सुनीताबाई देशपांडे

 Sunitabai Deshpande

सुनिताबाई देशपांडे

एकदा न्यु माजरी कोल फिल्डस मधे काम होतं म्हणुन वरोऱ्याला जाणं झालं. कामाच्या निमित्ताने का होईना, पण वरोऱ्याला जाणं झालं की बरं वाटतं. असं म्हणतात की जिथे तुमची नाळ गाडली गेली असते तिथे तुम्हाला नेहेमीच जास्त कम्फर्टेबल वाटतं. वरोऱ्या बरोबरच्या माझ्या बऱ्याच सुंदर आठवणी आहेत  लहानपणीच्या , म्हणून वरोऱ्याला जायचं म्हट्लं की इतका आनंद होतो की  “पंछी बनु… ” म्हणट नाचावसं वाटतं….

नागपुरला सकाळी पोहोचल्यावर, विमानतळावरुन टॅक्सी करुन न्यु माजरीला निघालो. वेस्टर्न कोल फिल्ड्स मधे मिटींग होती १२-३० ला . कामं आटोपून परत येतांना बाबा आमटेंना भेटुन यावं म्हणुन आनंद वनाकडे मोर्चा वळवला.न्यु माजरी पासुन खूपच जवळ म्हणजे फार तर १०-१५ किमी असेल आनंदवन. त्या काळी बाबांची तब्येत थोडी नरम गरमच होती. त्यांना नमस्कार केला, आणि म्हट्लं.. ’बाबा मी आप्पाजींचा नातु’ .. अस व्हय.. कोणाचा रे तु?? म्हंटलं सुहास चा मोठा मुलगा .. एकदम ओळखल्याचं ह्सूं आलं चेहेऱ्यावर. बाबांचं गावातलं घर आमच्या अजोबांच्या घरा शेजारचं..

शेजारीच कृष तरी पण ट्रेडमार्क चष्म्यामुळे भाई पण बसले होते पण, क्षणभर विश्वासच बसला नाही..  इथे पुलं कसे काय हा प्रश्न मनात आला.    बाजुला सुनीता बाई  बसल्या होत्या, त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रसन्न हास्य पाहून बरं वाटलं. खादीची साडी, गळ्यात काळ्या मण्यांची माळ आणि बस्स!!इतक्या सुंदर दिसत होत्या की त्यांच्याकडे  पहातच राहिलो  .   पुलं ना आणि  शेजारच्या सुनिता बाईंना  पण नमस्कार केला. ही माझी पुलंची पहिली आणि शेवटली भेट – अगदी अनपेक्षित झालेली .तसंही आहे मनोहर तरी वाचल्यामुळे सुनिताबाईंची थोडी ओळख झालेलीच होती .   एकदा आत्मचरित्र लिहिलं की तुमच्या जिवनातले बरेच बरे वाईट प्रसंग लोकांना समजतात, आणि तुमच्या बद्दल एक आपलेपणा निर्माण होतो लोकांच्या मनात. अगदी हेच झालंय सुनीताबाईंच्या बाबतीत.

काल सुनीता ताई गेल्या म्हणून एक मेसेज टाकला होता सागरने.आधी मला समजलंच नाही की कोण सुनिता ताई ते. नंतर संध्याकाळी त्यावर आनंदचं उत्तर होतं की सुनीताबाई देशपांडे.. आणि ते वाचल्यावर एकदम धक्काच बसला, आणि त्यांच्या भेटीचा हा प्रसंग आठवला- आणि  खुप वाईट वाटलं.आणि सुनिताबाईंना तर प्रत्यक्ष पाहिलेलं आहे.. त्यामुळे   कॊणी आपल्या जवळचं माणुस गेल्याप्रमाणे वाटलं. इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.. !!अतिशय निःस्वार्थ आणि समाजाशी नाळ जुळलेलं दांपत्य म्हणून पुलं आणि सुनिताबाई कायम स्मरणात रहातील.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized and tagged , , . Bookmark the permalink.

29 Responses to सुनीताबाई देशपांडे

 1. काका तुम्ही खरच खूप भाग्यवान आहात. पुलं, सुनीताबाई आणि बाबा आमटे या तिघांना एकत्र भेटण्याचा योग तुम्हाला आला. आज पुलं देशपांड्यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी सुनीता बाई गेल्या. पुलं देशपांडे आणि सुनीताबाई यांचे लग्न १२ जून १९४६ ला रत्नागिरीला झाले आणि पु ल चे देहावासान देखील १२ जूनलाच झाले. किती विचित्र योगायोग आहेत नाही?

