वंदे मातरम..

वंदे मातरम

वंदे मातरम

मुस्लीमांनी वंदे मातरम या गीताचे गायन करु नये.. असा फतवा पुन्हा एकदा ताजा करण्यात आला. या फतव्या मागचं बेसिकंच चुकीचे आहे असं मला वाटतं..

ह्यांचं म्हणणं असं आहे की मुस्लिम लोकं देशासाठी जिवन दान देतिल.. ( या बाबतित कांहीच संशय नाही , माझ्या मनात तरी ) पण वंदे मातरम म्हणणार नाहित , कारण त्या धर्मात परवरदिगार सोडुन इतर कोणालाही वंदन करणे हे इस्लाम च्या विरुध्द आहे .

कुठल्याही धर्माचा मी अभ्यास केलेला नाही, म्हणुन मी स्वतः या विषयावर लिहायचे टाळतो..पण जेवढं वाचलंय त्यावर माझी स्वतःची काही मतं आहेत.

हे मुस्लिम लोक हांजी अली किंवा तत्सम  दर्ग्या वर जाउन चादर चढवतात.  प्रेअर करतात….. म्हणतात मेरे गरीब नवाज मुझे बचाओ .. वगैरे वगैरे… अफजल खानाच्या कबरीवर जाउन प्रेअर करतात..  फुलाच्या हाराची गुंफलेली चादर पण त्या थडग्यावर चढवतात. थोडक्यात त्या थडग्यालाच देव मानुन पुजा करतात , त्या कबरीची ऑलमोस्ट पुजा करतात..  अपल्या घरामधे देव्हारा बनवुन तिथेहे काबा , मक्का चा फोटो लावतात, कुराणातली आयतं फ्रेम करुन लावतात आणि त्याची पुजा करतात बऱ्याच ठिकाणी पाहिलंय की त्या फोटोला हार  नाही फुलांची चादर बांधतात–  हे  सगळं चालतं?? हे सगळं इस्लाम ला मान्य आहे?? अर्थात नाही.. पण हे सगळं करतातंच ना?

इथे इस्लाम खतरेमे है म्हंटलं की झालं.. आणि जर एखाद्या (सुशिक्षित) मुस्लीम सुधारमत वाद्यानी त्यांच्या विरुध्द कांही बोललं की मग त्याला सरळ काफीर ठरवुन त्याची निंदा नालस्ती करायची. तसंही या समाजात बरेच लोकं  अशिक्षीत आहेत- माफ करा… असं म्हणण्यापेक्षा, या समाजात जास्त शिक्षीत लोकं नाहीत, हे म्हणणे जास्त योग्य ठरेल.

धर्मा बद्दलचं ज्ञान हे फार कमी लोकांना पुस्तकाद्वारे ( कुराण शरीफ ) मिळालेले नाही, तर मुल्ला मौलवी यांच्या कडुन ऐकीव स्वरुपात मिळालेले असतं . त्या मुळे बऱ्याच गोष्टी  या विकृत स्वरुपात माहीती होतात.  अर्ध्याहुन जास्त लोकांना अरेबिक येत नाही. मग त्या आयतांचा अर्थ कसा कळणार?
मुल्ला मौलवी   कुराणातल्या आयतांचा आपल्या स्वार्थाप्रमाणे अर्थ लावुन सामान्य लोकांना मिसगाईड करतात  , असे माझा एक मुस्लिम मित्र सांगतो.त्यांच्या  फायद्याचे सगळे कुराणेशरीफ मधे दिलेले आहे असं म्हंटलं की झालं.. सगळे लोकं भेड चाल प्रमाणे फॉलो करतात.  इस्लाम मधे सांगितलेलं नाही –तरी पण चादर फिरवली जाते, पैसा जमा केला जातो मजार मधे,आपल्या कडे आरती मधे करतो तसा… असो…

उपरवालेकी मारसे बचॊ.. असं म्हणुन सगळ्यांना घाबरवलं जातं.. वरच्याला घाबरा असं सांगायचं ,आणि मग ते मौलवी लोकं त्यांना पाहिजे तसं तुमच्या कडुन करुन घेतात . पण दुर्दैवाने आज सुशिक्षीत मुस्लीम्स फार कमी असल्यामुळे त्याच फावतं

