. खूप वाचलं आहे ते. लायब्ररी मधे नंबर लागायचे त्या साठी 🙂

 22. nitinbhusari says:

  लेख खुप आवडला.

 23. रमेश बालकोंडेकर says:

  मी 1990 पासून आपला वाचक आहे आपले अंकाशिवाय अपूरी दिवाळी असे मला वाटते

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s