जुने फोटो…

इ.सन. १९३० ते १९४० …त्या काळी फोटो काढणं म्हणजे एक खुप कांहीतरी महत्वाचं, आणि सामान्यांच्या आवाक्या  बाहेरचं काम होतं. फोटो काढणे हे फक्त गर्भ श्रीमंत किंवा मोठ्या हुद्यावर असलेल्यांचीच मक्तेदारी असायची.

माझ्या काकाच्या घरी ब्लॅक ऍंड व्हाइट काढलेले ते जुने  फोटो ग्राफ्स जेंव्हा एका जुन्या पेटी मधे सापडले तेंव्हा , चक्क एक खजीना हाती लागला असे वाटले आणि ते फोटो सगळ्यांनी मिळुन  पहातांना पण खुप मजा वाटली. बऱ्याच लोकांना आम्ही ओळखत नव्हतो, मग काका सांगायचे, हा बाळ भोंदु , हा  सुरेश भट, वगैरे वगैरे..

प्रत्येक फोटो ची एक कहाणी आहे. वडिलांनां/काकांना विचारले तर त्यांनी बर्याच जुन्या फोटो मधल्या  लोकां बद्दल  .माहिती दिली. बरेच लोकं तर काळाच्या ओघात या जगात पण राहिलेले नाहीत. पण फोटो च्या स्वरुपातल्या आठवणी आहेत.

हल्ली मोबाइल कॅमेरामुळे फोटो काढणं जरी सोप्पं झालं असलं तरीही जुन्या फोटो ची मजा काही औरच आहे.हल्ली  केंव्हाही, आणि कधीही कॅमेरा हातात असल्यामुळे सारखं उठ सुट फोटो काढणं सुरु असतं, कुठल्याही फोटो स्टुडिओ मधे गेलं की हवी असल्यास याची प्रिंट पण घेता येते चार रुपयात..

……….पण हे जे जुने फोटो आहेत त्यांची गम्मत वेगळीच .ह्या जुन्या फोटो मधे त्या काळच्या फॅशन्स, किंवा रहाणी मानाचं प्रतिबिंब दिसुन येतं. इथे कांही सिलेक्टीव्ह फोटो पोस्ट करतोय.. फोटोंचा काळ आहे १९२५ ते १९७० पर्यंतचा.

आमच्या घरी एक मेड इन इंग्लंड कॅमेरा होता. त्या मधे २० एम एम ची फिल्म बसायची. त्या फिल्म ला कॅमेऱ्यामधे बसवणं पण एक कला होती.  मला आठवतं की त्या कॅमेऱ्यात फिल्म बसवतांना नेहेमी दोन तिन स्नॅप्स खराब व्हायचे. पण नंतर येणारे जे फोटो असायचे ते मात्र अप्रतीम किंवा अगदी पुर्णपणे फेल्युअर.. म्हणजे असं, की चांगले फोटो काढले तर ती तुमचं  कौशल्य, आणि बिघडवले, तर त्याचा अर्थ की तुम्हाला फोटो काढता आला नाही.त्या कॅमेऱ्यात अपार्चर, आणि फोकस सेट करावा लागायचा. एक जरी चुक झाली की फोटो बिघडला.

बऱ्याच लोकांच्या ऍगफा आयसोली नावाच एक प्रिमिट्व्ह कॅमेरा असायचा. त्याने फोटो काढणे पण एक कलाच होती.

Dada

हा माझ्या वडिलांचा फोटो.. ते जेंव्हा पाच वर्षाचे होते तेंव्हा म्हणजे साधारण ७९ वर्षापुर्वीचा फोटो आहे हा. हा फोटो घराच्या पडवीत ( ओसरी मधे) काढलेला आहे. मागचा तट्टा दिसु नये म्हाणुन एक गालिचा मागे लावलेला दिसतो. पण जर तो मागचा तट्टाच असु दिला असता तर फोटॊ नक्कीच जास्त छान आला असता.शर्ट तर ठीक आहे, पण कोटाच्या बाह्या लहान झालेल्या दिसताहेत. पायातले बुट पहा.. म्हणजे ७० -७५ वर्षापुर्वी ची फॅशन असावी ती.अंगामधे वुलनचा कोट आणि पॅंट आहे. हे म्हणजे सुखवस्तु पणाचं लक्षण मानलं जायचं.