आमचा एक ड्रायव्हर होता, त्याला होती ९ मुलं, म्हट्लं, अरे इतक्या महागाईच्या दिवसात इतकी जास्त मुलं कशाला? तर म्हणे, साब, तुम्हारी कार का पंचर निकालने, स्टार्टर डायनामो रिपेर करने, और सर्व्हिस करने मेकॅनिक कहांसे मिलेंगे अगर हमे इतने बच्चे नही होंगे तो.. आता, यातला विनोदाचा भाग सोडा, पण वस्तुस्थिती तशिच आहे..

सगळ्यात शेवटी.. एकच सांगतो, जर वंदेमातरम म्हणणं इस्लामच्या खिलाफ आहे, तर मग सगळ्या मजारी असणं पण इस्लामच्या खिलाफ आहेत.. तिथे जाउन प्रेअर करणं पण इस्लामला मान्य नाही… ते सगळं पण लवकरंच बंद करा.. म्हणाव.. !!

मुस्लिम मुल्ला लोकं पैसे घेउन फतवे कसे काढतात, ते पुर्वी एकदा टिव्ही वर स्टिंग ऑपरेशन मधे दाखवलं होतं.म्हणुन वंदे मातरम म्हणुन नका हा फतवा एखाद्या मुस्लिम नेत्याच्या दबावाखाली पोलिटीकल इशु असावा म्हणुन, काढला असण्याची   मला तरी जास्त  शक्यता  वाटते..

आपल्या हिंदु धर्मातही कांही फारशी वेगळी परिस्थिती नाही..  त्या बद्दल उद्याचं पोस्टं. कारण हे आजचं पोस्ट खुप मोठं झालंय..

 

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , . Bookmark the permalink.

28 Responses to वंदे मातरम..

 1. महेंद्रजी, तुम्ही म्हणता ते सगळं ते वाकून करतात, गुडघे टेकतात, ‘वंदे मातरम्’ ताठमान ठेवून म्हणायचं असतं.

  • ते पण खरंच म्हणा.. पण ते मुल्ला लोकं बऱ्याच गोष्टी इस्लाम मधे नसतांना पण लोकांना करायला सांगतात, आणि इथे एखाद्या नेत्याला थोडा जरी पोलीटीकल फायदा दिसला की मग तो मात्र त्याचे फतवे काढायला लावतो/ फतवे निघतात..

 2. मुल्ला मौलवी कुराणातल्या आयतांचा आपल्या स्वार्थाप्रमाणे अर्थ लावुन सामान्य लोकांना मिसगाईड करतात.
  > खरंय… माझ्याही काही मुस्लिम – मित्रांच हेच म्हणणं आहे.

  मात्र प्रामाणिकपणे सांगायचं तर इतर धर्मातही हे आहेच की? हां, प्रमाण – घातकता वेगळी असु शकते.. देव – पुजारी – धर्म यांच्या नावावर राजकारण चालतंच की. काही वर्षांपुर्वी, “छैय्या छैया” या गाण्यावर – “जन्नत” या शब्दासाठी आक्षेप घेतल्याचं आठवतय..मात्र राष्ट्रगीतांवरही फतवे निघताहेत हे दुर्दैव!

  • हा प्रकार लवकर थांबवला गेला नाही, तर इतकी मोठी लोक संख्या त्या मुल्लांचं म्हणणं फॉलो करतिल..

