ऍक्सीलरेटेड एजिंग

मिसेस डाउटफायर टिव्ही वर पाहिला आणि सिनेमा संपल्यावर थोडावेळ आपण काय पाहिलं हेच कळलं नाही. एका वेगळ्याच ट्रान्स मधे घेउन गेला हा सिनेमा. ही गोष्ट अर्थात बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे..नंतर कांही दिवसांनी तोच सिनेमा हिंदी मधे पण पाहिला चाची ४२०- कमला हसनचा. या सिनेमा मधे कमला हसनचा मेक अप खुपच सुंदर केलेला होता. त्यासाठी खास मेकपमन हॉलिवुडवरून मागवले होते.आणि कमला हसनचे काम पण अगदी अप्रतिम झाले होते..

कमला हसन हा नेहेमीच अशा प्रकारचे प्रयोग करित असतो स्वतःच्या रुपावर. अप्पु राजा आठवतो?? ज्यामधे कमलाहसनने एका ड्वार्फ (बुटक्याचा) रोल केला आहे.प्रत्येक काम पर्फेक्टली झालंच पाहिजे हा याचा अट्टाहास असतो. दशावतारम मधे एका सिन च्या शूटींगसाठी तिन करोड रुपये खर्च केल्याचे ऐकले आहे. असो…मुद्दा कमला हसनचे चित्रपट हा नाही.

कांही दिवसांपूर्वी एक सिनेमा पाहिला होता टिव्ही वर. तसा  सिनेमा पहाण्याचा योग फारच कमी वेळा येतो. कारण टिव्ही वर सासु, सुन, आनंदी, आणि तत्सम सिरिअल्स( नांव लिहिली काय आणि न लिहिली काय) यांचाच कब्जा असतो. कधी तरी शनिवार रविवारी दुपारी सिनेमा बघायला मिळतो, तेंव्हा हा एक सिनेमा टिव्ही वर सुरु होता.स्टोरीलाइन अशी होती की एक मुलगा वयाच्या मानाने खूपच लवकर म्हातारा होतो,  म्हणजे त्याचं वय १८ असतांना तो अगदी ८० वर्षाच्या जख्खं म्हाताऱ्या सारखी त्याच्या शरीराची  स्थिती होते, आणि तशाही परिस्थितीत तो ग्रॅजुएशन पुर्ण करतो… असा कांहीसा चित्रपट होता तो.एका माणसाची घड्याळाच्या विरुध्द रेस… आयुष्य फार कमी , इकडे वय (शरीराचं एजींग मुळे) वाढतंय.. आणि सगळं काही करायचंय.. अशी केविलवाणी धडपड, आणि तसं असतांनाही , हिरोचा आयुष्यातला प्रत्येक क्षण जगण्याची धडपड..!!! अंगावर काटा येतो तो चित्रपट पहातांना.

अमिताभ बच्चन एका सिनेमात काम करतोय पा म्हणून.. त्या सिनेमात त्याने ऍक्सिलरेटेड एजींग सिंड्रोम असलेल्या मुलाचे काम केलेले आहे. त्याचा मेकप केलेला फोटो हल्ली जाहिरातींच्या मधे खूप झळकतो. आणि काल मला सागरने एक लिंक दिली “पा” या चित्रपटाच्या वेब साईटची . त्या मधे  अमिताभ बच्चन चा फोटो  +  आणि प्रोमो व्हिडीओ पाहिला.

आणि या रोगा बद्दल   अगदीच त्रोटक माहिती दिलेली आहे, ‘पा’ च्या साईटवर, म्हणून नेट वर शोध घेतला.   या रोगा बद्दल जेंव्हा वाचलं तेंव्हा अजुन काहीतरी शोधावं म्हणून यु ट्युब वर शोधलं तर एका मुलीचा व्हिडीओ मिळाला, जिला हा रोग झाला होता. या रोगाबद्दल जर कांही अजुन वाचायचं असेल तर यु ट्य़ुब वर जाउन त्या व्हिडीओ च्या शेजारची माहिती वाचा.