Picture 032

हा फोटो सौ. आणि तिचे दोन भाउ यांचा. साधारण १९६९ सालचा असावा. तिघंही बघा ह्या फोटो मधे कसे नॅचरल पोझ देउन बसले आहेत ते.

Picture 108

हा फोटो आहे माझ्या आजोबांचा , इंदौरच्या विल्सन कॉलेजातुन ( बहुतेक नांव बरोबरच असावं) ग्रॅजुएशन पुर्ण केलं तेंव्हाचा-त्यांच्या बरोबर शिकलेल्या मित्रांच्या बरोबर काढलेला आहे हा... १९२२ सालचा.धोतर, बुट, कोट टोपी.. त्या काळच्या कॉलेज कुमारांचे परिधान..

Picture 112

आजोबा तहसिलदार होते, त्यांचे कोणितरी फिरंगी बॉस.. आज्जी ने नांव सांगितलं होतं, पण विसरलो. फोटो आहे खांडव्याचा..

Picture 171

या फोटो मधे आहे मी, स्वामी राजरत्नानंद या नावाने जो कॉमेंट्स टाकतो नां तो आर्किटेक्ट राजीव.. आणि माझी आत्या.

त्या काळी पाचवार साडी नेसणं, आणि स्नो पावडर लावणं म्हणजे खुप फॅशन करणं असा अर्थ होता. कुटिकुरा मलम ( कुटिकुराचं फेस क्रीम मिळायचं असं आज्जी सांगायची  आणी त्या क्रिम ला मलम म्हणायचे ) आणि कुटीकुरा पावडर म्हणजे एकदम हाय क्लास प्रॉडक्ट्स..

Picture 131

आजोबांनी तेंव्हा मोटर घेतली होती. (तीला आज्जी मोटरंच म्हणायची) ऑस्टिन मायनर आणि आत्या . १९४०-४५ सालचा फोटो असावा हा.

Picture 101

आजी -आजोबा १९२३

Picture 222

अजुन एक जुना फोटो..माझे काका आणि आत्या..

त्या काळी कार म्हणजे एक अल्टीमेट लक्झुरी  समजली जायची. नविन कार घेतल्यावर सिट कव्हर नव्हते म्हणुन गालीचाचे तुकडे करुन ते बसायला वापरले होते, असे आज्जी सांगायची.

Picture 203

मोटर घेतली तेंव्हा ती एक नव्हाळी होती. कार नविनच आली होती .फक्त पार्शी लोकंच कार घ्यायचे.. आणि भारतीय +मराठी माणुस कार घेतो, म्हणजे एक मोठी गोष्टं, म्हणुन कार च्या बरोबर बरेच फोटो आहेत काढलेले.

या सगळ्यांच्या कपड्यांवर मास्टर भगवानचा ठ्प्पा दिसतो की नाही?? तेंव्हा पायजामा जस्ट फॅशन मधे आलेला असावा. पॅंट कोट वगैरे पण होतेच.. पण ते उच्च पदस्थांसाठी. इतर सामान्य लोकं पायजामा शर्ट, किंवा धोतर वापरायचे.

काकांची आणि वडिलांची मित्रमंडळी.. कित्ती फॅशनेबल आहेत नां सगळे?? त्या काळी पायजामा नविनच होता. बरेच लोकं धोतरा ऐवजी पायजामा वापरायचे.

काका, वडिल आणि त्यांची मित्र मंडळी.. कपडे बघा कसे आहेत ते.. त्या काळी धोतर नेसणे बंद करुन पायजामा वगैरे वापरणे जस्ट सुरु झाले होते...

सौ. लहानपणचा फोटो.

सौ. लहानपणीचा फोटो

me

हा मी, एकदा ट्रेकींग हुन परत येतांना बस बंद पडली होती , तेंव्हा एका मित्राने क्लिक केला . मी सिगरेट ओढत नाही बरं का आता..हा फोटो आहे २५ वर्षापुर्वीचा..

त्या वेळेस जस्सी जैसी हे सिरियल खुप पॉप्युलर होतं. त्यामुळे बाहुलीचं नांव होतं जस्सी, आणि तो बाहुला अरमान. बहिणीकडे तिसऱ्या मजल्याचं बांधकाम सुरु होतं, म्हणुन तिथे भिंतीवर रंगवणं  जस्सी वेड्स अरमान वगैरे. खुप काही केलं होतं मुलींनी.. त्याच सुमारास वडिलांची ७५वी झाली होती, म्हणुन सगळी मोठी माणसं पण होती या लग्नाला.