  काल म टा वर सुनीता बाई च्या “एक पत्र… भाईसाठी” ह्या लेखा मधल्या खालील ओळी मनाला फार भावल्या. “तू गेलास उद्या मीही नाहीशी होणार पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वत:च्या तेजाने चमकतच राहील ना?”

  • वाईट वाटतंय.. आजच्या तर प्रत्येक पेपरमधे त्यांच्यावर लेख आहे. सगळे वाचतोय आता..
   पुलंनी त्यांचा शेवटचा बराचसा काळ तिथेच घालवला. सेवा करित..

 2. Pravin says:

  या तीन विभूतींना प्रत्यक्ष भेटण्याचे तुम्हाला भाग्य लाभले. तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच. खरच सुनीताबाईंच्या जाण्याने मराठी साहित्यविश्वात एक पोकळी निर्माण झालीय. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

  • प्रविण
   पुण्याला होतो पांच वर्षं , पण पुण्याला असतांना ट्रेकिंग ची आवड होती, म्हणुन आप्पांना ( गोनिदां) भेटलोय दोन वेळा. पण भाईंना भेटायला जाणं झालं नाही. तेंव्हा मला फारशी आवड नव्हती वाचनाची वगैरे. फक्त ट्रेकिंग हाच एक कीडा डोक्यात वळवळायचा..
   खरंच तो प्रसंग ..अगदी अनाहुत पणे जुळुन आला होता. मी तर विसरुनही गेलो होतो, पण आज जेंव्हा ती बातमी कळली तेंव्हा आठवलं..आपल्या स्वतःच्या नशिबाचा आज हेवा वाटतोय..

 3. sahajach says:

  खरय तुमच्या नशिबाचा हेवा वाटतोय आज…पु.ल., सुनीताबाई आणि बाबा आमटे तिघांनाही भेटणे हे अनेकांचे स्वप्न आता अपुर्ण राहिलेले. पु.ल. आणि सुनीताबाईंची नि:स्वार्थ सामाजिक बांधिलकी खूप प्रेरणा देणारी आहे.
  त्यांना मनापासून सलाम!!!!

  • अहो, साधी गोष्ट आहे, एखादी गोष्टं नाही म्हंटलं की तिची किम्मत कळते. बरेचदा सौ. ला सोडलंय साहित्य सहवासच्या गेटवर , पण अजुनही एकाही साहित्यिका कडे गेलेलो नाही तिच्या बरोबर..

 4. Sagar says:

  Sir Tumhi Kharch khup bhagyvan aaht…….
  Sunitatainchya kahi Bhavmudra MT var aahet.Link post kartoy….
  http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowpics/5207577.cms

 5. नशीबवान आहात! असे प्रसंग अनाहूतपणे घडतात आणि आयुष्यभर आपल्या मनात घर करून रहातात. पु.ल. आजोबांसारख्या प्रतिभावान व्यक्तीमत्त्वाची सहचारिणी असूनही सुनीता आजींची स्वत:ची अशी वेगळी ओळख होती. खूप वर्षांपूर्वी एकदा पु.ल. आजोबांनी मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांना गाडी चालवता येत नाही, म्हणून सुनीताआजीच गाडी चालवतात. ते खरंही आहे. सुनीताआजींनी पु.ल. आजोबांच्या संसाराची गाडी खरोखरच सुखरूप चालवली. ’लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात’ असं जे म्हटलं जातं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुनीताआजींची पु.ल. आजोबांना मिळालेली साथ. दोघांनाही उत्तम लेखनाची आणि रसग्रहणाची आवड! सुनीताआजींचा कुठलाही फोटो पहा, त्यांच्या चेहे-यावरचं तेज किती सात्विक आहे. पु.ल. आजोबांचा फोटो पाहिला की प्रसन्न वाटतं आणि सुनीताआजींचा फोटो पाहिला की एकदम शांत वाटतं.

  • त्यांचे फार कमी फोटो आहे जालावर. पुलं स्वतः एक प्रोफेशनल फोटोग्राफर होते. सौ. सांगत होती, मुंबई मराठी दादर ला एक रेफरन्स पुस्तक आहे ,त्यात पुलंनी काढलेले बरेच फोटो आहे त्यांचे.. ते पुस्तक घरी नेउ देत नाहीत म्हणे..
   पुलंनी आनंदवनाला खुप मोठी देणगी दिली , आणि नुसते पैसेच (कुठेही नांव न येउ देण्याच्या अटींवर)दिले नाहीत तर तिथे राहुन कुष्ठ रोग्यांची सेवा पण केली. अतिशय मोठा माणुस ..पुलं म्हणजे पुलं.. त्या दोघांचं समाजासाठी दिलेलं कॉंट्रिब्युशन नेहेमीच लक्षात राहिल.