हा रोग चाळीस लाखात एखाद्याला होतो. या रोगामधे रुग्णाचे वय  ५ते १० पट जास्त एजींग होतं.  म्हणजे शारीरिक वय जरी १३ असले तरीही शरीराची झिज ही ८० वर्षाच्या म्हाताऱ्या प्रमाणे होते.

त्या मुलीचा व्हिडीओ खाली दिलेला आहे.. तो पहा आणि अमिताभ बच्चनचा व्हिडीओ दिलेला आहे, तो पण पहा-अमिताभचा मेकप अगदी त्या मुली सारखाच केलेला आहे. खूप सारखेपणा आहे .

कौतुक अमिताभचं तर आहेच, या वयात पण त्याने मेकप साठी  तो तासन तास न कुरकुरता बसला, पण  त्याच बरोबर त्या मेकप मन चे पण कौतुक करायलाच हवे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , , . Bookmark the permalink.

29 Responses to ऍक्सीलरेटेड एजिंग

 1. आनंद पत्रे says:

  हम्म…ब्रॅड पीटच्या सुंदर अभिनयाने सजलेला ‘द क्युरिअस केस ऑफ बेन्जामिन बटन’ चे तुकडे यात दिसू नयेत म्हणजे मिळविली. अमिताभच्या अभिनयाबद्दल काही शंका नाही पण… तरीही प्रभाव नसावा हि इच्छा. स्पेशल दिग्दर्शकासाठी नोट.

  • आनंद
   धन्यवाद….मी आत्ताच यु ट्युब वर क्युरिअस केस ऑफ बेंजॅमीन बटन चे तुकडे पाहिलेत. आणि मी जो चित्रपट रेफर करतोय तो हाच… होता. फक्त अर्ध्यामधुन पाहिल्या मुळे नांव माहिती नव्हते.
   माझा मेंदु कुरतडत होता सारखा, की कुठला चित्रपट होता मी पाहिलेला तो.. अतिशय उत्कृष्ट सिनेमा होता. त्या चित्रपटात चा शेवट हा त्याला डिग्री मिळते.. असा केलाय. तुम्ही नांव दिल्यामुळे आता तो मेंदू मधे कुरकुरणारा प्रश्न मार्गी लागला. धन्यवाद..
   तुमचं म्हणणं एकदम मान्य. अमीत च्या अभिनयावर पण ब्रॅड पीट चा प्रभाव झालेला न दिसो म्हणजे मिळवली. कांही तरी वेगळं पहायला मिळावं अशी इच्छा.

 2. Somesh says:

  बाबू मोशाय .. जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए .. 🙂

  • मला तसंही सारखं वाटंत होतंच, की हॉलीवुडच्या स्टोरीलाइन शिवाय आपण चित्रपट कां काढु शकत नाही?? प्रत्येक सिनेमाची स्टोरी लाइन जर्मिनेट झाली असते एखाद्या हॉलीवुड मुव्ही पासुन.

   • आनंद पत्रे says:

    ह्यात आपलाही काही खूप दोष नाही, हॉलीवुड वाल्यांनी इतके हटके विषय अगोदरच हाताळलेत की भारताचे लोकल विषय सोडून आपण काहीच वेगळे देवू शकत नाहीत. फक्त inspiration मध्ये ओरीजनलचा जस्ट उल्लेख असावा… त्याची पण गरज वाटत नाही ह्यांना… हे फक्त पटत नाही….

    • आनंद
     त्यांनी हाताळलेले चित्रपट आहेतच, आणि सोबतंच ते पुन्हा नविन प्रकारचे चित्रपट देण्याचे प्रयत्न करतात. भारतामधे श्वास सारखा चित्रपट किंवा ब्लॅक सारखा पण निर्मीत केला जाउ शकतो, तेंव्हा आपल्या कडे पण टॅलन्ट आहेच, फक्त स्वतःवर विश्वास नसल्याने नवीन काही ट्राय करण्यापेक्षा एखादा प्रुव्हन फॉर्मुला ट्राय करणं सोपं आणि जास्त सेफ वाटतं.

     “फक्त inspiration मध्ये ओरीजनलचा जस्ट उल्लेख असावा…”
     NO WAY!! koni karanar nahi ithe.