 बाहुला बाहुलीचं लग्न.. बाहुलीचं नांव होतं जस्सी, आणि बाहुला अरमान..

बाहुलीचं लग्नं झाल्यानंतर दोन्ही विहीणी केक कापतांना..लग्नं तर झालं.पण नंतर झालेली भांडणं पण खुप आठवणीत आहेत.बाहुलीचं लग्नं झालं, आता तीला इथेच ठेउन जा म्हणुन..

असे कमीत कमी १०० च्या वर फोटो सापडले आहेत. मस्त खजीना आहे . तुमच्याही घरी असेल. शोधा..आणखिनही असे बरेच फोटो आहेत,   हे असे जुने फोटो सापडले की मग ते पहातांना वेळ कसा जातो तेच समजत नाही. इट्स फन…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , . Bookmark the permalink.

65 Responses to जुने फोटो…

 1. sahajach says:

  मस्त पोस्ट आहे….जुने फोटो सही आहेत….गॉगल लावून फोटो काढणे हा एक काय विलक्षण आवडीचा प्रकार होता राम जाणे. आमच्या दोघी बहिणिंचाही असा एक फोटो आहे ज्यात बहिणीच्या डोळ्याचा गॉगल आईने मागून धरून ठेवला आहे.
  जुने फोटो पहायला पण एक हिंमत लागते….मी अमितला आमचे जुने फोटो दाखवण्यापुर्वी त्यातले बरेच काढून ठेवले होते.

  जुनी गाडी वगैरे मस्त वाटतय पहायला…..

  • गॉगल हा त्या काळी अगदी नविनच होता, त्या मुळे मुलांना कधीच मिळत नसे, म्हणुन कदाचीत असेल.. जुने फोटो बघायला खुप हिम्मत लागते. ही गोष्ट खरी.. पण तेच फोटो जास्त एंजॉय केले जातात पहातांना.स्पेशिअली लग्नामधे फोटो काढतांना पुढे पुढे करणारी लहान मुलं.. आज जेंव्हा पहातो, तर कोणि डॉक्टर, कोणि इंजिनिअर, कोणि बॅंकर झालेले आहेत. तेंव्हा तर कुणाचंही लग्नं असो, आपला फोटो त्यात आलाच पाहिजे असा अट़्टाहास असायचा.. म्हणुन प्रत्येक फोटो मधे नवऱ्या मुलाच्या, किंवा मुलिच्या मागे मागे रहायचं.. :)महणजे प्रत्येक फोटो मधे येतो आपण..

 2. Prashant says:

  thanks for sharing. old pics….old memories….
  magic of black n white snaps is superb……….!

  • फार जुने फोटो आहेत .. असे जवळपास १०० च्या वर असतिल फोटो.. त्यात कोण आहे हे सांगायला कोणितरी माहितीगार असला तर अजुन मज्जा येते..

 3. Ajay says:

  ekdam flashback madhye gelysarkha vatalaa, majaa aali photo bhagtanaa, sakali sakali photos pahun enjoy kela specially tumcha photos, ekdam amol palekar distay bar ka tumchi, to photo khup avadalaa, post hi ekdam bhari aahe tyat, ekdam befikir vagaire …

  -ajay

  • अजय
   त्या काळी ( २५ वर्षांपुर्वी ) मला ट्रेकिंगची खुप आवड होती. खुप ट्रेक्स केले आहेत तेंव्हा. मजा यायची. म्हणुन तर पंकज,रोहन, आणि भुंगाचे पोस्ट वाचायला आवडतं मला.तो फोटो काढला मित्राने, आणि मला खुप दिवस त्रास दिला घरी पाठवतो म्हणुन,म्हंटलं, तु कशाला- मीच पाठवतो, आणि घरी पाठवुन दिला तो फोटो घरी.. 🙂 नंतर मात्र त्याने त्रास देणे बंद केले.