   • वा! हे तर मला माहितच नव्हतं. थोर माणसं अशीच असतात. कुठेही बडेजावपणा न करता आपलं काम करून जातात.

 6. आनंद पत्रे says:

  http://www.puladeshpande.net/ या साईटवरची आदरांजली मनाला भावली!

  “या प्रतिभेला(पु लं) ज्या आणखी एका विलक्षण प्रतिभेची अखेर पर्यंत साथ लाभली, त्या सुनीताबाईंचे ७ नोव्हेंबरच्या रात्री पुण्यात निधन झाले. गेले अनेक महिने आजारी असलेल्या सुनीताबाई अखेरच्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी ८ नोव्हेंबरच्या दिवसाचीच वाट बघत असाव्यात की यालाच विचित्र योगायोग म्हणायचे?”

  तुम्ही खरंच भाग्यवान आहात.

  • आनंद
   मी पण वाचलं त्या साईटवर जाउन. आज सकाळी आधी दिपकची साईट पुलंप्रेम चेक केली, नंतर ही साईट. खरंच सुंदर आहेत ओळी.
   अनेक गोष्टी नकळंत घडतात.. अनेक लोकं असेच नकळंत आयुष्यात येउन जातात.. तेंव्हा त्याचा सिरिअसनेस वाटत नाही फारसा. पण नंतर मात्र जाणवतं.

 7. bhaanasa says:

  महेंद्र खरेच नशिबवान आहेस. या तिनही महान व्यक्तिंना जवळून भेटण्याचा योग आलाच नाही.आता येणारच नाही.
  “तू गेलास उद्या मीही नाहीशी होणार पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वत:च्या तेजाने चमकतच राहील ना?” किती खरे शब्द आहेत हे. तुम्ही आमच्या काळजात अमर आहात.सलाम.

 8. Anonymous says:

  पु ल देशपांडे यांनी आमटे यांना भरपूर पैसा दिला, पण स्वतः कुष्ठरोग्यांची सेवा कधीही केली नाही. तो त्यांचा स्वभावच नव्हता. ते अत्यंत आळशी होते. घरी दाराजवळ मोकळे बसले असतानाही ते बेल वाजल्यास उठत नसत. हातातलं काम सोडून सुनीताबाईंना दार उघडावं लागत असे. हा सगळा तळतळाट सुनीताबाईंनी ‘आहे मनोहर तरी’ पुस्तकात मांडला आहे. त्याची नंतर बाईंनी सवय करून घेतली.

  बाई अतिशय कडक होत्या. आधी वेळ न घेता आलेल्याला चक्क हाकलून देत. सुरेश भट कसे वेळ न घेता गेले, त्यांनी कसा त्रास दिला, आणि त्यांना पु लं नी कसं घरातून घालवलं याची हकीकत ‘प्रिय जी ए’ या पुस्तकात बाईंनी दिली आहे. ‘मला ‘पी एल च्या दारात बांधलेलं कुत्रं’ असं काही लोक म्हणतात’, हे त्यांनी बिनधास्तपणे लिहिलं. हा त्यांचा एक विशेष. त्या तत्त्वाला घट्ट धरून राहत. लोक काहीही म्हणोत. पु लं च्या निधनानंतर काही इतरभाषियांनी मला काही प्रश्न केलेत. म्हणून त्या साहित्याबद्दल मला सुनीताबाईंशी काम होतं. त्यांच्या नियमांची मला कल्पना होतीच. मी वेळ घेतली आणि गेलो. बाई छान दोन तास संतसाहित्य, इंग्रजी साहित्य, बोरकर – वसंतराव देशपांडे हे त्यांचे मित्र या सर्वांवर गप्पा करत होत्या.

  बाईंचा अजून एक स्वभावविशेष म्हणजे त्या अत्यंत निरिच्छ होत्या. रामदासांच्या भाषेत ‘उदास’. एकदा लोक त्यांची परवानगी मागायला गेले. नव्या वाचनालयाला ‘पु ल देशपांडे वाचनालय’ नाव देण्यासाठी. त्या म्हणाल्या, सगळेच लोक पु लं चं नावच का देऊ पाहतात? त्यांनी सूचना केली: ‘कुसुमाग्रज वाचनालय’ नाव ठेवा, कारण ते एवढे मोठे साहित्यिक आहेत. पु ल स्वतः उदास वृत्तीचे. त्यांनी ही सूचना उचलून धरली. मग त्या लोकांनी कुसुमाग्रजांशी संपर्क करून ते नाव दिलं.