 3. Rajeev says:

  हिंदू, सीख, क्रिस्चन लोकांना वंदे मातरम पाठ आहे ?
  कीती आमदार, खासदारांना वंदे मातरम पाठ आहे ?,
  शिक्शक, प्राध्यापकांना वंदे मातरम पाठ आहे ?,
  सरकारी आणी सनदी अधीकार्यांना वंदे मातरम पाठ आहे ?,
  कीती पत्रकारांना संपुर्ण वंदे मातरम कागदावर लीहीता येईल?
  मी तर ह्या वादाला सुरु करणर्यांचे आभार मानतो,
  कारण त्या निमीत्ताने का होईना , “वंदे मातरम ” हे शब्द
  वर्तमान पत्रात छापुन येतात, लोकांच्या तोंडुन उच्चारले जातात.
  स्वता: एखादी गोश्ट सोईस्कर रीत्या वीसरून जायची, अथवा करायची नाही…
  दूसरा ती करत नाही म्हणाला की आरडा ओरड कराय ची …
  अरे शहीद अब्दुल हमीद, मौलाना अबुल कलम आझाद , गौस खान, ह्याना का वीसरता ?
  कीती तरी मुसलमान राष्त्ट्रभक्त होउन गेले, आहेत आणी होतील..
  वंदे मातरम म्हणायचे आणी पैसे खायचे अशा राष्त्ट्रभक्ती चा काय उपयोग ?
  ज्या मौलानांनी हा फ़तवा काढ्ला आहे , ते पोटभरू गोसाव्या सारखे आहेत…
  काही तरी करून वाद उकरायचे आणी आपली तूंबडी भरायची, अन्यथा अश्या लोकांना
  काळे कुत्रे वीचारत नाही…..

  • अशा लोकांना विचारणारे आहेत नां.. म्हणुन तर फावतं. इथे सायनला एक मोठा मेळावा सुरु आहे त्यांचा, त्या मेळाव्यात हे वक्तव्य करण्यात आलं. अशिक्षीत असलेल्या समाजाला, धर्माच्या नावाखाली एकत्र ठेवणं सोपं जातं.. सारखं भिती दाखवत रहायचं.. की इस्लाम खतरेमे है म्हणुन.. की झालं….!!
   वंदे मातरम… किती लोकांना पुर्ण म्हणता येतं?? हा तर एक मिलियन डॉलर प्रश्न आहे. पण आता रेहमानच्या गाण्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती असेल.. कदाचित निराळ्या चाली मधे.. 🙂

  • zmanoj says:

   हिंदू धर्मामध्ये सिम्बोलीजम ला जास्त महत्त्व दिल जातं, इतर धर्मामध्ये ते इतक्या प्रमाणात नाही. इस्लाम मनोरंजनाच्या विरोधात आहे, तरीही जश्न, जलसे, उरूस होतात. सुफी फकीर गाणे गात धर्म प्रसार करायचेत. (तो इतिहास वेगळा आहे…) जे इस्लाम ला मान्य नाही, ते सगळ साळसुदपणे इस्लामच्या भल्यासाठी मान्य आणि अमान्य केले जाते.
   आपण सांगितल्या प्रमाणे, किती हिंदूंना वंदे मातरम पाठ आहे हा प्रश्न एकदम मुळावर घाव घालणारा आहे. वंदे मातरम म्हणणे हे सिम्बोलीजम आहे. वंदे मातरम म्हणणारा प्रत्येक जन जसा देशभक्त होऊ शकत नाही तसा वंदे मातरम न म्हणणाराहि देश द्रोही होऊ शकत नाही.
   नेशन फर्स्ट, हि संकल्पना ज्यांना फक्त मान्य नसून जो ती आचरणात आणतो तो खरा देशभक्त. कुठलीही जात, धर्म, प्रांत देशभक्तीला विरोध करत नाही. (इस्लाम वगळता)
   इस्लाम ला मुळात देश हि संकल्पनाच मान्य नाही. इस्लाम खतरेमे है, म्हंटल कि झाली दंगल सुरु, गेला देश गाढवाच्या गांडीत. आता, सर्वच हिंदू काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. पण जर देशभक्तीचे प्रमाण जर बघितले तर निशंक पने हिंदू धर्मात ते अतुलनीय आहे. कारण हिंदू धर्मापासून देशप्रेम विभक्त करता येणे अशक्य आहे.
   वंदे मातरम म्हणणे हि देशभक्तीची अंतिम कसोटी नाही असे मी मानतो. पण, आणखी एक अटल सत्य हि मानतो: “वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम”