 4. Sevakram says:

  ramya tya athavani, ani ramya te diwas, ajkal phot click karnya madhe kahich vatat nahi,purvi agadi ek photo vaya jail mhanun selective photo nighayache. tumcha khajina khupach cchan ahe.Sadhya asteen kuthe ahe,ki vikun takli ajobanni.Bhutkalat parat jata yet nahi.mhanunahi kadachit pan June zale mhanaje tyanchi kimmat vadhate asahi asel kadachit pan june photo pahayala khup avadatat mala, ani bahutek sarvannach…..

  • त्या मधे खुप फोटो आहेत . तेंव्हा खास कार्यक्रम असायचा फोटो काढणे हा.. कार खुप वर्षांपुर्वीच विकुन टाकली. आजोबा रोड ऍस्किडेंट मधे गेले , अकोल्याचे कलेक्टर असतांना.. नंतर मग कांही वर्षांच्या नंतर कार काढुन टाकली . मी सहा वर्षाचा होईपर्यंत घरी होती ती कार.. जुने फोटो मस्त वाटतात पहायला.

 5. जुण्या फोटोंबरोबर जुण्या आठवणीही ताज्या होतात… मस्त फोटो आणि आठवणी आहेत!
  ….. हां, तुमचा तो सिगि-वजा फोटो – जाम डॅशिंग वाटतोय… अगदी जुन्या मराठी चित्रपटातील हिरो शोभताय.. मला तर अगदी नाना पाटेकरची आठवण येवुन गेली… एक दोन सिनेमात = ‘राघु-मैना’ किंवा ‘माफिचा साक्षिदार’ असावा – अगदी असाच दिसला!

  • दिपक,
   त्या पिरियडला मला ट्रेकिंग चं खुप वेड होतं..खुप ट्रेक्स केलेत. बहुतेक प्रत्येक सुटीच्या दिवशी आमचा ग्रुप जायचा कुठे तरी फिरायला. गेले ते दिवस आता… पण अजुनही इच्छा आहेच, एकदा कुलु मनाली ट्रेक करायची.. 🙂 सिगरेट सोडली नंतर नेहेमी साठी. फक्त हा एकच फोटो आहे त्या दिवसांतली आठवण.

 6. फारच असामी होती आपली तर… आणि ’सौं’ना काय लहानपणापासूनच ओळखत होतात की काय?
  त्या ट्रेकच्या इश्टाईल फोटोवर आपण फिदा आहे बरं

  • हो ना. 🙂 अगदी लहान पणापासुन.. 🙂
   आणि ट्रेकिंगचा तो ड्रेस पण ठरलेला होता. एक निळ्यारंगाचा समोरुन पुर्ण चेन असलेला टी शर्ट आणि जिन्स. हंटर शुज आणि एक खाकी रंगाची सॅक..

 7. त्या जुन्या कॅमेरापैकी काही आहे का? काही अवशेष?

  • नाही.. काळाच्या ओघात गेला कुठे तरी . दोन गोष्टी मी मिस करतो जुन्या , एक म्हणजे आणि तो कॅमेरा.. मला अजुनही वाटतं की तो सापडायला हवा .. !! & आमचा ग्रामोफोन , त्या सोबत असलेली रेकॉर्ड हवा मे उडता जाये मेरा लाल दुपट़्टा ही, आणि अभी ना जाओ छोड कर ही.. हरवले कुठे तरी .. 😦

 8. Pravin says:

  Amazing snaps. I like to look at the printed copies than seeing them online. BTW that cigarette snap is awesome 🙂

  • प्रविण
   त्या स्नॅप नी -म्हणजे मित्रांनी त्या स्नॅपचा फायदा घेउन -मला खुप छळलंय.. आणि बरंच खर्चात पण पाडलंय.. वर लिहिलंय एका कॉमेंट मधे.. असो.. प्रतिक्रियेकरता आभार..

 9. Hirsch says:

  Cigarette snap …………….. cool!!

 10. Manju says:

  Mahendra jee,Bhunga mhanto te ekdum patalay…Nana Patekar ch..
  Mala na tya photot tumchya mage pathmori basalelya bai la baghityavar mazi aai,aatya hyanche june photo athavale. Tyahi ashyach sailsar ‘venya’ thevayachya.
  June photos kharach senti kartat.