  प्रेमात पडण्याआधी पु ल, आणि त्यांचे मित्र सुनीताबाईंना त्यांच्या अपरोक्ष ‘खादीवाली’ म्हणून चिडवत. पुढे मित्र सल्ला देत: ‘तू असा आळशी. तुला त्या खादीवालीबरोबर संसार झेपेल का?’ पण सुनीताबाईंनी योग्य ती शिस्त पु लं वर लादली. आणि त्यांना लेखनासाठी मोकळा वेळ मिळेल याची काळजी घेतली.

  • धनंजय
   पुलंनी महोन महिने आनंद वनात मुक्काम केला आहे, शेवटले बरेच महिने ते आनंद वनातच असायचे. म्हणुन मी त्यांनी कुष्ठ्र्रोग्यांची सेवा केली असे लिहिले आहे. यात, डॉम्निक लोपायरच्या सिटी ऑफ जॉय मधे लिहिलेल्या सेवांप्रमाणे सेवा अभिप्रेत नाही.पैशाने केलेली मदत तर आहेच….
   खादी वाली म्हणुन केलेली चेष्टा मी पण वाचलेली आहे. एक बघा, तुम्ही कदाचित यशोदा बाईंचं पण पुस्तंक वाचलं असावं, अगदी खरं सांगतो, ते पुस्तक वाचल्यावर मला क्षणभर खुप राग यायचा पाडगांवकरांचा… हे असे कां वागतात म्हणुन.. पण नंतर लक्षात आलं की हे आत्म चरित्र जेंव्हा आपण वाचतो, तेंव्हा ते एकाच्या दृष्टीकोनातुन लिहिलेली आपल्या जोडीदाराबद्दलची भावना असते. त्या मधे आपल्या जोडीदाराचा उपमर्द करावा अशी इच्छा नसते, फक्त जर पन्नास वर्षापुर्वीचे मनातले भाव लिहितांना थोडा कटु पणा येणं पण सहाजिकच आहे.
   तुमच्या मतांशी सहमत आहे.

 9. Pravin Chavan says:

  Mi aaj edinburgh la alo hoto mitrakadhe (ratnagiricha ahe toh ani mi chiplun cha) ……… mi kai sangat hoto ha tar mi tyachyakade glasgow hoon edinburghla alo hoto tar gappa chalu hotya amchya tar mi shivajiraje bhosale boltoy chitrapatacha wishay nighala ani mi googling kele ani tumcha blog bhetla…mhatal blog ani tohi marathit wachawa mhanun wachla ani kharach khupch interesting watla ……tumcha recent blog wachla …..khup dukh zal wachoon……mi 2002 te 2003 anandwan madhe hoto tithe ek biotechnology dept (govt of india) funded project war research officer hoto tyawelela babanchya barobar kahi diwas rahnyacha yog ala hota ata tumcha blog wachoon sarv atwani tajya zalya…Babani je kahi kelay tyala tod nahi………..Baba PL and sunitabai tyanchya sarakhe tech punha dusre hone nahi…………….tyana manpurwak salam.

  • प्रविण
   आवर्जुन दिलेल्या अभिप्रायाबद्दल आभार. खरंच बाबांनी केलेलं काम फार मोठं आहे, पण तुम्हाला माहिती नसेल , जेंव्हा त्यांनी हे काम सुरु केलं तेंव्हा गावातल्या लोकांनी त्यांना खुप नावं ठेवली.. नेहेमी म्हणायचे.. आमट्यांचा मुरली.. नुसते महारोगी अन भिकारी जमा करुन बसतो त्या तिकडे आनंद वनात.. चांगली शेती करावी.. पण नाही.. इतकं असुनही त्यांनी आपलं काम कांही सोडलं नाही. जाउ दे.. आता खरं लिहितो.. गावातले लोकंच नाही तर असं माझे आजोबाच म्हणायचे तेंव्हा. अगदी शेजारचंच घर होतं त्यांचं माझ्या आजोबांच्या .पुर्ण वेळ तिकडेच असायचे ते.
   सुनिताबाईंनी खरंच खुप साथ दिली पुलंना..