 4. Sagar says:

  Sir Khary tumch mahnan….Pan mala rag yeto to rajakarnyancha ….Kunaihi chakar shabd kadhat nahi yavar…..Shivasena tar bolli pan itarnch kai?Te congess vale tar far deshbhakatichya bata kartat aata tond uchakatav mhanav……Raj thakare pan gappa basalay………Tya Rahula gandhila mhanav aata kuthe geli deshbahati…..Bol mahnav kahitari……Sagala sar votebankaesathi…..Dadhya kuarvalayche veshyapekhsa khalchya darjache examplasa vatat mala he…….an ek apeksha muslima kadun pan aahe nidan sushikshit ki tyanai yala virodh karava jasa Saleem khan yanni kela aahe….Aajchya saamana madhe aahe batami……Yanchi himmat hotech kashee Vande matarm virodhat bolayahi…..Yana deshapeksha darm javalacha vatato….an kuthe aaple GADIMA jyani mhale vedmantrahun aamha vandya vandy mataram……..Dhanya aahe……

  • सागर
   मला असं वाटतं की अशा गोष्टींचा राजकारणासाठी वापर करणे पुर्णपणे अयोग्य आहे.
   यावर आता कोणीच काहिही बोलणार नाही- कोणाचीच हिम्मत नाही.. !!
   याच्या विरोधामधे काही बोलणे म्हणजे व्होट बॅंकेला सुरुंग लावणे आहे आणि पोलिटीकल फायदा कांहीच नाही…

 5. लेख वाचला. ’पडसाद’ या ब्लॉगवर असंच काही लिहिलं आहे. http://padsaad.blogspot.com/2009/11/blog-post.html राजीव शी काही प्रमाणात सहमत आहे. दिशाभूल करून गल्लेभरू गोसाव्यांनी माजवलेल्या अवडंबरात निरपराध मुस्लिमांचा बळी जात आहे.

 6. कांचन फारच सुंदर लेख लिहिलाय पडसाद वर.. माझे सुटलेले सगळे पॉइंट्स कव्हर केलेले आहेत.

 7. धन्यवाद! तुम्ही जिहादचा उल्लेख करून दिलात ते बरं केलंत. हा जिहाद सुद्धा अल्लाच्या बंद्यांनी करायचा असतो पण त्यात धर्मगुरू येत नाहीत. कारण धर्मगुरूंनीच जिहाद केला तर जगाला धर्म शिकवणार कोण? म्हणून मग गरीबातले गरीब लोक शोधायचे, धर्माचं बाळकडू पाजून किडीचा साप करायचा की हे बंदे जिहाद करायला मोकळे.

  कसं परस्पर होतं ना काम! तो मेला तर मेला, माझं काय गेलं? पुन्हा तो मरताना जर दोन-तीन बिगर मुस्लिमांना घेऊन मेला तर वाह, वाह! उसे जन्नत नसीब होगी. मला वाटतं, या धर्मगुरूंनीच एकदा जन्नतची ट्रीप करून यावी म्हणजे आम्हाला पण समजेल जन्नत कशी असते ती?

  • या धर्मगुरूंनीच एकदा जन्नतची ट्रीप करून यावी म्हणजे आम्हाला पण समजेल जन्नत कशी असते ती?
   😀
   जन्नत मधे ७२ मुली तरुण कुमारी कन्या मिळतात, शहिद झालं तर.. ह्या ७२ चं लॉजिक मला कधीच कळलेलं नाही..

 8. Ajay says:

  Vande Mataram, ekda nahi hazara vele asglyani mhatala pahije, yachya viruddha udhav thackeray sodun ekana sadha comment karnyachi hi tasadi ghetali nahi. sanatan prabhat chya lokanache sandhe goa bomb madhye nav aali tar sagle ithun tithun petun uthale hote. to deshdroha asen tar vande mataram na mhanane ha deshdroh nahi kaa ? swatrapuriv vande mataram mhatala tar lokana kathya padat hotyaa ani aata vande mataram mhanun naka mhanun jo fatwa kadhala jat aahe he aikun sulavar chadlelya tyaa pratyke swatrantrasainkala kai vedana hot astil te tyalac mahit. khup vedana hotat he asla kahi vachlaa ki, ya muslimachya dadhya pruvi hi kurvalalya jaichyaa ani aatahi tech chalu aahe.