  • मनाली
   सहमत आहे.. जुने फोटो पहाणं म्हणजे एक मजा असते. बऱ्याच जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. हा जुना खजीना हाती लागला, तेंव्हा तर मी अगदी उडीच मारायचं बाकी ठेवलं होतं. अजुनही काही फोटो आहेत म्हणे घरी, सुटी मधे गेलं की बघु.. फोटो ची क्वॉलिटी कांही खास नसली तरिही पहायला मजा येते.
   BTW,तशी सैलसर वेणी घालण्याची फॅशनच होती तेंव्हा.
   नाना पाटेकर सारखा .. 🙂 जेंव्हा दाढी ठेवली होती तेंव्हा म्हणायचे, पण आता ह्या फोटोला पहिल्यांदाच ही कॉमेंट मिळाली.

 11. @भुंगा – मला तर अगदी नाना पाटेकरची आठवण येवुन गेली… पूर्ण पाने सहमत.

  काका अगदी सिक्स पॅक Abs वैगरे. सही.

  बाकी ७०-८० वर्षापूर्वी तुमच्या आजी-आजोबांचे आणि आत्ये-काकाच्या लहानपणीचे फोटो काढले गेले आणि ते तुम्हाला तसेच तुमच्या पुढच्या पिढीला पाहायला मिळाले. खरच खूप भाग्यवान आहात.

  “सौं’ना लहानपणापासूनच ओळखत होतात.” प्रेम विवाह का? त्याबद्दल लिहला नसाल तर टाका की एखादी पोस्ट.

  • सिध्दार्थ
   हे फोटो पण असेच दुर्लक्षीत पडले होते. माझ्या काकांनी त्या निगेटिव्हज वरुन पुन्हा प्रिंट्स काढल्या कांही, आणि कांही ओरिजिनल जुन्या प्रिंट्स आहेत. आणि ते सिक्स पॅक्स वगैरे नाही .. मी अगदी काडी पहेलवान होतो, पण सलमान प्रमाणेच कुठेही शर्ट काढायची तयारी असायची माझी.. 🙂

 12. आनंद says:

  सिगारेटच्या फोटोमध्ये दोन इप्सित दिसतात, एक महेंद्राजी आणि दुसरे म्हणजे एसटीच्या चाकाजवळ बसलेले ते 🙂
  काही असो फोटो सुरेख आला आहे… मला जुने कृष्ण धवल फोटो खूप आवडतात, जास्त क्लीअर वाटतात. त्या काळची फँशन पाहून मजा येते… यातील काही फोटो पाहून वडिलांचे जुने फोटो आठवले… मस्त पोस्ट आहे.

  • आनंद,
   तसं कांही नव्हतं बरं.. तेंव्हा आम्ही फक्त मुलं -मुलंच जायचो ट्रेकला .सोबत मुली नसायच्या आमच्या गृप मधे .. सुटी मधे बघतो अजुन कांही फोटो सापडतात कां ते..

 13. वाह भारी खजिना आहे तुमचा.मी सुद्धा कधी कधी विरंगुळा म्हणून लहानपणीचे अल्बम्स काढून बसतो.मजा येते बघायाला आणी जुन्या आठवणीत हरवायला.चला तुम्ही परत एक कारण मिळवुन दिलत मला जुने अल्बम्स बाहेर काढायला.तसे सगळेच फोटो छान आहेत पण’स्ट्राइकिंग’ फोटो आहे तो तुमचा,मला सुद्धा तो फोटो पहातांना लगेच नाना पाटेकर ची आठवण आली.आणी एक गाण सुद्धा ओठांवर आल,
  ‘हर फ़िक्र को धूवेमे उडा ता चला गया ……’

  • देवेंद्र
   धन्यवाद. रविंद्रच्या ब्लॉग वर त्यांना सिगरेट ओढायला लावणाऱ्या मित्राचा फोटो पाहिला, आणि ह्या पोस्ट बद्दल सुचलं.. 🙂

 14. harshal says:

  sagle photo mastch ahet….. mala khup aavadtat ase june b/w photo pahayla… ek veglech jag samor yete.
  mala to rangit tumcha cigarette pitanacha photo pan khup aavadla. ekdum dashing hero vatta tumhi, marathi art movie madhla kuthlatari scene vattoy. mastttt….

  • हर्षल
   धन्यवाद. इथे जागे अभावी पोस्ट करता आले नाहीत , जवळ पास १०० च्या वर फोटो आहेत. लवकरच सगळे फोटो पिकासावर टाकायचे आहेत- बहुतेक रवीवारी.. 🙂 .