     • आनंद पत्रे says:

      ब्लॅक सुद्धा १९६२ साली आलेल्या ‘द मिरकल वर्कर’ पासून इन्स्पायर आहे… 🙂
      काहीजण ओरिजिनल सिनेमाचे हक्क विकत घेतात पण त्यात इतका हिंदी मसाला घालतात की मूळ चव निघून जाते, ताजे उदाहरण म्हणजे ‘Death at the funeral’ ची अधिकृत हिंदी आवृत्ती ‘Daddy Cool’…

 3. Sagar says:

  Ya pic madhun Tya rogabaddal thodi jagruti zali v pidit lokana fayda vhava hi apeksha….Chala Bollwood sudha kahitari vegl try karatay…..An amitabh baddal bolaych tar tychapeksha make up man la manayla hav…..

  • आनंदने वर लिहिलंय ना , मी पण तोच चित्रपट पाहिला होता. ह्या रोगाची वारंवारिता ही चाळीस लाखात एक अशी आहे. म्हणुन ह्या रोगाबद्दल जागृती निर्माण करुन कांहीच फायदा नाही असे वाटते.तरी पण एक चाकोरीबाहेरचा चित्रपट म्हणुन या कडे पहाता येईल.
   ब्लॅक मुळे अमिताभ बद्दलच्या अपेक्षा खुपच वाढलेल्या आहेत.आनंदने लिहिल्याप्रमाणे त्याने ब्रॅड पीट ची नक्कल करु नये असे वाटते. 🙂

 4. shyam says:

  Sadhya TV var ek serial chalu ahe – Aap ki Antara. Kay sold kam kartiay Antara. Movies cha manshil tar mala punayat 8 varshay zali pun tevdhi sudha picture baghitale nahit rather ischya pun zali nahi. Shevatacha baghitala to Tare Zamin par. Picture madhhe kahi tari vegala vishay asla tarach to pahanyat kahi tari maza ahe. Baghu ya navin picture baddal utsukta tar nirman zalich ahe. Pan yaar Amitabh la manlach pahije. Ya vayat hi challanges !! God bless him for further so many years.

  • शाम
   अमिताभ कडुन फार जास्त अपेक्षा असल्यामुळे, आपला अपेक्षाभंग होणार नाही याची काळजी त्याने घेतली पाहिजे. अर्थात त्याच्या अभिनय क्षमते बद्दल कांहीच संशय नाही. तो प्रत्येक काम अगदी जीव ओतुन करतो, आणि हेच त्याच्या यशाचं खरं कारण असावं..!
   बरं या सिनेमामधे अमिताभच्या वडिलांची भुमीका केलेली आहे अभिषेक ने आणी आई आहे विद्या बालन.. !! कुल नां??

 5. Rohini says:

  दोन्ही व्हिडीओज बघितले. अमिताभ चा मेकअप छानच झाला आहे. तरी आनंद ने वर लिहिल्याप्रमाणे बेंजामिन बटन चा पगडा नसला म्हणजे मिळवली. द क्युरीअस केस ऑफ बेंजामीन बटन मी बघितला आहे. त्यातही ब्रॅड पीट चा मेक अप आणि अभिनय सुंदर आहे. आता बघु अमिताभ काय करतो ते. अपेक्षा आहेतच. आणि अमिताभ पुरी पडेल अशी आशा आहे. लवकरच कळेल.

  • रोहिणी
   अमिताभचं पण अगदी सचीन सारखं आहे, प्रत्येक वेळी त्याने सेंचूरी काढावी अशी इच्छा असते आपली. अर्थात, जो कॅपेबल आहे त्याच्याकडुनच अपेक्षा केली जाते नां..म्हणुनच हा सिनेमात त्याने आपली स्वतःच्या पध्दतीने ऍक्टींग करावी मग ते पहायला बरं वाटेल..