 10. Anonymous says:

  ‘पुलंनी त्यांचा शेवटचा बराचसा काळ तिथेच घालवला. सेवा करित..’

  १९९३-९४ पासून पु लं ना पार्किन्सन’स चा त्रास होता; तो पुढे इतका वाढला की त्यांना समोर खूप लोक आलेले सहन होत नसत. त्यांनी घरी मैफिलींसाठी गायकांना बोलवणं पण बंद केलं. हे सुनीताबाईंनी पुस्तकात लिहिलं असेल किंवा मला प्रत्यक्ष बोलल्या असतील. ते प्रकृती साथ देत असताना आनंदवनात जात, पण शेवटचा काळ त्यांना पुण्यात घरीच घालवावा लागला. बाबासाहेब आमटे हा माणूस थोर समाजसेवक. पण तेही २००० सुमारास (नक्की साल आठवत नाही) आनंदवनातून बाहेर पडले होते, आणि मुस्लिमांची चमचेगिरी करत फिरत होते. नर्मदा आंदोलनात ते मेधा पाटकरांच्या बाजूचे होते. पण या विरोधाकडे दुर्लक्ष करून सरकारनी ते धरण बांधावं या मताचाही दुर्गाबाई भागवतांसारख्या लोकांनी पुरस्कार केला होता. यातले काही विषय वादग्रस्त आहेत, आणि एक पक्ष पूर्ण बरोबर आणि एक पूर्ण चूक अशा स्वरुपाचे नाहीत.

  ‘रुपाली’त पु ल आणि सुनीताबाई मजेत होते. तिथून हलायची त्यांची इच्छा नव्हती. पण सुनीताबाईंच्या भाचीला त्यांच्या मदतीसाठी नेहमी यावं लागे. म्हणून मावशी-भाची यांनी भांडारकर मार्गावर जवळ घरं घेऊन मुक्काम हलवला. डॉक्टरकडे स्वतः जाण्याची पण पु लं ची परिस्थिती नव्हती. अमेरिकेत तो रोग शस्त्रक्रियेनी बरा होतो अशी (खोटी) बातमी तेव्हा होती. अमेरिकेतल्या डॉक्टरशी सुनीताबाई बोलल्या होत्या. पुढे काय झालं मला आठवत नाही. पण पु लं ची प्रकृती विशेष सुधारणार नाही, हे डॉक्टर बोलले होते. त्या डॉक्टरांचा बाईंनी ‘देवमाणूस’ असा उल्लेख केला होता.

  • तुम्हाला निश्चीत जास्त माहिती आहे. माझी फक्त एक लहानशी भेट झाली होती.. अजुन कांही माहिती असेल तर अवश्य पोस्ट करा. धन्यवाद…..

 11. Smit Gade says:

  आम्ही ह्या जानेवारीत गेलो होतो सुनीता ताईना भेटन्यासाठी। पण त्यांची परिस्थिती खुपच खालावलेली होती। आम्ही दरवाज्यातूनच परत आलो । पण तेव्हा सुद्धा आतून कायम कन्हन्याचा आवाज येत होता । ते ऐकूनच काळजात चर्र झाल। परवा सुनीता ताई गेल्या। तुम्ही खरच भाग्यवान आहात तुम्ही भाई आणि सुनीता ताईना भेटला आहात ।

 12. दिपक says:

  शनीवारी जेव्हा ही बातमी जेव्हा टिव्हीवर झळकली तेव्हा हातातला रिमोट गळुन पडला. क्षणभर स्तब्ध झालो. पु.ल. जन्मदिनाच्या एक दिवस आधी सुनीताबाईंचे जाणे मनाला घोर चटका लावून गेले. कालचा दिवस त्यांचीच पुस्तके आणि आठवणी वाचत होतो. सगळ्या आठवणींनी मनात गर्दी केली. त्यांना आज इथे http://cooldeepak.blogspot.com/2009/11/blog-post.html वाटही दिली.
  महेंद्रा नशीबवान आहेस तुला त्यांना भेटायला मिळाले.. पु.ल. गेले आता सुनीताबाईही गेल्या एक पर्व संपले… वाईट वाटतं आपण आता अश्या जगात वावरत आहोत जिथे भाईकाका आणि माई नाहीत.

  दिपक
  पु.ल.प्रेम –> http://cooldeepak.blogspot.com

 13. Aparna says:

  तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात की तीन एकापेक्षा एक दिग्गजांची भेट व्हावी.. हा लेखही छान झालाय..

Leave a Reply to महेंद्र Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s