 15. फोटो छान आहेत. तुमच्या सौ. अगदी गोड दिसतायंत. तुमचा डॅशिंग लूक फोटो आवडला. तो फोटो तुमचा आहे, यावर सुरूवातीला विश्‍वास बसला नाही. कृष्णधवल प्रकाशचित्रे पाहिली की मलाही जुने दिवस आठवतात. एकदम नॉस्टॅलजिक व्हायला होतं. कधी तरी माझ्या फोटोंबद्दलही लिहिन.

  • कांचन
   धन्यवाद.. जुन्या फोटो मधले आपले लहानपणचे फोटॊ खुप मजेशीर असतात. 🙂
   लवकर लिहा..तुमच्या फोटो च्या पोस्ट ची वाट पहातोय..
   BTW गोड तर आहेच.. फक्त मला डायबिटीस झाला नाही म्हणजे मिळवलं..

 16. Sagar says:

  just awesome….kharch khup sundar post aahe….kas kai suchal post baddal?photos khupch sundar aahet….my fav is that cigi vala………jst love it….khari tumchya mulini pahilyavar pratikiya hoti?an ghari aai babani photo pahilyvar kai mhanale?btw once again nice post

  • तशी घरी कल्पना होतीच… त्या मुळे फारसं वादळ उठलं नाही. पण लवकरच सोडली सिगारेट मी.

 17. Rajeev says:

  जूनी चीत्रं, डोळ्यातल्या पाण्याबरोबर आठवणी सांडतात,
  अचानक फ़ोटोतले लोक उठतात …..
  आजोबा आजी, काका आणी काकू हळूच हसतात.
  जुन्या भींतीनच घर जाग होत……..
  ……….सुट्ट्यांच्या सकाळच उन लेतं.
  प्रायमसच्या आवाजात, पुजेची घंटी येते एकू,
  ………..उठा म्ह्णणत ओरडते नवी काकू
  लाल करडी मनी जोरात फ़िस्कारते….
  ….. .मोत्याच्या नाकाला हळूच बोचकारते…
  साखर झोपेतला भाउ चादर ओढतो..
  ……चांदोबाच्या स्वप्नांची माझी झोप मोडतो.
  घडी करतात चादरी फ़ोटोतल्या चंद्राबाई.
  …….भांड्यांचा आवाज करतात फ़ोटोतल्याच भागीबाई.
  थकलेले आई बाबा चाळीशीचे होतात,
  ……. कीनरया आवाजात सौभद्राची गाणी गातात..
  खरोट्यांचा वेडा बंडू जोरात पळ्त येतो..
  …… मंजु ताईला टूक टूक चीडवून जातो..
  ह्ळूचकन सगळे परत फोटो मधे जातात..
  ……. जागेपणी आपल्या समोर यायला भीतात..

  ….. एक मजा मात्र खरी आहे बघा..
  तूला मला सगळ्यांना शेवटी फोटो मधेच जागा !!!

  • “एक मजा मात्र खरी आहे बघा..
   तूला मला सगळ्यांना शेवटी फोटो मधेच जागा !!!”

   तुझ्याच कॉमेंटची वाट पहात होतो. म्हंटलं की तु अजुन कशी काही कॉमेंट टाकली नाहिस?? तो फोटो आणि त्या सोबतच अजुन एक फोटो आहे त्या मुधोळकर पेठेतल्या घरात काढलेला, ज्या मधे माझा हात तोंडावर ठेवलेला आहे तो…
   काय दिवस होते नं? चालायचंच .. काही वर्षातच तु आणि मी पण असेच फोटो मधे जाउन बसु..
   जे आहेत ते वर्षं मजेत घालवायचे.. बस्स…

 18. salil says:

  Mk
  Ekdum “Nana Patekar” look
  Sahi aahe.

 19. bhunga shi sahamat ! ekdam nana patekar sarkha photo ahe to !
  saglech awdle !

 20. Rohan says:

  वा.. सर्व फोटो मस्तच पण तुझा फोटो मस्तच आहे. काय स्टाईल आहे .. हाहा.

  • अरे स्टाइल वगैरे कांही नाही. ट्रेक नंतर परत येतांना बस फेल झाली म्हणुन रिलॅक्स करित होतो.. आणि तेवढ्यात मित्राने क्लिक केले.. बरेच दिवसानंतर दिसलास?