  -ajay

  • या गोष्टीला पुर्वी लांगुलचालन हा शब्द खुपदा पेपर मधे वापरला जायचा. धार्मिक उलेमा, मुल्ला लोकांना आधी असे फतवे काढण्यापासुन रोखण्यासाठी कायदे केले पाहिजे.आणि हीच काळाची गरज आहे.

 9. आनंद पत्रे says:

  निर्बंध/नियम जितके जास्त तितके किचकट होत जातात, आणि एका वेळेनंतर मूळ उद्देशांना ओलांडून जातात. माझ्यामते असेच होतेय इथे.

  • हिंदु धर्मात पण कांही फार निराळं नाही.. उद्या करतोय पोस्ट.. फक्त फरक इतकाच की … असो.. उद्याच लिहितो, नाहितर इथेच एक पोस्ट होईल.. 🙂

 10. Aparna says:

  धर्म ही अफ़ुची गोळी आहे असं कुठंतरी वाचलंय ते अगदी पटतंय…आज तुम्ही या विषयावर लिहीणार हे वाटलंच होतं. नेहमीप्रमाणेच पोस्ट झकास…
  फ़क्त हिंदु आणि मुस्लिमच नाही तर इथे ख्रिश्चनीटीच्या नावाखाली पण काय काय चालतं हे माहित असेलच….माझाही या विषयावर अभ्यास नाही म्हणून फ़ार काही लिहित नाही….

  • ख्रिश्चनीटी बद्दल मला पण फारसं माहिती नाही. पण लवकरंच लिहिन त्यावर पण..जेवढं माहिती आहे तेवढंच..

 11. मला एक कलत नाही स्वातंत्र संग्रामात सगळे मुस्लिम नेते वंदे मातरम उभ राहून म्हणायचेच की मग तेव्ह ते इस्लाम विरोधी नव्ह्तं का? का एकदम स्वातंत्र्या नंतारच झालं….

  • तेंव्हा पण होते.. आणि अजुनही आहेत.. हिंदु म्हणा किंवा मुसलमान म्हणा, एका कडव्यापेक्षा जास्त कोणाला म्हणता येतं? आणि दुसरी गोष्टं, तुम्हाला कोणी म्हणायला सांगतंय कां? मग हे असं उकरुन खरुज कशाला काढायचं? कांही लोकांना सवय असते- नको तिथे बोटं घालायची, आणि मग वांस येतो म्हणुन बोंब ठोकायची.. 🙂

 12. मनोहर says:

  राज

  राज ठाकरे यांच्या मराठीतून शपथ घेण्याच्या फतव्यानंतर अबू आझमीकडून अशा फतव्याची अपेक्षा होतीच.

  • सायनला, या लोकांचे धार्मीक उलेमा की मुल्ला काय म्हणतात ते जमले होते.. तिथेच अशी मुक्ताफळं उधळल्या गेली. हा फतवा तसा जुनाच आहे, फक्त आत्ता पुन्हा त्याची आठवण करुन देण्यात आली . अजमेरला हा फतवा काढला गेला होता..

 13. bhaanasa says:

  आनंद यांच्याशी संपूर्णपणे सहमत आहे. कुठल्याही धर्मात हेच आहे. आणि राजकारणी लोकांनी तर या सगळ्याचा फायदा उठवत पुरता खेळखंडोबा करून टाकलाय. खरे म्हणजे जाहिररित्या धर्माच्या नावाखाली गुंडगिरी करण्यासाठीचे खेळ आहेत हे सगळे. यांच्या बाचे काय जातेय हो….स्वत: सुरक्षित राहून ( यांच्या सुरक्षिततेसाठी बिचारे जवान मात्र मारले जातात ) सामान्य जनतेत प्रक्षोभक बडबड-लिखाण-फतवे काढून आग लावून द्यायची. मग ती मेंढरं कशी आपसात हाणामा~या करत जीवानीशी जात आहेत हे निवांतपणे बघत बसायचे. पुन्हा वर धर्मासाठी बलिदान वगैरे म्हणून पुढच्या वेळीसाठी बळी जाणारे बकरे निर्माण होण्याची तजविज करून ठेवायची. यांना वर जाउन जन्नत/स्वर्ग मिळणार आहे का याची चिंता करायचे कारणच काय हो….ती तर इथेच ते तुमच्या आमच्या छाताडावर नाचून मिळवत आहेत.