 6. हे जिवाला खूप चटका लावणारं आहे. जेव्हा आपल्याला आशा असते तेव्हा आपण शेवटचा प्रयत्नही निकराने करतो, अशा ठिकाणी काय करायचं हेच समजत नाही.रॉबिन विल्यम्सने या घटनेशी साधर्म्य असणारा जॅक हा चित्रपट केला होता. ज्यात तो वयाने लहान मुलगा असतो पण त्याचं शरीर म्हातारं होत जातं. ग्रॅज्युएशनच्या वेळेस त्याचं शरीर ८० वर्षांचं झालेलं असतं. त्यातही आई-वडील आणि जॅक यांच्यातील नात्याचं फार सुरेख चित्रण करण्यात आलं आहे. ’पा’ रिलीज झाला की जरूर पाहिन.

  • कांचन
   मी पण बहुतेक पाहिन हा.. पण आधी तुम्ही पहा, तुमचा रिव्ह्यु लिहा, तो वाचल्यावर मी पाहिन.. 🙂

   • जरूर. चित्रपट प्रदर्शित होण्याचीच वाट पहाते आहे. बच्चनने त्याच्या सेकंड इनिंगमधे प्रयोगशील अभिनयाकडे वाटचाल सुरू केली आहे. माझा तर तो फेवरिट नट आहे.

 7. अमिताभ च्या अभिनय बाबत वाद नाही तो छानच करेल अभिनय जर ब्रॅड पीटची कोपी करायला गेला नाही तर ..मागे ‘झूम बराबर झूम’ मध्ये जौनि डेप ची कॉपी केलि होती अमिताभने पण तिताकिशी जमली नाही झाली नाही त्याला..तरीही एक वेगळा प्रयोग म्हणून बघायला हरकत नाही हा सिनेमा …(कालच अजब प्रेम की गजब कहानी पाहिला त्यात रणबीर ने जिम केरी ची चांगली कॉपी केली आहे )

  • ” अजब प्रेम की गजब कहानी पाहिला त्यात रणबीर ने जिम केरी ची चांगली कॉपी केली आहे ”
   देवेंद्र
   कॉपी मास्टर आहोच आपण… कांही तरी नविन करायला हवं..
   हल्ली सिडी असल्यामुळे इंग्रजी सिनेमे पहाणं अगदी कॉमन झालंय.
   पुर्वी धर्मात्मा पाहिल्यावर तो गॉड फादरवर बेतला आहे हे खुप उशिरा समजलं होतं.
   आजकाल, हॉलीवुड ला सिनेमा रिलिझ झाला की नेट वर इथे पण पहाता येतो.

 8. bhaanasa says:

  द क्युरिअस केस ऑफ बेन्जामिन बटन’मधले ब्रॆडचे काम चांगले झालेय. अमिताभ हा माझा अत्यंत आवडता. मी या ’पा’ बद्दल खूप ऐकतेय.कोणाचीही नक्कल न करता अमिताभने स्वत:च्या पध्दतीने हे काम करावे, बास. महेंद्र तू ’विरूध-Viruddh ’ पाहिला होतास का?

  • मी फारच म्हणजे फारच कमी सिनेमा पहातो. अगदी चुकुन कधी तरी टुर वर असतांना संध्याकाळी कधी बोअर झालं तरंच…शेवटचा सिनेमा हॅरीपॉटर पाहिला होता मुलींच्या सोबत. 🙂 ,

 9. sachin says:

  काका गुगल ला सर्च करा ……
  bollwood movies copied from hollywood

 10. Rajeev says:

  असाच एक चीत्रपट होता… परफ़ेक्ट कोपी

  जसाच्या तसा ..कोपी टू कोपी…. माशी टू माशी स र्व सीन डाय लोग ….
  फ़क्त
  हिन्दी मधे ऋशी कपूर आणी शोमा आनंद होती ……………हां ………..( बारूद)
  ईंग्रजी मधे “Summer Time Killer ” डायरेक्टर Antonio Isasi होता
  आणी हीरो हीरोईन कार्ल माल्डोन-क्रिस्तोफ़र मीत्चुम होते
  प्रोडुसर हा हिन्दी होता … आत्ताच वारला … कोण बरे ?

 11. Rajeev says:

  आप ल्या समाजात एक रोग असाच आहे…
  काही तरूणांच वय कमी असत .. पण मन म्हतारं…..
  अशे लाखात सत्तर हजार तरी असतील,
  ओळखू येत नाहीत

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s