   • rohan says:

    अरे हो … कामात होतो काही दिवस … आता ३-४ दिवसात येइन पुन्हा फोर्मात …:D

 21. संजिव सिध्दुल says:

  काका, मस्त झाली पोस्ट!!! सकाळी सकाळी जुन्या आठवणी ताज्या झाल्या!
  आमच्या घरीही जुन्या फोटोंचा संग्रह आहे. साधारण १९५० च्या पुढचे फोटोज आहेत सगळे. त्यातील काही फोटोंचे digitization करतोय आता. काही फोटोज आता माझ्या orkut account वर पण टाकलेत.
  तुमचा तो treking वरून येतानाचा फोटो खुप आवडला. एकदम dashing!!!!
  BTW, सिद्धार्थच्या प्रश्नाचं उत्तर नाहि दिलात! “सौं’ना लहानपणापासूनच ओळखत होतात.” प्रेम विवाह का? त्याबद्दल लिहला नसाल तर टाका की एखादी पोस्ट.”

  • अरे काय सांगायचं.. 🙂 चालायचंच.. आता हे काय वय आहे कां अशा गोष्टी लिहायचं? अरे पन्नाशीला पोहोचलो मी आता 🙂

 22. Sagar says:

  Sir Vay pannashila gela…pan dil abhi java hoga….Kharach taka ki ekahadi post…….Tumchya lagna baddal……plz…mhnaje kas aamhla kahi tips gheta aalya tar pahav……:)

 23. Aparna says:

  सर्व फोटो मस्तच….:)

 24. bhaanasa says:

  मजा आली रे तुला असे सिगरेट ओढताना, शर्टाची बटणे उघडी टाकून एकदम सल्लू स्टाईलमध्ये पाहताना. किती बदलावे मानसने,:P. बाकी खरेच आहे, प्रत्येक वेळी आईकडे गेले की जुने फोटो आम्ही काढून बसतो….इतक्या रम्य आठवणी त्यासोबत जोडलेल्या आहेत. खूप आनंद होतो रे पुन्हा पुन्हा असे भूतकाळात रमून जायला. आई-बाबाही अगदी रंगून इथे बघ असे झाले होते, मी कशी दिसतेय ना…..वगैरे उत्साहाने सांगत असतात ते पाहून अतिशय बरे वाटते. सुपर्णाचे लहान पणीचे दोन्ही फोटो सही आहेत. मला अजून आठवतेय आजीकडे गेलो की दरवेळी फोटो सेशन चाले. बापरे! किती जामानिमा, सगळ्यांचे ठेवणीतले कपडे. त्या फोटोग्राफरची लगबग…आम्हां मुलांचे सारखे पुढे पुढे करणे…

  • सहमत आहे. माझे फारच कमी फोटो आहेत लहानपणिचे . पण जे आहेत ते पहायला मजा येते.. अजुनही मुलींचे लहानपणच्या फोटोचे १०० अल्बम असावेत, ते काढुन बसतो, प्रत्येक फोटोच्या मागे एक हिस्टरी असते.. ती आठवुन ते फोटो पहाण्याची मजा कांही औरच..

 25. Renuka says:

  Maja ali photo pahun.. yatale mostly me pahile ahet pan couple of them are new for me!! 🙂
  Vahini che photo khup ch cute ahet! 🙂

  • रेणुका
   तुझा फोटो पण टाकणार होतो. पण म्हंटलं… जाने दो.. माफ कर दिया.. अगं माझ्या कडे बिंकुचे पण लहानपणचे फन्नी फोटो आहेत ब्लॅक ऍंड व्हाईट- कानामधे फुल अडकवुन वगैरे.. पण नाही टाकले.. लवकरच पिकासावर टाकुन तुला लिंक पाठवतो.

 26. Amol says:

  I must say , the photo while ur reurtning from trek IS AWESOME, and ur wife’s pic from her childhood where she is standing and giving mischevous smile is also also good.. keep posting.
  Sorry I could not read all the posts, damned busy these days, but makes time in between. I will read all of it soon, but u write too fast…. gotta take a whole day off to read all of it 🙂
  waiting for the posts .