  • पुर्वीच्या काळी लोकांना एकत्रीत ठेवण्याच्या साठी धर्माचा वापर केला जायचा. आता त्याचा दुरुपयोग जास्त होतोय..असं वाटतं.

 14. मी says:

  काका,
  वंदे मातरम हे गीत बंकीमचंद्रांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीतले आहे. आनंदमठ मधे ‘परकीय’ आक्रमकांकडून जनतेचा छळ होत अस्तो, राज्य लयाला गेलेली असतात आणि परक्या आक्रमकांनी *व*व केलली असते. अशा वेळी समाजातील सन्यासी हातात शस्त्र घेतात आणि परक्या आक्रमकांची मारतात .. असा काहिसा कथाभाग आहे, त्यांच्याच तोडी असलेले हे स्वातंत्र्यगीत आहे, जे त्या कादंबरीतल्या पात्रांना लढण्याची प्रेरणा देतं. आजकाल चित्रपटात ज्याप्रमाणे गाणी असतात त्याचप्रमाणे ते कादंबरीत आहे. … ही कादंबरी आली तेव्हा ब्रिटिश राज्वटीविरोधात पेटत्या मनांमधे बसलं ते गाणं म्हणजे .. वंदे मातरम .. आता सांगा जे परकीय आक्रमक ‘धर्माचं काम’ म्हणून इथे हल्ला करताताअणि त्यांना हिन्दू संन्यासी पुरून उरतात .. अशा कथानकातलं वंदे मातरम कसं पचनार ?

  जाताजाता .. परवा घरी सगळ्यांनी मिळून स्वा.सावरकर हा चित्रपट पाहिला, जमल्यास नक्की पहा.

 15. Samir says:

  Dear mahendraji,
  Muslimancha Virodh Ahe To Vande Mataram Ya ganayat SwatantryaDevatela ‘Durga’ Ya Devi Barobar Tulana Keli aahe tya mule. Pan kahi provocation nastana FATAVA kadhane he pan chukiche ahe. Sarva Dharmatale Dharmaguru fakta Swatachi Polich Bhajun Ghetat… Hindu Dharmat Asha Dharmgurunchee Kami aahe ka? 2 Varshpurvi Eaka Dharmaguru ne DHARM-Dand Vimanatun Gheun jau dila nahi Mhanun Kiti Gondhal ghatala hota?Te kuthalya Dhramache Rakshan karatat aahe?

  • समीर
   तुम्ही ज्या धर्म गुरुला उद्देशुन लिहिताय, त्याचं नांव आज सामान्य हिंदु माणसाला माहिती नसेल.. आणि नेमका हाच फरक आहे आपल्या आणि मुस्लीम समाजात.. जयेंद्र सरस्वतींच्य़ा वर खुनाची केस सुरु आहे..अशा बऱ्याच गोष्टी आहेत . शेवटी मानवी प्रवृत्ती आहेच नां.. कुठेही गेलं तरीही.
   आज कुठल्याही मुस्लीम माणसाला, बडे इमाम ने बोला है , म्हंटलं की सगळं पटतं.. पण आपल्या कडे तसं नाही, आता हेच बघा नां, तुम्हाला पण धर्मगुरुनी दंड नेणं पटलं नाही, कारण तुम्ही सुशिक्षित आहात..तुमच्या मधे विचार करुन निर्णय घेण्याचि वैचारिक प्रगल्भता आहे.. नेमकी तिच त्यांच्या समाजात मिसिंग आहे.. हाच माझा मुद्दा आहे…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s