 27. ajayshripad says:

  photo chann aahet dada…! aaplyala tumcha cigret sobat cha photo far bhari vatala….! Ekdum NANA PATEKAR distay tumhi…..!:)

 28. ravindra says:

  काय पोज दिलीय राव तुम्ही. एकदम नानाच की. 🙂 असो जुनी फोटो म्हणजे एक खजिनाच असतो. तुमच सुखवस्तू कुटुंब असल्याने केमेरा गाडी होती. माझ्या कडे तास काही नाही. पण मी शाळेत असतानाचे मित्रांबरोबरचे नंतर लग्नाचे फोटो पाहिल्यावर छान वाटते. तुमच्या लेखात खांडवा इंदोर हि नाव आल्याने छान वाटल. माझ्या चांगल्या परिचयाची शहर आहेत हि. माझ बालपण ११ वी पर्यंत नेपानगर(जिल्हा खांडवा) आणि इन्जिनिअरिन्ग इंदोरला झाल आहे. छान पोस्ट झाली आहे. मला वाचायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी.

  • अहो माझे आजोबा तहसिलदार होते, नंतर पुढे अकोल्याला कलेक्टर म्हणुन बदलुन गेले. खांडव्याला बरीच वर्षं काढली त्यांनी. आज्जीचं आवडतं गांव खांडवा म्हणजे.
   आजोबांचं शिक्षण इंदौरलाच झालं. जुने फोटो म्हणजे खरंच खजीना असतो.. मला अजुनही आवडतं पहायला.. तुमच्या पोस्ट वर श्रीवास्तवचा फोटो पाहिला, आणि हे पोस्ट सुचलं.. 🙂

 29. शिनु says:

  मस्त आहेत फ़ोटो.

  राजीवची कविताही मस्त

  ते गॊगलवरून आठवलं. आम्ही शाळे बिळेत होतो तेंव्हा एका दिवाळीच्या सुट्टीत तुळशीबागेतून आम्हा सगळ्या पोरींना काकांनी पर्स घेऊन दिल्या होत्या आणि त्यानंतर त्या घेऊन म्हणजे खरं तर फ़ोटोत दिसतील अशा दाखवून फ़ोटोसेशनही केलं होतं अंगणामधे. कारण त्यावेळेस खानदानात पहिलाच कॆमेरा आला होता. त्यामुळे सटासट फ़ोटोसेशन व्हायची. ईईईई…आता फ़ोटो पहातानाही लाज वाटते. काय वाट्टेल ते उद्योग करतो, पण त्यातही गंमत आहे म्हणा. यावर ब्लॊगवर लिहिन म्हणते आता. 🙂

  बाकी क्रुष्ण धवल फ़ोटो खुपच छान आहेत. एकदम झटॆंग.

  • कालच आईने माझे मौंजीचे फोटो काढुन दिलेत. श्वेत धवल आहेत पण पुन्हा पहातांना मस्त वाटतंय.. जुने फोटो म्हणजे खजीना, उघडला की कसा वेळ जातो ते पण कळंत नाही.
   तुमचे ते जुने फोटो टाका ना ब्लॉग वर.. एक चांगलं आर्टिकल होईल तयार.. जुन्या आठवणींचं..

 30. nandkishor dambale says:

  mi photoghaphar ahe photo kadhane mala vawadtat-june photo pahatana annad watto-

 31. pradeep vaishampayan says:

  pradip vaishampayan 1955 te 1970 paryant khandwa yethe rahat hoto tya mule khandwyacha ullekh hotach man junya athawnit ramun gele amhi tya veles govindeshwar mandirajawal hariganj yethe bapatwadyat rahat hoto gokhlewada bedekarwada vaidyawada hi kahi jawalchi thikane
  far far anand zala
  pradip vaishampayan, badlapur Tal. Ambarnath Dist. Thane
  Mob. 9850500774, Res. 0251-2691774

  • प्रदिपजी
   ब्लॉग वर स्वागत. खंडव्याला बरीच वर्ष गेली आजोबांची. पण नंतर अकोल्याला बदली झाली आणि तिकडेच सेटल झाले ते.. प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.

 32. Dinesh Pawar says:

  Kharach khup chaan photos aahet…maja aaali june photo baghun..

 33. nitinbhusari says:

  सगळे फोटो फारच छान आहेत.
  मजा आली, तुमचा फोटो तर अप्रतिम !!!!!!!
  खुप खुप धन्यवाद . आपल्या आनंदात सहभाग दिल्याबद्दल.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s